खेळणी उद्योग आणि भारत

साहना's picture
साहना in काथ्याकूट
7 Jul 2022 - 8:26 am
गाभा: 

LKY ह्याचा एक विचार आहे. "Figure out what works and do it. ". चार्ली मुंगर ह्यांनी भारतावर टीका करताना ह्यावर भाष्य केले होते. भारतांत हा विचार कुणी रुजवला असेल तर तो HPMSNMJ* ह्यांनीच. फक्त हा विचार त्यांनी भारतीय प्रशासनासाठी न वापरता इलेक्शन कशी जिंकावी ह्यासाठी वापरला आणि त्यांत त्यांना भरपूर यश सुद्धा मिळाले.

भारताचे व्यापार मंत्री आहेत श्री पियुष गोयल जी. ह्यांचे एक जवळचे मित्र आमचे सुद्धा चांगले मित्र आहे. HPMSNMJ सरकारांत गोयल पेक्षा कुणी जास्त मठ्ठ असेल तर तो फक्त राम माधव असे ते म्हणत असत. पियुष गोयल म्हणे दर रोज सकाळी उठून शहादा पढतात. "अल्लाह सोडून दुसरा कुणीच देव नाही ! पैगंबर हा सर्वांत श्रेष्ठ देवदूत आहे". आणि ह्या प्रकारे इस्लाम काबुल केल्यावर ते म्हणे पूजा करतात.[१] त्यामुळे एकतर मठ्ठ असावेत नाहीतर खोटारडे. ते असो, कुणाला अल्ला पावतो तर कुणाला राम.

गोयल ह्यांच्या मंत्रालयाने हल्ली IT सेल इत्यादी मंडळींना वापरून मोठे कॅम्पेन पसरवले.

img1

एकूण असे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला जात आहे कि जणू अचानक भारतीय व्यापारी देशांतच खेळणी निर्माण करू लागले आणि त्यामुळे आयात कमी झाली.

> According to the governmnet data, the import of toys has declined 70% while 61% surge in exports seen in the last three years.

आयात कमी झाली ह्याचे मुख्य कारण म्हणजे भारत सरकारने खेळण्यांच्या वरील आयात कर तिप्पट केला म्हणजे २०% वरून ६०%. ह्या करामुळे विविध खेळण्यांचा किमती वाढल्या आणि त्यामुळे आयात कमी झाली. खेळणीच काय पण कुठल्याही गोष्टीची आयात कमी करण्याचा हा सोपा उपाय आहे. त्याशिवाय BIS लायसन्स अनिवार्य केले आहे. त्याचाही परिणाम खेळणी उद्योगावर झाला आहे.

> while 61% surge in exports seen in the last three years.

हा आकडा चांगला वाटतो पण ६०% निर्यात वाढ पण हि ३ वर्षांत. म्हणजे दर वर्षी साधारण १७% !

१७% सुद्धा चांगला आकडा आहे. पण ह्या आधी निर्यात कशी होती ?

img1

म्हणजे साधारण २०११ पासूनच वेगाने हि वाढ सुरु आहे. २०१५ साली निर्यात साधारण १३% वाढली म्हणजे १७% च्या आसपासच !

थोडक्यांत देशांतील सर्व खेळणी महाग झाली, तुलनेने निर्यात जास्त काही वाढली नाही. तरी सुद्धा मोठ्ठा तिर मारल्याप्रमाणे प्रोपागंन्डा सुरु आहे.

* HPMSNMJ - Honorable Prime Minister Shri Narendra Modi Ji.
[१]- https://youtu.be/-m1y6iQPgRc

प्रतिक्रिया

कंजूस's picture

7 Jul 2022 - 8:59 am | कंजूस

फक्त लहान मुलांसाठी असतात असं नाही. मोठ्या मुलीही घेतात. टेडी बेअर हा लादलेला आणि प्रतिष्ठा पावलेला प्रकार असला तरी भारतासाठी निरर्थक आहे. कुत्रा,मांजरे अधिक हवीत. राजस्थान ऊंट,हत्ती आणि
कर्नाटकात हत्ती हे चामडे अथवा लाकडाचे आहेत पण त्या शोभेच्या वस्तू आहेत. खेळणी नव्हेत.
ससा,कोल्हा आणि काही लोकांसाठी साळिंदर बनवले पहिजे.

