भारताबाहेरचा भारत -अंदमान १

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in भटकंती
2 Jun 2023 - 12:56 pm

नमस्कार मंडळी
गेले १.५-२ वर्षे घरात बसून पकलो असल्याने एखादी मोठी सहल करायचा मोह होत होता. आणि समुद्र हा नेहमीच आवडीचा विषय असल्याने बहुधा ३-४ दिवस कुठेतरी समुद्राकाठीच जायचे डोक्यात घोळत होते. त्यामुळे सुरुवात अलिबाग पासून होऊन, कोकण,गोवा,कोस्टल कर्नाटक करत करत चर्चा अंदमानला जाऊन पोचली. मालदिव्ह्स आणि सेशेल्स ५.५ ते ६ रुपयाला पडत होते आणि श्रीलंका ५० पैसे असले तरी आधीच झाले होते. शिवाय आत्ता तिथे परिस्थिती वाईट आहे.अंदमान भारतातच असल्याने करन्सी रेशो बघायची गरज नव्हती. दुसरे म्हणजे जालावर शोध घेतला असता चेन्नई आणि कोलकाताहून तिकडे थेट विमानसेवा उपलब्ध होती . मात्र कनेक्टिंग विमाने मुंबईहून जास्त होती. अर्थात पुणे-मुंबई फारसे अंतर नसल्याने बाय रोड जायला आमची काहीच हरकत नव्हती.माझ्या नेहमीच्या एजंटकडून प्लॅन मागवला असता ४ जणांच्या सहलीसाठी त्याने ५ दिवस ४ रात्री साठी सुमारे ६०,०००/- रुपये आकारले. त्यात हॉटेलचे वेगवेगळे पर्याय होते त्याप्रमाणे किंमत थोडीफार कमी जास्त होणार होती. परंतु विमानाचे तिकीट बघता एकूण चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला अशी परिस्थिती होती. पण हातात वेळ कमी होता आणि तेव्हढ्यातच सगळे बसवायचे म्हणजे पदराला खार लागणारच असा "सुज्ञ" विचार करून निमूटपणे बुकिंग करून टाकले. मग हापिसातील कामाचे डोंगर उपसायला सुरुवात केली.(असे म्हटले की कसे छान वाटते) आणि सगळ्या मीटिंगांमध्ये अंदमान सहलीबद्दल एखाद दोन वाक्य टाकून देऊ लागलो. उगाच कोणी आयत्या वेळी म्हणायला नको की "तू असा कसा न सांगता गेलास?" अशा तऱ्हेने ऑस्ट्रेलिया ,कॅनडा, अमेरिका,इंग्लंड आणि कुठल्या कुठल्या लोकांना मी अंदमानला चाललोय हे समजले. आणि त्यांची असूया बघून मला आसुरी आनंद होऊ लागला.(पुढे परत आल्यावर मी नसताना त्यांचे काहीच कसे अडले नाही हे ऐकून दु:ख झाले, ते असोच)

तर यथावकाश तो दिवस उजाडला आणि आम्ही पुण्याहून मुंबईस प्रस्थान करते झालो. दरवेळी मुंबईत गेल्यावर रस्ते, मेट्रो,नवनवीन उड्डाणपूल वगैरे बघून "हीच का ती"? असा प्रश्न मला पडतो. आयुष्याची कित्येक वर्षे जिथे उभा आडवा तिरका (म्हणजे सेंट्रल/वेस्टर्न/हार्बर) फिरलो, त्या मला आता जे व्ही एल आर /एस व्ही एल आर म्हटले की बाउन्सर जातात. चेंबूरहून कुलाब्याला १५ मिनिटात पोचता येते हे पाहून डोळे पाणावतात. घाटकोपरहून अंधेरीला मेट्रोने जाताना साकीनाक्याचे ते संध्याकाळचे ट्राफिक आठवते. आता तर म्हणे शिवडीहून न्हावा शेवाला थेट पूल होणार आहे २२ कि.मी. चा. कालाय तस्मै नमः
==============
पुढील माहिती विकीवरून साभार

तेराव्या शतकात झाओ रुगुआ यांनी लिहिलेल्या झु फॅन झी या पुस्तकात अंदमानचे नाव मध्य चिनी भाषेत 'ąanh də man( आधुनिक मँडरिन चिनी भाषेत युंटुओमन) या नावाने आले आहे. 'कंट्रीज इन द सी' या पुस्तकाच्या ३८ व्या अध्यायात झाओ रुगुआ यांनी स्पष्ट केले आहे की, लांब्री (सुमात्रा) येथून सेलानकडे जाताना प्रतिकूल वाऱ्यामुळे जहाजे अंदमान बेटांच्या दिशेने वाहतात. १५ व्या शतकात वू बेई झीच्या माओ कुन नकाशात झेंग हे च्या प्रवासादरम्यान अंदमानची नोंद "अँडेमन माउंटन" (आधुनिक मंदारिन चिनी भाषेत आंदेमान शॅन) म्हणून केली गेली. आतापर्यंत नोंदवलेले सर्वात जुने पुरातत्त्वीय पुरावे सुमारे २,२०० वर्षांपूर्वीचे आहेत; तथापि, अनुवांशिक, सांस्कृतिक आणि विलगीकरण अभ्यासातील संकेत असे सूचित करतात की या बेटांवर मध्य पॅलेओलिथिक (सुमारे 60,000 वर्षांपूर्वी) च्या सुरुवातीच्या काळात वस्ती असावी. मूळ अंदमानी लोक त्या काळापासून ते १८ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत या बेटांवर मोठ्या प्रमाणात विलगीकरणात राहत असल्याचे दिसून येते. राजेंद्र चोल दुसरा याने अंदमान निकोबार बेटांचा ताबा घेतला. अंदमान आणि निकोबार बेटांचा वापर त्यांनी श्रीविजय साम्राज्याविरुद्ध मोहीम सुरू करण्यासाठी सामरिक नौदल तळ म्हणून केला. इ.स. १०५० च्या तंजावूर शिलालेखात सापडलेल्या या बेटाला चोलांनी मा-नक्कावरम ("महान खुली/नग्न भूमी") असे संबोधले.युरोपियन प्रवासी मार्को पोलो (१२ वे-१३ वे शतक) यांनीही या बेटाचा उल्लेख 'नेक्युवेरान' असा केला आहे आणि नक्कावरम या तमिळ नावाच्या भ्रष्ट स्वरूपामुळे ब्रिटिश वसाहतकाळात निकोबार हे आधुनिक नाव पडले असावे.

