अमरनाथ यात्रा-बेचाळीस वर्षापुर्वीची आणी आताची.
https://www.misalpav.com/node/50542/backlinks
१. सन ऐंशीमधे अनुभवलेल्या अमरनाथ यात्रेतील अडचणी, सुखसोई व यात्रेकरूस आज उपलब्ध असलेल्या सोईंचा आढावा घेण्याचा प्रयत्न आहे.
२. क्लिक ३ कॅमेरात कैद केलेली छायाचित्रे काळाच्या ओघात लुप्त झाली, यंदा गेलेल्या यात्रेकरूने काही छायाचित्रे पाठवली आहेत व काहीअंतरजाला वरून घेऊन जुन्या आठवणींना उजळा द्यायचा प्रयत्न आहे. यात्रेकरूचे आणी आन्तर्जालाचे आभार.
मागील भागातून...
ठिक सहा वाजता कॅम्प सोडला व सिंध नदीच्या काठाने पायी प्रवास सुरू केला.
पुढे.......
आषाढ शुद्ध द्वादशी पासुन सुरू होणारी अमरनाथ यात्रा श्रावणी पौर्णिमेला संपन्न होते.अधिक मास, तीथींच्या क्षय,वृद्धी नुसार यात्रेचा कालावधी कमी जास्त होऊ शकतो. अमरनाथ हिमखंड काशमीर मधल्या लिद्दर खोर्यात आहे.एका बाजुला जोजीला पर्वत तर दुसरी कडे मचोई हिमखंड (ग्लेसियर) आहे.अमरावती नदी अमरनाथ हिमखंडातून उगम पावते व पंचतरणी कडून येणाऱ्या लिद्दर नदीला पवित्र गुफे पासून तीन कि.मी.अंतरवर मीळते.या जागेला संगम म्हणतात. इथेच बालटाल व पहलगाम कडून येणारे मार्ग एकत्र मिळतात.यात्रेकरू संगमावर स्नान करून अमरेश्वराचे दर्शन घेण्यास गुफे कडे प्रस्थान करतात.
*****
या गुफेत माता पार्वतीच्या विनंतीस मान देऊन भगवान शंकरानी त्यांना अमरकथा सांगीतली.पवित्र गुफा १३००० फुट तर अमरनाथ शिखर १७००० फुट उंचीवर आहे.
गुफे कडे जाण्यासाठी दोन मार्ग...
*****^^^^^
एक, बालटाल मार्गे, सिंध नदीच्या किनार्यावरून छोटा पण कठीण, चौदा किलोमीटर सरळ,उभी चढण (steep gradient) बालटाल वरून पायी यात्रेची सुरूवात होते.
*****
*****
दुसरा सोपा,कमी चढउतार पण चाळीस एक कि.मी.अंतरअसलेला. पहलगाम,चंदनबाडी,पिस्सू टाॅप, शेषनाग,पंचतरणी,संगमावरून अमरनाथ कडे जाणारा हा सर्वात जुना यात्रा मार्ग.ऋषि भृगू सुद्धा याच मार्गाने गेले होते अशी किवदंती आहे.या मार्गावर पहलगाम हा पहिला पडाव.खरी पायी यात्रा चंदनवाडी पासुन सुरू होते.पुर्वी यात्रेकरू श्रीनगर वरूनच पायी यात्रेची सुरूवात करायचे.
कुठला मार्ग घ्यावा....
पहलगाम मार्ग समुद्र सपाटी पासुन सात हजार पाचशे फुटावरून सुरू होतो.चंदनवाडी पर्यंतची दोन हजार फुट चढण गाडीतूनच पार पडते व इथे एक दिवस मुक्काम असतो. भाविकांना अत्यंत प्रतिकूल अशा वातावरणाशी जमवून घेण्यास मदत होते (acclimatization).पिस्सू शिखराची चढण भाविकांची परीक्षा घेते त्या मानाने पुढील प्रवास मात्र सोपा वाटतो.मध्यम पण सुदृढ वयातील यात्रेकरूंना हा मार्ग सोपा आहे.
बालटाल नऊ हजार फुटावर स्थित असून पुढील आडिच तीन हजार फुट चढण खुप तीव्र असल्याने भाविकांची लवकर दमछाक होते. तसेच या मार्गावरून जाताना मोठा हिमखंड लागतो.तो पार करणे सुद्धा मोठे अव्हानच असते.भल्याभल्यांना गुढगे टेकवायला लावणारी चढण चढण्याची व उतरण्याची हिम्मत शरीर धडधाकट असेल तरच करावी अन्यथा हवाई मार्गाने यात्रा सुखनैव संपूर्ण करावी.यात्रेसाठी वैद्यकीय अनुमती, प्रमाणपत्र अनिवार्य आहे. तरूणाई या वाटेवर स्वार्थ म्हणजे ट्रेकचा थरार व परमार्थ दोन्ही साध्य करू शकते. इथेच तीला सुरक्षा रक्षकांची दैनंदिन जीवनात काय समस्या असतात त्याचे दर्शन होईल.
