नेदरलँड बद्दल माहिती हवी आहे...

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
10 Feb 2024 - 1:11 pm
गाभा: 

माझ्या एका जिवलग नातेवाईकाचा मुलगा, कामानिमित्ताने, नेदरलँड मध्ये जाणार आहे.

कदाचित तो, तिथेच स्थाईक होणार आहे.

त्याला हातात साधारणपणे, (टॅक्स वजा करुन) हातात ३६००€ मासिक पगार आहे. हेड ऑफीस जरी Amsterdam इथे असले तरी, नौकरी फिरतीचीच असणार आहे.

त्याला काही माहिती हवी आहे.

१. घरभाडे किती € असेल?

२. चार माणसांसाठी, साधारणपणे किती € किराणा लागेल?

३. पब्लिक transport कसा आहे? महाग आहे की स्वस्त आहे?

४. साधरण पणे किती वर्षांत, Permantant सिटिझन मिळते?

५. Medical Help कशी आहे?

त्याने, मला ज्या प्रश्नांची यादी दिली ती वर लिहिली आहे.

तुम्हाला ह्या प्रश्नां व्यतिरिक्त , नेदरलँड बद्दल इतर काही माहिती देता येत असेल तर फारच उत्तम.

प्रतिक्रिया

फेसबुकवर नेदरलँडमधील भारतीय लोकांचे समुह असतील तिथे हे प्रश्न विचारा. तुम्हाला तिथे भरपुर उत्तरे मिळतील.

मुक्त विहारि's picture

10 Feb 2024 - 1:39 pm | मुक्त विहारि

मित्राच्या मुलाला सांगतो.

प्रत्यक्ष रहिवासी याबाबत फर्स्ट हॅण्ड माहिती देतीलच. पण जनरली अशा प्रकारचे अंदाज बांधताना दोन ठोकताळे बेसिक म्हणून वापरता येतील.

१. पर्चेस पॉवर पॅरिटी कॅलक्यूलेटर. हे जालावर सहज सापडतील. कोणत्याही देशातील एक रक्कम (उदा. पगार) हिच्यातून जितक्या मूल्याच्या वस्तू आणि सेवा घेता येतात तितक्याच मूल्याच्या वस्तू आणि सेवा जगातल्या अन्य देशांत मिळण्यास किती स्थानिक चलन लागेल. या गणितासाठी ज्या वस्तू आणि सेवा (बास्केट ऑफ गुडस) घेतल्या जातात त्या बऱ्याच स्टँडर्ड आणि जीवनात नेहमी वापरल्या जाणाऱ्या असतात. या केसमध्ये नेदरलँड येथील ३६०० युरो हे भारतातील एक लाख मासिक उत्पन्नासारखे आहेत. मुंबई, पुणे, बंगलोर यासारख्या शहरात एक लाख मासिक पगारात जितके राहणीमान मिळेल तत्सम ३६०० युरोत Amsterdam सारख्या शहरात मिळेल.

यात अधिक चांगले स्वच्छ हवामान, स्वच्छता, सुलभता , रुंद चांगले रस्ते किंवा तत्सम लाईफ स्टाईल उपलब्धी यांची तुलना होऊ शकणार नाही. खर्च याबाबत अंदाज येण्यासाठी हा उपाय आहे.

२. घरभाडे गुणिले किमान तीन आणि अधिक चांगले म्हणजे चार असा गुणाकार करून बघा. Amsterdam येथे एक बेड अपार्टमेंटचे भाडे १५०० ते २५०० अशा रेंजमध्ये दिसते आहे, जालावर random सर्च केल्यास. तर अशा वेळी साधारण किमान ४५०० ते ७५०० रक्कम अनुक्रमे एकटा आणि छोटे कुटुंब यांसाठी कंफर्टेबल असा अंदाज तुम्ही करू शकाल. इन्शुरन्स वगैरे भारतात नसलेले काही खर्च कम्पल्सरी असतील.

अर्थात हे सर्व ढोबळ अंदाज घेण्यासाठी आडाखे.

मुक्त विहारि's picture

10 Feb 2024 - 5:30 pm | मुक्त विहारि

माहिती पाठवली...

