लव्ह जिहाद, एक उच्चवर्णीय फँटसी !

उनाड's picture
उनाड in काथ्याकूट
12 May 2023 - 6:12 am
गाभा: 

गेली अनेक वर्षे या संकल्पनेने धुमाकूळ घातला आहे. वास्तविक पहाता असले काहीही अस्तित्वात नाही, पण तरीही शिकले सवरलेले लोक तावातावाने हा विषय मांडतात त्याचा थोडासा मागोवा.

या विषयी एक दरपत्रक व्हायरल झाले होते. ते खोटे दरपत्रकही ज्याने लिहिले त्याचा जात्याभिमान त्याला लपवता आला नाही. चातुर्वर्ण्याप्रमाणे त्याने विविध वर्णाचे दर ठरवले, जास्त दर कोणाचा हे सांगणे नलगे.

महाराष्ट्रात एका शहरात असा आंतरधर्मीय विवाह दोन्ही कुटूंबांच्या सहमतीने झाला होता. तेव्हाही रिकामटेकड्या मध्यमवयीन उच्चवर्णीय व्हॅट्स अ‍ॅप अंकल्स नी ती पत्रिका व्हायरल केली व दोन्ही कुटुंबांना मनस्ताप झाला.

नुकतेच उत्तरेत एका अक्षरशः भीक मागून जगणार्‍या महिलेने एका मुस्लिमाशी प्रेम विवाह केला व धर्म बदलला. तिच्या डोक्यावर छप्पर आले, दोन घास मिळू लागले ही खरे तर चांगली गोष्ट, पण विहिंप वाल्याने तक्रार केली व आता एफ आय आर वगैरे सुरू आहे. लव्ह जिहाद च्या संशयावरून आत टाकलेल्या एका मुलीचे तर मिस कॅरेज झाले.

स्वरा भास्कर ( कट्टर हिंदुत्ववादी दिवसभर तिला ट्रोल करतात ) ने एका मुस्लिमाशी लग्न केले. करो बापडी, पण स्वतःला साध्वी म्हनून घेणार्‍या एका भाजप नेत्रीने ट्विटर वर इतकी गरळ ओकली की तिला साध्वी तरी का म्हणावे असा प्रश्न पडला.

या लव्ह जिहाद कल्पने मध्ये आमच्या मुलींना अक्कल नसते, हे गृहितक अध्याहृत आहे.

केरला स्टोरी च्या निमित्तने या विषयावर पुन्हा एकदा सोमी वर थयथयाट सुरू झाला यात आश्चर्य ते काय ?

प्रतिक्रिया

>> आजकालच्या शिकलेल्या मुली स्वतःचा स्वार्थ समजणाऱ्या असतात. त्यांचे विचार पक्के असतात. अश्या मुली लव जिहादला बळी पडणे शक्य नाही.

आणि तरीपण “प्रबोधन" करणाऱ्या चित्रपटाची आवश्यकता आहे असं म्हणायचं?

>> पण मग अश्या वेळी मुसलमान धर्म सेक्युलर कसा ठरेल?

मुस्लिम सेक्युलर असण्याचा काय संबंध आहे इथे?

>> बाहेर उगम पावलेले आणि प्रसारासाठी आलेले धर्म टिकवण्यासाठी इथले लोक इतका आटापिटा का करतात हेच समजत नाही?

मुली लव्ह जिहाद ला बळी पडणारच नसतील तर या प्रश्नाची का काळजी असावी?

आणि तरीपण “प्रबोधन" करणाऱ्या चित्रपटाची आवश्यकता आहे असं म्हणायचं?

काही अंशी हो... आणि या मागे केवळ प्रोबोधन नाही तर अश्या चित्रपट काढण्यामागील मुख्य हेतू हा कि "हे घडतंय" हा निरोप सर्वत्र पसरवला पाहिजे
जर एकीकडे स्वताला पुरोगामी समजणाऱ्यांचं "सर्व काही आलबेल आहे किंवा , मुस्लिम समजतील काही वाईट प्रथांबद्दल बोलले कि लगेच "इस्लामोफोबिया " असा आरडाओरडा / प्रोपोगांडा चालू असतो तर मग ज्या हिंदू विरोधी घटना घडत आहेत ( छोट्या मोठया प्रमाणात, ) त्याबद्दल अशी कलाकृती बनवण्याचा हक्क आहेच,, बघणे ना बघणे हे ज्याचे त्याचे ...
शहाबानो प्रकरणात धर्मगुरु दबावाला बली पडणारे कॉग्रेस काय किवा ट्रिपल तलाक वरील बंदीला ती बंदी स्रीईं चं रक्षण साठी असून सुद्धा विरोध करणाऱ्या ढोंगी लोकांना काह्हीहि अधिकार नाही कि काश्मीर फाईल किंवा केरळ स्टोरी का काढली म्हणून विचारण्याचा.

