थोडे मा़झेही छायाचित्रण

खालिद's picture
खालिद in कलादालन
17 Dec 2008 - 6:27 am

नमस्कार मित्रहो ,

माझे मराठी आंतरजालावर हे पहिलेच पाऊल. मिपा विषयी वाचनात आले. मिपा वर येउन प्रत्यक्ष वाचनाचा आनंद घेतला आणि एका ले़खात म्हटले आहे त्याप्रमाणे खरोखरच मला कॉलेज कट्ट्याची आठवण झाली. वाटले की येथील सभासद नाही व्हायचे तर कुठले?

प्रथम वाटले की काहीतरी चांगले लिहिण्याचा प्रयत्न करावा. परंतु एक नजर टाकल्यास असे जाणवले की एकंदरीच लिखाणाचा दर्जा इतका उच्च आहे की मी कितीही जीव तोडून लिहिण्याचा प्रयत्न केला तरी पांढर्‍यावर काळे केल्यासाऱखे होईल. म्हणून विचार केला की आपल्याला काय बरे जमते (चांगले लिखाण: -नाही ; कविता: -मुळीच नाही; बाकी सध्ध्या काही सुचत नाही) "तुका म्हणे त्यातल्या त्यात" थोडीफार फोटोग्राफी मात्र जमते. म्हणून त्यानेच श्रीगणेशा करावा.

तर थोडक्यात काय तर माझी काही निवडक छायाचित्रे सादर करीत आहे.

(मी फार मोठा फोटोग्राफर नाही. दाबली कळ आणि आला फोटो या वर्गातील आहे. त्यामुळे त्या ठराविक १० वर्गातील प्रतिसाद झेलायला आनंदाने तयार आहे. परंतु कृपया तसे ध्वनित करावे. :T )

जर कोणी मिपा वरील चांगले छायाचित्रक सुधारणा सुचवणार असतील तर ते माझ्यासाठी अत्यानंदाचे !!!

धन्यवाद

(विनम्र) खालिद

कॅमेरा: -Canon S5Is मॅक्रो मोड + ४x झूम; प्रचंड वारा सोबतीला

कॅमेरा: -Canon S5Is सुपर मॅक्रो मोड

कॅमेरा: -Canon S5Is सुपर मॅक्रो मोड

कॅमेरा: -Canon S5Is सुपर मॅक्रो मोड

एक प्रश्न: -ही सर्कशीतल्या विदूषकांची वस्ती असावी का? (स्थळ: -ओरलँडो, फ्लोरिडा)

सीगल्स

कॅमेरा: -Canon S5Is मॅक्रो मोड + १२x झूम

एका बोटीतून दुसरीचा फोटो घेण्याचा प्रयत्न

छायाचित्रण

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

17 Dec 2008 - 6:54 am | मदनबाण

वरतुन ४ थे फुल जास्त आवडले...काय नाव आहे या फुलाचे ??

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

खालिद's picture

17 Dec 2008 - 8:26 am | खालिद

हे फूल कोणत्याही हिरवळी (!) वर आढळते.

अत्यंत लहान असते. कॅमेरा सुपर मॅक्रो मोड मधे असल्याने कदाचित निराळे वाटत असेल.

खालिद

अभिरत भिरभि-या's picture

17 Dec 2008 - 11:22 am | अभिरत भिरभि-या

>>हे फूल कोणत्याही हिरवळी (!) वर आढळते.

म्हणजे तिकडे सुद्धा "हिरवळी" फुले "माळतात ;)

लवंगी's picture

17 Dec 2008 - 8:11 am | लवंगी

चांगले आलेत फोटो .. मला पानांचा आवडला

सहज's picture

17 Dec 2008 - 8:12 am | सहज

फोटो छान आहेत.

मिपावर आपले स्वागत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Dec 2008 - 8:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर स्वागत आहे

भडकमकर मास्तर's picture

17 Dec 2008 - 8:18 am | भडकमकर मास्तर

सीगल्स छान...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

शितल's picture

17 Dec 2008 - 8:57 am | शितल

सहमत.
:)

टारझन's picture

17 Dec 2008 - 2:04 pm | टारझन

सहमत.

१. लेख आवडला
४. चौथा पॅरा आवडला
५. फारच मार्मिक लिहीलंय
१०. फोटू के व ळ अ प्र ति म
१२. कसं काय सुचतं बुआ आपल्याला एवढं भारी लिहायला ? आम्हाला आपला जाम हेवा वाटतो
१५. सहमत , +१ , असेच म्हणतो .

धनंजय's picture

17 Dec 2008 - 9:07 pm | धनंजय

समुद्रपक्षी आवडले, चवथे फूल आवडले.

विसोबा खेचर's picture

17 Dec 2008 - 8:26 am | विसोबा खेचर

सगळीच चित्र छान, पहिलं चित्र बेष्ट! :)

खालिद's picture

17 Dec 2008 - 8:30 am | खालिद

उतरोत्तर असाच पाठिंबा मिळावा हीच इच्छा

(आमच्याकडे सर्व जिवंत क्रिकेट सामन्याचे दुवे मिळतील)

खालिद

झकासराव's picture

17 Dec 2008 - 8:34 am | झकासराव

तिसरा आणि चौथा फुलांचा फोटु आवडला. :)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

डेस्क टॉप ब्याकग्राउन्ड म्हणून लावलाय.
(टपोरा)बेसनलाडू

खालिद's picture

17 Dec 2008 - 9:02 am | खालिद

.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Dec 2008 - 10:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तो थेंब चोक्कस आहे.