चौथा कोनाडा's picture

10 Feb 2024 - 6:08 pm | चौथा कोनाडा

मायबोलीवर चौकशी करुन बघा. माझ्या मते मिपाकरांपेक्षा जास्त मायबोलीकर परदेशस्थ आहेत.
तिथं परदेशासंबंधी बर्‍याच चर्चा वाचल्याचे आठवते.

निपा's picture

11 Feb 2024 - 9:51 pm | निपा

Netherlands एक छोटा देश आहे. म्हणून connectivity भरपूर मस्त . कुठल्याही ठिकाणी राहिलं कि जवळपास अर्ध Netherlands सहज जाता येतं .

इथे तुम्ही सांगितले नाही कि सॅलरी कशी आहे.

१. बेसिक
२. ट्रव्हल /कार allowance
३. पेन्शन अँड social security (८%)
४. तेरावा महिना (१ महिना पगार )
५. हॉलिडे allowance (१ महिना पगार )
६. ३०% रुलिंग
७. स्कूल (इंटरनॅशनल स्कूल्स - ५०००-६००० वर्षाचे , बाकी dutch स्कूल फ्री) - काही एम्प्लॉयर हे पण pay (पूर्ण किंवा अंशतः ) करतात
८. बोनस (८-२५%)

माझ्या मते इन-हॅन्ड ३६०० हा फार कमी पगार आहे. साधारणतः ५०००-६००० युरो असायला हवा.

१. घरभाडे किती € असेल? -->
१५०० च्या वर . २ बेडरूम लागणारच . १५०० ला आजू बाजू च्या शहरात मिळतील. माझ्या मते १८०० युरो ठीक असेल. वरून गॅस , वीज , इंटरनेट , पाणी , प्रॉपर्टी टॅक्स वैगेरे मिळून २००-३०० युरो लागतील.

२. चार माणसांसाठी, साधारणपणे किती € किराणा लागेल?
६००-८०० युरो . बाहेर जेवण वैगेरे असेल तर थोडे जास्त. एक्दम आलू खाल्ले तर कदाचित ३०० मध्ये पण होईल . पण जर एक्दम कंजुषीत राहायचे असेल तर कशाला यावं. इंडिया is बेस्ट ;-)

३. पब्लिक transport कसा आहे? महाग आहे की स्वस्त आहे?
महाग आहे पण एम्प्लॉयर फुल्ल refund करतो . स्वतः चा स्वतः केलं कि फार नाही होत. सायकल जिंदाबाद . सायकल न चालवता येणारे भारतीय बघितले आहेत मी . तरी ट्रान्सपोर्ट चा १०० युरो लागेल .

४. साधरण पणे किती वर्षांत, Permantant सिटिझन मिळते?
५ - फुल्ल प्रोसेस ला जवळपास अजून एक वर्ष जातो . Dutch भाषा शिकावी लागते , पण खूप डिफिकल्ट नाही . मनात असेल तर होऊन जातं ५ वर्षात.

५. Medical Help कशी आहे?
भारत पेक्षा फार वेगळी. परसिटॉमाल जिंदाबाद . फालतू चेकअप नाही करणार . सगळ्या अपॉइंटमेंट वर . मेडिकल सिस्टिम "the बेस्ट". sadaharan पणे ३०० युरो महिना इन्शुरन्स , मग जवळपास सगळं फ्री . डिलिव्हरी ला फक्त पार्किंग चे लागले . NICU ला फ्री. पार्किंग फीस पण रिटर्न आली.
डॉक्टर सांगतात तसे होते , रुग्ण सांगतो तसे नाही . म्हणजे, एन्टीबीओटीक मिळत नाही. किंवा MRI unnecessary होत नाही.

१८००+३००+१००+३००= २५००+५००= ३०००-३३०० युरो प्रति महिना खर्च . (स्कूल नाही पकडले)

इंडियन IT कंपन्या खूप विचित्र package देतात . म्हणून जर ब्रेकअप माहिती असेल तर बरोबर analysis करता येइल.

- मी Netherland ला आता ७ वर्षा पासून आहे - भरपूर १st जनरेशन इंडियन्स आहेत . २-३ तर मराठी मंडळ आहेत.

मुक्त विहारि's picture

12 Feb 2024 - 9:22 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद...