चालू घडामोडी -श्रीलंका अराजक

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in राजकारण
9 Jul 2022 - 2:36 pm

आत्ताच आलेल्या बातमीनुसार श्रीलंकेत जनतेने उठाव केला आहे.
राष्ट्रपती गोताभये हे राष्ट्रपतीभवनातून पळून गेले आहेत. जनतेने राष्ट्रपतीभवनात घुसून तेथला ध्वजही उखडून टाकला आहे. तिथे जनतेचा कब्जा झालेला आहे.
जनतेने गॉल मधे चाललेले श्रीलंका ऑस्ट्रेलिया मॅचही स्टेडियम मधे घुसून बंद केली आहे.
श्रीलंकेकडे परकीय चलन अजिबात शिल्लक नाही , ( चीनच्या कृपेने). त्याना कोणी कर्जही देण्यास तयार नाही.
या गोष्टीचा भारतावर नक्कीच परिणाम होणार आहे.
श्रीलम्केसारखा जवळचा देश अराजकतेचा सामना करतोय. जनता रस्त्यावर उतरलेली आहे. यात तरुणांचा जास्त सहभाग आहे.
सनथ जयसूर्या या जनतेचे नेतृत्व करायला पुढे आलेला आहे.
परिस्थिती दर तासातासाला अधीकच वाईट होत चालली आहे

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

9 Jul 2022 - 5:33 pm | श्रीगुरुजी

निदर्शक येण्यापूर्वीच अध्यक्ष राजप्रासादातून पळाले. निदर्शकांनी राजप्रासादात ठिय्या मारलाय. श्रीलंका-ऑस्ट्रेलिया कसोटी सामना व्यवस्थित सुरू आहे.

चीनच्या नादी लागून भरमसाट कर्ज घेऊन श्रीलंकेने स्वत:ची वाट लावून घेतलीये. अर्थात श्रीलंका भालताविरूद्ध जाण्यास भारत सुद्धा कारणीभूत आहे. १९८० च्या दशकात भारताने लिट्टेला पाठिंबा दिला नसता, नंतर शांतीसेना वगैरे पाठविली नसती तर श्रीलंकन जनतेत भारताविरूद्ध अविश्वास निर्माण झाला नसता व श्रीलंका चीनकडे झुकला नसता.

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Jul 2022 - 6:51 pm | अमरेंद्र बाहुबली

१९८० च्या दशकात भारताने लिट्टेला पाठिंबा दिला नसता, नंतर शांतीसेना वगैरे पाठविली नसती तर श्रीलंकन जनतेत भारताविरूद्ध अविश्वास निर्माण झाला नसता व श्रीलंका चीनकडे झुकला नसता.
श्रिलंकेतील तमीळांना मरू देण्यापेक्षा लंकन लोकांना फटकारून काढले हे खुप चांगले केले. लिट्टेला पाठिंबा देऊन नंतर तमीळ बहूस भाद भारतास जोडून घ्यायला हवा होता. शांतीसेना पाठवणे हा मुर्खपणा होता. तमीळ बंडखोरांमागे देशाने शेवटपर्यंत ठामपणे ऊभे रहायला हवे होते.

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Jul 2022 - 7:18 pm | अमरेंद्र बाहुबली

१९८० च्या दशकात भारताने लिट्टेला पाठिंबा दिला नसता, नंतर शांतीसेना वगैरे पाठविली नसती तर श्रीलंकन जनतेत भारताविरूद्ध अविश्वास निर्माण झाला नसता व श्रीलंका चीनकडे झुकला नसता.
श्रिलंकेतील तमीळांना मरू देण्यापेक्षा लंकन लोकांना फटकारून काढले हे खुप चांगले केले. लिट्टेला पाठिंबा देऊन नंतर तमीळ बहूस भाद भारतास जोडून घ्यायला हवा होता. शांतीसेना पाठवणे हा मुर्खपणा होता. तमीळ बंडखोरांमागे देशाने शेवटपर्यंत ठामपणे ऊभे रहायला हवे होते.

श्रीगुरुजी's picture

9 Jul 2022 - 7:40 pm | श्रीगुरुजी

पंतप्रधान विक्रमसिंघेंनी राजीनामा दिला.

राघव's picture

9 Jul 2022 - 10:54 pm | राघव

पण या अनुषंगानं एक विचारावंसं वाटतं -

पैशाचं चक्र सुरू होण्यासाठी उत्पादन होणं आणि ते विकत घेतल्या जाणं दोन्ही गरजेचं असतं.
सद्यपरिस्थिती प्रमाणे, कोणत्याही कारणानं का होईना, या दोन्ही गोष्टी श्रीलंकेत अशक्य बनलेल्या आहेत.
अशा परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी एक देश म्हणून काय करतात? यातून निघण्यासाठी काय मार्ग असतात?

श्रीगुरुजी's picture

9 Jul 2022 - 11:10 pm | श्रीगुरुजी

जागतिक बॅंक किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्याकडून दीर्घ मुदतीचे अल्प व्याजदराने कर्ज मिळू शकते. अर्थात कर्ज देताना ते काही अटी घालतीलच.

बहुवार्षिक योजना सुरू कराव्या लागतात.
१)पूर्वी या देशात रत्ने मिळत. आणि२) मुख्य म्हणजे दालचिनी,मिरी,लवंग. दालचिनी अरब व्यापारी नेऊन इजिप्तला विकत. ममी करण्यासाठी लागत असे. या मसाला आणि रत्नांतून पैसे मिळत आणि ते त्या काळच्या राहणीमानानुसार भरपूर असत. ४)ब्रिटिश वसाहतीतून चहा वाढला.
५)बुद्ध धर्माची महत्वाची जागा, हिंदु प्रभावाने चित्रांची गुहा 'सिगिरिया' यामुळे परदेशांतून इथे पर्यटन सुरू झाले आणि इन्कम वाढला. या उद्योडात हॉटेल, वाहतूक वाढली. पण कोरोनाने घात केला.

