१) आज क्रेमलिनवर ड्रोनमधून क्षेपणास्त्र डागल्याची बातमी आहे. त्या चित्रफितीतून क्रेमलिनचे काही नुकसान झाल्याचे दिसत नाही. पुतिनना मारण्यासाठी युक्रेनने ड्रोनमधून हे क्षेपणास्त्र सोडले असा रशियाचा दावा आहे. युक्रेनकडे कोणत्याही तंत्रज्ञानाला सुगावा लागू न देता थेट मॉस्कोपर्यंत पोहोचून क्रेमलिनच्या मध्यभागी कळसावर सोडता येईल असे ड्रोन असण्याची शक्यता अत्यल्प आहे. कदाचित रशियाने स्वत:च हे नाटक केले असावे व सूड घेण्यासाठी आता रशिया युक्रेनवर कदाचित अण्वस्त्रे सोडू शकेल.
२) कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मत देण्याचा दिनांक १० मे आहे. आतापर्यंत आलेल्या सर्व सर्वेक्षणांनी कॉंग्रेसला २२४ पैकी ११५+ व भाजपला ७० पेक्षा कमी जागांचा अंदाज दिलाय. कर्नाटकात प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सत्तांतर होत असल्याने कॉंग्रेसच्या विजयाचे नवल नाही.
३) काल पवारांनी अचानक पक्षाध्यक्ष पद सोडण्याची पुडी सोडून खळबळ निर्माण केली. हे सर्व ठरवून केलेले नाटक आहे हे अगदी स्पष्ट आहे. चर्चेत राहण्यासाठी वादग्रस्त विधाने करणे, अचानक कोणत्या तरी महत्त्त्वाच्या व्यक्तींना भेटून संशयास्पद वातावरण निर्माण करणे, काहीतरी अनपेक्षित घोषणा करणे अश्या गोष्टींचा पवारांना छंद आहे. प्रत्यक्षात आयुष्यात त्यांनी कोणतेही पद स्वत:हून सोडलेले नाही व यावेळी सुद्धा तेच होणार आहे.
प्रतिक्रिया
27 May 2023 - 10:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक उल्लू हा शब्द घुबडासाठी वापरलेला आहे, आणि उल्लूचा अर्थ निर्बूध्द, मूर्ख असाही आहे. एखादं चांगलं उद्यान, बागेची नासाडी करायला एकच घुबड-उल्लू पुरेसा आहे, पण इथे तर प्रत्येक झाडाच्या फ़ांदीवर एक घुबड बसलेलं आहे. परिणाम काय होणार, तर नासाडी.
मला भावलेला अर्थ असा, एखाद्या सुखनैव नांदणा-या कुटूंबात एखादा पालथा माणुस असला की त्याच्या अविचारी वागण्याणे कृतीने त्या चांगल्या घरादाराचं वाटोळं होतं. बरं, एखादा माणूस असा पालथा निपजतो, ते ठीक आहे. पण त्याच घरात तसेच, अजून चार-पाच पाठीराखे असतील तर राखरांगोळी नक्कीच. असंही.
भारी शेर आहे.
-दिलीप बिरुटे
26 May 2023 - 5:10 pm | श्रीगुरुजी
धरणात पडलेला भ्रमणध्वनी संच बाहेर काढण्यासाठी धरण उपसले.
सलग ३ दिवस धरण उपसले जात असताना सरकार, प्रशासन, माध्यमे गप्प होती कारण सरकार भाजपचे नव्हते.
26 May 2023 - 5:22 pm | Trump
धन्य ते सरकारी अधिकारी, धन्य तो माज
26 May 2023 - 8:33 pm | डँबिस००७
दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकार विरुद्ध अनेक प्रकरणात ईडी व सिबिआय कडुन तपास चालु आहे. दिल्लीतील सनदी अधिकार्यांची नियुक्ती, बदली राज्यपालाकडे होती पण मध्यंतरी सु कोर्टाने दिलेल्या निर्णया नूसार वरील अधिकार राज्यपाला कडुन काढुन दिल्ली सरकारला देण्यात आले होते. अश्या निर्णयामुळे दिल्ली सरकार आपल्यावर चालु असलेल्या तपासाला रोखण्यासाठी काम करु शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली.
