कॅवलरी टँक म्युझियम (रणगाडा संग्रहालय) - अहमदनगर

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
22 Apr 2022 - 1:20 pm

.container1 {
position: relative;
width: 100%;
overflow: hidden;
padding-top: 56.25%; /* 16:9 Aspect Ratio */
}
.responsive-iframe {
position: absolute;
top: 0;
left: 0;
bottom: 0;
right: 0;
width: 100%;
height: 100%;
border: none;
}
.my-heading {
background-color : #f0f0f0;
color : #000;
margin-top :16px;
margin-bottom :16px;
padding : 12px;
font-size : 17px;
font-weight : bold;
border : 1px dashed #9fa9a3
}
.notes {
background-color : #f0f0f0;
color : #000;
margin :16px;
padding : 12px;
border : 1px solid #9fa9a3;
}

१६ एप्रिल २०२२ रोजी अहमदनगर शहरातील आशिया खंडातील पहिले (आणि बहुतेक एकमेव) अशी ख्याती असलेले “कॅवलरी टँक म्युझियम” अर्थात ‘रणगाडा संग्रहालय’ पहाण्याचा योग आला.

अहमदनगर - सोलापूर रस्त्यावर शहराच्या ‘इवळे’ परीसरात प्रचंड मोठे क्षेत्रफळ व्यापणाऱ्या ह्या रणगाडा संग्रहालयाच्या प्रवेशाच्या कमानीच्या दोन्ही बाजुंना भारतीय बनावटीचे ‘विजयंता’ रणगाडे ठेवले आहेत. गमतीची गोष्ट म्हणजे भर रस्त्यात, उघड्यावर ठेवलेल्या ह्या रणगाड्यांचे आणि कमानीचे फोटो काढण्यास मनाई आहे.

कमानी जवळ तैनात असलेल्या जवाना कडील रजीस्टर मध्ये आपले नाव, गाव, फोन नंबरची नोंद केल्यावर तिथुन सुमारे दिड ते दोन की.मी. अंतरावर असलेल्या संग्रहालयाकडे जाण्याचा आपला मार्ग खुला होतो.

आतल्या रस्त्याच्या दुतर्फाही वेगवेगळ्या बनावटीचे रणगाडे ठेवले आहेत. त्यापैकी काही रणगाड्यांची चालत्या गाडीतून टिपलेली छायाचित्रे-

1

2

3

4

पार्किंग जवळ ठेवलेला ‘टोपाझ’ (Topaz) रणगाडा

5

शक्तीशाली इंजिन, २० सैनीक वाहुन नेण्याचा क्षमता, ३६० अंशातून बाहेर लक्ष ठेवण्याची सोय असलेला आणि जमीनीवरून तसेच पाण्यातुनही जाऊ शकणारा अशी अनेक वैशिष्ट्ये असणारा उभयचर गटातला हा रणगाडा पुर्वाश्रमीचा चेकोस्लोव्हाकिया आणि पोलंडने संयुक्तरीत्या तयार केला होता.

१९६४ मध्ये चेकोस्लोव्हाकिया आणि १९६६ मध्ये पोलंडने वापरात आणलेला हा रणगाडा पुढे भारत, अंगोला, बल्गेरिया, ईजिप्त, ईराक, लिबिया, मोरोक्को आणि सुदान अशा देशांच्या सैन्यदलांत दाखल झाला होता.

‘टोपाझ’ रणगाड्याचा अंतर्भाग -

topaz

6

पार्किंग पासुन सुमारे दीडशे मीटर अंतरावर तिकीट काउंटर असुन
लहान मुलांसाठी ₹ २५/-
मोठ्यांसाठी ₹ ५०/-
फोटोग्राफी साठी ₹ ५००/-
असे तिकिटांचे दर आहेत.

7

आधुनिक स्वयंचलित रणगाड्यांचा वापर विसाव्या शतकात सुरु झाला असला तरी त्यांचा इतिहास पंधराव्या शतकापासून सुरु होतो.

रणगाड्याची मूळ संकल्पना पंधराव्या शतकातला सुप्रसिद्ध चित्रकार आणि संशोधक 'लिओनार्दो दा विंची' (Leonardo da Vinci) ह्याने सर्वप्रथम मांडली होती आणि चिलखती वॅगन वर तोफ बसवून रणगाडा सदृश्य वाहन तयार करून पहिल्यांदा त्याचा प्रत्यक्ष रणभूमीवर वापर करण्याचे श्रेय पंधराव्या शतकातला पराक्रमी चेक जनरल 'जन जिझका' (Jan Zizka) ह्याला जाते.