पुढील चित्रपट " गोआ फाइल्स" सालाझार च्या पोर्तुगीझ गोव्यात सगले काही सुशेगात होते जणू असा प्रचार करणाऱ्यांच्या कांगाव्याला हाणून पाडण्यासाठी असा चित्रपट आला तर नवल नाही
तिथे एवढ्या हिंदू चे धर्मांतर झाले कसे? का कि सगळे डिंकाश्टा आणि ब्रॅगांझा सरळ पोर्तुगाल वरून आले आहेत?

रात्रीचे चांदणे's picture

16 May 2023 - 8:02 am | रात्रीचे चांदणे

या मागे केवळ प्रोबोधन नाही तर अश्या चित्रपट काढण्यामागील मुख्य हेतू हा कि "हे घडतंय" हा निरोप सर्वत्र पसरवला पाहिजे
सहमत, नाहीतर दहशतवाद्यांना धर्म नसतो याचप्रमाणे लव जिहाद ला धर्म नसतो च तुणतुणं चालू होईल.

सुखीमाणूस's picture

16 May 2023 - 10:22 pm | सुखीमाणूस

>>>आणि तरीपण “प्रबोधन" करणाऱ्या चित्रपटाची आवश्यकता आहे असं म्हणायचं?

होय.कारण मुलीना आपण फार स्वतन्त्र विचारच्या आहोत आणि स्वताची काळजी घ्यायला समर्थ आहोत असे वाटत असते. पण हे सगळे व्यक्तिमत्व स्वातन्त्र्य वगैरे भारतीय कायद्याने मिळालेले असते. त्यामुळे मुस्लिम माणसाशी लग्न झाल्यावर सगळे बदलते व गुपचुप बुरख्यात जावे लागते. मग टिकली आणि मंगळसूत्र यांचं लोढणे वाटणारी बाई, hijab is my choice म्हणते. आपले खोटे सेक्युलर पण याचे ढोल वाजवत बसतात. कर्नाटकात बुरखा या विषयाचे जे जे राजकारण केले गेले ते याचा उत्तम नमुना आहे. काँग्रेस स्वतःला सेक्युलर म्हणवते आणि हिजाब चे मात्र समर्थन करते. विनोदाचा भाग असा आहे की हा हिजाब मग गुलामगिरीचे प्रतिक वाटत नाही,तर स्वातन्त्र्याचे प्रतिक वाटते. शिवाय समाजात बिचाऱ्या भोळ्या अशिक्शीत किवा कमी शिकलेल्य, व्ह्यहवार चातुर्य नसलेल्य मुली असतात.त्या तर खोटे बोलून फसवल्या जातात. या मुलींना लव्ह जिहाद या नावाखाली systematically फसवले जाईल याची जागृती करणे आवश्यक आहे.
जर सुशिक्षित नॉन मुस्लिम स्त्री धर्म न बदलता मुस्लिम माणसाशी विवाह करून जर आपली मुले निधर्मी किंवा मातृधर्माचे संस्कार देऊन वाढवू शकली तरच ते लव जिहाद प्रकरण नसेल. नाहीतर विवाहामुळे मुस्लिम धर्म स्वीकारावा लागत असेल तर नक्कीच लव्ह जिहाद आहे.

सुखीमाणूस's picture

16 May 2023 - 10:27 pm | सुखीमाणूस

>>मुली लव्ह जिहाद ला बळी पडणारच नसतील तर या प्रश्नाची का काळजी असावी?

