प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांना जीवन गौरव पुरस्कार

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
1 Aug 2023 - 11:52 am
गाभा: 

प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांना जीवन गौरव पुरस्कार

1

प्रा. अद्वयानंद गळतगे सरांच्या मराठी भाषेतील वाङ्मय सेवेचा गौरव करण्यात यावा या उद्देशाने सरांच्या ९२व्या वाढदिवसाला जीवन गौरव पुरस्कार सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
आधुनिक विज्ञान आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. बुद्धिप्रामाण्यवाद, नियतिवाद, कर्मफल, विधिलिखित या सर्वांचा समग्र संबंध आहे काय? क्वांटम सिद्धांताने आधुनिक भौतशास्त्रीय चिकित्सेची दालने कशी उघडी केली आहेत?
भानामतीचे खेळ कोण करतो? मृतात्मे – भुते खरी असतात का? युएफओ उर्फ उडत्या तबकड्यांचे रहस्य काय ? शून्यातून वस्तु निर्मिती होते काय ? पुनर्जन्म मानायचा का? अतींद्रीय शक्ती असतात का? देवदूत असतात काय? गणपतीचा चमत्कार कसा होतो? श्रद्धेचे चमत्कारात काय स्थान? याचे स्पष्टीकरण त्यांच्या लेखनातून मिळते.
या सर्वांवर वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे काय? असेल तर त्यांचे काय मत आहे? भारतीय ब्रह्मविद्याशास्त्राचे याबाबत काय मत आहे? कानडी भाषिक असूनही त्यांनी मराठी भाषेत या विषयांवर विपुल लेखन केले आहे. नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या प्रज्ञालोक या त्रैमासिकात गेली २५ वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात.
दि.११ डिसेंबर २०२२रोजी भोज येथे संपन्न झालेल्या तिसऱ्या कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आपण भूषविले आहेत. याशिवाय करवीर पीठाचे जगदगुरू शंकराचार्य विद्याशंकर भारती यांच्या शुभहस्ते आपला यथोचित सत्कार सन्मान झाला आहे.
रविवारी, दि ६ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता टिळक रोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात गौरव समितीच्या विद्यमाने कार्यक्रम पार पडेल. त्या वेळी संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. अशोक कामत, पूर्णवाद याचे अभ्यासक डॉ लक्ष्मीकांत पारनेरकर, महाराष्ट्र साहित्या परिषदेचे अध्यक्ष आणि मराठीचे डॉ मिलिंद जोशी आणि रमल विद्या प्रवीण श्री चंद्रकांत शेवाळे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

जुन्या मिपाकरांना प्राचार्य अद्वयानंद गळतगे हे व्यक्तिमत्व परिचित आहे. परंतु नव्या मिपाकर सदस्यांना कदाचित गळतगे सरांच्या विपुल साहित्य निर्मितीची ओळख नसावी. म्हणून काही जुने धागे सादर करत आहे.
या कार्यक्रमात गळतगे सरांची पुस्तके विक्रीला ठेवली जातील. ७० रुपये इतक्या अल्प किमतीत अजब प्रकाशन कोल्हापूर यांनी उपलब्ध करून दिलेली आहेत.

विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे?

कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी

वरील विषयावरील प्रकरणे आता ईबुक म्हणून प्रकाशित झाली आहेत.

प्रतिक्रिया

प्राचार्य अद्वयानंद गळतगे सर लेखन कार्यातील माझे प्रेरणा स्थान आहेत.
पुरस्कार पत्राची प्रत मिपाकरांना वाचनार्थ सादर.
याशिवाय सन्मान चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

1

कर्नलतपस्वी's picture

5 Aug 2023 - 10:12 pm | कर्नलतपस्वी

दीर्घायुष्या करता परमेश्वर चरणी प्रार्थना.

विवेकपटाईत's picture

7 Aug 2023 - 9:09 am | विवेकपटाईत

अभिनंदन.

