वयाच्या ४० नंतर राजकारणात प्रवेश

एकुलता एक डॉन's picture
एकुलता एक डॉन in राजकारण
18 Jul 2023 - 6:16 pm

नमस्कार
तसे बरेच लोक जुन्या धाग्यावरून ओळखतात
सॉफ्टवेअर मध्ये काम करून कंटाळला आलाय
जास्त पैसे पण जमा नाही आणि ओळखी पण नाही
अश्या वेळी राजकारणात कसे जावे
१) सरकारी नोकरी पकडून ओळखी वाढवावया मग तिकीट मिळवावे ?
२) सतरंज्या उचलण्यापासून सुरु करायचे
३) काहीतरी पराक्रम करायचा
४) वाळू सप्लाय किंवा बिअर बार सारखे सुरु करायचे

प्रतिक्रिया

(हा धागा विनोदी वा उपहासात्मक नसावा, असे समजून चर्चा करता येईल)
-- पहिला प्रश्न असा, की चाळीशीत आल्यावर 'राजकारणात प्रवेश' करण्यामागचा 'हेतु' मुळात काय आहे ? आजवर करत आलेले काम करण्याचा कंटाळा आलेला असताना 'राजकारणा'तच शिरावे असे का वाटत आहे ? याशिवाय अन्य पर्याय काय आहेत ? त्याबद्दल विचार केला आहे का?

(हा धागा विनोदी वा उपहासात्मक नसावा, असे समजून चर्चा करता येईल)
-- पहिला प्रश्न असा, की चाळीशीत आल्यावर 'राजकारणात प्रवेश' करण्यामागचा 'हेतु' मुळात काय आहे ? आजवर करत आलेले काम करण्याचा कंटाळा आलेला असताना 'राजकारणा'तच शिरावे असे का वाटत आहे ? याशिवाय अन्य पर्याय काय आहेत ? त्याबद्दल विचार केला आहे का?

केजरीवाल सारखे जावा किंवा मग मंगल प्रभात लोढा सारखे..
सतरंज्या उचलून काही फायदा नाही

एकुलता एक डॉन's picture

18 Jul 2023 - 11:36 pm | एकुलता एक डॉन

midlife crisis

विजुभाऊ's picture

18 Jul 2023 - 11:40 pm | विजुभाऊ

वादग्रस्त विधाने करा आणि अतीशय उर्मटप्णाने वागायला सुरवात करा ( याचे आदर्श : बिचुकले, राऊत )
अंगात दम असेल तर फेसबुकवर शांतताप्रीमी लोकांबद्दल उलटसुलट विधाने पोस्ट करा.
अंगात दम नसेल तर सनातन धर्माविरुद्ध काहीतरी गरळ ओका.( उदा: हे सांगायलाच हवे का. अंधारातही दिसू शकेल ते)
बारामतीच्या काकांना फेसबुकवर नावे ठेवा.
ओवेसीच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणणार आहे असे जाहीर करा.
या सर्वामुळे तुम्हाला आपोआप प्रसिद्धी प्राप्त होईल. ( एखादे हाड मोडले तर ती प्रसिद्धीची किंमत मोजली असे समजावे ).
राजकारणात हमखास प्रवेश मिळेल. नगरसेवक वगैरे होऊन पुढे मागे कधीतरी आमदार वगैरे होण्यापेक्षा १२ आमदारांच्या यादीतून कायदे मंडळात जाणे हा सहज सोपान आहे.

एकुलता एक डॉन's picture

19 Jul 2023 - 5:54 am | एकुलता एक डॉन

वादग्रस्त विधाने करा आणि अतीशय उर्मटप्णाने वागायला सुरवात करा ( याचे आदर्श : बिचुकले, राऊत )
>>> लहान पणा पासुन आहे , काही फायदा नाही
अंगात दम असेल तर फेसबुकवर शांतताप्रीमी लोकांबद्दल उलटसुलट विधाने पोस्ट करा.
>> सतरन्ज्या उचलनारे कमी आहेत , विधाने करणारे जास्त,आणी हे पण करुन झाले आहे
अंगात दम नसेल तर सनातन धर्माविरुद्ध काहीतरी गरळ ओका.( उदा: हे सांगायलाच हवे का. अंधारातही दिसू शकेल ते)
बारामतीच्या काकांना फेसबुकवर नावे ठेवा.
>> हे अवघड आहे,एक्तर त्यान्चा आदर आहे , आणि मला ४१ पार कराय्चे आहे
ओवेसीच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणणार आहे असे जाहीर करा.
>> जवळच राह्तो, योग्य वेळ आली तर नक्की करेल
या सर्वामुळे तुम्हाला आपोआप प्रसिद्धी प्राप्त होईल. ( एखादे हाड मोडले तर ती प्रसिद्धीची किंमत मोजली असे समजावे ).
राजकारणात हमखास प्रवेश मिळेल. नगरसेवक वगैरे होऊन पुढे मागे कधीतरी आमदार वगैरे होण्यापेक्षा १२ आमदारांच्या यादीतून कायदे मंडळात जाणे हा सहज सोपान आहे.

