तो डोंगर चढत होता . एक खूप म्हातारा साधू .
त्याच्या गुरूने त्याला सांगितलं होतं , त्या शिखरावर जगाचा नियंता रहातो. आजच्या तिथीला तो भेटेल आणि त्याला सत्य सांगेल व ज्ञान देईल.
इतके दिवस तो घनदाट जंगलात राहिलेला . एकटाच . फळं अन कंदमुळं खाऊन त्याने दिवस काढले होते . आहारविहाराची सगळी पथ्यही त्याने पाळलेली होती . तो माणसांपासून लांब राहिला होता आणि स्त्रियांपासूनसुद्धा !
फक्त त्या नियंत्याचं नामस्मरण .
तो शिखरावर पोचला. त्याने त्या नियंत्याचं स्मरण केलं आणि हात जोडले .
तो प्रकट झालाच .
एकदा त्याच्याकडे पाहून नियंता म्हणाला . ‘ सत्य हे आहे की तू मूर्ख आहेस आणि ज्ञान हे आहे की ज्या पद्धतीने तू आयुष्य जगलास ते व्यर्थ आहे . ‘
प्रतिक्रिया
23 May 2022 - 10:17 am | प्रसाद गोडबोले
म्हणजे ? स्त्रीया माणसे नसतात ?
+०
23 May 2022 - 12:33 pm | चौथा कोनाडा
+१
बरोबर. स्त्रियांपासूनसुद्धा लांब राहिला म्हणजे आयुष्य जगला ते व्यर्थ आहे.
23 May 2022 - 12:47 pm | श्वेता२४
+१
23 May 2022 - 3:22 pm | नीळा
छान..
मला वाटल स्त्रियां पासुन लांब राहिला.... आणि परमेश्वर एक स्त्रीच आहे हा साक्षात्कार होतोय कि काय!
25 May 2022 - 7:28 pm | चेतन सुभाष गुगळे
आज एकामागोमाग एक इतक्या शशक वाचतोय आणि शशक या सुमार असतात या प्रमेयाची सिद्धता पटत चाललीये. असो.
2 Jun 2022 - 9:55 pm | बिपीन सुरेश सांगळे
वाचक अन प्रतिसाद्क
अन अर्थातच मतदार
साऱ्यांचा खूप आभारी आहे