अवांतर: माझ्याकडे एस ३ आहे. एकदम व्हॅल्यू फॉर मनी हाय यो क्यामेरा!

खालिद's picture

17 Dec 2008 - 11:07 am | खालिद

अदिती,

Canon S3IS अप्रतिमच आहे. मी पण मेगापिक्सेल चा फारसा वेडा नाहिये. उलट जितके कमी मेगापिक्सेल तितकी फोटो ची क्वालिटी वाढते. (असं आमच्या फिजिक्स च्या मास्तरांनी शिकवलेलं)

पण मी जेव्हा कॅमेरा घेतला तेव्हा Canon S3IS जास्त महाग होता. आणि Canon S५IS चे व्हिडिओ रेकॉर्डिंग जास्त चांगले असल्याने मी तो घेतला.

आता तर Sx10IS आलाय २०x झूम असलेला. आणि तो ही बराच स्वस्त आहे. बघू कधी हाताळायला मिळतो ते.

वेताळ's picture

17 Dec 2008 - 10:05 am | वेताळ

सर्वच फोटो मस्त आहेत्......मिपावर आपले स्वागत असो.
वेताळ

धमाल मुलगा's picture

17 Dec 2008 - 10:40 am | धमाल मुलगा

तो..तो...पानावरच्या थेंबाचा फोटु....क्या बात है!
जियो खालिद जियो :)

बाकी,

मी कितीही जीव तोडून लिहिण्याचा प्रयत्न केला तरी पांढर्‍यावर काळे केल्यासाऱखे होईल. म्हणून विचार केला की आपल्याला काय बरे जमते (चांगले लिखाण: -नाही ; कविता: -मुळीच नाही; बाकी सध्ध्या काही सुचत नाही)

हे काही पटलं नाही बरं का! अहो लिहा हो, हळुहळु सुचत जाईलच की :) काय म्हणता?

-(सर्कशीतल्या विदुषकांच्या वस्तीतला) ध मा ल.

अभिरत भिरभि-या's picture

17 Dec 2008 - 11:24 am | अभिरत भिरभि-या

चौथे चित्र तर खासच !

परिकथेतील राजकुमार's picture

17 Dec 2008 - 11:36 am | परिकथेतील राजकुमार

सर्व चित्रे आवडली !
आधी 'थोडे मा़झेही छायाचित्रण' असा लेखाचा विषय वाचुन तुम्ही स्वतःची छायाचीत्रे लावली असतील असे वाटले ;) असो, आता गैरसमज दूर झाला आहे. आता लवकरच 'हिरवळींची' छायाचीत्रे बघायला मिळावित हि अपेक्षा.
हुकुमावरुन

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

प्रगती's picture

17 Dec 2008 - 12:20 pm | प्रगती

अ प्र ति म !
सगळीच छायाचीत्रे आवडली. वरुन ४ नंबर चे फूल जास्त भावले. :)

मनस्वी's picture

17 Dec 2008 - 12:38 pm | मनस्वी

दोन्ही श्वेत फुले आणि पाण्याचा थेंब आवडला.

घासू's picture

17 Dec 2008 - 12:43 pm | घासू

हि सुंदर फुले ते वातावरण बघुन प्रसन्न वाटलं.

सोनम's picture

17 Dec 2008 - 2:44 pm | सोनम

फोटो सर्व छान आहे.

मैत्री ही करायची नसते कारण मैत्री ही होत असते
मैत्री ही तोडायची नसते कारण मैत्री ही जपायची असते

अनिल हटेला's picture

17 Dec 2008 - 3:10 pm | अनिल हटेला

शेवटची २ जास्त आवडली....

पानावरच्या थेंबाचा...
आणी नावेचा......

फुलाचे फोटो खुप झाले,थोडे फूल्पाखरांचे देखील येउ देत..

(आवारा भवरे..)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

कायनात के इस से भी बेहतर
खुबसुरत रन्ग तस्वीरो मै कैद किये हो
तो और भी भेजना ....
अप्रतीम !!

सुनील's picture

17 Dec 2008 - 5:07 pm | सुनील

फोटो मस्तच आले आहेत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सूर्य's picture

17 Dec 2008 - 9:05 pm | सूर्य

मिपावर स्वागत.. गुलाबाचा फोटो सुंदर आहे. तसेच थेंब सुद्धा छान टिपला आहे. अजुन फोटो येउद्यात.

- सूर्य.

भास्कर केन्डे's picture

17 Dec 2008 - 10:52 pm | भास्कर केन्डे

मिपावर आपले स्वागत!

सर्वच चित्रे झकास आहेत. पाण्यावरचा थेंब सर्वांत जास्त आवडला.

तुमच्या रुपाने अजून एक सह-शौकिन येथे मिळाल्याचे पाहून मन हर्षित झाले आहे. आपण खूप खूप लिहा, लाजू नका. येथे सगळे चांगले लोक आहेत. तुम्हाला येथल्या वास्तव्यात आनंद मिळेल यात शंका नाही.

बाकी आपण म्हणता तसे Canon S3IS आणि Canon S५IS मस्तच आहेत. मी कालच Sx10IS घेतला आहे. या शनिवार-रविवारी काही छायाचित्रे काढून त्याचा श्रीगणेशा करतो. तसेच अशातच मी Panasonic Lumix FZ20 पण घेतला आहे. कॅनॉन व सोनी व्यतिरिक्त मला आवडलेला हा एक अंमळ चोक्कस कॅमेरा. याने काढलेली काही छायाचित्रे येथे आहेत.

आपला,
(छायाचित्रांचा छंद जोपासनारा) भास्कर
आम्ही येथे वसतो.