कोपनहेगन - पॅरिस भटकंती -२

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in भटकंती
2 Feb 2024 - 2:17 am

अर्बन हाऊस
.
कोपहेगन मधले ‘अर्बन हाऊस’ हे एक मस्त डॉर्मिटरी - टाईप हॉटेल होतं. काॅमन किचन, खाली छोटा बार, खेळायला टेबल टेनिस, फूटबाॅल वगैरे होतं. इथे मुख्यतः काॅलेजच्या सुट्टीवर आलेले मुलं मुली होते. इथे नवीन समजलं की टॅप वॉटर, म्हणजे बेसीनला येणारं पाणीच लोक पिण्यासाठी वापरतात. वापरायचं वेगळं आणि प्यायचं वेगळं असा काही प्रकार नव्हता. आम्हाला खोली उशीरा मिळणार होती म्हणून आम्ही तिथेच वाट पाहत बसलो. मी क्रीमरोल काढले, डीश आणायला किचन मध्ये गेलो तिथे कुणीतरी बसलं होतं मला वाटलं केअर टेकर असावा मी त्याला विचारलं डीश साठी, तर तो “नो इंग्लीश, स्पॅनीश” असं म्हणाला. मी गूगल ट्रांसलेट वापरून त्याला विचारलं. तो बोलला “या.”
आम्हाला रूम मिळाली. छोटी होती, ४ बेड होते. आम्ही जेवण करूयात म्हणून खाण्याचे पदार्थ काढले. थेपले, खाकरा, भाकरी ह्यांची रेलचेल होती, भरपूर खाऊन आम्ही बाहेर फिरायला निघालो, थोडं आजूबाजूला फिरलो तिथे प्रचंड शांतता होती, बाईक एकही दिसली नाही, सायकल नी चारचाकी शिवाय काहीही दिसत नव्हतं, आपण रस्ता क्राॅस करायच्या बेतात असलो की गाड्या थांबायच्या, आणि ते लोक गाडीतूनच हाताने आदराने जा असं सांगायचे. हॉर्न वगैरे आजिबात कुणी वाजवत नव्हतं. पॅलेस्टीन समर्थक एक बाई तिच्या दोन पोरांना सायकल गाडीत टाकून जोरजोरात स्पीकरवर घोषणा देत फिरत होती तेवढाच काय तो शांतताभंग होत होता. येणारे जाणारे स्त्री पुरूष एकमेकांना स्माईल करायचे, नंतर नंतर मलाही सवय लागली, आणि दिसेल तो/ती मला, नी मी त्याला/तीला स्माईल देऊ लागलो.
तिवोली गार्डन
.