पहिला अध्याय - राजकारणात घुसण्यापासून नव्यांना जुने लोक 'परावृत्त' करण्याचा {त्यांच्या मार्गाने} प्रयत्न करतात. तिकडे स्थिरस्थावर झालात की मग वार्षिक उत्सवांचे आयोजनाची कामं अंगावर घेऊन वर्गणी गोळा करणे. भाषणं देणे आणि भाषणं देणाऱ्यांना आमंत्रित
करणे, त्यांची सरबराई करून शिधा घेणे. जसजसे वर जाल तसे काम तेच राहाते पण आवाका वाढत जातो. प्रत्येक स्तरावर परावृत्त करणाऱ्यांपासून आपल्याला वाचवणे आणि मग इतर हौशी उमेदवारांना परावृत्त करत राहाण्याचे व्रत घ्यावे लागते.
फावल्या वेळात जनतेची कामे करण्याचा सपाटा लावणे. यात खंड पडत नाही आणि नवनवीन आव्हाने येतच राहतात. एकसूत्रीपणा कधीच येत नाही. शेवटी आपल्या वारसदारांना मार्गी लावणे ही कावड उचलावी लागते. सुरू करा, श्रावण आला आहे अधिकचा.

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Jul 2023 - 1:20 pm | राजेंद्र मेहेंदळे

पैसा बोलता है.
ग्रामपंचायती पासुन सुरुवात करा(१ करोड). मग झेड पी(३-४ करोड), मग म्युनिसिपालिटी, मग आमदार्,मग खासदार(चढती भाजणी). नशीब चांगले असेल तर १०-१५ वर्षात पैसे कित्येक पट होतील.

पण मी काय म्हणतो? ईतकी मेहेनत करण्यापेक्षा तेच पैसे वापरुन एक पेट्रोल पंप आणि एक वाईन शॉप चे लायसन्स घ्या. पुढच्या अनेक पिढ्यांचा दुवा घ्याल.

एकुलता एक डॉन's picture

19 Jul 2023 - 6:07 pm | एकुलता एक डॉन

सोफ्ट वेअर वाल्या. कडे १ करोड?

राजकारण मे घुसनेकी हिम्मत तो जुटा लोगे, कमीनापन कहासे लाओगे?

एकुलता एक डॉन's picture

19 Jul 2023 - 8:14 pm | एकुलता एक डॉन

कोइ आदमी अपनी मा के पेट से कमिना नहि होता
उसे कमिना बना देता हैन मिपा का कम्पु

चौथा कोनाडा's picture

19 Jul 2023 - 8:46 pm | चौथा कोनाडा

सगळ्यात पैले मंडपवाले धंद्यात एन्ट्री मारा. त्या द्वारे संतरंज्या सप्ल्याय सुरू करा. पैसाही मिळेल, उद्योजक म्हणुन नाव कमवाल.
नंतर सतरंज्या उचलता उचलता ओळखी होतील, एखाद्या पक्षाचे तिकिटही मिळून जाईल !
,,,, मग ,,,,, प्रगतीच प्रगती ... नुसता विकास ........ हो ग्गय्या काम !

ऑल दि बेष्ट !

आलो आलो's picture

19 Jul 2023 - 8:51 pm | आलो आलो

बाल मंडळ अध्यक्ष मग तरुण मंडळ अध्यक्ष ....सुरुवात अशीच असते ...पण आता ४० म्हंटल्यावर ...तुम्ही तरुण मंडळचं बघा एखादं
वर्गणी कशी मागावी (जबरदस्ती वसुली कशी करावी) याबद्दल ज्ञान वाढवावे ....
दादागिरी/भाईगिरीची सुरुवात करावी ...
कारेक्रमाला गौतमी पाटील आणायलाच हवी (त्याबद्दल दुमत नसावे )
फिर्र देक्खो कमाल !! ... पुढे आपोआप वरच्या वर्गात बढती मिळतेच फक्त योग्य ते गुण उधळावे लागतील.

(हा धागा विनोदी वा उपहासात्मक या बाद्दल काहीच खुलासा नसल्याने पुढील मजकूर फक्त उहापोह करण्यासाठी)

राजकारण हा (सध्या तरी) केवळ धन्दा आहे आणि कुठल्याही धन्द्याला लागते तसे पहिल्यान्दा आपल्या हातात आणि खिशात काय आहे याचा अन्दाज घ्यायला हवा.

"सॉफ्टवेअर मध्ये (नुस्तेच) काम करून कंटाळा" येणे, हेच जरी कारण असले तरी सॉफ्टवेअर मध्ये काम केलेले आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यावरच पुढे जायचे असेल तर काही "नाम"वन्त आणि "माल"दार राजकारणी शोधा, त्यान्च्या "धन्द्याना" Hack करा. तुमच्या आजवरच्या अनुभवामुळेइतर अनेक उद्योग करण्यापेक्षा हा मार्ग कदाचित लौकर सापडेल.

एकदा अशा लोकान्च्या नाड्या तुम्हाला सापडल्या की मग त्यान्च्या कडून पाहिजे ते "वरदान" आणि म्हणून राजकारणात प्रवेश (शिवाय राज्यसभा, क्रिकेट बोर्ड अशा जागी नियुक्ती) हा पुढचा टप्पा असेल.

"राजकारणात प्रवेश" एव्हढाच हेतू नसेल तर मात्र प्रवेशानन्तर बरेच काम करावे लागेल. "सतरन्ज्या उचलणारे" कसे जमवावे आणि त्यान्च्या कडून (त्याना काहीही न देता) कसे काम करवून घ्यावे हे जमण्याकरता कदाचित पिढिजात राजकारणी असावे लागते.

एकुलता एक डॉन's picture

8 Aug 2023 - 2:25 pm | एकुलता एक डॉन

हा धागा जास्त माहीती देइल
https://www.misalpav.com/node/40025