फ्लॅट घेताना काय पहावे?

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in काथ्याकूट
28 Aug 2023 - 3:23 pm
गाभा: 

मला एक माहीती/सल्ला हवाय.
सध्या मी फ्लॅट पाहतोय पुण्यात (खरंतर पुण्याबाहेर) म्हणजे पुणावळे/कात्रज/रावेत/ चंदनवगर वगैरे भागात. बरीच माहीती घेतल्यावर माझा थोडा गोंधळ ऊडतोय.
१)बरेच फ्लॅट हे दोन ते तीन वर्ष पूढे ताब्यात मिळनारेत. त्यातही खुप कमी शिल्लक आहेत असे बिल्डर सांगतात. ते खरे की खोटे ते कळून येत नाही. शिल्लक म्हणजे एकतर सर्वात वरचे दोन मजले किंवा पहील्या दोन मजल्यांवर. ह्या दोन्ही मजल्यांत काही तोटे असतात का? असतील तर काय? खालच्या मजल्यांवर लोक का फ्लॅट घेत नाहीत?
२) रोडटच फ्लॅट नी थोडे आतले फ्लॅट ह्यात काय फायदे तोटे असतात?
३) फ्लॅट घेताना काय काय पहायला हवे जेणेकरून फसवणूक होऊ नये?
४) बिल्डींगची कामाची क्वालीटी कशी चेक करावी? मी सिवील इंजी. नाही. म्हणून मग बोंबाबोंब.
५)स्वतः जागा मालक डेवलपर असेल तर फ्लॅट घेऊ नये कारण सोसायटी फोर्म होताना प्रोब्लेम येतो असा एकाने सल्ला दिला. ते कितपत खरं?
६)बिल्डींग रोड टच असेल तर रोडटच भागातील फ्लॅट चांगला की मागच्या बाजूचा?
७) कायदेशीर दृष्ट्या कोणत्या गोष्टी जोखाव्यात?
८)म्हाडाच्या लोटरीत घर बघावे असेही काहींनी सांगीतले. पण स्वस्त घराच्या बाजूला तसेच लोक येतात./तसेच कामाची क्वालीटी बोंबलते असेही काहींनी सांगीतले.
९)काहींना सॅंपल फ्लॅट बनवून ठेवलेत काहींनी नाही. त्याचा काही फरक पडतो का?
१०) रोडटच बिल्डींग असेल तर भविष्याच्या दृष्टीने काही फायदा असतो का?
काही सल्ले असतील तर अवश्य द्यावेत किंवा मी असतो तर असं केलं असतं अश्या स्वरूपात तरी सांगावेत.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

28 Aug 2023 - 3:39 pm | कंजूस

बरेच मुद्दे काढलेत हो.
File दाखवतात का? मंजूरीची तारीख,सर्वे नंबर, किती महीन्यात काम करायचे आहे या गोष्टी पाहा.

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Aug 2023 - 3:57 pm | अमरेंद्र बाहुबली

हो. रेरा डेट ओफ पसेशन दाखवतात.

महानगरपालिकेचा डेव्हलपमेंट प्लान चेक करा (ओनलाईन मिळेल). बिल्डर बरेच सांगतात असे होईल तसे होईल पण हा प्लान बघितल्यावर खूप गोष्टी क्लिअर होतील. ( मुद्दे २, ६, १०)
बरेच फ्लॅट हे दोन ते तीन वर्ष पूढे ताब्यात मिळनारेत : शक्यतो रेडी पझेशन, क्लोज टू कम्प्लिशन घ्या. दुर्दैवाने काही कारणाने रखडला आणि २-३ ची ६-७ वर्षे झाली तर प्रोब्लेम होईल. रेरा वगैरे असुनसुद्धा असे विलंब होत आहेत.

स्वतः जागा मालक डेवलपर असेल तर फ्लॅट घेऊ नये कारण सोसायटी फोर्म होताना प्रोब्लेम येतो असा एकाने सल्ला दिला. ते कितपत खरं?
असे काही नाही, मोठ्या बिल्डरनी पण सोसायटी फोर्म करताना भरपूर लोचे केलेली खूप उदाहरणे माहिती आहेत.

एकतर सर्वात वरचे दोन मजले किंवा पहील्या दोन मजल्यांवर. ह्या दोन्ही मजल्यांत काही तोटे असतात का?
स्रर्वात वरच्या मजल्यावर पावसामुळे लिकेज, गरम होणे असे प्रोब्लेम होतात. पहिला, दुसर्‍या मजल्यावर रोडटच असेल तर धूळ, आवाज, किंवा सोसायटीचे क्लब हाऊस, गार्डन फेसिंग असेल तर सारखा आवाज वगैरे असतो.

एसबीआयचे गृहकर्ज काढले तर डोक्याला थोडा ताप झाला तरी मुद्दा क्र. ७ निकालात निघेल. बिल्डरकडून पण भरपूर डोक्युमेंटशन, वकिलाकडून जागेची कायदेशीरता वगैरे गोष्टी बँक काटेकोरपणे बघते.
सँपल फ्लॅट फक्त खोल्यांचा लेआउट बघण्यापुरताच कामाचा.
माझे मत रोडटच घेण्यापेक्षा मुख्य रस्त्यापासून ५०/१००/२०० मीटर आत घेतला तर उत्तम.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

5 Sep 2023 - 10:20 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

शक्यतो रेडी पझेशन, क्लोज टू कम्प्लिशन घ्या. दुर्दैवाने काही कारणाने रखडला आणि २-३ ची ६-७ वर्षे झाली तर प्रोब्लेम होईल. रेरा वगैरे असुनसुद्धा असे विलंब होत आहेत.

याला प्रचंड अनुमोदन. यामुळे खुप खस्ता खाल्ल्यात. कंन्सुमर कोर्टाच्या खुप चकरा माराव्या लागल्या, त्यानंतर मोठ्या मुश्किलीने पैसे परत मिळवण्यात यशस्वी झालोय. त्यात ३ वर्षे गेली, अनेक आर्थीक अडचणींना तोंड द्यावे लागले, मनस्ताप झाला तो वेगळा.

आणखिन एक महत्वाचा मुद्दा: बिल्डर जर राज्कारणी असेल (नगरसेवक, आमदार, वगैरे) तर अजिबात तिकडे फिरकू नका.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

5 Sep 2023 - 10:23 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

हो आणि आजकाल कंस्ट्रकशन संबधित तक्रारी कंन्झुमर कोर्ट घेत नाहीत. रेरा कडेच जावे लागते आणि रेरा ला कोर्टा इतके आधिकार नाही त्यामुळे रेरा कोर्टासारखे रिलीफ देउ शकत नाही.

ह्या दोन्ही मजल्यांत काही तोटे असतात का?
फार खालचे फ्लॅट्स असतील तर उजेड आणि हवा/वारं पुरेसं येईलच असं नाही. खूप वरचे फ्लॅट्समधे ( इमर्जन्सीत ) लिफ्ट्स शिवाय जाणं त्रासदायक राहतं, पाण्याचा फोर्स कमी असतो, घरं जास्त तापतात.

२) रोडटच फ्लॅट नी थोडे आतले फ्लॅट ह्यात काय फायदे तोटे असतात?
रहदारी फार असेल तर आवाजाचा त्रास होऊ शकतो एवढंच.

३) फ्लॅट घेताना काय काय पहायला हवे जेणेकरून फसवणूक होऊ नये?
- एसबीआयचं लोन मिळू शकेल काय? नाही म्हटलं किंवा घोळवलं तर बहुतेक वेळा स्कीममधे प्रॉब्लेम असू शकतो.
- आधी किती स्कीम्स झाल्यात? अप्रुवल किती फ्लोअर्सचं आहे? मेंटेनन्स किती राहील? बिल्डर २ वर्षांचं मेंटेनन्स घेतात, पझेशन देण्यापर्यंत म्हणून. पण उरलेलं ते सोसायटी फॉर्म केल्यावर बरेचदा देत नाहीत. सोसायटी सेटअप बिल्डरनं करून द्यायचा असतो.
- स्कीमच्या प्लॅन मधे पुढे काही बदल होणार आहेत काय? कधी कधी होतो, जर फेज मधे काम करणार असतील तर.
- पार्कींगचं ब्लू प्रिंट बरेचदा नसतं, तेही बघू शकता.
- काही कमर्शीयल सेटअप्स असणारेत काय? याचा खूप त्रास होतो, कारण कोण कशाचं दुकान उघडेल काही सांगता येत नाही.
- सेलडीड मिळणार काय? हा भाग जरा गुंतागुंतीचा आहे कारण कन्वेयन्स झाल्याशिवाय सेलडीड बिल्डर करत नाही. पण पार्शियल कम्प्लीशन देतात.. त्याशिवाय सोसायटी स्थापन होत नाही. जागा मालक जमीनीची मालकी सोसायटीला ट्रान्सफर करत नाहीत लवकर, त्यामुळं कम्प्लीशन आणि कन्वेयन्स व्हायला वेळ लागतो. पण महारेरा मधे आल्यापासून बरेच बिल्डर सरळ व्यवहार करतात.
- स्कीमची जागा आधी कशासाठी वापरली जायची याची माहिती मिळाली तर उत्तम.

माझ्यामते सध्या नवीन फ्लॅट्स फारच छोटे व्हायला लागलेत. त्यापेक्षा जर रिसेलचा, फार जुना नसलेला फ्लॅट घेतला तर जवळपास त्याच किंमतीत बराच मोठा फ्लॅट मिळू शकेल.

कर्नलतपस्वी's picture

28 Aug 2023 - 6:36 pm | कर्नलतपस्वी

काय विचार करावा....

नवीन का रि सेल
रेडी पझेशन का अंडर कन्स्ट्रक्शन का रि डेव्हलपमेंट
स्वताचे,कुटुंबातील इतर व्यकतींचे वय.
बजेट
त्वरीत हवा की थांबायची तयारी आहे.
होमलोन की स्वतःच्या पायावर.

कशा करता ...

गुंतवणूक की स्वताच राहाण्यासाठी.
कुटुंबातील सदस्य संख्या.
मुलांचे शिक्षण, स्वताची, बायकोची कामाची जागा.
वैद्यकीय सोयी
दळणवळणाची साधने. लोकसंख्या व दररोजच्या अवश्यकतेच्या सुखसोई.

काय बघावे....

बिल्डर रेप्युटेशन.
त्याचे पुर्व प्रोजेक्ट.
साईट व साईज ऑफ प्रोजेक्ट
कुठली बॅक लोन देत आहे
रेरा रजिस्ट्रेशन
कागदपत्रे, विवीध परवानगी.
बांधकाम चालू असेल तर प्रोग्रेस
सोसायटी का अपार्टमेंट असोसिएशन
अमेनिटीज

बर्याच प्रमाणात शंकानिरसन होतील.

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Aug 2023 - 7:37 pm | अमरेंद्र बाहुबली

माझे वय ३०, बायको २७ नी एक वर्षाचा मूलगा. तिघेच.
बजेट ५०-५५ कर्ज काढून.
होमलोन वर
सध्या तरी गुंतवणूक, रहायला जायची लगेच घाई नाही. कादाचीत दोनेक वर्षांनी रहायला जाईन.
बॅंक लोन मिळेलच.

Bhakti's picture

6 Sep 2023 - 2:47 pm | Bhakti

अरे वाह!
छोट्या बाहुबलीसाठी अभिनंदन!
चांगली चर्चा, बायकांना घर पाहिजेच असतं, तेव्हा घेतल्यास चांगलेच होईल.फक्त इन्कम वाढत राहील याची तरतूद करत राहा.

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Sep 2023 - 4:03 pm | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद. :) फार त्रासदायक असतो स्त्रीहट्ट. घ्यावच लागनार.

सुबोध खरे's picture

6 Sep 2023 - 6:57 pm | सुबोध खरे

राहते घर अगदी लहान असले तरी स्वतःचेच असावे या निर्णयावर आलो आहे.

गेली ७ वर्षे माझे छोटे घर भाड्याने देऊन मी मोठ्या घरात भाड्याने राहत होतो. या अगोदर लष्करात असताना १२ वर्षे सरकारी घरात रहात होतो

भाड्याच्या घराला स्वतः;च्या घराची सर कधीही येत नाही. त्यातील रंग, फरशा, फर्निचर, स्वयंपाकघराची रचना यातील तुम्हाला काहीही स्वतःच्या निवडीचे असत नाही. याशिवाय या घराबद्दल कधीही आपलेपणा वाटत नाही.

सोसायटीतील लोक तुम्हाला परकाच आणि तात्पुरता समजतात. मग तुम्ही कितीही चांगले असा.

उत्तम दर्जाची टॅक्सीबद्दल तुम्हाला कधीही ममत्व वाटत नाही.

हि वस्तू परक्याची आहे हि जाणीव आपल्या मनातून कधीही जात नाही.

आणि हि जाणीव स्त्रियांची अतिशय पक्की असते.

यामुळेच भाड्याच्या महालापेक्षा अगदी छोटे का होईना स्त्रियांना स्वतःचे हक्काचे घरच हवे असते.