रेल्वे स्टेशन जवळच तिवोली गार्डन होतं. गार्डनचं तिकीट जवळपास २००० रुपये होतं. आत गेलो नाही कारण संध्याकाळ झाली होती नी वेळ कमी होता. जवळच्याच एका पिझ्झा दुकानात गेलो, तिथे एक पाकिस्तानी पंजाबी मुसलमान नोकरीला होता त्याच्याशी गप्पा मारल्या. तिथे पिझ्झा खाऊन निघालो. फिरताना एका दुकानात कानटोपी पाहीली, तिची किंमत भारतीय रुपयात ५००० होती. मी पुण्यातील रमेश डाईंग मधून ११० रुपयांत टोपी घेतली होती. आमचा बाॅस टोपी आणायचं विसरला होता, किंमत पाहून त्याने टोपी घ्यायचं रद्द करून केजरीवाल सारखा मफलर बांधून फिरू लागला. पुढे एका बुटांच्या दुकानात गेलो, तिथे दोन नेपाळी मुली जाॅबला होत्या त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्या म्हणाल्या की शिकायला आहोत इथे झालं शिक्षण की परत जाणार, नको वाटतं रहायला इथे. परत रूमवर आलो. थोड्या वेळाने रात्री १० वाजता मी आणि विकास फिरायला निघालो, तिथे आजूबाजूला बरेच स्ट्रीप क्लब/बार होते. आम्ही खिडकीतूनच आत काय चाललंय ते बघत चालत होतो बरेच चित्रविचित्र प्रकार होत होते. एका ठिकाणी विकास तपास करून आला १५० ते २०० डॅनीश क्रोन्स प्रवेश शुल्क होतं.
सकाळी नाश्ता करायला आलो, १०० डॅनीश क्रोन्स ( १२०० रूपये) दिले. हाॅट चॉकलेट आयुष्यात पहिल्यांदाच प्यायलो. मी उकडलेली अंडी खाल्ली, इतर पदार्थ काही खाण्यासारखे वाटेनात. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पाव ठेवलेले होते. मी चव घेतली. काही खूप आवडले, मी फक्त पाव खाल्ले चविष्ट लागत होते. काही खिशात घेतले, बाहेर फिरायला गेलो की खाऊ ह्या बेताने.
आम्ही कोपनहेगन दर्शन घ्यायचे ठरवले. तिथे हीप हाॅप नावाच्या डबलडेकर बस होत्या. त्या कोपनहेगन दर्शन करवून आणायच्या. १८० डॅनीश क्रोन्स प्रत्येकी देऊन आम्ही त्यात बसलो, २२ स्टाॅप होते, कुठेही उतरायचं, ४५ मिनीटांनी पुढील बस यायची. पहीला स्टाॅप म्यूझियमचा होता, तिथे उतरलो नाही. पुढचा स्टाॅप नदीकिनारी होता, तिथे उतरलो. खूप थंडी वाजत होती, पण वातावरण खूप छान होतं. आम्ही तिथल्या एका काॅफीच्या गाडीवर काॅफी प्यायला गेलो. काॅफीवाला अर्जेंटीनाचा होता, मला बोलला की माझी एक्स भारतात धर्मशाळेत योगा शिकतेय. नदीवर इतक्या थंडीतही काही मुली आंघोळ करत होत्या, आणि पूर्ण उघड्या होऊन कपडे बदलत होत्या, मी काॅफी विक्रेत्याला बोललो की तुझी तर मज्जाय, तो बोलला तुम्ही चुकीच्या वातावरणात आलात ऊन्हाळ्यात जून मध्ये या, हा सर्व परीसर भरलेला असतो, मी त्याला विचारलं की असं पाहत असशील तू तर त्या मुलींच्या लक्षात येईल, तो हातातला काळा गाॅगल दाखवत बोलला “म्हणून तर मी हा काळा गाॅगल घालतो.” मी हसत हसत त्याला हायफाय दिला. अजून एकेक काॅफी होऊन जाऊदे म्हणून विकास नी माझं एकमत झालं पण आमचा कुटिल डाव बाॅसच्या लक्षात आला नी त्याने आमचा बेत हाणून पाडला.
तिथून आम्ही पुढती हीप हॉप धरून एका चर्च ला गेलो, जुने चर्च होते, आत अतिशय सुंदर नी भव्य लाकडी बांधकाम केलेले होते. त्याच्या टाॅवर वरून पूर्ण कोपनहेगन दिसतं असं कळालं, त्यासाठी तिकीट होतं नी मोठी रांग होती.
.
तिथून आम्ही कोपनहेगन च्या प्रसिद्ध Nyhavn भागातील इमारती पाहण्यास गेलो. तिथे खूप रेस्टोरंट होते, मला मासा चाखायचा होता, पण त्या दोघांमुळे खाता आला नाही, तिथे बरेच फोटो काढले, विकासने वाईन घेतली.
.
.
मी हाॅटडाॅग खायला गेलो पण त्याच्यात पोर्क होतं, तिथे एक मोठा जहाजाचा नांगर ठेवलेला होता. एवढा प्रचंड नांगर असू शकतो हे पाहून आश्चर्य वाटलं, तिथून मग पुढची हीप हाॅप पकडून लिटल मर्मेड ला गेलो, छोटसं सुंदर तळ्याकाठचं स्मारक होतं. आवडलं. त्याची प्रतिकृती विकास ने त्याच्या वडीलांना भेट म्हणून १०० डॅनीश क्रोन्स (१२०० ) रुपयात घेतली.
छोटी जलपरी.
.