https://en.wikipedia.org/wiki/Andaman_islands
==========================================
तर यथावकाश ट्रॅफिकमधून वाहत वाहत एकदाचे विमानतळावर पोचलो आणि भरून पावलो. रात्री विमानतळावर दिवस उजाडलेला असतो. एकतर मुंबई कधीच झोपत नाही. त्यातून हे विमानतळ प्रकरण तर नाहीच नाही. तर चेक इन करून मोकळे झालो आणि इकडे तिकडे करत वेळ घालवू लागलो.
a

d

c

विमानतळावर इतके काही बघण्यासारखे असते (शॉपिंग शिवायही) की बरेचदा वेळ भर्रकन निघून जातो.
d
मुंबई विमानतळावरचे काही सजावटीचे प्रकार
c

a
a

d

c

तसा तो गेलाच आणि आम्ही प्रथम चेन्नई आणि मग पोर्ट ब्लेअर अशी दोन विमाने पकडून सकाळी ७ च्या सुमारास वीर सावरकर अंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो.

चेन्नई विमानतळावरील सजावट--कॉलिंग प्रचेतस फॉर माहीती

d

c

a

d

b

b
b

b

अंदमानला पोचल्यावर सगळ्यात प्रथम जाणवले ते म्हणजे वेळेचा फरक. अंदमान हे जरी भारतात असले तरी नकाशाप्रमाणे ते मिझोराम च्या खाली आणि थायलंडजवळ आहे. त्यामुळे भारतीय प्रमाणवेळच पाळली जात असली तरी वेळेत साधारण तासाभराचा फरक आहे. घड्याळात ७ वाजले असले तरी ८-८.३० सारखे ऊन होते. १० मिनिटात आम्ही हॉटेलवर पोचलो . आज सकाळी मोकळा वेळ होता आणि दुपारी सेल्युलर जेल आणि लाईट आणि साउंड शो बघायला जायचे होते. तसेही रात्रभराचा प्रवास झालेला असल्याने डोळे गपागप मिटत होते. हॉटेलवर जाऊन फ्रेश झालो आणि मस्त ताणून दिली. ३-४ तास मस्त झोप झाल्यावर जरा बरे वाटले. हॉटेलवारचे मेन्यू कार्ड बघितले पण ते काही एव्हढे खास वाटले नाही. झोमॅटो स्वीगी उपलब्ध होते पण गुगलवर शोधले तर जवळपास ५०० मीटरच्या अंतरावरही हॉटेल्स दिसत होती. त्यामुळे चालतच जायचे ठरवले. हॉटेलवरून निघालो आणि अंदाजे चालत पुढे गेलो असता पाहिले एक छान सुपरस्टोर दिसले. लगेच मंडळी आत शिरली आणि सटरफटर खरेदी झाली. थोडेच पुढे एक "ग्रीन पार्क" नावाचे हॉटेल दिसले.

b

नावावरून जरा घोटाळा झाला पण आत शिरल्यावर मालकाच्या डोक्यावरच्या देवादिकांच्या तसबिरी बघून दाक्षिणात्य हॉटेल असल्याची खूण पटली आणि आम्ही निर्धास्त आत गेलो.तिथे एकदम टिपिकल केरळी पद्धतीचे थाळी जेवण मिळत होते. ३-४ भाज्या,रसम,सांबार, ढीगभर भात आणि अपलम पापड. अहाहा !! मजा आली आणि इथे असेतोवर जेवायला इकडेच यायचा निश्चय केला.