प्राचार्य अद्वयानंद गळतगे जीवन गौरव पुरस्कार सभेचा अहवाल

६

जीवन गौरव पुरस्कार मा‍झ्या गुरूंचा असून त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा मी भारवाहक आहे ! - प्रा. अद्वयानंद गळतगे

चेहरा

'माझ्या जीवनात विविध अतींद्रिय शक्तींचे प्रमाण दर्शवणारे प्रसंग आले. त्या प्रसंगांचे कारण शोधण्याचा, भूत शोधण्याचाही प्रयत्न मी केला. अशा अनेक प्रसंगात मला विशिष्ट ज्ञान देणारे गुरु मिळाले. काही प्रसंगांमध्ये महाराष्ट्र अंनिस सारख्या संस्था मोडीत निघाल्या, कारण त्या प्रसंगांना सामोरे जाण्याचे धैर्य त्यांच्यात नव्हते. जीवनगौरव पुरस्कार हा माझा नसून या माझ्या गुरूंचा आहे. गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा मी भारवाहक या नात्याने हा पुरस्कार स्वीकारतो. भविष्यात घडणाऱ्या घटनांचे ज्ञान अगस्ति ऋषी आणि त्यांच्या शिष्यांना आधीच ठाऊक होते. नाटक आधी लिहले जाते आणि मग रंगमंचावर सादर केले जाते. जगाच्या रंगमंचावर जीवनरूपी नाटक चालले असल्याचे ज्ञान मला अगस्ति ऋषी यांच्या नाडीभविष्यातून झाले. हे नाटक 'विधि'ने म्हणजेच ब्रम्हाने लिहले असल्याने त्याला विधिलिखित असे म्हणतात. आईन्स्टाईन, बोहर यांसारख्या शास्त्रज्ञांनीही भौतिक सिद्धांतांचा शोध लावून ब्रह्म विज्ञानाचे समर्थन केले आहे' असे परखड प्रतिपादन प्रा. अद्वयानंद गळतगे यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषदच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या जीवनगौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी विंग कमांडर शशिकांत ओक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत, पूर्णवाद अभ्यासक डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर, वेदांत गळतगे यांसह अनेक मान्यवर आणि श्रोता वर्ग उपस्थित होते.

२

प्रारंभी विंग कमांडर शशिकांत ओक यांनी प्रास्ताविक केले त्यामध्ये मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, ज्ञानतपस्वी प्रा. गळतगे हे माझ्या पित्यासमान आहेत. त्यांचे आणि माझे ३० वर्षांपासूनचे संबंध आहेत. माझी पोस्टिंग तांबरमहून श्रीनगर मध्ये झाली आणि नेमके प्रा. गळतगे हे मला चमत्कारिकरित्या श्रीनगरला भेटले. त्यांनी माझ्या समवेत नाडी भविष्य पाहिले तेव्हा त्यांची नाडीपट्टी तंतोतंत आली, तसेच माझेही नाव त्यात आले. त्यांचे वय त्यावेळी ६७ वयाचे होते. पट्टीमध्ये त्यांचे वय ६७ वर्षे असे उल्लेखित असल्याने त्याआधी आणि त्यानंतर हा योग आला नसता. प्रा. गळतगे म्हणतात नाडी भविष्यातील भविष्य कथन चुकवले जाते कारण नाडीमध्ये लिहिलेले भविष्य हे भविष्य सांगण्यासाठी नव्हे, तर त्यातून बोध घेऊन वर्तमानात कर्म सिद्धांत योग्य पद्धतीने वापरण्यासाठी मार्गदर्शक असते. प्रा. गळतगे यांचे लेखन एकटाकी आहे, म्हणजे ते जे हस्ताक्षरात कागदावर लिहितात ते सरळ छपाईला जाण्याइतके तयार असते. हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. ९२ व्या वर्षी माझ्या अल्पशा पुढाकारातून प्रा. गळतगे यांचा जीवन गौरव होत आहे याचा मला आनंद आणि अभिमान आहे.

११

वेदमंत्रपठणाने कार्यक्रमाला आरंभ झाला. त्यानंतर मान्यवरांची ओळख आणि सत्कार करण्यात आले. प्रा. गळतगे यांचा मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. प्रा. गळतगे यांचे मार्गदर्शन आणि अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांचे अध्यक्षीय भाषण झाले. शेवटी अन्य उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

1

२

३

प्रा. गळतगे पुढे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनुराधा देशमुख यांच्या हातून झालेल्या चमत्कारांमुळे महाराष्ट्र अंनिस ही संस्था मोडीत निघाली आहे, कारण त्यांना सामोरे जाण्याचे धाडस अंनिसमध्ये झाले नाही. कोल्हापूरमध्येही एका दिवाळी मासिकात मी लिहिलेल्या लेखांमुळे अंनिसच्या खोटेपणाची लक्तरे वेशीवर टांगली गेली.
गळतगे भाषण करताना
हे लेख वाचून विंग कमांडर शशिकांत ओक यांची माझी भेट झाली आणि नाडीपट्टीचाशोध घेण्यासाठी आम्ही तांबरम येथे गेलो. भानामती, कर्णपिशाच्च,करणी यांसारखे अनेक गोष्टींचे अनुभव आल्यानंतर ते मी ग्रंथांच्या माध्यमातून शब्दांत मांडले आहेत.

