महाराष्ट्रात सध्या चाललंय तरी काय?

वेडा बेडूक's picture
वेडा बेडूक in राजकारण
9 Feb 2024 - 1:18 pm

महाराष्ट्रात सध्या चाललंय तरी काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनाला पडावा इतक्या भयंकर घटना सध्या या राज्यात घडतायत. कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची आधी पुण्यात त्याच्याच साथीदारांनी दिवसाढवळ्या, भर रस्त्यात हत्या केली. मग कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्थानकातच शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच, काल मुंबईतल्या दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली.

महाराष्ट्राची वाटचाल एके काळच्या उप्र-बिहार च्या जंगलराज कडे सुरु आहे अशी शंका येते आहे.

प्रतिक्रिया

पूर्वीही निवडणुका अटितटीच्या अहंमला, वर्चस्वाला मातीत लोळवणाऱ्या झाल्या होत्या. परंतू हरल्यावरही वाईट वाटून पराभूत उमेदवार पाच वर्षे लोटत होते. आता मात्र संभाव्य जिंकणाऱ्या उमेदवाराला अगोदरच संपवण्याचे डाव सुरू झाले आहेत. त्यांचे खापर आणखी तिसऱ्याच पक्षावर किंवा राज्यावर फोडण्याचं काम राजकीय समीक्षक नेटाने करत आहेत.

मी कुठल्याच सरकारच्या बाजुने नाही, पण हे तिन्ही प्रकरणे व सध्याचे राज्य सरकार ह्याचा काहीही संबंध नाही. ज्यांची सदविवेक बुध्दी शिल्लक आहे ते सर्वच माझ्या मताशी एकमत आहेत असे मला अंतरजालावरच्या ईतर चर्चेतुन दिसले आहे.
ह्या प्रकरणाचा संबंध गुन्हेगारांनी काहितरी नवीन उपाय शोधला असावा, लुपहोल शोधला असावा न्याय व्यवस्थेतला म्हणुन सरसकट खुन करण्यापर्यंत मजल मारत आहेत. तिस-या प्रकरणात हे लागु होत नाही. हल्लेखोर सुध्दा मृत आहे. पण पहिल्या दोन प्रकरणात संशयाला वाव आहे.

स्वरुपसुमित's picture

9 Feb 2024 - 6:58 pm | स्वरुपसुमित

हरल्यावरही वाईट वाटून पराभूत उमेदवार पाच वर्षे लोटत होते.
>>>
पवार विखे वाद कुठुन सुरु झाला एक्दा बघाच

कंजूस's picture

9 Feb 2024 - 7:13 pm | कंजूस

हल्ली धुमसत राहातो.

आता मतदारांचा निवडणुकीच्या मतदानावरचा विश्वास उडत चालला आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Feb 2024 - 7:35 pm | अमरेंद्र बाहुबली

राज्याची परिस्थीती फारच बिघडलीय. युपी बिहार झालाय एवढं नक्की. बंदूकातर भाजीपाला मिळावा अश्या मिळत असाव्यात. प्रत्यक्ष इतक्या चालताहेत तर न चाललेल्या किती असतील, काही नेते सांगत फिरताहेत की जे करायचे ते करा, तुम्हाला मी सोडवेन, बाॅस *** बंगल्यावर बसलाय. अश्या प्रकारे गुन्हेगारांचं मनोबल वाढतंय. कायदा सुव्यवस्था नावालाच राहीलीय.

निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे ह्यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. काचा फोडल्या.

निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे ह्यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. काचा फोडल्या.

चौथा कोनाडा's picture

9 Feb 2024 - 10:24 pm | चौथा कोनाडा

गुंडगिरी ही राजकिय आश्रयानेच वाढत असते.
राजकिय वरदहस्ताने असे कित्येक प्रकार होत असतील.. ही जरा मोठी लोकं म्हणुन जास्त चर्चा होणार.

सतिश शेट्टी निर्घृण हत्या प्रकरणात पुढे काय झाले ?
१४ वर्षे झाली ही हत्या होऊन ... दोषी सापडले का नाही ?

टर्मीनेटर's picture

9 Feb 2024 - 11:05 pm | टर्मीनेटर

आधीचे तिनं तिघाडी सरकार असताना देशातल्या एक-दोन नंबरच्या उद्योगपतीच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्यात आली होती… आताचे तिन तिघाडी सरकार असताना गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत… ॲाक्टोबरमध्ये नवीन तिनं तिघाडी / चार चौघाडी सरकार येईल तेव्हा पून्हा रामपुरी चाकू/सूरे चालवण्याच्या घटना घडण्यापर्यंतची प्रतिगामी पातळी हा फुले, शाहू, अंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र गाठणार आहे का?

जोक्स अपार्ट…. ‘नोटा’ मध्ये आवश्यक ते बदल होत नाहित तोपर्यंत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे, कारण आजच्या राजकिय पक्षांपैकी आणि पून्हा निवडणुकीला उभे रहाणाऱ्या माझ्या मतदारसंघातील विद्यमान लोकप्रतिनीधींपैकी कोणालाच मत द्यायची ईच्छा नाहिये…

समान नागरी कायदा वगैरे नंतर आणा, आधी ‘नोटा’ मध्ये आवश्यक ते बदल करा!

हे करणे, अतिशय कठीण आहे...

रात्रीचे चांदणे's picture

9 Feb 2024 - 11:08 pm | रात्रीचे चांदणे

यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकांच्या भावना भडकवू नये आणि देशाच्या सर्वोच्च नेत्यांना अतिशय खालच्या स्तरावर जाऊन बोलणं हे देखील अत्यंत चुकीचं आहे.