बोलणारा पोपट ( इलेक्ट्रॉनिक) हे मात्र मस्त खेळणे होते.

विजुभाऊ's picture

7 Jul 2022 - 9:24 am | विजुभाऊ

"बोलणारा पोपट" हे खेळणे संपादक म्हणूनही वापरता येते.

कानडाऊ योगेशु's picture

7 Jul 2022 - 9:33 am | कानडाऊ योगेशु

उलटेही खरे असावे.
बोलणार्या पोपटाला संपादक म्हणुन्ही खेळवता येते.

साहना's picture

7 Jul 2022 - 11:02 am | साहना

कृपया हा विषय घडामोडी धाग्यावरच राहू दे. इथे नको !

निनाद's picture

7 Jul 2022 - 9:39 am | निनाद

लेख घाईत लिहिला असे वाटले. तुटक झाला जरा. तुमच्या पद्धतीने अजून यात विवेचन यायला हवे होते.

विजुभाऊ's picture

7 Jul 2022 - 4:02 pm | विजुभाऊ

HPMSNMJ* म्हणजे काय समजले नाही

चौथा कोनाडा's picture

7 Jul 2022 - 10:44 pm | चौथा कोनाडा

लेखाच्या तळाशी लिहिलेले आहे:

* HPMSNMJ - Honorable Prime Minister Shri Narendra Modi Ji.

आपल्या नजरेतून खरेच सुटले असावे असे गृहित धरून प्रतिसाद आहे. कृचुभूदेघे.

मला वाटते याकडे वेगळ्या प्रकारे पाहिले पाहिजे. गेल्या तीन वर्षांत भारतीय खेळणी आयातीत ७० टक्क्यांनी घट झाली आहे, तर निर्यातीत ६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
निर्यातीत वाढ सध्या बाजूला ठेवली तरी आयातीत ७० टक्क्यांनी घट झाली आहे हे महत्त्वाचे आहे. यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की भारताचे आता या क्षेत्राकडे लक्ष आहे आणि त्यावर काम चालले आहे. हाच त्या बातमीचा गाभा आहे असे वाटते. म्हणजे परिणाम येत्या ५ वर्षात नक्कीच दिसतील!

मूल्यानुसार, सर्व प्रकारच्या खेळण्यांसाठी जगातील ५ सर्वात मोठे निर्यातदार चीन, जर्मनी, झेक प्रजासत्ताक, जपान आणि हाँगकाँग हे आहेत.
देशांनुसार पारंपारिक खेळण्यांचे प्रमूख निर्यातदार

  1. चीन: US$३३.५ अब्ज (निर्यात पारंपारिक खेळण्यांपैकी ६२%)
  2. झेक प्रजासत्ताक: $२.९ अब्ज (५.४%)
  3. जर्मनी: $२.४ अब्ज (४.५%)
  4. हाँगकाँग: $१.९ अब्ज (३.४%)
  5. नेदरलँड: $१.३ अब्ज (२.५%)
  6. युनायटेड स्टेट्स: $१.१२ अब्ज (२.१%)
  7. व्हिएतनाम: $१.०५ अब्ज (२%)
  8. युनायटेड किंगडम: $९१८.५ दशलक्ष (१.७%)
  9. पोलंड: $९११.४ दशलक्ष (१.७%)
  10. बेल्जियम: $७३७.८ दशलक्ष (१.४%)
  11. फ्रान्स: $६८९.८ दशलक्ष (१.३%)
  12. मेक्सिको: $६१८.३ दशलक्ष (१.१%)
  13. स्पेन: $६१३.८ दशलक्ष (१.१%)
  14. डेन्मार्क: $४७७.५ दशलक्ष (०.९%)
  15. इटली: $४६६.७ दशलक्ष (०.९%)

अगदी इटली सारख्या लहानशा फलतू देशाने ही खेळण्यांची भरपूर निर्यात केली आहे. भारताने किमान सुरूवात तरी केली आहे. हेच महत्त्वाचे आहे - आणि पीयुष गोयल या मंत्री महोदयांनी धोरणात्मक काम केले आहे हे निश्चित आहे. अन्यथा आयात घसरली नसती!