पोटभर जेवणानंतर पुन्हा हॉटेलवर जाऊन टी व्ही बघत लोळत होतो. ३ वाजत आले होते. तेव्हढ्यात ड्रायव्हरचा फोन आला आणि त्याने आम्हाला थोड्याच वेळात सेल्युलर जेलच्या दारात सोडले. एका ऐतिहासिक वास्तूच्या दाराशी आम्ही उभे होतो.

b

b

ब्रिटिशांनी जेव्हा भारतावर किंवा इतरत्र राज्य केले तेव्हा समुद्राच्या आजूबाजूचे प्रदेश त्यांनी तुरुंग म्हणून वापरले जसे की अंदमान,मंडाले,रत्नागिरी,ब्रिटिश गयाना,फ्रेंच गयाना बेटे वगैरे. पण त्यावेळी त्यांना स्वप्नातही वाटले नसेल की अजून १०० वर्षांनी ही ठिकाणे पवित्र तीर्थक्षेत्रे म्हणून ओळखली जातील. जसे प्रत्येक मराठी आणि भारतीय माणसासाठी मंडाले हे नाव टिळकांशी आणि गीतारहस्य ग्रंथाशी जोडले गेले आहे तसेच अंदमान हे नाव स्वा. विनायक दामोदर सावरकर आणि कमला या महाकाव्याशी. ब्रायटन हे त्यांच्या "ने मजसी ने" गीताशी जोडले आहे तर मार्सेली हे नाव जहाजाच्या पोर्ट होल मधून मारलेल्या उडीशी, लंडनमधील इंडिया हाऊस हे बॉम्ब बनविण्याशी आणि पुस्तके कोरून पिस्तुले भारतात पाठवण्याशी अशा अनेकानेक जागा. त्या पवित्र वास्तूमध्ये आत शिरलो आणि पहिले उजव्या हाताला एक बोर्ड दिसला.
b

तिथेच आत एक संग्रहालय होते जिकडे सेल्युलर जेलचे मॉडेल ठेवले होते आणि काही माहितीदर्शक फोटो भिंतीवर लावले होते. ते बघून गाइडबरोबर आत जेलच्या फेरिसाठी निघालो.

गाईड एका कुटुंबाचे २०० रुपये आकारतो पण ते जी माहिती देतात त्यामानाने ही किंमत फार नाही. (एकुणातच अंदमान महागडे नाही, किमती वाजवी आहेत)
b

पुढील माहिती विकिपीडियावरून
==================================
अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे हे कारागृह आहे. मुख्य भारतीय भूमीपासून हजारो किलोमीटर अंतरावर आणि समुद्रापासून हजारो किलोमीटर दुर्गम अशा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या सैनिकांना तुरूंगात ठेवण्यासाठी हे ब्रिटीशांनी बांधले होते. काळ्या पाण्याच्या नावाखाली ती बदनाम होती.

ब्रिटिश सरकारने भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांवर झालेल्या अत्याचारांचा मूक साक्षीदार असलेल्या या कारागृहाचा पाया १८९७ मध्ये रचला होता. या कारागृहात ६९४ खोल्या आहेत. ह्या खोल्या बांधण्याचा उद्देश कैद्यांमधील परस्पर संवाद थांबविणे हा होता. ऑक्टोपस प्रमाणेच सात शाखांमध्ये पसरलेल्या या तुरुंगाच्या आता केवळ तीन शाखा शिल्लक आहेत. जेलच्या भिंतींवर शूर शहीदांची नावे लिहिली आहेत. येथे एक संग्रहालय देखील आहे ज्यामधून शस्त्रे ज्यावरून स्वातंत्र्य सैनिकांवर छळ करण्यात आला होता.

अंदमानमधील वसाहतीच्या मुख्य उद्देश म्हणजे समुद्राच्या वादळात अडकलेल्या जहाजांना सुरक्षित जागा पुरविणे. असा विचार केला होता की बंदरांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी तोडगा काढणे हाच एक उपाय आहे. या बेटांवर तोडगा काढण्याचा पहिला प्रयत्न १७८९ मध्ये झाला जेव्हा कॅप्टन आर्चीबाल्ड ब्लेअरने चथम आयलँडमध्ये सेटलमेंट केली. ही जागा नेव्हिगेशनल म्हणून गणली जात असल्याने ही वस्ती उत्तर अंदमानमधील पोर्ट कॉर्नवालिस येथे नंतर हलविण्यात आली. वसाहतीचा तोडगा काढण्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला नव्हता आणि १७९६ मध्ये संपुष्टात आला.

६० वर्षांनंतर, या बेटांवरील बंदरांच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रश्न आला होता, परंतु पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात देशभक्तांना पेरण्यासाठी वास्तविकपणे १८९७ मध्ये बंदिवान वसाहतीची स्थापना केली गेली. अंदमान आणि निकोबार आणि निकोबार बेटांवर १० मार्च १८५८ रोजी २०० स्वातंत्र्यसैनिकांच्या पहिल्या तुकडीच्या आगमनाने कैद केलेल्या वसाहतीची कारावास सुरू झाली. बर्मा आणि भारतातील मृत्यूदंडातून काही कारणास्तव जगलेल्या सर्व दीर्घावधी व आजीवन कारागृहात असलेल्या देशभक्तांना अंदमानच्या बंदिवासात वसाहतीत पाठविण्यात आले.

पहिल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर, वहाबी बंडखोरी, मणिपूर विद्रोह इत्यादींशी संबंधित सैन्य व इतर देशभक्तांना ब्रिटीश सरकारविरूद्ध आवाज उठवण्याच्या गुन्ह्याखाली अंदमानच्या बंदिवासात असलेल्या वसाहतींमध्ये पाठवण्यात आले.
=================================================
७ शाखा आणि मध्ये वॉच टॉवर अशा पद्धतीने बांधण्यात आले असले तरी आता या कारागृहाचे केवळ १,६,७ ह्याच शाखा शिल्लक आहेत. बाकीच्या ठिकाणी हॉस्पिटल्स वगैरे तयार करण्यात आली आहेत.