बाकी दोन्ही मार्गावर हवाई वाहतूक उपलब्ध आहे.उतारवयातील भावीकांना खुपच सोईचा मार्ग आहे.शारीरिक व अर्थिक क्षमते नुसार निर्णय घ्यावा. समुद्रसपाटी पासुन जसे उंचावर जाऊ तशी प्राणवायूची कमतरता भासते व शरीरावर प्रतीकूल परीणाम होण्याची दाट शक्यता आसते.
जनश्रुती प्रमाणे भगवान शंकराने अमरकथा फक्त एकट्या माता पार्वतीला सांगायची होती म्हणून आपले सर्व संगी साथी पाठिमागे सोडले.वाहन नंदीला जीथे सोडले ते बैलगाव (पहलगाम), चंद्राला चंदनवाडी मधे गळ्यातला सर्प ज्या तलावात सोडला ते शेषनाग,मंगेश पर्वतावर गणेशाला तर पंचतरणी मधे पंच महाभुतांना सोडले.एकट्या माता पार्वतीला गुफे मधे अमरकथा सांगीतली.एवढी काळजी घेऊनही कबुतराच्या जोडप्याने कथा ऐकली व ते अमर झाले.असे म्हणतात ते शुभ्र कपोत,कपोती पुण्यवान लोकांना दिसतात.
अमरनाथ यात्रा शिव भक्तांचे स्वप्न, तर स्थानिक लोकांचे मुख्य उपजीवीकेचे साधन.वर्षातील नऊ महिने बर्फाच्छादित असल्यामुळे धन-धान्य कमीच उगवते.येणाऱ्या यात्रेकरूनां विवीध सोई पुरवणे हाच मुख्य व्यवसाय.बाकी शेळ्या मेंढ्या पालन हा जोडधंदा. इच्छुक भाविक मोबदला देऊन बकरवाल व हिन्दू गुज्जर लोकांकडून तट्टू व डोली, पालखी घेऊ शकतात.
*****
यात्रेचा कालावधी,पहलगाम वरून पाच दिवस तर बालटाल वरून दोन दिवसाचा आहे.जागोजागी धर्मदाय संस्थाचे विनामूल्य लंगर भाविकांची खाण्या पिण्याची व्यवस्था करतात. राज्य पोलीस दल व सुरक्षारक्षक यात्रा सुचारू होण्या साठी दिवसरात्र सजग,सतर्क असतात.
*****
वाढणारी यात्रेकरूंची संख्या लक्षात घेत राज्य सरकारने सन दोन हजार मधे "श्री अमरनाथ जी श्राईन बोर्ड", स्थापन केले.बोर्डचे मानद अध्यक्ष महामहिम राज्यपाल आहेत.बोर्ड यात्रेकरूंचे नियंत्रण,सुरक्षा,वैद्यकीय मदत,रहाण्याची सोय,रस्त्याची देखभाल इत्यादी गोष्टी करता जबाबदार आहे.यात्रेसाठी नाव नोंदणी जम्मू मधे करावी लागते. आता यासाठी बोर्डाची स्वतंत्र वेबसाईट आहे.
http://www.shriamarnathjishrine.com/
********************
नोंदणी केलेले यात्रेकरूंचे जथ्थे नियंत्रित करून पुढे रवाना होतात. यात्रेबद्दलची सर्व माहीती,नोंदणी आणी हवाई यात्रेच्या आरक्षणाची सोय सुद्धा या वेबसाईटवर आहे. आता लाखो भाविक यात्रेसाठी नोंदणी करतात. चित्र आता दोन्ही मार्ग नागरीकां साठी खुले आहेत. त्या वेळेस यात्रेच्या संपुर्ण कालावधीत आठ ते दहा हजार यात्री श्रीनगरमधे नाव नोंदणी करून यात्रेसाठी रवाना होत होते.दररोज २५०-३०० यात्री पण आज दररोज पंधरा हजार भाविक (प्रत्येक मार्गावरून ७५००) दर्शना साठी जम्मूवरून रवाना होतात.
पुढील भाग लवकरच........
प्रतिक्रिया
17 Aug 2022 - 11:12 am | शाम भागवत
मस्त!
17 Aug 2022 - 1:47 pm | कर्नलतपस्वी
शाम भागवत जी धन्यवाद.