कृत्रिम बुद्धिमत्ता, किसान जीपीटी, प्रोजेक्ट भाषिनी, आणि बरंच काही...

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in काथ्याकूट
12 Apr 2023 - 11:19 pm
गाभा: 

----
कृत्रिम बुद्धिमत्ता

सध्या ChatGPT हे कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence) तंत्रज्ञान चर्चेत आहे. ते वापरून काय साध्य होऊ शकते, यावर दररोज नवीन कल्पना चर्चिल्या जात आहेत, विकसित केल्या जात आहेत. यातीलच एक कल्पना म्हणजे, भारतीय भाषांमध्ये शेती विषयावर चर्चा करणारा मदतनीस (voice assistant)

----
किसान जीपीटी

मूळ भारतीय, शेतकरी कुटुंबात जन्मलेले, अमेरिकेत शिकलेले एक संगणक शास्त्रज्ञ (computer scientist) प्रतीक देसाई यांनी ChatGPT हे सर्वात आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence) तंत्रज्ञान वापरून, भारतातील नऊ भाषांमध्ये शेतीविषयक चर्चा करू शकेल, असा एक मदतनीस (voice assistant) तयार केला आहे.

अगदी एखाद्या कृषी क्षेत्रातील अनुभवी तज्ञासोबत संवाद व्हावा, तो ही मातृभाषेत, अशा स्वरूपात ही सेवा उपलब्ध करून दिली आहे.

खालील वेबसाईटवर मराठी भाषा निवडून, शेती संदर्भात प्रश्न विचारता येतील, चर्चा करता येईल:
https://kissangpt.com/

याच विषयावरील हा लेख वाचनात आला:
https://analyticsindiamag.com/kissangpt-brings-cutting-edge-ai-to-indias...

----
प्रोजेक्ट भाषिनी

खरं तर, किसान जीपीटी तंत्रज्ञान उपयोगात आणण्यासाठी, भाषेचा महत्वाचा अडसर होता. पण तो दूर झाला ते भारत सरकारच्या Digital India Corporation अंतर्गत जुलै २०२२ मधे सुरू झालेल्या प्रोजेक्ट भाषिनी मुळे:
https://bhashini.gov.in/

UPI, CoWin, ONDC, यानंतरचा एक महत्वाकांक्षी, आणि कदाचित या सर्वांपेक्षा जास्त परिणामकारक असा हा प्रोजेक्ट असेल, जो देशातील ५०% पेक्षा जास्त लोकांपर्यंत ज्ञान/माहिती/तंत्रज्ञान पोहोचण्यासाठी असणारा भाषेचा अडसर कायमचा दूर करेल.

----

मिपासारख्या मराठी संकेतस्थळावर या विषयावर चर्चा झाली नाही, तर नवलच म्हणावं लागेल!

----

प्रतिक्रिया

आग्या१९९०'s picture

13 Apr 2023 - 12:45 am | आग्या१९९०

उपयुक्त धागा. धन्यवाद!
Kissangpt मराठीत वापरून बघितले खूप छान माहिती मिळते.

विवेकपटाईत's picture

13 Apr 2023 - 1:22 pm | विवेकपटाईत

आवश्यक नाही कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्हाला योग्य सल्ला देईल.. नुकतेच धार्मिक ग्रंथांच्या आधारावर कृत्रिम बुद्धिमत्ताने निर्मित प्रभू श्रीरामाचे चित्र बघितले. रामाच्या खांद्यावर जानवे नव्हते, कानी कुंडल नव्हते, रंगही सावळा किंवा निळा नव्हता इत्यादी. थोडक्यात धार्मिक ग्रंथात वर्णित केलेले श्रीराम त्या चित्रात दिसले नाही. याच्या एकच अर्थ निघतो या ॲपवर नियंत्रण ठेवणारे, गुगल फेसबुक प्रमाणे त्यांच्या स्वार्थानुसार हस्तक्षेप करू शकतात. असत्यला सत्य आणि सत्याला असत्य ठरवू शकतात. सावधान राहणे गरजेचे.

