संसदेच्या नवीन सभागृहाचे उद्धघाटन, यावरून अपेक्षेप्रमाणे विरोधी पक्षाने बहिषकार घालून देशाचे राजकारण किती खालच्या पातळीवर ते खेळत आहेत हे परत दाखवून दिले
आणि नतद्रष्ट पणाचा कळस म्हणून कि काय कि "जाणत्या राजाने " "बर झाले मी तिथे गेलो नाही " असे महान उदगार काढले आहेत ...
भारताच्या संसद भवनाच्या उदघाटन सोहळ्यात हिंदू धर्माचे असे उघड प्रदर्शन पाहून सर्व "शातिर " प्रवृत्ती डावखुर्यांची तळपायाची आग मस्तकात गेली असेल यात शंका नाही .. त्या सर्वांना उद्देशून हे
- तुम्हला लेको सर्वधर्मसमभावी घोषित असलेली पण ख्रिस्ती बहुल असलेलय काही पाश्चिमात्य देशातील सरकारी सोहळ्यात ख्रिस्ती धर्माचा ठसा असलेला चालतो पण भारतात जे ८०% आहेत त्यांच्या धर्माच काह्ही चालत नाही .. ?
- मध्यन्तरीच इंग्लड चे नवीन राजा चे राज्याभिषेक सोहळा झाला त्यातील एक महत्वाची गोष्ट , सर्व सोहळा हा एकतर चरच मध्ये झाला आणि सर्वात प्रोटेस्टंट ख्रिश्चन धर्मगुरूंनी केला .. ( अधून मधून कॅथॉलिक आणि ग्रीक किंवा रशियन ऑर्थोडॉक्स चर्च चे धर्मगुरू होते ) शेवटी बाहेर जाताण युनाइटेड किंग्डम मधील इतर धर्माचे धर्मगुरू रांगेत उभे होते आणि त्यांना अभिवादन करून राजा कॅचरल बाहेर पडला
कालचहय सोहळ्यात सुद्धा मुख्य हिंदू आणि शेवटी तर धर्मगुरुनींचे २ शब्द होते
मग या डावखुर्यांना येवध खुपत का?
काल देशातील बारनाळच नाही तर कैलासजीवन पण संपलं असेल !
प्रतिक्रिया
29 May 2023 - 8:33 am | श्रीगुरुजी
बरं झालं अपशकुन झाला नाही आणि कोणतेही विघ्न आले नाही.
29 May 2023 - 9:10 am | चौकस२१२
शेवटी "इतर धर्मगुरूंचे २ शब्द होते" असे वाचावे
29 May 2023 - 9:39 am | कॉमी
तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, इंग्लंड मध्ये राजाचा राज्याभिषेक झाला त्यावर उजवे डावे भांडत होते. राजेशाही कचऱ्याच्या टोपलीत टाकून द्या आणि त्यांच्यावर उगाच भरमसाठ पैसे उधळणे बंद करा असे डाव्यांचे म्हणणे होते. इथे बघा.
(बाकी, मला काही धार्मिक सिंबोलिझम बद्दल फारसा प्रॉब्लेम नाहीये.)
11 Jun 2023 - 4:11 pm | चौकस२१२
राजेशाही कचऱ्याच्या टोपलीत टाकून द्या
कॉमी, हो माहित आहे पण माझा मुद्दा तो नवह्ताच मुळी ं
इंग्लड मध्ये आणि विषेष कॅनडा आणि ऑस्ट्रेलियात "पुरे झाली राजेशाही " हि मोहीम चालू आहेच .. तीला अजून तरी यश आले नाहीये हे दुर्दैव
पण तो संपूर्ण वेगळं विषय आहे आणि बहुतेक भारतीय रहिवाश्यांना त्यात काही गम्य असण्याचे कारण दिसत नाही .. त्यामुळे तुम्ही उइथे ते का चिकटवले कळले नाही
माझा मुद्दा एवढाच कि "धार्मिक सिंबोलिझम" हे अगदी निधर्मी देशात सुद्धा बहुसंख्यांकांचे असते
तेवहा भारतात जर सरकारी कार्यक्रमात हिंदू संस्कृतीतीळ काही गोष्टी दिसलय तर डावखुर्यांना येवेढा जळफळाट का होतो?
आणि इथे हे हि नमूद करू इच्छितो कि कर्मकांडावर माझाही विश्वास नाही पण त्या रिच्युअल्स ( मराठीत ) त्यातून एक आनंद मिळ त असेल ( मग ते रंग/ गंध /स्वाद ) काही का असेना तर वापरायला काय हरकत आहे ? अनादर का?
सरकारने योग्य कीवा आयुर्वेद ची जाहिरात केली तर लगेच सरकारने हिंदुत्व आणले असला कंठशोष का करता ?
अणे तसे असेल तर सर्व बिन भाजप पक्षांनी आपली कार्यक्रमात कधीही झेंडूची फुले वापरू नयेत.. कारण त्यांचाच रंग बघ कसा हिंदुत्व प्रमोट करतो ते !
