भारताच्या इतिहासामध्ये 22 जानेवारी 2024 चा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल, कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील भव्य राम मंदिरात निवास करतील. अयोध्येत आता श्रीरामाच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहे.
वाल्मिकी रामायणानुसार अयोध्येत प्रभू रामाचा जन्म झाला. अनेक वर्ष अयोध्येत रामाचं राज्य होतं. त्यानंतर प्रभू रामाने जल समाधी घेतल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर अनेक वर्षानंतर उज्जयिनीचा राजा विक्रमादित्य अयोध्येत आला होता. त्याने या ठिकाणी खोदकाम सुरू केलं. या ठिकाणी श्री रामाचं अस्तित्व असल्याचं दिसून आलं. त्यानंतर विक्रमादित्याने या ठिकाणी रामाचं मंदिर बांधलं. या मंदिरात नियमितपणे प्रभू रामाची पूजा होत होती. त्यानंतर अनेक राजे आले आणि गेले. 14व्या शतकात मुघलांची सत्ता आली. 1525मध्ये मुघल शासक बाबरचा सेनापती मीर बांकीने राम जन्मभूमीवरील मंदिर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी मशीद बांधली. तीच बाबरी मशीद. तेव्हापासून मंदिर आणि मशिदीचा वाद सुरू होता.
१८५३ साली पहिल्यांदा हिंदू समुदायातील लोकांनी बाबरी मशीद आहे ती जागा राम मंदिराची होती आणि तिथे बाबरी मशीद पाडून राम मंदिर बांधले जावे अशी मागणी ब्रिटिश सरकारकडे केली आणि त्याबाबत खटला देखील कोर्टात दाखल केला. तेंव्हा पहिल्यांदा अयोध्येत राम मंदिर आणि बाबरी मशीद या वादावरून दोन समुदायात दंगल झाली. १८५९ साली ब्रिटिश सरकारने अयोध्येतील वादग्रस्त जागेला कुंपण घातले आणि मशिदीत मुस्लिम लोकांना तर बाहेर रिकाम्या जागेत चौथऱ्यावर हिंदूंना पूजा करण्याची परवानगी आली.
फेब्रुवारी १८८५ मध्ये महंत रघुवर दास यांनी फैजाबाद उपजिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर याचिका दाखल करून वादग्रस्त जागेवर मंदिर उभारण्याची परवानगी मागितली. पण बांधण्यासाठी अनुमती देण्यास कोर्टाने नकार दिला.
२३ डिसेंबर १९४९ रोजी वादग्रस्त जागेवर प्रभू राम आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आढळून आल्याने या वादाने नवे वळण घेतले. अयोध्येत राम प्रकट झाले असा दावा हिंदूंनी केला तर मुस्लिम लोकांनी यावर आक्षेप घेत कोणी तरी रात्रीच्या अंधारात मूर्ती आणून तिथे ठेवल्याचा दावा केला. तो वाद वाढू लागला म्हणून तत्कालीन सरकारने ‘वादग्रस्त वास्तू’ म्हणून शिक्का लावला आणि मशिदीला टाळे लावले. १६ जानेवारी १९५० रोजी गोपालसिंह विशारद यांच्याकडून मशिदीतून मुर्त्या हटवण्यात येऊ नयेत तसेच कोणत्या ही अडथळ्या शिवाय मुर्त्यांची पूजा सुरू ठेवण्यात यावी, अशी फैजाबाद दिवाणी न्यायालयात मागणी करण्यात आली. न्यायालयाने मुर्त्या हटवण्यात येऊ नयेत परंतु त्या टाळेबंदीत राहतील आणि केवळ पुजाऱ्याकडून पूजा सुरू राहील. जनता बाहेरून दर्शन घेईल, असे आदेश दिले.
सन १९५९ मध्ये निर्मोही आखाड्याने कोर्टात मंदिर उभारणीसाठी दावा दाखल केला तर सन १९६१ मध्ये सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने ही कोर्टात मशिदीचा दावा दाखल केला.
