वाचकहो,
आज इस्रायल देश जिथे आहे त्याचं पारंपरिक नाव पालेस्तिन म्हणजे पॅलेस्टाईन आहे. तर तिथे इस्रायल कोणी व कसं वसवलं, हे या लेखात मांडायचा यत्न करतो आहे. या प्रक्रियेतच भावी संघर्षाची बीजं रोवली गेली आहेत.
हमासने तसेच इस्रायलने केलेल्या अत्याचारांचा निषेध करायलाच हवा. निरपराध लोकं तडफडून मरू लागली की काही शक्तींना आनंद होतो. यांत इस्रायली प्रस्थापितांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल.
दीर यासीन, अल दवायमा या ठिकाणच्या निरपराधी आणि संबंधित नसलेल्या पालेस्तिनी नागरिकांची कत्तल करतांना इस्रायलच्या खाटिकांना फार शौर्य गाजवल्यागत चेव चढला होता. तोच चेव आज हमासला चढला आहे. असं असलं तरीही एक वर्तुळ पूर्णबिर्ण झालेलं नाही. कारण की हमास हे इस्रायलचं पिल्लू आहे. निदान अशी चर्चा तरी चालू आहे. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीस ओस्लो कराराद्वारे द्विराज्य पद्धती अंमलात आणण्याच्या दिशेने पावलं पडू लागली होती. पालेस्तिनी नागरिकांच्या बाजूने यासर अराफतची पी. एल. ओ. ( पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन ) होती तर इस्रायलच्या बाजूने यित्झाक राबिन होते. शांती प्रस्थापित होतेय अशी शंका आल्याने इस्रायलमधल्या झगडेबाज गोटाने हेबरॉन मशिदीत आत्मघातकी स्फोट घडवला. अतिरेक्याचं नाव बारुख गोल्डस्टाईन. पालेस्तिनात आत्मघातकी हल्ले सुरू करायचं श्रेय इस्रायलचं आहे. डाव हातातनं निसटतोय म्हणून इस्रायलमधल्या झगडेबाज गोटाने ( आरियल शेरॉन कंपू ) १९९६ साली चक्क यित्झाक राबिन यांची हत्या घडवली. अशा रीतीने ओस्लो करार थंड्या बस्त्यात गुंडाळला गेला. झगडेबाज गोटाप्रमाणे हमासही शांतता प्रक्रियेत खीळ घालायचं काम निगुतीने करते आहे.
अराफतच्या पालेस्तिनी मुक्ती संघटनेस खच्ची करण्यासाठी हमासला इस्रायलनेच सुविधासामुग्री ( रीसोर्सेस ) पुरवली. अराफत यांच्या म्हणण्याप्रमाणे हे तथ्य यित्झाक राबिन यांनी अराफतसमोर इजिप्तचे तत्कालीन प्रमुख होस्नी मुबारकांच्या उपस्थितीत ( साल १९९४ ? ) कबूल केलं आहे. इस्रायली प्रमुख यित्झाक शमीर यांनी हमासला शाळा, विद्यापीठे, मशिदी, वगैरे ७०० संस्था उभारून व त्या चालवायला पैसे दिले. अराफतच्या पालेस्तिनी मुक्ती संघटनेस मात्र असं काही साहाय्य केल्याचं ऐकिवात नाही. यथावकाश अराफत वृद्ध झाल्याने बाजूस पडले आणि हमासने पालेस्तिनी लोकांचं पुढारीपण बळकावलं.
यावर वाचक एक प्रश्न विचारतील की, इस्रायल स्वत:च्याच नागरिकांचा बळी कसा काय जाऊ देईल ? तर उत्तर असंय की स्वकीयांचा घात करायची ही इस्रायली प्रस्थापितांची पहिलीच वेळ नाहीये. प्रथम, हे इस्रायली प्रस्थापित नेमके कोण ते पाहूया. सध्या ज्याला इस्रायल देश म्हणतात त्याचं पूर्वापार नाव पॅलेस्टाईन ( पालेस्तिन ) आहे. पुलस्तिन ऋषींवरून हे नाव पडलं आहे. रावण हा याच कुळातला होता. महर्षी वाल्मिकींची रामायणाची मूळ कथा पौलस्त्यवध या संहितेवर बेतलेली आहे. तर पालेस्तिनमध्ये इस्रायल कुठून आलं, असा प्रश्न विचारायला हवा.
पालेस्तिनात इस्रायल ही टूम अगदी अलीकडची आहे. हिला बायबलचा आधार नाही. इथे बायबल म्हणजे यहुदी बायबल म्हणजेच जुना करार असा अर्थ अभिप्रेत आहे. ख्रिस्ती बायबल हे जुना करार व नवा करार मिळून सिद्ध होतं. यहुदी बायबल हे केवळ जुना करार आहे. बायबलमध्ये इस्रायल जमिनीशी संबंधित नाही. ते संततीजन्य वांशिक राष्ट्र आहे. ते हिंदी महासागरातल्या मादागास्कर बेटावर वा ऑस्ट्रेलियानजीकच्या टास्मेनिया द्वीपावरही अस्तित्वात असू शकतं.पालेस्तिनात यहुद्यांची बरीच पवित्र स्थानं असली तरी इस्रायल तिथेच असण्याची बायबलची आज्ञा नाही. फार काय, १९४८ पूर्वीच्या गेल्या दोनतीनशे वर्षांत अधिकतम यहुदी लोकसंख्या केवळ ७% च होती. बाकी ९३+% इतर वांशिक लोकं होते ( संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Palestinian_Jews#Historical_overview ). मग यहुद्यांना त्या भूमीवर राज्य स्थापायचा खास स्वामित्वाधिकार का ? आणि स्थानिकांवर अत्याचार करायचाही अधिकार कोणी दिला ? बायबलच्या नावाखाली काहीही खपवायचं का ?
काही संज्ञा :
०१. ज्यू = यहुदी ( jews ) : हे अब्राहामिक धर्माचे उपासक आहेत. तोराह व बायबल यांचे प्रमुख ग्रंथ. धर्मगुरूस राबी ( वा राबाय वा राबाई ) म्हणतात. शेमचे वंशज म्हणून यांना शेमित्य ( = semetic ) असेही म्हणतात. ख्रिश्चन व मुस्लीम हे ही तांत्रिक दृष्ट्या शेमित्य आहेत. मात्र ही संज्ञा प्रामुख्याने यहुद्यांसाठी वापरतात. शेमसोबत याफेथ व चम यांचे वंशजही शेमित्य धरले जातात. आई यहुदी असेल तर मूल आपोआप यहुदी धरतात.
०२. सेफार्दी ( sephardim ) : हा यहुद्यांचा उपगट आहे. प्रामुख्याने पश्चिम युरोप व काही प्रमाणावर भारतातले यहुदी हे सेफार्दी धरले जातात. सेफार्द हे आंदालुशिय म्हणजेच स्पेनच्या द्वीपकल्पाशी संबंधित प्रांतवाचक विशेषण आहे.
०३. आश्केनाझी ( ashkenazim ) : हे मध्य युरोपीय व/वा पूर्व युरोपीय व/वा तुर्की पार्श्वभूमीचे यहुदी आहेत. यांचा पालेस्तिनशी थेट संबंध नाही. यांचे बापजादे धर्मांतरित असून त्यांनी कधीही मध्यपूर्वेत पाय ठेवला नव्हता. हे पूर्वी फ्रान्स, जर्मनी, वगैरे येथे होते. रोमन साम्राज्य कोसळल्यावर हे सरकंत पूर्व युरोपात स्थिरावले.
०४. झायनवादी ( झायोनिस्ट = zionist ) : यांना पालेस्तिनात यहुद्यांचा देश निर्माण करायचा होता. देशाचं नाव इस्रायल वा झायन. म्हणून यांना झायोनिस्ट म्हणतात. हे बहुतांश यहुदी आहेत. सोबत काही प्रभावशाली यहुद्येतरही आहेत.
०५. शेमित्यभीरू ( anti-semetic ) : ज्यूंच्या विरोधात असलेला कुठलाही अविष्कार शेमित्यभीरू धरला जातो. हा एखाद्या सौम्य पूर्वग्रहापासनं हिंसक वंशविच्छेदापर्यंत काहीही असू शकतो. किंबहुना याची नीटशी व्याख्या अस्तित्वात नाही. भारतात सेक्युल्यारिझमच्या नावाखाली काहीही चेष्टा खपवल्या जातात. त्याच धर्तीवर अनेक यहुदी गुन्हेगार शेमित्यविरोधाची ढाल पुढे करून तिच्यामागे लपतात.
०६. संमीलित यहुदी ( assimilated jews ) : एखाद्या देशाशी निष्ठा ठेवून असलेले यहुदी यांत मोडतात. हे ज्या देशाचे नागरिक आहेत, त्याच्याशी इमान राखून असतात. यांना इस्रायल फारसा आकर्षक वाटंत नसतो. मात्र हे लोकं साधारणपणे इस्रायल देशाविषयी आपुलकी बाळगून असतात. १९४८ ला इस्रायल निर्माण झालं. त्यापूर्वी भारतातले बेणे इस्रायली हे संमीलित यहुदी होते व आजही तसेच आहेत. जर्मनी हा संमीलित यहुद्यांच्या आवडीचा एक देश होता व आजही आहे.
०७. मसीहा ( = messiah = moshiasch ) : यहुदी उच्चार मोशियाख वा मोशियाश. याला ख्रिस्ती व मुस्लीमांत मसीहा म्हणतात. हा एक प्रकारचा शेमित्य पंथीयांचा अवतार आहे. बायबलनुसार अंतिम समयी तो अवतरणार असून त्याच्या कळपातल्या सदस्यांचं रक्षण करणार आहे. या अंतिम समयास मुस्लीम कयामत म्हणतात. ख्रिस्ती लोकं त्यास न्यायदिन ( = judgement day ) तर यहुदी लोकं त्यास प्रायश्चित्त दिन ( = atonement day ) म्हणतात.
०८. घेटो ( = ghetto ) : ज्यू साधारणत: एकत्र राहतात. अशा वस्तीस युरोपात घेटो म्हणतात.
०९. होलीकाष्ठ ( = holocaust ) : नाझींनी केलेलं यहुद्यांचं शिरकाण.
असो.
आता इस्रायलचा राजकीय राष्ट्रवाद कसकसा विकसित झाला याचा धावता व अतिसंक्षिप्त आढावा घेऊया.
०१. यहुद्यांसाठी स्वतंत्र देश असावा अशी मागणी बऱ्याच काळ चालू होती. तिला थियोडोर हर्झल या विचारवंताने १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात वैचारिक दृष्ट्या मूर्त स्वरूप दिलं. हे ऑस्ट्रियातले ज्यू होते. त्यांच्या मते पालेस्तिनातच इस्रायल निर्माण झालं पाहिजे. यांनी झायोनिस्ट चळवळ सुरू केली व ती जगभर यहुद्यांमध्ये लगेच लोकप्रिय झाली. याने लंडन, व्हिएन्ना वगैरे खूप ठिकाणांहून स्थानिक यहुद्यांचा पाठींबा मिळवला. हर्झल १९०३ च्या आसपास परलोकवासी झाले.
०२. हे कार्य इस्रायल झांगविल या लेखक विचारवंताने पुढे नेलं. हे जन्माने इंग्लिश असून वंशाने पोलिश-लाटव्हियन ज्यू होते. त्यांनी जगभरातील राष्ट्रांविषयी मर्मग्राही निरीक्षणे नोंदवली आहेत. गोळवलकरांच्या 'राष्ट्र' या पुस्तकात झांगविल यांची अनेक वचने उद्धृत केलेली आहेत. झांगविल यांना सुरुवातीस पालेस्तिनात इस्रायल वसवणे मान्य नव्हते. पण १८९५ साली थियोडोर हर्झल यांचं लंडनमधील भाषण ऐकून ते झायोनिस्ट बनले. परंतु त्यांनी यहुदी देशासाठी इतर पर्यायांवर ( उदा. : केनिया ) वैचारिक उहापोह चालू ठेवला. यहुद्यांना स्वत:चं राष्ट्र हवंच या मताचे ते होते, पण ते नेमकं कुठे असावं यावर त्यांची मतं निश्चित झाली नाहीत. हे विचारवंत १९२६ साली मृत्यू पावले. तत्पूर्वी त्यांनी एक वैचारिक चौकट आखून ठेवली होती.
०३. या दोन विचारवंतांनी जे कार्य केलं त्याला समांतर अशी एक गुप्त राजकीय चळवळ उभी राहिली. हिला पताधिपती यहुद्यांचा ( = फायनान्शियर ज्यूंचा ) भक्कम पाठींबा होता. यापैकी प्रमुख घराणं होतं रॉथशील्ड्स. यांचं लंडन मध्ये चांगलंच वजन होतं. पॅरीस, बर्लिन, व्हिएन्ना, जिनेव्हा वगैरे इतर ठिकाणीही त्यांचा जोरदार प्रभाव होता. यांनी पालेस्तिनात इस्रायल वसवायला भरपूर मदत केली. याकरिता युरोपात दोन महायुद्धे पेटवण्यात आली . त्यापैकी दुसरं महायुद्ध तर जगभर पसरलं. दोन्ही महायुद्धाचं अंतिम फलित पालेस्तिनात इस्रायल वसवणे हे आहे.
०४. पहिल्या महायुद्धात जर्मनीस सर्वत्र विजय मिळंत होता. अमेरिकेने तटस्थ भूमिका घेतली होती. अशा वेळेस इंग्लंडमध्ये एक कट शिजला. ब्रिटनच्या लुसिटानिया नामे बोटीवर स्फोटके आहेत अशी खोटी बातमी जर्मन नौदलाकडे मुद्दाम फोडण्यात आली. ही नौका अमेरिकेकडे चालली होती. अर्थात, जर्मन पाणबुड्यांनी ती बुडवली ( मे १९१५ ). या दुर्घटनेत अनेक अमेरिकी नागरिक बुडून मेले. या घटनेचं भांडवल करून अमेरिकेस जर्मनीच्या विरोधात पाठींबा निर्माण केला. पुढे दोनेक वर्षांनी अमेरिका ब्रिटनच्या बाजूने युद्धात उतरली ( एप्रिल १९१७ ). अमेरिकी सामुग्रीच्या बळावर जर्मनीचा पाडाव करण्यात आला.
०५. अमेरिका आपल्या बाजूने उतरणार हा अंदाज ब्रिटनला आला होताच. म्हणजे आपण युद्ध जिंकणार याची ब्रिटीश प्रस्थापितांची खात्री पटली. तेव्हा त्यांनी नोव्हेंबर १९१७ मध्ये लॉर्ड बाल्फरच्या मार्फत एक घोषणा केली ( Balfour Declaration ). ही घोषणा जरा गोलमटोल भाषेत केलेली होती. हिचा अर्थ असा की, पालेस्तिनात यहुदी देश निर्माण करण्यासाठी ब्रिटन अनुकूल आहे. मात्र पालेस्तिनाच्या सीमा कोणत्या ते स्पष्ट केलं नव्हतं. तसंच तत्कालीन यहुद्येतर स्थानिकांवर अन्याय होणार नाही, याचीही ग्वाही दिली होती. अशा रीतीने पालेस्तिनात इस्रायल निर्माण करायचं जाहीर डिंडिम वाजलं.
०६. यथावकाश जर्मनी ( पहिलं ) महायुद्ध हरली. १९१९ साली व्हर्सायच्या तहाच्या वेळेस पराभूत जर्मनीस लुटायला सगळे बसले होते. फ्रान्स, इंग्लंड, वगैरे एकेकांनी एकेक मागण्या केल्या. अमेरिकेची ( म्हणजे ज्यूंची ) वेळ आली तेव्हा त्यांनी पालेस्तिन मागितलं. जर्मन आश्चर्यचकित झाले. साल्या इतक्या छटाकभर मागणीसाठी तुम्ही आमच्या विरोधात युद्धांत उतरलात, अशी पृच्छा केली. पालेस्तिन तर आम्ही जर्मन तुम्हां अमेरिकनांस ( म्हणजे ज्यूंना ) अगदी अत्यानंदाने आमच्या परिश्रमांनी मिळवून देऊ.
०७. मात्र तरीही ब्रिटन, फ्रान्स, वगैरे भिडूंचे कारण पुढे करून जर्मनीवर प्रचंड निर्बंध लादण्यात आले. जर्मनीत 'वायमर प्रजासत्ताक' १९१८ साली सुरू झालं होतं. त्यात हे निर्बंध लागू केले गेले. परिणामी सर्वत्र अनागोंदी माजली. वायमर प्रजासत्ताक पुढे १९३२ पर्यंत कसंबसं चाललं. या अनागोंदीने जर्मन जनतेस पार वीट आणला.
०८. यातून मग हिटलरला पुढे आणण्यात आलं. त्यात झायोनिस्ट पताधिपती ( = फायनान्शियर्स ) आघाडीवर होते. जानेवारी १९३३ ला हिटलर सत्तेत आला. झायोनिस्ट पताधिपतींचा हिटलर लाडका असला तरी त्यांनी जर्मनीस मात्र शत्रूच मानलं. हिटलर सत्तेत आल्याबरोबर लगेच अमेरिकी यहुद्यांनी जर्मन उत्पादनांवर बहिष्कार टाकून व्यापारयुद्ध जाहीर केलं. मार्च १९३३ मध्ये एके दिवशी ब्रिटीश वृत्तपत्राचा मथळा होता : "Judea Declares War on Germany". ( संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/1933_anti-Nazi_boycott#Boycott )
०९. नाझी पक्षाची देखभाल ज्यूंनी गुप्तपणे केली. पुढे १९३४ नंतर युरोपात जर्मन वांशिक लोकांच्या विरुद्ध दंगली पेटवण्यात आल्या. त्यापैकी सुडेटन दंगली, ब्रॉमबर्ग शिरकाण, डेन्झिग कत्तली ही काही ठळक उदाहरणे. जनतेच्या मागणीमुळे हिटलरला या प्रांतांत हस्तक्षेप करावे लागले. अशा अतिरिक्त हस्तक्षेपांमुळे पोलंड व नाझी जर्मनी यांत वितुष्ट आलं. जितकी प्रसिद्धी यहुदीविरोधी क्रिस्तालनाख्त दंगलींची झालीये, तितकी जर्मन लोकांविरुद्धच्या दंगलींची झालेली नाही.
१०. दुसऱ्या महायुद्धाच्या आधी हिटलरला सत्तेत येण्यास झायोनिस्टांनी मदत केली. जडव्यागळ नाझी यंत्रणा चालवायला पैसा लागतो. तो सुरुवातीस झायोनिस्ट पेढीवाल्या ( = बँकर ) लोकांनी पुरवला. नंतर हिटलरने जर्मनीचा पैसा छापायला स्वत:च सुरुवात केली. युरोपातले जे यहुदी पालेस्तिनात जायला तयार नव्हते त्यांना ( गचांडी पकडून वा गोडीगुलाबीने ) हाकलण्याची योजना म्हणजे हावरा ( haavara ) योजना कार्यान्वित केली ती या झायोनिस्टांच्या सहकार्याने.
११. दुसऱ्या महायुद्धानंतर नाझी नाहीसे झाले नसून इस्रायलमध्ये पुनरपि अवतीर्ण झाले आहेत. हे बारी चामिश या यहुदी लेखकाचं मत आहे. त्याच्या मते आजचे इस्रायली कालचे नाझी होते. यासंबंधाने एक इंग्रजी लेख सापडला : https://www.conspiracyarchive.com/Commentary/Nazi_Kapos.htm सदर लेखात गुश-कातीफ नामे गाझापट्टीतली यहुदी वस्ती इस्रायल सरकारनेच फ्यासिस्ट रीतीने कशी हटवली, ते लिहिलं आहे.
१२. झायोनिस्ट आणि नाझी यांच्या हातमिळवणीवर बरीच माहिती उपलब्ध आहे. मला माहित असलेलं उदाहरण हे जोसेफ यित्झाक श्नीयरसन या राबीचं आहे. हा वॉर्साच्या घेटोमधला राबी होता. याला वाचवायला नाझी गुप्तहेरप्रमुख अॅडमिरल कॅनरीस याने हिटलरच्या सहीशिक्क्याची प्रमाणपत्रे तयार केली. जोसेफ यित्झाक श्नीयरसन व सोबत त्याचे काही पित्ते हा चमू १९४० च्या जानेवारीत वॉर्सावरनं बर्लिनला रेल्वेच्या प्रथम वर्गाने आला. बर्लिनात चमूस ही प्रमाणपत्रे देण्यात आली. या रक्षापत्रांवर दस्तुरखुद्द हिटलरची स्वाक्षरी होती. त्यानुसार पत्रधारक, त्याचं कुटुंब व त्याची मालमत्ता थर्डराईश तर्फे संरक्षित म्हणून गणली जाणार होती. श्नीयरसन धरून सुमारे सोळासतरा लोकांना ही पत्रे वाटण्यात आली. नंतर तो बर्लिनहून समुद्रमार्गे लाटव्हियाची राजधानी रिगा येथे गेला. तिथनं त्यानं स्वीडनची राजधानी स्टॉकहोम गाठली, आणि पुढे आगबोटीने अमेरिकेस न्यूयॉर्क येथे रवाना झाला. ही कथा सविस्तरपणे Rescued from the Reich या पुस्तकात लेखक ब्रायन मार्क रिग याने लिहिली आहे. ( मी पुस्तक वाचलेलं नाहीये. )
१३. हीच कथा नाझी लेफ्टनंट हॉर्स्ट हॉयर याने १९५२ साली एका अहवालात लिहिली होती. 'होळीकाष्ठात नाझी ज्यूंनी निभावलेली भूमिका' यावर हा अहवाल होता. नाझींचा 'अंतिम तोडगा' म्हणजेच Final Solution अंमलात आणण्यासाठी अनेक यहुद्यांची मदत घेतली गेली. त्यांचं काम सर्वसाधारण यहुद्यांना नाझींच्या तोंडी देणे हे होतं. हा अहवाल दडपण्यासाठी त्याला ३०००० ( अक्षरी तीसहजार ) डॉईशमार्क्स लाच देण्यात आली, पण त्याने ती नाकारली. म्हणून त्याचा पुढे वर्षभरातच खून केला गेला. हॉयरने घेतलेली काही स्वद्रोही ज्यू आडनावं : सोनेनशेईन, झुकरहॉर्न, स्पित्झ, लोवेनस्टेईन, ग्रेगर, फेकलर, इत्यादि.
१४. या धर्तीवर अनेक कथा उपलब्ध आहेत. सांगण्याचा मुद्दा काय की निरपराध ज्यूंच्या रक्तावर झायोनिस्टांनी पालेस्तिनात इस्रायल देश उभारला. निरपराध यहुद्यांच्या कत्तलीचा फायदा मात्र झायोनिस्ट नित्यनेमाने उपटंत आले आहेत. ज्यांनी खून केले त्याच शक्ती आज मृतांच्या टाळूवरील लोणी ओरबाडून खात आहेत. कुठेतरी याला आवर घालायला हवा ना ? तो कोणी घालायचा ?
१५. १९४५ साली जर्मनी वगळून इतर युरोपातलं युद्ध संपल्यावरही ज्यूंचा पालेस्तिनात ओघ चालूच राहिला. यातून पुढे १९४८ साली ब्रिटनने पाय काढता घ्यायचा ठरवलं. या संधीचा फायदा उठवून झायोनिस्टांनी इस्रायली स्वातंत्र्याची घोषणा केली. यापूर्वी १९३६ ते ३९ साली पालेस्तिनी अरबांनी आपल्या हक्कांसाठी उठाव व निदर्शनं केली होती. पण ब्रिटनने धूप घातली नाही. याउलट झायोनिस्टांना मात्र मोकळं रान दिलं. संयुक्त राष्ट्रसंघाचा ज्यू व अरब ही दोन दोन राष्ट्रे निर्माण करायचा बेत गुंडाळला गेला. १९४७ ते १९४९ ज्यू विरुद्ध इतर असं युद्ध चाललं. यातनं ब्रिटीश पालेस्तिनमधून तीन गोष्टी उद्भवल्या. पहिली इस्रायल हा देश उत्पन्न झाला. दुसरी जॉर्डनने पश्चिमपाख ( West Bank ) ताब्यात घेतली. आणि तिसरी गाझापट्टी इजिप्तने ताब्यात घेतली.
