Skip to main content

शशक'२०२२ - बक्षीस

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 19/05/2022 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
स्पर्धेसाठी बाबाने वेळात वेळ काढून बनवून दिलेला परीचा ड्रेस घालायला सई जराशी नाराजच होती. अशी काय परी असते का? पांढराशुभ्र गाऊन आणी काळे पंख पाठीवरच्या पेटीला जोडलेले. थोडी जड पण लागत होती ती पेटी. सगळ्या बाकीच्या पर्या रंगीबेरंगी…सोनेरी…चमकदार कपडे ..पंख मीरवत एंट्री घेत असताना ती अजुनच हीरमुसत होती. तीचा नंबर पुकारला गेला, ती स्टेजवर गेली बाबाने सांगितले होते ते खिशातले रीमोट चे बटण गुपचुप दाबताच घुर्र्रर्रर्र असा आवाज चालू होऊन ते..पत्र्याचे पंख एका वीशीष्ट कंपनतेने थरथरू लागले. आणि सई हलकेच हवेत तरंगू लागली खर्याखुर्या परी सारखी…घरी पोहोचल्यावर ती हातात बक्षीस धरून बाबाच्या प्रयोगशाळेच्या दिशेने धावत सुटली

वाचने 11952
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

या वर्षीची शशक खऱ्या अर्थाने वेगळी ठरते आहे. काही तरी करून शेवटच्या एक दोन ओळीत कसे तरी धक्कातंत्राचा अवलंब करायचा ही चाकोरी एक दोन जणांनी मोडून काढली आहे. निरागसता देखील शशक मध्ये आणता येते आणि ती मोहून टाकते हा या कथेचा अनुभव छान वाटला.

फार उत्कृष्ट नसली तरी इतर कथांपेक्षा जरा बरी आणि वेगळी म्हणून स्तुत्य प्रयत्न म्हणता येईल.