सन १९८४ मध्ये विश्व हिंदू परिषदेने मंदिर निर्मितीसाठी एका समितीची स्थापना केली. १ फेब्रुवारी १९८६ रोजी फैजाबाद न्यायालयात वादग्रस्त ठिकाणी लावण्यात आलेले टाळे उघडून हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार बहाल करण्याचे आदेश देण्यात आले. या निर्णयाला विरोध करत बाबरी मशीद संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. तेंव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार होते आणि राजीव गांधी पंतप्रधान होते.
१९८९ मध्ये विश्व हिंदू परिषदेचे नेते देवकीनंदन अग्रवाल यांनी मंदिराच्या दाव्या विषयक आणखीन एक खटला न्यायालयात दाखल केला आणि नोव्हेंबर १९८९ मध्ये केंद्र सरकार म्हणजेच तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या परवानगीने बाबरी मशिदीच्या काही अंतर दूर राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. सन १९९० साली भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा सुरू केली. त्यामुळे देशातील वातावरण ढवळून निघाले. लालू प्रसाद यादव यांच्या सरकारने बिहारमध्ये ही रथरात्रा रोखली आणि लाल कृष्ण अडवाणी यांना अटक केली. सन १९९१ मध्ये रथयात्रेचा भाजपला मोठा फायदा झाला. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार आले आणि देश भरातून राम मंदिर उभारणीसाठी विटांची मोहीम सुरू झाली.
३० ते ३१ ऑक्टोंबर १९९२ रोजी धर्म संसदेत कारसेवेची घोषणा करण्यात आली आणि नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी मशिदीच्या संरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सोपवलं. ६ डिसेंबर १९९२ रोजी लाखो कारसेवक अयोध्येत दाखल झाले ते ११:५० वाजता मशिदीच्या घुमटावर चढले जवळ पास ४:३० वाजेपर्यंत मशीद उदध्वस्त करण्यात आली. घाईघाईत एक लहान मंदिर तिथे उभारण्यात आले. बाबरी मशीद पाडली आणि त्याचे पडसाद देशभरात उमटले. गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात जातीय दंगली झाल्या. या दंगलीत दोन हजार पेक्षा जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागले. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एम.एस लिब्रहान आयोगाची नियुक्ती केली.
१ जानेवारी २००२ रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अयोध्या विभागाची स्थापना केली. हिंदू मुस्लिम या दोन्ही पक्षकारांशी संवाद साधण्याची व वाद मिटवण्याची जबाबदारी अयोध्या विभागावर सोपवली. वादग्रस्त जागेवर मंदिर कधी अस्तित्वात होते का? याच्या पडताळणीसाठी अलाहाबाद न्यायालयाने पुरातत्व विभागाला सन २००३ मध्ये उत्खनन करण्याचे आदेश दिले. बाबरी मशीद पाडली तिथे उत्खनन करण्यात आले, जिथे मशीद पाडली तिथे दहाव्या शतकातील राम मंदिराचे अवशेष आढळून आले व तेथे राम मंदिर होते हे पुराव्या साहित सिद्ध झाले आणि तसा अहवाल भारतीय पुरातत्व खात्याने कोर्टात सादर केला.
३० सप्टेंबर २०१० रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जमीन राम मंदिर, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यात समसमान वाटण्याचा निर्णय दिला. या निर्णयाला सर्वांनीच सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाने ९ मे २०११ रोजी स्थगिती दिली. सन २०१७ लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्या सह भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक नेते यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
८ फेब्रुवारी रोजी सुन्नी वक्फ बोर्डा तर्फे बाजू मांडताना ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी नियमित व्हावी अशी विनंती केली. ती विनंती कोर्टाने फेटाळली. १९९४ मध्ये इस्माईल फारुखी विरुद्ध भारतीय संघ यांच्यातील खटल्यात दिलेल्या निकलाचा फेरविचार व्हावा व हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवण्यात यावे अशी मागणी राजीव धवन यांनी केली. ती मागणी देखील सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली.
सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानिक पीठाने हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल देत संपूर्ण वादग्रस्त जमीन राम मंदिरासाठी दिली. सोबतच मुस्लिम पक्षाला वादग्रस्त जमिनीपासून दूर पाच एकर जमीन मशीद उभारणीसाठी देण्याचा निर्णय दिला.
५ ऑगस्ट रोजी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साहित १७५ जणांना सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आले होते.
अशा प्रकारे प्रदीर्घ संघर्षानंतर शेवटी प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीत त्यांचे मंदिर उभारले जात आहे.
या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी रोजी घरोघरी श्री राम ज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. "हा ऐतिहासिक क्षण सुदैवाने आपल्या सर्वांच्या जीवनात आला आहे. या निमित्ताने सर्व 140 कोटी देशवासीयांनी 22 जानेवारी रोजी आपल्या घरी श्री राम ज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करावी", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
प्रभु श्रीरामाच्या आशीर्वादाने आपणा सर्वांच्या आयुष्यातील अंधःकार दूर होवो आणि लौकरच रामराज्य येवो ही प्रार्थना!
||जय श्रीराम||
प्रतिक्रिया
23 Jan 2024 - 8:08 pm | अहिरावण
च्यायला घष्टी तर चांगली प्या
23 Jan 2024 - 8:15 pm | रानरेडा
इकडे प्रतिसाद देणाऱ्या काही व्यक्तींची बौद्धिक कुवत लक्षात घेऊन हा प्रतिसाद दिला सर !
आपण शोधले व्यवस्थित
बाकी पुरोगा लोकांना पण हाच प्रतिसाद द्यावा
24 Jan 2024 - 1:11 pm | Trump
श्री रानरेडा यांना कोणत्या अॅंजेला व्हाईट अभिप्रेत आहेत ते माहिती नाही. एका पेक्षा जास्त अॅंजेला व्हाईट जगात असतील असा विचार कोणालाही शिवला नाही हे पाहुन आश्चर्य वाटले.
सहज खालील प्रकारे शोधले तर काही अँजेला दिसुन आल्या.
https://www.google.com/search?q=Angela+White+civil+engineer
अभियांत्रिकीमध्ये नोबेल पारीतोषिक नसते, त्यामुळे कोणाला मिळत नाही.
25 Jan 2024 - 10:43 am | सुबोध खरे
रानरेडा यांनी खोडसाळपणे अॅंजेला व्हाईट या पॉर्न स्टार च्या नावावर काहीतरी ढकलून दिलेले आहे
इंजिनियरिंग मध्ये नोबेल नाही, अॅंजेला व्हाईट यांनी कोणतेही संशोधन केलेले नाही
क्षाज्ञवल्क्य नसून याज्ञवल्क्य ऋषी होते. त्यांचा आणि स्थापत्य शास्त्राचा किंवा मंदिर निर्मितीचा काहीही संबंध नाही आणि त्यांनी याज्ञवल्क्य स्मृती नावाचा कोणताही ग्रंथ लिहिलेला नाही
आणि त्यावर सोमि वर मोदी विरोधक त्याची अजिबात शहानिशा न करता ऊत आल्यासारखे गोंधळ घालत आहेत.
यावरुन एक जुने वाक्य आठवले.
"मोदींकडे तोंड करून कुत्रा जरी भुंकत असेल तरी आजकालचे पुरोगामी त्याला आपला नेता मानतील"
बाकी चालू द्या
25 Jan 2024 - 11:41 am | अमरेंद्र बाहुबली
यावरुन एक जुने वाक्य आठवले.
"मोदींकडे तोंड करून कुत्रा जरी भुंकत असेल तरी आजकालचे पुरोगामी त्याला आपला नेता मानतील"
बाकी चालू द्या
हेच मी ऊलट ऐकले होते.