भारतातील सेक्युलर लोक जर समान नागरी कायदा यावा म्हणून कामाला लागली तर सगळे प्रश्न सुटतील. आणि सर्व धर्माच्या लोकांना एकाच लग्नाला परवानगी आणि लोकसंख्या नियंत्रण लागू केले तर खरी समानता येईल.

पण मग अश्या वेळी मुसलमान धर्म सेक्युलर कसा ठरेल?
बरोबर
हा प्रश्न जर मुस्लिम धर्मगुरूंना विचारला तर त्यानं फेफरे येईल

उनाड's picture

15 May 2023 - 9:30 pm | उनाड

सैराट पिक्चर ने नाही का समाजातील काही प्रकारच्या समस्यांवर प्रकाश टाकला.

कोणत्या समस्या ?

श्रीगुरुजी's picture

15 May 2023 - 9:43 pm | श्रीगुरुजी

उनाड,

लव्ह जिहाद हे उच्चवर्णीयांचा कल्पनाविलास आहे या दाव्याचे पुरावे व विदा कोठे आहे? नसेल देता येत तर दावा मागे घेऊन माफी मागा आपण खोटारडेपणा केला हे मान्य करा.

याविषयी अनेकदा विचारले आहे, परंतु कोणतेही पुरावे आणि विदा न देता ब्राह्मणमत्सरी पिचकाऱ्या का सुरू आहेत?

वारंवार ब्राह्मणद्वेषाची गुळणी थुंकण्याऐवजी पुरावे आणि विदा दिला पाहिजे.

चौथा कोनाडा's picture

15 May 2023 - 9:53 pm | चौथा कोनाडा

उगाच दुसरा विषय काढून सैराट व्ह्ययलेत उनाडभाऊ !
उकरत बसा आता समस्या !

श्रीगुरुजी's picture

15 May 2023 - 10:12 pm | श्रीगुरुजी

विदा व पुरावे नसताना ब्राह्मणद्वेषातून खोटे आरोप केल्याचे सिद्ध होऊन खोटारडेपणा उघडा पडला. म्हणून तर विषय बदलणे सुरू आहे.

मदनबाण's picture

15 May 2023 - 10:43 pm | मदनबाण

लव्ह जिहाद या शब्दाच्या उगमा विषयी काही मतांतरे आहेत. यात माझ्या पाहण्यात आलेली २-४ खालील प्रमाणे :-
१ ] साल "२००७" हिंदू जागृती समिती. स्थळ :- कर्नाटक.
२] साल "२००९" केरळ हायकोर्ट. स्थळ :- कोची. [ संदर्भ ]
३] याच काळात केरळातील ख्रिश्चन बिशप / फादर किंवा तत्सम धर्म प्रमुख यांच्या कडुन असा उल्लेख.
४] व्ही.एस.अच्युतानंदन. कोणा बद्धल :- पीएफआय. स्थळ :- केरळ.

लव्ह जिहाद म्हणजे नक्की काय ?
वाळवंटातील दुष्ट आणि लुटारु संप्रदायाने त्यांच्या अनुयायांना सांगितले जगात एकच देव तो म्हणजे आपला. जे लोक हे मानणार नाहीत त्यांचे सर्वस्व लूटा, त्यांच्या पुरुषांना कापा आणि त्यांच्या स्त्रियांना भोगुन काढा. याचे संक्षिप्त ३ शब्दात असलेले स्वरुप म्हणजे "जिहाद"
या ३ शब्दात सर्व काही समाविष्ट झालेल आहे आणि होऊ शकतं... उदा. लँड जिहाद,लव्ह जिहाद... इ.

जाता जाता :- श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे झाल्यावर देखील काहींना लव्हजिहाद दिसतं नसेल/ समजत नसेल तर...एक तर ते उच्चवर्णीय वायझेड असावेत किंवा उच्चवर्णीय गतीमंद !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ved Tujha... :- Ved

चौकस२१२'s picture

16 May 2023 - 4:46 am | चौकस२१२

"हलाल इकॉनॉमिक जिहाद "
https://www.youtube.com/watch?v=nNtV-egWGS8

आंद्रे वडापाव's picture

16 May 2023 - 9:05 am | आंद्रे वडापाव

समीर दाऊद वानखेडे आणि क्रांती रेडकर, यांचा विवाह लाव जिहाद आहे का ?

