१८५७ चे स्वातंत्र्य समर

Primary tabs

रणजित चितळे's picture
रणजित चितळे in काथ्याकूट
12 May 2022 - 3:10 pm
गाभा: 

इंग्रजांच्या विरुद्ध लढलेल्या १८५७च्या स्वातंत्र्यसमराला बरीच वर्षे लोटली. इंग्रजांशी झुंजून त्यांना मागे रेटण्यात आपले स्वातंत्र्यवीर सफल झाले व आजच्याच दिवशी १६५ वर्षापूर्वी दिल्ली इंग्रजांपासून मुक्त झाली.
मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे ह्यांच्या सारख्या असंख्य हुतात्म्यांमुळे बहादूर शहा जफर भारताचा राजा झाला. भले सहाच दिवसांकरता पण झाला. इंग्रजांनी त्याचा पराभव करून दिल्लीवर परत ताबा मिळवला आणि भारताचे पहिले स्वातंत्र्य समर अयशस्वी ठरले.
इंग्रजांनी ह्या स्वातंत्र्य लढ्याला “काडतुसाला लागलेल्या गायीच्या व डुकराच्या चरबीमुळे झालेला उठाव” असे घोषित केले. इंग्रजांनी त्यांना सोयीस्कर असा इतिहास आपल्या गळी उतरवला. खरे काय घडले व किती प्रमाणात घडले ह्याचे आपल्या लोकांना अज्ञान होते व त्यामुळे ह्या लढ्याचे आपल्या लोकांना विस्मरण होऊ लागले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गेल्या शतकाच्या पहिल्या दशकात इंग्रज अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या पत्रांचा व तपशिलांचा अभ्यास करून खरा इतिहास भारता समोर ठेवला. चरबीमुळे झालेला छोट्या स्वरूपाचा उठाव नव्हे तर १८५७चे स्वातंत्र्य समर हा इतिहास लोकांना दाखवून त्यांचे अज्ञान दूर केले. प्रयत्न केले तर स्वराज्य मिळू शकते हे लोकांना पटले. भारतीय जनतेला राणी लक्ष्मी, टोपे व मंगल पांडे ह्यांच्या हौतात्म्याचे स्मरण करून दिल्यामुळे पुढे प्रोत्साहित होऊन त्यांच्या नावाचा जयजयकार करीत व ओठावर बंकीम चंद्रांच्या वंदे मातरमचा उद्घोष करीत कित्येक भारतीयांनी आपले जीवन समर्पित केले.
स्वराज्य भिकेत मिळत नाही तर हिसकावूनच घ्यावे लागते हे समजावण्याचे काम १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याने केले. ह्याचे स्मरण म्हणून ११ मे हा दिवस भारतीय स्वातंत्र्य समर दिन म्हणून दर वर्षी साजरा झाला पाहिजे.

मला वाटते सावरकरांचे १८५७ च्या इतिहासाचे प्रयत्नां मुळेच मंगल पांडे राणी लक्ष्मी ह्या तेव्हाच्या लोकांच्या विस्मृतीत गेलेल्या स्मृतींना जाग आणून दिली गेली. आपल्याला काय वाटते

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

12 May 2022 - 4:00 pm | विजुभाऊ

या इथे थोडेसे लिहीलेय या बद्दल
१८५७ अ हेरीटेज वॉक http://misalpav.com/node/18464

रणजित चितळे's picture

13 May 2022 - 10:42 am | रणजित चितळे

विजूभाऊ मला लिंक दिल्या बद्दल धन्यवाद. वाचायला घेतले आहे

विजुभाऊ's picture

12 May 2022 - 4:05 pm | विजुभाऊ

अनेक कारणे होती
http://misalpav.com/node/18312

कर्नलतपस्वी's picture

12 May 2022 - 5:08 pm | कर्नलतपस्वी

सहमत,
विजूभाऊंचे धागे वाचण्यास मीळाले.
स्वातंत्र्य लढा हे एक प्रेरणास्थान आहे. या मधे लखनौचे एक विषेश स्थान आहे. तत्कालीन ब्रिटिश मुख्यालय रेजीडेन्सी मधे झालेल्या भीषण लढाई वर अल्फ्रेड टेनिसन यांच्या "The defence of Lucknow ",पोवाड्यातील शब्द फिरंग्याची अगतिक आणी हतबल परीस्थीतीचे सटिक वर्णन करतात.

"Every man die at his post—and the foe may outlive us at last—
Better to fall by the hands that they love, than to fall into theirs!’

प्रत्येक जागेचा इतिहास वाचल्यानंतर अंगावर काटे उभे रहातात.

कंजूस's picture

12 May 2022 - 5:10 pm | कंजूस

पण इथे विजुभाऊंनी एवढी चांगली लेखमाला लिहिली होती ते आताच कळले. संपूर्ण वाचेन.

सध्याच्या परिस्थितीत ब्रिटिशांना धुडकावले, धडा शिकवला पण जफर गेला हेसुद्धा बरेच झाले. दोन्ही शत्रूच होते.

एक काव्यगत न्याय हुमायून चा मकबरा हे भारतातले मुघल साम्राज्यातले पहिले मॉन्यूमेंट.
बहादूरशहा जफरच्या समोर इंग्रजांनी त्याच्या मुलांना इथेच फाशी दिले आणि त्याला मंडाले येथे पाठवून मुघलांचे साम्राज्य कायमचे संपवले.

रणजित चितळे's picture

13 May 2022 - 10:44 am | रणजित चितळे

विस्मृतीत गेली होती म्हणा मला दिसली नव्हती. अत्यंत सुंदर सुरवात. मी एक एक धागा वाचत आहे