ऑगस्ट सहल - भारतातील स्थळे सुचवा

विअर्ड विक्स's picture
विअर्ड विक्स in काथ्याकूट
13 Jun 2023 - 1:14 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी यावर्षी पंधरा ऑगस्ट मंगळवारी येत असल्यामुळे ४-५ दिवस सलग सुट्टी येतेय. पावसाळा असल्याने कुठे भटकंती करावी याविषयी घोळ होतोय. जालविश्व केरळ पासून लडाख पर्यंतची ठिकाणे दाखवतय . तरी पर्यटनासाठी भारतातील कोणती स्थळे चांगली याविषयी मत हवे होते ? राजस्थान, उटी व केरळ पाऊसात जाणेयोग्य आहे का ? मध्य प्रदेश ?

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Jun 2023 - 3:04 pm | राजेंद्र मेहेंदळे

मित्र मित्र असाल तर एखादा जंबो ट्रेक करु शकता. फॅमिली असेल तर कोस्टल कर्नाटक वगैरे बघु शकता. अनुभव ट्रॅव्हल्स चा प्लॅन बघा(रूट साठी)

https://www.anubhavvacations.in/domestic/coastal-karnataka-tour/

हम्पी/बदामी/ऐहोळे/पट्टदकल पावसाळ्यात करतात की नाही माहित नाही. पण असल्यास प्रचेतस्/कंजूस यांना व्यनि करा. मध्य प्रदेश (इंदूर/उज्जैन्/ओम्करेश्वर किवा जबल्पूर्/पचमढी/भीमबेटका) पण चांगला पर्याय आहे.

विअर्ड विक्स's picture

13 Jun 2023 - 5:32 pm | विअर्ड विक्स

मित्र मित्र असले कि एवढा विचार चर्चा करत नाही . ठिकाण ठरले कि सुटायचे फक्त :)

कुटुंब नि ५ वर्षाचा मुलगा आहे

बालाघाट पाहायची इच्छा आहे पण पावसाचा अंदाज नाही . जाल विश्वावर आजकाल माहिती हि प्रायोजित असल्याने विश्वासार्ह वाटत नाही

कंजूस's picture

13 Jun 2023 - 4:18 pm | कंजूस

म्हणजे श्रावण. राजस्थानात पाऊस येतो पडतो, अबूचे लेक भरते. तीज उत्सव उदयपूरात असतो. म्हणून सप्टेंबर बरा. गणपतीत तर फारच छान.
केरळ - श्रावणात ओणम सण येतो. गर्दी असते.
कर्नाटक - बेंगळुरू -१४-१५-१६ ऑगस्ट लालबागमध्ये फुलांचे प्रदर्शन असते. सुखावह वातावरण असते. एक दिवस हाफ डे टुअर करावी. फुल डे नको.नंतर मैसूर. तिथून उटी एक दिवसीय दाखवून आणतात ती टुअर भारी असते. पण बें-मै-उटी ही टुअर बऱ्याच जणांची झालेली असते. तरीही बरी. रेल्वे -बस रिकाम्या असतात.

विअर्ड विक्स's picture

13 Jun 2023 - 5:27 pm | विअर्ड विक्स

बेंगलोर चा पाऊस अनुभवलाय . आपल्यासारखा रिपरिप नसतो . एक दोन तासात खेळ खल्लास.

राजस्थान मध्ये जयपूर सोडून इतरत्र फिरलो नसल्याने जाण्याची उत्सुक्ता होती.

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Jun 2023 - 6:57 pm | राजेंद्र मेहेंदळे

बँगलोर, मैसूर्,बांदिपूर्,कूर्ग (किंवा ऊटी/कोडाई) हा पण पर्याय आहे. बांदिपूर ला जंगल सफारी असते का पावसाळ्यात ते बघुन जा. कूर्ग ऐवजी ऊटी/कोडाई करु शकता.