श्रीगुरुजी's picture

16 May 2023 - 10:32 am | श्रीगुरुजी

याविषयी माहिती मिळविण्यासाठी भेटा अथवा लिहा - नबाब मलिक, आर्थर पथ तुरूंग, मुंबई.

चौकस२१२'s picture

16 May 2023 - 6:49 pm | चौकस२१२

अश्या अनेक जोड्या असतील
स्वखुशीने आणि अमिश ना दाखवता अंतर्धर्मीय विवाह होतात त्या वर आक्षेप नाहीये
आक्षेप आहे तो लग्नानंतर धर्म बदल्यांची सक्ती
लव जिहाद हा धर्मांतर वाढवण्याचं अनेक क्लुप्त्यांपकी एक आहे
हे या सर्वांचे मूळ आहे ..
ते तुम्ही मान्य करायाला तयार नाही

श्रीगुरुजी's picture

16 May 2023 - 5:43 pm | श्रीगुरुजी

लव्ह जिहाद हा उच्चवर्णीयांचा कल्पनाविलास आहे हे तुम्ही धडधडीत खोटे बोलला ना.

उनाड's picture

16 May 2023 - 6:00 pm | उनाड

१ लव्ह जिहाद नावाचे काही अस्तित्वात नाही.
२ तो आहे असा कंठषोष करणारे सारे उच्चवर्णीय असतात.
३ या कांगाव्यामागे मुळात कनिष्त जातींबद्दल असलेला द्वेषच असतो (बहुसंख्य मुस्लिम हे पूर्वाश्रमीचे कनिष्ट जातीतले आहेत.)

वरील तीन विधाने एकत्र केली की पुरे.

हा एक माहीतीपूर्ण लेख.

https://timesofindia.indiatimes.com/blogs/the-interviews-blog/idea-of-lo...

श्रीगुरुजी's picture

16 May 2023 - 6:44 pm | श्रीगुरुजी

थापा क्रमवार मांडल्या तरी त्या थापाच राहतात.

पुरावे आणि विदा द्या, अन्यथा आपण खोटे दावे केले हे मान्य करून माफी मागा.

कृपया पुरावे द्या नाहीतर संचालक मंडळाकडे जातीय द्वेष पसरवणारे लिखाण म्हणून तक्रार करावी लागेल.

@कॉमि, जरा यांच्याकडे पण विदा मागा यांच्या विधानाचा..

का बुवा ? हा तुम्हा लोकांचा दुटप्पी पणा आहे. मी प्रयत्न करतो विदा असल्याशिवाय मत न व्यक्त करण्याचा, तेव्हा तुम्ही आणि तुमचे मित्र हागणे बिग्णे काय काय लिहितात, विदा मागणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा म्हणतात तेव्हा तुम्ही झोपून असता. आणि तुमच्या विरोधात मत आले की विदा मागायला पण मीच यायचे ? हॅट. असल्या फालतू अपेक्षा माझ्या कडून करूच नका. स्वतः सातत्याने विदा असल्याशिवाय मत न देणे शिका मग मला जब विचारा.

आनन्दा's picture

4 Jun 2023 - 8:24 pm | आनन्दा

Ok.
म्हणजे एखाद्याचे निष्कर्ष आपल्या बाजूचे असले तर तुम्ही कोणत्याही विदा शिवाय ते स्वीकारणार तर..
म्हणजे तुमचे पाय पण मातीचेच. मला आपलं उगीच वाटायचं की तुम्ही विदा असल्याशिवाय कशावर विश्वास ठेवत नाही म्हणून. त्याच्यामुळे तुमचं या थापांकडे लक्ष वेधून घ्यायचे म्हणून मी call out केलं.

आता पाय मातीचेच असतील तर मग जाऊदे. माझा पण pass.

नाही, मी वरील विधानावर विश्वास ठेवतो हे तुमच्या मनात आहे. ते विधान मी केले नाही. तुम्ही माझ्यावर तुमचे विचार प्रोजेक्ट करत आहात.

