चित्रपट - स्वातंत्र्यवीर सावरकर

निनाद's picture
निनाद in काथ्याकूट
28 Mar 2024 - 3:05 pm
गाभा: 

स्वातंत्र्यवीर सावरकर: चित्रपट
'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा क्रांतिकारी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहण्याचा योग आला. रणदीप हुड्डा यांनी दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका साकारली आहे.

प्लेगची साथ त्यात ब्रिटिश शिपायांची क्रूरता दाखवत चित्रपट सुरुवातीलाच पकड घेतो. चित्रपट सावरकरांच्या बालपणापासून ते अंदमानच्या सेल्युलर जेलमधील क्रूर कैदेपर्यंतच्या प्रवासाचे चित्रण यात आहे. सावरकरांच्या क्रांतिकारी कारवाया, साहित्यिक योगदान, सामाजिक सुधारणा आणि हिंदुत्वाचा विचार यांचा समावेश आहे.
सुटके नंतर रत्नागिरीमध्ये राहून त्यांनी दलितांसाठी कार्य दाखवले आहे. सावरकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी प्रचंड कार्य केले. त्यांनी जातीव्यवस्थेवर टीका केली आणि दलितांना समान हक्क मिळवून देण्यासाठी लढा दिला हे व्यवस्थित पणे दाखवले आहे.

सावरकरांनी दलितांसाठी अनेक सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. त्यांनी बालविवाह आणि विधवा पुनर्विवाहासारख्या प्रथांना प्रोत्साहन दिले. सावरकरांनी दलितांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळवून देण्यावर भर दिला. त्यांनी दलितांसाठी शाळा आणि hostels उघडली आणि त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, हे मात्र त्यात दाखवले गेले नाही. कदाचित आंबेडकर आणि सावरकर यांना एकत्र कार्य करायला संधी मिळाली असती तर किती छान झाले असते असा विचारही चमकून गेला.

सावरकरांनी 'घरवापसी' नावाची चळवळ सुरू केली. या चळवळीचा उद्देश इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित झालेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात परत आणणे हा होता. हे लोक मुळचे हिंदू होते आणि त्यांना फसवून किंवा जबरदस्तीने धर्मांतरित केले गेले होते. त्यातली तुरुंगातली दृष्ये चांगली झाली आहेत. धर्मांतरीत झालेल्या व्यक्तीची हिंदू धर्मात परत घरवापसी असा सीन बहुदा चित्रपट सृष्टीत पहिल्यांदा चित्रित करण्याचा मान रणदीप हुड्डा यांना गेला असावा. यांनी सावरकरांची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. इतर कलाकारांनीही चांगली कामगिरी केली आहे.

मात्र राहून राहून एक गोष्ट वाटत राहिली की सावरकरांनी मादाम कामा यांचे ऐकले असते आणि ते इंग्लंडला परत न जाता फ्रांस मध्येच राहून त्यांनी कार्य केले असते तर कदाचित भारताचा इतिहास निराळाच झाला असता.

चित्रपटगृहात जाऊन पहण्यासारखा चित्रपट आहे नक्की!

रिलीजची तारीख: २२ मार्च २०२४
दिग्दर्शक: रणदीप हुड्डा
कलाकार: रणदीप हुड्डा, साई मांजरेकर, चंकी पांडे
निर्माता: संदीप सिंह, रणदीप हुड्डा

प्रतिक्रिया

निनाद's picture

28 Mar 2024 - 3:10 pm | निनाद

यावर एक लेख आहे हे लक्षात न आल्याने हा लेख लिहिला गेला. असो!

Bhakti's picture

28 Mar 2024 - 3:26 pm | Bhakti

छान लिहिले आहे.
हम्म,कलाकार यादी चुकली आहे /अपडेट करायची राहिलेय :)
आणि मादाम कामाचा रोल जिने केला ती रणदीप हुड्डाची बहिण आहे-अंजली हुड्डा.