ऊटीपेक्षा अलीकडे कुन्नूर ला राहिलात तर तेथुन उटीला टॉय ट्रेन ने जाता येईल. कुन्नूर चे हे हॉटेल बघा

https://www.tripadvisor.in/Hotel_Review-s1-g1162349-d639317-Reviews-Riga...

किवा पहीले कोइम्बतूर करुन तेथुन मेट्ट्पालयम वरुन ही टॉय ट्रेन घेता येईल कुन्नूर/उटीसाठी. तिथुन पुढे मदुमलाई च्या जंगलातुन मैसुर ला जाता येईल(रेग्ल्युलर बसेस आहेत). मग बँगलोर आणि परत. ४-५ दिवस लागतील.

भुमन्यु's picture

19 Jun 2023 - 11:13 pm | भुमन्यु

मी २०१७ ऑगस्ट मध्ये पहिल्यांदा राजस्थान मध्ये आलो होतो. आणि गेल्या २.५ वर्षांपासून जयपूर मध्ये राहतोय. राजस्थान मधला पाऊस अतिशय सहज असा असतो, फार तर अर्धा एकतास सलग पडेल. काहीं मदत हवी असल्यास व्यनी करा, माहिती नसलेल्या गोष्टी ऑफिस मध्ये कुणालाही विचारून मदत करू शकेल

किंवा इतर आयोजक नेऊन आणतात ती कोस्टल नावे फसवणूक आहे. शिरसीमधल्या एका हॉटेलचे भले करण्यासाठी आहे. शिवाय धार्मिक स्थळे अधिक. याना रॉक्स आहेत त्यात पण तो मार्ग अनवाणी चालणे सामान्य लोकांना जमणारा नाही.
स्वतः कुमठा येथे राहून १)गोकर्ण,२)शिरसी - बनवासी सहज जमतं. भाविक लोकांनी सहस्रलिंग,सोंडा मठ,इडगुंजी पाहावे.

कंजूस's picture

13 Jun 2023 - 5:45 pm | कंजूस

आणि वाहन आहे का?
यावर जागा बदलू शकतात. समुद्र का डोंगर? लहान मुलगा आहे तर धार्मिक स्थळे घेऊ नये. बालाघाट का निवडले?

विअर्ड विक्स's picture

16 Jun 2023 - 2:17 pm | विअर्ड विक्स

मी पण मुंबईकर आहे नि आताचे डोंबिवलीकर ! मुंबईचे असल्यामुळे समुद्रा चे अप्रूप नाही , पावसाळयात समुद्र नको

बालाघाट नर्मदा मय्येसाठी .... हैदराबाद पाहून झाले अर्धे . बासर नि हैदराबाद जोडून पण विचार करतोय

या सोप्या साध्या असतात. एखाद्या ठिकाणी बराच वेळ घालवणे आवडते.
आम्ही भंडारदरा,वापी,केळवा,माथेरान,पाली,अशा लहानशा सहली करायचो.

चौथा कोनाडा's picture

16 Jun 2023 - 6:06 pm | चौथा कोनाडा

भंडारदरा परिसर श्रावणात / ऑगस्टमध्ये खुप सुंदर असतो ... अगदी हिरवा कंच ... हिरव्या रंगातला ऊन पावसाचा सुंदर खेळ पहायला मिळतो.
हिरवा रंग उपभोगून डोळ्यात साठवण्यासारखा.
उगाच नको तसल्या खेळाचे आकर्षण नसल्यास मुलांसाठी सुद्धा उत्तम सहल होऊ शकेल.

कर्नलतपस्वी's picture

13 Jun 2023 - 6:03 pm | कर्नलतपस्वी

,जबलपूर, भेडाघाट भंडारदरा,मांडवा,माहेश्वर,उज्जैन सारखी ठिकाणे.

