मकरसंक्रांत एक जागतिक परंपरा?

निनाद's picture
निनाद in काथ्याकूट
15 Jan 2024 - 8:54 am
गाभा: 

मकरसंक्रांत हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि प्राचीन सण आहे. सूर्याचे मकर राशीत संक्रमण केल्यानंतर साजरा केला जातो. मकरसंक्रांत नंतर दिवस लांब होतात आणि रात्री कमी होतात. हा सण नवीन सुरुवात आणि शुभतेचे प्रतीक आहे.

मकरसंक्रांतीच्या काही खास परंपरांमध्ये काही जागतिक संदर्भ दिसतात का हे आपण पाहू या.

मकरसंक्रांत हा सण भारतात सर्वत्र वेगवेगळ्या नावांनी आणि परंपरांसह साजरा केला जातो. उदाहरणार्थ, दक्षिण भारतात हा सण पोंगल म्हणून ओळखला जातो, तर पंजाबात हा सण लोहरी म्हणून ओळखला जातो. पण मग इतर कुठे हा साजरा होतो?

व्हिएतनाम, थायलंड आणि इंडोनेशियामध्ये निरयन मकरसंक्रांत हा एक महत्त्वाचा सण आहे जो हिंदू आणि बौद्ध लोक साजरा करतात. व्हिएतनाममध्ये, निरयन मकरसंक्रांतीला "Tết Nguyên Đán" म्हणतात. हा सण नवीन वर्षाचा सण म्हणून देखील ओळखला जातो. व्हिएतनामी लोक या दिवशी नवीन कपडे घालतात, घराची साफसफाई करतात आणि प्रियजनांना भेट देतात. ते एकत्र येऊन जेवण करतात आणि पतंग उडवतात. व्हिएतनामी लोक या दिवशी "Bánh chưng" आणि "Bánh dày" नावाचे दोन प्रकारचे विशेष पदार्थ खातात. "Bánh dày" हे तांदूळ आणि गहूपासून बनवलेले एक गोड पक्वान्न आहे.

या शिवाय व्हिएतनाममध्ये निरयन मकरसंक्रांतीच्या काही खास परंपरा पुढील प्रमाणे.
होई (Hoi): हा एक लोकप्रिय सण आहे जो निरयन मकरसंक्रांतीच्या दिवशी साजरा केला जातो. या सणात लोक एकत्र येतात आणि गाणी गातात, नाचतात आणि खेळ खेळतात.
बाओ (Bao): हा एक पारंपारिक व्हिएतनामी पदार्थ आहे जो निरयन मकरसंक्रांतीच्या दिवशी सेवन केला जातो. बाओ हा एक प्रकारचा भाजलेला पाव आहे त्यात गोड पुरण असते.
चाई (Chai): एक पारंपारिक व्हिएतनामी पेय आहे जो निरयन मकरसंक्रांतीच्या दिवशी प्यायले जाते. चाई हा एक प्रकारचा चहा असतो ज्यामध्ये लिंबू, मध आणि इतर घटक असतात.

थायलंडमध्ये, निरयन मकरसंक्रांतीला "Songkran" म्हणतात. हा सण नवीन वर्षाचा सण म्हणून देखील ओळखला जातो. थायलंडमध्ये, Songkran हा एक आनंददायी आणि उत्साही सण आहे. लोक एकत्र येऊन नाचतात आणि गातात. इंडोनेशियामध्ये, निरयन मकरसंक्रांतीला "Tahun Baru Imlek" म्हणतात. हा सण नवीन वर्षाचा सण म्हणून देखील ओळखला जातो. लोक या दिवशी नवीन कपडे घालतात, मंदिरात जातात आणि प्रियजनांना भेट देतात. ते एकत्र येऊन जेवण करतात आणि पतंग उडवतात.
धोणे (Loy): हा एक पारंपारिक थाई बौद्ध विधी आहे जो निरयन मकरसंक्रांतीच्या दिवशी साजरा केला जातो. या विधीमध्ये लोक एकमेकांच्या पायांवर पाणी घालतात आणि त्यांच्याकडून क्षमा मागतात.
खाणे (Kanon): हा एक पारंपारिक थाई पदार्थ आहे जो निरयन मकरसंक्रांतीच्या दिवशी खाल्ला जातो. कानो हा एक प्रकारचा लांब, पातळ नूडल्स आहे जो मांस, भाज्या आणि इतर घटकांसह बनवला जातो.

