गाडी वेळेवर सुटली. तू मात्र उशीरा आलास.
किती वेळ हाताने तुला खुणावले. तूला सहज चढता आले असते.
पण तू मागे फिरलास. नाही चढलास. निर्दयी.
किती स्वप्ने पाहिली होती तुझ्याबरोबर. किती मनसुबे आखले होते.
आतुरतेने तुझी वाट पाहात होते. सर्वावर तू पाणी सारलेस.
तुला फरक पडला नसेल. कदाचित कळलेही नसेल तुला तू काय केलेस ते.
मी कशी एवढी चुकले? का मी तुझ्यावर विश्वास ठेवला? कोणत्या तोंडाने घरी जाऊ? त्यांना काय सांगू?
आता फक्त आठवणी.
पुन्हा तुझी न माझी भेट होईलच. मुळीच जवळ येऊ नकोस. क्षमा देखील मागू नकोस.
तुझा माझा संबंध सुटला.
मी राहेन तुझ्याविना, तुझ्या चहा व खमंग भजीपाव विना.
प्रतिक्रिया
23 May 2022 - 11:48 am | चौथा कोनाडा
+१
मस्त, खुसखुशीत, आवल्डी!
23 May 2022 - 9:09 pm | स्वलिखित
Lol
23 May 2022 - 9:55 pm | भागो
+१
23 May 2022 - 10:00 pm | सुक्या
+१
23 May 2022 - 10:59 pm | ब़जरबट्टू
आवडली
24 May 2022 - 10:31 am | विजुभाऊ
पुलंच्या पौष्टीक जीवन मधले एक वाक्य आठवले
" आणि म्हणूनच म्हणते , शेखर मला विसरून जा"
24 May 2022 - 10:32 am | विजुभाऊ
ते वाक्य म्हणजे " ए वा क " आहे.
शशक पेक्षाही जोरदार
25 May 2022 - 7:13 pm | चेतन सुभाष गुगळे
नाही कळली. यशोदाबेननी लिहिली आहे काय?
26 May 2022 - 9:18 pm | सुखी
+१
27 May 2022 - 2:25 pm | भागो
+१
आवडली
28 May 2022 - 6:22 pm | सिरुसेरि
+१ . दिवाडकर स्टॉल आठवला .