शशक'२०२२ - मी का तु?

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
23 May 2022 - 9:39 am

आमचा दोघांचा वाढदिवस एका दिवशी येतो सहाजिकच आहे कारण आम्ही जुळे भाऊ. गेल्या बर्थडेला आम्ही समुद्राच्या किनारी पार्टी केली. भरपूर दारू प्यायला वरती आम्ही पोहायला गेलो… हे सगळं डॉक्टरांच्या म्हणण्या प्रमाणे पण मला एवढेच आठवतं की मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा माझं मन पूर्णपणे कोर होत. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन मी घरी आलोय . डीसचार्ज कार्ड वर माझ नाव पेशंट1 असच नोंदल आहे. कारण जेंव्हा आम्ही दोघे किनाऱ्यावरती बेशुद्ध अवस्थेत समुद्राच्या किनारी सापडलो तेव्हा आमच्या अंगावर फक्त चड्डी होती. समोर माझा आणि भावाचा फोटो आहे दोघांच्याही चेहऱ्यावरती हसू आहे पण माझ्या मनात एकच प्रश्न मी कोण आहे आणि गेला तो कोण होता?

प्रतिक्रिया

तर्कवादी's picture

23 May 2022 - 10:45 am | तर्कवादी

हा हा
मोरल ऑफ द स्टोरी : जुळ्या आणि अगदी सारख्या दिसणार्‍या भावंडांनी २ भिन्न रंगाच्या किंवा ब्रँडच्या चड्ड्या नेहमी वापराव्यात आणि त्याची माहिती आई-वडील किंवा जवळच्या नातेवाईकांना असावी :)
बाकी या केसमध्ये आधारच्या मशीनला बोट लावून (किंवा डोळा मारुन) काही मदत होते का ते बघता येईल :)

अमरेंद्र बाहुबली's picture

23 May 2022 - 11:35 am | अमरेंद्र बाहुबली

दोघं भाऊ जिवंत असते तर सर्कस सुरू करता आली असती, दम मलंग मलंग…..

चौथा कोनाडा's picture

23 May 2022 - 11:52 am | चौथा कोनाडा

+१

हा हा हा.... आवल्डी!

चड्डीने केला घोटाळा!

एमी's picture

23 May 2022 - 12:19 pm | एमी

+१

नीळा's picture

23 May 2022 - 3:15 pm | नीळा

+१

जुळ्या भावांच्या चड्ड्या या एकाच रंगाच्या असाव्यात . त्यांचे कपडे एकाच ताग्यातून केलेले असावेत असा नियम आहे

कानडाऊ योगेशु's picture

23 May 2022 - 6:11 pm | कानडाऊ योगेशु

फार पूर्वी मराठी दूरदर्शनवर द्विधाता नावाची एक मालिका होती. विक्रम गोखले आणि बहुदा रेणुका शहाणे हे कलाकार त्यात होते.त्याची आठवण आली.
कथेचे सूत्र असलेला संवाद त्यात होता.
पण तरी शब्दबध्द केली असल्याने +१

चेतन सुभाष गुगळे's picture

25 May 2022 - 7:16 pm | चेतन सुभाष गुगळे

रेणूका? मला तर स्मिता तळवळकर असाव्यात असे वाटते.

चेतन सुभाष गुगळे's picture

25 May 2022 - 7:24 pm | चेतन सुभाष गुगळे

आताच तपासलं.

http://www.madhuent.com/index.php/indian-serials/hindi-serials-list

स्मिता तळवळकर हेच बरोबर आहे.

कानडाऊ योगेशु's picture

25 May 2022 - 7:32 pm | कानडाऊ योगेशु

होय.स्मिता तळवलकरच होत्या त्यात.

भागो's picture

23 May 2022 - 9:57 pm | भागो

+१

चेतन सुभाष गुगळे's picture

25 May 2022 - 7:22 pm | चेतन सुभाष गुगळे

जुळ्यातला एक मेला आणि दुसर्‍याचं मेमरी कार्ड फॉर्मट झालं इतकं कळालं. पण त्यात आवडावं असं काही वाटलं नाही. शिवाय जुळ्यांपैकी एकाचंही लग्न झालं नसेल ( किंवा कोणतीही रिलेशनशीप नसेल) तर यापुढचं आयुष्य दोघांपैकी कोणतीही ओळख घेऊन जगला तरी काय फरक पडणार आहे? तसंही अंतर्वस्त्रदेखील एकाच ब्रँडची आणि एकाच रंगाची वापरणारे हे भाऊ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असा कितीसा फरक असणार आहे? कोणतंही नाव लावा आणि पुढचं आयुष्य जगा. नावात काय आहे असं विल आय अ‍ॅम सेक्स फिअर? सर म्हणून गेलेत.