रेल्वेचे युटीएस UTS app वापरून तिकीट.

कंजूस's picture
कंजूस in काथ्याकूट
14 Jan 2024 - 8:19 am
गाभा: 

युटीएस UTS app वापरून तिकीट.

रेल्वेच्या युटीएस UTS appचा वापर करून online unreserved तिकीट.
याबद्दल ऐकून होतो की चालत्या गाडीतून तिकीट काढता येत नाही. पण काल हा प्रयोग केला. यशस्वी.
.
.

या app चा बरेच प्रवासी वापर करून रेल्वेचं अनारक्षित तिकीट काढतात. रेल्वे तिकीट खिडकीपासून सहा मीटरस दूर असतानाच तिकीट निघू शकते. म्हणजे स्टेशनच्या बाहेरूनच. याचा अर्थ रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर जाण्याअगोदर तुमच्याकडे रेल्वे तिकीट हवे.
.
.

काल (२०२४_०१_१३) पुण्याकडून इंटरसिटी ट्रेनने(१२१२८) ठाण्याला उतरुन परत कल्याणला (उलट) जायचे होते. (गाडी कल्याणला थांबत नाही.)म्हणजे बॅगा संभाळत ठाणे स्टेशनला बाहेर पडून तिकिट खिडकीवरून कल्याण तिकिट काढून परत आत यायला हवे. पण समजा UTS App वापरून गाडीत असतानाच ठाणे ते कल्याण तिकिट काढता आले तर गाडीतून उतरल्यावर लगेच उलट दिशेने जाणाऱ्या लोकलने प्रवास शक्य होता. तो प्रयोग केला आणि तिकीट निघाले. मोठा खटाटोप वाचला. म्हणजे एखाद्या स्टेशनला उतरून दुसऱ्या मार्गावरची एखादी गाडी आहे तर ती पकडून प्रवास करायचा झाल्यास याचा उपयोग आहे.
.
.

[ UTS Android app ची लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.cris.utsmobile
हे app फोनमध्ये डाउनलोड करून तेरा वर्षे वयाच्या कुणालाही सुरू करून वापरता येते. फोन नंबर, नाव, पासवर्ड नोंद करून वापरता येते. फोनमध्ये जीपीएस GPS Location असणे गरजेचे आहे. तसेच तिकिट खरेदीसाठी ऑनलाइन पेमेंट फक्त रेल्वेच्या R WALLET ने किंवा freecharge/paytm/mobikwik यातूनच करता येते. इतर payments getway , नेट बँकिंग
पर्याय नाहीत. यांचे UPI payment साठी जीएसटी लागत नाही पण वॉलेटमधून payment केल्यास मार्च २०२३ पासून जीएसटी लागू आहे.जीपीएस असण्याची सक्ती मात्र जाचक/अनावश्यक वाटली. हे app वापरायचे कसे याबद्दल यूट्यूबवर बरेच विडिओ सापडतील.
.
.
यातून साधी लोकल ट्रेन, त्यातील फर्स्ट क्लास किंवा एसीचे, पॅसेंजर किंवा सुपरफास्ट मेल एक्सप्रेस गाडीचे तिकिट निघते.
.
.
तिकिटांची वैधता -१) लोकल ट्रेन साठी मुंबईत तिकिट काढल्यापासून एक तासात वैध. Valid. शिवाय समजा तुमच्याकडे १०:०५ वेळ छापलेले तिकिट आहे तर ज्या गाडीची वेळ त्या स्टेशनला १०:०५ नंतर असेल त्या गाडीत चढू शकतात. एखाद्या गाडीची वेळ (departure) अगोदरची आहे पण ती लेट (late) झाल्याने १०:०५ नंतर आली तर त्यात हे तिकीट चालणार नाही. खरं म्हणजे खिडकीवर तिकीट काढल्यावर आपण असा प्रवास करतो परंतू अगदी नियमांच्या भाषेत बोलायचं तर ते तिकीट चालणार नसते. तिकीट तपासनीस काही करत नसतात ही बाब वेगळी.
२) मेल एक्स्प्रेसचे तिकीट काढलेल्या वेळापासून तीन तासांत किंवा जी ट्रेन अगोदर येते त्यासाठी वापरावे लागते.
.
.
कोणतेही unreserved तिकीट कोणत्याही/त्याच तारखेचं ठराविक वेळ टाकून काढता येण्याची सोय झाली तर खूपच फायदा होईल. जीपीएसही नकोच. फोनचा वापर फारसा न करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना कुणी त्यांच्या फोनमधून अगोदरच तिकीट काढून देऊ शकतील.
.
.