प्रत्येक शाखेच्या समोर पुढच्या शाखेची पाठ येते जेणेकरून कैदी एकमेकांना पाहू शकणार नाहीत. खुद्द सावरकर बंधूना २ वर्षे माहित नव्हते की ते दोघे अंदमानात आहेत. कैद्यांनी कामे करायचे कारखाने प्रत्येक शाखेच्या समोर आहेत. तेथे ठेवलेली तेल काढण्याची आणि काथ्या वळण्याची यंत्रे बघितली तर आजही अंगावर शहारा येतो.
b

b

b

दररोज तेल आणि काथ्याचा ठरलेला कोटा पूर्ण केला नाही तर ज्या शिक्षा देत असत त्या बघून कैद्यांचा किती भीषण छळ होत असेल याची पुरेपूर कल्पना येते.

b

आणि सर्वात कहर म्हणजे आजही तेथे असणारी फाशी देण्याची जागा. एका बंद झोपडीवजा खोलीत ३ फाशीचे दोर , त्याखाली पांढरी खूण केलेली कैदी उभी करण्याची जागा आणि एका बाजूला असलेली एक लोखंडी लिव्हर. ३ कैदी आणि मृत्यू यांच्या मधला अखेरचा दुवा.

b

b

किती जणांनी तिथे परमेश्वराकडे अखेरची प्रार्थना केली असेल? हा आपला शेवटचा क्षण आहे हे समजून किती जणांना तिथे रडू आले असेल? मृत्यू परवडला पण इथल्या कठोर शिक्षांमधून आता सुटका होणार या भावनेने किती जणांना तिथे आनंद झाला असेल? मला तिथे उभे राहवेना. हळूहळू समोरचे दृश्य डोळ्यातील अश्रुनी पुसट होत गेले.

पुढे निघालो आणि ७ व्या शाखेत तिसऱ्या मजल्यावरची शेवटची खोली बघायला गेलो. काय विशेष आहे या खोलीत? जश्या इतर ६९३ खोल्या तशीच ही पण एक.

b
पण नाही. या खोलीचे नशीब इतके विलक्षण की एक असामान्य कैदी तिथे काही वर्षे वास्तव्यास होता. त्या खोलीत त्याला मुद्दामून ठेवले होते. त्या खोलीत जायला नेहमीच्या दाराशिवाय अजून एक लोखण्डी दार आहे जेणेकरून कैदी पळून जाऊ नये. त्या खोलीतून समोरची फाशीची जागा सतत दिसत राहते आणि तिथल्या किंकाळ्या रोज ऐकू येत राहतात. तिथे राहणाऱ्या कैद्यांचे मन खच्ची व्हावे यासाठी ही सगळी व्यवस्था आहे. आपल्या असामान्य बुद्धीच्या जोरावर हजारो लोकांना दिशा दाखवणाऱ्या भयंकर जहाल आणि धोकादायक माणसासाठी एव्हढी तयारी तर हवीच.
b

b

पण कसले काय? ५० वर्षे मुदतीच्या दोन काळ्यापाण्याच्या शिक्षा एकत्र सुनावणाऱ्या न्यायाधीशाला हा कैदी म्हणाला होता "तुम्हाला नक्की खात्री आहे की अजून पन्नास वर्षे तुमचे राज्य आमच्यावर राहील?" जेलमधील हिंदू मुस्लिम कैद्यांना एकमेकांविरुद्ध भडकविण्याचा ब्रिटिशांचा प्रयत्न त्याने हाणून पाडला. दंडाबेडी वाजवून एकमेकांशी बोलायची भाषा तयार केली आणि कैद्यांना शिकवली. कमला हे महाकाव्य रचले. आणि तेलाच्या घाण्याला जुंपून शिवाय चाबकाचा मार देणाऱ्या बारी साहेबाला ठणकावले की "खबरदार यापुढे हात उचललास तर, आम्ही तर शीर तळहातावर घेऊन बाहेर पडलोय, तू मात्र सांभाळ--की घेतले न हे व्रत अंधतेने । लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने । जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे । बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे।।'

एकीकडे पावले यंत्रवत पुढे पुढे जात होती तर डोक्यात हे सगळे विचार धावत होते. त्या नादातच खाली उतरलो आणि बाहेर पडलो. थोडावेळ समोरच्या बागेत वेळ घालवून पुन्हा लाईट आणि साउंड शो साठी आत शिरलो. या शो बद्दल मी काय लिहिणार?

b

b

प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी बघावाच असा हा जबरदस्त शो आहे. शाखा १ आणि ७ च्या भिंतीचा पडदा करून प्रोजेक्टरने जी कथा तासभर दाखवली जाते ती पाहून एखाद्याचे डोळे पाणावले नाहीत तरच नवल.

b

b

शो च्या शेवटी राष्ट्रगीत चालू झाले आणि शेवटी उत्स्फूर्त पणे भारतमाता की जय असा जयघोष झाला. यंत्रवत बाहेर पडलो आणि गाडीत बसलो.

