नायगारा धबधबा

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in भटकंती
8 Jul 2022 - 10:46 pm

mipa ** mipa

गोट बेटावर निकोल टेस्ला यान्चा पुतळा

mipa ** mipa

हायड्रो-एलेक्ट्रिक पावर

mipa ** mipa

नायगारा परिसर , आणी रेनबो ब्रिज

mipa**mipa

बोटीवरुन आणी जवळुन हाॅर्स शू फॉल्स

mipa**mipa

मेड ओफ द मिस्ट आणी मेड ओफ द मिस्ट थ्री सीस्टर्स बेटावरुन

mipa**mipa

व्हर्लपूल आणी फॉल्स टुगेदर. मेड ओफ द मिस्ट +हाॅर्स शू फॉल्स

mipa**mipa

हाॅर्स शू फॉल्स वेग वेगळ्या दिशेने

धबधबा रात्रीच्या प्रकाशात

mipa**mipa

mipa**mipa

mipa**mipa

आमेरीक आणी कनेडा निरीक्श्ण टावर

mipamipa
** mipa

काय पाहल

mipa**mipa

भारतीय होटल्स

mipa**mipa

देशी विदेशी जेवण्यची सोय आणी सिनेमा आणी सन्ग्राहालय

म्हणतात की ऋषीचे कुळ आणी नदीचे मुळ कधी शोधायला जाऊ नये पण ही गोष्ट अमेरिकेतील नायगारा नदीच्या बाबतीत खोटी ठरते.नदीचा उगमापासून ते मिलना पर्यतंचा सर्व प्रवास अगदी सुर्यप्रकाशा सारखा स्वच्छ दिसतो.या वर्षी पुन्हा अमेरिकेला जायचा योग आला आणी तेव्हांच ठरवले की प्रसिद्ध, प्रेक्षणीय, प्रवासी यादीतील "नायगारा फॉल्सला" जरूर भेट द्यायची.

mipa**mipa

मानचित्र -नदीचे मुळ बफेलो शहर

विकांता मधे न जाता आठवड्यात सोईस्कर दिवस बघून जायचे म्हणजे गर्दी कमी असेल आसे ठरले. राहात्या घरापासून साडे सहा-सात तासांचा प्रवास. गुगल मानचित्रावरून जाण्याचा रस्ता निश्चीत केला. दोन रस्ते उपलब्ध होते,एक कॅनडा मधून अडिच-तीन तासाचा व दुसरा अमेरिके मधून साडे सहा-सात तासाचा.चौकशी अंती आसे कळाले की कॅनडा मधून जायचे असेल तर तिकडचा प्रवासी व्हिसा पाहिजे.

अंदांज घेतला,केंव्हा निघायचे,केंव्हा पोहचणार,किती दिवस रहायचे, तेथील पर्यटन स्थळे इ.माहिती अंतरजालावर बघून झाल्या नंतर प्रश्न पुढे आला रहायचं कुठे ?

रहायचं कुठे ?

mipa**mipa

mipa**mipa

mipa**mipa

हवा बिस्तर आणी नाष्टा (Airbnb)

न्यूयॉर्कमधील नायगारा फॉल्स जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आसल्याने मोठी मोठी हाॅटेल्स तर आहेतच पण खुपच महागडी.शेवटी, तुम्हाला झोपायला जागा हवी आहे.

लेक ओंटारियो वर घर भाड्याने घेऊन राहू शकता.

नायगारा फॉल्स न्यूयॉर्कमध्ये राहण्यासाठी सर्वोत्तम अतिपरिचित क्षेत्र हे डाउनटाउन क्षेत्र आहे कारण ते बहुतेक आकर्षणांच्या अंतरावर आहे. तथापि, जर तुम्ही कमी गर्दीचे क्षेत्र शोधत असाल, तर तुम्ही उपनगरीय प्रदेशात सहज राहू शकता जे मुख्य आकर्षणांपासून काही मिनिटांच्या अंतरावर आहेत आणि खूप कमी खर्चिक आहेत.

नायगारा फॉल्स, न्यूयॉर्कमध्ये राहण्याच्या अनेक ठिकाणांपैकी सर्वात प्रसिद्ध 26 मजली सेनेका नायगारा रिसॉर्ट आणि कॅसिनो आहे, हे काउंटीचे एकमेव AAA चार-डायमंड पुरस्कार विजेते हॉटेल आहे.
निवडण्यासाठी आणखी शेरटन, मॅरीएट,हॉलिडे ईन,रॅडिसन सारखी बरीच हॉटेल्स आहेत, तसेच द बटलर सारखी आरामदायक बेड्स आणि ब्रेकफास्ट्स आहेत.