१२

प्रत्येक चमत्कारामागे काहीतरी ईश्वरी योजना असते, हे प्रा. गळतगे यांनी मांडले आहे ! - डॉ. अशोक कामत
श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा विषय प्रा. गळतगे यांनी हाताळला आहे. त्यांचे सर्व लेखन श्रद्धा याचा अन्वयार्थ सांगणारी आहेत. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली बुद्धिभेद करणाऱ्या मंडळींचा समाचार घेतला आहे. मुलाचे नाव मुस्लिम ठेवले, तर हिंदू मुस्लिम ऐक्य साधले जात नसते. इतिहासातील विषयांच्या मागे विज्ञान आहे. आपल्याकडे अज्ञान असल्याने आपल्याला ते कळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची काडीचीही माहिती नसलेले लोक त्यांचे नाव घेऊन राजकारण करत आहेत. प्रा. गळतगे यांनी केलेले लेखन एकमेव आहे. मेकॉले प्रणित पाठ्यक्रमामुळे माणसे भारावून गेली होती.आजही तसेच वातावरण आहे. आपण ज्याला चमत्कार म्हणतो, त्यामागे कार्यकारणभाव असतो. तो समजून घेण्याचे शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र, नाडीशास्त्र होय. प्रत्येक चमत्काराच्या पार्श्वभूमीला काहीतरी ईश्वरी योजना असते हे प्रा. गळतगे यांनी त्यांच्या पुस्तकांतून सांगितले आहे.

पुढे चालू...

प्रकाश घाटपांडे's picture

8 Aug 2023 - 8:59 pm | प्रकाश घाटपांडे

त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली बुद्धिभेद करणाऱ्या मंडळींचा समाचार घेतला आहे. मुलाचे नाव मुस्लिम ठेवले, तर हिंदू मुस्लिम ऐक्य साधले जात नसते.

हमीद दलवाईंच्या कार्याविषयी आदर प्रेम व्यक्त करण्यासाठी मुलाचे नाव डॉ दाभोलकरांनी हमीद असे ठेवले. ऎक्य साधणे याच्याशी ते थेट संबंधीत नाही.
पहिल्या वाक्यात बुद्धीभेद ऐवजी श्रद्धा निर्मूलन हा शब्द जास्त उचित आहे.
कठोर बुद्धीवादी प्रा य.ना.वालावलकर यांच्या मते तर श्रद्धा व अंधश्रद्धा यात एकच फरक आहे पहिला शब्द दोन अक्षरी आहे व दुसरा चार अक्षरी. म्हणजे मग जेव्हा घटनेने श्रद्धा बाळगण्याचे स्वातंत्र्य दिले आहे तेव्हा अंधश्रद्धा बाळगण्याचेही स्वातंत्र्य दिले आहेच

मूकवाचक's picture

9 Aug 2023 - 7:35 pm | मूकवाचक

समाजाचा थोडासा कानोसा घेतला तर लक्षात येते की ठराविक धर्मातल्या त्याच अंधश्रद्धा अशी हेटाळणी सातत्याने सुरू असते (त्या निरूपद्रवी असल्या तरी, कधी काळीच निकालात काढलेल्या असल्या तरी). अन्य धर्म + अज्ञेयवादी + निरीश्वरवादी + साम्यवादी व तत्सम यांनी उराशी कवटाळालेल्या अपसमजांना तुरळक अपवाद वगळता फारसा विरोध होताना दिसत नाही.