मसाला पिके आणि चहा व्यापारात इतर बरेच देश आहेत. म्हणजे धार्मिक पर्यटनावरच भर होता.

काही दुसरे कमाईचे उद्योग शोधणे आले.आपल्याटडील केरळ आणि श्रीलंकेत बरेच साम्य आहे. वनांची आणि पाण्याची हानी करणारे रासायनिक उद्योग नाहीत. पण केरळचे लोट परदेशात नोकऱ्या करून बराच पैसा देशात पाठवतात. पैसा आला की इंधन विकत घेता येतं. पर्यटन आहेच.

आता कर्ज घेणे उपयोगाचे नाही. आणि खड्ड्यात जात राहतील.

शेर भाई's picture

10 Jul 2022 - 11:56 am | शेर भाई

आपण भले हि वसुधैव कुटुंबकम म्हणत असू, पण जेव्हा जागतिक आरोग्य संघटना धन दांडग्यांसमोर शरणागती पत्करते तेव्हा विश्वास कोणावर ठेवावा ??
एक लेख:
https://www.msn.com/en-in/news/other/sunday-special-how-india-foiled-pre...

Nitin Palkar's picture

10 Jul 2022 - 7:08 pm | Nitin Palkar

तुम्ही दिलेल्या दुव्याला अनुलक्षून माझे मत....
WHO, UNO,UNESCO, UNICEF, UNCTAD इत्यादी सर्व संस्था केवळ आणि केवळ अमेरिकेचेच हित जपण्याचे काम करतात.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Baap Pandurang | Marathi Rap Song | Khaas Re TV

विवेकपटाईत's picture

10 Jul 2022 - 2:57 pm | विवेकपटाईत

करोंना फटका जगाला बसला आहे. अमेरिका सारख्या देशात ही महागाई 8 टक्केपेक्षा वाढली आहे. श्रीलंकेत पेट्रोल होत नाही, अन्न उत्पादन ही कमी. पर्यटन मुख्य व्यवसाय. तिथे मीडिया विदेशी नियंत्रणात आहे (भारतात ही हीच परिस्थिति आहे), विदेशी फंडिंग एनजीओ आगीत तेल ओतत आहे (भारतात ही अधिकान्श आंदोलन विदेशी फंडिंग वर होतात). स्वार्थी राजनेता सत्तेसाठी अराजकतेला प्रोत्साहन देत आहे. परिणाम तिथली परिस्थिति चिघळत आहे.
तामिळ आणि सिंहली सघर्ष हा तिथल्या इतिहासाचा भाग आहे. कितीही मैत्री असली तरी भारत चीन पासून श्रीलंकेला दूर नेण्यासाठी अब्जावधी रुपये तिथे गुंतवू शकत नाही. चीन ही तिथल्या मीडिया, एनजीओ आणि नेत्यांना खिशयात ठेऊन भारत विरोधी प्रचार करत राहणार.
बाकी आज श्रीलंकेला अराजक आंदोलन कठोरतेने दाबून शांति प्रस्थापित करून पुन्हा उद्योग आणि पर्यटनाला चालना देण्याची क्षमता असलेला नेत्याची गरज आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Jul 2022 - 3:35 pm | अमरेंद्र बाहुबली

भारतात ही अधिकान्श आंदोलन विदेशी फंडिंग वर होतात
असा आरोप भाजपेतर पक्षांनी आंदोलन केले तर करायचा असतो.ऊदा. काळ्या कृषी कायद्यांवीरोधातील आंदोलन, पेट्रोल दरवाढ विरोधी आंदोलन.
स्वयंस्फूर्तीने, देशभक्तीची आंदोलनं म्हणजे अन्ना हजारे, बाबा रामदेव ह्यांची.

सचिन धुमाळ's picture

11 Jul 2022 - 9:32 am | सचिन धुमाळ

हे कृषि क़ायदे जर इतके काले होते तर फक्त पंजाब मध्येच का झाले आंदोलन? महाभिकार आघाड़ी सरकार असून पण महाराष्ट्र मध्ये फारसा काही घडलेच नाही. AC मध्ये बसून ४-६ महीने कुठला शेतकरी आंदोलन करेल? मावळ मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनातील गोलीबार सोईस्कर विसरलात.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Jul 2022 - 9:47 am | अमरेंद्र बाहुबली

हे कृषि क़ायदे जर इतके काले होते तर फक्त पंजाब मध्येच का झाले आंदोलन?
फक्त भाजप आयटी सेलच्या बातम्या वाचनेयाचा परिणाम.
खालील बातमी पहा. महाराष्ट्रातही आंदोलन झालंय.
https://www.bbc.com/marathi/india-55169032.amp

महाभिकार आघाड़ी सरकार असून पण

महाभिकार नाही हो. महाविकास. महाभिकार सरकार पहायचं असेल तर मोदी सरकार पहा.

विवेकपटाईत's picture

11 Jul 2022 - 11:28 am | विवेकपटाईत

रामदेव बाबांचे आंदोलन आणि अण्णा आंदोलन स्वयं प्रेरित होते. सरकारने MNC दबावाखाली पतंजलि वर शेकडो केसेस केल्या नसत्या तर बाबांनी आंदोलन केले ही नसते.. रामलीला मैदान घटने नंतर बाबांनी सत्ता परिवर्तनासाठी देशभर दौरा केले. रस्त्यावर उतरले नाही. संघटनेला मजबूत केले. अण्णाला ही सत्याचा परिचय आला की मागे अराजक भीड एकत्र होत आहे.त्यांनी आंदोलन मागे घेतले. मनमोहन सरकारने विदेशी फंडिंगचा हिशोब न देणाऱ्या संघटनांवर कारवाई सुरू केली.

