ह्या whatsapp चे करायचे काय ?

मुग्ध्स्वप्न's picture
मुग्ध्स्वप्न in काथ्याकूट
14 May 2023 - 9:37 am
गाभा: 

मी  गेले  बरेच  वर्षे व्हाट्सअँप वापरत आहे . पण  नोव्हेंबर  २०२२ पासून  माझे  whatsapp ब्लॉक करण्यात आले आहे . ह्या संदर्भात मी Meta शी  ई-मेल मार्फत विचारणा केली असता  computerised जनरेटेड रिप्लाय आला तो  येणेप्रमाणे --

Hi,

Our system flagged your account activity as a violation of our Terms of Service and banned your phone number. Your account will remain banned as a result of the violation.We recommend carefully reviewing the “Acceptable Use of Our Services” section of our Terms of Service to learn more about the appropriate uses of WhatsApp and the activities that violate our Terms of Service. You can learn more about how to use WhatsApp responsibly in this Help Center article.Please keep in mind, WhatsApp reserves the right to enforce its policies in accordance with its Terms of Service.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

...आणि हा रिप्लाय bot जनरेटेड असल्यामुळे त्यातील नेमके कोणत्या कारणामुळे माझे व्हाट्सअँप ब्लॉक झाले आहे हे कळण्यास मार्ग नव्हता. बरेच वेळा ई-मेल करून सुद्धा हेच उत्तर.  त्यानंतर मी गूगल वर ह्यासंदर्भात माहिती मिळते का ? जंग जंग पछाडले परंतु मला काहीच माहिती मिळाली नाही पण एका लोकप्रिय वर्तमान पत्रातील बातमी निदर्शनास पडली ती अशी की -- According to WhatsApp’s monthly user safety report, the instant messaging service banned over 2.3 million Indian users in the month of August alone. 

त्यानंतर जानेवारी २०२३ साधारण परत व्हाट्सअँप चालू करून बघण्याचा प्रयत्न केला आणि  चक्क १/२ दिवस चालूही झाले आणि परत ब्लॉक झाले. नंतर बऱ्याच वेळा प्रयत्न केला मात्र  --This account cannot use WhatsApp असा मेसेज येतोय. त्याचप्रमाणे बेल्जियम, बेलारुस अश्या ठिकाणाहून काही नंबरद्वारा मला व्हाट्सअँप वर hi टाकून बोलण्याचा प्रयत्न होत असे  पण मी त्या नंबर ना स्पॅम समजून कोणताही प्रतिसाद न देता ब्लॉक करत असे. त्याचप्रमाणे  माझ्या मोबाईलद्वारे अचानक ISD कॉल्स लागत होते तेही लक्षात न येता. त्यामुळे मला लोकप्रिय मोबाईल कंपनीने २ वेळा ISD कॉल्स आकारले माझी काही चूक नसताना देखील.   

काही दिवसाने माझ्या नावावर असलेल्या अजून २ मोबाईल नंबर्सने व्हाट्सअँप चालू करण्याचा प्रयत्न केला परंतु ते दोन्ही नंबर्स व्हाट्सअँपने  ब्लॉक केले ते आजतागायत...

वि . सु .  मी आजमितीपर्यंत व्हाट्सअँप वर कोणतेच स्पॅम मेसेजेस पाठवले नाहीत. (... एवढा वेळच नसतो.) 

फारच मनस्ताप झाला आहे.. व्हाट्सअँप वापरता येत नाही म्हणून नाही पण जेव्हा एखादे महत्वाचे काम असते ऑफिसचे किंवा इतर महत्वाची माहिती आदान - प्रदान करण्याची तेव्हा फारच पंचाईत होते. आणि व्हाट्सअँप ब्लॉक झाले आहे असे सांगितल्यावर समोरच्याच्या चेहऱ्यावर मी दहशतवादी असल्यासारखा आविर्भाव असतो. 
मला जाणून घ्यायचे आहे की वरील अनुभव कोणास आला आहे का ? असल्यास त्यावर काही करण्यायोग्य मार्ग, पर्याय, उपाययोजना तज्ज्ञ, तंत्रज्ञ मीपाकरानी सुचवाव्यात. 

धन्यवाद !

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

14 May 2023 - 10:08 am | श्रीगुरुजी

१) क्रोम किंवा इतर कोणत्या तरी ब्राउझरमधून WhatsApp Web वापरून पहा.

२) एकदा WhatsApp uninstall करून एक दिवसांनी परत install करून पहा.

३) गुगलवर या समस्येवर उपाय शोधा. अनेकांना ही समस्या आली असणार.

४) गुगलवर मेटाचे इतर संपर्क क्रमांक, इमेल आयडी वगैरे शोधून त्यांच्याशी संपर्क साधा.

मुग्ध्स्वप्न's picture

14 May 2023 - 12:16 pm | मुग्ध्स्वप्न

श्रीगुरुजी, आपल्या माहितीसाठी आपण सुचवलेले प्रत्येक उपाय आधीच करून झालेले आहेत.

