अस्वस्थ पाचूचे बेट

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in काथ्याकूट
11 May 2022 - 3:17 pm
गाभा: 

अतिशय अस्थिर परिस्थितीत श्रीलंकेत महिंदा राजपक्षे यांनी 9 मे 2022 ला पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. श्रीलंकेतील सद्यपरिस्थितीला राजपक्षे जबाबदार असल्याचे श्रीलंकन जनतेचे मत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी जनतेवरील कर कमी करण्याचे आश्वासन दिले होते. निवडणूक जिंकल्यावर त्यांनी ते आश्वासन पूर्ण केलेसुद्धा. त्याचबरोबर अन्य काही लोकानुनयी निर्णयही लागू केले. एकीकडे करसंकलन घटले, त्याचवेळी लोकानुनयी निर्णयांमुळे सरकारी खर्च मात्र वाढत गेला.

सरकारच्या विरोधात होत असलेली आंदोलनं थांबवण्यासाठी आणीबाणी लागू करून बळाचा वापर सुरू झाल्यावर श्रीलंकन सरकारवर आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही दबाव वाढत गेला आहे.
• शांततामय मार्गाने आंदोलन केल्यानंतरही आणीबाणीची गरज काय? - कॅनडाचे श्रीलंकेतील उच्चायुक्त मॅककिनन
• श्रीलंकेतील परिस्थिती चिंताजनक असून या देशाने त्यातून बाहेर येण्यासाठी दीर्घकालीन इपाययोजना करण्याची गरज आहे. - अमेरिकेच्या श्रीलंकेतील राजदूत ज्युली चंग
• देशात आणीबाणी लागू करण्याचा उलटा परिणामही होऊ शकतो. – युरोपीय संघ

श्रीलंका आता आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. महिंदा राजपक्षे यांचे बंधू गोटाबाया राजपक्षे राष्ट्रपती आहेत. श्रीलंकेत राजपक्षे यांनी घराणेशाही आणली असून देशातील विकासाचा सर्वाधिक लाभ तेच घराणे उचलत असल्याचा आणि श्रीलंकेच्या सद्यस्थितीला हे दोघेच जबाबरदार असल्याचा श्रीलंकन जनतेचा आरोप आहे. त्यामुळे महिंदा राजपक्षे यांच्याबरोबरच राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्याही राजीनाम्याची मागणी होत आहे. श्रीलंकेतील या परिस्थितीची पार्श्वभूमी महिंदा राजपक्षे यांच्या राष्ट्रपतिपदाच्या कार्यकाळातच तयार होत गेली होती. त्यांचा बीजिंगकडे अधिक ओढा असल्यामुळे त्यांच्या कार्यकाळात श्रीलंका चीनवर अधिकाधिक विसंबून होत गेली. त्याचवेळी श्रीलंकेने चीनच्या Belt and Road Initiative मध्ये सहभागी होऊन देशातील विविध प्रकल्प, योजनांसाठी चीनकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले. देशात थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ते आवश्यक आहे, असे त्यावेळी सांगितले जात होते. पण त्या सुमारे 8 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या कर्जाची परतफेड करणे श्रीलंकेसाठी अवघड होत गेले आहे. त्यामुळे श्रीलंकेने आपले हंबनटोट्टा बंदर प्रकल्पातील 85 टक्के भागीदारी चीनच्या कंपनीकडे हस्तांतरीत केली आहे. त्याद्वारे 1.2 अमेरिकन डॉलर्सची उभारणी केली जाणार आहे. त्याचवेळी हे बंदर 99 वर्षांसाठी चीनला वापरण्यास देण्यात आलेले आहे. आता हंबनटोट्टा बंदर चीनला वापरण्यास मिळाले आहे.

श्रीलंकेतून निर्यात होणारी ही मुख्य शेती उत्पादने आहेत. चहाच्या निर्यातीत श्रीलंका जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये याच्या उत्पादनांमध्ये मोठी घट झालेली आहे. त्याला राजपक्षे सरकारच्या कृषीविषयक धोरणांनाच जबाबदार धरले जात आहे. चहाची निर्यात, पर्यटन या क्षेत्रांमधून मिळणारे विदेशी चलनही आता मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.