१. भारतात शेतकरी कायद्यांना ८५ टाके शेतकरी संघटनांचे समर्थन होते. आंदोलनात शेतकरी नव्हते यावर्षी पंजाबातील ही शेतकऱ्यांनी जास्त धान्य निजी क्षेत्रात विकले आहे.
२. दिल्ली बॉर्डरवर खालिस्तान समर्थनात रोज नारे लागत होते व्हिडिओ पाहू शकतात.
३. पंजाबात रस्त्यांवर मोठया प्रमाणात जागोजागी सिमेंटचे चौथरे वांधलेले दिसतील. बांगलादेशी मोठ्या प्रमाणात तिथे शरण घेत आहे.
४.शिखांना खालिस्तानचे गाजर दाखवून इस्लामी राज प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे.
भाजप आयटी सेल कुठे आहे त्याच्या बातम्या कुठे प्रकाशित होतात माहित नाही.बाकी सर्व मराठी वर्तमान पत्र फेकमत ते फेक रात्र दिवस रात्र प्रधानमन्त्री विरुद्ध गरळ ओकत राहतात. मराठी समाचार वाहिनीं बाबत बोलणेच व्यर्थ.

विवेकपटाईत's picture

11 Jul 2022 - 11:28 am | विवेकपटाईत

रामदेव बाबांचे आंदोलन आणि अण्णा आंदोलन स्वयं प्रेरित होते. सरकारने MNC दबावाखाली पतंजलि वर शेकडो केसेस केल्या नसत्या तर बाबांनी आंदोलन केले ही नसते.. रामलीला मैदान घटने नंतर बाबांनी सत्ता परिवर्तनासाठी देशभर दौरा केले. रस्त्यावर उतरले नाही. संघटनेला मजबूत केले. अण्णाला ही सत्याचा परिचय आला की मागे अराजक भीड एकत्र होत आहे.त्यांनी आंदोलन मागे घेतले. मनमोहन सरकारने विदेशी फंडिंगचा हिशोब न देणाऱ्या संघटनांवर कारवाई सुरू केली.

१. भारतात शेतकरी कायद्यांना ८५ टाके शेतकरी संघटनांचे समर्थन होते. आंदोलनात शेतकरी नव्हते यावर्षी पंजाबातील ही शेतकऱ्यांनी जास्त धान्य निजी क्षेत्रात विकले आहे.
२. दिल्ली बॉर्डरवर खालिस्तान समर्थनात रोज नारे लागत होते व्हिडिओ पाहू शकतात.
३. पंजाबात रस्त्यांवर मोठया प्रमाणात जागोजागी सिमेंटचे चौथरे वांधलेले दिसतील. बांगलादेशी मोठ्या प्रमाणात तिथे शरण घेत आहे.
४.शिखांना खालिस्तानचे गाजर दाखवून इस्लामी राज प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे.
भाजप आयटी सेल कुठे आहे त्याच्या बातम्या कुठे प्रकाशित होतात माहित नाही.बाकी सर्व मराठी वर्तमान पत्र फेकमत ते फेक रात्र दिवस रात्र प्रधानमन्त्री विरुद्ध गरळ ओकत राहतात. मराठी समाचार वाहिनीं बाबत बोलणेच व्यर्थ.

कपिलमुनी's picture

12 Jul 2022 - 12:25 am | कपिलमुनी

आपले ते स्वयं प्रेरित दुसऱ्याचे ते विदेशी स्पॉन्सर...

तर फक्त पंजाब मध्येच का झाले आंदोलन?
कारण सरळ आहे कि हे देशव्यापी आंदोलन नव्हातेच मुळी .. केवळ केंद्रसरकारला विरोध + शिखांना हिंदूंपासून वेगळे करण्याच्या वैश्विक क्लुप्त्यांपैकी एक
शेतकरी काय फक्त पंजाबात असतो काय ?
अहो मी बघितलंय त्यावेळी परदेशी शहरातील दिवाळी च्या सार्वजनिक कार्यक्रमात ,भारतातील जवळ जवळ सर्व राज्ययातील मंडलानी छोटे छोटे कार्यक्रम सादर केले त्यात फक्त शिखानच्याच टोळीने याचा उल्लेख केला .. शिवाय मांडवाचं बाहेर पाट्या धरून कोण उभे हिते फक्त शीख... ! का ?
असते एवढे दाहक आंदोलन तर येथे राहणारे कन्नड , ओदिशी, बंगाली . मराठी का नवहते धरून हातात पाट्या

सगला नुसता कांगावा

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Jul 2022 - 9:56 am | अमरेंद्र बाहुबली

आय टी सेलच्या बातम्या वाचण्याचा परिणाम. पुर्ण भारतभर आंदोलनं झालीत.
शिखांना हिंदूंपासून वेगळे करण्याच्या वैश्विक क्लुप्त्यांपैकी एक व्वा. काय लाॅजीक.

सचिन धुमाळ's picture

11 Jul 2022 - 10:42 am | सचिन धुमाळ

खलिस्तानी दहशतवाद्यान कड़ून एका पंतप्रधानांची हत्या होऊन सुद्धा तुम्हाला असचं वाटतं? ISI ची मदत घेणे, canada च्या PM ना आंदोलनाला पाठिंबा द्यायला लावणे. हे बहुतेक तुमच्या सखोल वाचनातून सुटले असावे. असो पण कसेही असेना तुम्हीं IT सेल च्या बातम्या वाचताय हे वाचुन बरे वाटले, हरकत नाही ही तुमची योग्य दिशेने सुरवात आहे.

चौकस२१२'s picture

11 Jul 2022 - 2:34 pm | चौकस२१२

व्वा. काय लाॅजीक.
हो का .. मग या प्रश्नच उत्तर द्या
- जर प्रामाणिक "शेतकरी आंदोलन " होते तर त्यात शीख धर्माचा झेंडा का? काहीच कारण नाही?
- भारताबाहेर बहुतेक करून शिकच का यात निदर्शने करीत होते -
- आंदोलन देशभराचे होते तर मग येथे ( ऑस्ट्रेल्यात ) गुरुमुखीतून पाट्या का होत्या? एकतर येथील भाषा इंग्रजी म्हणून इंग्रजीतून किंवा जास्तीत कीअसत भारतातातील प्रमुख भाष्य = हिंदी = तामिळ यातून तरी पाहिजे होत्या ना
- डिवलाईचं कार्यक्रमात जसे पंजाब मधील शीख शेतकऱ्यांना सहानुभूती द्यायला येथील शीख निदर्शने करीत होते तसेच मराठी/ कन्नड / तामिळ शेतकऱ्यांचे येथील मीटर का नव्हते फेंट आणि लुंगी सरसावून निदर्शने करताना दिसले ?