आपला अनुभव, सूचना, सुधारणा, दुरुस्ती अवश्य लिहा. काहींना हा लेख पाल्हाळ वाटू शकतो त्यांनी दुर्लक्ष करावे ही विनंती.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

14 Jan 2024 - 12:28 pm | मुक्त विहारि

सध्या आमची धाव, डोंबिवली (जागतिक केंद्र) ते नेरुळ, इतपतच असल्याने, आणि दोन्ही ठिकाणी, पटकन तिकीट मिळत असल्याने, ह्या App चा, सध्या तरी उपयोग नाही, पण भविष्यात ही माहिती उपयोगी पडू शकते म्हणून, वाखुसा...

कुमार१'s picture

14 Jan 2024 - 7:54 pm | कुमार१

उपयुक्त अनुभव.

शक्य झाले. गाडी कल्याणच्या पुढे गेल्यावर app सुरू केले. जीपीएस अगोदरपासूनच फोनमध्ये चालू ठेवले होते. त्यामुळे source station मध्ये डोंबिवली,कळवा,ठाणे दिसू लागले. ( जिथे असू त्यापासूनची फार दूरची स्टेशने यादीत येत नाहीत.) ठाणे निवडल्यावर destination Dombivli टाकले. ( ठाणे मिळाल्यावर पुढचे काम सोपे होते पण एक अडचण होती ती म्हणजे इंटरसिटी गाडी मुंब्रा मोठ्या बोगद्यात घुसते आणि नेट /जीपीएस बंद पडू शकते.) एक प्रयत्न वाया गेला कारण नेमके त्याच वेळी गाडी कोपर जवळून जात होती. " You need to be 6 meters away from ticket window" message आला.पुन्हा source stn केले. जमले. मग पेमेंट ही झाले. तिकीट आले. ठाण्याला उतरल्यावर लगेच बाजूच्याच ट्रॅकवरच्या फास्ट ट्रेनमध्ये चढता आलं.गाडी ठाण्यात येण्याअगोदर तिकिट निघाले होते. मला वाटतं की एकदा का ठाणे स्टेशनला गाडी घुसली असती तर तिकिट निघाले नसते.

App मधून जीपीएसची अट काढून टाकायला हवी.

विनातिकिट प्रवास करताना तपासनीस समोर आल्यावर तिकिट काढायची पळवाट असू नये म्हणून जीपीएसची अट आहे

आणि त्यामुळेच तुम्ही ट्रेन मधून तिकिट काढल्याचं आश्चर्य वाट्लं.

कंजूस's picture

9 Feb 2024 - 9:51 am | कंजूस

विनातिकीट नाही.

ट्रेन आणि बसच्या तिकिटांची पद्धत वेगळी असते. ट्रेन साठी रेल्वेच्या फलाटावर जाण्याअगोदर तुम्हाला तिकीट काढायचे असते. किंवा तुमच्याकडे तिकीट असले पाहिजे याकरिता जीपीएस / QR code ने तिकीट काढण्याची अट ठेवली आहे. एक्सप्रेस ट्रेनने आल्यावर आपल्याकडे त्या स्टेशनचे अधिकृत तिकीट असतेच. पण वेगळ्या मार्गावरचे तिकीट काढण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या बाहेर जावे लागते. QR code दुसऱ्या फोनवरून scan करण्याची युक्ती चांगली आहे. जर एकटाच प्रवासी असेल तर नेहमीच्या स्टेशनचे QR code प्रिंट जवळ बाळगल्यास काम होईल.