१६. यापुढील इतिहास मी लिहित नाही. इथे थांबतो. झायोनिस्ट शक्तींनी पालेस्तिनात इस्रायल कसं वसवलं याच्या पार्श्वभूमीची ओळख करून द्यायचा हेतू होता.
असो.
एकंदरीत, राजकीय हेतू साध्य करण्यासाठी स्वकीय यहुद्यांचा बळी देणं झायोनिस्टांना नवीन नाही. हाच प्रकार आज इ.स. २०२३ सालीही चालू आहे. गाझापट्टीत मुंगी जरी शिरली तरी इस्रायली शासनास ताबडतोब कळतं. तरीही हमासवाले यहुद्यांवर ५००० अग्निबाण डागतात, याचा अर्थ काय ? याचा अर्थ असा की हमासचं आक्रमण इस्रायल सरकारने मुद्दाम ओढवून घेतलेलं आहे. त्याकरता दोनपाचहजार ज्यू मेले तरी चालतील. असाच प्रकार या अगोदरही घडला आहे. पर्ल हार्बरवर होणाऱ्या हल्ल्यांच्या आगाऊ चेतावण्यांकडे अमेरिकी सरकारने मुद्दाम दुर्लक्ष केलं होतं. जेणेकरून हा हल्ला व्हावा आणि जपानविरुद्ध युद्ध भडकवता यावं. वर लुसिटानिया जहाज बुडवल्याचं उदाहरण दिलंय, ते ही तसंच आहे.
ज्या पद्धतीने इस्रायल वसवलं गेलंय त्यामुळेच आज पालेस्तिन विरुद्ध संघर्ष उद्भवला आहे. जर बेणे इस्रायली नामे भारतातले यहुदी हिंदूंसोबत आनंदाने नांदू शकतात तर पालेस्तिनात काय अडचण आहे ? सर्वच्या सर्व पालेस्तिनी नागरिक अतिरेकी नक्कीच नाहीत. शिवाय या संघर्षात इस्लामचा प्रवेश बऱ्याच उशीरा म्हणजे १९८० नंतर झाला. हा प्रवेश इस्लामिक ब्रदरहूड या संघटनेमार्फत झाला. या संघटनेने जगभरात इस्लामच्या वा मुस्लिमांच्या उन्नतीसाठी काहीही केलेलं नाही. ही पालेस्तिनी संघर्षाची प्रतिनिधी नाही. ज्याप्रमाणे झायोनिस्ट सर्व यहुद्यांचे प्रतिनिधी नाहीत त्याप्रमाणे इस्लामिक ब्रदरहूड मुस्लिमांची प्रतिनिधी नाही. मग लढणारे कोण आणि यातना भोगणारे कोण ? कुणाचा पायपोस कुणाच्या पायांत ? ओळखा पाहू !
तर भारताने शिकण्यासारखं काय आहे यातनं ? वर उल्लेखलेले आकृतिबंध भारतातही आढळून येतात. भारतात मुस्लिमांना शिक्षण नाही म्हणून ओरड होते. भले ठीक. पण मग हे शिक्षणास वंचित असलेले मुस्लीम जन एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर हलाल अर्थव्यवस्था कशी काय निर्माण करू शकतील ? की इतर कोणत्या तरी बाह्य शक्तीचा पाठींबा आहे ? ही शक्ती आंतरराष्ट्रीय पताधिपती ( = इंटरनॅशनल फायनान्शियर्स ) असू शकतात का? नाझींना आख्खा जर्मनी व आक्रमण केलेले मोठमोठे प्रांत चालवायची अक्कल होती का ? कोणी म्हणेल की, जर्मन लोकं जात्याच कामसू व हुशार असतात. तर मग नाझी सत्तेत येण्यापूर्वीही तेच जर्मन लोकं होते ना ? त्याच जर्मन लोकांना वायमर प्रजासत्ताक सांभाळायची अक्कल नव्हती का ? त्या अनागोंदीची संगती कशी लावायची ?
बघा. विचार करा. आणि विचार करायला जमंत नसेल ( वा असेल ) तरी एक काम अवश्य करा. जरा शिवाजीराजांना आठवा. महाराज करतील ते योग्य, आणि न करतील ते अयोग्य अशी सरळधोपट मांडणी आपण करू शकतो. यहुदी अशी मांडणी करू शकंत नाहीत. शिवाजी लाभणे ही एक प्रकारे ईश्वरी कृपाच आहे. त्याकरिता ईश्वराचे आभार नक्की माना.
असो.
हा लेख विस्कळीत आहे हे मान्य. सगळ्या गोष्टी एकाच वेळेस लिहिता येत नसतात. न लिहिलेल्या काही विषयांची यादी :
०१. आंतरराष्ट्रीय पताधिपती यहुद्यांनी ब्रिटीश राजघराणं व इंग्लिश सरदार घराणी कशी काबीज केली.
०२. आश्केनाझी यहुद्यांनी पूर्व युरोपात घातलेला धुमाकूळ व त्याचा आजच्या रशिया विरुद्ध युक्रेन युद्धाशी असलेला संबंध.
०३. साम्यवाद : यहुदी महाजनांचे एक कारस्थान ( सर्वसामान्य ज्यूंचे नव्हे )
०४. फ्रीमेसन व यहुदी यांच्यातले संबंध.
०५. गुलामांच्या व्यापारातलं यहुद्यांचं वर्चस्व.
०६. हिटलरच्या जन्माच्या दहाबारा वर्षं आधी १८७७ साली भरवलेली जर्मनीतली यहुदीविरोधी परिषद.
०७. ईस्ट इंडिया कंपनी : आंतरराष्ट्रीय पताधिपतींची बगलबच्ची.
०८. १८५७ च्या उठावानंतर भारतावर इंग्रजांचं राज्य होतं की यहुदी पताधिपतींचं ?
०९. आंतरराष्ट्रीय पताधिपती व मध्यपूर्वेतील तेलाचं राजकारण.
१०. व्हॅटिकनचं राजकारण व अध:पतन.
११. यहुद्यांच्या अंतर्गत संघर्षापायी ओढवलेलं होलीकाष्ठ.
१२. ही लांबलचक यादी अर्थात अपूर्ण आहे ! बरेच प्रश्न आहेत.
असो.
योग्य प्रश्न विचारणे, हे अत्यंत आवश्यक कौशल्य आपण भारतीयांनी आपल्या अंगी बाळगावयास हवं.
बस, सध्यातरी इतकंच.
- नाठाळ नठ्या
प्रतिक्रिया
15 Oct 2023 - 10:59 pm | अमरेंद्र बाहुबली
लेख आवडला. फार अभ्यासपुर्ण आहे. पण इतिहासात जाऊन फायदा नाही. पॅलेस्टीनींची इतकीच काळजी आहे तर आजूबाजूचे अरब देश त्यांना आपल्या देशात आणून वसवत का नाहीत?? मूळात कुठल्याही मुस्लिमदेशात इतरधर्मीय काफीरच म्हणवले जातात. पॅलेस्टीनात ज्यू काफीर म्हणूनच गणले गेले असते नी त्यांचे हत्याकांडंच घडले असते. इस्राईलजे करतंय ते योग्यच करतंय. बाकी हे पटलं की हा हल्ला इस्राईलने होऊ दिला असावा. ह्या हल्ल्याचं भाडवलं करून (एकदाची) गाझापट्टी साफ करता आली तर बरंच आहे.