रणगाड्यांचा इतिहास दर्शवणारा फलक-
info

1994 साली लष्कराचे तत्कालीन जनरल बी. सी. जोशी ह्यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या ह्या संग्रहालयात चाळीस-पंचेचाळीस रणगाडे आणि काही रणगाड्यांच्या प्रतीकृती, त्यांचे फोटोज व भारतीय सेनेच्या पराक्रमाची गौरवशाली गाथा दर्शवणाऱ्या दोन गॅलरीज इथे आपल्याला बघायला मिळतात.

सुरुवातीला प्रत्येक रणगाड्याचे बारकाईने निरीक्षण करण्यात आणि त्यांची वैशिष्ट्ये समज़ुन घेण्यात बराच वेळ घालवत होतो पण घरच्या मंडळींना वेळेचे भान होते (आणि त्यांना भुकही प्रचंड लागली होती) त्यामुळे पुढचे काही रणगाडे आणि गॅलरीज बघण्याचा कार्यक्रम घाईघाईने उरकावा लागला.

तिथे पाहीलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण रणगाड्यांचे फोटो + माहिती आणि बाकीच्यांचे फक्त फोटोज खाली देत आहे.

‘रोल्स रॉइस’ (Rolls Royce)

8

9

डिसेंबर १९१४ मध्ये रोल्स रॉइसच्या ‘सिल्व्हर घोस्ट’ ह्या कारचे रूपांतर चिलखती वाहनात केले गेले आणि हे त्या काळातील सर्वात यशस्वी आर्मर्ड कॉर्प्स वाहन ठरले.
पहिल्या महायुद्धात त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. ह्या चिलखती वाहनाचे पराक्रम फ्रान्स, इजिप्त, पूर्व आफ्रिका आणि रशियामध्ये युद्धकाळात पाहायला मिळाले. दोन्ही महायुद्धांच्या दरम्यान ब्रिटिश राजवटीत पोलिस दलासाठी आणि अंतर्गत सुरक्षेसाठी ह्या वाहनाचा वापर केला जात असे.

१३ एप्रिल १९१९ या दिवशी पंजाबमध्ये झालेल्या कुप्रसिद्ध जालियनवाला बाग हत्याकांडाच्यावेळी जनरल डायरने ह्याच कारचा उपयोग केला होता असे म्हणतात.

१९२० मध्ये तिचे इंजिन अपग्रेड केले गेले आणि स्पोक व्हील्सच्या ऐवजी डिस्क व्हील्स बसवण्यात आली.
१९२१ मध्ये त्यावर टरेट (Turret) बसविण्यात आले आणि त्यात मशीन गन बसवण्यात आली होती ज्याला व्हिकर म्हणतात, तसेच मागील चाकांचा आकार मोठा करण्यात आला. तिच्या टरेट मधुन आत बसलेल्या क्रूला पुढे असलेल्या क्षेत्राचे दृश्य स्पष्ट दिसण्यासाठी त्यावर लहान छिद्रे ठेवली आहेत.
६ सिलेंडरचे पेट्रोल इंजिन बसवण्यात आलेल्या ह्या कारची वेगमर्यादा ताशी ४५ कि.मी. होती.

‘शर्मन क्रॅब' (Sherman Crab)

10

शत्रूने पेरलेले भुसुरुंग नष्ट करत मागून येणाऱ्या सैन्याचा मार्ग मोकळा करण्याच्या उद्देशाने ब्रिटिश आर्मीसाठी 1944 साली विकसित करण्यात आलेला 'शर्मन क्रॅब' हा अवाढव्य आकाराचा रणगाडा मला फारच आवडला, बाहुबली सिनेमातील भल्लालदेवचा फिरती पाती बसवलेला रथच आठवला एकदम.

हा रणगाडा समोरून येताना पाहून शत्रू सैन्याची काय अवस्था होत असेल ह्याची कल्पना त्याचे अक्राळ विक्राळ रूप बघूनच येते.