प्रमुख खेळणी उत्पादक पाहू या

  1. हसब्रो (पॉटकेट, युनायटेड स्टेट्स)
  2. पॉप मार्ट (बीजिंग, चीन)
  3. मॅटेल (एल सेगुंडो, युनायटेड स्टेट्स)
  4. स्पिन मास्टर (टोरंटो, कॅनडा)
  5. कोकुयो (ओसाका, जपान)
  6. टॉमी कंपनी (टोकियो, जपान)
  7. FIYTA होल्डिंग्ज (शेन्झेन, चीन)
  8. रास्ता ग्रुप (ग्वांगझो, चीन)
  9. बानबाओ (शांताउ, चीन)
  10. ग्वांगडोंग क्युनक्सिंग खेळणी (शेन्झेन, चीन)

यात भारत कुठेही नाही. हे आपले दुर्दैव आहे. सध्यातरी चीन ने यात आपले निर्विवाद वर्चस्व जगावर लादलेले दिसते. आशा आहे की कधीतरी यातही भारत आपला ठसा उमटवेल. या विषयी अधिक महिती येथे

पण महत्त्वाचे हे आहे की भारताने आपली आयात मात्र सुमारे ७०% ने कमी केली आहे. ही आयात अजून कमी होत जाईल असे दिसते आहे. हा यातला सर्वात चांगला भाग आहे. २०२० मध्ये, सरकारने खेळण्यांवरील मूलभूत सीमा शुल्क २० टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत वाढवले. पेटंट, डिझाइन आणि ट्रेडमार्क हे सुटसुटीत करण्याचे कामही झाले आहे. आता हे काम मंत्री महोदयच करणार ना?

भारतीय मूल्य प्रणाली, भारतीय इतिहास आणि संस्कृती यावर आधारित खेळण्यांचे डिझाईन करणे, देशांतर्गत रचना मजबूत करणे आणि भारताला खेळण्यांचे जागतिक उत्पादन केंद्र म्हणून स्थान देणे हे त्यांचे उद्देश आहेत. यात मला काही गैर दिसत नाही. आता हे ही काम मंत्री महोदयच करत असणार - किमान बाबूंना तसे निर्देश तर दिले जात असणार. सरकारी यंत्रणा त्यातल्या त्यात त्यांच्या वेगाने काम करणार.

त्यातूनही इतकी आयात घट्वल्याबद्दल माझ्या कडून तरी श्री पीयुष गोयल यांना पैकीच्या पैकी मार्क आहेत.

चौथा कोनाडा's picture

8 Jul 2022 - 7:35 pm | चौथा कोनाडा

+१ प्रतिसाद

Trump's picture

9 Jul 2022 - 12:30 pm | Trump

काही उपमुद्दे. (ज्यांचा मुख्य लेखात आणि तुमच्या प्रतिसादात उल्लेखला नाही. )

१. आयात कमी झाली याचा अर्थ
अ. भारतातील मागणी कमी झाली.
ब. भारतील मागणी तेवढीच राहीली / वाढली आणि ती देशातर्गत उत्पादनामुळे भरुन निघाली.
मला तरी दुसरी शक्यता वाटत आहे. त्यामुळे ते सुध्दा एकुण मुल्यमापणात घ्यायला हवे.

२. निर्यातेचे आकडे फक्त बाहेर जाणार्‍या मालाचे आकडे दाखवत आहेत, त्यातुन पुर्ण उत्पादनाचे (एकुण बदलाचे) आकडे मिळत नाहीत. कोणताही निष्कर्ष काढण्यासाठी दोन्ही गोष्टींची माहिती आवश्यक आहे.
दिलेले आकडे सापेक्ष (relative) आहेत, संपूर्ण (absolute) आकड्यांची आवश्यकता आहे.

३. खाली दिलेला निर्याताचा आलेखात आकडे रुपयामध्ये आहेत. त्यांचे महागाईचा परिणाम काढण्यासाठी सामान्यीकरण (normalisation) केले का ते समजत नाही, पण वाटत नाही. त्यामुळे खरेच निर्यातीचे मुल्य वाढले आहे का समजत नाही, की नुसतेच महागाईमुळे फुगीर आकडे दिसत आहेत.