दुसरा मुद्दा सर्व पॅलेस्टीनी अतिरेकी नसतीलच पण हमास त्यांनीच निवडून दिलीय ना?? ते पॅलेस्टीनी अतिरेकी हमास विरूध्द गाझात बंडं का करून ऊठत नाहीत?? मुळात इस्राईल हे राष्ट्रच मान्य करायाला अरबांना जड जातंय. जेरूशलेम नाहीतरी ज्यूंचीच भूमी आहे.
16 Oct 2023 - 3:26 pm | साहना
> पॅलेस्टीनींची इतकीच काळजी आहे तर आजूबाजूचे अरब देश त्यांना आपल्या देशात आणून वसवत का नाहीत??
१० वर्षे जुन्या डेटा प्रमाणे साधारण ५.१ दशलक्ष पॅलेस्टिनी लोक अरब राष्ट्रांत राहत आहेत. त्यामुळे अरब राष्ट्रांनी त्यांना आश्रय दिला नाही असे म्हणणे चुकीचे आहे. जे लोक बाहेर जाण्याच्या लायकीचे होते ते कधीच गेले आहेत.
16 Oct 2023 - 4:44 pm | अमरेंद्र बाहुबली
ऊरलेले २० लाख गाझापट्टीवाल् का नाही घेत?
24 Sep 2024 - 8:45 am | चौकस२१२
सहमत
सीरियातील तथाकथित निर्वस्यांना जर्मनीलाच का जायचे असते? सौदी का नाही घेत "सामावून"
हा हि असाच एक प्रश्न
अफगाणिस्तानातून कन्तलेलेल लोक भाबंदकीतीतील अरब देशात की नाही जाऊन वस्ती करू शकत? त्यांना मलेशियाचे सारखया बऱ्यापकी सादहन आणि इस्लामिक देशात पण राहायचे नसते त्यांना पाश्चिमात्य देशातच गझवा ए कार्याला का जायचे असते
16 Oct 2023 - 3:29 pm | साहना
शांतताप्रिय विचारसरणी हि विचारसरणी नसून कर्करोग आहे. ह्यांना बोट द्या हि मंडळी हात आणि डोके दोन्ही छाटून टाकतील. ज्यू, हिंदू, पारसी, ख्रिस्ती मंडळी बरोबर व्यवस्थित राहू शकतात पण हि अपेक्षा शांततापूर्ण समाजाकडून करणे मूर्खपणा आहे.
16 Oct 2023 - 4:34 pm | कंजूस
लेख वाचला.
एकूण खूपच गुंतागुंत आहे. प्रश्न काय विचारायचा हेच कळत नाही.
16 Oct 2023 - 4:55 pm | कॉमी
काहीही कंस्पिरसी थेर्या आहेत. बरीच खळबळजनक आणि पुरावे मागावित अशी विधाने लेखात आहेत. पण कंस्पिरसी थियरी असे नाव स्वताला देणाऱ्या साईटचे आधार धागाकर्ता देणार असेल तर कशाला स्वतःचे डोके आपटून घ्या.
16 Oct 2023 - 4:57 pm | कॉमी
गामांचे स्वागत. :)
16 Oct 2023 - 5:28 pm | चक्कर_बंडा
यहुद्यांच्या ( आजचे ज्यू) आजच्या इस्राईल आणि पॅलेस्टाईनच्या भूमीशी असलेल्या नात्याला इसवी सन पुर्व २००० वर्षांचा इतिहास आहे. त्यांचा यहुदी धर्म याच भूमीवर निर्माण होऊन मूर्तीपूजा - अनेकेश्वरवादाकडून, निराकार एकेश्वरवादाकडे उत्क्रांत होत गेला व हा धर्मच ख्रिश्चन आणि इस्लाम या दोन्ही धर्मांची जननी आहे.
त्यांची टोळ्यांच्या स्वरूपातील व्यवस्था जाऊन एकजिनसी समाजरचना याच भूमीवर आकाराला आली. तत्कालीन इजिप्त, सिरिया यांच्याशी सततचा संघर्ष, गुलामगिरी आणि समझोते याद्वारे एकेकाळी याचं भागात आधी यहुद्यांच एकचं एकसंघ असं व नंतर ज्यूडा आणि इस्राईल ही दोन राज्ये शेकडो वर्षे नांदली.
आजच्या इस्राईल देशाला ही जागा देण्यामागे ही पार्श्वभूमी आहे त्यामुळे इस्राईल ही अलीकडील टूम आहे, त्याला बायबलमध्ये आधार नाही, ते संततीजन्य वांशिक राष्ट्र आहे वगैरे वगैरे लिहिणं अगदीच भंपकपणा आहे.
रोमन लोकांचं मध्यपूर्वेतील आगमन आणि त्यानंतर ख्रिश्चन धर्माचा उदय या दोन घटनांचे मूलगामी परिणाम यहुद्यांवर झाले व त्यांच्या कायमस्वरूपी विस्थापनाला सुरवात झाली.
येशूला नाकारणारी जमात म्हणून होणारी हिंसा व नंतरच्या काळात रोमन लोकांनी ख्रिश्चन धर्माला राजाश्रय दिल्यानंतर यहुदी धर्माचरणावर घातलेली बंदी यामुळे विस्थापनाला चालना मिळाली, इजिप्तमध्ये आधी गुलाम म्हणून दिवस काढले असल्याने तिथे यहुदी मोठ्या संख्येने गेले याशिवाय युरोपातील रशिया, जर्मनी, पोलंड या भागात ही ते गेले, शिवाय यातील रोमनांशी जुळवून घेतलेली काही यहुदी गट रोमन साम्राज्य जिथे जिथे पसरले होते तिथे-तिथे गेले.
धार्मिक आचरणातील वेगळेपण, उपरेपणाच्या भावनेतून आलेली अंगभूत सामाजिक अलिप्तता आणि येशूला सुळावर लटकवण्यासाठी कारणीभूत जमात असा शिक्का तसेच सावकारी या मुख्य व्यवसायातून अंगी बाणले गेलेले विकार या कारणांमुळे यहुदी वेळोवेळो हिंसेचे शिकार होत राहिले.
मध्यपूर्वेतील इस्लामचा उदय, त्यानंतर इस्लाम-ख्रिश्चन संघर्ष, त्यांची धर्मयुद्धे (कृसेड्स) व मग थेट ऑटोमन तुर्कांचा उदय यासर्व घटनाक्रमात यहूद्यांच्या मायभूमीकडे परतण्याच्या सर्व प्रयत्नांची धूळधाण उडत राहिली. सर्व कालखंडात यहुदी मुख्यत्वे व्यापार आणि सावकारी या व्यवसायात कार्यरत राहिले. जिकडे त्यांच्याविरुद्ध हिंसा होईल तिकडून पळ काढत ते जवळपास जगभर पसरले. व्यापार- सावकारी माध्यमातून त्यांनी राजकीय परिघात स्वतःच वेगळं महत्त्व शाबूत ठेवण्यात यश मिळवलं. तसेच, विस्थापनाच्या शेकडो वर्षानंतर आणि कित्येक पिढ्या जन्माने वेगवेगळ्या देशात-संस्कृतीत वाढून ही यहुदी म्हणून स्वतःची ओळख त्यांनी टिकवून ठेवली.
आधुनिक कालखंडात स्पेन, पोलंड, ऑस्ट्रिया, फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेत राहून आधुनिक बँकिंग व्यवस्थेत पाय रोवून त्याद्वारे व्यापारावर वरचष्मा राखीत पोलिटिकल बार्गेनिंग पावर मिळवण्यात यहुदी यशस्वी झाले.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला राजकीय अनुकूलता दिसताच त्यांनी पुन्हा मायभूमीकडे परतण्याचे निकराचे प्रयत्न सुरू केले. ब्रिटिशांच्या मदतीने पहिल्या महायुद्धानंतर त्यांनी आजच्या पॅलेस्टाईन भागात पाय रोवायला सुरुवात केली.