बायकाना भाड्याचा हिऱ्या माणकांचाचा मोठा रत्नहार असल्यापेक्षा छोटा का होईना पण स्वतःचा (नेकलेस) हारच आवडतो

शेवटी तुमच्या बँकेत पैसे किती आहेत यापेक्षा तुम्ही किती समाधानाने आयुष्य जगताय हे फार महत्त्वाचे असते.

या समाधानाची किंमत कधीही करता येणार नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Sep 2023 - 7:11 pm | अमरेंद्र बाहुबली

सहमत. स्त्री मनाची बाजू ऊत्तम मांडलीत.

चित्रगुप्त's picture

6 Sep 2023 - 4:51 pm | चित्रगुप्त

कर्नल तपस्वी यांनी लिहीलेले प्रश्न मी पण विचारणारच होतो.
आणखी काही प्रश्न (ज्याची उत्तरे इथे दिली नाहीत तरी चालेल, पण स्वतः लक्षात घेण्यासारख्या गोष्टी)
१. गावाकडे घर, शेती वगैरेत वाटा आहे का? (हेच बायकोच्या बाबतीतही) गरज भासल्यास तिकडून काही रक्कम मिळू शकते का?
२. नोकरी बदलून अन्यत्र (स्वदेशात वा परदेशात) जाण्याची इच्छा/ शक्यता कितपत ?
सध्या एवढेच. आणखी पण आहेत, ते नंतर.

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Sep 2023 - 7:22 pm | अमरेंद्र बाहुबली

गावाकडे घर आहे अगदी चांगल्या किमतीचे आहे. त्या घरामूळेच मी गंडलो. मी १५ लाख माझे स्वतचे लावून ते घर बांधले. तीन मजले काढले नी दोन दुकाने काढले. पाच लाख कर्ज ऊचललं त्या साठी. दहा स्वतचे कमावलेले टाकले. पण वडील दुकान भाड्याने जाऊ देत नाहीयेत. मला पैसा नको म्हणून, लोक १५ हजार भाडे द्यायला जागेवर तयार आहेत पण घरातूनच त्रास देणं सुरूय. लहान भावाने अर्धा कर्जाचा हफ्ता भरायला नकार दिलाय. घरातूनच अशी भयंकर मोठी आर्थीक फसवणूक झालीय. कुटूंब, आई- बाप, प्रेम वगैरेंवरून माझा विश्वास ऊडालाय. तिकडून भीक नको पण कूत्रं आवर अशी अवस्था झालीय. बायकोच्या माहेरून पुढील वीस- तीस वर्षे काही येणार नाहीये, एकंदरीत दोन्हीकडून बोॅब आहे.

२ ) तोच विचार चाललाय, भरभक्कम पैसा मिळनार असेल तर विदेशात जायचा विचार सुरूय. मूल लहान आहे तेव्हाच. जर्मनी, ओस्ट्रेलीया, कॅनडा स्थलांतरावर विचारही केला. पण खुप तयारी करावी लागनारेय. दिल्ली अजून बरीच दूर आहे.

गावाकडच्या सामायिक मालकीच्या घरात (शहरातील श्रीमंत भावाने ) 'लक्ष ' घालून चांगलं ठेवावं हे तिथे गावी राहणाऱ्यांकडून मनावर बिंबवण्यात मोठमोठ्या लेखकांना जमणार नाही अशी भावनात्मक मराठी बोलली जाते. ती नंतर (शहलवाल्याने घाम आणि पयशे घातल्यानंतर )कधीच ऐकू येत नाही. ती भाषा हीच खरी मराठी भाषा. मग उरतात फक्त हिश्श्याचे कागद.
बरं ही वृत्ती केवळ महाराष्ट्रातच (कोकण अथवा देशावर)नसून सर्व राज्यांत आहे.

सुबोध खरे's picture

6 Sep 2023 - 8:07 pm | सुबोध खरे

असा किती पैसा मुंबईतून "गावाकडच्या " कृष्णविवरात जात असतो हे कित्येक वर्षे पाहत आलो.

आणि कोव्हीड च्या वेळेस याच गावच्या लोकांनी मुंबईच्या लोकांना गावात प्रवेश बंद केल्याचे असंख्य उदाहरणे पाहिली आहेत.

गावचे लोक साधे सरळ आणि भोळे असतात यासारखी दुसरी अंधश्रद्धा नसेल.

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Sep 2023 - 8:54 pm | अमरेंद्र बाहुबली

खरं आहे कंकाका, नी डाॅ. साहेब, वडीलांची असंख्य कर्ज मी फेडली, एक नातेवाईक ऊरला नाही ज्याची ऊधारी नसेन. असा हीशेब लावला तर मी बराच कफल्लक झालोय. हे न भरून निघनारे कृष्णविवर आहे. आता मी एक रूपया हा देत नाही. काय होवे ते होवो तिकडे. हफ्ते भरायच्या वेळेस कुणीही येत नाही मदतीला घरातले.

सुबोध खरे's picture

7 Sep 2023 - 9:35 am | सुबोध खरे

हे न भरून निघनारे कृष्णविवर आहे

असं नाही. फाटक्या खिशातून गळून गेलेले पैसे सोडून द्या. आता खिसा नीट शिवून, जपून ठेवा

तिसाव्या वर्षी अतिशय महत्त्वाचा धडा शिकलात हे काय कमी आहे?

यापुढे पैसे कमवायच्या असंख्य संधी येतील. पैसे मिळत राहतो आयुष्यात. पैसे गेल्याबद्दल पश्चात्ताप करत राहू नका.

माणसं ओळखायला शिकलात तर आयुष्यात खूप प्रगती करता येईल.

अमरेंद्र बाहुबली's picture

7 Sep 2023 - 10:29 am | अमरेंद्र बाहुबली

_/\_

वामन देशमुख's picture

7 Sep 2023 - 10:46 am | वामन देशमुख

अतिशय आवडले.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

7 Sep 2023 - 8:14 pm | हणमंतअण्णा शंकर...

तुमच्या या अनुभवाला मी तर 100 टक्के रिलेट करतो.

शहरातील सुशिक्षित लहान कुटुंबांमध्ये काही लोक क्लिअर सेपरेशन ऑफ अससेट्स अगदी सुरुवातीलाच करून ठेवतात. म्हणजे पुण्यातले वडील योग्य वय येताच मुलांना त्यांचे स्वतः चे घर घ्यायला लावतात किंवा कुणाला काय द्यायचे याचा स्पष्ट आराखडा त्यांच्या मनात तयार असतो. गावाकडची एकत्र कुटुंब मात्र जमेल तितके एकत्र राहण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात मात्र कुचंबणा होऊन प्रचंड कडाक्याची भांडणे होऊन खूप मोठ्या भेगा पडतात.

जेव्हा मूले जन्माला घालायची तेव्हाच असेट्स ची आखणी करून ठेवावी या मताचा मी आहे.

शिवाय कोणत्याही सामायिक आर्थिक गोष्टी करत असताना कितीही वाईट वाटले तरी एम ओ यु केल्याशिवाय कोणतीही आर्थिक मदत करू नये. घरचे लोक सोयीस्कर रित्या आर्थिक मदती विसरून जातात. आम्ही आमचे गावचे घर रिनोव्हेंट केले तेव्हा सर्व भावंडांनी स्पष्टपणे काय मदत करणार हे लिहून सह्या केल्या. त्यामध्ये कोण लेबर किती देणार उदा. भिंतीवर पाणी मारणार, हेही नोंदवून ठेवले होते.

दुसरे म्हणजे कोणालाही किरकोळ रक्कम सोडल्यास कॅश मध्ये मदत करू नये. विशेषतः भावंडं, आईवडील, इतर कुटुंबीय. रेकॉर्ड मध्ये पर्पज स्पष्टपणे नोंदवल्याशिवाय मदत करू नये. घरखर्चाला घरी पैसे पाठवण्यापेक्षा थेट गोष्टी पाठवाव्यात किंवा बिले भरावीत. खूपदा लोक पैसे इतरत्र खर्च करतात, चैनी करतात. ते करण्याला मज्जाव नसला तरी पैसे मागताना लोक अटीतटीची परिस्थिती आहे असं सांगतात ते खटकते. शिवाय काय खर्च केला हे विचारायला गेल्यावर "आता तू आम्हाला हिशेब मागणार काय म्हणून" अजून संबंध खराब होतात. त्यापेक्ष्या थेट बिले भरली म्हणजे वाण्याला थेट पैसे देणे इत्यादि गोष्टी केल्या तर थोडी अकौंटे बिलिटी राहते.

बाकी "जोडीनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी" हे खरे असले तरी उदास विचार म्हणजे नुसतीच चॅरिटी नव्हे हेही खरे.

चौकस२१२'s picture

8 Sep 2023 - 8:50 am | चौकस२१२

ओस्ट्रेलीया, कॅनडा स्थलांतरावर विचारही केला. पण खुप तयारी करावी लागनारेय. दिल्ली अजून बरीच दूर आहे.
अमरेंद्र करणार असाल तर वेळेवर करा कारण अश्या स्थलांतराच्या अर्जात वय हा सुद्धा एक महत्वाचा विचार असतो
असं ऐकलंय कि त्यातल्या त्यातल्या त्यात Canada जास्त सोप्पे आहे

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Sep 2023 - 6:31 pm | अमरेंद्र बाहुबली

नक्कीच.

चित्रगुप्त's picture

28 Aug 2023 - 7:18 pm | चित्रगुप्त

बँक लोन बद्दल सांगायचे तर एचडीएफसी वगैरे बँका कर्ज द्यायला तयारच बसलेल्या असतात (बहुधा 'कर्जवसुली' करून घेण्यासाठी ते कोणतेही उपाय करू शकत असावेत) मात्र स्टेट बँक काटकोर तपासणी करूनच कर्ज देते याचा मला स्वतःला अनुभव आहे (आमचे घर विकताना ग्राहकाला एचडीएफसीचे सहज मिळत होते पण स्टेट बेंकेने नकार दिला- खोलात जाऊन बघता जे कारण समजले ते प्रॉपर्टी डीलरांनाही ठाऊक नव्हते)
या धाग्यावर जाणकार मिपाकर जे सल्ले देत आहेत, ते सर्वांच्याच कामास येतील. (वा.खू. साठवण्यालायक धागा)
या फ्लॅट खरेदीत बिल्डरकडून पांढरा-काळा पैसा किती वगैरेही काही मुद्दे आहेत का ?

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Aug 2023 - 7:38 pm | अमरेंद्र बाहुबली

हो काळा पांढरा मूद्दा आहे. बहुतेक ४५ लाखाच्या खाली जीएस टी कमी लागतो.

तुषार काळभोर's picture

28 Aug 2023 - 8:05 pm | तुषार काळभोर

सर्वात वरच्या मजल्यावर उन्हाने तापलेल्या टेरेसमुळे फ्लॅट मधील वाढणारी उष्णता तसेच पावसाच्या पाण्यामुळे टेरेसमधून होणारे लिकेज हे दोन त्रास असतातच. खालील किमान तीन मजल्यांपर्यंत आजूबाजूचा आवाज किंवा गोंगाट तसेच धूळ याचा त्रास होतो.
आतल्या बाजूला फ्लॅट घेतल्यास जर दुसरी इमारत शंभर फुटांपेक्षा कमी अंतरावर असेल तर प्रायव्हसी जपली जाईलच असे नाही. बाहेरच्या बाजूला फ्लॅट घेतल्यास समोरील दुसरी इमारत जास्त अंतरावर जर असेल तर ते प्रायव्हसीच्या दृष्टीने जास्त फायदेशीर ठरते. मात्र ही बाहेरची बाजू जर रस्त्यावर असेल आणि पाचव्या पेक्षा कमी मजल्यावर फ्लॅट असेल, तर रहदारी, प्रदूषण, धूळ, गोंगाट, आवाज यांचा सतत त्रास होऊ शकतो.

बिल्डर केवळ खालच्या दोन-तीन मजल्यावर आणि वरच्या दोन-तीन मजल्यावरच फ्लॅट शिल्लक आहेत असे सांगतात, कारण त्यांना सर्वात कमी मागणी असते. आणि ते त्यांना लवकर विकायचे असतात. मधल्या मजल्यावरचे फ्लॅट तसेही विकले जातातच. तेव्हा मला अमुक मजल्यावर अमूक दिशेलाच फ्लॅट असेल तर हवा आहे असे सांगितल्यास आणि खरोखर शिल्लक असल्यास बिल्डर तो उपलब्ध करून देऊ शकतो.
बऱ्याचशा प्रोजेक्टमध्ये साधारण 30 टक्के फ्लॅट जमीनमालकाचे असतात. (जॉइंट वेंचर). एवढे सगळे फ्लॅट जमीन मालक स्वतः वापरू शकत नाही किंवा सगळे स्वतः भाड्याने देऊ शकत नाही. त्याला ते विकावे लागतात. मग ते एकतर बिल्डरकरवी किंवा एजंट करवी विकावे लागतात. बिल्डर आधी स्वतःचे फ्लॅट विकतो आणि त्यानंतर असे जॉईंट वेंचरचे फ्लॅट विकतो. त्यामुळे आपल्याला हव्या असणाऱ्या मजल्यावर आणि दिशेला एखादा फ्लॅट शिल्लक असेल तरीही बिल्डर तो आपल्याला दाखवेलच असे नाही.

