अमानवी बुद्धिमत्ते ( NHI ) अर्थात एलियन्स विषयी माझी बदलती मते : भाग १

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture
हणमंतअण्णा शंकर... in काथ्याकूट
15 Jul 2023 - 8:43 pm
गाभा: 

सर्वप्रथम माझ्या आकलनाच्या प्रवासा विषयी:

मी सहजा सहजी कोणत्याही कॉन्स्पिरसी थिअरी वर भोळेपणाने विश्वास ठेवणाऱ्यातला नाही. पुराव्याने जे सिद्ध होत नाही ते मानायला बुद्धी अजिबात राजी होत नाही. त्यामुळे बिल गेट्सने वॅक्सीनद्वारे कोट्यवधी मानवांमध्ये नॅनो चीप घातल्या आहेत किंवा नेताजी सुभाष चंद्र बोस अजूनही जिवंत आहेत वगैरे सरळ सरळ मूर्ख थेऱ्या हसण्यावारीच नेल्या आहेत. आणि इतर सटल थेऱ्या मात्र तर्काच्या-पुराव्याच्या कसोटीवर घास घासून मान्य अमान्य केल्या आहेत. उदा. डार्विनची लैंगिक निवड थेरी. (नैसर्गिक निवड स्वयंस्पष्ट आहे) 'विदा आधी, निष्कर्ष (काढण्याची घाई) नाही' या तत्त्वावर माझी निष्ठा आहे. मी एकंदरीत 'अमानवी जीव किंवा परग्रहवासी' या विषयाभोवती प्रचंड शंकेखोर होतो. तथापि गेले काही महिने मी या विषयावर बरेच वेळ घालवला आणि मी समोर आलेला विदा नाकारू शकलो नाही. विदा त्याच्या सकृतदर्शनी मूल्याला जसाच्या तसा घेतला तरी कोणत्याही निष्कर्षाप्रती येण्यापूर्वी केवळ त्या विद्याच्या वैचित्र्याने स्तंभित व्हायला झाले.

मतबदलासाठी मानसिक मॉडेल:

एका तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकाने माझ्या सारख्या असंख्य लोकांच्या धडपडीला थोडी सुसूत्रता यावी म्हणून एक फ्रेमवर्क तयार केले आहे. तेच फ्रेमवर्क मी थोडी माझी वैयक्तिक भर घालून तुमच्यापुढे ठेवत आहे. या मॉडेल मध्ये एकूण सहा पातळ्या आहेत. पातळ्या चढत्या भाजणीत आहेत. उदा. पातळी ० ही मान्य करायला भरपूर पुरावा आहे. या पातळीवरचा पुरावा किंवा तर्क समजून घ्यायला सुद्धा खूप कष्ट करायची गरज नाही. पुढच्या पातळ्या ह्या क्रमा क्रमाने जास्त अविश्वसनीय होत जातात. तथापि आधीच्या पातळीचा पुरावा किंवा निष्कर्ष मान्य केला असेल तर काम सोपं होतं.

सर्वप्रथम सगळ्या पातळ्या :

०. विश्वात आपण (म्हणजे पृथ्वीवासीय प्रगत जीव) एकटेच नाही आहोत.
१. अनोळखी उडत्या वस्तू (UFO) किंवा अनोळखी विसंगत घटित (Unidentified Anomalous Phenomenon i. e. UAP) अस्तित्वात असून मानवी आकलनापलीकडे आचरण करतात.
२. अमेरिकन सरकार कडे पडलेल्या किंवा पाडलेल्या UAP आहेत. (कदाचित ते चालविणाऱ्या जीवांचे मृतदेह देखील असावेत)
३. UFO पुराणातल्या बऱ्याच दंतकथा खऱ्या असू शकतात.
४. अमानवी प्रगत जीव आणि मानव यांच्यात संवाद आहे.
५. आकाशगंगेचे किंवा त्याहून मोठ्या वैश्वीक भागाचे फेडरेशन आहे.

आता आपण एकेक पातळी तपासू.

०. विश्वात आपण (म्हणजे पृथ्वीवासीय प्रगत जीव) एकटेच नाही आहोत.

  • निरीक्षण करण्यायोग्य विश्वाचा व्यास ~93 अब्ज प्रकाश-वर्ष आहे
  • अंदाजे २ ट्रिलियन आकाशगंगा आहेत
  • प्रत्येक आकाशगंगेत लाखो - ते - करोडो-ट्रिलियन तारे आहेत.
  • आपल्या आकाशगंगेत लाखो तारे अस्तित्वात आहेत.
  • त्यातल्या असंख्य ताऱ्यांभोवती लहान मोठे ग्रह भिरभिरताहेत.
  • आतापर्यंत जे काही 5,410 एक्सोप्लॅनेट पृथ्वीवरून सापडले आहेत, त्यातले 156 ताऱ्यापासून राहण्यायोग्य क्षेत्रात आहेत. (त्यावरून एकूण जीवनानुकूल ग्रहाची संख्या लक्षात यावी)
  • एक्स्ट्रीमोफाइल जीव दाखवतात की जीवन कमालीचे लवचिक आहे.
  • बोनस: वर्महोल्स आणि वार्प ड्राइव्ह सैद्धांतिकदृष्ट्या (किमान आपल्यासाठी तरी फक्त सैद्धांतिकदृष्ट्या) शक्य आहेत.

१. अनोळखी उडत्या वस्तू (UFO) किंवा अनोळखी विसंगत घटिते (Unidentified Anomalous Phenomenon किंवा UAP) अस्तित्वात असून मानवी आकलनापलीकडे आचरण करतात.

  • अमेरिकन सरकार, अमेरिकन सरंक्षण मंत्रालयांनी आणि नासा या सगळ्यांनी याचे काही सबळ पुरावे सार्वजनिक केले आहेत, किंवा दोनेक लीक झालेले व्हिडीओ आहेत ते खरे आहेत हे जाहीररित्या, असंदिग्ध भाषेत कबूल केले आहेत.
  • NYT सारख्या अतिशय प्रतिष्ठित दैनिकाने २०१७ ला काही व्हिडीओ जाहीर केले आहेत.
  • मला अतिशय आवडलेला एक व्हिडीओ हा मध्य पूर्वेतील आहे. एका मिलिटरी ड्रोन ने अत्यंत वेगाने कोणत्याही propulsion शिवाय सहजगत्या वेगाने प्रवास करणारी एक गोल वस्तू टिपली आहे.
  • २०२१ मध्ये अमेरिकन संरक्षण खात्याने जाहीर केलेला हा रिपोर्ट. पाल्हाळ लावले असले तरी एक गोष्ट ढळढळीत पणे कबूल केली आहे. ती म्हणजे ह्या वस्तू नेमक्या काय आहेत त्याचा थांग लागत नाही. हा रिपोर्ट साधासुधा रिपोर्ट नसून अमेरिकन सरकारचा मूड बदलत असल्याची नांदी आहे. वर ते हेही म्हणताहेत की, या वस्तू रशियन किंवा चायनीज बनावटीच्या नाहीत. आणि त्या अमेरिकन बनावटीच्या सुद्धा नाहीत. त्यातून काय उरले हे सुज्ञास सांगणे न लगे.
  • अमेरिकन संरक्षण खात्याने UAP साठी खालील ५ निरिक्षते नोंदवली आहेत.
    1) Anti-gravity lift ( प्रति गुरुत्वाकर्षण अवरोध )
    2) Sudden and instantaneous acceleration ( तात्काळ त्वरण )
    3) Hypersonic velocities without signatures ( ध्वनीच्या वेगाहून जास्त वेग कोणत्याही इतर बाबींशिवाय )
    4) Low observability, or cloaking ( लपून राहण्याची क्षमता )
    5) Trans-medium travel ( आंतरमाध्यम प्रवास क्षमता, म्हणजेच पाण्यातूनही, निर्वातामधूनही, हवेमधूनही त्याच सहजतेने वरील गोष्टी करणे )
  • नुकतेच अमेरिकन सैन्याने चार उडत्या वस्तू पाडल्या आहेत. त्यापैकी एक चीनी स्पाय बलून असल्याची बतावणी केली गेली. नंतर बायडेन दुसरंच काहीतरी बरळले. एकंदरीत नेमकं काय चालंलय याचा काहीच ताळमेळ नाही.

( वरील सगळे व्हिडिओ हे सरकारने अधिकृत रित्या जाहीर केलेलेच व्हिडिओ आहेत. पदरचे आणि लोकांच्या पदरचे काहीही नाही. गवि यांच्यासारख्या व्यक्तींनी त्याविषयी अधिक माहिती घेतली तर त्यातल्या तांत्रिक बाजू कळतील. कारण काही पायलट असं सांगतात की, काही युएफो यांना कॅप पॉइंट सुद्धा ठाऊक असतात आणि ते बरोब्बर त्याच पॉईंटला थांबतात. )

पुढील भागात आपण अजून खोलात शिरून रॅबिट होल मधून नो नॉनसेन्स गोष्टी नोंदवून ठेवू.
क्रमशः

प्रतिक्रिया

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

15 Jul 2023 - 9:07 pm | हणमंतअण्णा शंकर...

हा व्हिडिओएस्से सगळे उघड केलेले विडिओ संगतवार मांडतो.

जाता जाता : अमेरिकन संसदेत नुकताच एक कायदा होऊ घातला आहे. वरच्या दर्जाचे सिनेटर शुमर यांनी हे बील प्रस्तावित केले आहे. त्या बीलाचे अधिकृत दस्ताऐवज.

एकंदरीत सरकारी पातळीवर बराच मोठा खल सुरु आहे. आणि खूप गोष्टी एका मागोमाग वेगाने घडत आहेत.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

15 Jul 2023 - 9:08 pm | हणमंतअण्णा शंकर...

ही आहे. लेम्मि :

तुर्रमखान's picture

15 Jul 2023 - 11:43 pm | तुर्रमखान

वेगळा आणि माझ्या आवडीचा देखिल विषय.

धाग्यात दिलेल्या लिंका बघेनच.

विश्वाचा पसारा बघता इतर ठिकाणे जीवसृष्ठी असण्याची शक्यता आहे खरं. बट अगेन, नुसत्याच केमिस्ट्री पासून बायलॉजी आणि तेही एकपेशीय जीव ते मानवा सारखा सॉफिस्टिकेटिड आणि क्लिष्ठ प्राणी तयार होणं तेवढंच इंप्रोबॅबल. दुसर्‍या स्केल वर म्हणजे टाईम स्केलवर बघायचं झालं तर इतिहासात काय झालं असेल ते सांगता येत नाही. पृथ्वीवर डायनॉसोरस असण्याचा आणि माणसाच्या उत्क्रांतीपासूनचा कालावधी बघितला तर आश्चर्य वाटतं. म्हणजे डायनॉसोरस एकशे पासष्ठ दशलक्ष वर्षे पृथ्वीवर होते. त्यांच्या नंतर पासष्ठ दशलक्ष वर्षांनंतर मानव आला आणि त्याला आता साधारण फक्त तीन लक्ष वर्षे झाली आहेत. त्यातही विज्ञानामुळे मागच्या शंभर-दोनशे वर्षापासूनच काही माहिती होत आहे.

बायलॉजीमध्ये जसं तंत्रज्ञान वापरून सुक्ष्मातले सुक्ष्मजीव शोधतोय तसंच मोठ्या स्केलमध्ये परग्रहवासीय शोधणं (असतील तर) शक्य होईल.

आपण कितीही उत्क्रांती आणी नॅचरल सिलेक्शन वगैरे म्हणलं तरी नुसत्याच रसायनांपासून खूप सिंपल, प्रिमिटिव्ह-प्रायमल पण सेल्फ रिप्लिकेटींग 'जीव' तयार होणं हे पचायला अवघड आहे. एलियन्सनी पृथ्वीत बीजं रोवली अशी ही एक थेअरी आहे.

बाकी परजीव अस्तित्वात आहेत या नुसत्या माहितीने पृथ्वीवर हलकल्लोळ माजेल त्यामुळे ही माहिती शक्यतोवर (सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे) क्लासिफाईड ठेवण्यात येइल हे ही खरंच.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

16 Jul 2023 - 4:23 pm | हणमंतअण्णा शंकर...

क्लिष्ठ प्राणी तयार होणं तेवढंच इंप्रोबॅबल

हा विषयच कितीही चघळला तरी वेळ पुरणार नाही. आपले वैज्ञानिक ज्ञान जसजसे वाढत आहे तसतसे प्रश्न निकालात निघण्याऐवजी नवीन प्रश्न आणि नवी उत्तरे निर्माण होताहेत.

एन्ट्रॉपी सारखा विषय जर थोडा समजला तर एक नवीन आयाम मिळतो अशा प्रश्नांना.

जेनेटिक्स, मोलेक्युलर बायोलॉजी अशा अनेक क्लिष्ट विज्ञानाच्या अंगाने या प्रश्नांना सामोरे गेले की दरवेळेस नवी आश्चर्य कारक माहिती समोर येते.

मी हे पॉडकास्ट नित्यनेमाने ऐकायला सुचवेन.

Betül Kaçar: Origin of Life, Ancient DNA, Panspermia

Anna Frebel: Origin and Evolution of the Universe, Galaxies, and Stars

Michael Levin: Biology, Life, Aliens, Evolution, Embryogenesis & Xenobots

Nick Lane: Origin of Life, Evolution, Aliens, Biology, and Consciousness

अशी अमेरिकेतील काहींची अवस्था आहे.

कानडाऊ योगेशु's picture

16 Jul 2023 - 9:30 am | कानडाऊ योगेशु

भित्यापोटी नाही भित्यापाठी ब्रह्मराक्षस अशी म्हण आहे.

कंजूस's picture

16 Jul 2023 - 9:32 am | कंजूस

बारीक प्रिंट दिसला नाही.

धर्मराजमुटके's picture

16 Jul 2023 - 10:45 am | धर्मराजमुटके

एलियन्सवर जसा आता लोकांचा हळूहळू विश्वास बसत चालला आहे तसा या ब्रह्मांडाच्या अनंत पसार्‍यात कुठेतरी परमेश्वर आहे आणि तो कोणा देव न मानणार्‍याला कधीतरी दिसावा / सापडावा अशी भाबडी इच्छा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jul 2023 - 11:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'अमानवी जीव, परग्रहवासी, देव, भूतं, आणि अद्भूत अतर्क्य, असलेल्या काल्पनिक गोष्टीमधून वास्तव किंवा सत्य शोधता शोधता अनेक पिढ्यांची माती झाली पण उत्सुकता तीच. अर्थात वरील वाक्यातील जीव आणि वस्तुंचं अधुन मधून दिसणं, अस्तित्वाच्या खुणा, भास, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दावे ती उत्कंठा सामान्य असामान्यांना तितकीच असते, यात काही वाद नाही. असे असले तरी काही अभ्यास, विदा यातून त्यांचा मागोवा, शोध, अद्भूतरम्य कथांइतकेच ते मला कायम आवडते. म्हणून आपलं लेखनही विदा, व्हीडीयो, माहिती उत्सुकता वाढविणारे आणि वाचनीय नक्की आहे, तेव्हा आपले लेखन उत्सुकतेने वाचत आहे.

बाय द वे, आपली पुराण ग्रंथ संपदेत ऋषि-मुनी अभ्यासू वगैरे होते म्हणून दावे केले जातात. त्यांचा खगोलशास्त्रांचा अभ्यासही होता. भाकडकथा जाऊ द्या. पण, त्यांना असा काही अमानवी जीवाचा सुगावा लागल्याचा कुठे वाचनात आले नाही. म्हणजेच, फार पूर्वी नसेल पण आपल्या जगाबरोबर त्या अमानवी जीवांचा सेम टू सेम आपल्यासारखाच आधुनिकतेकडे विज्ञानाकडे प्रवास सुरु झाला असावा असे वाटायला लागते. आपण इतर ग्रहांवर शोध मोहीम चालू ठेवतोय, तसंच त्यांचंही असाच प्रवास चालूय असे वाटते. आपला आणि त्यांचा प्रवास सारखाच चालू असावा असे वाटून सगळं भारीच वाटलं.