दरम्यानच्या काळात तिथे बहुसंख्य झालेल्या आणि महायुद्धानंतर तुर्कांपासून स्वातंत्र्य मिळालेल्या अरबांशी त्यांचा संघर्ष अटळ होता. दुसऱ्या महायुद्धदरम्यान वंशविच्छेदापासून वाचण्यासाठी अमेरिका व ब्रिटन यांच्या मदतीने त्यांनी निकराचा राजकीय संघर्ष करून आजच्या इस्राईलची भूमी मिळवली.
दोन्ही महायुद्ध पेटवणे, या दोन्ही युद्धात अमेरिकेला युद्धात उतरवण्यासाठीचं कारस्थान रचणे, हिटलरचा उदय, स्वतःचाच वंशविच्छेद करून घ्यायला नाझीची देखभाल, हमासची देखभाल हे सगळं यहुद्यांनीचं केलं अशी मांडणी तर निव्वळ बाळबोध.... हिटलरने किती यहुदी मारले त्याची उजळणी करा एकदा...
शिवाय अन्याय, अत्याचार, खून, विस्थापन अशा गोष्टी सोयीस्कर कालखंड निवडून दाखवणे म्हणजे तर कहरच...
असो....
16 Oct 2023 - 5:47 pm | अमरेंद्र बाहुबली
अभ्यासपुर्ण प्रतिसाद. ज्यूंच्या कष्टाला सलाम.
16 Oct 2023 - 6:03 pm | चौथा कोनाडा
@चक्कर_बंडा
+१
16 Oct 2023 - 6:07 pm | कॉमी
काहीही लेख.
16 Oct 2023 - 5:44 pm | चौथा कोनाडा
तपशिलवार लेख आवडला !
हे सगळं किती गुंतागुंतीचं आहे ! सत्तेच्या आणी राजकारणाच्या साठमारीत जनसामन्यांचा बळी जाणार .... अन मानवतेचा प्रश्न उद्भवला की ठराविक गट त्याचा गैरफायदा घेणार ! अवघड आहे सगळं !
भारतापुरते बोलायचे झाले तर गेले काही वर्षे पुरस्कॄत अतिरेकी आणि इतर गटांवर चांगलाच वचक बसत आहे, ही समाधानाची बाब आहे.
16 Oct 2023 - 7:15 pm | रंगीला रतन
ताजमहाल की तेजोमहालय छाप कैच्याकै भंकस
वेलकम ब्याक गामा पैलवान
रामायण आणलात तसा पूर्वी तिथे शकुनीच्या सासऱ्याच्या चुलत्याचे पांधार नावाचे राज्य होते असा कायतरी ठोकून महाभारत पण घुसवायचे कि मालक.म्हंजे अजून जास्ती मजा आली असती :=))
आपला नम्र
रंगीला रतन
17 Oct 2023 - 1:48 am | नठ्यारा
रंगीला रतन,
रामायण कुठे आणलंय? पुलास्तिन ऋषी रावणाचे आजोबा. त्यांचा रामायणाशी संबंध नाही. पण बरी आठवण केलीत. रामायण आणायला आवडेल मला.
- नाठाळ नठ्या
17 Oct 2023 - 3:43 am | नठ्यारा
चक्कर बंडा,
आपला इथला संदेश वाचला. माझी मतं सांगतो.
१.
अगदी बरोबर. पण हा सेफार्द ज्यूंचा इतिहास आहे. बहुसंख्य आश्केनाझी यहुदी पूर्व युरोप व मध्य आशिया येथले आहेत. ते इ.स. ७४० साली बुलन हा खजार साम्राज्याचा शासक यहुदी धर्मात परावर्तित झाला. त्याच्या वारसदारांनी यहुदी नावं घेतली. या यहुद्यांचा मध्यपूर्वेशी काहीही संबंध नाही. हे तथ्य अमेरिकी इतिहासकार प्राध्यापक आल्फ्रेड लिलीयेंथाल यांनी नोंदवलं आहे. एच.जी.वेल्स ( H.G.Wells ) यांचंही हेच मत आहे : The main part of Jewry never was in Judea and had never come out of Judea. ( संदर्भ : https://www.gutenberg.org/files/45368/45368-h/45368-h.htm#XXX )
आश्केनाझी यहुद्यांच्या वाय गुणसुत्राविषयी हा एक लेख सापडला : https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1274378/
खजार साम्राज्याविषयी माहिती : https://en.wikipedia.org/wiki/Khazars
२.
याचा काही संदर्भ मिळेल काय? एकजिनसी हे फार धाडसी विशेषण तुम्ही वापरता आहात.
३.
तुमच्याकडे बायबलमधला काही उल्लेख आहे का की इस्रायल हे पालेस्तिनाच्या ( तत्कालीन कनान च्या ) भूमीवरच वसवलं पाहिजे याचा ? असल्यास कृपया द्यावा. मग केनिया, मादागास्कर आणि टास्मेनिया हे पर्याय ज्यू विचारवंतांनी कशाला चाचपून बघितले असतील? झांगविल हे यापैकी एक विद्वान आहेत.
४.
माझ्या मते हे विधान सेफार्द यहुद्यांना लागू पडतं. आश्केनाझींना नाही. किंवा असलंच तरी फार किरकोळ प्रमाणावर लागू पडतं.
५.
हा संघर्ष अटळ नव्हता. नेमका हाच माझा मुद्दा आहे. जमवलं असतं तर स्थानिक अरबांशी मिळून मिसळून राहता आलं असतं.
ऑटोमन साम्राज्य मोडीत निघालं पहिल्या महायुद्धाच्या नंतर. तदोपरांत पालेस्तिन जरी यहुद्यांना परत येण्यासाठी उघडा केला, तरी त्या वाळवंटात धडपडायला जाणार कोण ? सेफार्दी ज्यू युरोपातलं सुखासीन जीवन सोडून ओसाड प्रदेशात जातीलंच कशाला ? जे गेले ते प्रामुख्याने पूर्व-युरोपात निवासी खजार/तुर्की वंशांचे आश्केनाझी होते. त्यांचा प्राचीन ज्युदिया प्रांताशी काडीमात्र संबंध नव्हता. कोणतरी बाहेरचे उपटसुंभ ज्यू या लेबलाखाली इथे येऊन का गोंधळ घालताहेत, असा स्थानिकांचा ग्रह होणं साहजिक आहे.
६.
याकरिता अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. शोधणार कोण, इतकाच प्रश्न आहे.
७.
तुम्ही सांगा किती मारले.
- नाठाळ नठ्या
24 Sep 2024 - 8:49 am | चौकस२१२
हा संघर्ष अटळ नव्हता. नेमका हाच माझा मुद्दा आहे. जमवलं असतं तर स्थानिक अरबांशी मिळून मिसळून राहता आलं असतं.
जमवून घ्य्याचे रक्तातंच नाही ,, किती उधारणे पाहिजेत
मीयनमार मध्ये बुद्धांशी वैर
भारतात हिंदूंशी वैर
श्रीलंकेत चर्च उधवस्त
पारशी लोकांची पूर्वीची हकालपट्टी
बामियान चे बुद्ध उध्वस्त
18 Oct 2023 - 10:24 pm | लिओ
खरोखर आपण थोडक्यात लिहिले १९२० नंतरचा इतिहास काहि एका लेखात पुर्ण होणार नाही.
०१. ज्यू = यहुदी ( jews ) : हे अब्राहामिक धर्माचे उपासक आहेत. तोराह व बायबल यांचे प्रमुख ग्रंथ. धर्मगुरूस राबी ( वा राबाय वा राबाई ) म्हणतात. शेमचे वंशज म्हणून यांना शेमित्य ( = semetic ) असेही म्हणतात. ख्रिश्चन व मुस्लीम हे ही तांत्रिक दृष्ट्या शेमित्य आहेत. मात्र ही संज्ञा प्रामुख्याने यहुद्यांसाठी वापरतात. शेमसोबत याफेथ व चम यांचे वंशजही शेमित्य धरले जातात. आई यहुदी असेल तर मूल आपोआप यहुदी धरतात.
या मुद्द्यानुसार ज्यू धर्मात मातृसत्ताक पध्द्त आहे का ??