"आश्रम मोटेल" ,सारखी शंभर डाॅलर्स पर डे दराची, (नावावरून भारतीय असावे ) राहाण्याची सोय आहे.

तुमच्याकडे कार असल्यास आणि डाउनटाउन क्षेत्रापासून थोडे दूर राहण्यास हरकत नसल्यास, पूल आणि अविश्वसनीय दृश्यांसह या सुंदर घर भाड्याने घेऊन शकतो.

हाॅटेल्स,हवाई बिस्तर आणी नाष्टा (Airbnb) किवां मनोरंजन गाडी (Recreational Vehicle) अश्या वेगवेगळ्या सोई उपलब्ध आहेत.

कुतूहलापोटी अंतरजालावर खंगाळू लागलो आणी अपसुकच डोक्यात तुलनात्मक विचारांनी गोंधळ/थैमान घालायला सुरुवात केली. खाण्या पिण्याच्या सवयी,बरोबर लहान नातू त्याच्या खाण्या पिण्याच्या वेळा सवयी व वारंवार उठणारी चहाची तल्लफ यामुळेच महागड्या हाॅटेल्सच्या तुलनेत दुसरा पर्याय हवा बिस्तर आणी नाष्टा (Airbnb) जास्त सोयीस्कर व खिशाला परवडणारा वाटला. आमच्याकडे गाडी आसल्याने थोडे दुरचे ठिकाण निवडले. रहाण्याचे ठिकाण निवडताना "Area compromised"( गुन्हेगारी जास्त आसलेला) तर नाही ना व होम सिक्युरिटीज काय व्यवस्था आहे हे जरूर बघावे. Airbnb चे रिव्ह्यू आणी रेटिंग जरूर बघावे.

इथे सर्वच व्यवहार अंकात्मक (digital) त्यामुळे अंतरजालावर पैसे भरून रहाण्याचे ठिकाण निश्चित केले. लगोलग सर्व सूचनांच्या बरोबर डिजीटल लाॅक कोड नंबर पण आला.हा पर्याय खुपच आवडला. सर्व मानव संपर्का विरहित. पुढे तेथील व्यवस्था व एका कुटुंबाला लागणाऱ्या गोष्टी याचा तपशीलवार आढावा घेऊन योजनाबद्ध सामान, टोस्टर,डिश वाॅशर,मीठ,मिर्ची ब्रेड, बटर, चिझ, अंडी,चहा,काॅफी,दुध ते कप बशा, काटे चमचे,नाईफ, टी ते सर्व्हिंग स्पून थोडक्यात काय सगळ्ळ काही उपलब्ध होते.सुदंर रंग संगती व प्रकाश योजना, आरामदायक बिछाने. सुसज्ज न्हाणी घरे. बारीक सारीक सुचना तर इतक्या की प्रत्येक शोभेच्या फुलांच्या कुंडीत " झाडाला पाणी घालू नये " आसा मुद्रित अक्षराचा झेंडा. या वरून आपल्याला कल्पना आलीच आसेल की कीती चांगली सोय आहे. दर दिवशीचे भाडे फक्त शंभर डाॅलर्स. तीन दिवसा करता घराचे जणू मालकच आणी हे सर्व अनुभवताना अमेरिका निवासी मुलगी,जावई यांचा निर्णय किती योग्य होता सारखे जाणवले.

हा मी घेतलेला अनुभव आहे.आपले अमेरिकन मिपाकर यात सुधारणा सुचवू शकतात. कारण त्यांचा अनुभव माझ्या पेक्षा निश्चितच जास्त आहे..

जास्त काही लिहीत नाही. फोतो मधे सर्व कही आले आहे. सर्व फोतो मोबाइल आणी निकोन डि एस आर चे आहेत.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

8 Jul 2022 - 10:55 pm | श्रीगुरुजी

खूप पूर्वी काही काळ डेट्रॉईट मध्ये रहात असताना कॅनेडियन व्हिसा घेऊन कॅनडातून प्रवास करून नायगरापर्यंत गेलो होतो. तेथून पाहून झाल्यानंतर मधला पूल ओलांडून अमेरिकेच्या बाजूने सुद्धा धबधबा पाहिला होता. अमेरिकेतील असंख्य सहलींपैकी नायगराची सहल सर्वोत्तम ३ सहलींमध्ये आहे. त्यावेळी आईवडील सुद्धा बरोबर असल्याने सहलीचा आनंद द्विगुणित झाला होता. जीव ओवाळून टाकावा अशी असंख्य निसर्गरम्य ठिकाणे अमेरिकेत आहेत. नायगरा त्यापैकीच एक.

