नमस्कार सुजाण मिपाकरहो! ___/\___
तर शीर्षकातल्या उल्लेखाच्या अनुषंगाने थोडक्यात सांगायचे झाल्यास, आमच्या ऑफीसमधील सर्वच स्टाफसाठी स्ट्रेसबस्टर म्हणून एक उन्हाळी सहल करावी असे संचालक मंडळाने ठरवले. त्यानुसार ऑफीसात जवळपास आठेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. ठिकाण ठरवणे हा मुख्य विषय असतो. बरीच डोकी खल करत असल्यामुळे की काय ठिकाण काय ते ठरेना. बजेट जाहीर झालेले नसले तरी ठिकाण ठरल्यानंतर ते अॅप्रूव्ह होईल असा एक संचालक मंडळाचा सूर आहे. तरीपण अंदाजे १.५ ते २ लाख इतके बजेट असण्याची शक्यता आहे. सर्व डोकी मिळून २५ ते ३० होतात.
ऑफीस पब्लीकच्या चर्चेत असलेली ३ ठिकाणे क्रमाने; १) दक्षिण गोवा २) दिवेआगार बीच ३) गरूडमाची (ताम्हीणी घाट).
मला विचाराल तर गरूडमाची हा पर्याय ठीक वाटतो. पण ह्या रखरखीत उन्हाळ्यात याच्यापेक्षा काय चांगले पर्याय असू शकतात हे मला जाणून घ्यायचे आहे.
कुणी म्हणेल उन्हाळा संपल्यानंतर पावसाळ्यात वगैरे ट्रीप काढा पण मेंब्रांचे म्हणणे पडते की कंपनीने आत्ता मनावर घेतलेय गेल्या पाच वर्षात, अजून पुढे ढकलले तर उगीच बेत रद्द व्हायचा.
तर मिपाकरहो, २५-३० च्या ऑफीस ग्रूपसाठी एक-दोन दिवस मुक्कामी अशी कुठली ठिकाणे तुम्ही सुचवाल? आपल्या मदतीसाठी आगाऊ आभार! ___/\___
प्रतिक्रिया
8 May 2023 - 5:57 pm | कंजूस
उन्हाळ्यामुळे रुमवर राहून गप्पा पत्ते वगैरे असेल तर टुअर आयोजक गाठा.
माथेरानचाही विचार करा.
8 May 2023 - 6:14 pm | चांदणे संदीप
तीशीच्या आसपासची जास्त मेंबर्स आहेत त्यामुळे कोणीही रूमवर बसणार नाहीत हे नक्की.
सं - दी - प
8 May 2023 - 5:59 pm | शेर भाई
श्री. वनलक्ष्मी कृषी पर्यटन केंद्र (आपल गाव),
मु. पो. बेलदरे, ता. कराड, सातारा
www.aaplagaon.com
8 May 2023 - 10:07 pm | चांदणे संदीप
धन्यवाद! चांगले ठिकाण दिसतंय.
सं - दी - प
8 May 2023 - 6:00 pm | टर्मीनेटर
किती रात्रींचा मुक्काम असेल?
8 May 2023 - 6:10 pm | चांदणे संदीप
कमीत कमी १ आणि जास्तीत जास्त २ रात्रींचा मुक्काम असेल.
सं - दी - प
8 May 2023 - 6:39 pm | टर्मीनेटर
ओके... 'स्ट्रेसबस्टर' म्हणून उन्हाळी सहल हा उद्देश असल्याने ठिकाण तसे फारसे महत्वाचे नाही, पण ते फार लांब असू नये नाहीतर जाण्या-येण्याचाच एवढा फटिग यायचा कि परतल्यावर स्टाफ मधले अनेक मेम्बर्स दोन दिवस ऑफिसला दांड्या मारायचे 😀
वर कंजूस काकांनी म्हंटल्या प्रमाणे तीसेक जणांसाठी तुम्हि दिलेल्या बजेटमध्ये 'माथेरानला' एक रात्र - दोन दिवस खओ-पिओ ऐश करो अशी सहल चांगल्या प्रकारे होऊ शकेल, किंवा तेवढ्याच खर्चात दोन रात्री - तीन दिवस अशी महाबळेश्वरची सहल करता येईल (माथेरान महाबळेश्वरपेक्षा निवास आणि खानपानाच्या बाबतीत बऱ्यापैकी महाग आहे). तुमच्या सुदैवाने तेव्हा पाउस पडल्यास भर उन्हाळ्यात पावसाळी सहलिची मजाही लुटता येइल!