अवांतर: अद्भूत रम्य कालखंडातील कादंब-यामधे नायक काडीच्या पेटीच्या आकाराच्या विमान किंवा तत्सम वस्तूमधुन येऊन कोंडुन ठेवलेल्या नायिकांना खिडकीच्या गजांमधून येऊन सुटका करायचे, त्याचीही आठवण झाली. च्यायला, असा वाहवत जातो. क्षमा असावी.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

-दिलीप बिरुटे

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

16 Jul 2023 - 4:08 pm | हणमंतअण्णा शंकर...

सत्य शोधता शोधता अनेक पिढ्यांची माती झाली

सतराव्या शतकात विल्यम हर्शल सारख्या तत्कालिन वैज्ञानिकांनी/निरिक्षकांनी तत्कालिन विज्ञानाच्या आणि पुराव्यांच्या आधारावर अनेक अचाट दावे केलेले होते. मंगळावर, शुक्रावर दुर्बिणीतून दिसणार्‍या सरळ रेषा म्हणजे कालवे आहेत असे दावे. परंतु हे सगळे तंत्र्ज्ञानाच्या मर्यादेमुळे झाले, विदाच जर मर्यादित असेल तर निष्कर्ष मर्यादितच येणार. परंतू म्हणून उत्सुकता शमली नाही.

त्या उत्सुकतेपोटीच आज आपण जेम्स वेब टेलिस्कोपसारख्या महाशक्तीशाली दुर्बिणी आकाशात पाठवत आहोत.

ही अनेक पिढ्यांची झालेली 'माती' खूप खूप सुपीक आहे.

बाय द वे, आपली पुराण ग्रंथ संपदेत ऋषि-मुनी अभ्यासू वगैरे होते म्हणून दावे केले जातात. त्यांचा खगोलशास्त्रांचा अभ्यासही होता. भाकडकथा जाऊ द्या. पण, त्यांना असा काही अमानवी जीवाचा सुगावा लागल्याचा कुठे वाचनात आले नाही

वाचनात आले नाही म्हणून अस्तित्त्वात नाहीच असे कसे म्हणणार?

ही आहे श्री चैतन्य चरितामृत मध्यलीला अध्याय २१ मधील कथा
--
एकदा, जेव्हा कृष्ण द्वारकेवर राज्य करत होते, तेव्हा भगवान ब्रह्मा त्यांना भेटायला आले आणि द्वारपालाने लगेचच भगवान कृष्णांना ब्रह्मदेवाच्या आगमनाची माहिती दिली.

कृष्णाला याची माहिती मिळाल्यावर त्यांनी ताबडतोब द्वारपालाला विचारले, ''कोणता ब्रह्मा? त्याचे नाव काय?'

म्हणून द्वारपाल परत आला आणि ब्रह्मदेवाची चौकशी केली.

द्वारपालाने विचारले, 'कोणता ब्रह्मा?' ब्रह्मदेव आश्चर्यचकित झाले. तो द्वारपालाला म्हणाला, 'कृपया जाऊन भगवान कृष्णाला कळवा की मी चार मुखी ब्रह्मा आहे जो चार कुमारांचा पिता आहे.'

द्वारपालाने मग भगवान श्रीकृष्णांना ब्रह्मदेवाचे वर्णन सांगितले आणि भगवान श्रीकृष्णांनी त्यांना आत जाण्याची परवानगी दिली. द्वारपालाने भगवान ब्रह्मदेवांना आत नेले आणि ब्रह्मदेवाने भगवान श्रीकृष्णांना पाहताच त्यांच्या कमळाच्या चरणी नमस्कार केला.

भगवान ब्रह्मदेवाची पूजा केल्यानंतर, भगवान कृष्णानेही त्यांना योग्य शब्दांनी सन्मानित केले. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला विचारले, 'तू इथे का आला आहेस?'

असे विचारले असता, भगवान ब्रह्मदेवाने लगेच उत्तर दिले, 'मी का आलो ते मी नंतर सांगेन. सर्वप्रथम माझ्या मनात एक शंका आहे जी तुम्ही कृपया दूर करावी अशी माझी इच्छा आहे.

कोणता ब्रह्मदेव तुला भेटायला आला होता याची तू का चौकशी केलीस? अशा चौकशीचे प्रयोजन काय? या विश्वात माझ्याशिवाय दुसरा कोणी ब्रह्म आहे का?'

हे ऐकून श्रीकृष्ण हसले आणि लगेच ध्यान केले.

अमर्यादित ब्रह्मांचे त्वरित आगमन झाले.

या ब्रह्मांची डोकी वेगवेगळी होती. कुणाला दहा डोकी होती, कुणाला वीस, कुणाला शंभर, कुणाला हजार, कुणाला दहा हजार, कुणाला लाख, कुणाला दहा लाख तर कुणाला शंभर दशलक्ष. त्यांच्या चेहऱ्यांची संख्या कोणीही मोजू शकत नाही.

तेथे अनेक भगवान शिवांचे आगमन झाले ज्यांची संख्या एक लाख दहा लाख होती. अनेक इंद्रांचेही आगमन झाले आणि त्यांच्या शरीरावर लाखो डोळे होते.

या सृष्टीच्या चार मुखी ब्रह्मदेवाने जेव्हा कृष्णाची ही सर्व ऐश्वर्ये पाहिली, तेव्हा तो अतिशय विस्मित झाला आणि त्याने स्वतःला अनेक हत्तींमध्ये ससा समजला.

कृष्णाच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व ब्राह्मणांनी त्यांच्या कमळाच्या चरणांना नमस्कार केला, आणि जेव्हा त्यांनी हे केले तेव्हा त्यांच्या शिरस्त्राणांनी त्यांच्या कमळाच्या चरणांना स्पर्श केला.
--

अर्थात सनातन ज्ञानात 'आपले विश्व इतर विश्वांत लहान आहे' याची जाणीव होती. (ही कशी आली याबद्दल मी अनभिज्ञ आहे, जाणून घ्यायला आवडेल.)
मुख्य म्हणजे अनेक खूप तांत्रिक सिद्धांत भारतीय तत्त्वज्ञान दर्शन, कथारूपाने फार छान समजावून देते यात शंका नाही.

वर उल्लेखलेली संपूर्ण कथा आणि त्यातील शेवटी आलेले वर्णन रोचक आहे.
येथे वाचा.
http://www.bhagavatam-katha.com/krishna-story-brahma-visit-to-lord-krish...

याशिवाय सनातन तत्त्वज्ञानात सप्तलोक आणि सप्तपाताळ आहेत - ही समांतर विश्वे असावीत असा माझा कयास आहे.

काहीशा अवांतराबद्दल क्षमस्व!

चांदणे संदीप's picture

16 Jul 2023 - 1:39 pm | चांदणे संदीप

ह्या एलियन किंवा तत्सम युएफो वगैरेंना अमेरिकाच का जास्त आवडते. युगांडा, घाना वगैरे का नाही? भारतानेही यांचे काय घोडे मारले. आपल्या इथल्या न्यूज चॅनेल्सना पर्यायाने लोकांना काहीतरी नवीन विषय मिळेल. सारखं आपलं ते अमेरिकचं काय कौतुक!

थोडक्यात, अमेरिका, रशिया, चीन, जपान हे आर्थिकदृष्ट्या आणि तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत देश सोडून किती देशांकडे ह्या एलियन संदर्भात अधिकृत/जाहीर चर्चा झाली आहे? भारत सरकारने याची कधी काही दखल घेतली आहे का? याचे उत्तर 'नाही' असे असल्यास हे सर्व देश जगाची दिशाभूल करत नसतील कशावरून?

सं - दी - प

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

16 Jul 2023 - 3:59 pm | हणमंतअण्णा शंकर...

युगांडा, घाना वगैरे का नाही

इथेही अशा केसेस सापडल्या आहेत.

झिब्वाब्वे इथल्या मुलांची केस खूप प्रसिद्ध आहे.

त्या केसमधली सगळी मुले एकसाथ खोटे बोलत आहेत, वर गेली तीसेक वर्षे ती मुले तेच खोटं इतक्या मोठ्या प्रमाणावर सस्टेन करत आहेत हेही मानायला मी तयार आहे.

तरीही त्यांना अमेरिकाच जास्त आवडते, इतर देश का नाही हे काही खरं नाही, इतकेच सूचित करतो.

( डॉ. जॅक व्हॅली यांनी जो डेटाबेस शास्त्रीय पद्धतीने तयार केला आहे, त्यातल्या अनेक केसेस मधून एक गोष्ट सातत्याने दिसली आहे ती म्हणजे अणुचाचण्या केंद्रे, पॉवर स्टेशन्स, सैन्यदलांचे बेसेस इथे खूप साईटिंग्ज दिसलेल्या आहेत.