मुक्त विहारि's picture

14 Jul 2022 - 1:08 pm | मुक्त विहारि

हे केंद्र सरकार, योग्य ती पावले नक्कीच उचलत आहे, विशेषतः, आयात कमी आणि संरक्षण...

नुकतीच वाचलेली, अजून एक बातमी ....

संरक्षण निर्यातीत भारताचा नवा विक्रम, वर्षभरात 13 हजार कोटी रुपयांची शस्त्रास्त्रे निर्यात (https://www.esakal.com/amp/desh/defence-export-by-india-in-2021-22-touch...)

अर्थात, ह्या अशा गोष्टी, एका दिवसांत होत नाहीत...

मनो's picture

8 Jul 2022 - 9:38 pm | मनो

> शहादा पढतात

त्या ओळींना कलमा (पहिला कलमा) असं म्हणतात, त्यामुळं 'शहादा पढतात' ऐवजी 'कलमा पढतात' असं हवं. शहादा याचा शब्दशः अर्थ साक्ष देणे - म्हणजेच अल्लाह एकच आहे आणि पैगंबर प्रेषित आहे याची साक्ष देणे, शहादा करणे अर्थात कलमा पढणे.

Trump's picture

9 Jul 2022 - 12:30 pm | Trump

काही उपमुद्दे.

१. आयात कमी झाली याचा अर्थ
अ. भारतातील मागणी कमी झाली.
ब. भारतील मागणी तेवढीच राहीली / वाढली आणि ती देशातर्गत उत्पादनामुळे भरुन निघाली.
मला तरी दुसरी शक्यता वाटत आहे. त्यामुळे ते सुध्दा एकुण मुल्यमापणात घ्यायला हवे.

२. निर्यातेचे आकडे फक्त बाहेर जाणार्‍या मालाचे आकडे दाखवत आहेत, त्यातुन पुर्ण उत्पादनाचे (एकुण बदलाचे) आकडे मिळत नाहीत. कोणताही निष्कर्ष काढण्यासाठी दोन्ही गोष्टींची माहिती आवश्यक आहे.
दिलेले आकडे सापेक्ष (relative) आहेत, संपूर्ण (absolute) आकड्यांची आवश्यकता आहे.

३. खाली दिलेला निर्याताचा आलेखात आकडे रुपयामध्ये आहेत. त्यांचे महागाईचा परिणाम काढण्यासाठी सामान्यीकरण (normalisation) केले का ते समजत नाही, पण वाटत नाही. त्यामुळे खरेच निर्यातीचे मुल्य वाढले आहे का समजत नाही, की नुसतेच महागाईमुळे फुगीर आकडे दिसत आहेत.

ट्रम्प आणि निनाद यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे ... एकूण भारतात उत्पादन आणि त्यामागे असणारे तंत्रन्यान वाढत आहे हे चांगलेच आहे अनेक दृष्टीने ,, मेक इन इंडिया ची जी लोक ( खास करून भारतात राहणारे ) उगाच टीका किंवा चेष्टा करतात यांना मी सांगू इच्छितो कि एक उत्पादन आणि रचना ( डिजाईन ) शेत्रातिल व्यक्ती म्हणून सांगतो कि तुमचं शेतात काय पिकत आहे त्याची तुम्हाला किंमत नाही .. अहो असे किंमत वाढवणारे ( फक्त कच्चा माल ना विकता पक्का माल विकणे ) उत्पादन करणारे देश असणे हे भाग्याचे आहे... हा पकाक माल जर ब्रँड इंडिया असे असेल तर दुधावरची साय .. टोयोटा ने भारतात खरखं उघडला आणि गाड्या भारताबाहेर निर्यात केली तर भारताला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदा ( स्किल सेट वाढणे ) होतोच याशिवाय भारतीय मालकीच्या ब्रँड ने टाटा बजाज हिरो जर उत्पादन निर्यात केलं तर दुहेरी फायदा .... अहो आज भारतातील लोकांनी खालाल यादी बघावी आणि अभिमानाने म्हणावे कि यातील बऱ्याच गोष्टी आम्ही बनवतो .. हीच यादी मी मी=किंवा कानडा मधील एखादा घेऊन बसलं तर आमची तोंडे हिरमुसली होतील ... १) घड्याळ २) फ्रीझ ३) सायकल ३) आगगाडी ४) वॉशिंग मशीन आणि एअर कंडिशनर ५) प्रेशर कुकर ६) मिक्सर ७) स्टेनलेस स्टील ची उपहारगृहात लागणारी विशेष भांडी, ७) असंखय तांत्रिक उत्पादने .... तेव्हा, ज्यांना केवळ मोदी द्वेष म्हणून "मेक इन इंडिया" ची चेष्टा करायाची त्यांना करू दे बाकीच्यांनी यात अभिमान वाटून घ्या , अश्या उद्योगांना प्रोत्साहंन द्या ... हे झाले प्रत्यक्ष उत्पादन या बरोअबर सॉफ्ट स्किल मध्ये पान भरपूर गोष्टी भारतात बनतात ... चित्रपटातील सी जी आय पासून ते उत्तम दारुची वैद्यकीय उपकरणे डिजाईन करणे .. तेव्हा मूळ धागाकर्त्यांनी त्यांची ऊर्जा जर यात काय चांगले घडते आहे त्याची माहिती खोदून काढण्यात व्यस्त केली असती तर जास्त बरे झाले असते