14 Nov 2023 - 7:26 pm | नठ्यारा
लिओ,
पहिल्याप्रथम उशीरा प्रतिसाद देतोय याबद्दल क्षमा मागतो.
यहुदी पंथ मातृसातत्यिक असला तरी त्यांत मातृसत्ताक पद्धती नाही. कुटुंबाचा प्रमुख बापंच असतो.
-नाठाळ नठ्या
14 Nov 2023 - 7:34 pm | नठ्यारा
मित्रहो,
इस्रायलने अतिरिक्त व अनावश्यक हिंसाचार करीत आहे. हा हिंसाचार थांबवा यासाठी संयुक्त राष्ट्रसंघात एक ठराव आणला होता. भारताने त्या ठरावाच्या बाजूने मतदान केलं आहे. बातमी : https://pudhari.news/national/678031/india-supported-the-resolution-cond...
शेवटी कुठेतरी सत्य उघडकीस येऊ लागलंय.
-नाठाळ नठ्या
17 Jun 2024 - 10:04 pm | नठ्यारा
इस्रायली संरक्षणदलाने स्वत:च्या ज्यू नागरिकांना ते ओलीस ठेवले जाऊ नयेत म्हणून ठार मारलं. असं राष्ट्रसंघाच्या निरीक्षकचमूचं मत आहे.
संबंधित बातमी ( इंग्रजी दुवा ) : Israel killed own citizens on October 7 in ‘Hannibal Directive’, UN claims
: https://www.telegraph.co.uk/world-news/2024/06/13/israel-killed-dozen-ow...
हमासने किती ज्यू मारले आणि इस्रायली संरक्षणदलाने किती मारले, काही हिशेब कोणी केलाय का ?
-नाठाळ नठ्या
23 Sep 2024 - 11:17 pm | नठ्यारा
लोकहो,
गेल्या आठवड्यात लेबनॉन देशात पेजर फुटून लोकं जखमी झाल्याच्या बातम्या आल्या. पेजर फुटल्याने जखमी झालेले सगळे काही अतिरेकी असू शकंत नाहीत. काही निरपराध नागरिकही जखमी झालेले आहेत. उघड युद्धांतही सैनिकी व नागरी लक्ष्य यांमध्ये भेद असतो. तसा इथे दिसंत नाही. त्यामुळे फुटणारे पेजर ही एक युद्धाची घोषणा आहे. इस्रायलने या क्षणी लेबनॉनविरुद्ध अधिकृत युद्ध घोषित केलेलं नाहीये. म्हणूनच हा एका प्रकारचा दहशतवादी हल्ला मानला पाहिजे. दहशतवादाचा आरोप होऊ नये म्हणून इस्रायलने या हल्ल्यांची जबाबदारी अद्यापही घेतलेली नाही.
हेझबोल्लामध्ये कोणीतरी फितूर आहे. अन्यथा असले पेजर श्वानास हुंगवून आरामात पकडता आले असते. मला वाटतं की दोन प्रकारे स्फोट घडवता यावेत :
१. भारिका अतिभारित ( battery overcharged ) करून तिचा स्फोट घडवणे. यातून हानी बऱ्यापैकी मर्यादित राहते.
किंवा मग :
२. पेजरात छोटे रासायनिक स्फोटक ( explosive ) पेरले व त्यास सक्रिय करण्यार्थ आगलाव्या ( detonetor ) वापरला. अनेकांचा हाच अंदाज आहे. स्फोटक अत्यंत शक्तिशाली असल्याने दोनतीन ग्राम इतकी कमी मात्रा पुरेशी ठरावी.
यासंबंधी एक ( इंग्रजी ) लेख वाचनात आला : https://apnews.com/article/lebanon-hezbollah-israel-exploding-pagers-889...
सदर लेखात म्हंटलंय की स्फोट होण्यापूर्वी काही पेजर बरेच तापले होते. हे खरं असेल तर मग ते का तापले असा एक प्रश्न उद्भवतो. ते तापले याचा अर्थ त्यातली भारिका जास्त काम करीत होती. आगलाव्याचं भारधाराचरण ( voltage current characteristic of the detonator ) तिला झेपंत नव्हतं का? की आगलाव्यासाठी अतिरिक्त भारिका वापरली होती? ही अतिरिक्त भारिका लिथियम-आयन वा लिथियम-पॉलिमर होती का? अशी असल्यास बरेच दिवस काम न करता शांत राहिली म्हणून ऐन वेळेस तापली का? हिला वीजपुरवठा कुठनं होत होता? नेहमीच्या दीड व्होल्ट पेन्सिलसेल ने भारिका भारीत करणं अवघड दिसतंय. मग इतर काही तंत्रज्ञान वापरलं का? बिनतारी संदेशामार्गे वीजभारण केलं का ? इथे एक संभाव्य तंत्र आहे : https://www.wired.com/story/distance-wireless-charging-ces-2022/
हे पेजर किती दिवसांपूर्वी सदर ग्राहकांना वितरीत केले होते? ते देखभालीच्या कारणासाठी नुकतेच मागवून परत एकदा वितरीत केले होते का? तसं असेल तर ही 'देखभाल' नवीन भारिका व स्फोटके बसवण्यासाठी असू शकते. अशा वेळेस आगलाव्याची भारिका काठोकाठ भरलेली असेल. नव्याने भारित करायची गरज पडू नये. पण मग अशा वेळेस पेजर तापणार नाहीत. की बरेच दिवस पडून राहिल्याने भारमात्रा ( charge ) उतरली होती? म्हणून ती पुनरपि भरण्यासाठी भारिका तापली?
वॉकीटॉकीचे भारिका जाडजूड असावी. स्फोटकांसाठी स्वतंत्र वीजपुरवठा बहुधा एकाच भारिकेतनं करता यावा. तसंच सौरपुठ्ठे ( सोलर पानेल ) वीजनिर्मिती करणारे असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र वीजपुरवठ्याची गरज पडू नये. या दोहींच्या बाबतीत वीजपुरवठ्याचे प्रश्न नसावेत वा वेगळे असावेत.
आजूनेक प्रश्न म्हणजे गंजगोळा ( shrapnel ) काय वापरला होता? ज्या प्रकारच्या जखमा दिसताहेत त्यावरून गंजगोळा बराच असावासं दिसतंय. अधिक माहिती मिळायला हवी. स्फोटक नेमकं काय होतं, त्याची रासायनिक संरचना काय, हा ही एक अनुत्तरीत प्रश्न आहे.
अनेक प्रश्न आहेत. जमतील तशी उत्तरे मिळवायचा बेत आहे.
आपला नम्र,
-नाठाळ नठ्या
24 Sep 2024 - 8:10 am | अमरेंद्र बाहुबली
आज जगात कुठलीक देशात सामान्य नागरिक पेजर वापरतात??
2 Oct 2024 - 8:58 am | कानडाऊ योगेशु
जवळपास सगळ्या तांत्रिक संज्ञांना पर्यायी मराठी शब्द वापरलेत वरच्या प्रतिसाद. फक्त पेजर प्रतिशब्द वापरायचे राहिले पहा.
2 Oct 2024 - 9:26 am | धर्मराजमुटके
पेजर ला शब्दप्रक्षेपक किंवा मजकूर प्रक्षेपक शब्द चालेल काय पर्याय म्हणून ?
24 Sep 2024 - 8:41 am | चौकस२१२
अति धार्मिकज्यू काय किंवा अति धार्मिक मुस्लिम काय दोघेही टोकाचेचं
पण आधी हल्ला कोणी केला ? आणि जगभर कोणाची कोणाशी भांडणे चालू असतात? जरा बघावे आधी
आलंआईज ऑन राफा वैगरे बोलण्याआधी इस्राएल वॉर जो हल्ला झालं जसे गुजराथ ला ७० हिंदूंना आधी कोणी जाळले हे हि अति उदार मतवादी लोक बघत नाहीत
24 Sep 2024 - 8:54 am | कंजूस
सविस्तर लेख आहे.
आमचा एवढा अभ्यास नाही.
3 Oct 2024 - 12:26 pm | विवेकपटाईत
या भागाचे पूर्वीचे नाव इजरायल हेच आहे.