तसेच मुळशी जवळ एक खूप चांगले, बोटिंग वगैरेची सोय असलेले निसर्गरम्य रिसॉर्ट आहे, त्याचे नाव आठवत नाही मित्राला विचारून कळवतो. आणखीनही काही तुमच्या पुणे जिल्ह्यातली ठिकाणे सुचली तर अपडेटवतो...
8 May 2023 - 10:00 pm | चांदणे संदीप
पुढच्या प्रतीसादाची वाट बघतो.
सं - दी - प
8 May 2023 - 6:43 pm | कर्नलतपस्वी
तारर्कर्ली हे एक सुंदर ठिकाण आहे.
पुणे तारर्कर्ली अंतर-१००० दोन्ही बाजुने.
ऑफ सिझन असल्यामुळे राहाण्यासाठी भरपुर जागा व स्वस्त मिळण्याची शक्यता.
सिंधुदुर्ग ते बॅक वाॅटर, स्कुबा डायव्हिंग आणी देवबाग ते सिंधुदुर्ग विवीध रंगी समुद्र किनारा.
मी नुकताच स्वतःच्या गाडीने जाऊन आलो.
बजेटबाहेर जाणार नाही असे वाटते.
8 May 2023 - 10:02 pm | चांदणे संदीप
मी मागे तारकर्ली आणि आजूबाजूला भटकून आलोय. बघूया हे सांगून बघतो टीमला.
सं - दी - प
8 May 2023 - 8:21 pm | राजेंद्र मेहेंदळे
हा पण एक छान पर्याय आहे. पुण्याहुन जायला(सातार्याहुन) ५-६ तास लागतील. मेढा वरुन खाली उतरा. कोयना बॅकवॉटर ला लागुन अनेक रिसॉर्ट आहेत. सकाळी ३-४ हजार रुपये जास्तीचे दिलेत तर लाँच ने वासोटा दाखवुन आणतील. नाहीतर तिथेच कयाकिंग करता येईल. रात्री गप्पा,गाणी वगैरे. वाटले तर तिथुन येताना व्हाया पाचगणी येऊन वाई ,धोम धरण बघु शकता.
मी ईथे राहीलो होतो.
https://www.riverviewagroresort.com/
8 May 2023 - 10:05 pm | चांदणे संदीप
आपण सुचवलेली जागाही उत्तम आहे. ठिकाण ॲडवले आहे लिस्टीत.
सं - दी - प
9 May 2023 - 7:32 am | गवि
तापोळा खरोखर अतिशय सुंदर ठिकाण आहे. पण तिथे वेगवेगळ्या सिझन्समधे जाऊन आल्याने हे सांगू इच्छितो की आत्ता तिथे तलाव नगण्य आणि रखरखीत मोकळे मातीचे क्रिकेट मैदान जास्त असते.
एकूण उन्हाळा सर्वत्र कडक असल्याने नॉन एसी घरगुती शेतीघर असे पर्याय उन्हाळ्यात अगदी टाळा. एसी रिसॉर्ट निवडा. दीड लाखाच्या आत पंचतारांकित मिळणे अवघड आहे. पण त्रितारांकित मिळेल. तरीही एकदा प्रकृति रिसॉर्ट काशिद इथे चौकशी करा. महाग असले तरी खणखणीत पैसा वसूल होईल. तीस लोकांचा मोठा ग्रुप असला की ते बऱ्यापैकी कमी करू शकतील. त्यांची बरीच प्याकेजे सर्व जेवणे आणि संध्याकाळी हाय टी, स्नॅक्स असे सर्व included असतात. डोक्याला ताप नाही. प्रायव्हेट बीच देखील आहे संध्याकाळी जायचे तर. जेवण ब्रेकफास्ट सर्व स्प्रेड भव्य. Five star.