अंधश्रद्धेला विरोध करू पाहत असलेल्या आणि 'विवेकवादी' असे बिरूद मिरवत असलेल्या लोकांनी विवेक वापरून अंधश्रद्धा विरोधी भूमिका घेताना आपला प्राधान्यक्रम स्पष्ट करायला हवा. प्राधान्यक्रम ठरवताना अंधश्रद्धा कोणाची आहे यापेक्षा ती किती उपद्रवी आहे हा निकष लावायला हवा. घराबाहेर काळी बाहुली बांधत असलेल्या माणसाच्या नावाने आकांडतांडव करायचे आणि अंधश्रद्धेपोटी निष्पाप जिवांची कत्तल सुरू असताना सोयिस्कर मौन धारण करायचे, अशाने अंधश्रद्धा विरोधकांचा विवेक कमी पडतो, तो सोयिस्करपणे जागृत होतो की अंधश्रद्धा विरोधामागे एखादा सुप्त अजेंडा असतो असा प्रश्न पडतो. असो.

सुबोध खरे's picture

10 Aug 2023 - 9:49 am | सुबोध खरे

कसला अजेंडा आणि विवेक.

ते केवळ भेकड आणि दांभिक असतात

बकर ईद ला मुसलमानांना तुम्ही बोकड कापू नका किंवा मुहर्रम ला स्वतःला क्लेश करून घेऊ नका हे सांगण्याचे त्यांना धैर्य नसते.

कारण "सर तन से जुदा" होण्याची भीती असते.

क्रिसमसला मेणबत्त्या जळू नका किंवा नववर्षाच्या दिवशी रोषणाई करणारे फाटक वाजवू नका हे सांगण्याचेही त्यांना धैर्य नसते.

हीच स्थिती इतर जाती आणि धर्माबाबत आहे.

हिंदू म्हणजे "मुकी बिचारी कुणी हाका" असल्याने त्यांचे पुरोगामीत्व केवळ हिंदू सणांमध्ये दृश्य होते.

उदा. दिवाळीचे फटाके वाजवल्यामुळे प्रदूषण होते सांगण्यापुरते.

या पुरोगामी दांभिकपणा मुळेच आजकाल अंनिसचा जनाधार नाहीसा झाल्यासारखा आहे.

अन्यथा त्यांचे काम खरोखरच वाखाणण्यासारखे होते.

कुठले बुद्धीवादी अन कसले काय? हिंदूंबाबत पोटदुखी असलेला वळवळकर, ओकण्यापलीकडे काय केले आयुष्यात?

सुबोध खरे's picture

10 Aug 2023 - 9:54 am | सुबोध खरे

बाकी एकंदर लेख

देवा हो देवा गणपती देवा तुमसे बढकर कौन

और तुम्हारे भक्तजनो मी हम से बढकर कौन

या थाटाचा झाला आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2023 - 10:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भक्तजनो मी हम से बढकर कौन

पदोपदी निदर्शनास येतं. मान्य...!

-दिलीप बिरुटे

सुरिया's picture

12 Aug 2023 - 5:21 pm | सुरिया

बाकी एकंदर लेख

देवा हो देवा गणपती देवा तुमसे बढकर कौन

और तुम्हारे भक्तजनो मी हम से बढकर कौन

या थाटाचा झाला आहे

अगगगगगग
खरंच की, पुरस्कार देणार हेच, भाषण देणार हेच, समितीवर हेच, प्रसिध्दी करणार हेच,
मज्जा म्हणजे पुरस्कार देणार्या समितीत ज्याला पुरस्कार दिला त्याचेच दोन नातेवाईक.
.
आमच्या गल्लीतले गणपती मंडळच आठवले हो. ;)

सुरिया's picture

12 Aug 2023 - 5:23 pm | सुरिया

बाकी एकंदर लेख

देवा हो देवा गणपती देवा तुमसे बढकर कौन

और तुम्हारे भक्तजनो मी हम से बढकर कौन

या थाटाचा झाला आहे

अगगगगगग
खरंच की, पुरस्कार देणार हेच, भाषण देणार हेच, समितीवर हेच, प्रसिध्दी करणार हेच,
मज्जा म्हणजे पुरस्कार देणार्या समितीत ज्याला पुरस्कार दिला त्याचेच दोन नातेवाईक.
.
आमच्या गल्लीतले गणपती मंडळच आठवले हो. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2023 - 10:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राचार्य अद्वयानंद गळतगे सर यांचं काही लेखन वाचनात आलं नाही.
तरीही, सरांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. !

-दिलीप बिरुटे

अहिरावण's picture

10 Aug 2023 - 10:45 am | अहिरावण

तसं तर तुमचं सुध्दा लेखन बरेच दिवसांत वाचनात आले नाही (निरर्थक काथ्याकुट, मृत्युलेख, मोदी+संघ्+ब्राह्मण द्वेष वगळता).

