साहित्य चोरी मध्ये मैलाचा दगड

स्वरुपसुमित's picture
स्वरुपसुमित in काथ्याकूट
6 Apr 2023 - 9:09 pm
गाभा: 

मित्रानो

साहित्य चोरी हा नेहमी चघळा जाणार विषय आहे पण आज ह्यात मैलाचा दगड पडला
पहिल्यन्दा पोलीस complaint झाली आणि त्यावर शिक्का पण आहे हे आधी कोणी पण करू शकले नाही
दुसरे म्हणजे हे ऐवढे viral झाले कि ह्या वेळी सोक्ष मोक्ष लागणारच

https://www.facebook.com/JanardanKeshavHome/posts/pfbid0vctQtGVKFCCgoomB...र

https://www.facebook.com/TheLayBhariOfficial/posts/pfbid0y2MCAJvccQDgLMV...

https://www.facebook.com/Maharashtra60/posts/pfbid0WHTPWzJ2zdqqjuqvipZ1b...

https://www.facebook.com/search/photos/?q=%22%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4...

आपापले साहित्य चोरी चे अनुभव प्रकट करावे

ह्या आधी पण बर्याच वे़ळा सहित्या चोरी झाली पण आता हे प्रकरण निकराचे आहे

प्रतिक्रिया

स्वरुपसुमित's picture

9 Apr 2023 - 10:51 am | स्वरुपसुमित

कोणी पण प्रतिसाद नाही?

विवेकपटाईत's picture

10 May 2023 - 6:28 pm | विवेकपटाईत

एकदा सोशल मीडियावर पोस्ट टाकली की फिरणार. चोरांच्या नादी लागून मनस्ताप होणार एवढेच. 1980 च्या काळात अनेक मराठी मासिकातले लेख हिंदीत आणि हिंदी मासिकांतले लेख मराठीत वाचले आहेत, वेगवेगळ्या नावांनी. पण त्यावेळी तुमचे लेख कुणीतरी चोरला आहे कळणे शक्यच नव्हते. आज तुम्हाला कळून जाते, एवढेच.

सरिता बांदेकर's picture

11 May 2023 - 7:27 am | सरिता बांदेकर

मी माझी कथा एका मासिकासाठी पाठवली होती. तिचे अंक सर्व भाषांमध्ये येतात.
त्यांनी मला सरळ सांगितलं होतं, तुमची कथा आवडली तर आम्ही भाषांतर करून ती इतर भाषिक मासिकंमध्ये छापू पण कुठेही तुमचे नांव येणार नाही. मग मी त्यांना मेल करून सांगितलं कि माझी कथा तुम्ही अशी दुसऱया कुणाच्या नांवानी छापलीत तर मी कायदेशीर कारवाई करीन.
त्यामुळे मला असं वाटतं कि हे सर्रास होत असावं.
आपणच लक्श ठेवायला पाहिजे.

चौथा कोनाडा's picture

11 May 2023 - 6:21 pm | चौथा कोनाडा

सध्या चोरीमारीचेच दिवस आहेत.

(टिव्ही वरच्या रोजच्या मालिका तरी काय असतात ? शेकडो सिनेमामधून चोरलेल्या कल्पना वापरत असतात)

कितीही अटकाव करायचा प्रयत्न केला तर आपले प्रयत्न तोकडे पडतात.
त्यामुळे याचा त्रास घेऊन उपयोग नाही असं जाणकार मित्रांबरोबर चर्चा करताना समजुन आले.

>>>त्यामुळे याचा त्रास घेऊन उपयोग नाही असं जाणकार मित्रांबरोबर चर्चा करताना समजुन आले.

फार वेळा सहमत.

"पेशवा सरकार" नावाचा एक लेख व्हायरल झाला होता. अर्थातच लेखकाचे नाव उडवून तो लेख सगळीकडे फिरत होता.

तो लेख वाचूनच रावेरखेडीला जावे अशी कल्पना सुचली आणि २०१५ साली दुचाकीवरून रावेरखेडीला गेलो. त्यावेळी रस्त्यांची इतकी वाईट अवस्था होती की खड्ड्याळ प्रदेशातून आणि कुणाच्या तरी गोठ्यातून वगैरे बुलेट नेली होती.

मिपावर धागा टाकला आणि बहुदा इथूनच फोटो व्हायरल झाले. नंतर पेशवा सरकार लेख आणि मी काढलेले रावेरखेडीचे फोटो असे जोडीने फिरत होते.

फेसबुकवर एक दोघांसोबत वाद झाला. पण लोकं कोडगी असतात. ऐकत नाहीत आणि चूक मान्य करूनही त्यांना वाद घालायचाच असतोच. असा अनुभव आला.

शेवटी मीच विचार केला की तेथे जाऊन फोटो काढून आणले यात फार मोठा तीर मारला नाहीये.. फोटो जितके जास्त लोकं बघतील तितके जास्त लोकं रावेरखेडीला जाऊन डोकं टेकवून येतील.