कंपनीची टूर काढताना कर्मचारी बेहद्द खूष आणि तृप्त होऊन परत येणे आवश्यक असते. यादगार टूर हवी, पुढे अनेक वर्षे आठवणी निघतात. तेव्हा जितके शक्य होईल तितके प्लीज डू नॉट कट द कॉर्नर्स.
9 May 2023 - 10:12 am | कंजूस
यापुढे इतर ठिकाणे बाद होतात.
9 May 2023 - 2:00 pm | चांदणे संदीप
हे ठिकाण आवडल्या गेले आहे. लिस्टीत अॅडवले गेले आहे.
फायनली फायनल काय होतंय ते कळवीनच धाग्यावर.
सं - दी - प
8 May 2023 - 10:55 pm | तुषार काळभोर
15 विभागप्रमुख आणि 15 त्यांचे सहकारी + महाव्यवस्थापक + हेचार चे 2 जण २८-२९ एप्रिल ला महाबळेश्वर येथे गेलो होतो. नाव होते लीडर्स मीट. पण ती स्ट्रेस बस्टर सहलच झाली एक रात्री मुक्काम असलेली.
२८ ला सकाळी ५.३० वाजता बस स्पाइन रोडवरून निघाली. पिंपरी चिंचवड मनपा, पुणे मनपा क्षेत्रातील ६ पिकप पॉइंट्स वरून सर्वांना उचलून साडे नऊला Regenta महाबळेश्वर येथे पोचलो. पोचल्यावर बुफे न्याहारी.
मग 1 वाजेपर्यंत वेगवेगळे प्रेझेंटेशन. मग बुफे जेवण. पाच वाजेपर्यंत पुन्हा वेगवेगळे प्रेझेंटेशन. पाच ते आठ ब्रेक. त्या दरम्यान काहींनी आराम केला, काही ऑफिसचे काम करत बसले, काही मार्केटमध्ये गेले.
साडेसात ते अकरा विविध कलादर्शन (आमचंच!). गायन, नृत्य, मिमिक्री, दंगा. सोबत पिणे आणि चखना खाणे. अकरा ते बारा बुफे जेवण (कुणालाच भूक नव्हती).
एक दीड पर्यंत मग (तुलनेने) गार हवेत गप्पा.
मग आपापल्या कॉटेजमध्ये झोपणे.
सकाळी पाच वाजता आम्ही काही जण उठून दीड किमी चालत विल्सन पॉईंट येथे सूर्योदय पाहायला गेलो. बाकीचे (सकाळी सात वाजता!!) सनसेट पॉईंट बघायला गेले. आठ ते नऊ बुफे न्याहारी. मग बाहेरचा एक ट्रेनर होता, त्याने चार पर्यंत ट्रेनिंग दिलं. (तेच ते, तेच ते. डोळे बांधून असं करा, हात बांधून तसं करा. आपण यातून काय शिकलो. तेच ते!). मध्ये एक ते दोन बुफे जेवण. साडे चारला निघालो. मध्ये mapro मध्ये थांबवून भरपूर खरेदी. (माझा तीन महिन्यांपूर्वीच भेटीचा अनुभव असल्याने, तिथे मी एक्सपर्ट होतो ;)). मग विनाथांबा त्या त्या पॉइंट्स वर लोकांना टाकून दिले आणि ही स्ट्रेस बस्टर सहल कम ट्रेनिंग कम मीट संपली.
खर्च कंपनीने केला.
