नीर डोसे. घावने

कंजूस's picture
कंजूस in पाककृती
25 Dec 2023 - 5:01 pm

नीर डोसे. घावने
https://youtu.be/ftG4q-Wrzmc?si=phSgsxd9jFiP1h0j

या विडिओत दाखवल्याप्रमाणे केले. सहज सोपे आहे. कढीपत्ता डाळं यांची चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला येतील. सांबार ही घेता येईल.
दोन तीन वेळा वेगवेगळे तांदूळ वापरून करून पाहिले. होतात. नानस्टिक तवा वापरला. बिडाचा नाही. तव्याला तेलसुद्धा लावावं लागलं नाही.
फोटो

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

25 Dec 2023 - 5:27 pm | कर्नलतपस्वी

मस्तच की. आपला आणी स्वयंपाक घराचा छत्तीस चा आकडा. खायला जमते. करायला नाही.

अरे वाह सोप्पाय,पाण्याचा म्हणजे आपलं नीर डोसा :)

कंजूस's picture

25 Dec 2023 - 6:23 pm | कंजूस

पुढे दोन तीन महिन्यांत उडुपीला समारंभात जायचे आहे.

..त्या निमित्ताने काही विडिओ पाहताना हा विडिओ दिसला. करून पाहू म्हणून प्रयोग केला. आणि यशस्वी झाला. पूर्वी तांदुळाच्या पिठीची( धूऊन वाळवून केललेलं पीठ) आंबोळी घातली जायची पण ती तव्याला चिकटून राहतात. सहज उलटता येत नसत. आगरी पद्धतीच्या खापऱ्याही करून पाहिल्या होत्या पण तो एक खटाटोपच असतो. कोकणात पानग्या करतात. त्याही सोप्या नाहीत. फेण्या नावाचा प्रकार आहे तो तर फारच वेळखाऊ असतो.
या नीर डोशाचं थोडं ओलं पीठ फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी करून पाहिले. तरीही यशस्वी. आता हे नीर डोसे प्रवासात नेऊन पाहणार आहे. आता थंडीत काही प्रश्न नाही पण उन्हाळ्यात किती तास टिकणार हे बघणार.

सरिता बांदेकर's picture

25 Dec 2023 - 9:02 pm | सरिता बांदेकर

नक्की करा नीर डोसे प्रवासात न्यायला.पण ते नेताना केळीच्या पानांत बांधून न्या. केळीचं पान थोडं विस्तवावर शेकून घ्यायचं म्हणजे फाटत नाही. सगळे डोसे एका जागी ठेवू नका , म्हणजे वेगवेगळे पॅकेट बनवा. आणि चटणी जरी संपली तरी चहातून पण चांगले लागतात.
फक्त नीर डोसे करायला खूप वेळ लागतो ते लक्शात घेऊन बेत आखा.
आणि भीडाच्या तव्यावर पण छान होतात, करायच्या आधी अर्धा तास वाटीभर तेल तव्यावर टाकून ठेवायचं, मग ते वाटीत काढून घ्यायचं.
चांगले होतात नीर डोसे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Dec 2023 - 3:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त. भारी. थोडा रंग वगैरे आणता येईल असे वाटले.

-दिलीप बिरुटे

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Dec 2023 - 11:47 am | राजेंद्र मेहेंदळे

मस्त आणि सोपी पाककृती. करुन बघणार. चटणी मात्र चवदार हवी. एम टी आर च्या तयार मुळगा पुडी बरोबर खाता येईल. किवा ओल्या खोबर्याची चटणी

मुळगा पुडीवर तिळाचे तेल टाकून इडली बरोबर छान लागते. आमच्या शेजारच्या अय्यरकडून ही ताटली मिळायची. (( तमिळ लोक शेजारी असावेत. पदार्थ मिळतात. वरच्या मजल्यावर नसावेत. फक्त पीठ वाटण्याचा गुडगुडगुड आवाज ऐकायला मिळतो.))