मग माझ्यापुरता विषय संपला. नंतर मी मिपावर लिहिलेले दोन तीन लेख लोकांनी न विचारता पार अभिवाचनाला वगैरे घेतले फक्त त्यात मिपाचा आणि माझा उल्लेख केला होता म्हणून मी तो पण विषय सोडून दिला.

*********************

दुर्ग विहार करून मिपावर लेख लिहिणारे एक जण माहिती आहेत. ५०-६०% स्वतःचे लेखन आणि उरलेले दुसऱ्याचे ढापलेले असा मामला असतो. फोटो दुसऱ्याचे घ्यायचे आणि त्याचे नामनिर्देश नाहीत. एक दोन वेळा त्यांनी रेफरन्स मध्ये मूळ लेखकांची नावे लिहिली पण मूळ लेखकांनी त्यावर आक्षेप घेतले. त्यांच्या मिपावरच्या एका लेखाखाली बराच दंगा झाला आहे. पण लोकांनी प्रश्न विचारले की ते महाशय उत्तरे देत नाहीत.

अशा लोकांच्या कोडगेपणाची कमाल वाटते.

बरं ५०-६०% स्वतःचे लिहीत आहात तितकेच प्रकाशित करा.. ते जे काही असेल, जसे असेल "ते स्वतःचे असेल" इतकी साधी गोष्ट का समजू नये?

चौथा कोनाडा's picture

12 May 2023 - 1:10 pm | चौथा कोनाडा

उदबोधक अनुभव !

👍

एकदा का आंजावर प्रकाशित झाले की ते आपले नसते हेच खरे !
एखाद्याने मुळ नाव लिहिले तर बोनस समजायचा.

ह्या नाव गाळण्याच्या ( मुद्दाम किंवा अनभिज्ञतेने) चालीमुळे सुंदर सुंदर लेखांचे मुळ लेखक समजत नाहीत त्यामुळे अग्रेषित करताना कुचंबण होते.

श्रीगुरुजी's picture

12 May 2023 - 7:37 am | श्रीगुरुजी

२०१३ मध्ये मी मिपावर ज्योतिष राशी, स्वभाव, एकमेकांशी कोणत्या राशींचे जुळते अश्या विषयावर एक हलकाफुलका लेख लिहिला होता.

२०१५ मध्ये रत्नागिरीतील एका पूजापाठ करणाऱ्याने स्वतःच्या फेसबुक भिंतीवर स्वतःच्या नावाने एक अक्षरही न बदलता प्रसिद्ध केला. तो लेख आवडल्याचे त्याच्या मित्रयादीतील ८०+ मित्रांनो दर्शविले होते. अनेकांनी कौतुकाचे प्रतिसाद दिले होते. हे मला नंतर समजल्यावर त्याला विचारणा केली. त्यावर त्याने उत्तर दिले की मिपावर या लेखकाचे नाव नव्हते म्हणून मी माझ्या फेसबुक भिंतीवर नाव टाकले नाही. पण त्या लेखाखाली त्याने स्वत:चे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक दिला होता.

त्या लेखाचा लेखक म्हणून माझज मिपा सदस्यनाम आहे. त्यामुळे लेखक म्हणून माझे सदस्यनाम व मिपाचा उल्लेख करायला पाहिजे होता. परंतु तो लेख स्धत;च्या नावावर खपवून पूजापाठ, ज्योतिष यासाठी नवीन गि-हाईके मिळवण्यासाठी त्याने हे वाङ्‌मयचौर्य केले. लेखाखाली माझे नाव लिही हे सांगूनही त्याने नकार दिला. आपण दुसऱ्याचा लेख ढापलाय हेच मुळात त्याला मान्य नव्हते. तो वारंवार मिपावर किंवा इतर संकेतस्थळावर येऊन इतरांचेही लेख ढापत असणार.

मी फेसबुकला सुद्धा तक्रार करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.

शेवटी मी विचार केला की या साधारण लेखनाची मिपावर १०००+ वाचने झाली व ९०+ प्रतिसाद आले. माझ्या दृष्टीने तो लेख सर्वसाधारण होता. पण तरीही तो लेख कोणाला तरी चोरावासा वाटला व तो फेसबुकवर वाचून बऱ्याच जणांना आवडला हेच माझे यश आहे.

बाकी आंतरजाल व समाजमाध्यमांमुळे वाङ्‌मयचौर्याला प्रतिबंध करणे अशक्य आहे. अमीरखान या यशस्वी अभिनेत्याने सुद्धा चेतन भगतच्या फाईव्ह पॉईंट समवन या कादंबरीवर आधारीत थ्री इडियट्स चित्रपट निर्माण करताना चेतन भगतचा कोठेही उल्लेख सुद्धा केला नाही. हे वाङ्‌मयचौर्यच होते. त्यांच्या तुलनेत मी तर अत्यंत नगण्य माणूस.