Map location
Regenta MPG Club Mahabaleshwar
02168 270 027
https://maps.app.goo.gl/RTzoYXjeJ7WJc3Bo6
लोकेशन: उत्तम. Valey view. प्रशस्त जागा, प्रशस्त रूम्स.
जेवण : उत्तम दर्जा, कमी मसालेदार. शाकाहारी, मांसाहारी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, परदेशी सर्व चवीच्या लोकांना आवडेल असे.
मार्केट रोड च्या पूर्व टोकापासून चालत दहा मिनिटे अंतर. गाड्यांची सोय असेल तर सकाळी संध्याकाळी काही पॉइंट्स बघता येतील. विल्सन पॉईंट, सनसेट पॉईंट एक किमी अंतरावर.
रूम्स : आरामशीर, वातानुकूलित.
मोबाईल रेंज फारशी चांगली नाही. मात्र हॉटेलचे वायफाय चांगले आहे.
9 May 2023 - 1:50 am | टर्मीनेटर
अच्छा! म्हणजे आपल्या कट्ट्यासाठी त्यावेळी मॅप्रो गार्ड्न हे ठिकाण सुचवण्यामागे एवढा दुरगामी विचार होता होय तुमचा 😀
9 May 2023 - 7:55 am | चांदणे संदीप
प्रतिसादाबद्दल अनेक आभार्स! महाबळेश्वर हा पर्याय उन्हाळ्यात खरंच चांगला आहे. तुम्ही सुचवलेले रिसॉर्टही उत्तम आहे.
सं - दी - प
9 May 2023 - 6:20 am | कंजूस
फार दूर असू नये. आणि कंपनी खर्च करत असेल तर गोष्ट वेगळी. पण स्वतः आयोजन टाळा मोठ्या ग्रूपचे.
9 May 2023 - 7:57 am | चांदणे संदीप
कंजूस काका, खर्च कंपनी करत आहे. तीन-साडेतीन प्रवासासाठी सगळेजण तयार आहेत त्यामुळे तेवढ्या वेळेच्या परिघात काय काय येते ते पहायचे आहे.
सं - दी - प
9 May 2023 - 10:32 am | कंजूस
मुरुड (जंजीरा वाले) .
हॉटेल्स चांगली आहेत. ओनलाइन बोलणी करून काम होईल.
मार्ग.
पुणे -एक्सप्रेसवे -डाइवर्शन -खोपोली- पाली- नागोठाणे -रोहा -मुरुड. साडे चार तास. रोहा मुरूड रस्ता फणसाड अभयारण्य गेटवरून जातो. पालीचा गणपती.
मुरुड गावात एक दत्तमंदीर.,समुद्र किनारा,बाजार
मुरुडच्या आसपास -excursion
१)जंजीरा.
२)दिवेआगार (कार नेणारी फेरी आहे.)
३)काशिद किनारा -कोरलई किल्ला -आणि साळावचे बिर्ला मंदिर.परत.
ठिकाणांची लयलूट आहे
खाणे -वेज नानवेज हॉटेल देईलच. शिवाय पाटील खानावळ प्रसिद्ध.
एकूण धार्मिक किंवा इतर पर्यटनास भरपूर वाव आहे.
9 May 2023 - 10:40 am | nutanm
सगळा मोठा प्रतिसाद ऊडाला हे कसा ऊडाला कळलेच नाही महाबळेष्वर अजिबात आवडले नाही व काय नाही आवडले लिहीले पण ऊडाला वपरत इतका मोठा लिहिण्याचा संयम नाही म्हणून एवढ्यावरच पुरे करते महाबळेश्र्वर जाउ नाही 5 स्टारचे माहित नाही.
9 May 2023 - 10:41 am | अमर विश्वास
सध्याचे हवामान पहाता कोल्हपूर / अंबा घाट / गगनबावडा परिसर उत्तम.
पूर्वी एकदा पावनखिंड रिसॉर्ट (अंबा घाट) मधे आऊटडोअर इव्हेंट केली होती .. पण तिथले रूल्स वेगळे आहेत .. सर्वांना पचनी पडतील असे नाही ...