आता समजा अँडवान्स तिकीट काढण्याची सोय दिली ( अमुक तारखेचं अमुक एक वेळेचं तिकीट आगावू काढणे)तर काम सोपेच होईल. तिकीट काढल्या वेळेपासून एक तासात लोकल ट्रेन किंवा तीन तासांत मेल/ पॅसेंजर /एक्स्प्रेस मध्ये चढण्याची अट आपण पाळणारच.

ज्या गाडीत तुम्ही ज्या वेळेला चढणार त्यांच्या नियोजित वेळेअगोदर काढलेले तिकीट असले म्हणजे झालं. त्यानंतरचं असेल तर तुम्ही तिकीट तपासनीस दिसल्यावर तिकीट काढलं म्हणता येईल. समजा ठाण्याला आठ वाजताची पनवेल गाडी आहे तर तुमच्याकडे सात ते आठ या दरम्यान काढलेले तिकीट हवे. यासाठी जीपीएस कशाला हवं?

वेडा बेडूक's picture

9 Feb 2024 - 12:27 pm | वेडा बेडूक

मग ठीक आहे.

जीपीएस ची अट जे लोक विनातिकिट प्रवास करतात, आणि तपासनीस दिसला की तिकिट काढाय्ची खट्पट करतात त्यांच्यासाठी आहे.

>>अँडवान्स तिकीट काढण्याची सोय दिली

तर नक्किच फायदा होइल

कंजूस's picture

9 Feb 2024 - 2:05 pm | कंजूस

नाही. QR code नाही.

साध्या Journey Ticket >>NORMAL BOOKING>> Book & Travel (Paperless) पद्धतीने काढलं.
तिकीट अधिकृत (validity) ठेवण्याबाबत रेल्वेने नियम घालून दिले आहेत ना मग रेल्वे घाबरते कशाला? याची दोनतीन उदाहरणे माहीत आहेत घडलेली.
एकदा मुर्डेश्वर स्टेशनला 06602 या गाडीची वाट पाहात होतो. तिची वेळ 09:20 होती. तिकीट खिडकीवर क्लार्कने अर्धा तास अगोदर तिकीटे द्यायला सुरुवात केली. पण गाडी लेट होती. 09:20 वेळ झाल्यावर बुकिंग क्लार्कने खिडकी बंद करून टाकली. आरडाओरड केली रांगेतल्या प्रवाशांनी. पण तो बोलला की शेड्यूल टाइमाअगोदरच तिकीट देता येते आणि पुढे तीन तास इथे कोणतीच गाडी नाही. तेच नियम या appलाही लावता येतील ना? आमचं आम्ही काढू तिकीट. वाया जाण्याची जबाबदारी आमचीच. जीपीएस कशाला ठेवता?

वेडा बेडूक's picture

12 Feb 2024 - 5:09 pm | वेडा बेडूक

तुम्हाला वाचता येत नाहि की कळत नाहि?

जीपीएस ची अट जे लोक विनातिकिट प्रवास करतात, आणि तपासनीस दिसला की तिकिट काढाय्ची खट्पट करतात त्यांच्यासाठी आहे.

कंजूस's picture

12 Feb 2024 - 6:16 pm | कंजूस

गाडीच्या स्टेशनच्या वेळेनंतरचे तिकीट असेल ते. अर्थात अनधिकृत.
समजा गाडीची ठाणे स्टेशनची वेळ आठची आहे आणि एखाद्याने प्रवास सुरू केला. तपासनीस आलाय म्हटल्यावर त्याने तिकीट काढलेच तर तिकिटावरची वेळ ( आठ नंतरची) खोटे पाडणार. यामध्ये काय चूक आहे? आठ नंतरचे तिकीट काढून त्यास आठची गाडी मिळेलच अशी? गाड्या उशिरा धावत असतात ते धरूनसुद्धा प्रत्येकवेळी शक्य होणार नाही.