पुढे आम्ही नॅशनल म्युझीयमला गेलो, तिथे फुकट तेवढं पाहून त्याच्या समोरच्या गार्डनमध्ये गेलो तिथे बरंच भटकलो, ४ वाजले होते तरी अंधार पडत आला होता, पुन्हा हीप हाॅपच्या बस स्टाॅपवर आलो, तिथे एक ऑस्टृयन ऑस्ट्रीयन नी एक जपानी जोडपं होतं त्यांच्याशी गप्पा मारल्या.
हाॅटेलला आल्यावर मॅगी बनवून खाल्ली, मॅगी बनवताना एक आफ्रीकन व्यक्ती मासा बनवत होता त्या माश्याच्या खमंग वासाने किचन भरलं होतं. हे दोघे पळाले, मी त्याला ऊत्तम मासा बनवलास नाईस स्मेल म्हणुन दाद दिली. मॅगी खाऊन आम्ही हाॅटेलच्या हाॅल मध्ये आलो तिथे आमच्या बाॅसचा मित्र भेटायला आला होता, तो बिहारी होता सांगत होता इथे लवकर नागरीकत्व मिळत नाही, मुलं ऐकत नाहीत, खूप प्रश्न विचारतात. तो गेल्यावर मी किचनमध्ये बाटलीत पाणी भरायला गेलो तिथे एका ब्रिटीश मुलीशी अर्धातास गप्पा मारत बसलो. नंतर थोड्या वेळ मी आणी विकास बाहेर रोडवर टाईमपास करत होतो, एव्हाना तो भाग माझा चांगला पाठ झाला होता, येणारे जाणारे मला पत्ता विचारायचे, रेल्वे स्टेशन ?? दिसवे गो स्ट्रेट टेक लेफ्ट, तिवोली गार्डन? असं जा, रॅडिसन ब्लू? असं जा…!
(क्रमशः)

प्रतिक्रिया

कंजूस's picture

2 Feb 2024 - 4:34 am | कंजूस

हसून सुरुवात करतो.
:)

मजेदार आहे एकूण. पर्यटन हे गप्पीष्ट माणसांसाठी असतं. फोटोंची गडबड आहे.

कर्नलतपस्वी's picture

2 Feb 2024 - 6:18 am | कर्नलतपस्वी

कविवर्य ग्रेस म्हणतात ,

तुला पाहीले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे

परदेशात अशी परिस्थीती सामान्य असते पण आपल्याला ते आठवे आश्चर्य....

बाकी राहील ते घर माझं आणी उरलेललं विश्व माझ्या बापाचं असा स्वभाव असेल तर कुठेच अडचण येत नाही.

बाकी भटकंती मस्त. फोटो गडबडले.

मस्तच , वेगवेगळ्या लोकांशी छान वाटत गप्पा मारायला,फिरायला.
ओल ओव्हर वर्ल्ड मेन आर मेन ;)

चित्रगुप्त's picture

2 Feb 2024 - 8:50 am | चित्रगुप्त

छान खुसखुशीत लिहीत आहात. पण फोटो मात्र एकही दिसत नाहीये. काहीतरी उपाय करा लवकर.

मुक्त विहारि's picture

2 Feb 2024 - 9:06 am | मुक्त विहारि

आवडले...

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Feb 2024 - 10:45 am | अमरेंद्र बाहुबली

सर्वांचे धन्यवाद. फोटोंसाठी मालकांचा धावा करतो. मालक मदत करा.

छान सुरु आहे... पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

फोटोंसाठी मालकांचा धावा करतो. मालक मदत करा.

तुम्ही धाग्यात दिलेल्या फोटोंच्या लिंक्स उघडत नसल्याने मालक, चालक, संपादक मंडळींपैकी कोणीही मदत करु शकणार नाहीत! लेख भटकंती विभागात हलवला आहे तेव्हा स्वसंपादन करुन करा लिंक्स अपडेट! आता "तुम्हीच आहात तुमच्या धाग्याचे शिल्पकार" 😀

गवि's picture

2 Feb 2024 - 12:22 pm | गवि

रोचक प्रवास.

युरोपात भरपूर वेळा फिरणे होऊन देखील स्कँडेनेव्हिया राहून गेला आहे. बघू. येईल तोही योग.

एकूण जन्क्षान मजा केलीत असे दिसते.

बाकी फोटो म्हणाल तर माझा गणेशा झाला आहे..