उगाच शेंडी लावणं आणि कांगावा बस झाला

प्रत्यक्ष शेतकरी विरोधी काय होते ते सांगा तर बोलू नाही तर हागल्या पडलेला मोदी जबाबदार हे तुमचे तुणतुणे खूप ऐकले

आणि तुम्हाला जर असे वाटत असेल कि जगभर हिंदूंचायत फूट पाडण्यासाठी शीख विरुद्ध हिंदू , अशी भांडणे लावणे हे "उद्योग" काही लोक करीत नसतात तर आपण जाणीवपूर्ण आंधळे असे म्हणेंन

दर १५ ऑगस्ट ला कानडा ता आणि इंग्लडात जरा डोळे उघडून बघ्ह काय चाललंय ते ! कोण भारताविरुद्ध आंदोलन करता ते ( भाजप असताना आणि काँग्रेस असतानां पण )

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Jul 2022 - 9:15 pm | अमरेंद्र बाहुबली

- जर प्रामाणिक "शेतकरी आंदोलन " होते तर त्यात शीख धर्माचा झेंडा का? काहीच कारण नाही? ट्रम्प समर्थकानी व्हाईट हाऊस वर हल्ला केला त्यावेळी भारताचा झेंडाही होता. मग पुर्ण भारत देशाला जबाबदार धराल का?? किती टोकाचा तो शिखद्वेष.

सुक्या's picture

11 Jul 2022 - 9:25 pm | सुक्या

ऑ?
कधी ?? कुठे? कसाकाय?
काही पुरावा / फोटो? की उगाच फुसुकल्या ?

सुक्या's picture

11 Jul 2022 - 9:35 pm | सुक्या

हायला खरं आहे राव.
बाकी तिथे साउथ कोरेया / जपान वगेरे वगेरे पण होते .. पण असो .. पण त्याने भारताचा सहभाग होता हे कुणी मुर्खच म्हणेल ..

ईतर बाबतीत आपला पास ..

चौकस२१२'s picture

12 Jul 2022 - 4:32 am | चौकस२१२

ओह भाऊ शीख द्वेष वैगरे काही नाही साधा तर्क आहे ( तो अक्षकही खातात हे तुमहाला माहिती आहे कि नाही कोण जाणे )
ठीक आहे कि धरून चालू हे आंदोलन पूर्ण योग्य होते .. आणि असेही धरून चालू पूर्ण देशभरच्या शेतकऱ्यांचे होते .. मग हे सांगा कि त्यात कोणताच धार्मिक झेंडा घेण्याचा संबंध काय ???

उद्या समजा गोव्यातील शिक्षकांचे आंदोलन आहे आणि आणि असेही धरून चालू कि त्यातील ५०% पेक्षा अधिक हे हिंदू आहेत आणि त्यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री ख्रिस्ती आहेततर त्या अनोलनात हिंदू धर्माचा कोणतेही चिन्ह वापरण्याचे काहीच कारण नाही असेही मी म्हणेन
कारण हे आंदोलन ( अजर प्रामाणिक असेल) तर ते
- गोव्याचे शिक्षक आणि गोव्याचे सरकारने केलेले जाचकल कायदे असे आहे
आणि प्रामाणिक नसेल तर त्याला गोव्याचे हिंदू शिक्षक विरुद्ध गोव्याचे ख्रस्ती सरकार असे दाखवले जाईल

बाहुबली साहेब जरा बघा जगभर हिंदू आणि शिखांचायत फूट पडणे हे वर्षानुवर्षे चालू आहे ....

बहुतेक हिंदूंना अजूनही शिखांबद्दल आदरच आहे पण अति जर व्हायला लागला तर हा "भाईचारा" गेलं चुलीत असेच म्हणावेसे लागत .. त्यात मुद्डमून असा शीख द्वेष असा काही नाही

चौकस२१२'s picture

11 Jul 2022 - 2:39 pm | चौकस२१२

सगळ्यानं "भक्त" आणि "आय टी सेल" चे गुलाम वैगरे लेबले चिकटवून तुमची सुटका होत नाही बाहुबली !
अर्थात ते तुमचं टूल किट मध्ये आहे त्याला कोण काय करणार म्हणा

जरूर सरकारला धारेवर धारा, भाजपला कधी मत देऊ नका पण असले बिनबुडाची वक्तवये करून फुकटचा ......

सुक्या's picture

11 Jul 2022 - 11:52 am | सुक्या

सगला नुसता कांगावा

सहमत. ते आंदोलन शेतकर्‍यांचे नव्हतेच मुळी. ते आंदोलन परदेशी फंडिंग वर नव्हते वगेरे बाता जे लोक मारतात त्यांना त्या आंदोलनाचा खाण्यापिण्याचा जो लंगर १२ महिने अहोरात्र चालला त्याला कॅलिफोर्निया स्थित एका गुरुद्वारा चे फंडिंग होते हे माहीत नाही काय? बाकी वँकुव्हर ला गेलो की तेथिल गुरुद्वारा मधे दर्शन घेउन लंगर मधे जेवणे हा नियमीत क्रम होता ... आता त्याला आंदोलन / एक लोकशाही देश विरोधी कारवाईचा वास यायला लागल्या पासुन तीकडे फिरकत्च नाही.

बाकी या आंदोलनावरुन भारताला उपदेशाचे डोस पाजनारा ट्रुडो त्याच देशात ट्रक ड्रायव्हर लोकांचे आंदोलन झाले तेव्हा पार्श्वभागाला पाय लाउन पळाला होता ...

