टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ घोषित

वेडा बेडूक's picture
वेडा बेडूक in काथ्याकूट
30 Apr 2024 - 9:36 pm
गाभा: 

बीसीसीआयने १ जूनपासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ साठी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये मुख्य संघातील 15 आणि तीन राखीव खेळाडूंचा समावेश आहे. भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा याच्याकडे टी 20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर आयपीएल स्पर्धेतील खराब कामगिरीमुळे सातत्याने टीकेचा धनी ठरत असलेल्या हार्दिक पंड्या याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.

भारतीय संघ खालीलप्रमाणे:

  • फलंदाज - ४: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव
  • अष्टपैलू - ४: हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल,शिवम दुबे,
  • यष्टीरक्षक - २: ऋषभ पंत, संजू सॅमसन
  • फिरकीपटू - २: कुलदीप यादव, युजवेंद्र चहल
  • वेगवान गोलंदाज - ३: अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज
  • राखीव खेळाडू - ४: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.

हा तात्पुरत्या स्वरुपाचा संघ असून २५ मे पर्यंत प्रत्येक देशाला घोषित केलेल्या संघात बदल करण्याची मुभा आहे.

या संघाविषयी क्रिकेटप्रेमी मिपाकरांचं काय मत आहे? कोणते खेळाडू यात नको होते? कोण असायला हवे होते? या संघात काही बदल होतील का? याविषयी चर्चा व्हावी.

विनम्र विनंती: क्रिकेट मध्ये रस नसलेल्यांनी किंवा "कसोटी क्रिकेट हेच खरं क्रिकेट" अशी मतं असलेल्यांनी कृपया ती मतं या धाग्यावर व्यक्त करुन विषयांतर करु नये. विषयाला धरुन चर्चा करावी.

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 May 2024 - 1:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हार्दीक पांड्याचा परफॉर्मन्स पाहिलाय आयपीएल मधे फोकलीच्याला घेतलं नसतं तरी चाललं असतं.
संघात अजून एखादा वेगवान गोलंदाज पाहिजे होता. बुमराचं काय चाललं तर चालतो.

बाकी, अजून लिहित राहीन.

-दिलीप बिरुटे

अमरेंद्र बाहुबली's picture

1 May 2024 - 2:53 pm | अमरेंद्र बाहुबली

क्रिकेट हा फालतू खेळ आहे. पाहून आजीबात वेळ घालवू नये असा.