निनाद's picture

29 Mar 2024 - 4:35 am | निनाद

क्षमस्व!
यादी पुढील प्रमाणे:

 1. विनायक दामोदर सावरकरांच्या भूमिकेत रणदीप हुडा
 2. तरुण वीर सावरकरांच्या भूमिकेत वरुण बुद्धदेव
 3. यमुनाबाई सावरकरांच्या भूमिकेत अंकिता लोखंडे
 4. गणेश दामोदर सावरकरांच्या भूमिकेत अमित सियाल
 5. नारायण दामोदर सावरकरांच्या भूमिकेत चेतन स्वरूप
 6. महात्मा गांधींच्या भूमिकेत राजेश खेरा
 7. बीआर आंबेडकर यांच्या भूमिकेत लोकेश मित्तल
 8. सुभाषचंद्र बोसच्या भूमिकेत ब्रजेश झा
 9. बाळ गंगाधर टिळकांच्या भूमिकेत संतोष ओझा
 10. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या भूमिकेत राहुल कुलकर्णी
 11. जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत संजय शर्मा
 12. मदनलाल धिंग्राच्या भूमिकेत मृणाल दत्त
 13. भिकाईजी कामाच्या भूमिकेत अंजली हुडा
 14. श्यामजी कृष्ण वर्माच्या भूमिकेत जय पटेल
 15. नथुराम गोडसेच्या भूमिकेत चिराग पंड्या
 16. दादाभाई नौरोजीच्या भूमिकेत बाळकृष्ण मिश्रा
 17. वासुदेव चापेकरांच्या भूमिकेत भूषण एस.आर
 18. लाला हरदयालच्या भूमिकेत नितेश ठाकूर
 19. मिर्झा गुलाम अहमदच्या भूमिकेत पल्ले सिंग
 20. हरनाम सिंग सैनीच्या भूमिकेत अपिंदरदीप सिंग
 21. किंग जॉर्ज सहावाच्या भूमिकेत गॅरी जॉन
 22. विन्स्टन चर्चिलच्या भूमिकेत जेम्स मर्फी
 23. क्लेमेंट ॲटलीच्या भूमिकेत साल युसूफ
 24. लॉर्ड माउंटबॅटनच्या भूमिकेत रायन वॉल्टर्स
 25. एडविना माउंटबॅटनच्या भूमिकेत हेला स्टिकलमायर
 26. कर्झन वायलीच्या भूमिकेत रिचर्ड बी
 27. रेजिनाल्ड क्रॅडॉक म्हणून रेमंड फ्रान्सिस्को
Bhakti's picture

29 Mar 2024 - 9:06 am | Bhakti

+१
फायनली रणदीप हुड्डा ओन रणवीर शो,वाटच पाहत होते!:)
नक्कीच ऐका .
https://youtu.be/LmLKh2LxZ7g?si=i4vc0YBJG6zukAO_

कर्नलतपस्वी's picture

28 Mar 2024 - 4:10 pm | कर्नलतपस्वी

आता इकडे उडेल.

ज्यांनी आपल्या आयुष्याची राख रांगोळी या देशा करता केली,भले मार्ग,विचारसरणी वेगळी असेल पण उद्देश एकच होता.त्यांच्या बद्दल अपशब्द केवळ सहेतूक द्वेषातून करणे दुर्भाग्यपुर्ण आहे.
स्वातंत्र्य नंतर जन्मलेल्या पिढीस स्वातंत्र्य पुर्व लोकां बद्दल बोलताना आदरपूर्वकच बोलले पाहीजे. मतभेद असू शकतात परंतू मर्यादा पालन केलेच पाहीजे.

चित्रपट आवडला होताच, चित्रपट परिचय पण आवडला.

झैरात, सोसायटी तील house keeping लोकांना चित्रपट पाहायला तिकिटे काढून दिली आहेत. याआधी केरला स्टोरी ची दिली होती.

निनाद's picture

29 Mar 2024 - 6:56 am | निनाद

अरे वा!
हा एक चांगला उपक्रम आहे! हाउसकीपिंग कर्मचाऱ्यांसाठी चित्रपट पाहणे हा एक वेगळा अनुभव असणार आहे.
या उपक्रमामुळे हाउसकीपिंग कर्मचाऱ्यांमधील बंध मजबूत होण्यास मदत होईल.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

29 Mar 2024 - 11:47 am | माईसाहेब कुरसूंदीकर

आणी मतेही योग्य त्या पक्षाला मिळतील.! हलकेच घ्या.

अहिरावण's picture

29 Mar 2024 - 1:27 pm | अहिरावण

छे छे !! आदल्या दिवशी जो जास्त नोटा देतो त्याला मत देतात असे ऐकले आहे

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Mar 2024 - 12:11 pm | अमरेंद्र बाहुबली

जर हाऊसकीपींग कर्मचार्यांना पैसे देऊन सिनेमा पहायला “पाठवावं” लागत असेल तर सिनेमात दम नाही. जेव्हा असे ग्राऊंड लेवलवर काम करनारे लोक स्वतहून स्वतचा पासा खर्च करून सिनेमा पहायला जात असतील तर तो खरा सिनेमा.