गामा पैलवान's picture

12 Jul 2022 - 6:55 pm | गामा पैलवान

चौकस२१२,

तुमच्या संदेशाशी १०० % सहमत आहे. भारतात गेली कित्येक दशके उच्च दर्जाची अभियांत्रिकी उत्पादने ( engineering products ) निर्माण व निर्यात होतात. ती देखील अत्यंत कमी किंमतीत. याचं प्रमुख कारण म्हणजे भारतीय कामगार अतिशय कुशल आहेत. आणि दुसरं कारण म्हणजे गुणवत्तेची मानकं ( standards ) परदेशी ठरवली जायची, आणि त्यांत तडजोड अजिबात होत नसे.

याउलट घरगुती उपकरणांत ( = रीटेल सेक्टर ) मध्ये भारतीय निर्माते नव्हते असं नाही. पण मानकं देशी होती आणि चालता है ची वृत्ती होती. मोदी आल्यापासनं यात हळुहळू फरक पडंत चाललाय.

आ.न.,
-गा.पै.

ट्रम्प आणि निनाद यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे ... एकूण भारतात उत्पादन आणि त्यामागे असणारे तंत्रन्यान वाढत आहे हे चांगलेच आहे अनेक दृष्टीने ,, मेक इन इंडिया ची जी लोक ( खास करून भारतात राहणारे ) उगाच टीका किंवा चेष्टा करतात यांना मी सांगू इच्छितो कि एक उत्पादन आणि रचना ( डिजाईन ) शेत्रातिल व्यक्ती म्हणून सांगतो कि तुमचं शेतात काय पिकत आहे त्याची तुम्हाला किंमत नाही .. अहो असे किंमत वाढवणारे ( फक्त कच्चा माल ना विकता पक्का माल विकणे ) उत्पादन करणारे देश असणे हे भाग्याचे आहे... हा पकाक माल जर ब्रँड इंडिया असे असेल तर दुधावरची साय .. टोयोटा ने भारतात खरखं उघडला आणि गाड्या भारताबाहेर निर्यात केली तर भारताला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदा ( स्किल सेट वाढणे ) होतोच याशिवाय भारतीय मालकीच्या ब्रँड ने टाटा बजाज हिरो जर उत्पादन निर्यात केलं तर दुहेरी फायदा .... अहो आज भारतातील लोकांनी खालाल यादी बघावी आणि अभिमानाने म्हणावे कि यातील बऱ्याच गोष्टी आम्ही बनवतो .. हीच यादी मी मी=किंवा कानडा मधील एखादा घेऊन बसलं तर आमची तोंडे हिरमुसली होतील ... १) घड्याळ २) फ्रीझ ३) सायकल ३) आगगाडी ४) वॉशिंग मशीन आणि एअर कंडिशनर ५) प्रेशर कुकर ६) मिक्सर ७) स्टेनलेस स्टील ची उपहारगृहात लागणारी विशेष भांडी, ७) असंखय तांत्रिक उत्पादने .... तेव्हा, ज्यांना केवळ मोदी द्वेष म्हणून "मेक इन इंडिया" ची चेष्टा करायाची त्यांना करू दे बाकीच्यांनी यात अभिमान वाटून घ्या , अश्या उद्योगांना प्रोत्साहंन द्या ... हे झाले प्रत्यक्ष उत्पादन या बरोअबर सॉफ्ट स्किल मध्ये पान भरपूर गोष्टी भारतात बनतात ... चित्रपटातील सी जी आय पासून ते उत्तम दारुची वैद्यकीय उपकरणे डिजाईन करणे .. तेव्हा मूळ धागाकर्त्यांनी त्यांची ऊर्जा जर यात काय चांगले घडते आहे त्याची माहिती खोदून काढण्यात व्यस्त केली असती तर जास्त बरे झाले असते

