रविवारी नगरच्या महिलांना स्वयंपाकाचा कंटाळा आला,आणि होटेलात जायचा कंटाळा आला , झणझणीत खावं वाटलं की आगडगावाचे प्लॅन केला जातो.
आगडगावाला शंकराचा अवतार/सेवक काळभैरव याचे जुने मंदिर आहे.रतनमल,देवमल ,आगडमल या तीन राक्षसांनी हे दगडाने बनलेले मंदिर बांधले आहे अशी आख्यायिका आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वारावर तीन राक्षसांची शिरं आहेत.कदाचित हे किर्तीमुख असावेत पण आता मंदिरावर इतके आधुनिक रंगरंगोटी इतर थर आहेत की ओळखता येणे अवघड आहे.आतील , बाहेरील बांधकामही हेमाडपंथी दिसत आहे परंतु कोणताही शिलालेख नाही.
रविवारी १२ वाजता काळभैरव आणि जोगेश्वरी मातेची अत्यंत मोहक मूर्ती/तांदळा ज्याची आरती झाल्यावर अतिशय रूचकर महाप्रसादाच्या पंगतीच्या पंगती उठतात.यामध्ये गरमागरम मिश्र डाळीची आमटी, बाजरीची भाकरी,ठेचा,कांदा लिंबू फडफडीत भात,गोड शिरा/लापशी असे अस्सल गावरान पदार्थ असतात.यासाठी असंख्य भगिनी स्वच्छेने आनंदाने भाकरी करण्यासाठी सहभाग घेतात.सर्वांना प्रसाद वाटप होईपर्यंत माईकहून भाविकांना नामस्मरणात तल्लीन केले जाते.कोणताही प्रसाद उष्टा ठेवू नका यांची वारंवार सुचना दिली जाते.
हळूहळू गर्दी वाढली असते.ताजी भाजी, गावरान डाळी, कडधान्य विकायला असतात.पेढे, लहान मुलांसाठी किरकोळ खेळणी ...एक जत्राच भरते.
आणखिन एक विशेष म्हणजे भैरव जयंती नंतरच्या रविवारी येथे यात्रा भरते तिथे रात्री भुतांची असते कोणत्याही गावकरी ,बाहेरील व्यक्तींना येथे प्रवेश करता येत नाही.याविषयी अजूनही फारशी शहानिशा केली नाही.
परततांना पवनचक्की मोजत मोजत , उंचीवरून हिरव्या शेताचे आकार ओळखत बुर्हानगरला पोहोचलो.तुळजाभवानी देवीचे मंदिर आहे.प्रत्यक्ष तुळजाभवानी बालरूपात येथे भक्तांची सेवा करत असे मानले गेले.तुळजापूरला येथून पाठवलेल्या पालखीचा मोठा मान आहे.
प्रतिक्रिया
4 Dec 2022 - 9:53 pm | कंजूस
फोटो टाकून चटपटीत लेख आणि प्रसादाचे ताट. आवडलं. गावरान गंमत अशीच टिकायला हवी. रंगरंगोटीचं खूळ आता सर्वच देवळांत शिरलं आहे. असो.
5 Dec 2022 - 10:42 am | Bhakti
गावरान गंमत अशीच टिकायला हवी.
आणि दर्शन रांग, महाप्रसाद प्रतिक्षालय, स्वच्छता या गोष्टींसाठी १००% देईन.येत्या काही वर्षांत या देवस्थानाचा नावलौकिक वाढणार आहे.
5 Dec 2022 - 11:10 am | गोरगावलेकर
माहिती व फोटो नेहमीप्रमाणेच सुंदर. धार्मिक स्थळी बहुतेक वेळेस स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. हे ठिकाण मात्र त्याला अपवाद दिसते. नावलौकिक वाढला तरी हे सर्व असेच टिकून राहायला हवे.
5 Dec 2022 - 2:44 pm | श्वेता२४
खूपच स्वच्छता व निटनेटके आहे देवस्थान . छान ओळख.
11 Dec 2022 - 6:43 pm | चौथा कोनाडा
रोचक भटकंती !
काळभैरव, मंदिर माहिती छान आहे आणि प्रसादाची थाळी पाहून तोंपासू !
अशी आडबाजूची स्थाने जिथे कमी गर्दी असती अशी स्थाने खुप समाधान देऊन जातात.
गर्दी कमी असली की अस्वच्छता होत नाही, शिस्त पाळली जाते. अशी ठिकाणे मला आवडतात.
12 Dec 2022 - 6:48 am | प्रचेतस
फोटो आणि माहिती मस्त. अशाच काही आडवाटेवरच्या ठिकाणांची सफर घडवत राहा.
12 Dec 2022 - 8:03 am | फारएन्ड
सुंदर माहिती आणि फोटो!
12 Dec 2022 - 3:21 pm | शानबा५१२
हा लेख मी दोन चार वेळा वाचला. त्यातला काळ व भैरव असा उल्लेख हवा होता. तुळजाभवानीचे दोन सोबती, संरक्षक होते एक काळ व दुसरा भैरव. तुळजापुरला(सोलापुर) मंदिराच्या मागे दोन डोंगर आहेत, त्यांना एक काळ व दुसरा भैरव अस बोलले जाते.
ज्यांच आडनाव 'कदम' असते ते तुळजाभवानीचे पुजारी 'कर्दम ऋषी' ह्यांवरतुन असते. त्यांचा उल्लेख स्कंदपुराणात आहे. कदमांची ही देवी कुलदैवत असते. म्हणुन लिहावसे वाटले.
12 Dec 2022 - 5:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितीपूर्ण भटकंती ल्हिहिते राहावे.
-दिलीप बिरुटे
12 Dec 2022 - 9:49 pm | मुक्त विहारि
नगर पासून आगडगाव किती दूर आहे?
13 Dec 2022 - 8:38 pm | आलो आलो
शहरापासून साधारण १०-१२ किमी.
स्वतःचे वाहन असेल तर उत्तम ...नसेल तरी खाजगी कामचलाऊ व्यवस्था असते.
निसर्गाचे दान अजूनतरी येथील गावकऱ्यांनी जपले आहे,
शिवाय दूधदुभते या भागात जास्त असल्याने येथील अस्सल गावरान खवा खूपच स्वादिष्ट असतो त्यामुळे त्यालाही खूप मागणी आहे.
( वाह तोंपासु ! इस संडे का प्लॅन फिक्स हुआ )
बुर्हाणनगर ची आई भवानी तर आम्हाला हाकेच्या अंतरावर म्हणजे साधारण दोन अडीच किमीवर त्यामुळे फ्रिक्वेंट दर्शन होते हि जगदंबेची कृपा !! __/\__
13 Dec 2022 - 10:02 pm | मुक्त विहारि
नशीबवान आहात
14 Dec 2022 - 7:22 am | कर्नलतपस्वी
गावा गावातून अशी प्राचीन मंदिरे आहेत. त्यांना ऐतिहासिक वारसा आहे. काही चांगली काहींची हालत जर्जर पण भेट दिल्याने वारसा कळतो.
भटकंती आवडली.
14 Dec 2022 - 3:24 pm | Bhakti
सर्वांना धन्यवाद!