आपण सुचवलेल्या उपायांकरिता धन्यवाद !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2023 - 10:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाट्सॅप थर्ड पार्टी अ‍ॅप वापरल्यास बॅन होते याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. थर्ड पार्टी अ‍ॅप मधे अनेक फिचर्स असतात जे रेग्युलर वाट्सॅप देत नाही त्यामुळे अनेकदा असे थर्ड पार्टी अ‍ॅप्लीकेशन्स वापरणा-यांना एक तास, सात दिवस, असे बॅन होतांना पाहिले आहे. पण पून्हा प्लेस्टोरवरील वाट्सॅप वापरले की वाट्सॅप पूर्ववत चालू होतात. आपण मांडलेल्या धागा-विचारावरुन असे वाटते की, तुम्ही थर्डपार्टी अ‍ॅप वापरले असावे आणि त्यामधे खटपट किंवा अन्य काही. जे रेग्युलर वाट्सॅपमधे करता येत नाही, ते करीत आहात असे त्यांना वाटल्यामुळे तुमचे वाट्सॅप बॅन झाले असावे असे वाटते. आता तुम्ही नाही म्हणत आहात पण, कदाचित स्पॅम मेसेजेस टाइप मेसेजेस बीझीनेस म्हणून पाठवले गेले असावेत किंवा काहींनी स्पॅम म्हणून तक्रारी केल्या असाव्यात अशी शंका येते कारण विनाकारण वाट्सॅप बॅन झाल्याचे माझ्या पाहण्यात नाही.

-दिलीप बिरुटे

मुग्ध्स्वप्न's picture

14 May 2023 - 12:19 pm | मुग्ध्स्वप्न

सर, मी रेग्युलर व्हाट्सअँपच  वापरतो. 

प्रतिसादाबद्दल आभारी आहे आपला, सर !

शाम भागवत's picture

14 May 2023 - 12:50 pm | शाम भागवत

तुमचा फोन हॅक झाला असावा असचं माझं प्रथमदर्शनी मत झाले आहे.

आनन्दा's picture

15 May 2023 - 2:55 pm | आनन्दा

माझे पण हेच मत आहे.

फोन factory reset करा आधी.
त्यानंतर नवीन सिमकार्ड घेऊन त्यावर WhatsApp वापरून पहा.
कदाचित चालेल.
प्रॉब्लेम किल्ली मध्ये नसून कुलुपात आहे.

मुग्ध्स्वप्न's picture

15 May 2023 - 8:57 pm | मुग्ध्स्वप्न

...आनंदाजी, जरुर आपण म्हणताय तसे करून पाहतो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

मुग्ध्स्वप्न's picture

15 May 2023 - 8:53 pm | मुग्ध्स्वप्न

...मलाही तसेच वाटते आहे. काय उपाययोजना करू शकतॊ ?

त्याच हँडसेटमध्ये दुसरा नंबर टाकला तरी त्यांना कळते ते तुम्हीच आहात.

बाकी काही कारण कळत नाही.

श्रीगुरुजी's picture

14 May 2023 - 2:08 pm | श्रीगुरुजी

मग नवीन क्रमांक व नवीन चतुर भ्रमणध्वनीसंच घेऊन त्यात WhaysApp इन्स्टॉल करून पहावे.

मुग्ध्स्वप्न's picture

15 May 2023 - 9:05 pm | मुग्ध्स्वप्न

हाही एक उत्तम उपाय आहे पण थोडा खर्चिक आहे. पण त्यातही एक गोम आहे हा नंबर मी गेली १५/१६ वर्ष वापरत असल्यामुळे सगळी कडे हाच नंबर दिला आहे . त्यामुळे सकृतदर्शनी पाहता हा उपाय करण्यास वेळ जाईल. माझाही डोक्यात ही कल्पना येऊन गेली .

मुग्ध्स्वप्न's picture

15 May 2023 - 9:01 pm | मुग्ध्स्वप्न

हो ना... मला वाटते IMEI ब्लॉक केला असेल... जेणेकरून कोणताही नवीन सिम कार्ड ने

लॉगइन करता येऊ नये

सिरुसेरि's picture

17 May 2023 - 3:27 pm | सिरुसेरि

एक सुचना - या मधे तुमचा मोबाईल तसेच मुख्यत्वे तुमचे वाट्सॅप अकाउंट हॅक झाले आहे असे दिसते आहे . पुर्वी मायक्रोमॅक्स च्या मोबाईलला हा प्रॉब्लेम सतत येत असे . नवीन मोबाईल घ्या . तसेच सर्व प्रथम तुम्ही तुमचे वाट्सॅप अकाउंट लॉक करा . तुमचे वाट्सॅप अकाउंटला एक सिक्युरिटी पिन सेट अप करा . फेसबूक अकाउंट हॅक होऊ नये म्हणुन हिच कॄती करा .

मुग्ध्स्वप्न's picture

17 May 2023 - 6:57 pm | मुग्ध्स्वप्न

मोलाची माहिती दिलीत आपण. धन्यवाद सिरुसेरि 

कंजूस's picture

17 May 2023 - 10:20 pm | कंजूस

तुमचा फोन तुमच्या नकळत वापरून कुणीतरी चावटपणा केला आहे हा संशय आहे. त्यामुळे हे सिम कुठेही वापरले तरी चालणार नाही. Restart करूनही फायदा नाही. वाटसपच्या यूजर लिस्टमध्येच नंबर बाद आहे.
सिम बदलणे हाच उपाय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 May 2023 - 12:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाटसपच्या यूजर लिस्टमध्येच नंबर बाद आहे.

बरोबर. फोनक्रमांकास तिकडून जामीन मिळाला पाहिजे. हॅक वगैरे यातही काही तथ्य वाटत नाही.वाट्सॅप कोड यायला पाहिजे सरळ सरळ, इतर मेसेजेस येत असतील आणि वाट्सॅपचा कोड येत नसेल तर झोल इथेच आहे. ब्लॉक करायला यांनी काही मोठा गुन्हा केलेला नाही. गुगलून यूट्यूबवर बरेच मार्ग आहेत ते बघून प्रयत्न करीत राहावे. यश नक्की मिळेल.

-दिलीप बिरुटे