"मोदींच्या बाजूने तोंड करून कुत्रा जरी भुंकत असेल तरी आजकालचे अंधभक्त त्याला आपला नेता मानतील"
असो.
रानरेडा हे अंधभक्त वाटताहेत, आलं की ढकल ह्या कॅटेगीरीतले.
25 Jan 2024 - 12:38 pm | सुबोध खरे
भुजबळ बुवा
उगाच ओढून ताणून काही लिहायची गरज नाही
अंधभक्तांना लुंग्यासुंग्याला नेता मानण्याची गरजच नाही.
त्यांच्यासाठी श्री मोदी हे एकच नेते पुरेसे आहेत.
उगाच एक ना धड भराभर चिंध्या ची त्यांना अजिबात गरज नाही.
बा़की
मी रानरेडा याना ओळखतो ते आपल्या कल्पनेपेक्षा किती तरी जास्त हुशार आणि समतोल आहेत.
तेंव्हा त्यांच्याबद्दल उगाच फालतू लिहून स्वतः चं हसं करू नका
25 Jan 2024 - 1:19 pm | अमरेंद्र बाहुबली
मी रानरेडा याना ओळखतो ते आपल्या कल्पनेपेक्षा किती तरी जास्त हुशार आणि समतोल आहेत.
ते त्यांच्या वरील व्हाईट बाईच्या पोस्ट वरून कळालं किती हुशार नी समतोल आहेत ते.
त्यांच्यासाठी श्री मोदी हे एकच नेते पुरेसे आहेत.
असं काहीही नाहीये.काही अंधभक्त कितीतरी लुंग्यासुंग्यांना नेता मानतात तर काही योगी, अमीतशा नी फडणवीस ह्यांना नेता मानतात.25 Jan 2024 - 12:46 pm | अहिरावण
>>रानरेडा हे अंधभक्त वाटताहेत, आलं की ढकल ह्या कॅटेगीरीतले.
एकंदरीत पहाता तुमचंच हसू होतंय पण या साठमारीत... आवरा !! :)
23 Jan 2024 - 7:54 pm | रानरेडा
खरे तर मंदिरात बऱ्याच चुका आहेत. इंजिनिअरिंग मध्ये नोबेल मिळालेल्या प्रोफेसर अँजेला व्हाईट यांचे नाव तुम्ही ऐकले असेलच. त्यांनी हिंदू धर्म आणि मंदिर शास्त्र याचा सखोल अभ्यास केला.
मंदिर निर्माण साठी क्षाज्ञवल्क्य स्मृती प्रमाण मानतात हे माहीत असेलच - तर अँजेला व्हाईट यांनी या आणि इतर ग्रंथाद्वारे राममंदिर कसे चुकीचे आहे ते सप्रमाण दाखवून दिले,
दुर्दैवाने उन्मादात आंधळे झालेल्या मोदी सरकारने हे नाकारले!
23 Jan 2024 - 10:06 pm | कर्नलतपस्वी
चुक, बरोबर अंधभक्त, पुरोगामी,प्रतिगामी इत्यादी,इत्यादी पण काल, एकंदरीत ज्याप्रमाणात जनसमुदाय एकत्रीत झाला ,देशातच नाही तर परदेशात सुद्धा याचे पडसाद उमटले .....
इथे मतमतांतर असल्याने काहिही प्रतिसादले तरी कुणाला भावणार कुणाला खुपणार. उभ्या आयुष्यात एव्हढ्या मोठ्याप्रमाणात देशवासी एकत्रीत झाले पाहून आनंद झाला. मुख्य मुद्दा देश संघटीत व्हायला पाहीजे. सशक्त व्हायला पाहीजे. पुन्हा कुणी आक्रमकता आमच्याकडे वाकड्या डोळ्याने बघता कामा नये.