तुम्ही केवळ तुम्हाला सूट होईल तेव्हा विदाचा आग्रह धरता. तुमचे समविचारी इतके दिवस विदा मागणे म्हणजे अजेंडा आहे म्हणत होते, हगणे इत्यादी शब्द वापरत होते तेव्हा तुम्ही तोंडाला कुलूप लावून बसता. आणि उगाच मला वेगळ्या स्टँडरड वर जज करता, ते पण माझे वक्तव्य नसताना. किती ती हीपोक्रसी. माझे वक्तव्य विदा शिवाय नसल्यास खुशाल प्रश्न विचारा. दुसऱ्यांचे नाही.

आनन्दा's picture

4 Jun 2023 - 8:58 pm | आनन्दा

Ok.
म्हणजे एखाद्याचे निष्कर्ष आपल्या बाजूचे असले तर तुम्ही कोणत्याही विदा शिवाय ते स्वीकारणार तर..
म्हणजे तुमचे पाय पण मातीचेच. मला आपलं उगीच वाटायचं की तुम्ही विदा असल्याशिवाय कशावर विश्वास ठेवत नाही म्हणून. त्याच्यामुळे तुमचं या थापांकडे लक्ष वेधून घ्यायचे म्हणून मी call out केलं.

आता पाय मातीचेच असतील तर मग जाऊदे. माझा पण pass.

चौकस२१२'s picture

17 May 2023 - 5:35 am | चौकस२१२

उनाड भाऊ एक करा ना मग हिंदू धर्मात एवढे जर (आपण म्हणता तसे) " उच्चवर्णीय " त्रास देतायत तर सोडा हो धर्म.. बघ बुद्ध धर्म स्वीकरता येतोय का ते
पण त्या आधी हे स्पष्ट करा कि नक्की कोण हो हे हुच्चवर्णीय? क्षत्रियांबद्दल बोलताय का? तसे असेल तर सांगा मग होतो कि नाय तुमचाच :सैराट" ते बघा

आणि दुसरे अत्यंत महत्वाचे : बुद्ध धर्म स्वीकरतां आधी तेथील धर्मगुरूंना विचार कि कसा काय बुवा या जिहादींनच्य बरोअबर "डील " कर्याच? .. तुम्हाला त्यासाठी मियांन मार ( हायला काय नाव आहे पन इंटेंडेड ) ला जायचा असेल तर इमानाचाच तिकीट पाठउ काय?
तिथे बघ रोहिंग्या आणि बुद्धांचे फार चांगले संबंध हायेत
https://www.youtube.com/watch?v=TuA_IuSCATA

कि श्रीलंकेला जाताव ? तिथे क्रिस्टी लोकांचे पण हिरवाई लोकांशी चांगले संबंध आहेत ,, नाही का ती चर्चात खास पूजा बांधली होती हिरव्यान्नी
https://www.youtube.com/watch?v=a8A8j8ROQic

सुबोध खरे's picture

18 May 2023 - 7:46 pm | सुबोध खरे

१ लव्ह जिहाद नावाचे काही अस्तित्वात नाही.
२ तो आहे असा कंठषोष करणारे सारे उच्चवर्णीय असतात.

ख्रिश्चन किंवा कम्युनिस्ट लोक सुद्धा लव्ह जिहाद बद्दल चिंता व्यक्त करतात याचे कारण देता येईल का?

कि

आमच्या काळ्या गाईला पांढरं वासरू झालं हा पण उच्चवर्णीय कावा आहे ?

एकंदर पुरोगामी दळभद्रीपणा किती खोलपर्यंत मेंदूत रुतला आहे कि धडधडीत सत्य पण दिसेनासं झालं आहे

हा असला पुरोगामी दळभद्रीपणा काही भारताची मक्तेदारी नाही. .

जर्मनीत २०१५-१६ च्या ३१ डिसेंबरच्या मध्य रात्री १२०० स्त्रियांवर घोळक्यात घेऊन लैंगिक अत्याचार झाले. अर्थात हे सर्वच्या सर्व शांतीप्रिय लोकांनीच केलेले होते

पण त्यांना तसं म्हणायचं नाही तर the sexual assaulters had mostly been described as "North African", "Arab", "dark-skinned" and "foreign".

सुरुवातीला जर्मनीच्या पुरोगामी सरकारने असे काही झालेच नाही म्हणून कानावर हात ठेवले होते नंतर त्याची वेगवेगळी कारणे दिली गेली.

https://en.wikipedia.org/wiki/2015%E2%80%9316_New_Year%27s_Eve_sexual_as...'s%20night.