9 May 2023 - 11:47 am | सुबोध खरे
https://www.palmwoodsretreat.com/
सुंदर जागा आहे.
जेवण अप्रतिम आहे.
तीन वेळेस जाऊन आलो आहे
पुण्यापासून जवळ असल्याने स्वतःच्या वाहनाने सुद्धा जाता येईल किंवा बस करून.
प्रवासात वेळ वाया जाणार नाही.
9 May 2023 - 3:12 pm | चांदणे संदीप
सुंदर जागा आहे ही. ह्या ट्रीपच्या निमित्ताने होईल का नाही माहिती नाही पण पुढे कधीतरी फॅमिली सोबत नक्की जाईन इथे.
सं - दी - प
9 May 2023 - 5:25 pm | तुषार काळभोर
Weekend getaway साठी उत्तम पर्याय आहे.
9 May 2023 - 2:50 pm | चौथा कोनाडा
दि हिडन ओअॅसिस : पुण्या पासुन एक दिड तासाच्या अंतरावर .... गराडे धरणाच्या सानिध्यात.
टिपिकल अॅड्व्हेन्चर अॅक्टिव्हिटीज नाही दिसल्या ... पण निसर्गाच्या सानिध्यात छान वाटले. स्वस्त आणि मस्त. हे ट्राय करू शकता.
https://www.thehiddenoasis.com/#
9 May 2023 - 3:13 pm | चांदणे संदीप
मस्त जागा आहे ही पण.
सं - दी - प
9 May 2023 - 7:03 pm | कंजूस
(अवांतर आहे)
ऑफिसातल्या लोकांबरोबर पिकनिकला जाऊन स्ट्रेसबस्टर का काय कसे काय शक्य होत असेल?
कुठेही स्वतंत्र जावे. तिथे काय नवीन सांपल मिळत नाहीत?(गंभीरपणे घेऊ नका.)
10 May 2023 - 12:55 pm | चौथा कोनाडा
10 May 2023 - 12:56 pm | चौथा कोनाडा
पिकनिकला ऑफिसमधली लोकं मनमोकळी होतात. त्यांच्यातले सॅम्पल तरारुन वर येते !
सुप्त कलागुण दिसतात. एखादा / दी चे सुप्त रोमॅण्टिक कलागुण फुलून वर आले की स्ट्रेसबस्टरचा अनुभव येतो !
बरोबर ना ?
😜
10 May 2023 - 12:59 pm | प्रचेतस
=))
हा हा, अगदी अगदी, विशेषतः रात्रीच्या जेवणाच्याआधी हे कलागुण तर अतिशय प्रकर्षाने दिसतात.
10 May 2023 - 5:51 pm | कंजूस
एकटे जाऊन झाडाच्या सावलीत ताणून देणे हा मला चांगला उपाय वाटतो.
11 May 2023 - 12:19 pm | चांदणे संदीप
झाडाखाली ताणून देणारी आजची पिढी नाहिये. त्यातल्या त्यात एकटे तर आजीबात नाही. आजची पिढी न थकता डीजेवर किंवा कसल्याही म्युजिक सिस्टीम वर तासन् तास नाचणारी आहे. त्यांच्यासाठी स्ट्रेसबस्टर काय असेल हे त्यांनाच चांगलं माहिती. आपण मारून मुटकून अमुक एक करा असं म्हणण योग्य नाही असं मला वाटतं. थोडंसं त्यांच्या पद्धतीनेही करून बघायचं, नंतर आपल आपल्याजवळ आहेच. झाडाखाली, एखाद्या ऐतिहासिक स्थळी किंवा किल्ल्यावर, म्युझियम किंवा लायब्ररी. मी तर कधी कधी जवळच्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात जातो. गाणी-बिणी म्हणतो. आपल्याला काय सगळं चालतं. सगळे तसे नसतात. सगळ्यांचा विचार करून काही गोष्टी कराव्या लागतात. ह्या ट्रीपचे आयोजन त्यातलाच एक भाग समजा.