रहिवासी इमारत आणि व्यावसायिक बांधकाम शक्यतो स्वतंत्र असावे. रहिवासी इमारतीच्याच तळमजल्यावर दुकाने, गाळे, व्यवसाय इत्यादी असल्यास त्याचा त्रास केवळ खालील मजल्यावरच नाही, तर अगदी शेवटच्या मजल्यापर्यंत ही होऊ शकतो.

कायदेशीर गोष्टींच्या बाबतीत जर बिल्डर नावाजलेला असेल आणि तज्ञ वकिलाने अशा गोष्टींचा निर्वाळा दिला, तर इतर गृह कर्ज देणाऱ्या संस्थांचाही विचार करता येऊ शकतो. विशेषतः जर त्या प्रकल्पाचा tie-up एसबीआय सोबत असेल, तर बाय डिफॉल्ट कायदेशीर सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत असे धरून चालायला हरकत नाही.
व्याजदर ०.५% पर्यंत कमी असू शकतो ज्याचा दीर्घकालीन आर्थिक फायदा खूप होतो.

हडपसरच्या पूर्वेला शापूर्जी पालनजी चा जॉयविल नावाचा प्रकल्प आहे. तेथील २bhk चे चटई क्षेत्र ५५० स्क्वे फूट पासून सुरू होते. किंमत तीन वर्षांच्या मेंटेनन्ससहित ५७-६० लाख. त्याच्याच अलीकडे ५-१० वर्षे जुने ७००-७५० स्क्वे फूट चटई क्षेत्र असणारे २bhk फ्लॅट्स ५० लाखात येतात. पण अशावेळी नवा की जुना, साधी सोसायटी की मोठी टाऊनशिप असे निर्णय घेताना व्यवहार विरुद्ध हौस असे द्वंद्व नेहमीच असते.

मुलांची शाळा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पाच-दहा-पंधरा किलोमीटर वरील भारी शाळेपेक्षा चालत जाण्याच्या अंतरावर असलेली बरी किंवा चांगली शाळा हा जास्त चांगला पर्याय आहे. हे अर्थातच वैयक्तिक मत. आपण आपल्या नोकरी व्यवसायासाठी दोन चार पाच किलोमीटरचा प्रवास अधिक करू शकतो परंतु शाळकरी मुलांना तो प्रवास रोजच्या रोज करणे थकवणारे असते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Aug 2023 - 10:18 pm | राजेंद्र मेहेंदळे

तज्ञ लोकांनी वर अनेक मुद्दे कव्हर केलेच आहेत, पण माझ्या मते
१. रेराचे फायदे असले तरी त्यामध्ये फ्लॅटचे क्षेत्र वॉल टू वॉल धरले जाते, त्यामुळे फ्लॅट छोटे वाटतात उदा. नवीन ५०० चौ.फू मधील बेडरूम ही १०-१५ वर्षे जुन्या ५०० चौ.फू. फ्लॅट पेक्षा लहान वाटते/असते.
२. रेरामुळे बराचसा वचक आलेला असला तरी बिल्डर आर्थिक अडचणीत आल्यास पझेशन लांबणे होउ शकते.
३. नवीन फ्लॅटचा मेंटेनन्स सहसा जास्त असतो, त्यतही गार्डन्/जिम/पूल वगैरे असेल तर अजुन जास्त.

वरील बाबी विचारात घेता १०-१५ वर्षे जुना रेडी पझेशन- फ्लॅट बघावा. वकीलाकडुन ३० वर्षाचा सर्च रिपोर्ट काढुन घ्यावा (टायटल क्लिअर आहे ना बघावे.)
शक्यतो ५ मजल्यापासुन १० मजल्यापर्यंत घ्यावा. मेन रोड ला लागुन नको. खाली दुकाने नकोत. टाउनशिप असेल तर सुरक्षेच्या दृष्टीने बरे राहील. पण मोठी ५०-७० फ्लॅटची बिल्डिंग असेल तरी चालेल. मुख्य पाणी २४ तास आहे ना बघावे.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Aug 2023 - 9:41 am | अमरेंद्र बाहुबली

सौंदाळा, राघव, कर्नल साहेब, चित्रगूप्त, तुका सर, राजेंद्रजी आपल्या सर्वांच्या बहुमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद. बर्याच गोष्टी क्लिअर झाल्यात. खुप खुप आभार.

विजुभाऊ's picture

29 Aug 2023 - 12:02 pm | विजुभाऊ

माझ्या एका मित्राच्या सोसायटीत ;समोरच्या बिल्डींगमधे करीना कपूरने फ्लॅट घेतला आहे या कारणास्तव फ्लॅटच्या दरामधे वाढ झाली होती.
एजंट लोक करीना कपूर हा मुद्दा हायलाईट करून प्रत्येकाला सांगायचा.

छान ! करीना चे कपडे गॅलरीत सुकताना पाहायला मिळतील अशी अपेक्षा ठेवली असेल लोकांनी कदाचित .

मी लक्षांत ठेवलेले मुद्दे :

१. फ्लॅट कधीही टॉप फ्लोर वर घेऊ नये , पावसांत गळू शकतो.

२. जास्त खाली सुद्धा नको, मच्छर वगैरे येतात.

३. लिफ्ट किती मोठी आहे ती पाहावी जरुरी पेक्षा छोटी वाटली तर घेऊ नये.

४. आग दुर्घटनेच्या दृष्टिकोनातून बिल्डर ने काय काळजी घेतली आहे ते पाहावे, तिथे कमी काळजी घेतली असेल तर इतर ठिकाणी सुद्धा विविध कॉर्नर्स कट केले असतील असे समजावे.

५. बरोबर एक चेंडू नेवून बाथरूम मध्ये ठेवावा. तो घरंगळत ड्रेनेज कडे गेला पाहिजे.

६. तुम्ही AC वगैरे वापरणार नसाल तरी पॉईंट ठेवला आहे कि नाही ते पाहावे.

७. बिल्डिंग मधील इतर लोकांची नावे पाहावीत, जात धर्म वगैरे लक्षांत घ्यावा. बहुतेक लोक एकाच समुदायांतले असले आणि आपण त्यातील नसाल तर त्रास होऊ शकतो. एक तर आपला समुदाय पाहिजे नाहीतर डायव्हर्सिटी असली पाहिजे.

८. बिल्डिंगमधील लोक तरुण असली तर चांगले, म्हातारी मंडळी चोंबडेपणा फार करतात.

९. आजूबाजूला शाळा कॉलेज काय आहेत हे आधीच पाहावे. तुम्हाला गार नसली तरी भविष्यांत भांड्याला देताना फायदेशीर ठरू शकतो.

१०. बिल्डिंग मधील कॉमन एरिया किती चांगली आहे ह्यावरून कॉलोनीची एकूण संस्कृती कळते.

११. शक्य असेल तर लोकांना इलेट्रीसिटी बिल किती येते असे विचारा. कचरा व्यवस्थापन सुद्धा महत्वाचे आहे.

१२. टाईल्स किती चांगले बसवले आहे हे पाहण्यासाठी अनवाणी चालून पहा. विशेषतः कॉर्नर्स कडे पहा. स्कार्र्टिंग कडे लक्ष द्या.

बांधकामाचा एक प्रिन्सिपल आहे. समजा बिल्डर ने एक ठिकाणी कॉर्नर कट केला असेल तर तो अनेक ठिकाणी सुद्धा केला असेल. प्लम्बिंग खराब आहे तर इलेक्रीटीक काम सुद्धा खराब असू शकते.

छान ! करीना चे कपडे गॅलरीत सुकताना पाहायला मिळतील अशी अपेक्षा ठेवली असेल लोकांनी कदाचित .

इतकी(च) साधी अपेक्षा असेल असे प्रथमदर्शनी वाटत नाही. :-))

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 Aug 2023 - 2:17 pm | राजेंद्र मेहेंदळे

चेंडू ऐवजी १ ग्लास पाणी ओतले तर?

कदाचित चेंडू ला वेग मिळेल ईतका उतार नसेल, पण पाण्याल वेग मिळु शकेल.

बाकी करीनाच्या मुद्द्यावर गविंशी सहमत!!

पाणी बरोबर नेणे जास्त अवघड आहे, बाथरूम सोडून इतर ठिकाणी उदा किचन काऊंटर, गॅलरी, वॉशिंग मशीन एरिया इत्यादी ठिकाणे पाणी ओतणे कदाचित विकणाऱ्याला आवडणार नाही. मी नेहमी गोल्फ बॉल वापरते.

https://www.apartmenttherapy.com/bring-golf-ball-to-open-house-36994080

चौथा कोनाडा's picture

4 Sep 2023 - 5:41 pm | चौथा कोनाडा

उतार तपासण्यासाठी बॉलची आयडिया भारी आहे.

चौथा कोनाडा's picture

4 Sep 2023 - 5:42 pm | चौथा कोनाडा

८. बिल्डिंगमधील लोक तरुण असली तर चांगले, म्हातारी मंडळी चोंबडेपणा फार करतात.

वादग्रस्त मुद्दा वाटतोय !

या वर वेगळा धागा काढावा ही मैत्रीपुर्ण सुचवणी !

चित्रगुप्त's picture

5 Sep 2023 - 2:19 am | चित्रगुप्त

बिल्डिंगमधील लोक तरुण असली तर चांगले, म्हातारी मंडळी चोंबडेपणा फार करतात.
-- वादग्रस्त मुद्दा वाटतोय ! या वर वेगळा धागा काढावा ही मैत्रीपुर्ण सुचवणी !

-- मलाही हे जरा विचित्र वाटले होते. फक्त म्हातारेच जिथे रहातात अशी वसाहत म्हणजे वृद्धाश्रम. तिथे फ्लॅट घेण्याचा प्रश्नच नाही. बाकी जनरल वसाहतींमधे म्हातारे लोक, लहान मुले वगैरे असणे चांगलेच असते. रिटायर म्हातार्‍या लोकांचे वसाहतीत काही गैर प्रकार तर होत नाही ना यावर लक्ष असते. त्यांच्यासाठी लहान मुले बागडत आहेत, सणावाराला स्त्रिया पैठण्या वगैरे घालून मिरवत आहेत ... वगैरे बघणे खूपच दिलासादायक असते. अजून तरी भारतात अमेरिकेसारखे झालेले नाही हे चांगलेच आहे.
बाकी ज्या तरुणांना फ्लॅट घ्यायचे असतील त्यांनी आई-वडिलांची रवानगी वृद्धाश्रमात करून मग स्वतःसाठी तरूण लोकांच्या सोसायटीत रहायला जावे, असा याचा अर्थ असेल तर ते दुर्दैवी आहे.

समोरच्या बिल्डींगमधे करीना कपूरने फ्लॅट घेतला आहे या कारणास्तव फ्लॅटच्या दरामधे वाढ झाली होती.

हे वाचून "कुणाला कशाचं तर रंडकीला केसांचं" ही म्हण आठवली.

देवा ! म्हातार्‍या-कोतार्‍यांचे कपडे पाहताना काय लोकांना आनंद होतो कोणास ठाऊक ?

चौकस२१२'s picture

30 Aug 2023 - 6:41 am | चौकस२१२

इमारतीचा विमा ? या याबद्दल कोणीच काही उल्लेखित नाही ?

सर टोबी's picture

30 Aug 2023 - 9:27 am | सर टोबी

शाळेत जाणारं मूल घरात असेल तर चालत जाता येईल इतकी शाळा जवळ असण्यासारखं सुख नसतं. मुलं सहसा कोणत्या न कोणत्या कारणाने रात्री उशिरा झोपतात. अशा वेळेस सकाळी त्यांना उठविणे हा खरेच एक दुःखद प्रकार असतो. शाळा लवकरात लवकर केव्हा उघडावी याचा बहुदा मुलांच्या दृष्टिकोनातून विचारच केलेला नसतो. मन आणि आरोग्य संवर्धनासाठी प्रातःकाल चांगला या विचाराचं जोखड जेव्हा उतरेल तो सुदिन. असो.

तर अशी हि, गरज असू पर्यंत चांगली वाटणारी संस्था कायमस्वरूपी मात्र कटकट वाटू शकते. शाळेजवळ असणारी व्हॅन्सची गर्दी, मुलांना शाळेत सोडणाऱ्या पालकांकडून होणार उपद्रव, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तयारीचा गोंगाट, कला आणि खेळ यांच्या क्लासेसचा उशिरापर्यंत चालणारा सराव या सर्वांचा त्रास आपण शिक्षण म्हणजे उदात्त कार्य या नावाखाली सहन करीत असतो.