मकर संक्रांती हा खरे तर जागतिक सण होता. पण ख्रिस्ताच्या आगमना नंतर चर्चला आपले मोठेपण सिद्ध करायचे होते म्हणून सूर्याच्या भ्रमणावर आधारीत असलेले हे नैसर्गिक सण प्रचंड प्रयत्नाने मोडून काढले गेले. एप्रिल फूल हे त्याचे प्रतिक आहे. त्यासाठी पेगन सणांना "सैतानी" म्हणून चित्रित केले. असो. पण या प्रयत्नांनी काही सण पूर्ण लोप पावले नाहीत. मग पेगन सणांना ख्रिश्चन रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, मकरसंक्रांतीचे सण काही ठिकाणी "क्रिसमस" म्हणून साजरे केले जाऊ लागले असे वाचनात आले आहे. (संदर्भ आत्ता हाताशी नाहीत पण जिज्ञासूंनी गुगलची मदत घ्यावी!)

युरोपियन उत्सवांमध्ये मूर्तिपूजक परंपरांचे वेधक समांतर अवशेष आजही आहेत असे दिसून येते.
उदाहरणार्थ युल, एक पूर्व-ख्रिश्चन मूर्तिपूजक सण आहे हा सण जर्मनिक लोकांद्वारे साजरा केला जातो, ज्यामध्ये मेजवानी, भेटवस्तू, अग्नीची पूजा आणि आनंद साजरा केला जातो. Imbolc हा सेल्टिक सण हिवाळ्यातील संक्रांती साजरा करतो, जो थंडीत नवीन जीवनाचे प्रतीक आहे. विधींमध्ये बर्‍याचदा अग्नीची पूजा, शुध्दीकरण संस्कार आणि प्रजनन क्षमता आणि चूल यांच्याशी संबंधित देवतांना अर्पण केले जाते. लुपरकॅलिया हा प्राचीन नवनिर्मितीचा रोमन सण, जो मकर संक्रांतीच्या सुमारास साजरा केला जातो.

प्राचीन स्लाव्ह लोक सूर्याला एक देव मानत असत आणि संक्रांती हा सूर्याचा सण म्हणून साजरा करत असत. भारतीय आणि प्राचीन स्लाव या दोन्ही संस्कृतींमध्ये सूर्यपूजेला महत्त्व आहे. संक्रांती सूर्याचा मकर मध्ये प्रवेश साजरा करते, तर स्लाव्हिक परंपरा याच काळात सूर्याच्या जीवनदायी शक्तीचा आदर करतात. अग्नीला देखील त्यांचाकडे खूप महत्त्व आहे, संक्रांती विधींमध्ये अग्निपूजेद्वारे दर्शविली जाते, शुद्धीकरण, संरक्षण आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे असे ते मानतात.

प्राचीन इराणमध्येही संक्रांती साजरी केली जात होती. या सणाला इराणमध्ये "नौरुझ" म्हणतात. नौरुझ हा इराणचा नवनिर्मितीचा सण आहे. भारतीय संक्रांती आणि प्राचीन इराणमधील नौरुझ यांच्यात अनेक समानता आहेत. दोन्ही सण सूर्याच्या एका नवीन राशीत प्रवेश साजरा करतात. दोन्ही नवीन वर्षांच्या आगमनाचे प्रतीक मानतात. दोन्ही सण आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहेत.

आता जरा दूरचे पाहू या. दक्षिण अमेरिकेत युरोपिय ख्रिस्ती मिशनरी येण्याआधी काय घडत असे?
इंका संस्कृतीत, मकरसंक्रांत हा इंका लोकांचा नवीन वर्षाचा सण होता. या दिवशी, इंका लोक सूर्य देव इंटिची पूजा आणि नवीन वर्षाचे आगमनाचे स्वागत केले जात असे.
तसेच अ‍ॅझटेक लोक सूर्य देव टोनांटिलाची पूजा आणि नवीन वर्षाचे आगमनाचे स्वागत करत असत.

हे सर्व पाहिले असता सूर्याचे मकर संक्रमण हा जागतिक स्तरावर साजरा होणारा सण होता असे मानायला प्रत्यवाय नसावा.
मी इतिहासकार नाही, मी पुरातत्त्वशास्त्रज्ञ नाही. वरील लेखात अनेक चुका असू शकतात. वरील माहितीच्या संदर्भाने प्राचीन भारतीय संस्कृती आणि त्याचे जागतिक संदर्भ किंवा वैश्विक घटना आणि त्याचे सणात झालेले रुपांतर यावर चर्चा व्हावी म्हणून हा प्रपंच केला आहे.