किंबहुना अमेरिकेत सुद्धा युएफो कल्ट हा गोल्ड रश सारखा खूप जुना नाही. खर्‍या अर्थाने हा कल्ट १९४७ च्या रॉझवेल क्रॅश नंतर सुरू झाला आहे. दोन लोकांनी अलिक्डेच दिलेल्या साक्षींनुसार पहिल्या अणुचाचणीनंतर एका महिन्यातच ट्रिनिटी सेंटर येथे एक ऑबजेक्ट पडला होता. म्हणजे साधारण ऑगस्ट १९४५.

भारत सरकार काय करत आहे हे मला ठाऊक नाही. July 16, 1945 ला अमेरिकेने पहिली अणुचाचणी केली. जवळजवळ तीस वर्षांने भारताने ती 18 May, 1974 ला केली.

अमेरिका, रशिया, युरोपियन देश तांत्रिक प्रगतीबाबत आपल्याहून काही दशके पुढे आहेत, आणि सामाजिक प्रगतीबाबत कदाचित एक दोन शतके इतकेतरी मला जाणवते.

गेम थियरीनुसार प्रत्येक देश जगाची दिशाभूल करणारच. त्यात काय विशेष? )

सुबोध खरे's picture

19 Jul 2023 - 10:05 am | सुबोध खरे

त्यातल्या अनेक केसेस मधून एक गोष्ट सातत्याने दिसली आहे ती म्हणजे अणुचाचण्या केंद्रे, पॉवर स्टेशन्स, सैन्यदलांचे बेसेस इथे खूप साईटिंग्ज दिसलेल्या आहेत.

अशा ठिकाणी या गोष्टी जास्त आढळल्या याचे एक कारण या जागांवर डोळ्यात तेल घालून पहारा ठेवला जातो. त्यामुळे जराशी कोणती गोष्ट वेगळी आढळली तर त्यावर पाळत ठेवली जाते असे असावे.

परग्रहावरील लोकांना आपली हीच महत्त्वाची स्थाने माहिती असावीत हे कल्पनाशक्तीच्या बाहेर जाते असे वाटते.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

21 Jul 2023 - 2:39 pm | हणमंतअण्णा शंकर...

परग्रहावरील लोकांना आपली हीच महत्त्वाची स्थाने माहिती असावीत हे कल्पनाशक्तीच्या बाहेर जाते असे वाटते.

कल्पनाशक्तीचा प्रश्नच येत नाही. विदा अविश्वसनीय आहे का नाही इतकाच प्रश्न आहे.

डॉक्टर साहेब, तुम्ही स्वतः नौदलात होता.

युएसएस ओमाहा आणि युएसएस निमित्झ (uss omaha and uss nimitz) इतकं गुगल करून पाहा फक्त.

पेंटॅगॉन ने जाहीर केलेले व्हिडिओ आहेत. पायलट, अधिकारी अनेक लोकांच्या टेस्टिमनी आहेत.

(अर्थात या सगळ्या गोष्टी मानवनिर्मित आहेत असंही असू शकेल.)

एक विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून या गोष्टींकडे पाहा. सध्याच्या आपल्या वैज्ञानिक मर्यादा काय आहेत आणि वरील गोष्टींना सरकारने अ‍ॅनॉमलस का म्हंटले आहे हे लक्षात येईल.

यामागचा भावनिक कार्यकारणभाव कल्पनाशक्तीला ताण देऊन समजून घेणे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे मी कोणत्यातरी एका हायपोथेसिस वर विश्वास ठेवत आहे. जर तो हापपोथेसिस खोटा ठरला तर ते मान्य करणे मला सहजशक्य वाटते तेही मी चुकीचा आहे याविषयी कोणताही अपराधभाव न बाळगता.

आपल्या जीवसृष्टीचे रहस्य उलगडत नाही किंवा तूर्त साध्या केमिस्ट्री फिजिक्सच्या तर्कांनी इतकी जटिलता उकलत नाही म्हणून एलियन किंवा अन्य सुपर ह्युमन शक्तींनी इथे येऊन काही पेरले असे मानण्याने प्रश्न सुटत नाहीत. उलट आपल्यालाही बनवू शकणारे एलियन लोक कसे उत्पन्न झाले? त्यांना कोणी पेरले ? असे जास्तीचे प्रश्न निर्माण होतात.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

16 Jul 2023 - 3:40 pm | हणमंतअण्णा शंकर...

अन्य सुपर ह्युमन शक्तींनी इथे येऊन काही पेरले असे मानण्याने प्रश्न सुटत नाहीत, उलट आपल्यालाही बनवू शकणारे एलियन लोक,

लेखात सांगितलेल्या पातळ्यांमध्ये असे कुठेही सूचित केलेले नाही. कुणी कुणाला पेरले हा मुद्धा मी उपस्थित केला नाही.

आपल्या पृथ्वीला एलियन्सनी भेट दिली आहे का, किंवा ते इथे आहेत का इतक्याच प्रश्नाचा धांडोळा घेत आहे.

जीवोत्पत्ती आणि त्याचे सिद्धांत यांचा उहापोह करणे हा हेतू नाही.

तरीही तुम्ही प्रश्न उपस्थित केला आहे त्याला अनुसरून हे सांगू इच्छितो -

(कुणीही कुणाला पेरले नाही हे गृहीत धरू. सेंटिएन्ट जीव हे उत्क्रांतिजन्यच शक्य आहेत हे गृहीतक मान्य करू), तेव्हा

१. विश्वाचे वय आणि पृथ्वीवरती मानवी उत्क्रांती लक्षात घेता, लाखो वर्षे उत्क्रांत झालेले सेंटिएन्ट जीव विश्वात इतरत्र असण्याची शक्यता आहे.
२. मानवाच्या तांत्रिक प्रगती झेप गेल्या ३००/४०० वर्षांत एक्स्पोनेन्शियल पद्धतीने वाढली आहे. १०००० वर्षातच जर आपण कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करण्याइतपत झेप घेतली असेल तर ज्यांना अशी लाखो वर्षे मिळाली आहेत त्यांची झेप कुठवर असू शकते याची कल्पनाही शक्य नाही.

गवि's picture

16 Jul 2023 - 3:47 pm | गवि

लेखात सांगितलेल्या पातळ्यांमध्ये असे कुठेही सूचित केलेले नाही. कुणी कुणाला पेरले हा मुद्धा मी उपस्थित केला नाही.

त्याला उद्देशून हे नाही म्हटलेले.

तर्कवादी's picture

16 Jul 2023 - 5:38 pm | तर्कवादी

आणि इतर सटल थेऱ्या मात्र तर्काच्या-पुराव्याच्या कसोटीवर घास घासून मान्य अमान्य केल्या आहेत. उदा. डार्विनची लैंगिक निवड थेरी. (नैसर्गिक निवड स्वयंस्पष्ट आहे)

याबद्दल आपले विस्तृत मत जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे डाविनचा उत्क्रांतीवाद आपण अमान्य करत असाल तर आपणास मान्य असलेला सिद्धांत कोणता याबाबत उत्सुकता आहे.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

16 Jul 2023 - 7:59 pm | हणमंतअण्णा शंकर...

डार्विनची नैसर्गिक निवड स्वयंस्पष्ट रित्या सर्वांना मान्य आहे. परंतु, त्याने मांडलेली दुय्यम लैंगिक निवड थेअरी आजही लोकांना फारशी पटत नाही.

मला दोन्ही थिअरी पूर्णपणे मान्य आहेत.

अण्णा, कोणताही मेंटल ब्लॉक न ठेवता या विषयावर objectively माहिती गोळा करण्याच्या उपक्रमाबद्दल प्रथम कौतुक.

आता या विषयावर येणारे पुरावे, प्रसंगाची वर्णने इत्यादींत असलेला समान धागा बघू. यातील कोणत्याही मुद्द्याला अपवाद असल्यास तो निश्चित रोचक असेल. पण एरवी केवळ या काही प्राथमिक मुद्द्यांपायी हा विषय भुते, आत्मे, near death experience, कन्स्पिरसी थियरी इत्यादि सरहद्दीत शिरू लागतो.