वाटेत बोलताना सगळेच या अनुभवाने भारावून गेले होते. पुढे एका चढावर बरेच ट्राफिक लागले. वाहने अडकली होती. काही कारण तर दिसत नव्हते. गाडी हळूहळू पुढे सरकली आणि ड्रायव्हरने सांगितले डावीकडे पहा. तिथे एक वाईन शॉप होते आणि ते बंद व्हायला शेवटची ५ मिनिटे बाकी असल्याने तिथे आडव्या तिडव्या गाड्या लावून दारू घेण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. क्षणात धाडकन वर्तमानात आलो आणि हसत हसत हॉटेलवर पोचलो.(क्रमश:)

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

2 Jun 2023 - 1:27 pm | कुमार१

पोटभर फोटो आणि शानदार वर्णन....

कर्नलतपस्वी's picture

2 Jun 2023 - 1:35 pm | कर्नलतपस्वी

सुरवातीचे फोटो बघून असे वाटले की आम्हाला शेंडी लावताय. कारण सगळे फोटो केळकर संग्राहालयातले दिसतायत. पुढे वाचन सुरू ठेवल्यावर गैरसमज दुर झाला.

आम्ही पण जाणार आहोत. एजंटाचा नाव मोबाईल जर व्य नि करा.

बाकी सर्व वाचून प्रतिसाद देईन.

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Jun 2023 - 2:12 pm | राजेंद्र मेहेंदळे

व्य नि केला आहे

सौंदाळा's picture

2 Jun 2023 - 2:12 pm | सौंदाळा

मस्त सुरुवात आणि छान फोटो.
मला पण एजंटाचा नंबर व्यनि करा.
आणि पुभाप्र.

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Jun 2023 - 2:23 pm | राजेंद्र मेहेंदळे

https://traveltriangle.com/

मी आत्तापर्यंत श्रीलंका, मॉरिशस आणि अंदमान अशा ३ ट्रिप ह्या साईटवरुन बूक केल्या आहेत. सहसा विमान प्रवासाची तिकिटे स्व्तः काढणे चांगले कारण आयत्या वेळी काही बदल झाल्यास आपल्याला थेट समजते. एकदा आपला प्लान दिला की आपल्याला २-३ एजंटचे कोट येतात. त्यापैकी जे आवडेल्/परवडेल ते घ्यायचे. ट्रिप कस्टमाईझ करायची असेल (१-२ दिवस कमी जास्त किवा ठिकाणे कमी जास्त करणे) तर तसेही करुन मिळते. विमानतळावर शक्यतो स्थानिक एजंटची गाडी पिक अप करायला येते. तेथुन पुढची जबाबदारी त्यांची. काही समस्या आल्यास लोकल एजंट आणि ट्रॅव्हल ट्रँगल दोन्ही मदत करतात(एस्कलेशन करता येते, पण एकुण अनुभव चांगला आहे). बोलुन काम झाले नाहीच तर गूगल रिव्ह्यु खराब करायची धमकी द्यावी, म्हणजे सुतासारखे सरळ येतात.

श्रीगुरुजी's picture

2 Jun 2023 - 2:35 pm | श्रीगुरुजी

सुंदर वर्णन!

आम्ही २०१७ च्या दिवाळीच्या सुट्टीत ६ दिवस अंदमानात होतो. २ दिवस पोर्ट ब्लेअर, दोन दिवस हॅवलॉक बंदर, २ दिवस नील बंदर. या दोन्ही बंदरांचे व समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य वर्णनातीत आहे. सायंकाळी दृकश्राव्य कार्यक्रम बघताना मनात सहज विचार आला की बरोबर १०० वर्षांपूर्वी याच दिवशी याच वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर दिवसभराच्या छळाने थकून कोठडीत बंदिस्त असतील व त्या अवस्थेत सुद्धा त्यांच्या मनात भारताच्या स्वातंत्र्याचेच विचार असतील.

या महान स्वातंत्र्यवीराला कोटी कोटी प्रणाम!

कंजूस's picture

2 Jun 2023 - 4:31 pm | कंजूस

विमानतळांवर अगदी वेळेवरच का जाऊ नये ते कळलं.

Bhakti's picture

2 Jun 2023 - 6:22 pm | Bhakti

छान लेख!

कर्नलतपस्वी's picture

2 Jun 2023 - 8:56 pm | कर्नलतपस्वी

वाचून गळ्यात आवंढा आणी अंगावर शहारे येतात.

या अशा हुतात्म्यांना केवळ सत्ता लोलूपता आणी लांगूलचालन म्हणून लायकी नसताना काहीजण वाटेल ते बोलतात हे पाहून चिड येते.

बाकी बकेट लिस्ट मधे आहे नशीबवान असेल तर तीर्थयात्रा घडेल.

यश राज's picture

3 Jun 2023 - 3:36 am | यश राज

स्वातंत्र्यवीर सावरकरांना वंदन.

फोटो व माहिती खूपच छान.