प्रतिक्रिया

लेख इंटरेस्टिंग आहे. व्हिएतनाम आणि थायलंड या देशांत जेव्हा जाणे झाले तेव्हा हे बहुतांश पदार्थ खाल्लेले आहेत. त्यातले अनेक आता भारतात निवडक ठिकाणी मिळतात. उदा. Bao.

आता एक अवांतर शंका, जी अनेकदा मनात येते.

रविवार, सोमवार इत्यादि सात वारांची सिस्टीम मूळची पाश्चात्य आहे की भारतीय? भारतीय पद्धत ही चंद्राच्या कलांवर अवलंबून असते अशी प्राथमिक समजूत आहे. म्हणजे काही लोक जे निग्रहाने भारतीय पद्धतीने तारखा सांगतात ते चांद्रमास आणि तिथी असे सांगतात.

पण प्रत्यक्ष व्यवहारात अनेक कारणांनी आपण साप्ताहिक कॅलेंडर पाळतो. हे सर्व समजून घेता येईल.

पण मग गुरुवारचा उपास, शनिवार मारुतीचा वार, मंगळवारी संकष्टी आली तर अंगारकी म्हणून जरा खास.. असे हे कॉम्बिनेशन कसे झाले असावे?

संक्रांत देखील इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे जवळ जवळ एका फिक्स तारखेला असते. १५ किंवा १४ जानेवारी. पाश्चात्य कॅलेंडर सूर्यावर आधारित असल्याने सूर्यासंबंधित घडामोडींच्या बाबतीत ते अधिक सुसंगत असावे असे वाटते. पण मग भारतीय संस्कृतीत या फिक्स इंग्रजी तारखा कशा आल्या..?

(साबुदाणा, बटाटा उपासाला अलौड कधीपासून झाला, या धर्तीवर)

निनाद's picture

15 Jan 2024 - 11:21 am | निनाद

शंकेला उत्तर म्हणून येथे एक लेख सात वारांची भारतीय पद्धती लिहिला आहे

अहिरावण's picture

15 Jan 2024 - 7:45 pm | अहिरावण

>>>संक्रांत देखील इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे जवळ जवळ एका फिक्स तारखेला असते. १५ किंवा १४ जानेवारी.

याचे गणित सायन निरयन पद्धतीत आहे. दर ७२ वर्षांनी संक्रांत १ दिवस पुढे जाते. पानिपताच्या वेळेस १० की ११ जानेवारी होती.
काही वर्षांपूर्वी ती नियमित १४ तारखेला असायची. त्यापुर्वी १३ किंवा १४. त्याच्या पुर्वी नियमित १३.

आता काही दिवसांनी नियमित १५ येईल. मग १५-१६. मग नियमित १६

पंचांगातील गणित जाणणारे अधिक भाश्य करु शकतील

याचे गणित सायन निरयन पद्धतीत आहे. दर ७२ वर्षांनी संक्रांत १ दिवस पुढे जाते. पानिपताच्या वेळेस १० की ११ जानेवारी होती.

रोचक. धन्यवाद ..

Bhakti's picture

15 Jan 2024 - 11:09 am | Bhakti

सुंदर लेख!
मला ना सूर्य खुप आवडतो.म्हणजे त्याच्या भोवतीच आपल जीवन फिरतेय आणि त्याचे दक्षिणायन,उत्तरायण ही गोष्ट पूर्वीपासून निरीक्षण केली जात असणार.पूर्वी देश‌ थोडे ना होते , संस्कृती असायची.उत्सव सात्विक असायचे.
सर्वांनी तीळगुळ घ्या गोड गोड बोला !

कर्नलतपस्वी's picture

15 Jan 2024 - 11:31 am | कर्नलतपस्वी

माहितीपूर्ण लेख. आतापर्यंत मराठी संक्रांत इतर राज्यात वेगवेगळ्या नावाने साजरी होते एवढेच माहीत होते. पण इतर देशात पण होते हे आजच कळाले.

मुक्त विहारि's picture

15 Jan 2024 - 2:43 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद...

यश राज's picture

15 Jan 2024 - 2:54 pm | यश राज

लेख आवडला. त्याबरोबर इतर देशीय सणांची माहिती मिळाली.

सौन्दर्य's picture

16 Jan 2024 - 9:14 am | सौन्दर्य

'संक्रांती' की 'संक्रांत?'