बरेचदा वाचनमात्र असतो पण जिव्हाळ्याचा विषय असल्याने सविस्तर प्रतिसाद देतोय

१)बरेच फ्लॅट हे दोन ते तीन वर्ष पूढे ताब्यात मिळनारेत. त्यातही खुप कमी शिल्लक आहेत असे बिल्डर सांगतात. ते खरे की खोटे ते कळून येत नाही. शिल्लक म्हणजे एकतर सर्वात वरचे दोन मजले किंवा पहील्या दोन मजल्यांवर. ह्या दोन्ही मजल्यांत काही तोटे असतात का? असतील तर काय? खालच्या मजल्यांवर लोक का फ्लॅट घेत नाहीत?

फ्ललोर राईस हि संकल्पना माहित असल्यास हि शंका येणार नाही . वरच्या माळ्यावरून परिसर दृश्य (View ) चांगला मिळतो , पण हे बिल्डिंग कोणत्या परिसरात आहे यावर अवलंबून आहे. पहिले दोन माळे हे मोठ्या टॉवरमध्ये सहसा कोणी घेत नाही वरील सबबीमुळं. शक्यतो फ्लॅट हा माझ्या हिशेबाने ४-७ माळ्यापर्यंत घ्यावा , अडीअडचणीच्या काळी पायऱ्या उतरू शकता. आजकाल मुंबईत पहिले दोन मजले हे वाहनतळ असतात त्यामुळे ३-४ था माळा असा उल्लेख केला. पहिले दोन माळे हे व्यावसायिक कारणासाठी भाड्याने जात असल्याने शेजार बघून निर्णय घ्यावा. जास्त उंचावर गेलात तर हवेचा प्रॉब्लेम होतो . जबरदस्ती खिडक्या बंद ठेवाव्या लागू शकतात.

२) रोडटच फ्लॅट नी थोडे आतले फ्लॅट ह्यात काय फायदे तोटे असतात?
व्यक्तिशः मला रोड टच आवडतो , पण धूळ व आवाजाचा प्रॉब्लेम येतो , फ्लोअर कितीही वरचा असला तरी आवाजाची तीव्रता कमी होत नाही .

३) फ्लॅट घेताना काय काय पहायला हवे जेणेकरून फसवणूक होऊ नये?
रेरा नि संबंधित शासकीय संस्थेची मंजुरी . लोन घेणार असाल तर sbi वा hdfc चे त्या बिल्डिंग मध्ये कोणाचे लोन झाले असल्यास चौकशी करावी. शक्यतो फ्लॅट ज्याचे इंटिरिअरचे काम चालू आहे म्हणजे पझेशन जवळ चा घ्यावा . थोडा महाग वाटलं तरी चालेल पण जे दिसेल ते खरेदी करावे सॅम्पल फ्लॅट नि बिल्डर रेप्युटेशन वर भरवसा ठेवू नये . गोदरेज नावाचा फायदा घेउन प्रीमियम घेतो पण प्रोजेक्ट उशीर ला ब्रँड कामी येत नाही . बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल हा हिशेब ठेवावा

४) बिल्डींगची कामाची क्वालीटी कशी चेक करावी? मी सिवील इंजी. नाही. म्हणून मग बोंबाबोंब.

आजकाल अनेक agency हे काम करून देतात. ५-१० हजार ५० लाखाच्या फ्लॅटसाठी खर्च करण्यास हरकत नसावी . पण बिल्डरकडून घेताना खरेदीपत्र हे त्याच्या बाजूने असते त्यामुळे जे पदरी पडेल ते गोड मानणे . यासाठी फ्लॅट पैंटिंग वा लाद्या बसवण्याच्या स्टेज ला घ्यावा .

५)स्वतः जागा मालक डेवलपर असेल तर फ्लॅट घेऊ नये कारण सोसायटी फोर्म होताना प्रोब्लेम येतो असा एकाने सल्ला दिला. ते कितपत खरं?

हे जागा मालकावर अवलंबून आहे तो पांढरपेशा असल्यास हरकत नसावी पण गळ्यात चार चेन नि gunman घेऊन फिरणाऱ्या माणसाकडून काय प्रॉब्लेम होऊ शकतो हे अनुभवानेच कळेल .

६)बिल्डींग रोड टच असेल तर रोडटच भागातील फ्लॅट चांगला की मागच्या बाजूचा?

मी पर्यावरण अभियंता आहे त्यामुळे पाऊस पाणी उन वाऱ्याचा त्रास पाहून निर्णय घेतो, तुम्ही पण तो पाहून घ्यावा.हा निर्णय अंडर construction स्टेज ला सोपा नाही , तो अनुभवानेच घेता येतो. वास्तुशास्त्र मानत असल्यास त्याप्रमाणे सल्ला घ्या .

७) कायदेशीर दृष्ट्या कोणत्या गोष्टी जोखाव्यात?

लोन घेत असल्यास लगेच लोन मिळते पण कुठल्याही बँकेतून लोन घेऊ नका . sbi वा hdfc are गुड. OC ni CC असल्यास निर्धास्त व्हा . पण हा निर्धास्तपणा फार कमी लोकांच्या वाट्याला येतो कारण बिल्डर चा मेन बिझिनेस हा टोपी लावणे नि काळ्याचे पांढरे करणे हा असतो , घराला घरपण देणे वगेरे बाता असतात . title चेक वकिलाकडून ५-१० हजारात केल्यास जमिनीची संपूर्ण माहिती मिळते . जर लोन घेणार नसाल तरी ३-४ बँक मध्ये चौकशी करा , कारण प्रत्येक ठिकाणच्या अडीअडचणी वेगळ्या स्वरूपाच्या असतात. अनधिकृत बांधकाम, OC नसणं , गावठाण वा ग्राम पंचायतीची जागा हजार भानगडी असतात .

८)म्हाडाच्या लोटरीत घर बघावे असेही काहींनी सांगीतले. पण स्वस्त घराच्या बाजूला तसेच लोक येतात./तसेच कामाची क्वालीटी बोंबलते असेही काहींनी सांगीतले.

तुम्ही गुंतवणुकीसाठी घर घेत असाल तर म्हाडा वा सिडको लॉटरी बेस्ट . कायदेशीर बाबी बाबत चिंता नसते कारण सरकारी प्रकल्प . लोडींग कमी सोयी सुविधा हे तुम्ही कुठल्या लोटरिला apply करता यावर असते . म्हाडा चा उच्च उत्त्पन्न गटातील फ्लॅट मुंबईत ७. ५ करोडचा होता

९)काहींना सॅंपल फ्लॅट बनवून ठेवलेत काहींनी नाही. त्याचा काही फरक पडतो का?

सॅम्पल फ्लॅटवरून जागेचा अंदाज घ्या निर्णय नाही . सोयी सुविधा पाहून लोक भुलतात

१०) रोडटच बिल्डींग असेल तर भविष्याच्या दृष्टीने काही फायदा असतो का?

मेन रोड ला लागून असेल तर होऊ शकतो . रोड प्रत्यक्षात आल्याशिवाय व दृष्टीपथात असल्याशिवाय फायदा तोटा ठरवा . राजकारणी हिशेबाने अँप्रोव्हड प्लॅन बदलतात , पस्तावण्यापेक्षा थोडा चढ रेट द्यावा

गुंतवणुकीसाठी फ्लॅट बिलकुल घेऊ नये या मताचा मी आहे , आपल्याकडे रोख रक्कम असेल तर ठीक अन्यथा होम लोन घेऊन गुंतवणूक करणे हे सुज्ञाचे लक्षण नाही या मताचा मी आहे . २००४-१०१३ सारखे प्रॉपर्टी रेट आता वाढणे अशक्य आहे , मी स्वतः covid चा फायदा उचलत मोठा फ्लॅट घेतला राहण्यासाठी , गुंतवणुकीसाठी नाही. तत्सम संधी मिळाल्यास गुंतवणूक करा अन्यथा मोह टाळा .

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Aug 2023 - 6:22 pm | अमरेंद्र बाहुबली

माझा एक जांगडगूत्ता झालाय. माझी चूकी नसूनही एक्सीस बॅंकेने माझा सीबील स्कोर डॅमेज केलाय. ३ चे १३ हजार झालेत लेट फी वगैरे धरून. आता होमलोन वाल्या बॅंक सीबील स्कोर ६७० चा पाहून काहीबाही टक्के लोन सांगताहेत. काय करावे ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडायला?

तुषार काळभोर's picture

31 Aug 2023 - 7:41 pm | तुषार काळभोर

किमान दोन बुडीत अथवा थकीत कर्जे (कर्ज किंवा क्रेडिट कार्ड) असतील तर इतका वाईट स्कोर होतो. ६७० ला महाग का होईना गृहकर्ज मिळतंय हीच मोठी गोष्ट आहे! व्याजदर किमान ९.५ असेल. कदाचित १०.५ ते ११ ही असू शकतो.

आणि क्रेडिट स्कोअर फार पटकन कमी होतो आणि फार सावकाश वाढतो.
६७४ वरून ७४९ वर यायला मला आठ वर्षे लागली होती.

वाढवण्याचे पर्याय - सिबिल रिपोर्ट मध्ये जर काही थकीत कर्जे दिसत असतील तर ती फेडून बंद करणे. बँकेकडून तसे रीतसर लिहून घेणे. ते सिबीलला दिल्यास ते ऋण गुण धन होतात आणि स्कोअर सुधारतो. आधीच बंद केली असल्यास, बँकेशी इमेल अथवा पत्रव्यवहार करून त्यांच्याकडून कंफर्मेशन घ्यायचे आणि ते सिबीलला कळवयचे. याने काही महिन्यांत ७००-७२५ दरम्यान स्कोअर जाईल. पण याला ६-९ महिने लागू शकतात. त्यानंतर ९.५% व्याजदर मिळू शकतो.

महाग कर्ज घेऊन नंतर क्रेडिट स्कोअर सुधारल्यास बँका कर्जदर कमी करतात.

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Aug 2023 - 8:09 pm | अमरेंद्र बाहुबली

एकच होतं क्रेडीट कार्ड बील. तेही तीन साडे तीन हजार होतं. एक्सीस बॅंकेच्या सर्वर डाऊन मूळे जानेवारी २२ चं पेमेंट झालं नव्हतं. त्यानी मलाच लेट फी लावली. मग मी त्यांचे पूढील महाने थकवले.

जानेवारी बावीस ते आतापर्यंत क्रेडिट कार्ड बिल थकवून तरीही स्कोअर बराच उरला आहे असे म्हणावे लागेल.

आपण असे पेमेंट थकवून बँकेला कोणताही धडा मिळत नसतो. उलट आपल्याच स्कोअर वर अत्यंत विपरीत परिणाम होतो.

आपल्याला कधीही कर्ज लागण्याची शक्यता असेल तर पत दर्शक स्कोअर सांभाळणे आवश्यक आहेच.

हरकत नाही. अनेकदा आपल्याला दीर्घकालीन परिणाम दिसत नाहीत. आता लक्षात आले आहे तर पूर्ण रक्कम विना तडजोड भरून टाका. (अधली मधली तडजोड रक्कम भरून कार्ड बंद करून टाकणे हा मार्ग नव्हे. तो अधिक नुकसानीचा या बाबतीत.

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Sep 2023 - 2:19 pm | अमरेंद्र बाहुबली

एक्सीस बॅंक थकबाकीवर दोन हजार जास्त घेऊन म्हणजे १६००० घेऊन सीबील स्कोर सुधारून देईन म्हणतेय. काय करावे? भरून टाकावेत का?

चौथा कोनाडा's picture

4 Sep 2023 - 5:46 pm | चौथा कोनाडा

परवडणार असेल तर करायला हरकत नाही ,,, पण हे करण्यापुर्वी दोन तीन केस स्टडी करुनच हा मार्ग निवडा.

सुबोध खरे's picture

4 Sep 2023 - 7:50 pm | सुबोध खरे

सिबिल स्कोअर सहज सहजी सुधारत नाही. निदान तीन महिने तरी लागतातच.

माझी कोणतीही मागणी नसताना एन के जी एस बी बँकेने मला कर्जाचा मोरॅटोरियम दिला. आणि मी दोन हप्ते आगाऊ भरूनही माझा हप्ता थकल्याची नोटीस पाठवली ज्यामुळे माझा सिबिल स्कोअर फुकटचा ८२५ वरून ८१० आला.

मी बँक मॅनेजरची चांगलीच खरडपट्टी काढली यानंतर याबद्दल बँकेने मला माफीचे पत्र देऊन त्याची कॉपी सिबिल कडे पाठवूनही सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी तीन महिने लागले.

ऍक्सिस बँकेतून जो कोण माणूस २ हजार रुपये अतिरिक्त भरून सिबिल स्कोअर सुधारण्याची हमी देतो आहे त्याच्या कडून ते लिहून घ्या किंवा तसा नियम असल्यास स्वतः वाचून खात्री करून घ्या.