म्हणजेच त्यांना म्हणायचं आहे की मोदी आणि शहा विरुद्ध काहीही बोलू नये. नाहीतर करकर्ते अशाच गाड्या फोडतील.

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Feb 2024 - 11:41 am | अमरेंद्र बाहुबली

सांगलीत संतोष कदम नावाच्या आरटीआय कार्यकर्त्याचा निर्घूण खूण करन्यात आलाय, अनेक भ्रष्टाचार ते बाहेर काढत होते. काल ते सांगलीत मोर्चा काढणार होते. एकंदरीत सरकार विरूध्द काहीही कराल तर गाडी फोडल्या जाईल नाहीतर खून केला जाईल.

प्रसाद गोडबोले's picture

10 Feb 2024 - 2:44 pm | प्रसाद गोडबोले

जुन्या पापांची फळं =))))

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Feb 2024 - 2:56 pm | अमरेंद्र बाहुबली

जालन्यात गजानन तौर ह्यांची हत्या.
कल्याणमध्ये गायकवाड ह्यांच्यावर गोळीबार.
जळगावात माजी नगरसेवकाची हत्या.
राहुरीत वकील पती पत्नी आढाव हत्या.
सांगलीत आरटीआय कार्यकर्ता संतोष कदम ह्यांची हत्या.
मुंबईत अभिषेक घोसाळकर ह्यांची हत्या,
पुण्यात निखील वागळेंवर हल्ला.
महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला.

विजुभाऊ's picture

10 Feb 2024 - 11:16 pm | विजुभाऊ

ठाण्यामधे अनंत करमुसे याना अक्षरशः जनावरेसाअरखे बडवले तेंव्हा हा प्रश्न कोणीच विचारला नाही
अर्नब गोस्वामीला घरातून उचलून नेलेतेंव्हा हा प्रश्न कोणीच विचारलानाही
नाराउअण राणेना अटक केली तेंव्हा हा प्रश्न कोणीच विचारला नाही
दिशा सालीयानच्या हत्यबाबत हा प्रश्न्कोणीच विचारला नाही
केतकीचितळेला अटक झाली तेंव्हा हा प्रश्न कोणीच विचारला नाही
सुषांत राजपूतची हत्या झाली तेंव्हा हा प्रश्न कोणीच विचारला नाही
मनसूख हिरेनला हकनाक मरावे लागले तेंव्हा हा प्रश्न कोणीच विचारला नाही

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Feb 2024 - 2:31 am | अमरेंद्र बाहुबली

ठाण्यामधे अनंत करमुसे याना अक्षरशः जनावरेसाअरखे बडवले तेंव्हा हा प्रश्न कोणीच विचारला नाही >>>>
अनंत करमूसेने अत्यंत अश्लील विडीओवर आव्हाडांचा चेहरा चिपकवलेला विडोओ समाजमाध्यमात शेअर केला होता.
अर्नब गोस्वामीला घरातून उचलून नेलेतेंव्हा हा प्रश्न कोणीच विचारलानाही त्याने एका मराठी ऊद्योगपतीचे पैसे थकवले होते, त्यामुळे त्या ऊद्योगपतीने आत्महत्या केली होती, तसं त्याने चिठ्ठीत लिहीलं होतं. गोस्वामी हा गुन्हेगार होता, त्याला अटक कायदेशीररीत्या अटक झाली.
नाराउअण राणेना अटक केली तेंव्हा हा प्रश्न कोणीच विचारला नाही राणेंनी मुख्यमंत्र्यांना कानाखाली मारायची भाषा केली होती. ह्या विरूध्द राज्यात जनक्षोभ ऊसळला होता.
दिशा सालीयानच्या हत्यबाबत हा प्रश्न्कोणीच विचारला नाही हत्या झाली की आत्महत्या आधी ह्याची माहीती घ्या. ऊगाच कैच्याकै लिहू नका.
केतकीचितळेला अटक झाली तेंव्हा हा प्रश्न कोणीच विचारला नाही
केतकी ने पवारांवरील एक घाणेरडी कविता शेअर केला होती. तिला कायदेशीररीत्या अटक झाली होती.
सुषांत राजपूतची हत्या झाली तेंव्हा हा प्रश्न कोणीच विचारला नाही ह्या गंजेडी, ड्रग्स एडीक्ट सूशांतनेही आत्महत्या केली असं तपासात निष्पन्न झालंय.
मनसूख हिरेनला हकनाक मरावे लागले तेंव्हा हा प्रश्न कोणीच विचारला नाही त्यावेळी थेट गृहमंत्र्यांनाही अटक झाली होती.
त्यावेळी आताच्या सारखा पिस्तूलांचा सूळसूळाट नव्हता. तसेच गुन्हेगारांचे मनोबल एवढे ऊंचावले नव्हते.

प्रसाद गोडबोले's picture

11 Feb 2024 - 12:58 pm | प्रसाद गोडबोले

आपला तो बाब्या , दुसर्‍याचे ते कार्टे =))))

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Feb 2024 - 10:14 am | अमरेंद्र बाहुबली

भाजपच्या माजी नगरसेवकावर टोळक्याचा गोळीबार, उपचारादरम्यान बाळू मोरे यांचे निधन.

काही लोकं किती बिनडोक आहेत हे प्रतिक्रिया वाचून समजले.

ऑर्वेल म्हणतो तेच खरे.. आल आर इक्वल, सम आर मोर इक्वल