१. यू एफ ओ सदृश सर्व दर्शने ही एकेकट्या व्यक्तीला किंवा अगदी छोट्या समूहाला झालेली असतात. पूर्ण शहर किंवा गाव दिवसा ढवळ्या असे दृश्य पाहील्याची नोंद नसते. अर्थात एलियन जीव हे शक्यतो लपून छपून नजरेत न भरता संचार करू इच्छित असतील हे गृहीत धरता येईल. पण तरीही एखाद्या ठिकाणी पोचण्यासाठी / विशिष्ट वेळी असण्यासाठी कोणत्या तरी प्रकारचा प्रवास करून तिथे जावे लागेल. सर्वच दाट वस्तीची ठिकाणे आणि उजेडाची वेळ टाळून हे स्थलांतर कठीण दिसते.

२. सर्व चित्रे अत्यंत धूसर आहेत. असतात. किंबहुना जितके स्पष्ट वर्णन प्रत्यक्षदर्शी सांगतो त्या मानाने चित्रे म्हणजे एक हलती सावली, थरथरता धूसर आकार इतकीच असतात. त्याही वर जाऊन, आधुनिक काळात अशी चित्रे व्हिडिओ कमी येताना दिसतात. सत्तर ऐंशीच्या दशकात जेव्हा असे विमानातून केलेले छायाचित्रण अगदीच लो क्वालिटी असण्याच्या कारणाने ते खपून गेले. आता अपेक्षा अधिक स्वच्छ प्रतिमा आणि फुटेजची असते. तसे दाखवणे अवघड.

३. सर्व वर्णने ही एकाच प्रकारची आहेत आणि बहुतांश वर्णनांचे साधर्म्य सायन्स फिक्शन किंवा गूढकथा यांमध्ये कल्पिलेल्या वर्णनाच्या जवळ जाते. (गोल, तबकडी, एका जागी तरंगणे) एलीयंसचे उद्देश देखील अशा कथांमध्ये असतात तसे भासतील (मानवजातीवर संशोधन, कोणाला उचलून नेण्याचा प्रयत्न, गुप्त टेहेळणी) अशी वर्णने असतात.

४. जे काही येणार ते गुप्त रुपात येऊन विशिष्ट बिंदूवर प्रकट होत असेल आणि त्याच्या प्रवासात ते अदृश्य राहू शकत असेल तर मग
४अ. पूर्णवेळ अदृष्यच राहणे अधिक तर्कशुद्ध ठरले असते. केवळ चार मनुष्यांच्या एका समूहाला मध्यरात्री दचकवण्या पुरते दर्शन नेण्यात काय मिष्चिफ असावी?
४ब. जर असे कुठूनही कसेही प्रकट होणे शक्य आहे तर हे सर्व शिंचे हवेतच का उडत असतात? बाहेरून येणे म्हणजे आकाशातून येणे ही रूढ संकल्पना इथे दिसते.

५. जर विविध देशांत असे पक्के अवशेष मिळाले असतील तर ते इतके लपवून ठेवण्यात काय हशील? बरे एका देशाची तशी गुप्ततेची पॉलिसी असेलही. इतरही देश आटापिटा करून हे सर्व लपवत आहेत? उलट जनसामान्यांना योग्य तो इशारा देणे, सावधगिरीच्या सूचना देणे, त्यांचे सहकार्य मागणे, माहिती फोटो पाठवण्यासाठी पब्लिक लिंक देणे असे केले असते.

अनेक मुद्दे आहेत.

केवळ तात्विक दृष्ट्या तसे काहीही शक्य असतेच.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

16 Jul 2023 - 7:48 pm | हणमंतअण्णा शंकर...

यू एफ ओ सदृश सर्व दर्शने ही एकेकट्या व्यक्तीला किंवा अगदी छोट्या समूहाला झालेली असतात. पूर्ण शहर किंवा गाव दिवसा ढवळ्या असे दृश्य पाहील्याची नोंद नसते.

हे खरे असले तरी अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे अनेक लोकांनी, पूर्ण शहराने युफओ पाहिल्याचे दावे केलेले आहेत. तरीही आपण हा Anecdotal विदा मानू. उदा. बेल्जियन केस.

म्हणून मी कोणत्याही एका व्यक्तीने दिलेला विदा, धूसर व्हिडिओ यावर बोलत नाही. नासा ने अधिकृत रित्या जाहीर केलेला ऑर्ब व्हिडिओ मला मात्र बुचकळ्यात पाडतो.

अर्थात अशा संस्थांकडे अजून स्पष्ट व्हिडिओ किंवा फोटो असतील*. किंवा जाहीर केलेल्या व्हिडिओ यांचे स्पष्ट व्हर्जन असतील.

मुद्दा हा आहे, की व्हिडिओ किंवा फोटो कितीही धूसर किंवा अस्पष्ट असला तरी तो कुणी जाहीर केला हे महत्त्वाचे आहे. म्हणून मी नासा, किंवा संरक्षण खाते यांचे व्हिडिओ गंभीररित्या घेतो.

२. सर्व चित्रे अत्यंत धूसर आहेत. असतात. किंबहुना जितके स्पष्ट वर्णन प्रत्यक्षदर्शी सांगतो त्या मानाने चित्रे म्हणजे एक हलती सावली, थरथरता धूसर आकार इतकीच असतात. त्याही वर जाऊन, आधुनिक काळात अशी चित्रे व्हिडिओ कमी येताना दिसतात. सत्तर ऐंशीच्या दशकात जेव्हा असे विमानातून केलेले छायाचित्रण अगदीच लो क्वालिटी असण्याच्या कारणाने ते खपून गेले. आता अपेक्षा अधिक स्वच्छ प्रतिमा आणि फुटेजची असते. तसे दाखवणे अवघड.

हे मान्य आहे. तथापि आपण, हौशे, नवशे आणि गवशे वेगळे केले पाहिजेत. मी पुढच्या भागात अनेक थापाड्यांचीही माहिती देईन. युएफओ पुराणात थापाड्यांचे प्रमाण प्रचंड आहे.

शिवाय नासाच्या स्वतःच्या म्हणण्यानुसार जवळ जवळ सर्व युएफओ एक्स्प्लेन करता येतात. परंतु ३% केसेस मात्र नाहीत.

आपण त्या ३% ४% टक्क्यांचीच बात करत आहोत. शिवाय सगळेच पुरावे काही व्हिडिओ किंवा फोटो नसतात.
रडारचा विदा, प्रत्यक्ष पदार्थ यांचे काय?
त्यांचे विष्लेषण करणे प्रचंड खर्चिक काम आहे.
उदा. गॅलिलिओ प्रोजेक्ट

काही पदार्थांचे असे आयसोटोप्स आढळले आहेत जे मानवाला त्या स्केल मध्ये व्यापारी तत्त्वावर, औद्योगिक स्केल वर देखील शक्य नाही.

उदा. गॅरी नोलान यांनी तपासलेले ब्राझील येथील नमुने. मॅग्नेशियमचे अतिशय शुद्ध आयसोटोप कोण कशाला तयार करेल? तेही अगदी आण्विकपातळीवर जाऊन?

३. सर्व वर्णने ही एकाच प्रकारची आहेत आणि बहुतांश वर्णनांचे साधर्म्य सायन्स फिक्शन किंवा गूढकथा यांमध्ये कल्पिलेल्या वर्णनाच्या जवळ जाते. (गोल, तबकडी, एका जागी तरंगणे) एलीयंसचे उद्देश देखील अशा कथांमध्ये असतात तसे भासतील (मानवजातीवर संशोधन, कोणाला उचलून नेण्याचा प्रयत्न, गुप्त टेहेळणी) अशी वर्णने असतात.

मलाही हे प्रश्न आहेत. म्हणूनच सत्य 'परग्रहवासी गृहीतक' आहे की अजून काही वेगळेच? मुद्दा हा आहे की हा वैज्ञानिक प्रश्न आहे की नाही हे तरी लोक मान्य करतात का? ते मान्य झाल्यावर मग विदा खोदायला घेणे आणि अधिकाधिक सत्याच्या जवळ जाणे ही प्रोसेस गंभीररित्या होणे गरजेचे आहे. हसण्यावारी नेऊन नाही.