चौकस२१२'s picture

11 Jul 2022 - 2:46 pm | चौकस२१२

"कॅलिफोर्निया स्थित एका गुरुद्वारा चे फंडिंग होते "
हो ना
भर सभेत हजारोंच्या संख्येत शांतपणे हिंदू जनता आपला दिवाळी ( ते सुद्धा ख्रिस्ती बहुल देशाचं सरकारचं खर्चाने ) साजरा कऱ्याला कुटुंबासमवेत आली होती तेव्हा हे "ह ....... खोर " पगडी वालेच फक्त निषेध करीत होते इथे .. आपलं तर टाळकं सटकलं ...

म्हणे शेतकरी ... घंटा (देवळातली ) वाजवा म्हणावं ...

त्यादिवशी शिंखं बदल चा उरलेला आदर पण नाहीसा झाला ...
परत कधी गुरुद्वारात जाणार नाही
पण त्यांना तरी काय तोंडानें दोष देणार आपण हिंदूच नपुंसक आहोत ना

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Jul 2022 - 9:20 pm | अमरेंद्र बाहुबली

आली होती तेव्हा हे "ह ....... खोर " पगडी वालेच फक्त निषेध करीत होते इथे ज्या राज्यातील घराघरातून एक व्यक्ति सैन्यात आहे. त्यांची देशभक्ती जगात नावाजली जाते त्या पगडीवाल्याना ह.. खोर म्हणताना जनाची नाहीतर मनाची तरी वाटायला हवी.
पण त्यांना तरी काय तोंडानें दोष देणार आपण हिंदूच नपुंसक आहोत ना आम्ही हिंदू बांधव शिख धर्मीयांचा संत नामदेवांच्या काळापासून आदर करत आलो आहोत. शिखांबद्दल आम्हा हिंदूच्या मनात किंचीत ही द्वेष नाही. पण शिखांवविरोधात हिंदू धर्माचं ढोंग करून कुठला पक्ष ऊभा राहत असेल तर आम्ही शिखांच्या खांद्याला खांदा लावून लढू नी त्या पक्षाला औरंगजेबाचंससैन्य जसं नातूत मिसळवलं तसं मिसळवू.
शिखांना घाबरून शेवटी काळे कायदे मागे घ्यावेच लागले ना? शिंखांशा वाकडं त्याचे नदीवर लाकडं. :)

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Jul 2022 - 9:20 pm | अमरेंद्र बाहुबली

आली होती तेव्हा हे "ह ....... खोर " पगडी वालेच फक्त निषेध करीत होते इथे ज्या राज्यातील घराघरातून एक व्यक्ति सैन्यात आहे. त्यांची देशभक्ती जगात नावाजली जाते त्या पगडीवाल्याना ह.. खोर म्हणताना जनाची नाहीतर मनाची तरी वाटायला हवी.
पण त्यांना तरी काय तोंडानें दोष देणार आपण हिंदूच नपुंसक आहोत ना आम्ही हिंदू बांधव शिख धर्मीयांचा संत नामदेवांच्या काळापासून आदर करत आलो आहोत. शिखांबद्दल आम्हा हिंदूच्या मनात किंचीत ही द्वेष नाही. पण शिखांवविरोधात हिंदू धर्माचं ढोंग करून कुठला पक्ष ऊभा राहत असेल तर आम्ही शिखांच्या खांद्याला खांदा लावून लढू नी त्या पक्षाला औरंगजेबाचंससैन्य जसं नातूत मिसळवलं तसं मिसळवू.
शिखांना घाबरून शेवटी काळे कायदे मागे घ्यावेच लागले ना? शिंखांशी वाकडं त्याचे नदीवर लाकडं. :)

त्यावेळी भारतीय सेना पाठवणे हे धोरणामक दृष्ट्या योग्यच होते .. दुसरा कोणीतरी येऊन बसण्यापेक्षा आपण गेलेलं बरे हे साहजिक आहे

श्रिलम्केतील परिस्थिती पहाता तेथे पहिली गोष्ट म्हणजे कोणीतरी जबाबदार स्थिर सरकार असणे
हे झाले तर बेल आउट पॅकेज वगैरे देता येईल.
पॅकेज देताना काही भाग वस्तु रूपात द्यावा लागेल. अन्यतः पॅकेजचा मोठा भाग चीन चे कर्ज फेडण्यातच निघून जाईल

श्रीलंकेच्या परीस्थिती पहाता अरब स्प्रींगची आठवण झाली.

डँबिस००७'s picture

11 Jul 2022 - 1:22 pm | डँबिस००७

अरब स्प्रींग मध्ये भरडल्या गेलेल्या देशातले सगळेच देश अजुनही अव्यवस्थेच्या गर्तेत आहेत. आजुबाजुचे देश अश्या देशांचे लचके तोडायला, नॅचरल रीसोर्सचे शोषण करायलाच बसलेले असतात. चिन अश्यापैकीच आहे. सध्या चिन स्वःता कठीण आर्थिक परीस्थितीतुन जात असल्याने श्री लंके विषयी काय धोरण आखत असेल ?
राजकारणाची, सरकारी नोकरशाहीचा चांगला अनुभव असलेला नेताच श्री लंकेला तारुन नेउ शकतो.

चीन ने सर्वत्र इतकी गुंतवणूक केली आहे की ते त्याची वसुली कशी करणार आहेत तेच समजत नाही.

श्रीगुरुजी's picture

11 Jul 2022 - 2:08 pm | श्रीगुरुजी

त्या त्या देशाचा एखादा भूभाग, एखादे बंदर ताब्यात घेऊन चीन कर्जवसुली करते. उद्या पाकिस्तानने कर्ज फेडले नाही तर पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीर चीनला द्यावे लागेल.

पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीर चीनला द्यायला तयार आहेच, चीनच्या ग्वादर पोर्टच्या कनेक्टीव्हीटीसीठी पाकव्याप्त काश्मीर चीनला हवाच आहे.
चीनने पाकीस्तानात ग्वादर पोर्टशिवाय बरेच पावर प्लँटस ऊभारलेले आहेत त्यावरचा हक्क चीन सोडणार नाही.