दिल्लीतील व्हिजीलंस Office मधला आपल्या कार्यालयातच्या १५ मे रात्री काही
लोक घुसले होते व त्यांनी महत्वाच्या विषयाच्या केस फाईल्स आपल्या
कार्यालयातुन १५ मे रात्री गायब केलेल्या आहेत अस "राजशेखर" अधिकारी व्हिजीलंस यांनी १६ मे ला आपल्या उच्च अधिकार्यांना लिखीत रुपात कळवल होत.
काल नवभारत टाईम्स ने १५ मे रोजी रात्रीचा CCTV फूटेज व्हायरल केलेला आहे. ह्या फुटेज मध्ये रात्रीच्या २ वाजता तीन ईसम फाईल्स एका Office मधुन बाहेर काढताना दिसत आहेत.
केजरीवाल ना सुप्रिम कोर्टातुन अधिकार मिळताच आपल्या विरुद्ध असलेल्या पुराव्याच्या फाईल्स नष्ट करायचा चंगच बांधला होता. वरील प्रकरण हा त्यातलाच एक प्रयत्न होता.
सुप्रिम कोर्टाने केजरीवालला अधिकार देउन एका प्रकारे "चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या दिलेल्या ! "
सुप्रिम कोर्टाला ह्या प्रचरणाचा जाब कोण विचारु शकेल ?
26 May 2023 - 11:38 pm | मुक्त विहारि
2 महिलाएं, 16 आदमी और... हिंदू से मुस्लिम बनाने का हैरान कर देने वाला खेल
https://www.aajtak.in/amp/crime/news/story/two-women-sixteen-men-and-sho...
ही बातमी मराठी वर्तमानपत्रांत आली आहे का?
27 May 2023 - 12:19 pm | विवेकपटाईत
राष्ट्रपती या मुख्य अतिथी आहे. बाकी उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले असते तरीही बहिष्कार होणारच होता. ज्या संसदेत राजकुमार प्रवेश करू शकत नाही तिथे त्यांचे दरबारी कसे जातील. बहिष्कार साठी एवढे कारण पुरेसे आहे.
27 May 2023 - 5:30 pm | मुक्त विहारि
इतर पक्षांकडे, कुठलाही ठोस मुद्दा नसल्याने, अशा गोष्टींचा उगाच बाऊ करतात .....
कृष्ण आणि शिशूपाल, हा वाद आठवला ....
27 May 2023 - 5:34 pm | मुक्त विहारि
https://maharashtratimes.com/india-news/surat-man-sell-samosas-stuffed-w...
काळजी घ्या ......
-------
27 May 2023 - 9:21 pm | मुक्त विहारि
US CCP committee: चीनला घेरण्यासाठी रणनीती; भारताला 'नाटो प्लस'चा दर्जा मिळण्याची शक्यता, अमेरिकेच्या संसदीय समितीची शिफारस
https://marathi.abplive.com/news/world/world-news-us-select-committee-on...
परमपूज्य, नेहरू यांनी केलेल्या चुका, आता मोदी नक्कीच सुधारत आहेत .....
देशाचे संरक्षण हे नेहमीच प्राथमिक पातळीवर येते .....
मला तरी, मोदी, योगी आणि तेजस्वी सुर्या, यांच्या शिवाय पर्याय नाही.....
27 May 2023 - 11:08 pm | जेपी
तेजस्वी सूर्या ट्विटर बॉय आहे. बाकी त्याच्या कडून काय नाही होणार.