बेकार तरुण's picture

13 Jul 2022 - 11:39 am | बेकार तरुण

प्रास्ताविकाचे २ परिच्छेद अन शेवटची ओळ याचे काहीच प्रयोजन कळले नाही अन त्यात (मोदी भक्ती किंवा मोदी द्वेष यात) मला रसही नाही, त्यामुळे ते जाउदे....

थोडक्यांत देशांतील सर्व खेळणी महाग झाली, तुलनेने निर्यात जास्त काही वाढली नाही >>>
हा निष्कर्ष कशावरुन, का फक्त अंदाज आहे?? फक्त आयातकर वाढविला म्हणुन असेल तर त्या अंदाजात अनेक त्रुटी असाव्यात.... असा काही विदा असेल किंमती वाढल्याचा (आयातशुल्कामुळे, कच्च्या मालाच्या किंमतीमुळे नाही) तर तो नक्कीच वाचायला आवडेल... माझ्यातरी वाचनात असे काहीच आले नाहीये की भारतात खेळण्यांच्या किंमती ३३% ने वाढल्या आहेत (३३% हा आयातदरातील फरक, २० चा ६०% केल्याने किंमत १२० ची १६० होईल).... तुमच्याकडे काही विदा असेल तर जरुर वाचायला आवडेल....

तसेच माझ्या अत्यंत अल्पमतिनुसार आयातशुल्क वाढवुन आयातीस आळा घालणे हा परकीय चलनाचा विचार करता चांगला निर्णय आहे ... त्यात गैर असे काहीच वाटत नाही मला... वर भारतात माल विकायचा असल्यास भारतीय सर्टिफिकेशनचा आग्रह धरण्यातही काही अयोग्य वाटत नाही...

तसेच जर सर्टिफिकेशन्स मुळे भारतीय निर्यात मालाचा क्वालिटी चेक होउन परदेशी अश्या खेळण्यांची पत वाढत असेल तर काय वाईट आहे त्यात हेही कळत नाही.....

आता दर १३ चा फक्त १७% वर गेला आहे हे कबुल... पण ४% वाढ म्हणजे जवळ जवळ ३०.७% वाढ आहे आधीच्या दरावर... अन मला तरी बातम्यात कुठेही असे दिसले नाही कि सरकारने टेकु दिल्याने मरत चाललेला उद्योग बहरत आहे वगैरे जहिरातबाजी चालु असल्याचा....... दर बातमीत हे ३ वर्षाचे आकडे आहेत हेही स्पष्ट लिहिलेले दिसले.... हे आकडे अमेरीकी डॉ मधे आहेत, रूपयातील निर्यात अधिकच वाढली असावी म्हणजे... (डॉ ६९ वरुन ७३ ला पोचला असावा ह्या ३ वर्षात.. म्हणजे जवळ जवळ ६% घसरला आहे)...

एक मात्र आहे, हे आकडे अत्यंत फुटकळ आहेत - आंतरराष्ट्रीय बाजारात चीनची खेळण्यांची निर्यात बघता... अन गेले ३ वर्षे चीनमधील परिस्थीती बघता कदाचित तेथील काही कारखाने बंद वगैरे असल्याचाही भारतातील उद्योजकांना फायदा झाला असण्याची शक्यता आहे ... आता पुढे हाच वाढदर राखता येतो का हे बघणे जास्ती सुरस असेल....

असो, लेख आवडला, पण निष्कर्ष पूर्ण पटला नाही म्हणुन हा प्रतिसाद....