भारताकडून मदत
श्रीलंकेतील शांतता, स्थैर्य राहणे भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. श्रीलंकेतील सध्याच्या अभूतपूर्व आर्थिक संकटानंतर तेथील नागरिकांचे भारतात पलायन सुरू झाले आहे. त्यामुळे श्रीलंकेची आर्थिक व्यवस्था कोलमडून पडू नये यासाठी भारताने तिकडे तातडीने मदत देण्यास सुरुवात केली आहे. जानेवारी 2022 पासून भारताने विविध श्रीलंकेला 3.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत केलेली आहे. त्यात मदत म्हणून 50 कोटी अमेरिकन डॉलर्सचे कर्ज देण्यासंबंधीचा करार फेब्रुवारी 2022 मध्ये करण्यात आला आहे. भारताने आतापर्यंत सुमारे दीड लाख टन इंधन तिकडे पाठवले आहे. पहिल्या चार टप्प्यांमध्ये भारताची मदत श्रीलंकेत पोहचली असून मे अखेरीपर्यंत आणखी पाच टप्प्यात पुढील मदत पाठवली जाणार आहे. त्याशिवाय अन्न, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी एक अब्ज अमेरिकन डॉलरचे मदतरुपी कर्ज श्रीलंकेला दिले जात आहे. भारताने श्रीलंकेला 40 कोटी अमेरिकन डॉलर्सचे परकीय चलन आणि इंधन खरेदीसाठी 50 कोटी अमेरिकन डॉलर्स देणार आहे. तसेच, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सेंट्रल बँक ऑफ श्रीलंकेने घेतलेल्या कर्जाचे हप्तेही भरण्यासाठी सवलत दिली आहे.

भारताच्या या महासागरातील नाविक वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी चीनच्या हालचाली सुरू आहेत. त्यातून तो श्रीलंकेशी जवळीक वाढवत आहे. अशा विविध बाबी विचारात घेऊन भारताने श्रीलंकेला तातडीने मदत देऊ केली आहे.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/05/blog-post_11.html

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

11 May 2022 - 3:52 pm | प्रसाद गोडबोले

जुन्या आठवणी जागा झाल्या :
कझाखस्तानमधील अशांतता https://www.misalpav.com/node/49784
ह्या नावाचा धागा इथे आला होता अन त्यावर अनेकांना अशीच अशांतता भारतात येईल अशा अर्थाचे डोहाळे लागलेले होते . त्यानंतर चार महिने उलटुन गेलेले आहेत तरी भारतात काही अशांतता नाही . इथे सारं क्षेमकुशल आहे ह्याचा मनापासुन आनंद वाटतो.

लोकं झक मारत पेट्रोल वरील वाढीव टॅक्स भरत आहेत .
काही लोकं बिनधास्त सुप्रीम कोर्टाचे नियम फाट्यावर लाऊन स्पीकर वाजवत आहेत .
काही लोकं त्याला अल्टिमेटम देत आहेत अन राज्य सरकर कायदा मोडणार्‍याला सोडुन कायदा पाळा म्हणणार्‍यांना नोटीसा बजावत आहे .
भिडे गुर्जींन्ना अन एकबोटेंना क्लीनचीट मिळत आहे अन अर्बननक्षल्यांना साधे खाजगी रुग्णालयात ट्रीटमेंट घ्याय्ची परवानगी नाकारली जात आही.
फुले पागोट्याच्या आग्रह धरणारे साहेब जितो च्या कार्यक्रमात स्वतःच पेशवाई बामणी पगडी घालत आहेत.
आरबीआय रेपो रेट वाढवुन सामान्यांचे कंबरडे मोडत आहे . महागाईने आधीच लोकांची ठासली असुन हा शब्द बदलुन महाघोडा करायची वेळ आलीये .

तरीही सर्व काही क्षेम कुशल आहे , कुठेही काही टोकाचा हिंसाचार नाही , सारं काही उत्तम आहे !

देवा ह्या भारतदेशावर तुझी अशीच कृपादृष्टी ठेव __/\__

स्वस्ति: प्रजाभ्यः परिपालयंतां न्यायेन मार्गेण महीं महीशाः ।
गो ब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनोभवंतु ॥

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः

कंजूस's picture

11 May 2022 - 4:14 pm | कंजूस

तुलनात्मक पाहता आपला देश मोठा आहे, इथे काही उद्योगी लोक आहेत आणि आपण केवळ पर्यटनावर अवलंबून नाही.
आफ्रिकन देशांत खूप वनसंपत्ती, अभयारण्य पर्यटन आणि खनिजं यावर टिकून असलेले देश आता ते संपत आल्यामुळे भिकेला लागले आहेत.

काही तरी फालतू भावनिक गोष्टी ना बळी पडून चुकीच्या लोकांना निवडून दिले की ही वेळ येतेम
श्रीलंकन नागरिकांना त्यांच्या कर्माची फळ मिळत आहेत.
ज्या देशात,वंश,धर्म,जात ह्या वर लोकप्रतिनिधी निवडून येतात ,सरकार निवडले जाते त्या सर्व देशांची अवस्था श्री लांकेसारखी होण्याची तीव्र शक्यता असते.
भारताच्या आर्थिक स्थिती वर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.