चित्रगुप्त's picture

5 Feb 2024 - 1:20 pm | चित्रगुप्त

फोटो 'अजुनी रुसूनि' का बरे आहेत ?
खुलता फायली खुलेना ?

चित्रगुप्त's picture

5 Feb 2024 - 1:20 pm | चित्रगुप्त

फोटो 'अजुनी रुसूनि' का बरे आहेत ?
खुलता फायली खुलेना ?

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Feb 2024 - 1:38 pm | अमरेंद्र बाहुबली

आता मालकच काहीतरी संपादन करून फोटो टाकू शकतात. अजून कुणी आहे का?? :(

टर्मीनेटर's picture

5 Feb 2024 - 1:59 pm | टर्मीनेटर

"तुम्हीच आहात तुमच्या धाग्याचे शिल्पकार"

हा वरचा प्रतिसाद वाचला नाहित का?

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Feb 2024 - 2:04 pm | अमरेंद्र बाहुबली

धागा संपादीत करता येत नाही. आता काय करावे?? फोटो अल्बम मध्ये आहे. अस्बम ची लिंक शेअरांग मध्ये आहे .तुमच्या धाग्यात सांगीतल्साप्रमाणे सर्व प्रोसेस केली.

टर्मीनेटर's picture

5 Feb 2024 - 2:26 pm | टर्मीनेटर

?
आपल्याला ‘संपादन’ हा ॲाप्शन वरती दिसत नाहिये का?

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Feb 2024 - 2:38 pm | अमरेंद्र बाहुबली

दिसतोय. धागा संपादीत करता येतो हे माहीतच नव्हतं. केव्हा आला हा पर्याय?? करतो करतो फोटो टाकत पुन्हा.

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Feb 2024 - 7:46 pm | अमरेंद्र बाहुबली

फोटो दिसताहेत का??

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 Feb 2024 - 8:04 pm | राजेंद्र मेहेंदळे

आता दिसताहेत!! नीट जमलय.

मस्त चालु आहे. येउंद्या पुढचा भाग

टर्मीनेटर's picture

5 Feb 2024 - 8:21 pm | टर्मीनेटर

जेब्बात! अब आया असली मजा 👍

चित्रगुप्त's picture

5 Feb 2024 - 10:49 pm | चित्रगुप्त

तिथे आजूबाजूला बरेच स्ट्रीप क्लब/बार होते. आम्ही खिडकीतूनच आत काय चाललंय ते बघत चालत होतो बरेच चित्रविचित्र प्रकार होत होते. एका ठिकाणी विकास तपास करून आला १५० ते २०० डॅनीश क्रोन्स प्रवेश शुल्क होतं.

ग्येलाच हुता तर त्ये बी बघुन घ्यायाचं होतं राव. मस्त फोटोगिटो टाकायाचे.

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Feb 2024 - 11:03 pm | अमरेंद्र बाहुबली

गेलथो मध्ये :) फोटोला बंदी होती.

चित्रगुप्त's picture

7 Feb 2024 - 11:30 am | चित्रगुप्त

हा डॅनिश भाषेतला शब्द आहे का? त्याचा अर्थ काय आहे ?

अमरेंद्र बाहुबली's picture

7 Feb 2024 - 11:44 am | अमरेंद्र बाहुबली

:( गेले होतो चं नगरी वर्जन आहे.

श्वेता व्यास's picture

6 Feb 2024 - 11:43 am | श्वेता व्यास

वा, छान अनुभव आहेत, फोटोसुद्धा मस्त!

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Feb 2024 - 12:31 pm | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद

निनाद's picture

7 Feb 2024 - 5:20 am | निनाद

मस्त चालले आहे. ओघवते आहे...

कंजूस's picture

7 Feb 2024 - 11:47 am | कंजूस

फोटो आले रे!

छान.

कर्नलतपस्वी's picture

7 Feb 2024 - 3:16 pm | कर्नलतपस्वी

अबा लई भारी.

श्वेता२४'s picture

8 Feb 2024 - 12:41 pm | श्वेता२४

खूपच छान वर्णन. फोटोही एकदम मस्त. पुढील भागाची उत्सुकता आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Feb 2024 - 2:06 pm | अमरेंद्र बाहुबली

सर्वांचे आभार.