बहुधा हा तुम्हाला शेंडी लावत असण्याची शक्यता जास्त आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Sep 2023 - 9:47 pm | अमरेंद्र बाहुबली

हो डोक्टर साहेब. त्यांनी तसं लिहून दिलंय. हे पहा पत्र.
https://ibb.co/WpGPqW9

अनन्त अवधुत's picture

5 Sep 2023 - 12:38 am | अनन्त अवधुत

तुम्ही पैसे भरल्यावर तसे पण ते कार्ड नॉर्मल रिपोर्टिंग होऊन तुमचा सिबील स्कोअर वाढेल, त्यात काही शंका नाही.
पण कार्ड क्लोज केल्यावर ते कार्ड पुढचे तीन वर्षे तरी ते लेट पेमेंट/ नो पेमेंट तुमच्या सिबील रिपोर्ट वर दिसत राहील. त्यामुळे स्कोअर वाढला तरी, प्रत्येक वेळेस सिबील रीपोर्टचे तुम्हाला स्पष्टीकरण द्यावे लागेल.

तुम्हाला जे पत्र आलय त्यात सिबील स्कोअर मधे लेट पेमेंट्स दिसणार नाहीत असे काही आहे का? वा त्या अनुषंगाने क्रेडिट ब्युरोकडे काही करता येते का ते पहा.

माझा अनुभव: मी २००६ साली एसबीआयचे कार्ड काढले. कार्ड घेताना ते लाईफटाईम फ्री असेल असे सांगीतले होते,पण नंतर त्यांनी वार्षीक फी आकारली म्हणून ते कार्ड २००८ साली बंद केले.

लाँग स्टोरी शॉर्ट, २००८ ते २०२२ माझ्याकडे माझा भारतातला फोन नंबर नव्हता. २०२२ मध्ये मला माझा भारतातला नंबर मिळाला.
एका महिन्यात मला एसबीआयचे पेमेंट बाकी असल्याचे मेसेज आले. कस्टमर केअरला फोन लावण्याचे निष्फळ प्रयत्न केले.
त्यादरम्यान माझा बजाज फायनांस कार्डाचा अर्ज कमी सिबील स्कोअर मुळे नाकारला.

एसबीआयची एकंदरीत थकबाकी ३ आकडी असल्याने ती रक्कम मे २०२२ मध्ये भरली. अकाऊंट सेटल झाल्याने स्कोअर वाढला. पण सिबील रिपोर्ट मध्ये एसबीआयचे गेल्या तीन वर्षातले मे २०२२ पर्यंतचे सगळे पेमेंट्स मिसींग दाखवत आहे.

त्यामुळे मे २०२५ पर्यंत हे मिसींग पेमेंट्सचे रीमार्क, माझ्या सिबील स्कोअरला धक्का देत राहणार.

सुबोध खरे's picture

5 Sep 2023 - 9:42 am | सुबोध खरे

यात दोन हजार "जास्त" कशाचे हे त्यांनी काहीच लिहिलेले नाही

याशिवाय ४५ दिवसपर्यंत निल बॅलन्स पत्र देण्यासाठी लागणार.

हे पत्र सिबिल मध्ये पाठवल्यावर त्यावर ते कार्यवाही करण्यास पुढची तिमाही उजाडणार म्हणजेच आपला सिबिल स्कोअर किमान सहा महिने सुधारणार नाही.

आणि पुढची काही वर्षे तुम्हाला हे पत्र प्रत्येक वेळेस तुम्ही पैसे भरले आहेत आणि निल बॅलन्स आहे याचा पुरावा म्हणून दाखवत राहावे लागणार

अर्थात तुमच्या कडे पर्याय काय आहे?

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Sep 2023 - 10:25 am | अमरेंद्र बाहुबली

अर्थात तुमच्या कडे पर्याय काय आहे?>>
तेच तर. पण देन हजार जास्तीचे भृबन जर सिबील वाढला. नी मला फ्लॅट घ्यायचा असेल तर ७.७५ टक्के पासून कर्ज सुरू होतेय. सिहील खराब असेल तर ९.५ टक्के ने देतय बॅंक.

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Sep 2023 - 10:26 am | अमरेंद्र बाहुबली

अर्थात तुमच्या कडे पर्याय काय आहे?>>
तेच तर. पण दोन हजार जास्तीचे भरून जर सिबील वाढला नी मला फ्लॅट घ्यायचा असेल तर ७.७५ टक्के पासून कर्ज सुरू होतेय. सिबील खराब असेल तर ९.५ टक्के ने देतेय बॅंक.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Jan 2024 - 7:24 pm | अमरेंद्र बाहुबली

कळवण्यास अत्यंत आनंदं होतोय की १६००० रूपये एक्सीस बॅकेच्या थोबाडावर मारल्यानंतर त्यांनी माझा क्रेडीट स्कोर बर्यापैकी सुधारून दिलाय, इतका की ९०० ला भिडत आलाय. मला इतर बॅंकाचे फोन येताहेत की आम्ही तुम्हाला क्रेडीट कार्ड देतो, त्यांना सांगीतलं की “तुमचा बॅंक ना तुमचं क्रेडीट कार्ड दोन्ही चूलीत जाऊद्या.”
क्रेडीट स्कोर फार लवकर सुधारलां :)
नंतर एक्सीस बॅंकेचं अकाऊंट बंदं करायला बॅंकेत तरफडलो ते बंदं करायला त्यांना बराच त्रास दिला १२०० रूपये मागत होते, त्यांच्या रिजनल मॅनेजर ला मेल वगैरे ठोकले तर सगेच ३४ रूपये भरून बंदं केले. शेवटी जाताना ब्रांच ला हात जोडले. साक्षात बाहुबलीला जेरीस आणले हरा**रांनी.

अनन्त अवधुत's picture

31 Aug 2023 - 11:17 pm | अनन्त अवधुत

१)बरेच फ्लॅट हे दोन ते तीन वर्ष पूढे ताब्यात मिळनारेत. त्यातही खुप कमी शिल्लक आहेत असे बिल्डर सांगतात. ते खरे की खोटे ते कळून येत नाही. शिल्लक म्हणजे एकतर सर्वात वरचे दोन मजले किंवा पहील्या दोन मजल्यांवर. ह्या दोन्ही मजल्यांत काही तोटे असतात का? असतील तर काय? खालच्या मजल्यांवर लोक का फ्लॅट घेत नाहीत?
=>हाय राईज इमारतीच्या सर्वात वरच्या १-२ मजल्यांना पावसाचा फार त्रास होतो, शिवाय लिफ्ट बंद असली तर जीन्याचा वापर त्रासदायक ठरू शकतो. अर्थात सगळ्यात वरच्या मजल्यांवरून दिसणारा नजारा मात्र जोरदार असतो.
पहिला मजला नको. पार्किंग मधल्या गाड्यांचा त्रास, धूळीचा त्रास, फार काय इमारतीचे ड्रेनेज तुंबून, पहिल्या मजल्यावरील न्हाणीघर खराब झालेले पाहिले आहे.
पहिल्या मजल्यावर हॉटेल, दुकाने नसतील तर २,३,वा ४ पैकी एका मजल्यावर घर घ्यावे.
पहिल्या मजल्यावर हॉटेल, दुकाने असतील तर शक्यतोवर तीथे फ्लॅट घेऊ नका.
५ ते ८ मध्ये घर घेण्यात फार हशील नाही, फ्लोअर राईज मुळे किंमत वाढते, बाकी विशेष असा काही फायदा नाही.

'दोन ते तीन वर्ष पूढे ताब्यात मिळनारेत' हा रिस्क फॅक्टर आहे. अंदाज घेऊन ऊडी मारा. बिल्डर कसा आहे, ज्या सोसायटी मध्ये इमारत आहे तिथे ऑलरेडी इतर इमारती तयार आहेत का असे काही निकष लावू शकता.
रेडी पझेशन वा नीअर पझेशन हे योग्य.

२) रोडटच फ्लॅट नी थोडे आतले फ्लॅट ह्यात काय फायदे तोटे असतात?
=>थोडे आतले फ्लॅट बरे. हमरस्ता ते फ्लॅट ह्यात एखादे तरी डेली नीड्स चे दुकान असते जे आपली दूध, भाजी वगैरे आपात्कालीन गरज भागवू शकते.

३) फ्लॅट घेताना काय काय पहायला हवे जेणेकरून फसवणूक होऊ नये?
=> रेरा नोंदणी, एस्बीआयचे कर्ज , आणि वकिलाचा सल्ला कागदपत्रांसाठी.

४) बिल्डींगची कामाची क्वालीटी कशी चेक करावी? मी सिवील इंजी. नाही. म्हणून मग बोंबाबोंब.
=>रेडी पझेशन घर असेल तर इतर रहीवाशांकडून माहीती मिळू शकेल.

५)स्वतः जागा मालक डेवलपर असेल तर फ्लॅट घेऊ नये कारण सोसायटी फोर्म होताना प्रोब्लेम येतो असा एकाने सल्ला दिला. ते कितपत खरं?
=>माहीती नाही.
६)बिल्डींग रोड टच असेल तर रोडटच भागातील फ्लॅट चांगला की मागच्या बाजूचा?
=>रोडटच भागातील फ्लॅटमध्ये राहणारे व्यवस्थीत नसतील, तर घरातला सगळा गचाळपणा रस्त्यावरून दिसतो.

७) कायदेशीर दृष्ट्या कोणत्या गोष्टी जोखाव्यात?
=> जाणकार वकील हेच योग्य ठरतील.

उन्मेष दिक्षीत's picture

1 Sep 2023 - 12:57 am | उन्मेष दिक्षीत

फक्त ऐपत पहावी

बाकीचे विचार करत बसु नये , आपल्याला आवडला कि नाही हे पटकन कळते, क्लिक होते !

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Sep 2023 - 2:58 am | अमरेंद्र बाहुबली

सर रेडी फ्लॅट असेल तर नक्कीच पण अंडर कन्स्ट्रक्शन कसा कळनार?

उन्मेष दिक्षीत's picture

1 Sep 2023 - 1:13 pm | उन्मेष दिक्षीत

च म्हणतोय

बाकीचे विचार करत बसु नये , आपल्याला आवडला कि नाही हे पटकन कळते, क्लिक होते !

-- हे बूट, रुमाल, साडी, टेबल वगैरे वस्तू घेतानाच्या बाबतीत ठीक असले तरी घर घेताना अनेक बाबी विचारत घेणे अतिशय आवश्यक असते. रक्कम खूप मोठी असते, वर्षानुवर्षे कर्जाचे हप्ते भरणे हा जन्मभराचा मामला असतो, कुटुंबातील सर्वांचीच सोय, सुरक्षितता, हवा-उजेड-पाणी, बांधकामाचा दर्जा अश्या अनेक गोष्टींखेरीज कोणत्याही प्रकारे फसवणूक तर होत नाही ना, याची खात्री करून घेणे गरजेचे असते. या धाग्यावर अनेक जाणकारांनी उत्तम प्रतिसाद दिलेले आहेत, ते यासाठीच.

उन्मेष दिक्षीत's picture

5 Sep 2023 - 3:24 am | उन्मेष दिक्षीत

तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात त्या माहीत नसतात का आपल्याला ऑलरेडी? विचार करायची गरज आहे का त्या बाबतीत?

लग्न करताना विचार करण्यासारखी गोष्ट झाली ही!

'क्लिक' होणे येवढेच पुरेसे आहे का ?

तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात त्या माहीत नसतात का आपल्याला ऑलरेडी?

'ऑलरेडी' म्हणजे व्यवस्थित चवकशी केल्यावर, गरज पडल्यास वकिलाचा सल्ला घेतल्यावर ना ? की ते आपल्याला 'क्लिक' होताना आपोआपच समजते ?

उन्मेष दिक्षीत's picture

5 Sep 2023 - 12:11 pm | उन्मेष दिक्षीत

तेव्हढेच पुरेसे आहे.

मी एका प्रोजेक्ट मधे फ्लॅट घेता घेता चेक द्यायच्या वेळी प्लॅन कॅन्सल केला. आणि दुसर्या मधे एकंदर सगळं बघुन जास्त विचार न करता लगेच घेतला. इन्स्टिंक्ट्स फार महत्वाचे असतात बघा.

वकील वगैरे काय भानगड नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Sep 2023 - 2:57 am | अमरेंद्र बाहुबली

गवि, तूका, अवधूत साहेब माहीतीबद्दल धन्यवाद.