“Israel” first appears near the end of the 13th century BC within the Egyptian Merneptah Stele, referring apparently to a people (rather than a place) inhabiting what was then “Canaan.” A few centuries later in that region, we find two sister kingdoms: Israel and Judah (the origin of the term “Jew”).6 Jul 2021.
पैगंबर च्या काळात मक्केतील एका यहुदी गुटाचा समूल नाश केला होता. आज ही यहूदींचा जगण्याचा अधिकार इस्लाम नाकारत आहे. इजराइल जिवंत राहण्याचा संघर्ष करतो आहे. इजराइल ला अमेरिकेची मदत नसते यहूदींचा संपूर्ण विनाश दशकांपूर्वी झाला असता. . तसेही काफिरांचा संपूर्ण विनाश हेच इस्लामचे उद्दिष्ट आहे.( कुराण वाचा).
ज्यू ना मारण्यासाठी ज्यू मदत करत होते. वाचून हसावे की रडावे समजले नाही. हे असेच जसे कसाब इत्यादी हिंदू होते. हिंदू जेहादींनी करकरे इत्यादी मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांना मारले. शेवटी शेंडा ना बुड असा लेख.
3 Oct 2024 - 7:58 pm | नठ्यारा
पटाईत काका,
तुम्हीच उद्धृत केलेल्या मजकुरात म्हंटलंय की इस्रायल हे नाव लोकांचं आहे, भूमीचं नाही. नेमका तोच तर मुद्दा आहे. इस्रायल नामे लोकांसाठी केनिया, मादागास्कर किंवा टास्मेनिया इथलीही भूमी चालली असती. निदान ज्यू विचारवंतांचं मत तसंच होतं. पूर्वीच्या कनान म्हणजे आजच्या पालेस्तिनात इस्रायलला जमीन कशाला पाहिजे असा सवाल आहे.
बाकी तुम्हांस शेंडा किंवा बुडखा बघायचा असेल तर या दोन गोष्टींचा शोध घ्यावा म्हणून सुचवेन.
१. शेंडा : हिटलरचा खाजगी सहायक ( म्हणजे स्वीय सचिव म्हणजे पर्सनल असिस्टंट ) एक मिश्रवंशीय ज्यू होता. त्याचं नाव एमिल मॉरीस. हिटलर आर्यवंशी वगळून इतरांचा द्वेष करायचा ही एक भूलथाप आहे. नाझी सैन्यांत असंख्य ज्यू होते.
२. बुडखा : बेन्जामिन नेतान्याहू हा पोलिश ज्यू आहे. त्याचा पालेस्तीनशी फुटक्या कवडीइतकाही संबंध नाही. त्याच्या बापजाद्यांनी पालेस्तिनात कधीही पाउल ठेवलं नव्हतं. त्याचं खरं आडनाव मिल्खोव्हस्की ( वा माईलकोवस्की ) आहे. मग तो आज तिथे दहशत का माजवतोय ? तो सेमेटिक तरी आहे का ?
बाकी पालेस्तिनसकट सर्व मध्यपूर्वेत ज्यू लोकं इ.स. १९४८ च्या बऱ्याच आधीपासून रहात आले आहेत. त्यांना इतरांनी कसलाही त्रास दिला नाही. ज्याप्रमाणे युरोपीय ज्यू विस्थापित आहेत तसे मध्यपूर्वेतले ज्यू आजीबात नाहीत. निदान १९४८ पर्यंत तरी नव्हते. १९४८ च्या पश्चात इस्रायलने काड्या घालायला सुरुवात केल्यावर मगंच इराण, इराक, भारत वगैरे आशियाई देशांतले ज्यू घरदारे सोडून पालेस्तिनात स्थायिक झाले.
वस्तुस्थिती पार वेगळी आहे.
आपला नम्र,
-नाठाळ नठ्या
5 Oct 2024 - 11:37 pm | जव्हेरगंज
हिटलरसुद्धा ज्यू होता असे कुठेतरी वाचले आहे.
6 Oct 2024 - 8:04 am | चौकस२१२
इस्रायल नामे लोकांसाठी केनिया, मादागास्कर किंवा टास्मेनिया इथलीही भूमी चालली असती.
काहीही
इस्लाम, ख्रिस्ती आणि ज्यू या तिन्ही धर्मांचा संबंध सध्याचे इस्राएल / पॅलस्टीन भूभागाशी निगडित असताना तुम्ही जु नि केनयात इस्राएल ची स्थापना केली तर नसते का चालले? असते हे विधान करताय ?
हे म्हणजे असे म्हणायसारखे आहे कि हिंदूनं हिंदुराष्ट्र्र हवे असल्यास त्याचा भारत / नेपाळ या भूभागाशी का संबंध नाही त्यांनी तिमोरे लेस्टे किंवा ग्रीनलंड मध्ये हिंदू राष्टर बनवावे !
6 Oct 2024 - 10:07 pm | नठ्यारा
चौकस२१२,
सदर विधान माझं नाही. हा प्रस्ताव इझ्रायल झांगविल यांच्यासारख्या विद्वानांनी चर्चेत घेतलेला आहे.
आपला नम्र,
-नाठाळ नठ्या
6 Oct 2024 - 10:37 pm | नठ्यारा
लोकहो,
बीबी ( बेन्जामिन ) नेतान्याहू याने फ्रान्सचा अध्यक्ष म्याक्रॉन यांस एक चेतावणी दिली आहे. बीबी म्हणतो फ्रान्सचे सहाय्य मिळो वा ना मिळो आम्ही हे युद्ध आम्ही जिंकूच.
यामागची पार्श्वभूमी अशी की म्याक्रॉन म्हंटलं की इस्रायलला शस्त्रपुरवठा करण्यावर बंदी घालावी ( arms embargo to be enforced ). तसंच लेबनॉनात सैन्य धाडण्याच्या इस्रायलच्या निर्णयावर असंतोष व्यक्त केला. यावर बीबीने थयथयाट केला. म्हणतो कसा की असा प्रस्ताव मांडणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे.
बातमीचा इंग्रजी दुवा : https://www.bbc.co.uk/news/articles/cjr3zd4d8y5o
खरी बात अशीये की अमेरिकेच्या मदतीनेच इस्रायल आजवर युद्ध छेडीत आलेला आहे. ही मदत बंद केली तर कठीण आहे. लेबनॉनमध्ये २००६ साली बिंत जबेईल ची लढाई इस्रायलला भारी पडली होती. तिची पुनरावृत्ती होण्याची शक्यता बीबीस भेडसावते आहे. लिपीपट ( पेजर ) फोडणे वेगळे आणि प्रत्यक्ष सैनिकी कारवाई करून भूमी व्यापणे वेगळे.
शिवाय फ्रान्स लेबनॉनला आपला 'सहकारी' मानतो. लेबनॉन फ्रान्सपासून स्वतंत्र झाला. जर तिथे काही गडबड उडाली तर ते लोकं फ्रान्स कडे धाव घेतात. जसे केनिया, युगांडा वगैरे इंग्लंड कडे आशेने बघतात, त्या धर्तीवर अल्जिरीया, माली, मोरोक्को वगैरे फ्रेंच भाषिक पूर्वाश्रमीच्या वसाहती फ्रान्सकडे डोळे लावून असतात. लेबनॉनमध्ये कुणासही हस्तक्षेप करायचा असल्यास आपली संमती घ्यावी अशी फ्रान्सची अपेक्षा आहे.
फ्रान्सने २००३ साली अमेरिकेने इराकवर केलेल्या आक्रमणाचा जबर ( शाब्दिक ) विरोध केला होता. कसाबसा त्याला शांत केला. आज मामला लेबनॉनचा आहे. फ्रान्सला आपली 'वसाहत' सांभाळायची आहे, तर इस्रायलास ती तुडवायची आहे. असा लफडा आहे.
बिंत जबेईल च्या लढाईचा ( इंग्रजी ) दुवा : https://en.wikipedia.org/wiki/Battle_of_Bint_Jbeil
आपला नम्र,
-नाठाळ नठ्या