तरंग

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in कलादालन
9 Dec 2008 - 8:44 pm

कलाछायाचित्रण

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

9 Dec 2008 - 9:02 pm | लिखाळ

उत्तम !!! सुंदर...
सर्व विशेषणे पहिल्याच प्रतिसादात वापरुन टाकत नाही :)
-- लिखाळ.

सुनील's picture

9 Dec 2008 - 9:10 pm | सुनील

फोटो झकास. आहे कुठला?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

भडकमकर मास्तर's picture

9 Dec 2008 - 11:14 pm | भडकमकर मास्तर

लै झ्याक फोटो...
रंगांचे स्तर ...अप्रतिम....
(तुम्ही काढलेल्या फोटोंना पाहून दर वेळी काहीतरी फोटोशॉपची चलाखी आहे असं का बरं वाटतं? :? ... नेहमीप्रमाणेच म्हणतो की ही काँप्लिमेंट समजा :))
_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

यशोधरा's picture

10 Dec 2008 - 12:25 am | यशोधरा

सुंदर फोटो. अचूक पकडलाय क्षण... मस्त..

सूर्य's picture

10 Dec 2008 - 12:48 am | सूर्य

सुंदर फोटो.. आवडला.

- सूर्य.

रवि's picture

10 Dec 2008 - 1:02 am | रवि

एकदम मस्त
रवि

अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ......

विसोबा खेचर's picture

10 Dec 2008 - 1:19 am | विसोबा खेचर

क्लासच आहे तरंग..!

साक्षिदेवा, लै भारी फोटू काढला आहेस..

तात्या.

चतुरंग's picture

10 Dec 2008 - 1:22 am | चतुरंग

तरंग क्लास! (अजून क्लोजप हवा होता का?)
(नेमके कशाने उठलेत ते तरंग?)
आकाशापासून ते गवतापर्यंत हळूहळू एकेक पडदा उघडत गेल्यासारखा वाटतोय ते मस्तच आहे.

चतुरंग

धनंजय's picture

10 Dec 2008 - 1:25 am | धनंजय

अगदीच मस्त.

(पण यात दोन सुंदर फोटो एकमेकांवर अन्याय करत आहेत असे वाटले.)

छोटा डॉन's picture

10 Dec 2008 - 6:50 am | छोटा डॉन

>>(पण यात दोन सुंदर फोटो एकमेकांवर अन्याय करत आहेत असे वाटले.)
अगदी माझ्या मनातले बोललात ....
असेच म्हणतो.

वास्तवीक ह्या फोटोत २ वेगवेगळे व संपुर्ण स्वतःच्या वैशिष्ठ्याचे फोटो दडलेले आहेत.
ते अजुन वेगळे पहायला मिलाले तर सह्हीच...!
असो.

बाकी फोटो झकास आहे ह्यात शंकाच नाही. अप्रतिम ....!

छोटा डॉन
" अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? "
[ अपने अड्डे पे जरूर आना ,

झकासराव's picture

11 Dec 2008 - 4:10 pm | झकासराव

अगदि माझ्या मनातल लिहिलय.
दोन फोटो असतील वेगवेगळे तर टाका इकडे. :)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

शितल's picture

10 Dec 2008 - 1:27 am | शितल

पोस्टर बनु शकेल इतका सुंदर फोटो. :)

रामोजी's picture

10 Dec 2008 - 3:49 am | रामोजी

फारच सुन्दर. स्थळ आणि फोटो, दोन्ही अप्र् तीम. प्रत्येक रंग छ्टा उत्त् म उतर् ली आहे.

नंदन's picture

10 Dec 2008 - 4:47 am | नंदन
नंदन's picture

10 Dec 2008 - 4:47 am | नंदन
सहज's picture

10 Dec 2008 - 6:41 am | सहज

१) सुंदर फोटो. अजुन मोठा हवा होता
२) कुठला आहे?

३) त्या डबक्या ऐवजी स्वीमींगपूल, जकूझी, गरम पाण्याचा कुंड इ इ असते तर आहाहा!

साक्षीजी यांना छायाचित्रकार म्हणताना त्यात जादुगार ह्या शब्दाची छटा जाणवते.

सर्वसाक्षी's picture

10 Dec 2008 - 9:56 am | सर्वसाक्षी

धन्यवाद मंडळी,

हे चित्र महाबळेशवर येथे केट्स कड्यावरून टिपलेले आहे. समोर दिसणारी नागमोडी वाट खाली पोलादपूरकडे जाते. अगदी मागे पार्श्वभूमीवर सह्याद्रीचे कडे-किल्ले आहेत. पावसाळा नुकताच संपलेला होता व पिवळ्या फुलांवरुन नवरात्राची चाहूल लागत होती .

रसिकांनी सुचविल्याप्रमाणे तरंग आणि निसर्ग असे दोन वेगळे विषय एकाच चित्रात घेतले आहेत, आणि ते दोन स्वतंत्र चित्रविषय होऊ शकतात. अर्थातच आता एखादे असे स्वतंत्र चित्रही देईन.

पुन्हा एकदा आभार.

श्रावण मोडक's picture

11 Dec 2008 - 3:47 pm | श्रावण मोडक

साक्षींनी काढलेले छायाचित्र म्हणून उत्साहाने येथे आलो पहायला तर ते गायब. आणि आता पूर्वपरीक्षण करताना खाली नुसतीच छायाचित्राची मोकळी चौकट मात्र दिसतेय. आणि हे एवढे लिहिपर्यंत तीही बेपत्ता. हा बहुदा माझ्याच संगणकाचा किंवा इंटरनेट कनेक्शनचा प्रश्न असावा काय?
दिसले, दिसले एकदाचे. हे सारे लिहून प्रतिसाद प्रकाशित केला आणि छायाचित्र प्रकटले.
सु रे ख!!!

मदनबाण's picture

11 Dec 2008 - 4:01 pm | मदनबाण

झकास...नागमोडी रस्ता क्लासच आहे..
मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन

निळा सावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन

चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे;

शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे

पायवाट पांढरी तयांतुन अडवीतिडवी पडे;

हिरव्या कुरणांमधून चालली काळ्या डोहाकडे

झांकळुनी जड गोड काळिमा पसरी लाटांवर;

पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर.

बालकवींची कविता या निसर्गदृष्याशी समर्पकच वाटते.

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Dec 2008 - 8:59 pm | बिपिन कार्यकर्ते

खूपच सुंदर फोटो. एका फोटोत दोन अतिशय सुंदर देखावे.

बिपिन कार्यकर्ते