अनिरुद्ध प's picture

9 Feb 2024 - 2:13 pm | अनिरुद्ध प

कन्जुस जी,
माझ्या माहिती प्रमाणे, पुर्वी मैल/एक्ष्प्रेस चे तिकिट हे पुर्ण दिवसा साठि चालायचे,आपण म्हणत तो तीन ते चार तासाचा नियम नवा असावा. तसेच पुर्वी तिकिट खिड्की वर अड्वन्स तिकिट मिळायची सोय होती, ती बन्द केली असावी का?

अनिरुद्ध

अँडवान्स तिकीट अनारक्षित

अजूनही मिळते. तसं खिडकीवर पाटीही आहे. तीन दिवस आगावू आणि पॅसेंजर,मेल, एक्सप्रेस किंवा सुपरफास्ट ट्रेनचे दोनशे किमिटर अंतरापुढचे मिळते. ते दिलेल्या तारखेला संबंध दिवस कोणत्याही गाडीसाठी(त्याच प्रकारच्या) वापरता येते. समजा तुम्ही स्लिपरच्या डब्यांत चढलात तर TTE कडे तिकीट देऊन बर्थची मागणी करावी आणि वरच्या फरकाचे पैसे दिल्यावर जागा असल्यास नियमित आरक्षित तिकीट देतो.
तीन तासांत गाडीत चढण्याचा नियम हा खिडकीवर चालू (current booking) तिकीटासाठी असतो. अँडवान्स तिकीट हे आपण प्रवासाच्या तीन दिवसांअगोदर काढलेले असू शकते.

" त्यामुळेच तुम्ही ट्रेन मधून तिकिट काढल्याचं आश्चर्य वाट्लं."

ज्यावेळी ट्रेनमध्ये ( एक्स्प्रेस) होतो तेव्हा अधिकृत तिकीट होतंच. फक्त पुढच्या प्रवासाचं काढायचं होतं.

सर्व QR code https://utsqrcode.com/ इथे मिळतील.

कदाचित हे वापरून कुठूनही तिकीट काढता येईल.
https://www.howtogeek.com/795277/how-to-spoof-your-location-on-android/

डेव्हलपर ऑप्शन वापरायचे आहे.
त्याबद्दल माहिती असावी लागते. काही फोन्समध्ये 'about phone' हे सेटिंग्ज चार पाच वेळा क्लिक करून डेव्हलपर ऑप्शनयेतो. तिथे काही चूक झाली तर फोन बंद पडू शकतो असं यूट्यूबवर कळले.

गोरगावलेकर's picture

6 Feb 2024 - 9:22 pm | गोरगावलेकर

15 दिवसांपूर्वी जळगांवहुन मुंबईला येत असतांना ठाण्याला उतरून नेरुळला जायचे होते पण गाडीला ठाणे थांबा नसल्याने कल्याणला उतरलो.
कल्याणच्या आधी UTS App द्वारे यांनी कल्याण ते नेरुळ तिकीट काढायचा प्रयत्न केला. तिकीट मिळाले नाही.
कल्याणला प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर परत प्रयत्न केला. QR कोड स्कॅन करून तिकीट काढू शकता असा मेसेज मिळाला. दुसऱ्या फोनवर नेट वरून कल्याणचा QR कोड मिळवला. पहिल्या फोनवरून App द्वारे कोड स्कॅन केला. तिकीट मिळाले.

रेल्वे स्टेशन QR कोड लिस्ट मिळते त्यातून तो मिळवून साठवून ठेवणे करता येईल.
QR कोडची युक्ती चांगली आहे. कामाची गोष्ट. हा पर्याय app मध्येच आहे त्यामुळे कामाचा आहे.

रेल्वेच्या ट्विटर अकाउंटला मेसेज केला होता की ऍपमधून जिपिएस काढा म्हणून पण त्यांना खूप विनंती आल्यावरच काढतील.