28 May 2023 - 10:05 am | मुक्त विहारि
पुढील प्रचार हा आंतरजालावर जास्त प्रमाणात होईल
योगी नंतर तेजस्वी सुर्या ही प्राथमिकता आहे, पण तेजस्वी सुर्या बरोबर अजूनही काही उमेदवार नक्कीच असतील
जसे, वाजपेयी + अडवाणी
आत्ताच्या घडीला, मोदी + अमित शहा
भाजप, एका व्यक्तीवर कधीच अवलंबून रहात नाही
प्रवक्ता एकच जण असतो पण निर्णय मात्र, भाजपची थिंक टॅन्क घेते
वरील प्रतिसाद, जेपी यांनाच आहे, इतरांनी उगाच चोंबडेपणा करायला येऊ नये....
वादे वादे जायते संवादः, असे होत असेल तरच,वादविवाद घालणे इष्ट असते, इति बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात.....
28 May 2023 - 11:51 am | प्रदीप
सर्वप्रथम, तुमच्या 'इतरांनी चोंबडेपणा करू नये' ह्याचा कधीतरी, कुणीतरी समाचार घेतला पाहिजे, ते मी येथे करतो आहे, मेन बोर्डावर आपण काहीही लिहीले, की ते सार्वजनीक झाले. ते सदर धाग्याचा एक भाग झाले. त्याचा 'बरावाईट' प्रतिसाद कुणीही सभास्सद करू शकतो, त्याला प्रत्युत्तर देण्याची हिम्मत ठेवावी लागते, तसे जमत नसेल तर, व्यनि आहेतच. तेव्हा हे 'चोंबडेपणा'चे दळण मेनबोर्डावर थांबवावे.
आता, भाजपच्या नेत्यांच्या उतररंडीबद्दल. ह्या पक्षांत मोदी, योगी, हिम्मत बिश्वास शर्मा व अण्णामलाई सोडून इतर सर्व बोलघेवडे आहेत. अमित शहा तर त्यांचे अंतस्थ चाणक्य वगैरे असतील तर असूदेत बापडे. पण गृहमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द अतिशय निराशाजनक आहे. आणि त्यांच्या चाणक्यनीतिचे फलित तर महाराष्ट्र, बिहार येथे आपण बघतोच आहोत. स्थानिक छोट्या पक्षांना अकारण महत्व देणे, नंतर विपक्षांतील भ्रष्ट नेत्यांची पक्षांत आयात करणे ह्यामुळे पक्षाचे पुढे काय भले होणार आहे, हे आपण पाहूयाच! सभांतून गरजणे व मुलाखती घेणार्या अँकर्सवर डाफरणे, ही दोनच कामे करतांना शहा जाहीरपणे दिसतात. भाजपने स्वतःच्या मुशीतील स्थानिक नेते घडवले नाहीत. जिथे ते घडवले, तिथेही विपक्षांतील नेत्यांवर केवळ ईडी, सी. बी. आय. व तत्सम संस्थांच्या चौकशीचे नाटक झाले. पुढील परिणाम शून्य. बंगालमध्ये गेल्या निवडणूकानंतर स्थानिक भाजप कार्यकर्त्यांवर जबरदस्त हल्ले करण्यात आले, अनेक कुटुंबेच्या कुटुंबे स्थलांतरीत झाली. भाजप नेतृत्वाने काय केले, तर म्हणे देशांतील प्रमुख शहरांतील चौकांत निदर्शने केली!! सत्ता हातांत येऊन अनेक वर्षे झाली तरी स्वतःची बाजू आक्रमकपणे प्रो-अॅक्टिव्हली मांडणे त्यांना अजून जमत नाही. तेव्हा होते काय, विपक्षीय अथवा त्यांचे चा.बि. पत्रकार नवनवे आरोप करत असतात, ज्यांतील बहुतांश बिनबुडाचे असतात, त्यांना उत्तरे देण्यात ह्या पक्षाच्या बुळचट नेत्यांचा बेळ जातो. अनेक पत्ते हातांत असतांंनाही, युद्ध दुसर्यांच्या अंगणांत लढवणे ह्या बाळूंना अजिबात जमत नाही. तर मग 'ह्या ठिकाणी' मारच मार खाण्याव्यतिरीक्त होणार काय आहे?
तेजस्वी सूर्या हा बाळूगळू नेता ज्या पक्षाच्या नेतृत्वाचा उत्तराधिकारी आहे, असे असेल, तर त्या पक्षाचे काही खरे नाही.