तुषार काळभोर's picture

3 Jun 2023 - 8:57 am | तुषार काळभोर

विमानतळाचे नाव अजूनही सावरकरांच्या नावाने आहे हे नशीबच!
त्या विमानतळाला दुसरे कोणतेही नाव इतके जास्त शोभणार नाही.
.
.
साठ हजार रुपये प्रत्येकी की चौघांचे? आणि पुणे ते पोर्ट ब्लेअर हा प्रवास मुंबई ते पोर्ट ब्लेअर पेक्षा १०००-१५०० कमी दिसतोय. दिवसांनुसार कमी जास्त होत असावा, तरी पुणे ते मुंबई प्रवास करण्यापेक्षा पहिला पर्याय जास्त सोयीस्कर असावा.
.
.
चेन्नई विमानतळावरील निर्गमन कक्षातील त्या शिल्पांचे फोटो मीसुद्धा प्रचेतस यांना विचारण्यासाठी काढले होते, पण राहून गेले.
.
.
सेल्युलर जेल खरोखर तीर्थक्षेत्रच आहे! लाईट अँड साऊंड शो सुंदर दिसतोय. सावरकरांचे कार्य आणि विचार इतके प्रेरणादायी आहे की भारावून जाणे साहजिक आहेच. क्रमशः असल्याने इतर निसर्ग आणि समुद्र किनारे पुढील भागात येतीलच.
.
.
अवांतर : चेन्नई विमानतळावरील एक शिल्पसंच -
1

२. डावी़कडील शिल्प - पोपट वाहन असलेला केवळ कामदेव माहिती आहे. पण त्याच्या हातात धनुष्यबाण असतो. इथे हातात वीणा असल्याची स्थिती दिसते.
2

३. उजवीकडील शिल्प - हंसावरील देवी - सरस्वती? हाता वीणा असावी असे हातांच्या स्थितीवरून वाटते. काही ठिकाणी रतीचे वाहन हंस असल्याचंही वाचलंय. शिवाय डावीकडे कामदेव आहे.
3

४. मधील चित्र - दाक्षिणात्य शैली वाटते. डावीकडे नंदी. डोक्यावर जटा+चंद्रकोर = शिव आहे का? पण शिवाच्या पायाखाली कोण आहे?
4

प्रचेतस's picture

4 Jun 2023 - 2:35 pm | प्रचेतस

२. डावी़कडील शिल्प - पोपट वाहन असलेला केवळ कामदेव माहिती आहे. पण त्याच्या हातात धनुष्यबाण असतो. इथे हातात वीणा असल्याची स्थिती दिसते.

शुकावर आरुढ म्हणजे कामदेवच. भारतभर मूर्तींची शैली जवळपास समान असली तरी दक्षिणेत आयुधांमध्ये थोडीशी भिन्नता आढळते. तसेच उजवीकडील सरस्वती की रती हे देखील पुरेशा लक्षणांअभावी निश्चितपणे सांगता येत नाही.

४. मधील चित्र - दाक्षिणात्य शैली वाटते. डावीकडे नंदी. डोक्यावर जटा+चंद्रकोर = शिव आहे का? पण शिवाच्या पायाखाली कोण आहे?

शिव आहे. एका बाजूला मनुष्यरूपातील नंदी, दुसर्‍या बाजूस वीणा हाती धरलेला विष्णू? खालच्या बाजूस मात्र विष्णू, ब्रह्मदेव आणि कार्तिकेय आणि ऋषी आहेत हे अगदी नक्की. पायाखाली मारलेला असुर म्हणजे अपस्मार.

तुषार काळभोर's picture

4 Jun 2023 - 10:50 pm | तुषार काळभोर

१. शिवाचं रूप: उजवा पाय अगदी मस्तकपर्यंत उचलला आहे. त्याचा काही अर्थ आहे का?

२. खालील रांग: मध्ये कार्तिकेय, त्याच्या उजवीकडे विष्णू, मग ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाच्या उजवीकडे कोण आहे?

शिवाचं बहुतेक तांडवनृत्य सुरू असावं. मस्तकापर्यंत उचललेला पाय म्हणजे ललाटतिलक मुद्रा.
ब्रह्मदेवाच्या उजवीकडे हिरव्या रंगाचा पोपटाची चोच असलेला शुकमुनी असावा. हा व्यासांचा अयोनीज पुत्र. शिव एकदा पार्वतीला कथा सांगत असताना एक पोपटही तो कथा ऐकू लागला आणि ऐकता ऐकता मध्येमध्ये हुंकार भरू लागला, त्याने पार्वतीची एकाग्रता भंग झाल्याने शिवाला राग आला व तो शुकाला मारायला धावला, भेदरलेल्या शुकाने व्यासांच्या आश्रमात प्रवेश करून त्यांच्या पत्नीच्या शरीरात प्रवेश केला आणि दडून राहिला, व्यासांनी अभय दिल्याने तो बाहेर आला व व्यासपुत्र बनला व पुढे शिवभक्त झाला अशी थोडक्यात कथा.

तुषार काळभोर's picture

5 Jun 2023 - 7:15 am | तुषार काळभोर

शुकमुनींची कथा रोचक आहे.

तुम्ही अनुभवाने भारावून गेलात तर आम्ही तुमच्या लिखाणाने !!

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Jun 2023 - 12:57 pm | राजेंद्र मेहेंदळे

सर्व वाचकांचे धन्यवाद!!

गोरगावलेकर's picture

3 Jun 2023 - 1:52 pm | गोरगावलेकर

सुरुवात तर छानच झाली आहे. पुढचे भागही येऊ द्या पटापट.
काही शंका आहेत. पुढील भागांमध्ये निरसन होईलच.
"४ जणांच्या सहलीसाठी त्याने ५ दिवस ४ रात्री साठी सुमारे ६०,०००/- रुपये आकारले"
यात लहान मुले किती? दोन रूम दिल्या का एकच? खर्च चौघांचा मिळून असेल तर जेवण, भटकंतीसाठी गाडी, प्रत्येक ठिकाणाची प्रवेश फी , वॉटर स्पोर्ट्स इ. खर्च वेगळा असेल ना?