चावटमेला's picture

4 Sep 2023 - 6:43 pm | चावटमेला

रेडी पझेशनच घ्या, कितीही नावजलेला बिल्डर असला तरी, कधी कुठे माशी शिंकेल आणि प्रोजेक्ट रखडेल ह्याचा नेम नाही. मनःशांती महत्वाची. बांधकाम व्यवसायात बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल हाच नियम बाळगावा

सुबोध खरे's picture

5 Sep 2023 - 9:47 am | सुबोध खरे

रेडी पझेशनच घ्या, कितीही नावजलेला बिल्डर असला तरी,

बाडीस

मुक्त विहारि's picture

4 Sep 2023 - 8:53 pm | मुक्त विहारि

खूप रहदारी असलेला फ्लॅट नको

मंदिर आणि शाळा जवळ असलेला फ्लॅट नको

सार्वजनिक गणपती किंवा नवरात्र उत्सव साजरा करणारे जवळपास नको

सभा भरवणारे मैदान जवळपास नको

पाण्याची बोंबाबोंब असलेला फ्लॅट नको

शेजारी भांडकूदळ नको

लहान मुलांचे हाॅस्पीटल समोर किंवा बाजूला नको

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, राजकीय पक्षाचे कार्यालय जवळपास नको ..... ध्वनी प्रदूषण, हे सगळेच जण करतात...

-------

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Sep 2023 - 9:48 pm | अमरेंद्र बाहुबली

व्वाह. ह्या बाबतीत विचारच
केला नव्हता. एकंदरीत मिपाकरांच्या सल्ल्याने मी आता बारीक बारीक गोष्टींचे निरीक्षण करतोय.

मुक्त विहारि's picture

4 Sep 2023 - 10:09 pm | मुक्त विहारि

मंगल कार्यालय, जवळ असलेला फ्लॅट नको

समोर, चहाची टपरी असलेला किंवा पानाची गादी असलेला फ्लॅट नको ....

.....

शक्यतो, दोन ते तीन वर्षे, भाड्याने घर बदलत रहा

योग्य तो फ्लॅट नक्कीच मिळेल

------

बाकी, घर कुठेही घ्या पण, ते घर साऊंड प्रूफ करून घ्या.... निरव शांतता, ही एक परी कल्पना आहे

खिडकी साऊँडप्रूफ करणे यासाठी खर्च अवाढव्य आहे. दोन खोल्यांचा तीन लाख पर्यंत

मुक्त विहारि's picture

8 Sep 2023 - 8:30 pm | मुक्त विहारि

पण,

50-60 लाख जर घरातच जाणार असतील तर, ही रक्कम 5%च आहे

मी फ्लॅट घेण्यासाठी एका वकिलाकडे सल्ल्यासाठी गेलो होतो. ते दोघे होते आणि जोडीने त्यांनी वकिली सुरू केली होती. माझ्याच वयाचे तिशीचे होते. योगायोगाने ते चांगले निघाले. चांगले म्हणजे सल्ला देण्यास उत्सुक. वकील लोक स्वतः काही धंदा ठरवून घेतात. कुणी फौजदारी,सिविल,मालक_भाडेकरू,सोसायट्या,जमीन फ्लॅट खरेदी करार,व्यापारी करार, कॉपीराइट, आर्थिक दावे,कंपनी-कामगार,मृत्युपत्रे,टॅक्स आणि जीएसटी खटले ,वारसाहक्क आणि वाटण्या इत्यादी.

तर सांगायचे म्हणजे खटला केस घेणे वेगळं आणि वकिली सल्ला आगावू देणं वेगळं काम असतं. जमीन फ्लॅट खरेदी यासाठी कागदपत्रे पाहून सल्ला देण्याची फी ०.५% चेकने घेतात. त्यांनी सांगितले की तुझ्या बजेट प्रमाणे चार पाच फ्लॅट पाहून ये आणि मग त्यात कोणता बरा वाटेल आम्हाला तिथं येऊन त्यांची फाईल पाहून घेणे/न घेणे/त्रुटी/धोके सांगेन. त्याप्रमाणे केले.

काही जमीन मालकी किंवा नवीन बिल्डर झालेले असे असल्यास त्यांनाही कळून जाते आपल्यात काय दोष आहेत. तसेच झाले. आमच्या बिल्डर भागीदारांत शेवटचे पंधरा टक्के काम बाकी असता भांडणे झाली. मी वकिलाला ही माहिती सांगितली. त्याने लगेच सल्ला दिला की त्यांच्याकडे जाऊन "मला कराराप्रमाणे पैसे मिळाले आहेत,ताबा देत आहे असे सही शिक्क्याने लिहून घ्या" मग भांडत बसा पैशाचा हिशोब करत. ती सूचना बिल्डर भागीदारांना पटली व त्यांनी तसे लिहून दिले. आम्ही सर्व मेंबर कागदोपत्री मुक्त झालो व राहिलेले काम करवून घेतले. सोसायटीही करून टाकली.

एक सावधानता - ज्या इमारतींमध्ये केवळ 'सेकंड होम गुंतवणूक' करणारे अधिक असतील त्यांची सोसायटी पुढे चालवणे फार त्रासदायक होते . वसुली,मिटींगा होत नाहीत.

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Sep 2023 - 9:49 pm | अमरेंद्र बाहुबली

खुप बहूमूल्य सल्ला कंकाका. _/\_

प्लॉट हुडकण्या/घेण्यासाठी विविध प्रयत्न-खटाटोप करणे, घरासाठी अनेक नकाशे स्वतः बनवून त्यानुसार घर बांधणे, त्याची निगा, दुरुस्ती, विविध सरकारी भानगडी हे सगळे करून मग तीस वर्षांनंतर ते विकणे वगैरे सगळ्या अवस्थांमधून पार झाल्यावर आता या विषयात लक्ष घालण्याची गरज राहिलेली नसली, तरी अजून ते सगळे रोचक वाटते, आणि नवनवीन माहिती मिळत राहिली तर चांगलेच वाटते.

नवनवीन माहिती म्हणजे असं की नवनवीन फसवाफसवीचे प्रकार वाढले आहेत. मोठ्या बिल्डरांकडे त्यांचे वकील असतात ते त्यांना उपयोगाचा करार बनवतात. पण प्रत्येक मेंबर एक एकटा तो करार वाचून समजून घेत नाही. एकदा का तो करार सह्या करून नोंद (registered) झाला की पुढे सोसायटी झाल्यावर सगळी कलमे डोक्यावर बसतात. सर्व मेंबर एकत्र फसलेले असतात.

१)गच्ची बिल्डरने स्वतः कडे ठेवलेली असते. तिथे मोबाईलची अंटेना लावून त्यांचे उत्पन्न तो खातो.
----
जिम,लाइब्री, स्विमिंग टँक या सोयी जोपर्यंत बिल्डरकडे ताबा असतो तोपर्यंत छान एकहाती राखल्या जातात. पुढे सोसायटी झाली की सर्वच राजे. मग काय देखरेख,स्विमिंग टँकची परवानगी नियम पाळणे यात हेळसांड सुरू होते. पुस्तके गायब. जिम उपकरणे मोडतात. परदेशी राहणाऱ्या तरुण मुलांनी पालकांसाठी इथे जागा घेतली असेल तर साठ+ वयाचे असे मेंबर या सोयी वापरत नाहीत. मेंटेनन्स मात्र वाढीव भरतात. सुरक्षा रक्षक असलेल्या, मोठे आवार, मुलांसाठी बाग असणाऱ्या मोठ्या सोसायट्या चांगल्या परंतू खर्च वाढतो आणि चोऱ्याही होतात. चोरही सुधारले आहेत.

वीस,चाळीस मेंबरांच्या मिटिंगा आटोक्यात पार पडतात परंतू शंभर ते तिनशे सभासदांचे हेच काम म्हणजे अगडबंब आणि राजकारण.

विअर्ड विक्स's picture

5 Sep 2023 - 9:55 am | विअर्ड विक्स

तुमच्या एकंदर प्रतिसादावरून तुमचा गोंधळ जास्त दिसतोय , पुढील मुद्दे लक्षात घ्या

१. निर्णय पक्का असेल तर सिबिल ने फरक पडणार नाही , NBFC व सहकारी बँकेत जा अर्धा टक्का च्या फरक पडेल पण काम होईल
२. गुंतवणुकीसाठी नि राहावयास घर वेगळया संकल्पना आहेत , गुंतवणुकीसाठी घर घेणार असाल तर भाडे उत्पन्न हवे का भविष्यातील किंमत वाढ यावरून पण फरक पडतो
३. लोन घेऊन गुंतवणूक करण्याआधी होम लोन विरुद्व भाडे वा होम लोन घेऊन गुंतवणूक का करू नये याचे अनेक विडिओ व लेख मिळतील, ते अभ्यासा .

तुमचे घर एक खांबी तंबू आहे ( सिंगल इन्कम असे प्रतिसादातून कळते ). या स्थितीत नोकरी बदल व प्रमोशन झाल्यावर अचानक झालेल्या पगार वाढीने असे विचार मनी येतात असा माझा स्वानुभव आहे . मोह टाळा.

मी स्वतः या स्थितीतून गेलो आहे म्हणून आगाऊ सल्ला .

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Sep 2023 - 11:00 am | अमरेंद्र बाहुबली

तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण घरात “स्वतःचं” घर असावं असा फोर्स सुरूय.

विअर्ड विक्स's picture

5 Sep 2023 - 5:15 pm | विअर्ड विक्स

माझ्या सध्याचा नोकरीचे काही खरे नाही, नोकरी बदलली कि सहा महिने तरी बँक लोन देत नाही वा कंपनीची स्थिती चांगली नाही, जागतिक मंदी अशी एक ना एक अनेक कारणे देणे

शेवटी काय बालहट्ट , राजहट्ट नि ..... यापुढे कोणाचे चालत नाही

कंजूस's picture

5 Sep 2023 - 7:20 pm | कंजूस

Rera असूनही गटांगळ्या. Radius चा चेंबूर प्रोजेक्ट गडबडला. २२मजली आठ मनोरे काम ठप्प. लोकांचे पैसे अडकले. DHFL गुंतागुंत.
नशीब दुसरं काय? कोणाचे चालत नाही.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

6 Sep 2023 - 9:05 am | हणमंतअण्णा शंकर...

घ्यावा का नाही?

तुमचा निर्णय पक्का झालेला दिसतोय. तरीही माझ्या मते तुम्ही पुन्हा एकदा निर्णय तपासून पाहावा. घरचे लोक याबाबतीत अत्यंत शॉर्ट साईटेड विचार करतात असा माझा स्वानुभव आहे. डोक्यावर छत नाही वगैरे फार फालतुचा इमोशन अत्याचार असतो. बायको अर्थसाक्षर असेल तर मात्र हा फोर्स दिसत नाही. माझे आणि माझ्या मित्राचे असेच आहे. माझ्या मित्राची पत्नी बर्‍यापैकी अर्थसाक्षर आहे. त्यामुळे माझ्या बायकोसारखी ती 'माझ्या डोक्यावर छतच नाही' वगैरे बंडल इमोशनल अत्याचार करत नाही. (डोक्यावर छत असणे म्हणजे मेट्रोसिटीत फ्लॅट असणे. घर हवे म्हणून घर घेणे नव्हे, तर 'राहत्या' घराला सिक्युरिटी किंवा गुंतवणूक म्हणून पाहून घर घेणे असा खूप वरवरचा विचार असतो. राहते घर कधीही गुंतवणूक नसते हे लक्षात घ्या)

तुम्ही आधी तुमच्या उत्तरार्धाचे प्लॅनिंग करा. म्हणजे तुम्ही पुण्यातच आयुष्य काढणार आहात काय? ते तुम्हाला परवडणार आहे काय? इत्यादी.. त्यानुसार 'राहते' घर कुठे घ्यायचे हे ठरवा. राहते घर आणि गुंतवणुकीचे घर हे मिसळू नये असे मला वाटते. तुम्हाला जर तुमचा फ्लॅट ही एक चांगली गुंतवणूक वाटत असेल तर एकदा सुस टेकडीवर जाऊन सभोवताली नजर टाका.

माझ्या मते कोल्हापूर, नाशिक, सांगली-मिरज, सातारा, कराड, नगर, इस्लामपूर, वाई, बेळगाव अशी पश्चिम महाराष्ट्रातली सुपीक भागातील शहरे चांगली. (त्यातल्यात्यात राहणीमान स्वस्त, परंतु चांगले दवाखाने आणि आरोग्य सुविधा ) पुणे-पिं.चिंचवड आणि मेट्रो सर्वार्थाने वगळावेत अशा अवस्थेला आहेत. पुण्याच्या बाह्य भागांत तर सुविधा नगण्य पण दर अव्वाच्या सव्वा आणि प्रदूषण अव्वाच्या सव्वा असे अशी परिस्थिती आहे.

घराचे कर्ज परतफेड करताना टॅक्स मध्ये काही सवलत मिळत असली तरी ऑपॉर्चुनिटी कॉस्ट ही काढावी लागते. माझ्या मते तुमच्या गावाकडे जमीन वगैरे गुंतवणूक म्हणून घ्या. पुढे मागे घर बांधता येईल किंवा विकता येईल. कारण फ्लॅट पेक्षा जमीन जास्त परतावा देते हा स्वानुभव आहे.

व्यक्तिशः मी पुण्यात बाणेर जवळ घेतलेला फ्लॅट नुकसानीत विकावा लागला म्हणून घर विकत घेण्याच्या सख्त विरूद्ध आहे. स्त्रीहट्ट मला खूप महागात पडला आहे.