४. जे काही येणार ते गुप्त रुपात येऊन विशिष्ट बिंदूवर प्रकट होत असेल आणि त्याच्या प्रवासात ते अदृश्य राहू शकत असेल तर मग
४अ. पूर्णवेळ अदृष्यच राहणे अधिक तर्कशुद्ध ठरले असते. केवळ चार मनुष्यांच्या एका समूहाला मध्यरात्री दचकवण्या पुरते दर्शन नेण्यात काय मिष्चिफ असावी?
४ब. जर असे कुठूनही कसेही प्रकट होणे शक्य आहे तर हे सर्व शिंचे हवेतच का उडत असतात? बाहेरून येणे म्हणजे आकाशातून येणे ही रूढ संकल्पना इथे दिसते.

टिक टॅक म्हणून जी घटना संरक्षण खात्यांने अधिकृत रित्या जाहीर केलेली आहे, त्या घटनांच्या साक्षीदारांनी म्हण्जे पायलट यांच्या साक्षी तपासाल्यवर आपली तर्कशुद्धता आणि त्या ऑब्जेक्टची तर्कशुद्धता यात जमीन अस्मानाचा फरक आहे. शिवाय तुम्ही पाचवे निरीक्षित पाहिले नाही का?

5) Trans-medium travel ( आंतरमाध्यम प्रवास क्षमता, म्हणजेच पाण्यातूनही, निर्वातामधूनही, हवेमधूनही त्याच सहजतेने वरील गोष्टी करणे )

काही यु.ए.पी पाण्यातही सहजगत्या प्रवास करतात असं खुद्द संरक्षण खातेच म्हणत असेल तर आपण ते का अमान्य करावे?

५. जर विविध देशांत असे पक्के अवशेष मिळाले असतील तर ते इतके लपवून ठेवण्यात काय हशील? बरे एका देशाची तशी गुप्ततेची पॉलिसी असेलही. इतरही देश आटापिटा करून हे सर्व लपवत आहेत? उलट जनसामान्यांना योग्य तो इशारा देणे, सावधगिरीच्या सूचना देणे, त्यांचे सहकार्य मागणे, माहिती फोटो पाठवण्यासाठी पब्लिक लिंक देणे असे केले असते.

५. जर विविध देशांत असे पक्के अवशेष मिळाले असतील तर ते इतके लपवून ठेवण्यात काय हशील? बरे एका देशाची तशी गुप्ततेची पॉलिसी असेलही. इतरही देश आटापिटा करून हे सर्व लपवत आहेत? उलट जनसामान्यांना योग्य तो इशारा देणे, सावधगिरीच्या सूचना देणे, त्यांचे सहकार्य मागणे, माहिती फोटो पाठवण्यासाठी पब्लिक लिंक देणे असे केले असते.

माहित नाही. रिव्हर्स इंजिनियरिंग हा एक उद्देश असू शकतो.
इतर देशांचे माहिती नाही, परंतु अमेरिकेने प्रोजेक्ट ब्ल्यू बूक नावाचा अधिकृत कार्यक्रम काही वर्षे चालवून बंद केला. का केला, कसा केला तेही खूप रोचक आहे.
इतर देशांचे माहित नाही. भारतासारख्या देवभोळ्या देशात सरकार स्वतःहून असे करेल याची काडीचीही शक्यता मला वाटत नाही.
परंतू लपवालपवी मागे कोल्ड वॉरने केलेली मानसिकता असू शकते. जी पुढच्या पिढीत नाही म्हणून सध्याची सरकारे किमान अशा संस्था तरी स्थापन करीत आहेत. ज्या या प्रकारात एकंदरीत पारदर्शकता आणतील.

आग्या१९९०'s picture

16 Jul 2023 - 6:34 pm | आग्या१९९०

गुपचूप पृथ्वीवर येण्यापेक्षा ह्या यू एफ ओ स्पेस स्टेशनवर का जात नाही? अंतराळविरांसकट पूर्ण स्पेस स्टेशन ताब्यात घेऊ शकतील.

कर्नलतपस्वी's picture

16 Jul 2023 - 6:49 pm | कर्नलतपस्वी

जड आहे पण नवीन माहीती कळेल. प्रतिसाद सुद्धा दमदार आहेत.

अमेरिकन त्रिशंकू's picture

16 Jul 2023 - 8:04 pm | अमेरिकन त्रिशंकू

UAP = Unidentified Aerial Phenomenon

अ)आपण मर्त्य मानव आणि जीव पृथ्वीवर आहोत. आपले प्राधान्य
अ१)प्राणवायू
अ२)सूर्यप्रकाश
अ३)जीवांची विविधता

ब)मर्त्य मानवासाठी आणखी काही
ब१)खनिजे -धातू,तेल,कोळसा.
ब२)प्रेम,लालसा.
.....
आता आपण हेच प्राधान्य इतर काही वैश्विक जीवांना लागू धरत आहोत. त्यांचं प्राधान्य वेगळं असू शकेल. ते समजलेलं नाही. ते इथे येतात पण त्यांना हवं असलेलं न सापडल्याने लगेच निघून जात असतील.

विवेकपटाईत's picture

17 Jul 2023 - 9:01 am | विवेकपटाईत

ब्रम्हांडात सर्वत्र जीवन आहे फक्त आपल्याला त्याचे ज्ञान नाही. बाकी लेख उत्तम आहे.

कोणत्याही निरिक्षणासाठी निरीक्षक अस्तित्वात येणे /असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे ज्या ब्रह्मांडात जीवन उर्फ निरीक्षक अस्तित्वात येऊ शकतो तेच ब्रह्मांड अस्तित्वात येऊ शकते. त्या जीवनास शक्य करण्यासाठी सर्व ट्यूनिंग जमत जमत आले तरच ते विश्व "असते".

-अँथरोपिक प्रिन्सिपलचे एक ओबड धोबड रूप.

प्रसाद गोडबोले's picture

18 Jul 2023 - 10:18 am | प्रसाद गोडबोले

कोणत्याही निरिक्षणासाठी निरीक्षक अस्तित्वात येणे /असणे अत्यावश्यक आहे.

:
उत्तम !
निरिक्षक नसेल तर निरिक्ष्य आणि निरिक्षण दोन्हीही नसतात !

हेच अध्यात्माच्या भाषेत लिहायचे झाले तर :

जिये प्राणेश्वरीवीण । शिवीहीं शिवपण ।
थारों न शके ते आपण । शिवें घडली ॥ १-२८ ॥

शक्ती आहे म्हणुन आपण शिव आहे असे म्हणतो , शिव आहे असे आकलन होते , जर शक्तीच नसेल तर सर्वच शिव शिव आहे, मग शिव आहे हे म्हणाणाराही शिवच आहे , रादर फक्त "आहेच" , म्हणणे वगैरे नाहीच, म्हणजे शक्ती नाही तिथे शिवपण आहे असे बोलणे ही नाही अन आकलन करणे ही नाही. बस्स "आहे".
आणि अशी ही शक्ती शिवातुन उद्भवली असे आपण म्हणतो ! (कसले मजेशीर आहे हे!)

जे निरिक्ष्य आहे त्यातुनच निरीक्षक उद्भवत आहे , आणि निरीक्षक आहे म्हणुन निरिक्ष्य आहे असे निरिक्षण होत आहे. ह्या दोघांचं(?) असणं हे कालिदासाच्या शब्दात सांगायचे झाले तर "वागर्थाविव सम्पृक्तौ " असं आहे !

असो. आपल्या प्रतिसाद वाचुन एकदम उर्फुर्तपणे ह्या काही ओव्यांची आठवण आली म्हणुन लिहिले.
अवांतराबद्दल क्षमस्व !

बाकी एलियन्स विषयी काही बोलायचे नाही. :)

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Jul 2023 - 12:56 pm | राजेंद्र मेहेंदळे

प्रतिसाद समजून घेण्यासाठी २ वेळा वाचला. थोडेसे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी प्रिन्सिपल सारखे वाटतेय. म्हणजे फलाटावर उभा असलेला माणुस, विरुद्ध बाजुने जाणार्‍या ट्रेनमधील माणुस आणि त्याच दिशेने जाणार्‍या ट्रेनमधील माणुस यांना ट्रेनचा वेगवेगळा वेग अनुभवाला येईल. पण ट्रेनमध्ये बसुन प्रवास करणार्‍या माणसासाठी तो शून्य वेग असेल कारण ट्रेन व तो दोघेही एकाच वेगाने एकाच दिशेत जात आहेत.

