भारतीय सरकारी नोकरांना असलेल्या वैद्यकी सुविधेची माहीत पाहिजे

स्वरुपसुमित's picture
स्वरुपसुमित in काथ्याकूट
15 Oct 2023 - 12:55 am
गाभा: 

मी आधी पोस्ट टाकली तशी रक्तात गाठ dvt आजार आहे
सध्या महिना ४००० औषधांवर खर्च होत आहे जो कायम राहणार वाढू मात्र सह्कतो ,मेडिकल ला खर्च ४ लाख आला ४ दिवसाचा
मी सध्या सॉफ्टवेअर मध्ये आहे ,जर सरकारी नोकरी केली तर सरकार खर्च उचलेले कि त्यात येईल नाही
स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब मध्ये वेग वेगळ्या पोलिसी असतील कोणी सांगू शकेन ?

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

15 Oct 2023 - 12:28 pm | विवेकपटाईत

सरकारी नोकरीत आधीचे आणि नंतरचे सर्व आजारांचा खर्च *नियमानुसार सरकार उचलते. औषध उपचार अनुमती इत्यादी घेण्यासाठी थोडी डोके दुखी सहन करावी लागते, इतके कष्ट घ्यावेच लागतात. आजारी व्यक्तीसाठी सरकारी नोकरी उत्तम.

बाकी रोज सकाळ संध्याकाळ एक तास नियमित कपालभाती प्राणायाम करा. अनुलोम विलोम प्राणायाम वेळ मिळेल तेंव्हा करा. काही महिन्यात बिना औषधी रोग ठीक होईल. विश्वास असेल तर नियमित सवय लावण्यासाठी १५ दिवसांसाठी हरिद्वारला जाऊन या.

*नियमानुसार ( माझी bay-pass सर्जरी दिल्लीच्या प्रसिद्ध गैर CGHS हॉस्पीटल मध्ये झाली होती. सरकारने नियमानुसार खर्च उचलला,बाकी खिश्यातून).

स्वरुपसुमित's picture

15 Oct 2023 - 8:14 pm | स्वरुपसुमित

खर्च किति झाला?

विवेकपटाईत's picture

17 Oct 2023 - 1:24 pm | विवेकपटाईत

केंद्र सरकार// राज्य सरकार अधिकृत हॉस्पिटलमध्ये काहीही खर्च लागत नाही. इमर्जेंसी उपचार देशात कुठेही घेऊ शकतात. केंद्र/ राज्य सरकार त्यांच्या पूर्व निर्धारित दरानुसार तुमच्या उपचाराचा खर्च उचलेल. हे दर वेळोवळी बदलत राहतात. २००७ मध्ये स्लीप डिस्क मुळे तब्बल पाच महिने बिस्तारावर होतो. डोक्यावर कोणतेही टेन्शन आले नाही.
बाकी सरकारी नोकरीत पगार कमी असतात एवढेच.

अहिरावण's picture

20 Oct 2023 - 10:50 am | अहिरावण

>>>बाकी सरकारी नोकरीत पगार कमी असतात एवढेच.

काय बिनडोक वाक्य सहज लिहिता हो तुम्ही? काही कामं न करता लाखो रुपयांचे पगार घेऊन परत दर सहा महिन्यांनी म्हागाई भत्ता वाढवून घेत स्वतःच्या तुंबड्या भरुन घेत प्रत्येक कामासाठी भिका-यासारखे हात पुढे करुन लाच खात कधी तरी उपकार केल्यासारखे काम उरकणारे सरकारी नोकर म्हणजे प्रारब्धात असलेला नरक जिवंतपणी भोगावा लागतो असे भारतीयांना वाटते.

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Oct 2023 - 7:24 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Oct 2023 - 7:26 pm | अमरेंद्र बाहुबली

लाच घेताना सापडला तरी पहीले तीन महाने अर्धा पगार नी नंतर “निर्दोष सुटे पर्यंत“ (वाक्य पुन्हा वाचा) पुर्ण पगार मिळत राहतो.

अहिरावण's picture

20 Oct 2023 - 7:30 pm | अहिरावण

आजपर्यंत किती जणांना खरोखर शिक्षा झाली लाच खाल्याबद्दल?
उलट असा पकडला गेलेला पुन्हा कामावर रुजू झाल्यावर सदर व्यक्ती सहज मॅनेज होते हा संदेश योग्य ठिकाणी गेलेला असतो त्यामुळे त्याची पोस्टींग मलईदार ठिकाणी होते आणि कार्यक्रम सुरु रहातो.

वर पुन्हा रडगाणे आहेच... सरकारी नोकरांना पगार कमी असतो....

आणि हेच सरकारी नोकर निर्लज्ज आणि बेशरमपणे ३२ रुपये प्रतिदिन आरामात जगता येते असले अहवाल सादर करत असतात

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Oct 2023 - 10:08 pm | अमरेंद्र बाहुबली

सरकारी नोकरीसाठी ऊगाच का लोक जिवतोड मेहनत करतात?? नी मुलींचे बाप जाऊन सरकारी नोकरांचे पाय धरतात.

अहिरावण's picture

21 Oct 2023 - 10:27 am | अहिरावण

हीच गोष्ट सुमारांची सद्दी असल्याचे आणि लफंग्यांचे उदात्तिकरण होऊन समाजाचा नैतिक स्तर रसातळाला गेल्याची खुण आहे.

स्वरुपसुमित's picture

17 Oct 2023 - 1:55 pm | स्वरुपसुमित

upper capping असेल