विवेकपटाईत's picture

13 Apr 2023 - 1:22 pm | विवेकपटाईत

आवश्यक नाही कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्हाला योग्य सल्ला देईल.. नुकतेच धार्मिक ग्रंथांच्या आधारावर कृत्रिम बुद्धिमत्ताने निर्मित प्रभू श्रीरामाचे चित्र बघितले. रामाच्या खांद्यावर जानवे नव्हते, कानी कुंडल नव्हते, रंगही सावळा किंवा निळा नव्हता इत्यादी. थोडक्यात धार्मिक ग्रंथात वर्णित केलेले श्रीराम त्या चित्रात दिसले नाही. याच्या एकच अर्थ निघतो या ॲपवर नियंत्रण ठेवणारे, गुगल फेसबुक प्रमाणे त्यांच्या स्वार्थानुसार हस्तक्षेप करू शकतात. असत्यला सत्य आणि सत्याला असत्य ठरवू शकतात. सावधान राहणे गरजेचे.

अमर विश्वास's picture

13 Apr 2023 - 6:52 pm | अमर विश्वास

इंटरेस्टिंग .... उत्तम माहिती

श्रीगणेशा's picture

13 Apr 2023 - 7:30 pm | श्रीगणेशा

एबीपी माझा वेब टीम मिसळपाव वरून फक्त बातमी शोधत नाही, तर बऱ्यापैकी कॉपी करतात असं स्पष्ट दिसतंय :-)
वरील चर्चात्मक लेख मिपावर प्रकाशित झाल्यानंतर पुढील नऊ तासात एबीपी माझावर इथे प्रकाशित झाला, अर्थातच थोडेफार बदल करून:
https://marathi.abplive.com/agriculture/agriculture-news-kissangpt-the-a...

एबीपी वरील बातमीतील पहिला परिच्छेद मिपावरील या धाग्यातून जवळ जवळ कॉपी केला आहे. पण नंतर त्यात अजून भर घालण्यात आली, हेही खरं.
ABP Majha KissanGPT news

Bhakti's picture

13 Apr 2023 - 8:28 pm | Bhakti

:-)

लेख आवडला, ठीक आहे , शेती विषय फक्त एक बाजू आहे , chatgpt खूप मोठा विषय आहे.
मी स्वतः यावर एक धागा काढणार होतो. पण तुम्ही सुरुवात केली अभिनंदन.
पून्हा एकवार विषय खूप मोठा आहे.आपल्याकडे जाणकार तर आहेतच.

सर टोबी's picture

8 May 2023 - 8:50 pm | सर टोबी

चॅट जिपीटी त्याला “शिकविण्यासाठी” वापरलेली माहिती आणि आंतरजालावर प्रचलित/उपलब्ध असलेली माहिती याचं संकलन आणि एक मर्यादेत निष्कर्ष अशा प्रकारे माहिती देतो. तयार माहिती आणि प्रणाली करणारे तंत्र जसे उत्तरोत्तर विकसित होईल तसं तसं संगणक प्रणाली तयार करणारे आणि तांत्रिक माहितीविषयक लिखाण करणारे व्यावसायिक यांच्यावर गंडांतर येईल अशी भीती सध्या निर्माण केली जात आहे. यावर माझे अंदाज या प्रमाणे:

एखादा व्यावसायिक प्रश्न सोडविण्यासाठी त्या प्रश्नाचा अभ्यास आणि त्याची उकल एव्हडा टप्पा गाठायला कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करणाऱ्या तंत्रज्ञांना बराच वेळ लागू शकतो. आणि असे तंत्र विकसित झाले तरी सोबतच एक नवे व्यावसायिक कौशल्य तयार होईल. म्हणजे पूर्वीचे टांगे गेले तरी रीक्षा ड्राइविंग हे नवे कौशल्य आपल्याला लागतेच आहे.

आज घडीला तरी चॅट जिपीटी कोणत्याही वादग्रस्त प्रश्नावर उत्तर देण्याचं टाळतो. पण पुढे जाऊन अधिकृत रित्या विशिष्ट विचारसरणीचे चॅट जिपीटी येऊ शकतात.

वस्तू आणि सेवा यांच्या बाबतीत एखाद्या मुद्द्यावर वाद झाल्यास त्या कंपनीच्या अधिकृत संकेत स्थळावरील माहिती हि कायदेशीर रित्या प्रमाण मानली जाते. त्यामुळे तंत्रविषयक माहिती तयार करणाऱ्या व्यावसायिकांनी चॅट जिपीटी आपल्या पोटावर पाय देईल अशी काळजी सध्यातरी सोडावी.

सध्या इतकेच.

कुमार१'s picture

9 May 2023 - 9:06 am | कुमार१

लेख आवडला.