म्हणजेच
दिपकी दिपक मावळल्या ज्योती, घरभरी वाती शून्य झाल्या असावे काय? जाउदे विषय अवघड आहे.

प्रश्न : विश्वातील अगणित तार्‍यांपैकी काही तार्‍यांभोवती असणर्‍या ग्रहांवर सजीव असू शकतात का ?
उत्तर (माझ्या मते) : असू शकतील , तत्वतः शक्यता नाकारणे अयोग्यच
प्रश्न : असे परग्रहावरील सजीव पृथ्वीवर येत असतील का ?
उत्तर : शक्यता खूप कमी वाटते याची कारणे
१) असे ग्रह पृथ्वी पासून अनेक प्रकाशवर्षे दूर असेल. इतक्या दुरुन पृथ्वीवर येण्यास व पुन्हा आपल्या ग्रहावर परत जाण्यास हजारो नाहीतरि किमान शेकडॉ वर्षे लागू शकतील (कारण त्यांचे तंत्रज्ञान कितीही प्रगत असले तरीही प्रकाशाच्या वेगाने ते प्रवास करु शकणार नाहीत
२) पण तरीही त्या सजीवांचे आयुष्य्मान फार प्रचंड असेल आणि अतिप्रगत (मिपाच्या अतिप्रगत तंत्रज्ञानामुळे अतिप्रगत शब्द टंकणे जिकरीचे होते. ते असो !!) तंत्रज्ञानामुळे ते पृथ्वीजवळ येत असतील असे मानले तरी तसे करण्यामागे ठोस कारण वा उद्दिष्ट दिसत नाही. ते येतात, ते (क्वचित आणि धूसरपणे) दिसतात आणि ते जातात !! काय जेवणानंतर लाँग ड्राईव्हला (किंवा फ्लाय म्हणू) येतात का ? आल्यावर कधीच कुठे जमिनीवर उतरत नाहीत की ठोस काही करत नाहीत, की आल्यासरशी काही दिवस रहात नाहीत.. असे कसे ?
३) काही लोकांना ते दिसतात (म्हणजे त्यांची वाहने, तबकड्या ई) ,मग त्यावेळी उपग्रहाद्वारे त्यांची अधिक सुस्पष्ट छायाचित्रे, चित्रफिती मिळत नाहीत का ? आजच्या काळात आधुनिक खगोलीय दुर्बिणी , रेडिओ दुर्बिणी , उपग्रह ई सर्व २४*७ कार्यरत असूनही त्या वस्तुंचे प्रकटणे हे इतके संदिग्ध का ? एकीकडे आपण कॉस्मिक किरण, गुरुत्वीय लहरी यांसारख्या क्षीण बाबींचे नि:संदिग्ध पुरावे देवू शकलो आहोत तर इतक्या मोठ्या वस्तुंच्या प्रकटण्याची निसंदिग्धपणे पुस्ती का केली गेली नसेल अजून ?
प्रश्नः पण तरीही असे सजीव पृथ्वीवर कधीच आले नसतील किंवा भविष्यात कधीच येणार नाहीत असे खात्रीने म्हणता येईल का ?
उत्तर : नाही , असे म्हणता येणार नाही. एक शक्यता म्हणून कदाचित यापुर्वी ते येवून गेले असतील आणि भविष्यातही येवू शकतील हे अमान्य करता येणार नाही. पण ते आलेत, त्यांनी पाहिलं आणि ते गेलेत.. कुठे कुणाला त्रास दिल्याच्या नोंदी नाहीत तर कशाला चिंता करा !! भविष्यतही त्रास देणार नाहीत याची खात्री नाही .. पण त्याची चिंता आताच का करा ? अजून ते कोण ? कोणत्या ग्रहावरुन आलेत वगैरे काहीच माहित नाही.. त्यामुळे फारतर ०.००००००१ % वगैरे अशी ज्याची शक्यता आहे अशा संकटाचा किती विचार करावा ? यापेक्षा कितीतरी अधिक शक्यता असलेली संकटे पृथ्वीवर येतच असतात आणि भविष्यातही येवू शकतात (उदा: तीव्र भूकंप , त्सुनामी )

सौंदाळा's picture

17 Jul 2023 - 7:13 pm | सौंदाळा

प्रतिसाद पटला आणि आवडला

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

17 Jul 2023 - 7:39 pm | हणमंतअण्णा शंकर...

प्रतिसाद आवडला. मी ही याच प्रश्नांमधून गेलोय. आणि उत्तरे शोधायचा प्रयत्न करत आहे.

तरीही तुमच्या सगळ्या प्रतिसादाचे सार समजावून घेऊन मी हा प्रतिवाद करतो.

प्रश्न : असे परग्रहावरील सजीव पृथ्वीवर येत असतील का ?

नुकतेच आपण चांद्रयान पाठवले. का? मुंबईमध्ये चालता चालता मॅनहोलमधून माणूस वाहत जातो. पायाखालचे पॉटहोल दुरुस्त करण्याऐवजी मान वर करून आपण चंद्राकडे नजर लावून तिथले क्रेटर तपासण्याची काय हौस आहे माणसाला?
परत येण्याची काहीही शक्यता नसताना देखील आपण मंगळावर पाय ठेवणारच आहोत ना येता काही वर्षात? का?

या प्रश्नाचे उत्तर आपण द्यावे.

असे ग्रह पृथ्वी पासून अनेक प्रकाशवर्षे दूर असेल. इतक्या दुरुन पृथ्वीवर येण्यास व पुन्हा आपल्या ग्रहावर परत जाण्यास हजारो नाहीतरि किमान शेकडॉ वर्षे लागू शकतील (कारण त्यांचे तंत्रज्ञान कितीही प्रगत असले तरीही प्रकाशाच्या वेगाने ते प्रवास करु शकणार नाहीत

आपण आपल्या टाईमस्केल नी विचार करतो. त्यांचा टाईम स्केल खूप वेगळा असू शकतो.

२) पण तरीही त्या सजीवांचे आयुष्य्मान फार प्रचंड असेल आणि अतिप्रगत (मिपाच्या अतिप्रगत तंत्रज्ञानामुळे अतिप्रगत शब्द टंकणे जिकरीचे होते. ते असो !!) तंत्रज्ञानामुळे ते पृथ्वीजवळ येत असतील असे मानले तरी तसे करण्यामागे ठोस कारण वा उद्दिष्ट दिसत नाही. ते येतात, ते (क्वचित आणि धूसरपणे) दिसतात आणि ते जातात !! काय जेवणानंतर लाँग ड्राईव्हला (किंवा फ्लाय म्हणू) येतात का ? आल्यावर कधीच कुठे जमिनीवर उतरत नाहीत की ठोस काही करत नाहीत, की आल्यासरशी काही दिवस रहात नाहीत.. असे कसे ?

या प्रश्नाला अनेक रोचक उत्तरे आहेत. एक वानगीदाखल देतो. ते मी मान्य केलेले उत्तर आहेच असे नाही.

झू हायपोथेसिस : मानव काझीरंगा अभयारण्यात एकशिंगी गेंडा पाहायला जातो तेव्हा शक्यतो तिथली इकोसिस्टिम मानवी अस्तित्त्वाने प्रभावित होऊ नये असा प्रयत्न करतो. म्हणजे ज्यांना आपण न्याहाळत आहोत त्यांना आपल्या अस्तित्त्वाचा पत्ता लागू न देणे. तरीही आपल्या गाड्या घोडे हत्ती त्यांना दिसतातच.

भारत सरकार उत्तर सेन्टिनेल बेटावरच्या आदिवास्यांना त्यांच्या नकळत पूर्ण संरक्षण देते आणि कायद्याने त्या बेटावरच्या आदिम मानवी जीवनात अजिबात ढवळाढवळ न करण्याचा निर्णय घेते. भारत हा त्या बेटाच्या तुलनेत प्रचंड शक्तीशाली, प्रचंड लोकबळ आणि पिसाट लोकांचा देश आहे. तरीही आपल्या सैन्यदलांनी, खासदारांनी ही भूमिका घेतली? का बरे? अर्थात ही एक मानवी भूमिका झाली. अजूनएक भूमिका युरोपियन राष्ट्रांनी मध्ययुगात घेतली. नवीन भूभाग शोधायचे आणि तिथे कॉलन्या करायच्या. तिथलं जनजीवन ढवळूनच नव्हे तर प्रसंगी उध्वस्त करून टाकायचे. एखादी परजीवजात असाच मानवी विचार करणार नाही असे गृहीत धरू. त्यामुळे ह्या गोष्टी का घडताहेत त्याचे विष्लेषण करत राहू.