शत्रूपक्षाने जमिनीत पेरलेले भुसुरुंग उखडून पुढे फेकून देण्यासाठी किंवा त्यांचा जाणीवपूर्वक स्फोट घडवून आणण्यासाठी ह्याच्या पुढे 'mine flail' उपकरण बसवले असून त्याच्या फिरत्या ड्रमला खालच्या टोकाला लोखंडी गोळे असलेल्या जमिनीपर्यंत लोंबकळणाऱ्या दणकट साखळ्या जोडलेल्या आहेत. ह्याची मजबुती एवढी आहे की पुढे भुसुरुंगाचा स्फोट झाला तरी ह्याचे काही नुकसान होत नसे.

ह्या रणगाड्याची काही वैशिष्ट्ये -
उत्पादक : ब्रिटन
वापरकर्ते: ब्रिटन, युनायटेड स्टेट्स आणि कॅनडा
लांबी: 6.6 मीटर
रुंदी: 2.62 मीटर
उंची: 2.74 मीटर
वजन: 31.6 टन
कमाल वेग: ताशी 40 किमी आणि डी-माइनिंगचे काम सुरु असताना ताशी 1.5 किमी
मुख्य शस्त्रास्त्र: एक 75 मिमी तोफ
दुय्यम शस्त्रास्त्र: सह-चालकासाठी एक ब्राउनिंग 7.62 मिमी मशीन गन आणि टरेट मधून आणखीन एक ब्राउनिंग 7.62 मिमी मशीन गन
इंजिन: 6 सिलेंडरचे पेट्रोल इंजिन
क्रू सदस्य : 5 (कमांडर, गनर, रेडिओ ऑपरेटर, चालक, सह-चालक)

ह्या रणगाड्याच्या रिमोट कंट्रोल्ड मॉडेलचा खाली एम्बेड केलेला युट्युब वरील व्हिडीओ बघून त्याच्या कार्यशैलीची थोडीफार कल्पना येते.

'चर्चील ब्रिज लेयर' (Churchill Bridge Layer)

11

12

आधीच्या 'चर्चील' रणगाड्यात काही सुधारणा करून 1942 साली तयार करण्यात आलेला 'चर्चील ब्रिज लेयर' हा रणगाडा म्हणजे अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना आहे. हायड्रॉलीक तंत्रज्ञानाचा वापर करून केवळ 2 मिनिटात 30 फूट लांबीचा अतिशय मजबूत पूल सैन्याला वापरासाठी उपलब्ध करून देण्याची ह्याची क्षमता होती.

दुसऱ्या महायुद्धात इटली आणि वायव्य युरोपमध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावणारा हा रणगाडा 1960-1961 पर्यंत सेवेत होता.

ह्या रणगाड्याचे कार्य कशापद्धतीने चालायचे हे खालील छोट्याशा व्हिडीओत पाहता येईल.

'विजयंता' (Vijayanta)

13

14

14-a

ब्रिटनच्या 'ब्रिटिश व्हिकर्स लिमिटेड' कंपनीने 1963 मध्ये विजयंताचे प्रोटोटाईप तयार करून दिल्यावर त्यात काही सुधारणा करून चेन्नईजवळील आवडी येथील हेवी व्हेईकल फॅक्टरीमध्ये ह्या रणगाड्यांचे उत्पादन सुरु झाले. संपूर्णपणे भारतीय बनावटीचा पाहिला रणगाडा अशी 'विजयंता' ची ओळख आहे.

ताशी 50 किमी वेगाने चालू शकणाऱ्या ह्या रणगाड्याचे वजन 43 टन होते.

105 मी. मी. ची तोफ आणि मशिनगन्सने सुसज्ज असलेल्या विजयंता रणगाड्यांनी 1971 च्या भारत - पाकिस्तान युद्धात मोलाची कामगिरी बजावली होती.

1966 पासून भारतीय लष्कराच्या विविध चिलखती तुकड्यांत दाखल झालेल्या विजयंता रणगाड्यांना 2004 साली निवृत्त करण्यात आले.