विवेकपटाईत's picture

27 Dec 2023 - 11:53 am | विवेकपटाईत

मस्त. डोसे आवडले.

नीर डोसा मंगलोरी गस्सीबरोबर एकदम मस्त लागतो.

गस्सी? (लस्सी?) हा काय प्रकार आहे शोधतो.
आम्ही लहानपणी अशी घावने दुधात गूळ टाकून त्याबरोबर खायचो. अंगावर सांडून चिकट व्हायचे. कोकणात नारळाच्या दुधात खातात.

प्रचेतस's picture

27 Dec 2023 - 3:38 pm | प्रचेतस

गस्सी म्हणजे मिश्र भाज्यांपासून केलेले मंगलोरी पद्धतीचे कालवण.

कंजूस's picture

27 Dec 2023 - 7:57 pm | कंजूस

विडिओ शोधला गस्सी.

Bhat n Bhat >> https://youtu.be/5OF5vcCdx6c?si=7oEiridHjyDT3gwJ

मला वाटलं तमिळ लोकांचं 'आवियल' असेल.

कर्नलतपस्वी's picture

27 Dec 2023 - 6:39 pm | कर्नलतपस्वी

निर डोसे "जस्सी" बरोबर खायला पण एकदम मस्त. ( इथे हसणारी इमोजी आहे असे डोळ्यासमोर आणावे)

कंजूस's picture

27 Dec 2023 - 8:07 pm | कंजूस

ओ, ती चष्मावाली जस्सी?

हल्लीच्या जस्सी असले डोसे खात नसतील. फिज्जा, पास्ता, फ्रॅंकी खातात. टेबलावरच्या पेपर नॅपकिनवर मेसेज पाठवत नाहीत. आइपॅडवर पाठवतात.
वल्लीदा सांगतील .

प्रचेतस's picture

28 Dec 2023 - 5:47 am | प्रचेतस

=))

राजमा गस्सी :)
A
धन्यवाद प्रचेतस, कंकाका!
गस्सीच्या खुप रेसिपी पाहिल्या,पण गाजर कंकानी पाठवलेल्या रेसिपीतच होते, मस्त!

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Dec 2023 - 11:58 am | अमरेंद्र बाहुबली

मस्त दिसतेय रेसीपी, काका एक गाडी लावूयात का?? बक्कळ कमवू. :)

आमच्या इकडे एक धनलक्ष्मी स्नॅक्स आहे तो आप्पम देतो तीन चटण्यांसह. जोरदार चालते. [आप्पम = कढईत पीठ टाकून कढी गोल फिरवतात ते. मध्यभागी जाडसर असते कडेला पातळ. पण याला वेळ लागतो.]

असा अप्पम पुण्याला पण आहे,परवाच व्हिडिओ पाहिला.पत्ता विसरले.

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Dec 2023 - 5:04 pm | राजेंद्र मेहेंदळे

तो टाटा पॉवरच्या लाईन जवळचा ना?

Bhakti's picture

27 Dec 2023 - 5:52 pm | Bhakti

समर्थ केरला अप्पम,क्युमिंस कोलेज जवळ,श्रीधर कओलनई, कर्वे नगर.

होय.

शिवाय फडके रस्त्यावर.

इथं कलिंगात अप्रतिम नीर डोसे आणि गस्सी मिळते.

कंजूस's picture

27 Dec 2023 - 8:24 pm | कंजूस

कर वा!

तांदुळाच्या पण या नीर डोशाला मऊ पदार्थाला पर्याय म्हणजे rice paper taco. थोडक्यात सांगायचे तर पोह्याचा पापड थोडा विस्तवावर मऊ करून घ्यायचा, आतमध्ये हव्या त्या भाजा,चीज,अंडे घालायचे आणि दुमडून घडी करून दोन्ही बाजूने कुरकुरीत भाजायचा. आम्ही कांद्याच्या पातीची परतलेली भाजी घालून प्रकार केला. वरून कुरकुरीत आतून मऊ.