डबल ब्यारेलमधे पाणी गेले की काय? घ्या जरा मनावर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2023 - 10:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्यासारख्या कन्हत राहणा-या आयडींचं प्रोत्साहन कायम लागतं.
लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

अहिरावण's picture

10 Aug 2023 - 2:10 pm | अहिरावण

>>>आपल्यासारख्या कन्हत राहणा-या आयडींचं प्रोत्साहन कायम लागतं.

हे वाक्य असे लिहायला हवे होते...

आपल्यासारख्या (लिहा लिहा) म्हणत राहणा-या आयडींचं प्रोत्साहन कायम लागतं.

हाय रे हाय
पालीचा अभ्यास करता करता मराठी लिहीणे वाचणे विसरुन चालले प्रा डॉ....=))

अर्थात शिकवणे हा फार काही गंभीर विषय नसल्याने नोकरीची चिंता नाही... लगे रहो

प्राचार्य अद्वयानंद गळतगे सर यांचं काही लेखन वाचनात आलं नाही.

प्रा. डॉ. दिलिप बिरुटे सर,
प्राचार्य अद्वयानद गळतगे यांच्या जीवन गौरव समारंभानिमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ केल्या
बद्दल धन्यवाद.
चर्चा रंगतदार होताना समाधान वाटते.
गळतगे सरांचे लेखन वाचनात आले नाही असे आपण म्हणता म्हणून अंनिसवाल्यांचा खरा चेहरा या पुस्तकातील प्रकरण २ अनुराधाबाईंच्या विभूती- चमत्कारामुळे अंधश्रद्धा निर्मूलनवादाची इतिश्री मधील गळतगे सरांचे विचार सादर केले आहेत.

श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक
जेव्हा एखादी गोष्ट खरी आहे की खोटी, याविषयी कसलाच प्रत्यक्ष पुरावा नसतो, तरीही ती गोष्ट खरी मानण्यात येते, अशा वेळी ती गोष्ट श्रद्धाविषय ठरते. याच्या उलट एखादी गोष्ट खोटी असल्याबद्दल प्रत्यक्ष पुरावा आढळून येतो, तरीही ती खरी मानण्यात येते. अशा वेळी ती गोष्ट अंधश्रद्धेत मोडते.उदाहरणार्थ, ईश्वराचे अस्तित्व कुठल्याही पुराव्याच्या आधारे सिद्ध करता येत नाही. ईश्वर खोटा आहे अस्तित्वात नाही हेही कुठल्याही पुराव्यांनी सिद्ध करता येत नाही. अशावेळी ईश्वर हा श्रद्धाविषय ठरतो. या उलट सशाला शिंगे आहेत, किंवा चंद्र खव्याचा बनला आहे असे कोणी मानू लागला, तर त्याचे हे मानणे अंधश्रद्धेत मोडते. कारण सशाला शिंगे आहेत, किंवा चंद्र खव्यांचा बनला आहे, ही समजूत खोटी असल्याचे प्रत्यक्ष पुराव्याच्या आधारे दाखवून देता येते. ईश्वराच्या बाबतीत असे दाखवून देता येत नाही. उलट ईश्वराचा अनुभव वैयक्तिकरीत्या येऊ शकतो. (मग भले कोणी त्या अनुभवाला भ्रम म्हणो.) पण सशाच्या शिंगांचा वा चंद्रातील खव्याचा वैयक्तिक अनुभव येणे शक्य नाही. (आणि मला तो येतो असे कोणी म्हणू लागला, तर तो भ्रम असल्याचे प्रत्यक्ष पुराव्यांनी दाखवून देता येते.) श्रद्धा व अंधश्रद्धा यातील हा मुख्य फरक आहे. थोडक्यात, जी गोष्ट खोटी असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करता येत असतानाही ती खरी मानण्यात येते, ती अंधश्रद्धा व जी गोष्ट खरी की खोटी हे पुराव्यानिशी सिद्ध करता येत नाही, पण जिचा वैयक्तिक पातळीवर अनुभव अगर पडताळा येतो ही श्रद्धा होय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Aug 2023 - 10:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एखादी गोष्ट खरी आहे की खोटी, याविषयी कसलाच प्रत्यक्ष पुरावा नसतो, तरीही ती गोष्ट खरी मानण्यात येते, अशा वेळी ती गोष्ट श्रद्धाविषय ठरते.