कर्नलतपस्वी's picture

9 Jul 2022 - 7:53 am | कर्नलतपस्वी

गुरूजी मिशिगन ते बफेलो संपुर्ण प्रवास तलावाच्या काठाकाठाने. त्याचा सुद्धा एक वेगळाच अनुभव.

पेनसिलव्हानीया मधे वाईन यार्ड सुद्धा भारी.
नायगारा मला पण खुप आवडला.

म्हणजे प्रत्येकी तीन MBचे आहेत. धागा लवकर लोड होण्यासाठी कमी साईजचे( 200 -500 KB) टाकले तरी चालेल.
बाकी नायगारा काही खास आहे असं मला नाही वाटत.

कर्नलतपस्वी's picture

9 Jul 2022 - 7:49 am | कर्नलतपस्वी

कंजुस भाई प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
खयाल अपना अपना,पण नायगारा मधे रौद्र सौंदर्य दिसले.
धधबधब्यातून पडणाऱ्या पाण्याचा आवाज एवढा मोठा की आपल्याच मनातला आवाज आपल्यालाच ऐकू येत नाही.

निकोल टेस्ला व त्यांच्या सहकार्याने जगावर करून ठेवलेला उपकार व कठीणतम प्रवास सिनेमात दाखवतात, खुपच मस्त.
तकनीकी माहीती बद्दल आभार.

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Jul 2022 - 2:11 pm | ज्ञानोबाचे पैजार

छान आले आहेत सगळे फोटो

पैजारबुवा,

नायगारा फॉल्स हे माझ्या बकेट लिस्ट मधे होते.
आमच्याकडे पण कॅनडा विसा नव्हता.
पण एका मिपाकराने सुचवल्यानुसार मी भारतातूनच मी एका चायनीज टूर ऑपरेटर ची न्यूऑर्क - नायगारा - वॉशिंग्टन अशी सहल बुक केली खूपच स्वस्तात पडली.
माझ्या सोबत तीन ज्येष्ठ नागरीक होते ( सासरे ८०+ सासू बाई आणि माझी आई ७५+ ) त्यानाही ते खूप सोयीचे पडले.
तीन दिवसात नायगारा सोबत स्टर्लिंग काचेचा कारखाना , वॉशिंग्टन म्युझियम वगैरेही होते.
खूप मजा आली.
डेट्रॉईट मधून कॅनडा मार्गे नायगारा सोपे पडते. वेळ वाचतो .

कर्नलतपस्वी's picture

10 Jul 2022 - 9:04 am | कर्नलतपस्वी

डेट्राईट नदीवरील अम्बेसिडर पुलावरून खुपच जवळ आहे. प्रकाशयोजना कॅनडात जास्त चांगली दिसते.तसेच तेथील निरीक्षण स्तंभ हा अमेरिकन स्तंभा पेक्षा जास्त उंचावर आसल्याने एरीयल व्ह्यू अधिक प्रमाणात मोठा दिसतो.

छान माहिती आणि फोटो. फोटोची फाईल साईझ मोठी असल्याने लोड होण्यास वेळ लागतो. फोटो जमल्यास कंप्रेस करुन अपलोड करावेत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Baap Pandurang | Marathi Rap Song | Khaas Re TV

कर्नलतपस्वी's picture

22 Jul 2022 - 6:40 am | कर्नलतपस्वी

माहितीबद्दल धन्यवाद. पुढील लेखात साठी फोटो छोटे केलेत.बघतो जमतं का.

श्वेता व्यास's picture

11 Jul 2022 - 10:43 am | श्वेता व्यास

छान फोटो आहेत.

Nitin Palkar's picture

14 Jul 2022 - 6:27 pm | Nitin Palkar

उत्तम प्रची. सुरेख माहिती.

कर्नलतपस्वी's picture

22 Jul 2022 - 6:41 am | कर्नलतपस्वी

श्वेता, नितीन प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jul 2022 - 7:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो छान. माहितीही आवडली. लिहिते राहावे.

-दिलीप बिरुटे

कर्नलतपस्वी's picture

17 Jul 2022 - 7:33 pm | कर्नलतपस्वी

प्रा डाॅ बिरूटे सर प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

मुक्त विहारि's picture

18 Jul 2022 - 8:17 pm | मुक्त विहारि

फोटो मस्तच आले आहेत

टर्मीनेटर's picture

21 Jul 2022 - 12:30 pm | टर्मीनेटर

माहिती छान, फोटोज खूप आवडले 👍

कर्नलतपस्वी's picture

22 Jul 2022 - 6:42 am | कर्नलतपस्वी

मुडी,टर्मीनेटर प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

तिमा's picture

22 Jul 2022 - 7:13 am | तिमा

close view

गोरगावलेकर's picture

28 Jul 2022 - 11:19 am | गोरगावलेकर

माहितीही आवडली