अथांग आकाश's picture

29 Mar 2024 - 2:10 pm | अथांग आकाश

शाळेत होतो तेव्हा आम्हा पोराटोरांना लई भंगार पिक्चर दाखवायला घेऊन जायचे. खर्च आमच्या आई बापाला करावा लागायचा. त्यावेळी केंद्रात आणि राज्यात कोणते सरकार होते ते तुम्हाला समजले असेल :)

आमच्या लहानपणी पंध्रागष्ट, सव्वीस्जानेवारी, दोनाक्टोबर, चाचा न्हेरूंचा ह्याप्पीबड्डे, वगैरेंना दिवसभर जबरदस्ती सगळीकडे लौड्स्पिकर लाऊन "साबर्मतीकेसंततुनेकर्दियाकमाल" ऐकवायचे. कोणीही स्वतःहून तसली गाणी कधीच ऐकली नसती, ते आठवले. "समग्र ग्रंथ वाचल्याविण, उगाच ठेवी जो दूषण, तो येक मूर्ख" हेही आठवले. 'कलेसाठी कला' तसा 'विरोधासाठी विरोध". त्यात काही दम नाही.

ग्राऊंड लेवलवर काम करनारे लोक स्वतहून स्वतचा पासा खर्च करून सिनेमा पहायला जात असतील तर तो खरा सिनेमा.

मंजे शारुक,सलम्याचे पिच्चरच काय ते खरे पिच्चर. चालू द्या.

अथांग आकाश's picture

29 Mar 2024 - 4:10 pm | अथांग आकाश

कोणीही स्वतःहून तसली गाणी कधीच ऐकली नसती, ते आठवले.

आम्ही पण ते भंगार पिक्चर स्वतःहून पाहिले नसते.शाळेच्या जबरदस्तीमुळे आई बापाचे पैसे खर्च झाले.

अहिरावण's picture

29 Mar 2024 - 4:31 pm | अहिरावण

कसे बोललात !!

अहिरावण's picture

29 Mar 2024 - 4:30 pm | अहिरावण

लई भारी

कांदा लिंबू's picture

29 Mar 2024 - 1:44 pm | कांदा लिंबू

HK लोकांना दसरा, गुढीपाडवा बोनालू इ. दिवशी मिठाई वगैरे देत असतो.

#SharingIsCaring

यश राज's picture

29 Mar 2024 - 2:40 pm | यश राज

चित्रपट इकड़े पहिल्याच आठवड्यात पाहिला, शो हाउसफुल होता.
आमच्या समोरच्या रांगेत खुप सारे ब्रिटिश लोक बसलेले होते.
रणदीप हुड्डा ने खुप मेहनत घेतली आहें व ती पूर्ण पणे सार्थकी लावली आहे.

मी माझ्या मुलीला चित्रपट पहायला नेले होते . चित्रपट संपल्यावर ती बराच वेळ निशब्द होती. तिने नन्तर मला सान्गितले की या सर्व लोकानी देशासाठी एवढ्या हाल अपेष्टा सहन केल्या आहेत व प्रसंगी प्राण सुद्धा अर्पण केले आहे त्या सर्वान्चि प्रथमच ओळ्ख तिला झाली व तिला आता या सर्वांबद्दल वाचायचे आहे.

रणदीप हुड्डाचे खुप कौतुक त्याने यशस्वी रित्या हे धनुष्य पेलले व सार्थकी लावले.

जी कलाक्रुती महाराष्ट्रातुन व खास करुन मराठी कलाकारांकडुन घडायला हवी होती पण नाही घडली व घडली असती तरी एवढी मेहनत घेतली असती का या बद्दल साशंकच.

रामचंद्र's picture

29 Mar 2024 - 4:03 pm | रामचंद्र

सुधीर फडक्यांनी शेवटी आपलं आयुष्य पणाला लावून काढलेला सावरकरांवरचा चित्रपट विसरलात का?

यश राज's picture

29 Mar 2024 - 8:32 pm | यश राज

मला सद्य स्थितितिल कलाकारांबद्दल बोलायचे होते. सुधीर फडक्यांचे सावरकर कोण विसरु शकेल.