मी हौसेने फ्लॅट घेतला खरा, पण सोसायटीने नीट कारभार हाकला नाही. शिवाय पाण्याची गंभीर समस्या उभी राहिली. चार वर्षात लोन फटाफट फेडले. त्यामुळे मला दसादशे ४ टक्के इतका इफेक्टिव्ह इंटरेस्ट पडला. तुम्हाला नीट समजावे म्हणून मी प्रत्यक्ष आकडे देतो.

२०१६ => ११ लाख रोख, उर्वरीत ४२ लाखांचे लोन दसादशे सरासरी ८ टक्के दराने, एकूण किंमत = साधारणतः ५४ लाख
२०१८ => ताबा
२०१९ => ६ लाखांचे सामान
२०२९ अर्धे ते अर्धे २०२२ = दरमहा २५०० मेंटेनन्स
२०२० => कर्ज परतफेड ( आलेला बहुतांश पगार मुद्दल फेडण्यात घालवला ). एकूण रक्कम दिली = ५२ लाख. फ्लॅटवर झालेला एकुण खर्च = ११ + ५२ + ६ + १ = ७० लाख.
२०२२ शेवट विक्री => ६४ लाख.

बघा हा नुकसानीचा प्रकार. स्त्रीहट्ट. ५४ ला घेऊन ६४ ला विकला असं मनात येतं. पण प्रत्यक्षात आकडे तपासून पाहिले तर मी घाट्यात आहे.

मी सगळा व्यवहार जिने हट्ट केला तिलाच पाहायला लावला. तेव्हा कुठे तिच्या थोडेफार डोक्यात शिरले. आता हाती आलेली रक्कम मी योग्य ठिकाणी गुंतवली आहे.

तरीही हा द्राविडी प्राणायाम करताना मी अनुभवलेल्या गोष्टी सांगतो -

सोसायटीबद्दल:
१. अतिशय उत्तम दर्जाचे पाण्याचे मीटर प्रत्येक घराला बसवून घ्यावेत. सोलार वॉटरला सुद्धा स्वतंत्र मीटर बसवावेत. सोसायटी ताब्यात आल्यावर या गोष्टी होतात -
पुण्यात पश्चिम भागात पाणी कमी पडते. टॅकर लावावे लागतात. लहान असेल तर सोसायटीला लोकल टँकर माफिया त्रास देतात.
२. सोसायटी वॉचमन परवडण्याइतपत मोठी असावी.
३. सोसायटीत वॉट्सप थेरडे नसावेत.
४. त्यामुळे शक्यतो नामांकित बिल्डरांच्या मोठ्या सोसायट्या पाहाव्यात. गोदरेज वगैरे.

कंस्ट्र्क्शन बद्दलः
१. फ्लॅटमध्ये पश्चिम-नैऋत्य दिशेकडून इशान्येकडे वारे वाहते राहील अशी व्यवस्था असावी. म्हणजे
२. डक्टमध्ये खिडकी असणारे किचन घेऊ नये. किचनची खिडकी बाहेर मोकळी ओपन व्हावी.
३. एक युरोपियन पद्धतीचे बाथरूम असावे, एका बाथरूममध्ये भारतीय पद्धतीचे संडास बसवून घ्यावे. जिथे भारतीय संडास आहे तिथे ते फक्त संडासच असावे. भारतीय संडास आणि आंघोळीची जागा एकत्र जात नाहीत. मलातरी किळस येते. अर्थात मला युरोपियन बाथरूम्सच आवडतात. कोरडे आणि सुटसुटीत.
४. ईंटेरियरवर जास्त खर्च करू नये. पीओपी वगैरे स्वतः करू नये. खरेतर इंटेरियर तीन ते चार वर्षांनी करावे. पुन्हा, युरोपियन किंवा जपानी रुचीचे इंटेरियर असावे. भडक, फॉल्स सिलींग, एलईडी वगैरे गणपती मंडप डेकोरेशन करून शोभा घालवू नये.
५. सगळीकडे वीजेचे पाँईट असावेत. कोणताही अपूर्ण फ्लॅट घेताना हे आवर्जून पाहावे.
६. गॅलरीतून हॉल मध्ये किंवा इतर कोणत्याही रूममध्ये मोकळ्या पाइप टाकून ठेवाव्यात. खूपदा इंटरेट, डिश टीव्ही वगैरे यांच्या वायर्स बाहेरून आत घेताना खिडकीतून, दरवाज्यांच्या फटीतून वगैरे घेतल्या जातात. मोठे ड्रिल पाडल्यास गळती होण्याची शक्यता असते. त्याऐवजी, एसी आणि इतर वायर्स एका रूम मधून दुसर्या रूममध्ये किंवा आतबाहेर करता यावेत म्हणून बारीक लोखंडी पाइप्स टाकून छताजवळ होल्स आधीच करून घ्यावेत. बिल्डरने ज्या कस्न्सील्ड वायर्स वापरलेल्या असतात त्या एका वर्षातच मान टाकतात.
७. उत्तम दर्जाच्या जाळ्या बसवाव्यात. दरवाज्यांनाही. विशेषतः गॅलरीच्या दरवाज्यांनासुद्धा. स्लाईडिंग जाळ्या बसवताना दर्जात अजिबात तडजोड करू नये. बिल्डरकडून बसवता आल्यातर उत्तमच!
८. बाथरूमध्ये सूर्यप्रकाश येत असेल तर उत्तमच!
९. मोठ्या उंच इमारतीत खालचा व सर्वात वरचा मजला टाळावा.
१०. शक्यतो तयार रेडी पझेशन फ्लॅट घ्यावा. तो जर मनासारखा मिळाला नाहीतर सरळ रिसेल वाला फ्लॅट घ्यावा. तुम्हाला चांगले लोकेशन आणि स्वस्तःत फ्लॅट मिळेल. स्पेसचा अंदाज अपूर्ण फ्लॅटमध्ये येत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Sep 2023 - 10:18 am | अमरेंद्र बाहुबली

खुप खुप धन्यवाद. खरंतर मीच हे महीना ४०-५० हजाराचं २० वर्षासाठीचं जोखड मानेवर लादून घेण्याच्या विरोधात आहे. पण नातेवाईक सूसाट घरं घेत सूटलेत, त्यामूळे इकडे चलबिचल होते. घर नाही म्हणजे आपली प्रगती होत नाहीये असा गैरसमज पसरतोय. तरी मी २ वर्षे चालढकल करतोय. पण हट्ट दिवसेंदिवस जोर धरतोय. बर्याच लोकांचे फ्लॅट बाबतीत असेच अनूभव आहेत.
बरं फ्लॅट पहावे तर मनात भरत नाहीत. शहरांपासून प्रचंड लांब. पण मी एक पक्के केलेय की घेणार तर रीसेलच. कारण तो मध्यवर्ती भागात त्याच किमतीत पडेल जी पुण्याबाहेर नव्यासाठी पडतेय. शिवाय भाडेही जास्त आहे मध्यवर्ती भागात.
मला कुणी हे गणीत सांगेल का? समजा मी ४० लाखाचं लोन केलं २० वर्षासाठी, ९ टक्के हा भरमसाठ व्याजदर धरला तरी मला ३६ हजाराचा हफ्ता पडेल. समजा भाडे सोसायटी मेंटेनन्स नी लाईटबील भाडेकरूने भरून २० हजार भाडे मिळाले तर फक्त १६ हजार भरून फ्लॅट माझा होतोय. हे परवडेबल आहे ना? (इतके भाडे मध्यवर्ती भागात आहेत)

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

6 Sep 2023 - 4:34 pm | हणमंतअण्णा शंकर...

माझ्या मते नवीन फ्लॅट घेण्यापे़क्षा चांगला रिसेल प्लॅट घेतलेला केव्हाही उत्तम. पाणी असलेली सोसायटी, पूराचा धोका नसलेली सोसायटी पाहा. शिवाय अनेक कारणे देऊन किंमत पाडून घेता येते.

मला कुणी हे गणीत सांगेल का

https://fi.money/calculators/rent-vs-buy-calculator

हा कॅल्क्युलेटर पाहा ट्राय करून.

स्वतःचे राहायचे घर ही रूढ अर्थाने* गुंतवणूक नाही. स्वतःच्या मालकीचे रहायचे घर असावे. भविष्यात स्वतःच्या उत्पन्नावर अनिष्ट परिणाम झाले तरी किमान स्वतःचे राहते घर तरी शिल्लक राहते. अर्थात त्या घरात आपल्या उत्पन्नाच्या ५०%हुन अधिक खर्च करू नये.

---

भाड्याने द्यायचा विचार असेल तर निवासी मालमत्तेत गुंतवणूक करण्यापेक्षा व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक केलेली चांगली. परतावा आणि किमतीतील वाढ यांत बराच फरक दिसून येईल. बाकी, मूळ धाग्यातील प्रश्नांबद्धल मिपाकरांनी आधीच उत्तरे दिली आहेत.

---

*खरंतर हीही गुंतवणूक आहेच. स्वतःच्या कौशल्यविकासासाठी खर्च, अपत्यांच्या शिक्षणाचा खर्च, धंद्याच्या विपणनाच्या खर्च हीदेखील गुंतवणूक नव्हे का?

कंजूस's picture

6 Sep 2023 - 2:03 pm | कंजूस

निर्णय

आता तुम्ही प्रतिसाद वाचून बजेटप्रमाणे आवाक्यातील घर घेऊन टाका किंवा नोंदणी करा.
.
.
पण कुणाला सांगू नका.
.
.
कारण त्या निर्णयावर प्रतिकूल मत देणारे पुढे पाच वर्षांनी कौतूक करू लागतील. नशीब फिरते. जो भाग /घर नकोसा म्हणून स्वस्त होता आणि बजेटात होतंय म्हणून घेतले ते काही अचानक चमत्कार होऊन मालामाल झालेले आहेत. त्या भागाची मागणी वाढली.

परिस्थितीला जो शरण जातो त्याचे भाग्य उजाडते हा नियम आहे.

परिस्थितीला जो शरण जातो त्याचे भाग्य उजाडते हा नियम आहे.

सुटाबुटातला, विशिष्ट अविर्भाव, चर्येवर खोटे हसू आणि बळेच आणलेला आत्मविश्वास असलेला स्वतःचा फोटो कव्हरावर छापून हमखास यशस्वी कसे व्हावे याचा खात्रीलयक गुरुमंत्र देणारे जे महाभाग असतात, त्यांच्या सगळ्या फॉर्म्युलांना सुरुंग लावणारा हा नियम प्रचंड आवडल्या गेला आहे. (आपापल्या सोयीनुसार वाटल्यास 'परिस्थिती' ऐवजी कुणी 'बायको' लिहीले तरी चालेल)

https://www.youtube.com/watch?v=sRnz15t-JJc
वद जाऊ कुणाला शरण (संगीत सौभद्र): पदः अण्णासाहेब किर्लोस्कर गायकः आनंद भाटे.

अशी बरीच उदाहरणे सापडतात.
लेखी म्हणजे शिकार कथा लिहिणाऱ्या केनेथ अँडरसेनचे. डाक बंगला उर्फ सरकारी गेस्ट हाऊसच्या नियमांचा बडगा( तो नियम अजूनही तसाच आहे) खाल्ल्यावर त्याने तीन घरे विकत घेतली होती. भारत सोडताना त्या घरांचे चांगले पैसे मिळाले त्याला.

मी अगदी सुरुवातीलाच घरची पार्श्वभूमी काय आहे ते विचारणार होतो, पण ते अशिष्टपणाचे दिसले असते आणि बहुतेकांना तसे विचारलेले आवडतही नाही. इथे कुणी प्रतिसादकानेही विचारले नव्हते.
-- आता सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत तर सध्या नाहक या भानगडीत न पडता तुमच्या करियरच्या दृष्टीने जिथे योग्य असेल तिथे भाड्याच्या घरात रहा. वय तीसच असल्याने अजून अनेक संधी समोर येतील, त्यातून हळूहळू निवड करत चाळीशीत ठरवा नक्की कुठे स्थायिक व्हायचे ते. कॅनडा ऑस्ट्रेलिया न्यूझिलंड वगैरेसाठी पण बघा. तसे हल्ली पुष्कळजण आयटी कंपन्यांतर्फे विदेशात जातात तेही उत्तम.
-- इथे उगाच लचांड - तेही कर्ज घेऊन - वाढवू नका. ती कायमची डोकेदुखी होईल. असे अनेकांचे झालेले आहे. गृहकर्जावर जितके टक्के व्याज द्यावे लागते, तेवढी दर वर्षी फ्लॅटची किंमत आता वाढत नाही. सुरुवातीची अनेक वर्षे हप्ता भरूनही मूळ मुद्दल अगदी कमी फेडले गेलेले असते. रोख पैसा देणे घेणे हे वेगळेच प्रकरण. बँकेतून काढून रोख रक्कम देणे म्हणजे मेहनतीचा पांढरा पैसा स्वतःच काळा करणे. कर्जात अडकला तर धोबी का कुत्ता व्हावे लागते. ज्यांना स्वतःला रहाण्यासाठी घेऊन त्या घरात वर्षानुवर्षे रहायचे असते, सरकारी वगैरे कायमची त्याच गावात नोकरी असते, त्यांची गोष्ट वेगळी.
-- परदेशात वा भारतातच अन्य शहरात रहाणारा घरमालक असला तर भाडेती भाडे देणे बंद करून शेवटी लाखो रुपये दिल्यावरच घर सोडतात अशी अनेक उदाहरणे असतात. मनस्ताप आणि नुकसान वेगळे. या सगळ्या गोष्टी अर्धांगिनीला समजवून सांगा.
परदेशी गेलेल्या तरुणांचे फोरम वरून उपयोगी माहिती मिळते. परदेशात जाऊनही भरपूर मित्र लाभतात. सगळे सणवार करता येतात, भारताएवढेच उत्तम - वा काही बाबतीत आणखी सरस जीवन जगता येते.
-- इथे अन्य प्रतिसादकांनी मोलाचे सल्ले दिलेले आहेतच. एकदा शांतपणे विचार-चर्चा करून योग्य तो निर्णाय घ्यावा असे म्हणावेसे वाटते.