चौकस२१२'s picture

11 Jul 2022 - 2:48 pm | चौकस२१२

हो बरोबर गुरुजी .. चीनने आर्थिक जागतिक युद्ध कधी पासूनच पुकारले आहे ... इन्फ्रा मार्फत .. पूर्वी अमेरिकेने काही देशांबरोअबर असे " फिनान्शिअल वार फेअर " केलं आहे

कानडाऊ योगेशु's picture

11 Jul 2022 - 3:44 pm | कानडाऊ योगेशु

उद्या पाकिस्तानने कर्ज फेडले नाही तर पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीर चीनला द्यावे लागेल.
असं कसं होऊ शकेल.? पाकव्याक्त काश्मीर पाकिस्तानचा अधिकृत भाग नाहीच आहे. हे म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उदार असे काहीसे होईल. आणि तसे झालेच तर पाकिस्तानला नुकसानीतला फायदा होईल.

श्रीगुरुजी's picture

11 Jul 2022 - 5:30 pm | श्रीगुरुजी

पाकव्याप्त काश्मीरचा अंदाजे १० टक्के म्हणजे ५००० वर्ग किलोमीटर इतका भाग पाकिस्तानने खूप पूर्वीच चीनला दिला आहे. त्या भागात चीन बांधकाम करीत असल्याने भारताने अनेकदा आक्षेप घेतलाय. पण चीनने पूर्णपणे दुर्लक्ष केलंय. हेच कारण दाखवून भारताने चीनच्या Belt and Road Initiative या उपक्रमात सामील होण्यास नकार दिलाय कारण या उपक्रमांतर्गत बांधले जाणारे रस्ते पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Jul 2022 - 9:22 pm | अमरेंद्र बाहुबली

चिन चं नाव घ्यायला ही आपले कडीनिंदा फेम राजनाथसींग नी छप्पन ईंच छाती फेम मोदीजी तयार नाहीत.

चीनी सरकारी मालकीच्या बँका व्याजदर कमी करण्यापेक्षा वाढीव कालावधी आणि परतफेड कालावधी वाढवण्यास अधिक इच्छुक असतात. काहीवेळा तर परफेडीस वाढीव वेळ देण्यासाठी कर्जावरचे व्याजदर वाढवलेले ही दिसतात. म्हणजे दीर्घकालीन गुलामगीरी करुन घ्यायची त्या देशाकडून असा हा खेळ आहे. त्यामुळे त्यांना भूभाग आपल्याकडे घेण्यापक्षा त्या सरकारवर नियंत्रण आणून आपल्या पद्धतीने हवा तो भूभाग हवा तसा वापरून घेणे हे महत्त्वाचे आहे असे दिसते. मग पाक जनतेचा उठाव होत नाही. पण पाकवर नियंत्रण मात्र चीनचे राहते.

अमेरिकेचे धोरण युझ अँड थ्रो होते . पण चीनी धोरण युझ युझ युझ अँड नेव्हर थ्रो असे आहे.

विवेकपटाईत's picture

11 Jul 2022 - 6:05 pm | विवेकपटाईत

चीन आज जे करत आहे , ते नेहमीच महाशक्ती करतात. अमेरिकन कंपन्याची पद्धत वेगळी असते. बाकी श्रीलंकेच्या लोकांच्या विवेक बुद्धी सर्व अवलंबून आहे. भारतात तथाकथित शेतकरी आंदोलनाला हरियाणा आणि प. उत्तर प्रदेशच्या शेतकर्‍यांनी अंगूठा दाखविला आणि आंदोलन असफल झाले. या शिवाय टीकेतचे सत्तेची मलई खाण्याचे सर्व मनसुबे असफल झाले.

या अराजक परिस्थितीचा विचार करत होतो आणि अर्थात् मदतीला गूगल आहेच.
जरा सखोल बघताच इतके गुंतागुंतीचे मुद्दे लक्षात येतात की, मोठमोठे विश्लेषक आणिक काय काय विचारात घेत असतील देव जाणे..

अर्थव्यवस्था कोलमडणे म्हणजे खालील काही बाबी ठळकपणे दिसतात -
- मागणी आणि पुरवठा साखळी जवळपास उध्वस्त होणे
- उत्पादन साखळी उद्ध्वस्त झाल्याने कर्ज परतफेडीसाठी देशांतर्गत पैशाचे स्त्रोत बंद होणे
- कर्जाच्या फेर्‍यात अडकल्याने कितीही कर्ज काढलं तरी आधीचंच फेडण्यात ८०% पेक्षा जास्त पैसा खर्च होणे
- चलनाची किंमत जवळपास शून्य होणे
- मूलभूत गरजांच्या गोष्टींचा तुटवडा निर्माण होणे
- मूलभूत गरजा नसलेले सर्व व्यापार ठप्प होणे

राज्यव्यवस्था कोलमडणे म्हणजे खालील काही बाबी ठळकपणे दिसतात -
- राजकीय आणि प्रशासन व्यवस्था कोणतीही पावले न उचलू शकण्याच्या स्थितीत येणे
- देशांतर्गत आणि देशाबाहेरील सुरक्षेला थेट धोका निर्माण होणे [ स्थिती पोलीस/लष्कराच्या नियंत्रणाबाहेर जाणे, परकीय गुप्तहेरांचा सुळसुळाट होणे, इ. ]
- देशांतर्गत मिडियावर जरादेखील नियंत्रण न राहणे
- लोकांचा राजकीय / प्रशासनीक व्यवस्थेवरील विश्वास लयाला जाणे [ हे सर्वात वाईट ]

या काही बाबी झाल्यात. आणिकही बर्‍याच आहेत.. अशा परिस्थितीत कोणताही नेता येवो, त्याला/तिला ह्यातून मार्ग काढणे अतिशय जिकिरीचे होणार हे उघड आहे.
यातून मार्ग काढण्यासाठी अनेक स्तरांवरून लढावे लागेल. पण सर्वात् मुख्य म्हणजे लोकांचा ज्याच्यावर विश्वास आहे असा नेता उदयाला यावा लागेल. कारण थेट लोकसहभागा शिवाय यातून मार्ग निघणे शक्यच नाही. या स्थितीला देश येतो तेव्हा जवळपास मध्ययुगाच्या परिस्थितीपर्यंत मागे जातो. आणि तेच पचवणे जनतेला शक्य होत नाही.

