मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व्यंगचित्रे

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
1 Mar 2024 - 4:50 pm
गाभा: 

मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने मी केलेली ही व्यंगचित्रे

marathi shala

marathi bhasha

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

1 Mar 2024 - 5:32 pm | सौंदाळा

चित्रे छान आहेत.
पण व्यंगचित्रे म्हणायला यात काही व्यंग दिसले नाही.
मराठी भाषा दिनाबद्द्ल बोधप्रद चित्रे म्हणा हवे तर.
बाकी खूप दिवसांनी दिसलात इकडे - लिहित रहा आधी सारखे.

चौथा कोनाडा's picture

1 Mar 2024 - 5:49 pm | चौथा कोनाडा

दोन्ही भाष्यचित्रे आवडली ...
सत्य परिस्थिती आहे. पहिलं चित्र विशेष आवडलं
मी यांना व्यंगचित्र म्हणण्यापेक्षा भाष्यचित्रे
एआय चित्रं वापरण्याची कल्पना पण छान आहे. (व्यंगचित्रे, भाष्यचित्रे.अर्कचित्रे काढण्यासाठी आता चित्रं काढता येण्याची गरज नाही )
कॉम्पोझिशन अ ति श य समर्पक आहे !

आन देव और भी !

मुक्त विहारि's picture

1 Mar 2024 - 8:51 pm | मुक्त विहारि

परखड विचार व्यक्त केला आहे.

रीडर's picture

1 Mar 2024 - 11:53 pm | रीडर

योग्य भाष्य

अप्रतिम चित्रे आणि कल्पना.
एआय ने चित्रे कशी काढतात ? मला अजिबात ठाऊक नाही. जाणून घ्यायला, आणि प्रयत्न करायला आवडेल.
आणखी उत्तमोत्तम चित्रे देत रहा.

माहितगार's picture

4 Mar 2024 - 4:03 pm | माहितगार

व्यंगचित्र बोलकी आहेतच. व्यंगसाहित्याचा उपयोग परिस्थिती बदलण्यापेक्षा परिस्थिती स्विकारणे सोपे होण्यात होतो का, असा एक प्रश्न मला नेहमी राहुन राहुन पडत आला आहे. मराठीभाषेच्या बदलत्या स्थितीबद्दलचे उपरोक्त चित्रातून दिसणारी चित्रण आणखी २० वर्षांनी व्यंगचित्रकार कसे दाखवतील हा प्रश्न मनाला जरा चटका लावून गेला.

अहिरावण's picture

4 Mar 2024 - 7:54 pm | अहिरावण

सहमत आहे.

माझ्या मते २०- वर्षांनंतर संस्कृतऐवजी मराठी स्कोअरींग भाषा म्हणून शालेय स्तरावर असेल. बोली मराठी ९० टक्के इंग्रजीच्या वळणावर गेली असेल.

जसे की मी केले रे पण झाले नाही.. आय डीड रे बट नथिंग हॅपन्ड... वगैरे इत्यादी

सरकारी काम अधिकृतरित्या इंग्रजीत होईल.

श्वेता व्यास's picture

5 Mar 2024 - 2:11 pm | श्वेता व्यास

समर्पक चित्रे. कल्पना आवडली. आणि चित्रे पाहून वाईटही वाटलं.

कर्नलतपस्वी's picture

7 Mar 2024 - 7:15 am | कर्नलतपस्वी

एक सारखी वाटतात. एका दृष्टीक्षेपात पुष्कळ काही सांगून जातात.

समर्पक,सटिक, समयोचित डोक्यावर छाप सोडणारी भाष्य चित्रे.