मुक्त विहारि's picture

8 Sep 2023 - 8:25 pm | मुक्त विहारि

प्रतिसाद आवडला

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Sep 2023 - 8:41 am | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद काका. नक्कीच विचारत करतो.

कौशी's picture

8 Sep 2023 - 8:21 pm | कौशी

कळवा ठाणे मधे आशर अराइज प्रोजेक्ट बद्द्ल कोणी सान्गु शकेल....

तितक्याच पैशांत, कोपर, (डोंबिवली) येथे घर घेता येईल

राणि's picture

11 Sep 2023 - 12:19 pm | राणि

नेरुळ, नवी मुंबई मध्ये घर घेण्याबद्द्ल काही मार्गदर्शन करु शकाल का?

नेरुळ, नवी मुंबई मध्ये घर घेण्याबद्द्ल काही मार्गदर्शन करु शकाल का?

--- सदर धाग्याच्या बाबतीत जसे झाले, तसेच सगळे पुन्हा होण्यापेक्षा ज्यांना घर हवे आहे त्यांची कौटुंबिक, आर्थिक माहिती, गरज, कोणत्या प्रकारचे, किती किंमतीचे, नवीन की जुने, किती जणांसाठी, काय हेतूने घर हवे आहे वगैरे माहिती आधी इथे दिल्यास प्रतिसाद नेमके आणि उपयोगी देता येतील, अन्यथा सगळेच मुसळ केरात असे होऊ शकते.

आर्थिक माहिती - पती पत्नी नोकरदार, गरज - स्वत: राहण्यासाठी, कोणत्या प्रकारचे - १ BHK, शाळा जवळपास असणारे, किती किंमतीचे - माहिती घेतली असता किंमत ६०-६५ पासुन सुरु होते असे कळले, नवीन की जुने - जुने ( तुलनेने किंमत व Maintenance कमी असेल असे वाटते म्हणून) , किती जणांसाठी - ५

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 Sep 2023 - 8:35 pm | राजेंद्र मेहेंदळे

हा विषय प्रतिसादात ३-४ ठिकाणी आला म्हणुन हे लिहितोय.

युरोप-
सध्या युक्रेन युद्ध आणि ईतर परीस्थितीमुळे युरोपमध्ये महागाईचा भडका उडालेला आहे. भारतीयांना वार्षिक ७ टक्के माहागाई वाढीची सवय असते तशी तिकडे नाही. १०-१५ वर्षानंतर अचानक वस्तूंचे भाव वाढल्याने लोकांना चटके बसताहेत. अगदी जर्मनी/फ्रान्स सारख्या अग्रणी देशातही हीच परीस्थिती आहे. एकाच्या पगारात भागणे अंमळ कठीणच. आणि दोघे नोकरी करत असाल, तर मुलाला पाळणाघरात ठेवणेही भयानक महाग. (एक मित्र जर्मनीत आणि दुसरा इंग्लंड मधे आहे)

कॅनडा-
पेट्रोलचे भाव २-३ वर्षात दुप्पट झाले आहेत. टोरोंटो सारख्या ठिकाणी घरांचे भाडेही दुप्पट झाले आहे. विकत घ्यावे तर बिडिंग करुन जो जास्त बोली लावेल तो जिंकतो. २००१० साली जे ड्युप्लेक्स २.५ ते ३ लाखाला मिळत होते ते आता ७-८ पर्यंत गेले आहे. २०१० साली वार्षिक ८५,००० डॉलर्स मध्ये ४ जणांचे कुटुंब मजेत राहु शकत होते ते आता १,३०,०००/- शिवाय जमत नाही.(एक मित्र टोरोंटो मधे आहे)

ऑस्ट्रेलिया-
फारशी माहीती नाही. पण मिपाकर देउ शकतील.

तेव्हा जर नवरा-बायको भारतातच राहुन महिना १.५ ते २ लाख कमवत असतील तर कुठेही जाउ नये. गड्या आपुला गाव बरा.

ऑस्ट्रेलिया-
फारशी माहीती नाही. पण मिपाकर देउ शकतील.

महागाई येथेही वाढली आहे , पेट्रोल १ डॉलर ३० सेंट चाय आसपास ते २. १० / २५ पर्यंत गेले आहे
घरे अशीच खुप महाग झाली आहेत
आयकर तर काही कमी होत नाही आणि पगार हि फारसा वाढत नाही
भांडीही वादळी आहेत २०-३०%

सर्वात चटका देणारे म्हणजे विक्रमी प्रमाणात बेस इंटरेस्ट रेट ०.२५ पासून ते ४% पर्यंत गेला आहे त्यामुळे सर्व कर्जे महाग झाली आहेत

मग सका रात्मक काय? तर
अश्या देशातील स्थलांतर हे लांब पल्यासाठी असते
- शिक्षण जवळ जवळ फुकट आणि जागतिक दर्जचे
- त्यामानाने पगारातील तफावत कमी ( रिटेल स्टोर मॅनेजर काय किंवा प्लम्बर / इलेकट्रिशिअन काय )
- मुख्य आणि तातडीची वैद्यकीय सेवा फक्त उत्पन्नाचं १.८% कर द्यवा लागतो )
- अनेक सरकारी मदत ( उदा कोविद काळात प्रत्येक माणशी $ ३००० महिना सरकारने दिले )
- मेरिट वर चालते !
- खरा सर्वधर्म समभाव ( त्यात खोलात जात नाही )

अर्थात ऑस्ट्रेल्या चे इतर फायदे तोटे पण आहेत कि जे युरोप आणि उत्तर अमेरिके पेकशा वेगळे असणार

तेवहा स्थलांतर हे केवळ महिना किती कमवतो आणि वाचवतो यावर अवलम्बुन नसते

राजेंद्र मेहेंदळे's picture

12 Sep 2023 - 6:46 am | राजेंद्र मेहेंदळे

जीवनमान सुधारण्यासाठी स्थलांतर हा मुद्दा बरोबर(शिक्षण्,वैद्यकीय मदत वगैरे). पण सामाजिक जीवन, मित्र, नातेवाईक यांचा बळी देउन?

आणि ज्याला सामाजिक जीवनाची गरज भासत नसेल तर तो भारतातही "बेटावर" राहील्याप्रमाणे अलिप्त राहु शकतोच की(असे अनेकजण पाहण्यात आहेत)

चौकस२१२'s picture

12 Sep 2023 - 4:51 am | चौकस२१२

भांडीही वादळी आहेत २०-३०%
परत एकदा मुद्रराक्षसाचा विनोद केला " भाडीही वाढली आहेत" असे वाचावे

प्रदीप's picture

28 Sep 2023 - 11:20 pm | प्रदीप

अतिशय उपयुक्त माहिती येथे जमा होत आहे, म्हणून वाचनखूण करून ती साठवली आहे. ह्या धग्याबद्दल अ. बांचे आभार.

इथे अनेकांनी रेराच्या साईटीवरून, प्रोजेक्टबद्दल  बरीच उपयुक्त माहिती मिळते असे लिहीले आहे.

भारतांत, प्रॉपर्टी घेतांना, एखादी विश्वासार्ह साईट असावी, तर ती रेराची ह्या समजूतीने, मी एक उदाहरण म्हणून येथे 'सर्च' केला. त्यांत, 'असा काही रेकॉर्ड अस्तित्वांत नाही' असे आले.

म्हणजे असे:

.

मग, गूगल मॅपवरून, शहराच्या त्या भागांत सर्च केल्यावर काहीतरी अजबच दिसू लागले.

.

इथे मी शोधतोय ती साईट मुंबई गोरेगांव पश्चिम येथे आहे. पण एका साईटीवर माऊसने हॉव्हर केले असता, औरंगाबादमधल्या कुठल्यातरी साईटीची माहिती येत आहे,

ह्यांत माझे काही चुकते आहे, का प्रॉब्लेम अन्यत्र आहे?

तुषार काळभोर's picture

29 Sep 2023 - 7:10 am | तुषार काळभोर

Sunteck City असं स्पेस सहित सर्च करा. दोन रिझल्ट्स येतील.
Sunteck City Avenue 1
Sunteck City Avenue 2
यातील पहिला तुम्हाला हवा असलेला आहे.
किंवा
फक्त रेरा क्रमांक P51800001281 सर्च करा.
Sunteck City Avenue 1 हा एकच रिझल्ट येईल.

प्रोजेक्ट नाव, प्रमोटर नाव आणि रेरा क्रमांक सगळं टाकायची आवश्यकता नाही. कोणतीही एक माहिती टाकल्यास रिझल्ट येतो. खूप रिझल्ट्स आल्यास दोन किंवा तीन माहिती दिल्यास जास्त अचूक रिझल्ट येतात.

गुगल मॅप मध्ये Sunteck City एवढंच सर्च केलं तर डायरेक्ट गोरेगाव येथे नेलं. दोन तीन ठिकाणे दिसली आजूबाजूला.
हे त्यातील Avenue 1

प्रदीप's picture

29 Sep 2023 - 7:32 am | प्रदीप

तुषार, ही प्रोसेस इथे सविस्तर टाकल्याबद्दल.

मुक्त विहारि's picture

1 Oct 2023 - 5:42 pm | मुक्त विहारि

शतकी धाग्या बद्दल, सर्व मिपाकरांचे अभिनंदन

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Jan 2024 - 11:29 am | अमरेंद्र बाहुबली

मी बराच तपास करून पुनावळे भागात घर पाहीले होते. तिथे माझ्या बजेट मध्ये घर होते. ५५-६० लाख. पण तिथे कचरा जेपो येणार आहे असे कळाले, काही लोक सांगताहेत रद्द झालाय. काी सांगताहेत होना आहे. नक्की काय ते कळेना. कुणाला माहीतीय का काही??

पण तिथे कचरा जेपो येणार आहे

कचरा डेपो, मशिद झाली की किमती अगदी कमी होतात.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Jan 2024 - 1:44 pm | अमरेंद्र बाहुबली

मशिद झाली की

…या लल्ला.

सध्याचा स्टेटस माहित नाही पण जनआंदोलनाचे फ्लेक्स पाहिलेत साधारण ६-७ महिने पूर्वी . स्थगित प्रकल्प पुनर्जीवित होतात वा वावड्या उठलेल्या खोट्या ठरतात अशा ठिकाणी जागा घेणे टाळावे. रोकडा पैसे असतील तर गोष्ट वेगळी आहे पण पांढरपेशा माणसाने अशा ठिकाणी "गुंतवणूक" वा "राहते घर" म्हणून जागा घेऊ नये. गोष्टी तापदायक ठरतात.

पुनावळेपेक्षा वाकड-रावेत चांगले आहे या बजेटला

पुढे काय होणार हे कुणीच सांगू शकत नाही. नव्या चांगल्या वसाहतीत महागाई फार जाणवते. तिथे mbbs dr. जागा घेऊन दवाखाना टाकणे परवडत नाही. आणि पेशंटनाही त्यांच्या फिया परवडत नाहीत. भाजी मार्केट महागडेच असते. रस्त्यावरची मुख्य दुकाने म्हणजे मॉल्स, मोबाईलवाले, बुटिक कपडे दुकाने, पिझ्झावाले,डी मार्ट.

कपिलमुनी's picture

29 Jan 2024 - 2:19 pm | कपिलमुनी

सध्या तिथ न घेणे उत्तम ! कचरा डेपो नाही तर सॉलिड वेस्ट प्रोसेसिन्ग उभारणार असे कळले आहे. शिवाय सध्या तिथे बस कनेक्शन कमी आहे . रोज ट्राफिक जँम असते. धूळ , प्रदूषण जास्त आहे.

५५-६० ला ताथवडे, रावेत या भागात चांगले पर्यय आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Jan 2024 - 6:05 pm | अमरेंद्र बाहुबली

विअर्ड विक्स, कंकाका, मूनिवर खुप खुप आभार. पुनावळे टाळतो.