आजि मी विठ्ठ्ल पाहीले

मंदार धारप's picture
मंदार धारप in काथ्याकूट
16 Dec 2008 - 9:59 pm
गाभा: 

आपल्या मिसळपावचे मालक तात्या अभ्यंकर ह्यांचे सद्गुरु जसे स्वरभास्कर भिमसेन जोशी, तसेच माझे सद्गुरु म्हणजे आपला सचिन रमेश तेंडुलकर.

काल सचिनने शतक ठोकून भारताला सामना जिंकून दिला आणि डोळ्यात टचकन पाणि आले. एकोणिस वर्षे सतत देशाची सेवा निरपे़क्श भावनेने करणार्या सचिन, आजही लहान मुलासारखा नाचला. गेलि दोन-तीन वर्षे मे सचिन वरून लोकांचि आतोनात बोलणी खाल्ली आहेत. त्याचे काही तथाकथित दोष :

१. त्याने शतक ठोकले की भारत हारतो.
२. तो फायनल मधेकधीच खेळत नाही
३. तो म्हातारा झाला आहे
४. तो सेल्फिश आहे
५. तो कधीच भारताला चवथ्या इन्निंग मधे शतक ठोकून जिंकून देउ शकत नाही

आज हे सगळे आरोप फोल ठरले आणि माझा सचिन अस्सल सोनं आहे हे पुन्हा सिद्ध झाले.
पण प्रश्न असा आहे की सचिनच्या कम्मिट्मेंट बद्द्ल कोणी काही बोलूच कसे शकतो?

सचिन सोडून इतर खेळाडूंचे काहीच उत्तरदायित्व नाही.
तो फायनलमधे फेल जातो, पण फायनल पर्यंत पोचवतो कोण?
तो म्हातारा झाला आहे , पण यंग ब्रिगेडवाल्यांना ओझला ओझमधे हरवायला फायनलमधे हा म्हाताराच लागला ना??

काल सामना जिंकल्यावर मन एकदम ९ वर्षे मागे गेले.चेन्नईला भारत-पाकिस्तान सामना. भारताला २७१ रन्स हव्या होत्या.सचिनला पाठ्दुखी सुरू झाली आणि तो प्रत्येक चेंडू नंतर कळवळत होता. तसेच त्याने शतक ठोकले. भारत २५५/५ आणि सचिन बाद झाला. उरलेले ४ गडी वसीमने गुंडाळले व भारत हारला. त्यनंतर सर्वांने सचिनच्या डोक्यावर खापर फोडले होते.
काल तो कलंक पुसला गेला.

आत सचिनचा क्रिकेट्बद्दल व यशाबद्द्ल जो द्रुष्टिकोण आहे तो एका मुलखतितुन बाहेर आला तो असा :

प्रश्न : रेकोर्ड्स बद्द्ल तुझे काय मत आहे?
सचिन : रेकोर्ड्स होत रहातात, पण ज्या इन्निंगमुळे देश जिंकतो तिच ग्रेट, बकी सर्व फोल.

प्रश्न : तू क्रिकेट शिकायला सुरुवात केल्यापासुन आजपर्यंत असा कुठला क्शण आहे जो तुला परत हव आहे?

हे उत्तर ऐकल्यावर मे सचिनचा चाहता होतो तो भक्त झालो.

सचिन : मी शिवाजी पार्क वर सराव संपवला आहे आणि आइला पी.सी.ओ वरून फोन करतो आहे आणि सांगतो आहे कि आई, मी येतो आहे, आमरस काढ आणि पोळ्या बनवायला घे. मला ओट्यावर बसून आमरस पोळी खायची आहे.

हे ऐकल्यावर मला वाटले :

"आजि मी विठ्ठ्ल पाहीले"

जय सचिन
जय महराष्ट्र
जय हिंद

प्रतिक्रिया

व्यंकु's picture

16 Dec 2008 - 10:15 pm | व्यंकु

खरंच महान माणूस आहे तो बोलावं तितकं कमीच याच्याबद्दल
'झाले बहू होतीलही बहू परंतु या सम हा'

शंकरराव's picture

17 Dec 2008 - 1:24 am | शंकरराव

स्तुतीच्या पलिकडे ...
'झाले बहू होतीलही बहू परंतु या सम हा'
असेच म्हणतो..

विसोबा खेचर's picture

17 Dec 2008 - 1:27 am | विसोबा खेचर

मंदारभिडू, सह्हीच लिहिलं आहेस रे!

या मराठमोळ्या फलंदाजाला माझाही सलाम..!

तात्या.

सिद्धू's picture

17 Dec 2008 - 10:38 am | सिद्धू

मंदार, तुझ्या मताशी मी एकदम सहमत आहे.
सचिन बद्दल अविश्वास दाखवणार्‍यांचे खरच आश्चर्य वाटते.
त्याची कमिटमेंट वादातीत आहे.

दिपक's picture

22 Dec 2008 - 4:15 pm | दिपक

माझ्या नशिबाने मला त्याची स्वाक्षरी घेण्याचा योग जुळुन आला होता. नववित असताना एका जाहिरातीत प्रेक्षंकाचे काम करण्यासाठी आमचा वर्ग गेला होता. त्या मैदानात सचिन आला तेव्हा मी आणि माझ्या एका मित्राने त्याच्याकडे स्वाक्षरीसाठी धुम ठोकली होती. मी एक स्वाक्षरी सचिनकडुन घेतली आणि वहिचे पान परतुन परत मागितली. तेव्हा सचिन "एक घेतली ना?" असे म्हणाला. मी मग माझ्या बाकिच्या मित्रांकडे बोट दाखवुन "त्यांच्यासाठी पण हवी आहे!" असे म्हणालो तेव्हा सचिनने स्मित करत ८ स्वाक्षऱ्या दिल्या.! :)

धन्य झालो मी माझ्या देवाला प्रत्यक्ष पाहुन.