बाय द वे, हे खरं आहे. अशा गोष्टी रोचकच असतात. वर प्रतिसादात कुठे तरी उल्लेख आलाय भानामती, भूते, कर्णपिशाच्च विद्यांच्या बाबतीत. माझा जसा देवावर विश्वास नाही, तसं भूतं वगैरे यावरही विश्वास नाही, ते सर्व वैयक्तिक अनुभवाकडे जाते आणि त्याची सत्यता तपासणे कठीण होते. बाकी, असं काही असेल का ? याची उत्कंठा कायम असते. भूतांवरचे-कर्णपिशाच्च काही त्याबद्दलचे लेख माहिती कल्पना रम्य असले तरी ते वाचायला आवडेलच.

अशाच उत्कंठेपायी, आमच्या मराठवाड्यातल्या एका जिल्यातील एका गावी कर्णपिशाच्च विद्या जाणना-या लोकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या अर्थात ते सगळे ठोकताळेच होते पण ते इतके तंतोतंत माहिती सांगतात की कमाल वाटते. ( आता हे गाव कोणतं, कुठं पत्ता विचारायला खरडी व्य.नि. करु नयेत) पण, हे सगळं रोचक असतं.

-दिलीप बिरुटे

अहिरावण's picture

12 Aug 2023 - 7:15 pm | अहिरावण

अंधश्रद्धा पसरवणारा प्रतिसाद जुन्याजाणत्यांकडून पाहून एक मिपाकर म्हणून शरम वाटली, डोळे प्वाणावले.

महिरावण's picture

12 Aug 2023 - 9:09 pm | महिरावण

अरे अहिरावणा, भूत हडळ खविस सगळं खरं असतं. मी स्वतः आमच्या वाडीच्या टेकडीला जाणाऱ्या पाखाडीवरून जातांना रातांब्याच्या झाडाखाली प्रत्यक्ष अनुभव घेतलाय. स्वतः महिरावण असूनही रामरक्षा म्हणत गेलो तेव्हा सुटलो. एकदा आमच्या वाडीला येऊन स्वतः अनुभव घे तेव्हा कळेल.

प्रत्येक चमत्कारामागे काहीतरी ईश्वरी योजना असते, हे प्रा. गळतगे यांनी मांडले आहे !

प्रत्येक चमत्कारामागे एक शास्त्र ( सायन्स) असते हे ऐकून आणि अनुभवून होतो.

कंजूस's picture

10 Aug 2023 - 7:11 pm | कंजूस

अंधश्रद्धा म्हणजे काय?

शब्दशः अर्थ घेतला तर श्रद्धा आणि अंधश्रध्दा एकच, पुरावा नसताना आणि पुराव्याची अपेक्षा न करता कशावर तरी विश्वास ठेवणे.

जनरल वापरानुसार अंधश्रध्दा म्हणजे ठेवल्याने स्वतःचे किंवा दुसऱ्यांचे नुकसान किंवा हानी होऊ शकतील अश्या श्रद्धा.

चौकस२१२'s picture

11 Aug 2023 - 9:44 am | चौकस२१२

शब्दशः अर्थ घेतला तर श्रद्धा आणि अंधश्रध्दा एकच

माझा कोणाला त्रास ना हणाऱ्या , देशाच्या / समाजाच्या संतुलनात त्रास ना देणाऱ्या श्रधेला विरोध नाही ... विरोध याला आहे कि
१) श्रद्धेचा फायदा करून दुसऱ्याना फसवणे
२) श्रद्धेचा वापर करून दुसऱ्यांच्या प्रामाणिक प्रयतनाननां अपमानित करणे ( अमुक स्तोत्र म्हणला नाहीस / गुरुवर श्रद्धा नाही म्हणून नोकरी वयवसायात यश नाही असे हिंणवणे ) इत्यादी

म्हणजे एखाद्या अंगदि सरकारी वास्तूच्या बांधणीच्या सुरवातीला जर लोकांना पूजा करावीशी वाटली तर असश्या श्रद्देहेला विरोध करण्याचे काहीच कारण नाही उदय समाज जर ख्रिस्ती असेल आणि त्यांना प्रभूची पूजा करावीशी वाटली तर हि काही गैर नाही

पण .. पूजा नाही केली म्हणून सगळं बिघडेल असा विचार करणे = हि अंधश्रद्धा
आणि अर्थात बुवाबाजी ( सर्व धर्मातील) हि केवळ फसवणूक आहे ,, सर्व माणसांना षडरीपूंची व्याधी अस्टिच कोण सुटलाय ?