ज्यांना विरोध करायचा त्यांनी विरोध करा पण एक लक्षात घ्या ये पब्लिक है सब जानती है.
ताजा कलम-काही विरोधकांना, आपल्या गोड छोट्या रामल्लां सह ,मतभेद बाजुला ठेवून उत्सवात सामील होताना बघीतले आहे.
23 Jan 2024 - 10:11 pm | कर्नलतपस्वी
आक्रमकता ऐवजी आक्रांता ,
रामल्ला ऐवजी रामलल्ला
असे वाचावे.
चुक भूल देणे घेणे
23 Jan 2024 - 11:06 pm | यश राज
खरंय अगदी. आमच्या इकडे सुद्धा गेल्या दहा पंधरा दिवसात देवळात किंवा वेगवेगळ्या कम्युनिटी हॉल मध्ये अभूतपूर्व अशी गर्दी पाहायला मिळते आहे. एरवी जी लोकं देवळात जायला कचरतात ती लोकं आवर्जून पाहायला मिळाली. सगळे मतभेद(आपल्या पंतप्रधानांबद्दल असलेला आकस सुद्धा) बाजूला ठेवून आपल्या रामलललाचे स्वागत करण्यासाठी आतुर असे चेहरे पाहिलेत.
प्रचंड मोठ्या प्रमाणात आपले देशवासी एकजूट झालेत ज्याची आजच्या काळात सर्वात जास्त गरज आहेच.
आता ज्यांना स्वतःहून
स्वतःच्या पोटात दुखावून घ्यायचेच असेल तर त्यावर काहीही औषध नाहीये.
थोडे अवांतर: माझा ब्रिटिश मॅनेजर ज्याने सोमिवर कार्यक्रमाचे high lights बघितले . त्याला रामलल्लाची मूर्ती विलक्षण आवडली. तो मीटिंग मध्ये म्हणाला की " I am extremely happy for you guys that you reclaimed it what was yours and you truly deserved it"
25 Jan 2024 - 6:38 pm | मुक्त विहारि
सहमत आहे....
-------
"I am extremely happy for you guys that you reclaimed it what was yours and you truly deserved it"
आता गोराच जर, असे बोलला असेल तर, उदारमतवादी हिंदू लोकांचा जास्तच जळफळाट झाला असेल...
26 Jan 2024 - 10:51 am | अहिरावण
>>>उदारमतवादी हिंदू लोकांचा जास्तच जळफळाट झाला असेल...
किंचित सुधारणा - हिंदू हा उदारमतवादीच असतो. विविध पंथ, संप्रदाय, रीती, पद्धती यांना सहज मान्यता देतो.
सध्या आम्ही उदारमतवादी असे ओरडून सांगणारे काही गणंग या देशात कीडीप्रमाणे पैदा झाले आहेत विशेषतः इंग्रजी अंमलापासून... त्यांची मुलत: वृत्ती केवळ कुठलेतरी युरोपातील बुके वाचून तसेच इथे भारतात होते असे समजून ओका-या काढणे हीच असते. हे स्वतःला डावे (डावे आहोत म्हणजेच आम्ही उदारमतवादी) असे समजतात.
अशा भुक्कड वृत्ती समाजाला घातक आहेत हे पक्के समजून चला.
25 Jan 2024 - 12:35 pm | अमरेंद्र बाहुबली
चेपूवरील पुरोगामी प्रतिगामी हाणामारीत ही सूंदर कविता सापडली.
शाळा पडू द्या,त्यात लेकरू मरू द्या....
पण तुम्ही देवळे बांधा बापहो…....
सोन्याचा कळस चढवा त्यावर ,
उद्याच भविष्य दडलंय ना त्यात तुमचं ..……
बाजारात विकत मिळणारी मूर्ती जर,
माणसाच्या जीवनात समृद्धी आणत असेल तर....
विकणारा काय खुळा आहे का ?
का मूर्ती घडवणारा खुळा आहे ?
