तेजस सोसायटीच्या एका कोप-यात देशमुख कुटूंब गेली अनेक वर्ष रहात आहे. म्हणायला ते कुटूंब खरे , पण केवळ दोनच माणसे त्या घरात राहायची. सकाळचा मिक्सरचा आवाज सोडला , तर त्या कोण राहत आहे का नाही इतपत शंका येईल अशी शांतता असायची.
या शांततेचा भंग व्हायचा तो उन्हाळ्यात. देशमुखांच्या अंगणात आंब्याचे झाड होते. मोहर लागताच सोसायटीचे पोरे आजूबाजुला दबा धरून असायची. जरा चाहूल लागली की काका आपली काठी घेऊन बाहेर धावत येत.
बरेच दिवस हा प्रकार काकू बघत होत्या. शेवटी न राहावून त्यांनी काकांना आंबे द्यायला सांगितले तर काका फक्त हसले.
त्यांच्या हुसकावण्यातच आंबे चोरायची गंमत लपली होती हे त्यांना पुरते ठाऊक होते.
प्रतिक्रिया
26 May 2022 - 8:58 am | डाम्बिस बोका
+१
26 May 2022 - 11:36 am | चौथा कोनाडा
+१
निरागस!
26 May 2022 - 12:31 pm | सौंदाळा
+१
26 May 2022 - 2:33 pm | विजुभाऊ
कथा कुठे आहे यात
26 May 2022 - 9:54 pm | अमरेंद्र बाहुबली
कळली नाही? शेवटी धक्कातंत्र वापरलंय, मला वाटलं एकटं कुटूंब, कोपर्यात, शांतता, म्हणजे काहीतरी भूताटकी असेल. काका लहान मूलांमागे लागायचे ना मिक्सरचा आवाज ह्याचा संबंध मी वेगळाच जोडला म्हणजे ती मूलं मिक्सरमध्ये…… पण तसं काही नसल्याने धक्का बसला.
26 May 2022 - 3:22 pm | नीळा
अजुनही शशक पाठवता येईल का?
26 May 2022 - 7:56 pm | राजाभाउ
+१
26 May 2022 - 8:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान
-दिलीप बिरुटे
26 May 2022 - 9:27 pm | सुखी
+१
26 May 2022 - 9:50 pm | अमरेंद्र बाहुबली
शामळू कथा क्रमांक दोन.
27 May 2022 - 12:10 am | सुक्या
+१
27 May 2022 - 12:33 pm | योगी९००
+१ आवडली.
28 May 2022 - 6:20 pm | सिरुसेरि
+१ . छान कथा श श क .
30 May 2022 - 9:38 am | भागो
+१