जर असा नेता तयार झाला आणि बहुतांशी लोकं त्याला/तिला ऐकायला लागले तर काही मुख्य कामे -

- आणिबाणी जाहीर करणे, देशांतर्गत परिस्थितीवर श्वेतपत्रिका काढणे, विविध देशातील दुतावासांना विश्वासात घेऊन पुढील धोरण आखणे
- जागतीक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, मित्रदेश यांच्याकडून जेवढा शक्य होईल तेवढा पैसा उभा करणे, कडक ऑडीट मधे विनियोग करणे
- युनोत ठराव आणून त्यातून शक्य तेवढी अन्नधान्य+वैद्यकीय मदत मिळवणे, शक्य असल्यास बियाणे मिळवणे
- सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणणे आणि त्यांचा त्यांच्या प्रभागात सहभाग सुनिश्चित करणे, राजकारण काही काळ बाजूला ठेवण्यासाठी उद्युक्त करणे
- सर्व मिडियाला ज्या योजना सरकार बनवेल त्यावर सकारात्मक दृष्टीकोनातून देखरेख ठेवण्यास बाध्य करणे, गरज पडल्यास मिडियाला लष्कराच्या अधिकारात देणे, देशवासियांसोबत नियमीत संवाद साधणे
- देशांतर्गत भ्रष्टाचारी, परकीय गुप्तहेर यांच्यावर वेगाने आणि कठोर कारवाई करून ती लोकांपुढे आणणे
- सर्व प्रशासनाचा पगार अगदी गरजेपुरता मर्यादित करणे
- सर्व लोकांना पैशाचा उपयोग अगदी गरजेपुरता करण्यासाठी आवाहन करणे

राज्यव्यवस्थेवर पुन्हा विश्वास तयार करण्यासाठी ही आणि अशी अनेक पावले वेगाने उचलणे गरजेचे आहे. हा विश्वासच लोकसहभाग सुनिश्चित करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे.

आता परिस्थितीवर काम करण्याच्या दृष्टीकोनातून तीन प्रमुख भाग करावे लागतील - योजना आखणी, अंमलबजावणी आणि अर्थकारण.
- योजना आखणी मधे देशांतर्गत विविध तज्ञांना सामील करून त्यांना थेट उद्देश सांगावा लागेल/पटवावा लागेल. सगळ्या गोष्टींवर एकत्रीत योजना न आखता टप्प्या-टप्प्यानं योजना बनवाव्या लागतील.
- अंमलबजावणीत प्रशासनातील जाणकारांना उतरवावे लागेल. प्रत्येक राज्य-महानगर-तालुका-गाव याप्रमाणे लोकसहभाग तयार करावा लागेल. आणि त्यांना अंतर्गत निर्णयक्षमता द्यावी लागेल. हे संपूर्ण साखळी तयार करण्याचे अतिशय जटील काम युद्धपातळीवर हाती घ्यावे लागेल.
- या संपूर्ण प्रकाराची अत्यंत काटेकोर ऑडीट व्यवस्था ठेवावी लागेल. कारण पैशाचा विनियोग अत्यंत कमीत कमी आणि फार जागरूकपणे करणे भाग आहे.

या संपूर्ण प्रकारात पोलीस आणि लष्कर यांच्या सर्व प्रकारांच्या तुकड्यांचा संपूर्ण सहभाग लागेल, नव्हे तो अत्यावश्यक आहे. कारण लोकांचा रोष केव्हा भडकेल सांगता येत नाही.

बाकी पुढच्या टप्प्यांचा तर अजून विचारच करू शकलो नाही पण प्रथम टप्पा असा असू शकेल -
- मिळालेल्या कर्जाचा उपयोग देशांतर्गत मूलभूत गरजांच्या उद्योगांसाठी [ इलेक्ट्रीसिटी उत्पादन/मेंटेनन्स, मालवाहतुकीसाठी इंधन खरेदी, इ. ] करावा लागेल. अनेक उद्योग या टप्प्यात चालू होऊ शकणार नाहीत, कारण त्यांचे उत्पादनाला मागणी असली तरी लोकांजवळ पैसा नसल्याने ते तोट्यातच राहतील.
- अन्न आणि वैद्यकीय सुविधा या सर्वप्रथम प्राथमिकतेवर घ्याव्या लागतील. या परिस्थितीत, जेवढ्या लोकांना शक्य होईल तेवढ्या लोकांनी आपापल्या घरीच आपल्या गरजे पुरतातरी शेती करणे गरजेचे आहे. कारण इंधन नसल्यामुळे/ अत्यंत मोजके असल्यामुळे प्रत्येकाला धान्य पुरवणे सरकारला अशक्य असेल.
- प्रत्येक प्रभागातील शासकीय इमारती आणि हॉस्पीटल्स यांना वैद्यकीय बेसीक सुविधा मोफत पुरवण्यासाठी सेटअप करावे लागेल. पैसा नसल्याने लोकसहभागातून हे करणे भाग आहे. देशांतर्गत मेडीकल बॉडीजना यासाठी एकत्र यावे लागेल.
- तसा दुर्लक्षित असणारा प्रकार म्हणजे कचरा व्यवस्थापन. हे अशा परिस्थितीत फार महत्त्वाचे आहे, कारण जर अशा परिस्थितीत रोगराई पसरली तर... त्याबद्दल विचारच न केलेला बरा!

हुश्श... अजून कितीतरी जास्त काम असणार.. अनेक टप्पे असणार. यात अनेक मुद्दे सुटलेही असतील कदाचित.. जाणकारांनी भर घालावी. एक देश उभारणे आणि चालवणे याचा एक ओझरता अनुभव जरी आला तरी खूप झाले.
देशांतर्गत बाजारपेठ परत उभारणे हेच एक मोठे दिव्य असणार आहे, कारण परदेशी गुंतवणूक अशक्य असेल. हे कसे होऊ शकेल यावर विचार करायला हवा खरंतर.