सं - दी - प
10 May 2023 - 1:33 pm | धर्मराजमुटके
धागालेखकाला शुभेच्छा ! वर सुचविलेल्या एकाही ठिकाणी ट्रिप जाणार नाही पण स्ट्रेस बस्टर म्हणून चांगला टाईमपास आहे. ट्रिप साठी (आगाऊ) शुभेच्छा !
:)
10 May 2023 - 2:18 pm | चांदणे संदीप
असं काय करता. इथे सुचवलेल्यांपैकी काही ठिकाणे ऑफिसातल्या लोकांपुढे मांडलीयेत. आता फक्त १०-२० करून एक फिक्स करायचं आहे. जे काही ठरेल ते मी इथे पोस्टवीनच.
सं - दी - प
10 May 2023 - 2:30 pm | टर्मीनेटर
गुड! कुठेही जा... पण भरपुर मजा करा...स्ट्रेसला हद्द्पार करा...आणि शक्य झाल्यास भरपुर फोटोंसहीत त्याचा वृत्तांत इथे लिहा...
10 May 2023 - 2:38 pm | कर्नलतपस्वी
+१
11 May 2023 - 4:52 am | चौकस२१२
"कॉर्पोरेट रिट्रीट " साठी योग्य वाटते
ह्याचा विचार करू शकता, वाई, जवळ आहे , आणि फार मोठे नाही
प्रतापगड, महाबळेश्वर , धोम धरण , वैगैरे पण दिवसा करता येईल
https://www.booking.com/hotel/in/metrica.en-gb.html?aid=311984&label=met...
https://www.facebook.com/theyellowretreat.in/
https://www.youtube.com/watch?v=em8UALxQPfY
11 May 2023 - 12:21 pm | चांदणे संदीप
तुम्ही दिलेले पर्याय आणि लिंका पाहिल्या. यानिमित्ताने एक चांगली माहिती संकलित होत आहे.
सं - दी - प
11 May 2023 - 12:51 pm | चौथा कोनाडा
दि यलो रिट्रीट ....
👌 👌 👌
5 Jun 2023 - 4:27 pm | चांदणे संदीप
तर, मिपाकरहो. शेवटी गोव्याचा विजय झाला. लोकशाहीत संख्याबळापुढे सगळ्याच गोष्टी खुज्या ठरतात हे नव्याने अधोरेखित झाले (माझ्यापुरते).
दक्षिण गोवा ह्या स्थळाला या महिन्याच्या ३० ला निघणे, जुलै १ आणि २ गोव्यात मुक्काम, ३ जुलै ला पुण्यात आणि ४ जुलै ला ऑफिस असा कार्यक्रम ठरला आहे.
सर्वांनी सुचवलेली ठिकाणे अगदीच छान आहेत. सर्वांचे त्याबद्दल आभार. गविकाकांची प्रकृती रिसॉर्ट, काशीद ही सुचवणी अंतिम फेरीपर्यंत गेली आणि थोड्याशा फरकाने मागे राहिली. असो, सर्व ठिकाणे वैयक्तिक यादीत अॅडवून टाकलेली आहेत. मिपाच्या कट्ट्यासाठीसुद्धा यांपैकी एखाद्या ठिकाणाचा विचार व्हावा अशी मिपामालक-चालक वाचक यांना विनंती! :)
सं - दी - प
5 Jun 2023 - 11:55 pm | धर्मराजमुटके
जितं मया
बघा मी वर प्रतिसादात म्हटलो होतो ना की सभासदांनी सुचविलेल्या कुठल्याही ठिकाणी सहल जाणार नाही म्हणून. ऑफीसवाल्यांनी लाज राखली हो माझी. त्यांना धन्यवाद सांगा :)
6 Jun 2023 - 10:59 am | गवि
मुळात एक पर्याय गोवा असतो, त्या वेळी ऑफिस ग्रुप अन्य कुठे जाण्याची शक्यता नगण्यच. तरी सांगून बघितले. मानो या न मानो.. ऑफिस टूरचे उद्देश, रादर टूरचा उद्देश (एकच असतो) आणि स्पष्ट असतो.