तो स्वतःच भलं करण्याऐवजी ,
बाजारात देव मांडून त्याचा व्यापार कशाला करेल ?
हे कधी कळणार माझ्या बाप हो तुमाले
राष्ट्रसंत गाडगेबाबा
25 Jan 2024 - 12:45 pm | अहिरावण
क्या बात है !
थोरांचे थोर विचार !!
26 Jan 2024 - 5:46 pm | मुक्त विहारि
https://www.loksatta.com/business/finance/ayodhya-ram-mandir-increase-in...
------
26 Jan 2024 - 6:17 pm | अमरेंद्र बाहुबली
शक्यता. :)
26 Jan 2024 - 6:41 pm | सर टोबी
कलेक्शन काय म्हणतंय सध्या?
हायड्रोजन धोरण जाहीर झाल्यानंतर हायड्रोजन गॅस स्टेशन, हायड्रोजन वरील वाहन निर्मिती आणि दुरुस्ती यातून निर्माण होणाऱ्या नव्या रोजगाराच्या संधी कुणी बघितल्या आहेत का?
सेमिकंडक्टर धोरणामुळे तैवानच्या नाड्या आवळ्या गेल्यात का?
26 Jan 2024 - 6:58 pm | अमरेंद्र बाहुबली
सेमिकंडक्टर धोरणामुळे तैवानच्या नाड्या आवळ्या गेल्यात का?
तो प्रकल्प महाराष्ट्रातून काढल्यामूळे वारला.26 Jan 2024 - 7:35 pm | वामन देशमुख
तुफान सुरू आहे; काळजी करू नका.
26 Jan 2024 - 8:51 pm | अमरेंद्र बाहुबली
काही आकडे?? की वाट्सअप युनीर्सीटी?
26 Jan 2024 - 10:53 pm | वामन देशमुख
'
हं
हा प्रश्न करणाऱ्यांना काहीतरी संशोधन केलं असेलच नं. त्यांना त्यांचे आकडे सांगू द्या, मी माझे आकडे सांगतो. तोपर्यंत -
या प्रश्नाचे
हे उत्तर!
'
26 Jan 2024 - 11:27 pm | अमरेंद्र बाहुबली
म्हणजे आकडे नसताना ठोकून दिलं की तुफान सुरूय.
27 Jan 2024 - 6:46 am | वामन देशमुख
नाही.
हा प्रश्न करणाऱ्यांनी काहीतरी संशोधन केलं असेलच नं. त्यांना त्यांचे आकडे सांगू द्या, मी माझे आकडे सांगतो. तोपर्यंत -
या प्रश्नाचे
हे उत्तर!
---
चला, आता पुढचं खुसपट काढा.
28 Jan 2024 - 6:42 pm | विवेकपटाईत
मी दिस जन.२०१९-२० गुजरातची १७ दिवसांची भटकंती केली होती.दोन दिवस नर्मदा टेंट सिटीत राहिलो.पूर्ण परिसर बघायला दोन दिवस ही कमी. सुट्टीसाठी अनेक आकर्षण आहेत. मोठ्या प्रमाणात होटेलांचे निर्माण दिसत होते. तेंव्हा ही भारी भीड होती. रोज किमान २५ ते ३० हजार पर्यटक ते ही एक ते तीन दिवस रहात असतील.कल्पना करा किती कमाई असेल. अधिकांश जागी स्थानिक रोजगार होता.
पर्यटन स्थळ कसे विकसित केले जाते याचे अध्ययन करायचे असेल तर एकदा जाऊन या.
28 Jan 2024 - 7:57 pm | मुक्त विहारि
तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघीतले असल्याने, विश्वास वाटतो...