पूर्वी संक्रांती हा शब्द कधी ऐकला नव्हता हल्ली सर्वत्र तसा तो वाचायला ऐकायला मिळतो. विभक्ती प्रत्यय लावताना 'संक्रांती' हे बरोबर आहे, जसे संक्रातीच्या शुभेच्छा, किंवा संक्रांतीला तिळगुळ वाटतात. पण 'संक्रांती' हे नाम असू शकत नाही असे मला वाटते.

तसेच 'नवरात्री' की 'नवरात्र?'

जाणकारांनी ह्यावर थोडा प्रकाश टाकावा.

धर्मराजमुटके's picture

16 Jan 2024 - 6:41 pm | धर्मराजमुटके

संक्रांत
मावशीने आईची पोरं पळवून नेल्यामुळे असे शब्दप्रयोग होतात. चालायचेच !

वामन देशमुख's picture

18 Jan 2024 - 9:16 am | वामन देशमुख

'संक्रांती' की 'संक्रांत?'
...
तसेच 'नवरात्री' की 'नवरात्र?'

हा भाषाभाषांमधील फरक आहे -

मराठी - तेलुगु
संक्रांत - संक्रांति
नवरात्र - नवरात्रि
पौर्णिमा - पुन्नमि
मानसी - मानसा

मराठी - हिंदी
शांता - शांती
तुळस - तुलसी
पौर्णिमा - पूर्णिमा
दुसरा - दूसरा

---
अवांतरः आंध्र-तेलंगणा प्रांतांत बोलल्या जाणाऱ्या भाषेचे नाव तेलगू नसून तेलुगु आहे!

सौन्दर्य's picture

26 Jan 2024 - 8:32 pm | सौन्दर्य

माहितीबद्दल आभार.

वेगवेगळ्या भाषेत एकच शब्द वेगवेगळ्या पद्धतीने लिहिला जातोच व ते बरोबर देखील आहे. सदर लेख हा मराठीतून लिहिला गेला असल्याने मराठी भाषेत 'संक्रांति' का 'संक्रांत' असा प्रश्न मला पडला होता.

पुन्हा एकदा आभार.

सौन्दर्य's picture

16 Jan 2024 - 9:44 pm | सौन्दर्य

काय झालंय ना की सतत चुकीचे शब्द कानावर पडल्यामुळे किंवा वाचनात आल्यामुळे चूक काय व बरोबर काय हेच कळेनासे झालंय. आता 'झालंय' हाच शब्द बघितला तर तो 'झालं आहे'चा संक्षिप्त पण चुकीचा आविष्कार आहे हे कळतं. ह्याच पठडीतले इतर शब्द म्हणजे, केलंय, पाहिलंय, बघितलंय वगैरे. शाळेत असताना एकदा 'आलेलो' बोललो तर हातावर छड्या खाव्या लागल्या होत्या.

थोडं अवांतर झालं आहे, पण खात्री करून घ्यायची होती म्हणून विचारलं.

संक्रांतीवरचा लेख उत्तम.

वामन देशमुख's picture

18 Jan 2024 - 9:22 am | वामन देशमुख

'झालंय' हाच शब्द बघितला तर तो 'झालं आहे'चा संक्षिप्त पण चुकीचा आविष्कार आहे

अवांतर:

मराठवाडा : काय करायलास?
विदर्भ: काय करून राहिलास?
अजून कुठे १: काय करतोयस?
अजून कुठे २: काय करत आहेस?
अजून कुठे ३: काय करतो आहेस?
अजून कुठे N: अजून काहीतरी

यांतले चूक-बरोबर कसे ठरवणार? लहानपणापासून कानावर जे शब्द पडतात ते बरोबरच असतात, नाही का?

मकरसंक्रांती हा शब्द चुकीचाच आहे. तो मकरसंक्रांत असाच हवा. झालेल्या चुकीबद्दल खेद व्यक्त करतो. संपादकांना विनंती आहे की किमान मथळ्यात तरी मकरसंक्रांत असा बदल करावा. शक्य असल्यास लेखात केला तर उत्तम. धन्यवाद.

सौन्दर्य's picture

26 Jan 2024 - 8:43 pm | सौन्दर्य

निनाद भाऊ,

माझा लेखातील चूक दाखविण्याचा उद्देश नव्हता तर मराठी भाषेत काय बरोबर आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न होता. आपल्या आसपास कानावर पडत असलेले शब्द किंवा वाचनात आलेले शब्द हेच काही काळानंतर बरोबर आहेत असे वाटायला लागतात, त्यामुळे तुम्हाला खेद प्रदर्शित करायची गरज नाही.