Vichar Manus's picture

13 Jun 2023 - 6:51 pm | Vichar Manus

हैद्राबाद

गोरगावलेकर's picture

17 Jun 2023 - 3:09 pm | गोरगावलेकर

हिल स्टेशन आवडत असेल तर पंचमढी छान आहे. समुद्र सपाटीपासून १०६७ फुट उंचीवरील सातपुडा पर्वत रांगांमधील हे ठिकाण म्हणजे मध्य प्रदेशमधील एकमेव हिल स्टेशन. जवळचे रेल्वे स्टेशन : पिपारिया (४७ किमी )
मुंबईहून गुरुवारी दुपारी गरिबरथ गाडी सुटते ती शुक्रवारी सकाळी ३ च्या दरम्यान पिपारियाला पोहचते. (लवकर पोहचायचा उद्देश एव्हढाच कि भटकंतीसाठी पूर्ण दिवस मिळावा) भटकंतीसाठी सर्व दिवस भाड्याने गाडी करावी. येथे फिरण्यासाठी (4x4) गाडी करावी लागेल. गाडीवालेच पंचमढी फिरण्यासाठी वन विभागाचा परवाना वगैरे घेऊन देतील.


रेल्वे स्टेशनपासून पिकअप /ड्रॉप समाविष्ट असावा. सहलीसाठी सोबत आणखी एखादे कपल असले तर बघा. गाडीचा खर्च निम्मा होईल आणि मजाही येईल.

आमच्या ग्रुप सहलीत आम्हीही याच रेल्वे गाडीने गेलो होतो. आम्हाला घेण्यासाठी गाड्या स्टेशनवर हजर होत्याच. पहाटे साडेपाचलाच पंचमढीला पोहचलो. येथे मध्यप्रदेश पर्यटन मंडळाचे 4-5 चांगले हॉटेल आहेत. त्यातील 'रॉक एन्ड मॅनोर' हा एक ब्रिटिशकालीन सुंदर बंगला (6 रूम) आम्ही बुक केला होता. जरी आमचे दुपारचे चेक इन असले तरी आदल्या दिवशी बंगला रिकामा असल्याने व मध्य प्रदेश पर्यटन मंडळाच्या कृपेने आम्हाला पहाटेच सर्व रूम उघडून देण्यात आल्या.

पंचमढी दोन मुक्कामात (३ दिवस) व्यवस्थित पाहून होईल. क्षेत्र खूप जास्त नसल्याने गाडीवाले दिवसाच्या दोन सत्रात वेगवेगळ्या भागात फिरवतात. दुपारी जेवणासाठी व थोडा आराम करण्यासाठी गाड्या हॉटेलवर परत येतात,
पंचमढी येथे धबधब्यांची मालिकाच आहे. बी फॉल ,जमुना प्रपात, रजत प्रपात, अप्सरा विहार “Fairy Pool” :धबधब्याच्या पायथ्याशी तयार झालेल्या नैसर्गिक पाणवठ्यात पर्यटक मनसोक्त डुंबण्याचा अनुभव घेवू शकतात . उथळ पाण्यामुळे मूल-बाळ असणाऱ्या कुटुंबासाठी सोयीस्कर.

पांडव गुफा: या गुफा भारतीय पुरातत्व खात्यामार्फे जतन केल्या आहेत.

समोरच सुंदर उद्यान आहे.

उद्यानाच्या बाहेर कमी उंचीच्या छोटया बाईकची राईड घेता येते. मुले, महिलांना आवडेल.

प्रियदर्शिनी पोइंट (Forsyth Point) : याच ठिकाणाहून कॅप्टन फोरसिथ यांना इ.स. १८५७ मध्ये पंचमढीचा शोध लागला.