बाकी फार आध्यत्मिक रीतीने मी या कडे बघत नाही (आणि तेवढी वैचारिक कुवत हि नाही )

सुबोध खरे's picture

10 Aug 2023 - 7:13 pm | सुबोध खरे

आपली ती श्रद्धा

दुसऱ्याची ती अंधश्रद्धा

अनुराधाबाईंच्या विभूती- चमत्कारामुळे अंधश्रद्धा निर्मूलनवादाची इतिश्री

-- या प्रकरणाबद्दल वाचायला आवडेल. शक्य झाल्यास इथे थोडक्यात गोषवारा द्यावा किंवा जालावर उपलब्ध असल्यास त्याचा दुवा किंवा पुस्तकातील मजकुराचा स्कॅन देता आले तर उत्तम.
प्रा. गळतगे आणि तुमच्या सर्व चमूचे आभिनंदन. असे काही उद्योग करत रहाणे वृद्धापकाळासाठी उत्तम.
माझ्या जीवनात चमत्कार म्हणता येतील अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत. चमत्कार यासाठी की कोणत्याही प्रकारच्या तर्काने त्यांचा कार्यकारण भाव लक्षात येऊ शकलेला नाही. गेल्या वर्षीच असा एक अनुभव आला. सध्या टंकाळ्यास्तव इथे लिहीत नाही. पुढे कधितरी.
--- एका अर्थी विश्वात घडणारी प्रत्येक घटनाच 'चमत्कार' म्हणावी लागेल, कारण 'असे का झाले/होते ? हा प्रश्न विचारत विचारत मागे मागे गेल्यास शेवटी अशी वेळ येते की त्या "का" चे उत्तर कुणालाही देता येत नाही. अस्तु.

अनुराधाबाईंच्या विभूती- चमत्कारामुळे अंधश्रद्धा निर्मूलनवादाची इतिश्री

-- या प्रकरणाबद्दल वाचायला आवडेल. शक्य झाल्यास इथे थोडक्यात गोषवारा द्यावा किंवा जालावर उपलब्ध असल्यास त्याचा दुवा किंवा पुस्तकातील मजकुराचा स्कॅन देता आले तर उत्तम.
प्रा. गळतगे आणि तुमच्या सर्व चमूचे आभिनंदन. असे काही उद्योग करत रहाणे वृद्धापकाळासाठी उत्तम.
माझ्या जीवनात चमत्कार म्हणता येतील अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत. चमत्कार यासाठी की कोणत्याही प्रकारच्या तर्काने त्यांचा कार्यकारण भाव लक्षात येऊ शकलेला नाही. गेल्या वर्षीच असा एक अनुभव आला. सध्या टंकाळ्यास्तव इथे लिहीत नाही. पुढे कधितरी.
--- एका अर्थी विश्वात घडणारी प्रत्येक घटनाच 'चमत्कार' म्हणावी लागेल, कारण 'असे का झाले/होते ? हा प्रश्न विचारत विचारत मागे मागे गेल्यास शेवटी अशी वेळ येते की त्या "का" चे उत्तर कुणालाही देता येत नाही. अस्तु.

शशिकांत ओक's picture

11 Aug 2023 - 12:37 pm | शशिकांत ओक

जालावर उपलब्ध असल्यास त्याचा दुवा किंवा पुस्तकातील मजकुराचा स्कॅन देता आले तर उत्तम.

चित्रगुप्त आपण या संकेतस्थळावर दुवा मागितला आहे म्हणून त्या इबुकचा दुवा देत आहे. अन्यथा असे करणे म्हणजे माझ्या पुस्तकांची जाहिरात केल्यासारखे होईल असे वाटते.
गळतगे सरांच्या पुस्तकास मागवून वाचणे कटकटीचे आहे म्हणून सरांच्या परवानगीने ईबुक माध्यमातून त्यांच्या अंधश्रद्धा वाल्यांचा खरा चेहरा पुस्तकातील प्रकरणे ₹१० त उपलब्ध आहेत.

लिंक
खरेदीसाठी लिंक - अंनिसची अतिश्री

मोबाईलवर वाचताना शक्यतो आडवा धरून वाचावे.