काहीही करून येन केन प्रकाराने हिंदू संस्कृतीला काह्ही पुढेच आले कि झोडायचे हि प्रवृत्ती दिसतीय
11 Jun 2023 - 5:23 pm | कॉमी
तुम्ही राज्याभिषेक सोहळ्याचा उल्लेख केलेला. म्हणून मी त्या सोहळ्यासाठी तिथल्या डाव्यांचे काय विचार आहेत हे सांगितले.
पुढे, मी हेच म्हणतो आहे, की धार्मिक सिंबोलिझ्म काहीही वाईट किंवा चुकीचे नाही. त्यामुळे माझ्याकडे काय गोष्टीचे स्पष्टीकरण तुम्ही मागत आहात मला माहीत नाही. भारतात अमुक नेते नेते इफ्तार पार्टीला गेले, चादर चढवायला गेले, असे आरोप असल्यासारखे फोटो कायम येत असतात. तो सुद्धा एक धार्मिक सींबोलिझम नाही काय ?
एखादे उदाहरण ? काय ऑब्जेक्शन घेतले आहेत सदर डावखुऱ्या लोकांनी ? ते जरा steelman करा, म्हणजे ते योग्य की अयोग्य बोलता येईल.
11 Jun 2023 - 6:00 pm | श्रीगुरुजी
अगदी काही दिवसांपूर्वी नवीन संसदभवनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगात वेदमंत्र, धार्मिक व्यक्ती वगैरेंच्या उपस्थितीवरून केलेला गदारोळ स्मरत असेल अशी आशा आहे.
11 Jun 2023 - 6:19 pm | कॉमी
इथे जी चर्चा झाली, त्यात असे म्हणणे एकूण दिसले.
"सध्या लोक आक्षेप म्हणून कारण देत आहेत ते राष्ट्रपती मूर्मू ह्यांच्या अनुपस्थितीचे, पण हे कारण नसते तर लोकांनी इतर काहीतरी कारण दिले असते"
11 Jun 2023 - 7:14 pm | श्रीगुरुजी
अजूनही कारणे दिली आहेत. थोरले पवार म्हटले की राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन नसल्याने मी गेलो नाही, तर त्यांच्या सुकन्या म्हणतात की खासदार असूनही औपचारिक निमंत्रण न देता कायप्पावर निमंत्रण दिल्याचा निषेध म्हणून मी गेले नाही. चुकलंच मोदींचं. धोतर कोट टोपी परिधान करून सर्व ८०० खासदारांच्या घरी जाऊन चांदीच्या वाटीत अक्षता सुपारी घेऊन निमंत्रण द्यावयास हवे होते.
29 May 2023 - 10:30 am | चंद्रसूर्यकुमार
ते तिथे गेले नाहीत म्हणून आम्हालाही बरेच वाटले :)
गेल्या काही दिवसातील घडामोडींमुळे, विशेषतः सेंगोल प्रकरणामुळे एक गोष्त लक्षात आली आहे. एक तर सेंगोल असे काही होते हेच बहुसंख्य लोकांना गेल्या काही दिवसातच कळले असेल. आणि तो सेंगोल नेहरूंच्या वडलोपार्जित घरी प्रयागराजला नेऊन ठेवला हे समजल्यावर स्वतःला नेहरूव्हिअन समजणारे लोक मात्र अडचणीत आले आहेत आणि ते याविषयी काहीही बोलू शकत नाहीत. जयराम रमेश या काँग्रेसमधील तथाकथित अभ्यासू नेत्याने त्याविषयी थोडेफार स्पष्टीकरण द्यायचा क्षीण प्रयत्न केला पण ते त्यात यशस्वी झाले नाहीत. कसे होणार? कारण नेहरूंनी (किंवा त्यांच्यापैकी कोणी) केलेला प्रकार पूर्ण असमर्थनीयच होता.
यावरून एक गोष्ट आठवली. २०१५ मध्ये प्रजासत्ताक दिनासाठी बराक ओबामांना प्रमुख पाहुणे म्हणून मोदींनी बोलावले होते. तेव्हा मोदी एक कोट घालून होते. त्या कोटावर बारीक फॉन्टमध्ये 'नरेंद्र दामोदरदास मोदी' असे लिहिलेले होते. वास्तविकपणे त्या कोटावर तसे काही लिहिले होते हे मुद्दामून कॅमेरा झूम केल्याशिवाय समजण्यातले नव्हते. तरी कोणा पत्रकाराने की कॅमेरामनने तसे केले आणि त्या कोटावर ते लिहिले आहे हे समजल्यावर सगळा गदारोळ झाला. खरं तर तो कोट मोदींनी स्वतः बनवून घेतलेला नव्हता तर त्यांना तो कोणा पक्ष कार्यकर्त्याने भेट म्हणून दिला होता. त्यानंतर मोदींनी त्या कोटचा लिलाव करून मिळालेले पैसे नमामि गंगे प्रकल्पाला देणगी म्हणून दिले. गुजरातचे मुख्यमंत्रीपद सोडून दिल्लीला पंतप्रधान म्हणून येतानाही त्यांना मुख्यमंत्री असताना मिळालेल्या भेटवस्तूंचा असाच लिलाव करून मिळालेले पैसे गुजरातमधील मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी दिले होते. तरीही त्या एका कोटावर बारीक फॉन्टमध्ये सहजासहजी न दिसणार्या शब्दांवरून त्याच नेहरूव्हिअन लोकांनी इतका गदारोळ केला होता. त्या कोटावर ते शब्द लिहिले आहेत हे स्वतः मोदींच्याही लक्षात आले होते की नाही कोणास ठाऊक.