कशाला चिंता करा !! भविष्यतही त्रास देणार नाहीत याची खात्री नाही .. पण त्याची चिंता आताच का करा ? अजून ते कोण ? कोणत्या ग्रहावरुन आलेत वगैरे काहीच माहित नाही.. त्यामुळे फारतर ०.००००००१ % वगैरे अशी ज्याची शक्यता आहे अशा संकटाचा किती विचार करावा ?

मी लेखामध्ये चिंता व्यक्त केली नाही, किंबहुना हे संकट आहे असाही कुठे सूर नाही तरीही तुम्हाला असे का वाटले हे कळले तर बरे होईल.

तर्कवादी's picture

18 Jul 2023 - 4:30 pm | तर्कवादी

मी लेखामध्ये चिंता व्यक्त केली नाही, किंबहुना हे संकट आहे असाही कुठे सूर नाही तरीही तुम्हाला असे का वाटले हे कळले तर बरे होईल.

मी व्यक्तिशः तुमच्याबद्दल म्हंटलं नाही. एकूणातच परग्रहवासी सजीव (एलियन्स) बद्दल काही लोकांकडून / गटांकडून जो काही उपहापोह केला जातो तो मला बहुतांशी अनाठायी वाटतो. बरं इतका अभ्यास चालवून ठोस काही हाती लागले आहे किंवा एखादा सिद्धांत निश्चित केला गेला आहे (तो खरा की खोटा हा पुढचा विषय) असं झालं नाही. म्हणजे परग्रहवासी कदाचित पृथ्वीवर येत असावेत इतकंच काय ते अजून सांगितलं जातंय.. ते नेमके कुठून / किती दूरुन येतात ? कशासाठी येतात वगैरेबद्दल काहीच मांडलेलं नाही.

कॉमी's picture

18 Jul 2023 - 8:14 pm | कॉमी

रोचक !

अमेरिकन त्रिशंकू's picture

19 Jul 2023 - 2:22 am | अमेरिकन त्रिशंकू

https://en.wikipedia.org/wiki/Drake_equation#:~:text=The%20Drake%20equat....

The Drake equation is:[1]


=




p


e


l


i


c


{\displaystyle N=R_{*}\cdot f_{\mathrm {p} }\cdot n_{\mathrm {e} }\cdot f_{\mathrm {l} }\cdot f_{\mathrm {i} }\cdot f_{\mathrm {c} }\cdot L}
where

N = the number of civilizations in the Milky Way galaxy with which communication might be possible (i.e. which are on the current past light cone);
and

R∗ = the average rate of star formation in our Galaxy
fp = the fraction of those stars that have planets
ne = the average number of planets that can potentially support life per star that has planets
fl = the fraction of planets that could support life that actually develop life at some point
fi = the fraction of planets with life that actually go on to develop intelligent life (civilizations)
fc = the fraction of civilizations that develop a technology that releases detectable signs of their existence into space
L = the length of time for which such civilizations release detectable signals into space

अवांतरः
आधुनिक जगाच्या नकाशाशी तंतोतंत जुळणारी अशी पृथ्वीची रचना महर्षी व्यासांनी हजारो वर्षांपूर्वी लिहिली आहे. हे महाभारताच्या भीष्मपर्वात लिहिले आहे. महाभारताचा कालखंड जरी ५००० वर्षांचा मानला तरी पृथ्वीचा खरा नकाशा हजारो वर्षांपूर्वी आपल्या विद्वानांनी सांगितला होता हेही सिद्ध होते.
त्यांच्या मते, चंद्रावरून पृथ्वी पाहिल्यावर ती शक (ससा) दोन भागात आणि पिप्पल (पाने) या दोन भागात दिसते. महर्षी व्यास महाभारताच्या भीष्मपर्वात लिहितात:

सुदर्शनं प्रवक्ष्यामि द्विपं तु कुरुनंदन ।
परिमंडलो महाराज द्विपोसौ चक्रसंस्था ।
यथा हि पुरुषः पश्येदादर्शे मुखमात्मनः ।
आणि सुदर्शन बेटावर दिसणारे चंद्रमंडले.
द्विरांशे पिप्पलस्त्र द्विरांशे च शशो महान ।

अकराव्या शतकात श्री रामानुजाचार्य यांनी महर्षी व्यासांनी वर्णन केलेला नकाशा तयार केला. श्री रामानुजाचार्य यांनी ज्या वेळी हा नकाशा तयार केला, तेव्हा संपूर्ण जगाला पृथ्वी सपाट आहे असे वाटायचे.
हा नकाशा येथे पाहता येईलः https://www.dharmsansar.com/2020/05/vedvyas-naksha.html

कॉमी's picture

19 Jul 2023 - 6:59 pm | कॉमी

डिस्क्लेमर : मी हा लेख वाचला, लेखातल्या काही लिंक ह्यापूर्वी पाहिल्या असतील, पण सगळ्या लिंक उघडून पाहिल्या नाहीत.

UAP मध्ये माणसास ज्ञात नसलेले तंत्रज्ञान आहे.
ह्याचे दोन प्रकारे स्पष्टीकरण येऊ शकते.

१. अमेरिकन सरकारला माहीत नसणारे तंत्रज्ञान पृथ्वीवरच्या काही माणसांनी आत्मसात केले आहे.

२. हे तंत्रज्ञान पृथ्वीबाहेरील आहे.

आता आपण ह्यातले कोणतेही हायपोथेसिस फेकून देऊ शकत नाही. आणि कोणतेही हायपोथेसिस सिद्ध सुद्धा करू शक्य नाही.

संग्राम's picture

19 Jul 2023 - 8:56 pm | संग्राम
कर्नलतपस्वी's picture

20 Jul 2023 - 7:29 pm | कर्नलतपस्वी

माहितीपूर्ण असा लेख. लेखक व प्रतिसादकांचे आभार.

वाचतो आहे.

अण्णा धन्यवाद.

निनाद's picture

8 Aug 2023 - 9:40 am | निनाद

माजी यूएस गुप्तचर अधिकारी, डेव्हिड ग्रुश यांनी वॉशिंग्टनमधील हाऊस निरीक्षण समितीसमोर शपथेखाली साक्ष दिली आणि दावा केला की यूएस सरकारकडे यूएफओ आणि अ-मानवी नमुने आहेत.
ग्रुश यांना क्रॅश झालेल्या आणि आता अमेरिकन सरकारच्या ताब्यात असल्या यूएफओ बद्दल प्रश्न विचारण्यात आला. अशा घटनांमधून र्प्राप्त झालेल्या "जैविक" अस्तित्वाची पुष्टी ही केली आहे. त्यांनी सांगितले आहे की हे जीव "मानवेतर" स्वरूपाचे होते.
पण - हा पणच महत्त्वाचा आहे...

ग्रुश म्हणाले की त्याने वैयक्तिकरित्या कोणतीही परकीय वाहने किंवा एलियन बॉडी पाहिलेली नाहीत! आणि त्याची मते यूएपी टास्क फोर्समधील त्याच्या भूमिकेत चार वर्षांत मुलाखत घेतलेल्या ४० हून अधिक साक्षीदारांच्या दाव्यावर आधारित आहेत.

एकुणच हा भंपकपणा असावा असे मानायला जागा आहे.

चित्रगुप्त's picture

8 Aug 2023 - 10:13 pm | चित्रगुप्त

ही पुस्तके वाचली आहेत का कोणी ?

...

मी खूप वर्षांपूर्वी ही दोन्ही वाचली होती. आणखी बरीच पुस्तके आहेत याची. हजारो वर्षांपूर्वी अवकाशातून परग्रहावरील 'प्राणी' पृथ्वीवर आले होते, याचे पुरावे जागोजागी आढळतात वगैरे प्रतिपादन केलेले आहे. खखोदेजा.
यूट्यूबीवर कोणतेतरी च्यानेल पण आहे.