;-))
6 Jun 2023 - 2:02 pm | चांदणे संदीप
=))
मलाही ते वाटलेलेच पण मी आणि आणखी एकजण असे दोघे शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहिलो. पण पब्लीक ऐकेल तर शपथ!
सं - दी - प
6 Jun 2023 - 6:57 am | कंजूस
मला ऑफिसमधले एक दिवसीय ट्रिपसाठी विचारत आणि मी माहिती देत असे. तिकडे ते कुठेही जाणार नाहीत हे नक्कीच असे. (चर्चा होऊन शेवटी ठाणे उपवनला जाऊन झाडाखाली बसून पिणार हे दरवर्षीचा कार्यक्रम ठरलेला.) तरीही चर्चा भरपूर.
दुसरा एक मल्याळी अधिक मराठी ग्रूप मात्र दोन दिवस वज्रेश्वरीला जायचा. चांगली हॉटेल रूम घेऊन तिथे जेवण स्वतःच बनवत. मल्याळी आणि मंगळुरी यात तरबेज असतात.
तिसरा एक ग्रूप महिन्यातून एकदा शनि-रवि-सोमवार मिळणाऱ्या सुटीचा उपयोग करून घेणारा होता. एक सुमो/ट्रॅक्स मात्र केलेली शुक्रवारच्या शेवटच्या दिवशी ऑफिसच्या गेटवर बोलावत. ती मंगळवार सकाळच्या ड्युटीला परत आणे. याप्रमाणे वर्षात तीन तरी पिकनिक करत. त्यातून वेगवेगळी ठिकाणे सहज होत.
गोवा, अजंठा वेरूळ,भंडारदरा,कोकण इत्यादी. चर्चा नाहीच. एक दोन जण ठरवत या वेळी अमुक ठिकाणी जायचे. स्त्रिया/ महिला नसल्याने पटापट निर्णय होत. त्यांना नेता येईल अशी ठिकाणे आणि प्रवास यावर मर्यादा असतात.
6 Jun 2023 - 10:39 am | मुक्त विहारि
प्रचंड सहमत आहे..
6 Jun 2023 - 10:47 am | वामन देशमुख
मी मिपाच वाचतोय ना?
6 Jun 2023 - 11:38 am | कंजूस
वय,तसेच महिला/पुरूष यांच्या आवडी फार भिन्न असतात. ऑफिस ट्रिपमध्ये वयाचा प्रश्न येत नाही आणि स्ट्रेस/थकवा काढण्यासाठी जाणारे धार्मिक स्थळांचा आग्रह धरत नाहीत. राहिला मुद्दा महिला/पुरूष हा.
महिला मंडळात गप्पा(गॉसिप?) मारणे आणि खरेदी आवडते. गोव्यात जाणाऱ्या पुरुषांची आवड काय असणार हे सांगायला नको. तर काय 'त्यांच्या' कलाने घेणे आणि तोंड बंद ठेवणे एवढेच शिल्लक राहाते.
----
आता समजा हैदराबाद ट्रिप कौटुंबिक आहे तर काय फाटे फुटतात ते पाहा -
१)मी आणि मोठे काका - सालारजंग बघू सावकाश.
गोवळकोंडा.
२)महिला मंडळ - चार मिनार जवळचा बांगडी बाजार किंवा मोती बाजार हुसेनसागर जवळ खरेदी. साड्या पाहणे.
३)लहान मुले - नेहरू प्राणी संग्रहालय.
४) तरुणवर्ग - रामोजी फिल्मसिटी,खादाडी.
५) ज्येष्ठ नागरिक - श्रीशैलम.
तर हे सर्व एकाच सहलीत जमणार कसे?