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Jun 2023 - 2:00 pm | राजेंद्र मेहेंदळे

रु.६०,०००/- चौघांसाठी घेतले.(२ लहान,२ मोठे) त्यात राहणे( प्रत्येक ठिकाणी २ सेपरेट ए.सी. रूम), जीप ने फिरणे, पोर्ट ब्लेअर ते हॅव्लॉक आणि परतीचे बोटीचे तिकिट, जेल व लाईट आणि साउंड शो चे तिकिट हे समाविष्ट होते. वॉटर स्पोर्ट वगैरे गोष्टी आम्ही स्वतःच्या खर्चाने केल्या. विमानाची तिकिटे ही स्वतः काढली. पुर्ण खर्च २.२५ लाखाच्या आसपास झाला. (पुणे-मुंबई+खरेदी वगैरे मिळुन)

आपण म्हणता त्याप्रमाणे खरोखरच "एकूण चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला" अशी परिस्थिती दिसते.

अगदी मलाही तसेच वाटले. सुरवातीचा आकडा बघुन सहज जमण्यासारखे वाटले पण आता नीट विचार करुनच ठरवायला हवे.

विमान प्रवासाचा खर्च धरला तर थायलंड, व्हिएतनाम, मालदीव, दुबई या सर्व टूर अंदमान पेक्षा कमी बजेट मधे बसतात. तीस वर्षांपूर्वी शाळेत असताना तिथे भेट दिली होती. आताचे फोटो बघून बरेच renovation झाले आहे असे वाटते. मी गेलो तेव्हा तात्यारावांची कोठडी खोली धुळीने भरलेली होती. भिंतीचा रंग उडालेला होता आणि फक्त एक फोटो लावला होता. मला माझ्या शिक्षकांनी जाण्यापूर्वीच तिथे सावरकरांना साष्टांग नमस्कार घालायला सांगितले होते. मी तिथे कोठडीत तसा साष्टांग दंडवत घातला. तर सोबतचे लोक आणि मुख्यत: शहरी पोरे पोरी खूप हसले, चेष्टा केली. माझे कपडे धुळीने माखले. मी दुर्लक्ष केले. पण त्यांच्या प्रतिक्रियेबद्दल खूप वाईट वाटलं होतं.

बाकी फाशी गेटचे दोरखंड आणि लिव्हर ओढल्यावर पायाखाली उलटणारा तक्ता हे पाहून जुनी आठवण जागी झाली. तेव्हा एका विचित्र हौसेने तो फास गळ्यात घालून घेतला होता. आणि एकदम भान येऊन धडकी भरली. दोर उतरवला.

तो तुरुंग आहे हे क्षणभर बाजूला ठेवले (कठीण आहे ते) तर असे म्हणता येईल की ही वास्तू अतिशय निसर्गरम्य सुंदर जागी आहे. अथांग समुद्र दिसतो. हे तात्यारावांनी देखील नोंदवले आहे. अनेक तुरुंग अशा निसर्गरम्य जागी आहेत. गोव्यातही एक आहे असाच सी फेसिंग.

ऑस्ट्रियामध्ये एक नाझी छळछावणी बघायला गेलो होतो. तिचेही लोकेशन नितांत सुंदर होते. अशा ठिकाणी अनेक जण हालात जगले आणि क्रूर पद्धतीने मारले गेले हा विरोधाभास फारच विचित्र वाटतो.

लेख आवडला. धन्यवाद.

प्रचेतस's picture

4 Jun 2023 - 2:26 pm | प्रचेतस

खूपच सुरेख सुरुवात. अंदमान नाव घेताच आधी मनात नाव येतं ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचं. प्रचंड हालअपेष्टा भोगल्यात तिथं त्यांनी आणि इतर अनेक अनाम क्रांतिकारकांनी. प्रत्ययकारी वर्णन केले आहे तुम्ही.

चेन्नई विमानतळावरील शिल्पे फारच सुंदर. पहिली आहे विष्णूमूर्ती, बाजूला गरुड आणि नारद किंवा तुंबरु दिसताहेत, दुसरी आहे तीही शेषासह असलेल्या विष्णूची. नंतर अनंतशयनी विष्णूसह दशावतार, गणेश, दर्पणसुंदरी, महिषासुरमर्दिनी, पुन्हा अनंतशयनी मूर्ती खूपच सुरेख आहेत. मुंबई विमानतळावरील सजावट देखील आवडली.

पुढचा भाग लवकर येऊ द्यात.

सर्वसाक्षी's picture

5 Jun 2023 - 10:35 am | सर्वसाक्षी

वर्णन आणि चित्रे दोन्ही मस्त.

टर्मीनेटर's picture

5 Jun 2023 - 10:54 am | टर्मीनेटर

छान सुरुवात 👍
पुढील भागच्या प्रतिक्षेत!

सुबोध खरे's picture

6 Jun 2023 - 7:26 pm | सुबोध खरे

सुंदर वर्णन

अंदमानच्या समुद्रात दोन महिने काढले आहेत. तेंव्हाचे दिवस परत आठवतात. ( यावर एक लेखमाला मी येथे लिहिली आहेच)

सेल्ल्युलर तुरुंग आणि त्यातील स्वा. सावरकरांची कोठडी तेथला कोलू आणि त्यांनी काढलेल्या हालअपेष्टा याचा शो पाहिला होता. आजही त्याची आठवण झाली तर हृदयाचे पाणी पाणी होते आणि डोळे भरून येतात.