28 Jan 2024 - 10:56 pm | सर टोबी
जेव्हा सरदार पटेलांच्या स्मारकाची चर्चा होत होती ती खास करून तीन हजार कोटीच्या आसपास केवळ पुतळ्यावर खर्च झाला त्याच्या वसुलीच्या अनुषंगाने होती. तुम्ही पर्यटकांच्या येण्यामुळे जी उलाढाल होत आहे त्याचा विचार करून झाला प्रकार अतिशय यशस्वी झाला आहे असा निष्कर्ष काढत आहात. आणि हे करतांना तेथे झालेली हॉटेल्स आणि इतर सुविधा यांच्यासाठी भांडवली गुंतवणूक झाली आहे हे सोयीस्करपणे विसरता.
चार वर्षानंतर गुजरातचं पर्यटन म्हणजे गीरचे जंगल, अडालज येथील रानी कि वाव आणि इतर पारंपरिक स्थळं यांना पुन्हा पसंती मिळत असेल तर हा सर्व खटाटोप निदान "तुफान यशस्वी" झाला असे तरी म्हणता येईल असे वाटत नाही. आकडेमोड हा तुमचा नेहमीच वीक पॉईंट आहे तेव्हा काही ठोस माहिती मिळेल असे वाटत नाही.
सर्वात महत्वाचा मुद्दा हा नाही कि ते स्मारक पर्यटनस्थळ म्हणून यशस्वी झाले कि नाही. मुद्दा हा आहे कि कुठले तरी धोरण, कुठली तरी सुविधा वगैरे निर्माण झाली कि देशात कधी नव्हे ती सोन्याची पहाट उगवली असा भक्तांचा आवेश असतो. आणि जागरूक नागरिक म्हणून आपण त्या धोरणांचा मागोवा घेतला, सुविधांच्या सातत्यपूर्ण उपलब्धतेचा विचार केला तर आपण फारच लवकर आणि उत्साहात ढोल बडवले होते हे लक्षात येऊ शकते.
29 Jan 2024 - 3:43 am | वामन देशमुख
मतभिन्नतेच्या आदरासहित -
@विवेकपटाईत साहेब,
काही प्रतिसाद गांभीर्याने, अर्थपूर्ण, माहितीयुक्त प्रतिसाद देण्याच्या लायकीचे नसतात. त्यांचा हेतूच सतत काहीतरी खुस्पटे काढत राहणे असतो.
#खवचट_प्रश्नाला_खवचट_उत्तर
26 Jan 2024 - 9:32 pm | मुक्त विहारि
हे मस्त...
27 Jan 2024 - 9:32 am | सर टोबी
ताईवान की नाड्या आवळणे के लिए नाड्या कम गिरतें होंगे तो अपून को बोलने का. पथारी है अपनी नाड्या बेचने की.
27 Jan 2024 - 10:26 am | अमरेंद्र बाहुबली
हाहाहा. खतरनाक.
27 Jan 2024 - 10:59 am | वामन देशमुख
आधी इथे चितपट झाला आहात हे मान्य करा आणि मग पुढचं खुसपट काढा.
http://www.misalpav.com/comment/1174822#comment-1174822
नाही, आम्ही काही चितपट वगैरे करत नाही, आमच्यासाठी केवळ चर्चा आहे.
http://www.misalpav.com/comment/1174347#comment-1174347
चितपट वगैरे हे सगळे तुमचेच विचार आहेत म्हणून म्हटलं.
27 Jan 2024 - 11:37 am | सर टोबी
स्टॅच्यू ऑफ युनिटीचं कलेक्शन काय आहे हा प्रश्न भले आम्ही उपरोधाने विचारला असू पण त्याला उत्तर देण्याची जबाबदारी तुमचीच आहे. तेव्हा ती द्यायची नसेल तर देऊ नका. भक्तांचा आवाका आम्ही आज ओळखतोय का?
आणि धार्मिक अस्मिता हि गोष्ट आमची अभिव्यक्ती म्हणून आम्ही निवडलीच नाही. त्यामुळे आम्हाला धार्मिक निष्ठा वगैरे नाहीच. आणि ज्या नाहीत त्या वाहणार कुणाला?