हांडी खोह: घोड्याच्या नालेच्या आकाराची खोल अरुंद दरी. ३०० फुट खोल सरळसोट कडा. अगदी जवळपर्यंत गाडी जाते. जास्त चालावे लागत नाही. एक कठडा असलेला व्ह्यू पोईंट आहे जेथून दोन डोंगरामधील दरीचे सुंदर दृश्य दिसत. येथे घोड्यावरची रपेट करता येईल. (येथे फिरण्यासाठी अर्धा तास पुष्कळ होईल) खोह = खड्डा, दरी

जटाशंकर मंदिर : नैसर्गिकरित्या तर झालेले गुंफेतील शिवलिंग

महादेव मंदिर : अध्यात्मिक भटकंतीत हे एक पवित्र स्थान आहे. पंचमढी शहरापासून १२ किमी. येथे शंकराची मूर्ती तसेच शिवलिंग आहे. येथून अर्ध्या किमीवर खडकात गुफा/ भेग आहे. हे ठिकाण गुप्त महादेव किंवा छोटा महादेव म्हणून ओळखले जाते.

राजेंद्रगिरी सनसेट पॉईंट

रिचगड (रीसगड:बहुतेक अस्वलांवरून पडलेले नाव). गुफा आहेत. सुंदर नजारा

बायसन लॉज संग्रहालय: पंचमढीचा इतिहास समजून घेण्यासाठी चांगले ठिकाण. पंचमढी वनक्षेत्रात येत असल्याने परवाना घेण्याचे ठिकाण.

चौरागड मंदिर
३ ते ४ किमीचा ट्रेक /१३८० पायऱ्या चढून गेल्यावर केल्यावर हे मंदिर आहे. साधारण दोन तास वर पोहोचण्यासाठी लागतात. थोडे थकायला होते पण आजूबाजूचे निसर्गसौंदर्य पाहून सर्व थकवा दूर होतो.

मंदिर परिसरात भाविकांनी वाहिलेले हजारो त्रिशूळ दिसतात. येथे शंकराची मूर्ती असून मंदिर आधुनिक काळात बांधलेले आहे.
हा ट्रेक चुकवू नये असे माझे मत. ज्यांना शक्य नाही त्यांना गुप्त महादेव मंदिराजवळच थांबू द्यावे.
आपल्याकडे खाद्य पदार्थ असतील तर वाटेत माकडांपासून वाचण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागतेमाकडांना पळवण्यासाठी येथे गलोलही विकत मिळतात. नुसती माकडांच्या दिशेने फिरवली किंवा खडा बाजूला कुठेतरी मारून आवाज केला तरीही माकडे दूर पळतात.
बाकी नवरे मंडळी स्वतःच्या बायकोला का दूर पळवायला बघतात ते कळत नाही .

धुपगड: हे सातपुडा पर्वतराजीतील सर्वोच्च शिखर आहे. उगवत्या सूर्याच्या पहिल्या किरणापासून ते मावळणार्या सूर्याचा शेवटच्या किरणापर्यंत सतत उन्हाचा मारा आपल्या माथ्यावर झेलत धूपगढ उभा आहे.येथून सूर्यास्ताचा अप्रतिम नजारा दिसतो. सतत उन्हामध्ये असल्यामुळेच याला धूपगढ हे नाव देण्यात आलंय.

धूपगडला जाताना वाटेत पॅरासेलिंगची मजाही अनुभवता येईल.

तसेच पंचमढीत झिप लाईन इ. साहसी खेळही आहेत. छोट्यांसाठी टॉय ट्रेन आहे.

एकाच सहलीत निसर्ग,आध्यत्मिक ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, खेळ सर्वच अनुभवता येईल.

रविवार संध्याकाळ किंवा रात्री ९-१० वाजताच्या सोईस्कर गाडीने सोमवार सकाळपर्यंत मुंबईला परत. सध्या तरी जाण्यायेण्याची सर्व तिकिटे उपलभद्ध दिसतात.

माझी सर्व माहिती 6 वर्षांपूर्वीची आणि पावसाळ्यानंतरच्या सहलीतील आहे. जायचे झाल्यास थोडी चौकशी करून जावे.

भारी आहे. मला इकडे फिरायचं आहे गलोल न घेता. तो फोटो आवडला.