तरी बरं, तेथे ही एक उच्चवर्णीय फँटसी म्हणणारे महापुरोगामी नव्हते

फाटक्यात पाय's picture

4 Jun 2023 - 8:49 pm | फाटक्यात पाय

तुम्ही म्हणता तसे प्रेम देखिल असेल बहुतेक!
स्वरा भास्कर आणि तिचा दादला उर्मिला मार्तोंडकर आणि तिचा कारभारी हे आदर्श जोडपी असतील देखिल!
पण! पण सोशल मीडियावर हिंदू नावे ठेवून मुलींना जाळ्यात ओढणे ,याला काय म्हणाल?
आपल्या धर्मातील मुलींना परधर्मातील मुलीशी दोस्ती करवून त्यांच्यामार्फत मुलींना गटवणे याला कोणते नाव द्याल?
अस्मानी पुस्तकात याला शिर्क असे म्हणतात, म्हणजे जर मुलीने निकाह करताना धर्मपरिवर्तन नाही केले तर काफिर दोजखच्या आगीत जळणारच आहेत पण हे जे शिर्क करणारे आहेत ते इंधन बनणार आहेत.
जर मुलीने धर्म बदलला तर 72 हुरे , जर मुलीने नकार दिला तर तिला मोक्ष दिला तरी जन्नत! चित भी मेरी पट भी मेरी

लव जिहाद चे जे निकष आहेत त्यानुसार तश्या घटना घडतात. तिथे गुन्हेगारांना शिक्षा व्हावी आणि पीडितांना मदत मिळावी ह्याबाबत वाद असण्याचे कारण नाही.
मग (किमान माझ्यापुरता तरी) विवाद काय आहे ?

१. लव जिहाद हा स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायापापैकी किती प्रमाणात घडतो ? सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे अनुयायी ह्यांचे म्हणणे ऐकले तर असे वाटावे की खूपच मोठ्या प्रमाणात स्त्रियांवरील गुन्हे हे लव जिहाद मधले असतात. पण हे सांख्यिकी मधुन कोणी मांडत नाही. त्याउलट, बरेचशे गुन्हे हे स्त्रियांना माहितीच्या लोकांकडून झाले असतात हा सांख्यिकी माहितीतून काढला जाणार निष्कर्ष आहे. आंतरजातीय विवाहाची टक्केवरी अतिशय लहान असते. त्यामुळे स्त्रियांवर घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये लव जिहाद निकष पास करणारे गुन्हे फार कमी प्रमाणात असावेत असा निष्कर्ष काढणे अयोग्य नाही. (तावातावाने प्रतिसाद टाईप करण्याआधी वरील ठळक वाक्य वाचावे)

२. सत्ताधारी पक्ष स्त्री रक्षणाबाबत खरोखरीच जागरूक आहे काय ? बलात्कारी लोकांचे हारतुरे घालून होणारे स्वागत, बलात्कारी लोकांच्या शिक्षा कमी करणे, पोलिसांनी पीडितेच्या शरीराला रातोरात जाळून टाकने, पीडितेच्या वकील आणि नातेवाईकांचे संशयास्पद मृत्यू होणे, ह्या सगळ्या गोष्टींवरून उद्दिष्टांवरच शंका येते.

३. लव जिहादचे निकष साहना ह्यांनी मांडले आहेत, पण हा शब्द अतिशय सरधोपट पणें वाट्टेल तसा फेकला जातो. दागिन्यांच्या जाहिरातीत हिंदू मुस्लिम सून सासू ? लव जिहाद. मुस्लिम तरुणाने पत्नीचा खून केला, धार्मिक कारण आढळले नाही ? लव जिहाद. IAS हिंदू मुस्लिम जोडप्याचा घटस्फोट ? लव जिहाद.

४. लव जिहाद निकषात बसणाऱ्या गोष्टी कायद्याखाली गुन्हाच असतात. मग नवीन कायदा करून काय साध्य होते ?