28 May 2023 - 12:26 pm | रात्रीचे चांदणे
मुलाखती घेणार्या अँकर्सवर डाफरणे
मुलाखत घेणारा अँकर् बऱ्याच वेळा भजप समर्थकच असतो तरी ते डाफरतात.
28 May 2023 - 1:36 pm | श्रीगुरुजी
बऱ्याच अंशी सहमत!
ह्या पक्षांत मोदी, योगी, हिम्मत बिश्वास शर्मा व अण्णामलाई सोडून इतर सर्व बोलघेवडे आहेत.
अगदी. महाराष्ट्रात अश्या भाजप नेत्यांची भाऊगर्दी आहे. आचरट बोलणे, पोकळ वल्गना, शून्य कृती, वेळ येताच शेपूट घालून पळणे याचा महाराष्ट्रात अतिरेक झालाय.
आणि त्यांच्या चाणक्यनीतिचे फलित तर महाराष्ट्र, बिहार येथे आपण बघतोच आहोत. स्थानिक छोट्या पक्षांना अकारण महत्व देणे, नंतर विपक्षांतील भ्रष्ट नेत्यांची पक्षांत आयात करणे ह्यामुळे पक्षाचे पुढे काय भले होणार आहे, हे आपण पाहूयाच!
नितीशकुमार, उठा, राठा, शिंदे अश्यांना भाजपने विनाकारण महत्त्व देऊन डोक्यावर चढवून स्वत:चंं खूप नुकसान करून घेतलंय. पण डोक्यात प्रकाश पडत नाही. पुढील विधानसभा निवडणुकीत कळेलच.
अत्यंत घाणेरडे, भ्रष्ट नेते पक्षात आणून भाजपने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय. राठासारख्या अत्यंत नगण्य माणसाला अवास्तव महत्त्व देऊन वारंवार घरी जाऊन भेटून भाजपला काय मिळते राम जाणे. उठासमोर तर भाजप नेत्यांनी लाळघोटेपणाचा कळस केला होता. या प्रकाराला चाणक्यनीति समजमाऱ्यांची कीव येते.
28 May 2023 - 8:05 am | रात्रीचे चांदणे
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची सुरवात मोदींनी हवन करून केलेली आहे. Secular लोकं परत भडकणार आसं दिसतय. विनाकारण विरोध करून विरोधक एका ऐतहासिक सोहळ्याला मुकले आहेत.
28 May 2023 - 10:07 am | धर्मराजमुटके
उद्घाटनात दक्षिणेतील संतांचे प्राबल्य दिसले.
"दक्षिणेतील मते मिळविण्यासाठीचा हा एक नवीन जुमला आहे पण तिथले लोक हुशार आहेत. ते अशा जुमल्यांना बधायचे नाहीत" अशा प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.
28 May 2023 - 10:45 am | डँबिस००७
आमच्या सूदैवाने नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची सुरवात मोदींनी हवन करून केलेली आहे. कॉंग्रेस असती तर पोपला बोलावल असत !!
राजदंडाची प्रतिस्थापना करुन मोदींनीं अनेक लक्ष सध्य केलेले आहेत. स्वातंत्र काळापासुनच ऊत्तर भारताला दक्षिण भारतापासुन वेगळ ठेवण्याचा कावा भारत सरकारने खेळला होता.
भारताला खर्या अर्थाने स्वातंत्र्य 2014 लाच मिळालेल आहे.
28 May 2023 - 1:40 pm | डँबिस००७
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी स्वा. वीर सावरकर यांच्या जन्म दिवसाचा मुहुर्त साधुन डाव्या लोकांच्या जखमेवर मिठ चोळलेले आहे. बर्नाँलचा खप वाढणार !
28 May 2023 - 2:13 pm | श्रीगुरुजी
बरं झालं बऱ्याच विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. त्यामुळे हा कार्यक्रम कोणतेही विघ्न न येता, अपशकुन न होता आनंदात संपन्न झाला.