विजुभाऊ's picture

20 Jun 2023 - 11:31 am | विजुभाऊ

सप्टेंबरला वेळ मिळाला तर सातारा महाबळेश्वरला या.
कास पठार तापोळा कास तलाव दुथडी भरून वहात असतात. ठोसेघर , वजराईचा धबधबा कोसळत असतो.
निवान्तपणा उपभोगता येतो.
इथला पाऊस भयावह नसतो. हव्या असणार्‍या सखीसारखा दिवसभर सोबत असतो.

चौथा कोनाडा's picture

20 Jun 2023 - 1:17 pm | चौथा कोनाडा

हव्या असणार्‍या सखीसारखा दिवसभर सोबत असतो.

💖

आपण महाबळेश्वरचे आहात का? मी आहे

आपण महाबळेश्वरचे आहात का? मी आहे

विअर्ड विक्स's picture

20 Jun 2023 - 1:00 pm | विअर्ड विक्स

चांगले पर्याय मिळत आहेत . यादी बनवतोय . गेला बाजार बालसिनोर , पावागढ नि अहमदाबाद पर्याय ठेवलाय . कार्यालयीन कामानिमित्त अहमदाबादला ऑगस्टमध्ये जावे लागले तर

अहमदाबादला आलात तर मोढेराचे सूर्य मंदीर नक्की पाहून जा. अडलजची वाव ( विहीर ) पहा.
बाकी ऑगस्ट मधे अहमदाबाद खूप गरम असते. पाऊस असा फार नसतो.

कंजूस's picture

20 Jun 2023 - 7:30 pm | कंजूस

फार दूरच्या सहली करू नका. लहान मुलांचे जग लहान असते. त्यांना सर्व बागा सारख्याच. किल्ले, म्युझियम नकोच.
हल्ली बऱ्याच सोसायट्यांत छानपैकी झोपाळे,घसरगुंड्या असतात. त्यामुळे त्याचेही अप्रूप राहिले नाही.
वापी स्टेशन पूर्व दहा किमीवर वापी (दादरा?)गार्डन आहे. मंगळवार बंद असते. पुढे बारा किलोमीटर वर सिल्वासा आहे. रिझॉटस आहेत. सिल्वासात तलाव, आणि मौजमजा साधने भरपूर आहेत.
फार दूर नाही.
(वापी स्टेशनही आहे आणि मुंबई अहमदाबाद हायवेवर आहे. वापी(वापी मात्र गुजरातेत. ) पश्चिम ला दमण आहे,समुद्र आहे. पूर्वेला दादरा,नगर हवेली,सिल्वासा. हे सर्व भाग केन्द्रशासित प्रदेशात. संपूर्ण स्वच्छ मोठे रस्ते. स्वस्त हॉटेल्स.

वाहन असल्यास नाशिक -त्र्यंबकेश्वर-जव्हार-/ डहाणू-बोर्डी- बोरीवली/कल्याण /ठाणे अशी राऊंड ट्रिप बऱ्याच ठिकाणं करत जमते. पावसाळ्यात काय बसायचं.

लडाख ला जायचे असेल तर शक्यतो जून ते सप्टेंबर हा काळ निवडावा . भारतात इतरत्र जरी मौसमी पावसाचे वातावरण असले तरी लडाख मध्ये मात्र हा उन्हाळी हंगाम असतो. BRO (Border Road Organisation) च्या अथक प्रयत्नाने, एप्रिलच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या १५-२० तारखे पर्यंत रस्त्यावर साठलेला बर्फ काढला जातो. मी २०१५ साली ही सहल केली होती.
या सहली साठी अधिक माहिती हवी असल्यास खालील दुवा पहावा,

लेह-लडाख टूर चे प्लॅनिंग आणि अंदाजे खर्च

१० दिवसाची लेह लडाख टूर चे प्लॅनिंग कसे करावे ?