मक्याचे लॉलीपॉप

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
3 Mar 2023 - 3:53 pm

खमंग थालिपीठ पाहून मलाही वेगळे थालिपीठ बनवायची इच्छा झाली.लुसलुशीत दाणे असलेले मक्याचे कणीस दुर्लक्षामुळे कोरडे व्हायला लागले होते.मक्याचे पीठ त्याच्या कार्ब ,फायबर मुळे अनेक पाककृतीमध्ये वापरले जाते.थालिपीठ तर बनवायचे होते पण लेक कालपासूनच म्हणत होती वेगळ खायचं आहे.तेव्हा लॉलीपॉप हा प्रकार कधीच केला नाही तो करावा म्हटलं.
साहित्य:
g
दोन वाट्या उकडलेले मक्याचे दाणे
एक वाटी उकडलेले मटार
दोन उकडलेले बटाटे
मिरची,लसूण,आलं,जिरे,कोथिंबीर वाटण
दोन चमचे तिखट,चाट मसाला,गरम मसाला
चवीपुरते मीठ
दोन चमचे स्टार्च पावडर
दोन चमचे मैदा
ब्रेड क्रंब
तळण्यासाठी तेल
आईस्क्रीमच्या काड्या

तर या कणसाचे दोन तुकडे करून उकडून घेतानाच बटाटे,मटार मिठाच्या पाण्यात कुकरमध्ये उकडून घ्यावे.
आता मटार ,मक्याचे दाणे जिर्याच्या,मिरची वाटण फोडणीत परतून घ्यायचे.त्यात मीठ ,कोथिंबीर ही टाकावी.

g

आता हे सारण मिक्सरमधून एकजीव करायचे,छान वाटून बनवायची.
थोड वाटलेलं सारण संध्याकाळी थालीपिठासाठी बाजूला ठेवायचे.
हे वाटलेलं मक्याच सारण कुस्करलेल्या बटाट्यात एकत्र करून घ्यायचे.त्यात चाट मसाला टाकायचा.
आता ह्याचे छोटे गोळे करून आईस्क्रीमच्या काड्याना लॉलीपॉप सारखे टोचायचे.
आधी गोल गोल गोले केले,ते नीट तळ्ता येइना.तेव्हा लॉलीपॉप उभट गोले केले.ते नीट झाले.
हे लॉलीपॉप मैदा ,स्टार्च ,मीठ ,गरम मसाल्याच्या घोळात घोळून घ्यायचे.
a

s

मंद आचेवर तळून घ्यायचे.
कोशिंबीर तयार होती ,त्याच्याबरोबर गट्टम झाले हे मक्याचे लॉलीपॉप..

g

आता थालिपीठ संध्याकाळी 
-भक्ती

प्रतिक्रिया

श्वेता व्यास's picture

3 Mar 2023 - 4:07 pm | श्वेता व्यास

वाह, तोंपासु :)

कंजूस's picture

3 Mar 2023 - 5:38 pm | कंजूस

हे काडीवरचे कटलेट झाले.

मक्याचे ब्रेड कटलेट
G
सर्वांना धन्यवाद!
(आज डाएटची वाट लागली .. हम्म ;)

Bhakti's picture

3 Mar 2023 - 8:52 pm | Bhakti

प्रेरणा
https://www.misalpav.com/node/51133
आणि वांग्याचे थालिपीठ
--
उकडलेले मक्याचे दाणे आलं लसूण मिरची पेस्ट मधून परतून,मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे.भाजणी मध्ये हे वाटलेले सारण कांदा घालून पीठ मळून घ्यायचे.छानपैकी थापून घेऊन,खमंग थालिपीठ भाजून घ्यायचे.तूप ,मका चाट बरोबर निवांत आस्वाद घ्यायचा .
T

कर्नलतपस्वी's picture

3 Mar 2023 - 10:30 pm | कर्नलतपस्वी

आमचा मेस कुक खालील पदार्थ बनवायचा. त्याला ब्रेड ग्रेनेड म्हणायचा.

मका,मटर,किसलेले गाजर,बीट रूट व उकडलेला बटाटा मॅश करून एकत्र सारण बनवायचे. अर्थात बाकी तिखट,मीठ, मसाले चवी प्रमाणे.

ब्रेड स्लाईस पाण्यात बुडवून लगेचच बाहेर काढायचा व दाबून त्यातले पाणी काढून टाकायचे. ओलसर स्लाईस वर वरील सारण भरून ग्रेनेडचा शेप द्यायचा. डिप फ्राय करून तळलेली मिर्ची ग्रेनडच्या पिन सारखी अडकवायची. टोमॅटो केचअप किंवा साॅस बरोबर सर्व्ह करायचे.

बाकी मका थालीपीठ करून बघतो. रुपडे छान आहे म्हणजे चव पण भारीच असणार.

टर्मीनेटर's picture

4 Mar 2023 - 5:30 pm | टर्मीनेटर

ब्रेड ग्रेनेड वरून आठवले, 'टॉम अँड जेरीचा' डाय हार्ड फॅन असल्याने मी काही वर्षांपूर्वीपर्यंत अंड्यासाठी 'हेन ग्रेनेड' हा शब्द वापरायचो. (भारता बाहेरही) एखाद्या चांगल्या रेस्टोरंट मध्ये गेल्यावरही बरोबरच्या मंडळींपैकी कोणाला हवी असल्यास ऑर्डर देताना 'बॉइल्ड एग्स' ऐवजी 'बॉइल्ड हेन ग्रेनेड्स' असे वेटर/स्टीवर्डला सांगायचो 😀
क्वचित प्रसंगी वेटर/स्टीवर्ड स्मार्ट निघायचा आणि बरोबर बॉइल्ड एग्स सर्व्ह करायचा पण बहुतांश वेळी ऑर्डर घेताना त्यांच्याकडून 'सॉरी' असेच ऐकू यायचे 😂 😂 😂

Bhakti's picture

5 Mar 2023 - 10:08 am | Bhakti

हेन ग्रेनेड!
भारीच.

अच्छा याला ग्रेनेड म्हणतात का.अनेक लोक चौकोनी ब्रेडला तिरपा काप देऊन,त्यात वरील पद्धतीने सारण भरून डाळीच्या पिठात घोळून ब्रेड पकोडा करतात, डेंजरच हा हा.

ब्रेड ग्रेनेडचा फोटो हवा होता, म्हणजे जास्त idea आली असती कसा करायला हवाय.

तुषार काळभोर's picture

4 Mar 2023 - 8:04 am | तुषार काळभोर

लॉलीपॉप एकदम कल्पकतेने बनवलाय...

कर्नल साहेब, ग्रेनेड एकदम झक्कास असणार.

टर्मीनेटर's picture

4 Mar 2023 - 5:18 pm | टर्मीनेटर

खल्लास रेसिपीज आहेत दोन्ही 👍
मका हे असं धान्य आहे कि ज्याचे सर्वच पदार्थ मला मनापासून आवडतात, नावे तरी कुठल्या कुठल्या पदार्थांची घ्यायची 😀
मक्याचे लॉलीपॉप आणि मक्याचे थालीपीठ हे दोन्ही पदार्थ लवकरच ट्राय करण्यात येतील!

चांगले लागतात.

वा भक्ती, मक्याचे लॉलीपॉप आणि थालीपीठ लैच भारी झालेले दिसतेय.

Bhakti's picture

5 Mar 2023 - 10:02 am | Bhakti

सर्वांना धन्यवाद!

रीडर's picture

5 Mar 2023 - 10:17 pm | रीडर

खमंग