५. सरतेशेवटी,
१. कोणीही आपल्या जोडीदाराच्या आग्रहास्तव धर्म बदलूच नये. असा आग्रह असेल तर दूर राहणे उत्तम.
२. कोणत्याही मुलीने, भले ती मुसलमान का असेना, अती धार्मिक मुसलमान माणसाशी लग्न करूच नये. (हे अतिधार्मिक हिंदूंना सुध्दा लागू होते.)
३. स्पेशल मॅरेज ॲक्ट हा लग्नाचा एकमेव पर्याय असावा. इतर सर्व पर्याय कायद्याने बंदच करावेत.

तुमचे विचार योग्य मांडले आहेत...
आक्षेप उच्चवर्णीय लोकांचे चोचले या धागाकरत्याच्या विधानाला आहे

श्रीगुरुजी's picture

16 May 2023 - 10:29 pm | श्रीगुरुजी

१) लव्ह जिहाद विरोधात काही राज्यांनी मागील १-२ वर्षातच कायदा केला आहे. त्यापूर्वी याविषयी जागरूकताही नव्हती व काही अकायदेशीर झाले असल्यास ते तत्कालीन कलमांतर्गत नोंदले असणार. तस्मात् ही आकडेवारी इतक्यात पाहणे अप्रस्तुत ठरेल. उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद विरोधात कायदा झाल्यानंतर एका वर्षातच ४००+ गुन्हे नोंदले आहेत.

२) कोणताही राजकीय पक्ष व कोणत्याही पक्षातील महिला नेत्यासुद्धा स्त्री रक्षणाविषयी जागरूक नाहीत. एखाद्या महिलेविरोधात काही घडले तर सर्वात पहिल्यांदा आरोपी कोण आहेत, आरोपी कोणत्या पक्षाचे आहेत, आरोपी कोणत्या जातीचे आहेत हे पाहिल्यानंतरच पुढील कृती ठरते.

३) लव्ह जिहाद म्हणजे थोडक्यात धर्मासाठी खोटेपणा करून अमुस्लिम मुलीशी संबंध वाढविणे, लग्न करणे, नंतर धर्म बदलण्याची सक्ती करणे, काही काळाने तिला सोडून देणे अशी मोड्यचस ऑपरंडी दिसते.

४) आंतरजालाच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करणे हे तत्कालीन कायद्याखाली सुद्धा गुन्हा होता. परंतु सायबर विश्वाची व्याप्ती व गुन्ह्यांचे प्रकार वाढत गेल्याने वेगळे सायबर कायदे आणले गेले. लव्ह जिहादचे प्रकारही वाढत गेल्याने आता निदान राज्यपातळीवर तरी कायदे होण्याचा शुभारंभ झालाय.

५) या सर्व मुद्द्यांशी सहमत.

कोणीही आपल्या जोडीदाराच्या आग्रहास्तव धर्म बदलूच नये.
सहमत, पण हे बोलणे सोप्पे असते, प्रत्यक्ष करणे अवघड असते .. मुलगी भांबावलेल्या परिस्थिती असू शकते ..एकीकडे वाटणारे प्रेम आणि बहुतेक घरचांशी झालेली ताटातूट , काही मीटर मैत्रिणी आधार देत असतील काही नाराज

विवाद काय आहे ?

आता तुम्ही हे सांगा पण कि एकूणच धर्मांतर करण्याचा जोर आहे हे तुम्हाला मान्य आहे कि नाही?
लग्न करून धर्मांतर हा एक भाग झाला फक्त ( कि जो एक्सीटनात शिखांच्या बद्दल पण होतोय )

अनि मग जे कोनि यात जतिय्वद अनत अस्तिल तो पन विवाद

काही शे वर्षात भारत परत गुलाम झाला तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही आणि म्हणूनच मला वोटेबँक लोकशाही मान्य नाही.

काही शे वर्षात नाही..५० कि॓वा १०० .
भारतासारख्या देशात, जिथे नागरी भावना, राष्ट्रीय अभिमान आणि इतिहासाचे आकलन हरवलेले आहे, जास्त वेळ लागणार नाही..

धर्मांतराला बळी पडलेल्या मुलींची प्रत्यक्ष मुलाखत
https://www.youtube.com/watch?v=3XHSg61K2tg

केरला स्टोरी देखकर लड़की ने मुस्लिम दोस्त को पहुंचाया जेल
https://www.youtube.com/watch?v=bvD6pB3mDoI