आणि सर्व अगदी सुरळीत पार पडले तरीही कमीतकमी पुढची ५ वर्षेतरी लोकसहभाग टिकवून ठेवण्याचे पराकोटीचे कठीण काम येणार्‍या सरकारला करावे लागेल. :-)

इत्यलम्

निनाद's picture

12 Jul 2022 - 8:15 am | निनाद

तुमचा या चर्चेवरील हा प्रतिसाद समर्पक आहे. अर्थव्यवस्था कोलमडण्यासाठी दिलेले बिंदूगामी अगदी योग्य आहेत. राज्यव्यवस्था कोलमडण्यासाठी परकीय गुप्तहेरांचा सुळसुळाट हे तर आहेच. पण तो कदाचित आधीच झालेला असू शकतो. आणि त्यात त्यांनी आपले डीप असेटस, सरकार, मिडिया, एनजीओज आणि प्रशासनीक व्य्वस्थापनात घुसवलेले असतात. त्याचा उपयोग करूनच ही परिस्थिती आणली गेली आहे असे मला वाटते. उदा: प्रचंड गवगवा करून सरकार कडून रासायनिक खतांना कायदेशीर बंदीच घालून घेतली होती श्रीलंकेने. मग अन्नधन्य उत्पादन शक्यच झाले नाही. आणि सर्व आर्थिक भार अन्न आयातीवर गेला. रासायनिक खतांना कायदेशीर बंदी करा हा गवगवा एका एनजीओ ख्रिस्ती संघटनेकडून घडवून आणला होता असे म्हणतात. आणि त्याचे महत्त्वाचे लोक नंतर गायब झाले. (खखोदेजा!)
भारताथी अनेक एनजीओज बेकायदेशीर परकीय पैसा बंद केल्यावर फार नाराज आहेत. हा पैसा त्यांना कउठे खर्च करायचा आहे ते मात्र त्यांना सांगायचे नसते, हे खास!

असो तुमच्या मुद्देसूद प्रतिसादावर मीच विषयांतर केले त्याबद्दल क्षमस्व.

एक महत्त्वाचा मुद्दा यात राहून गेला आहे तो म्हणजे आणिबाणी जाहीर केल्यावर कोणत्याही मोठ्या सत्तेच्या हातातले खेळणे न बनण्यासाठी योग्य ती घटना दुरुस्ती करून घेणे.
(भारतात इंदिरा गांधींनी आणिबाणी जाहीर केल्यावर घट्नाच बदलून टाकली आणि भारत अचानक सेक्युलर देश झाला.)

डँबिस००७'s picture

12 Jul 2022 - 10:01 am | डँबिस००७

राघव आणि निनाद, उत्तम प्रतिसाद

सस्टेनेबल गाव ही भारतासारख्या देशाची खासियत होती. वाढत्या शहरीकरणातुन व त्यानंतरच्या जागतिकीकरणातुन गावातल्या सेल्फ सस्टेनींग ईको सिस्टीम लयाला गेली.

श्री लंकेतील लोकांना पुन्हा आपल्या मुळाकेडे परतावे लागेल. जितक्या लोकांकडे त्यांच्या मुळ गावात जमिनी आहेत त्या कसुन त्यावर जमेल तसे अन्न धान्य पिकवणे सुरु करावे लागेल. गावातील सर्व गावकर्यांना एकत्र आणुन एक सामाजीक बांधिलकी निर्माण करावी लागेल. शहरातुन लोक कमी झाल्याने शहरावरचा ताण कमी होईल. ईंधनाची मागणी कमी होईल. अन्न धान्य पिकवायला लागल्याने त्याची आयात करावी लागणार नाही. गावात रहायला गेल्याने तिथे विजेची पण बचत होईल.

ईतर देशाकडुन मदत घेण्यासाठी देशांतर्गत तज्ञ लोकांची कमिटी बनवुन पैश्याव्यतिरीक्त ईतर सामानांची जसे युरीया, ईंधन, औषधे अशी मदत घ्यावी लागेल व त्या वस्तुचे योग्य वितरण जनतेत करावे लागेल.

आग्या१९९०'s picture

12 Jul 2022 - 12:04 pm | आग्या१९९०

उदा: प्रचंड गवगवा करून सरकार कडून रासायनिक खतांना कायदेशीर बंदीच घालून घेतली होती श्रीलंकेने. मग अन्नधन्य उत्पादन शक्यच झाले नाही. आणि सर्व आर्थिक भार अन्न आयातीवर गेला. रासायनिक खतांना कायदेशीर बंदी करा हा गवगवा एका एनजीओ ख्रिस्ती संघटनेकडून घडवून आणला होता असे म्हणतात. आपले पंतप्रधान तरी वेगळं काय करत आहेत? तज्ज्ञ लोकांचे ऐकायचेच नाही.
https://www.agrowon.com/agriculture-latest-news/organic-farming-favors-g...

डँबिस००७'s picture

12 Jul 2022 - 2:01 pm | डँबिस००७

जय किसान आंदोलनाचे योगेंद्र यादव म्हणाले

अरेरे सर्वेज्ञ योगेंद्र यादव व राजु शेट्टी यांच्या म्हणण्यावर विसंबुन हा लेख लिहिला आहे त्याला सर्वांनीच पास द्यायला हरकर नाही.

आग्या१९९०'s picture

12 Jul 2022 - 3:43 pm | आग्या१९९०

योगेंद्र यादव हे सेंद्रिय शेती समर्थक आहेत तर राजू शेट्टी ह्यांनी स्वतःच्या अनुभवामुळे सेंद्रिय शेतीला सावध प्रतिक्रिया दिली आहे. उत्पन्न वाढत असेल आणि ते देशाच्या लोकसंख्येची भूक भागवू शकत असेल तर कोणीच सेंद्रिय शेतीला विरोध करणार नाही. श्रीलंकेने हात पोळून घेतले आहेत.