मागच्या आठवड्यात दक्षिणेतील मुख्यमंत्री आणि एक राज्यस्तरीय मुख्य विरोधक असा गूगल ट्रेंड शोध घेऊन लेख लिहिला पण अनवधानाने तो माझ्याकडून डिलीट झाला होता. दक्षिणेतील राजकीय नेत्यामध्ये जगन मोहन रेड्डी आंध्रातच नव्हे तर भारतातही अधिक शोधले जात असलेले नेते असावेत असे गूगल ट्रेंड्स दाखवत होते. आज प्रशांत किशोर यांचे जगन मोहन रेड्डी अँटी इन्कुम्बन्सी आणि मध्यमवर्गीय अॅस्पिरेशनल वोटर्स योजनांच्या अभावामुळे मागे पडतील असे भाकीत केले आहे म्हणून गूगल ट्रेंड्स पुन्हा एकदा तपासले तर आंध्रात गूगल ट्रेंड्सवर अद्याप तरी जगन मोहन रेड्डी तेलगु देशमच्या चंद्राबाबु नायडूंच्या बरेच पुढे आहेत असे दिसते.
बाकी भारतातील राजकीय तुलना प्रतिसादांच्या माध्यमातून येत्याकाळात वेळ मिळेल तशा जोडण्याचा मनोदय आहे.
मोदींकडे दाक्षिणात्य भाषा येऊन दक्षीणेत पुरेसा लोकप्रीय असा प्रभावी नेता अद्याप नसल्यामुळे भाजपाची प्रगती होत असली तरी अद्याप त्यास सावकाशच म्हणणे क्रमप्राप्त ठरते. असो.
* या पुर्वीची गूगल ट्रेन्ड्स विश्लेषणे मी मुख्यत्वे इतरांच्या धाग्यांत प्रतिसाद स्वरुपात केली असल्याने त्यांचे जुने संदर्भ देणे शक्य झालेले नाही. मनुष्यस्वभावाबाबत माझा अंदाज लोक सहसा स्वतःच्या आवडत्या गोष्टींच्या शोधात अधीक असतात आणि त्यांचा अंशतः का होईना परिणाम गूगल सर्च आणि गूगल ट्रेन्ड्स मध्ये दिसून येतो. मागच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या काही आठवडे आधी गूगल ट्रेंड्स मध्ये शरद पवारांचा प्रभाव इतर महाराष्ट्रीय नेत्यांच्या तुलनेत वाढल्याचे आठवते. पण गूगल ट्रेंड्स मध्ये महाराष्ट्रीय नेत्यात राज ठाकरे बर्यापैकी आघाडीवर असत पण त्याच्या लोकप्रयतेचे परिवर्तन मतात झालेले दिसले नाही याचे विश्लेषण मतात परिवर्तन होण्यासाठी दुसर्या फळीतही सुयोग्य नेतृत्वाची अंशतः गरज, काही लोकप्रीय आश्वासनांच्या घोषणा आणि लोकांना नको असलेले न बोलणे याची दक्षता असे फरक असतील असे वाटले. असो
* अनुषंगिकाव्यतरीक्त आवांतर आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आभार.
प्रतिक्रिया
10 May 2024 - 6:47 pm | माहितगार
अखिलेश यादव मोदींच्या बरेच मागे असले तरी इतर उत्तर भारतीय नेत्यात त्यांची गूगल ट्रेंड आघाडी देशभरात ज्या पद्धतीने वाढलेली दिसते त्यात यादव आणि 'ते' मतदान एक गठ्ठा होण्याची शक्यता असावी का? ४ जून सांगेल