मी भारतात राहत नसल्यामुळे तसेच मला आपल्या मराठी भाषेबद्दल नितांत प्रेम व आदर असल्यामुळे शक्यतो शुद्ध मराठी बोलण्याचा आणि लिहिण्याचा प्रयत्न करतो. जेथे जेथे शक्य असेल तेथे तेथे व्हॉट्सअपवरचे अशुद्ध मराठीत लिहिलेले संदेश मी सुधारून पुढे पाठवतो, उद्देश फक्त एव्हढाच असतो की निदान वाचकाला चुकीचे मराठी वाचायला लागू नये जेणेकरून अशुद्ध लिहिलेलेच बरोबर आहे असा त्याचा समज होऊ नये.

असो, विषयाची व्याप्ती फार मोठी आहे म्हणून येथेच आटोपते घेतो.

जेथे जेथे शक्य असेल तेथे तेथे व्हॉट्सअपवरचे अशुद्ध मराठीत लिहिलेले संदेश मी सुधारून पुढे पाठवतो, उद्देश फक्त एव्हढाच असतो की निदान वाचकाला चुकीचे मराठी वाचायला लागू नये जेणेकरून अशुद्ध लिहिलेलेच बरोबर आहे असा त्याचा समज होऊ नये.

पुर्णवेळ नोकरी होऊ शकेल इतके संदेश असतात. लहानपणी एका गोष्ट वाचली होती. एक मुलगा इतर लोक ठेचाळु नयेत म्हणुन रस्त्यातील दगड बाजुला करुन ठेवत होता.

टर्मीनेटर's picture

19 Jan 2024 - 12:03 pm | टर्मीनेटर

छान माहितीपुर्ण लेख 👍

कर्नलतपस्वी's picture

24 Jan 2024 - 8:57 pm | कर्नलतपस्वी

+1

युलेटिड फेस्टिवल हि जागतिक संकल्पना आहे. तथाकथित ख्रिसमस सुद्धा हा सूर्योपासक लोकांचा सण असून ख्रिस्तजन्माशी त्याचा काडीमात्र संबंध नाही (ख्रिस्त जन्म उन्हाळ्यांत झाला असावा असे बायबल मानते).

जगांत विविध ठिकाणी हिंवाळा म्हणजे मोठे संकट. हिंवाळा मृत्यू आणि गरिबी घेऊन येतो. एकदा हिवाळा सुरु झाला कि काही उगवत नाही. आपली गुरेढोरे सुद्धा मरतात. अश्या स्थितीत गरीब माणूस शेकोटी पेटवून सूर्य उगवण्याची वाट पाहत बसतो. सूर्याला देव मानतो. हिवाळ्यात झाडे सुद्धा मरतात. पण काही झाडे हि हिवाळ्यात सुद्धा हिरवी राहतात. त्यामुळे डागल्स फिर सारख्या झाडाचे माणसाला कौतिक वाटते. त्यापासून प्रेरणा मिळते.

मग एक असा दिवस येतो जिथे सूर्याचा प्रवास उलट दिशेने सुरु होतो आणि दिवस मोठे होऊ लागतात. त्यामुळे हिवाळा सरला ह्याची जाणीव होते. शेकडो वर्ष आधी म्हणजे साधारण ३०० CE मध्ये सूर्याचा मकर राशीतील प्रवेश आणि उत्तरायण सुरु होण्याचा दिवस एकच होता.भारतीय खगोल निरीक्षकांनी ह्याचे निरीक्षण केले होते आणि मकर संक्रांती आणि उत्तरायण ह्यांचा संबंध जोडून मकर संक्रांती एक महत्वाचा सण झाला. पण प्रत्यक्षांत राशीचक्र आणि वार्षिक सूर्याचा प्रवास ह्यांत अत्यंत छोटे फेस डिफरंस आहे त्यामुळे मकर संक्रांती हळू हळू उशिरा येत जाते आणि सध्या ती १४-१५ जानेवारी मध्ये येते. अर्थांत हा फरक अत्यंत छोटा असल्याने समजण्यासाठी शेकडो वर्षे जातात.

हे खूप प्राचीन गीत डग्लस फिर झाडाची स्तुती आहे. ख्रिसमस ट्री ची संकल्पना हीच आहे. हे गीत हल्ली "क्रिसमस करोल" म्हणून साजरे केले जाते.

https://www.youtube.com/watch?v=Xww_oaafCBA

[१] - https://pragyata.com/when-should-pongal-makar-samkranti-be-celebrated-an...