असो. तुमचं नाव बहुधा तुमच्या बुद्धीच्या अवाक्यानुसार ठेवलं असावं. म्हणून आम्ही आपल्याला फारसा प्रतिसाद देण्याच्या फंदात पडत नाही.
27 Jan 2024 - 11:41 am | अमरेंद्र बाहुबली
+१
27 Jan 2024 - 6:01 pm | वामन देशमुख
मुद्देसूद प्रतिवाद केल्यानंतर निरुत्तर झालं की अशी उत्तर येणं स्वाभाविकच आहे म्हणा.
27 Jan 2024 - 6:03 pm | वामन देशमुख
खवचट प्रश्नाला खवचट उत्तर
26 Jan 2024 - 6:47 pm | मुक्त विहारि
https://marathi.indiatimes.com/business/real-estate-news/ram-mandir-effe...
------
पैसे असतील तर, काशी आणि मथुरा मध्ये, आत्ताच गुंतवणुक करा...
28 Jan 2024 - 4:07 pm | रंगीला रतन
येडा बेडूक कुठे गेला?
पावसाळ्यात डराव डराव करत येल का परत? मग काय झालं २२ जानेवारीला? ऐतिहासिक दिवस ठरला काय? हिंदूंमध्ये उत्साह होता काय? की फ्लॉप शो होता? काही फोटो, व्हिडीओ द्या की राव का नुसतीच आग लावून मजा बघत बसला आहात? का फर टोपीचा डू आयडी आहे येडा बेडूक?
28 Jan 2024 - 6:25 pm | वेडा बेडूक
फ्लॉप शो होता. हिंदूंमध्ये उत्साह नव्हता. कुठेही भगवे झेंडे लागले नव्हते. मिरवणूका निघाल्या नाहीत. मंदिर या विषयावर हिंदू लोक नाराज आहेत. बहुतेक हिंदू शंकरंचार्यांना पाठिंबा देत आहेत. अयोध्येचं मंदिर भाविकांअभावी ओस पडलं आहे.
28 Jan 2024 - 6:52 pm | अमरेंद्र बाहुबली
युपी नी अपकमींग युपीत (महाराष्ट्र) सर्वाधीक ऊत्साह होता.
28 Jan 2024 - 5:39 pm | मुक्त विहारि
https://panchjanya.com/2024/01/27/316179/bharat/uttar-pradesh/american-c...
28 Jan 2024 - 6:14 pm | अमरेंद्र बाहुबली
पान्चजन्य. :)
28 Jan 2024 - 6:25 pm | मुक्त विहारि
https://hindi.news18.com/news/rajasthan/jaipur-ayodhya-aastha-trains-sta...
------
चला, रेल्वेला अजून एक उत्पन्नाचा स्रोत मिळाला...
जय श्रीराम...
28 Jan 2024 - 6:35 pm | मुक्त विहारि
https://www.aajtak.in/india/news/story/indian-railways-has-pushed-the-in...
------
28 Jan 2024 - 6:53 pm | अमरेंद्र बाहुबली
रेल्वे ला शर्वाधीक ऊत्पन्न विकसीत युपीतून अविकसीत महाराष्ट्रात येनार्या लोंढ्यांमूळे होते.
28 Jan 2024 - 8:05 pm | मुक्त विहारि
https://www.abplive.com/states/up-uk/yogi-adityanath-ram-mandir-news-tou...
-----
स्थानिक पातळीवर रोजगाराची अजुन एक संधी....
28 Jan 2024 - 8:09 pm | मुक्त विहारि
https://navbharattimes.indiatimes.com/state/uttar-pradesh/ayodhya/ram-ma...
------
ही तर फक्त सुरुवात आहे..
अजुन काशी आणि मथुरा बाकी आहेत...
28 Jan 2024 - 8:10 pm | अमरेंद्र बाहुबली
१९९२ ला कारसेवा झाली तेव्हा तुम्ही कुठे होतात?? दुबई की कतार??