त्याउलट नेहरूंना तो सेंगोल भेटवस्तू म्हणून मिळालेला नव्हता तर भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून त्यांनीच तो स्विकारला होता हे आता सर्वज्ञात झाले आहे. सेंगोल हा शब्दही बहुसंख्य लोकांना माहित व्हायच्या आधी मागच्या वर्षी स्वातंत्र्यदिनाला आलेला एका लेखाची लिंक मी दुसर्या धाग्यात दिली आहे त्यात त्याचा उल्लेख आहे आणि नेहरूंनी तो सेंगोल स्विकारल्यानंतरचा फोटोही त्यात आहे. म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याचे प्रतिक असलेला सेंगोल नेहरूंनी (किंवा त्यांच्यापैकी कोणी) नेहरूंना मिळालेली भेटवस्तू ठरवून टाकून त्यांच्या घरी नेऊन टाकला. हे कसे काय समर्थनीय आहे? जर मोदींच्या कोटावर बारीक फॉन्टमध्ये लिहिलेल्या आणि सहजासहजी न दिसणार्या शब्दांवरून हे नेहरूव्हिअन लोक इतका गदारोळ करत असतील तर मग त्यांच्याच प्रिय नेत्याने (किंवा त्या नेत्याशी संबंधित कोणीतरी) अशी ढापाढापी केल्यावर तेच लोक मूग गिळून का गप्प आहेत?
नशीब ग्रोव्हर क्लिव्हलँड जवाहरलाल नेहरूंसारखे नव्हते. नाहीतर फ्रान्सकडून भेट मिळालेल्या स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यालाही अध्यक्ष क्लिव्हलँड यांना फ्रान्स सरकारने भेट दिलेली भेटवस्तू म्हणून स्वतःच्या घराच्या अंगणात घेऊन जायचे.
29 May 2023 - 11:34 am | प्रसाद गोडबोले
तरीही टीका करायचीच असं ठरवलं तर मला एक गोष्ट खटकली सर्व सोहळ्यात की-
हिंदु कर्मकांडात , विशेषतः कोणत्याही पवित्र कार्यात गृहस्थ व्यक्ती सोबत त्याची पत्नी , अर्धांगिनी असणे महत्वाचे आहे. खुद्द रामाने अश्वमेध यज्ञ करताना सीता सोबत नाही म्हणुन सीतेचा सोन्याचा पुतळा बनवुन घेतलेला.
आता हे संसद उद्घाटन म्हणजे काही श्राध्द वगैरे तस्तम समान कर्म नाही की पुरुषाने एकट्याने करावे.
किंव्वा मोदी काही ऑफिशियली संन्यासीही नाहीत. (मुळात संन्यास्याला कर्मकांडच नाही, अन कर्मकांड करावयाचा अधिकारच नाही , जीवनमुक्त माणुस गोत्र काय सांगणार ?! )
तर एक कट्टर सनातनी वैदिक म्हणुन ही एक गोष्ट खटकली . बाकी उत्तम !
31 May 2023 - 5:50 am | कंजूस
सुपारी ठेवतात. पण नसलीच तर काही बिघडत नाही.
आता आमचे नेते कर्नाटकात जायला उत्सुक आहेत. इथल्या काही जिल्हा तालुका गावांची मागणी होती की आम्हाला कर्नाटकात न्या. तर आता पुढे नवीन सरकार मविआचं आलं की तसे करतीलच. शिवाय कुणाचे पाहुणे म्हणून जाण्याची गंमत बऱ्याच वर्षांनी आली.
31 May 2023 - 12:45 pm | Trump
+१.
हिंदुधर्म हा कालसुसंगत हवा आणि लोकांचे आयुष्य सुखकर करायला हवे, नाहीतर नुसते अबोध नियमांचे एक डबके होऊन जाईल.
29 May 2023 - 1:15 pm | ashok dalvi
जाउन याय् च हो....... उध्या चे कअन्य सन ग ६त येत नहि.
29 May 2023 - 1:15 pm | ashok dalvi
जाउन याय् च हो....... उध्या चे कअन्य सन ग ६त येत नहि.
29 May 2023 - 1:35 pm | श्रीगुरुजी
बरं झालं (अप)शकुनी मामा आला नाही.