कोणत्याही तीर्थयात्रेला जाण्याऐवजी अशा ठिकाणी जाऊन स्वा. सावरकरांना श्रद्धांजली वाहिल्यास जास्त पुण्य जमा होईल.

स्वातंत्र्यासाठी कोणी किती किंमत दिली याबद्दल आजच्या पिढीला काहीही माहिती नसावी याबद्दल वैषम्य वाटते.

इतक्या हालअपेष्टा सहन करण्यासाठी माणूस का आणि कशासाठी तयार होतो हा विचार करुन स्वतःच्या स्वार्थी पणाची लाज वाटते आणि त्यांच्यावर आजहि शिंतोडे उडवणाऱ्या अत्यंत नालायक आणि स्वार्थी राजकारण्यांची चीड येते.

डँबिस००७'s picture

8 Jun 2023 - 1:51 pm | डँबिस००७

राजेंद्र मेहेंदळे,
खुप छान माहिती दिलीत. अंदमानच्या जेलचॅ फोटो बघुन एकाच वेळेला अनेक विचार मनात आले.
स्वातंत्र संग्रामाबद्दल , स्वतंत्र्य सैनिकांबद्दल अगोदरच्या पिढीत जी माहीती होती ती आता नाहीशी होत आहे, देशाला स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्षे होताना, आताच्या तरुण पिढीला स्वतंत्र्य सैनिकांनी भोगलेल्या हालअपेष्टांची जाणिव नाहीय. त्यामुळे अगदी हल्लीच (फक्त ७५ वर्षांपुर्वी ) मिळालेल्या स्वतंत्र्याची कदर नाही असे वाटते.
अंदमान जेल मधुन वीर सावरकरांची नावाची पाटी उखडुन टाकणार्या काँग्रेसी मणि शंकर अय्यर सारख्या लोकां विरुद्ध रोष त्यावेळेला महाराष्ट्रात दिसला नाही.

डँबिस००७'s picture

8 Jun 2023 - 2:10 pm | डँबिस००७

"सिनेमाग्रूहात राष्ट्रगीत चालु असताना उभे राहुन मानवंदना का द्यावी? " असा एक प्रश्न ईशा फांऊडेशनचे सद्-गुरु ना एका विद्यापिठाच्या समारंभात एका तरुणाने विचारला होता.
ह्या प्रश्नावर समर्पक उत्तर देताना सद् गुरुनी म्हंटले होते की कोणीतरी निधड्या छातीने सिमेवर आपल्या रक्षणासाठी उभा आहे ह्याची
जाणिव ठेवली तर स्वयंप्ररणेने राष्ट्रगीत चालु असताना उभे राहुन मानवंदना द्यावीशी वाटेल.
ह्या ऊत्तरा वर सहमत न होता प्रश्न विचारणार्याने पुढे विचारले की सिमेवर उभा रहाणारा सैनिक माझ्या साठी तिथे उभा नाही तर त्याला त्याचे पैसे मिळतात आणी वर प्रश्न कर्त्याने जोड प्रश्न विचारलाच, जर एखादा विकलांग राष्ट्रगीत चालु असताना उभे राहुन मानवंदना देऊ शकला नाही तर काय ?

कर्नलतपस्वी's picture

10 Jun 2023 - 2:34 pm | कर्नलतपस्वी

सिमेवर उभा रहाणारा सैनिक माझ्या साठी तिथे उभा नाही तर त्याला त्याचे पैसे मिळतात आणी वर प्रश्न कर्त्याने जोड प्रश्न विचारलाच, जर एखादा विकलांग राष्ट्रगीत चालु असताना उभे राहुन मानवंदना देऊ शकला नाही तर काय ?

असे प्रश्न विचारणाऱ्या भंपक माणसांना वाटते आपण किती हुशार, एवढ्या मोठ्या माणसाला निरुत्तर केले.

सद्गुरूंना त्याची लायकी कळाली म्हणून त्यांनी मर्यादा सोडली नसावी. माझ्यासारखा म्हणला असता, ये तुझ्या दोन तंगड्या तोडतो मग तू पण उभे नाही राहीलेस तर चालेल.

धर्मराजमुटके's picture

10 Jun 2023 - 3:37 pm | धर्मराजमुटके

सद्गुरूंना त्याची लायकी कळाली म्हणून त्यांनी मर्यादा सोडली नसावी. माझ्यासारखा म्हणला असता, ये तुझ्या दोन तंगड्या तोडतो मग तू पण उभे नाही राहीलेस तर चालेल.

अतिशहाण्यांच्या नादीच न लागलेले बरे. मात्र त्याचे वय काय होते ते पण पाहिले पाहिजे. शक्यतो तरुणपणात माणूस स्वतःला अतिशहाणा समजतो. वय वाढत जाते तसतशी अक्क्ल जागेवर येते.

Nitin Palkar's picture

4 Aug 2023 - 7:58 pm | Nitin Palkar

लेख आणि प्र चि दोन्ही सुंदर.
आता पाठोपाठ पुढचे लेख वाचतो.