'जर्मन फ्लॅक - अँटी एअरक्राफ्ट/आर्मर फिल्ड गन' (German FLAK Anti Aircraft/Armour Field Gun)

15

हिटलरच्या नाझी सैन्याकडून प्रभाविपणे वापरली गेलेली अँटी एअरक्राफ्ट गन. हिला FLAK हे नाव 'Flugabwehrkanone' ह्या जर्मन शब्दावरून दिले गेले ज्याचा अर्थ होतो 'aircraft defense cannon'.
30,000 फुटांपेक्षा अधिक उंचीवरच्या लक्ष्याचा भेद करण्याची हिची क्षमता होती.

'8RAD (श्वेरर पॅंझरस्पॅहवॅगन) / Schwerer Panzerspahwagen'

16

17

दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या पॅंझर रणगाड्यांनी धडाकेबाज कामगिरी करत घवघवीत यश प्राप्त केले होते त्या पथकातील ही आर्मर्ड कार. हिचा उपयोग मुख्यत्वे शत्रूच्या प्रदेशात शिरून टेहाळणी करणे आणि त्याच्या लष्करी छावण्या, युद्ध सज्जता, रसदीची माहिती मिळवणे ह्या कामांसाठी केला जात असे.

-----

आता ह्यापुढे बाकीच्या रणगाड्यांचे फक्त फोटोज देत आहे. इच्छुक्कांना त्यांच्या बद्दलची तपशीलवार माहिती https://tanks-encyclopedia.com/ ह्या वेबसाईट किंवा विकीपीडिया वर मिळू शकेल.

'Lion' (Bakhtawar)

18

'शर्मन' (Sherman)

19

19-a

'टी 54' (T 54)

20

20-a

'चाफी' (Chaffee)

21

21-a

'एम 48 पॅटन' (M 48 Patton)

23

24

'वॉकर बुलडॉग' (Walker Bulldog M 41)

26

26-a

'ए 9 क्रूझर' (A 9 Cruiser)

27

'एम 3 ग्रॅण्ट' (M3 Grant)

28

'स्टुअर्ट' (Stuart M3 A3)

29

'एल वाय एन एक्स १' (LYNX1)

30

30-a

'एस पी सेक्स्टन' (SP Sexton)

31

'एस पी आर्चर' (SP Archer)

32

'चर्चील' (Churchill)

33

'शर्मन डी डी' (Sherman DD)

34

'एल व्ही टी (ए) 4 [LVT (A) 4]

35

-----

अशा गोष्टींची आवड असणाऱ्यांनी आवर्जून बघावे असे हे संग्रहालय आहे. तीन ते चार तासांचा वेळ हाताशी असल्यास अगदी व्यवस्थित बघता येईल, आत भरपूर झाडे असल्याने उन्हाचा त्रासही होत नाही. ह्याच संग्रहालयाच्या आवारात 'फरिया पॅलेस' ही प्राचीन वास्तुही आहे परंतु वेळे अभावी आम्हाला ती बघता आली नाही.

प्रतिक्रिया

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

22 Apr 2022 - 3:24 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान फोटो व माहिती.

Bhakti's picture

22 Apr 2022 - 3:34 pm | Bhakti

उत्तम माहिती!
‘शर्मन क्रॅब' आवडतो.
१५ ओगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी बरीच गर्दी होते.तेव्हा प्रवेश मोफत असतो.वातावरणही देशभक्तीने भारावलेल्या असत .

टर्मीनेटर's picture

23 Apr 2022 - 5:53 pm | टर्मीनेटर

‘शर्मन क्रॅब' आवडतो.

मला जामच आवडला.

१५ ओगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी बरीच गर्दी होते.तेव्हा प्रवेश मोफत असतो.वातावरणही देशभक्तीने भारावलेल्या असत .

अरे वाह!

सर्व रणगाडयांच्या शेड मध्ये लावलेल्या स्पीकर्स वर त्या दिवशीही सतत देशभक्तीपर गाणी वाजत होती जसे की "कर चले हम फिदा जानो तन साथीयो..." वगैरे वगैरे. त्यामुळे माहौल छान तयार झाला होता.

कर्नलतपस्वी's picture

22 Apr 2022 - 6:05 pm | कर्नलतपस्वी

छान फोटो व माहिती.धन्यवाद.

प्रतिसादासाठी धन्यवाद ॲबसेंट माइंडेड आणि कर्नल साहेब 🙏

वामन देशमुख's picture

23 Apr 2022 - 8:20 am | वामन देशमुख

सचित्र माहिती देणारा लेख आवडला.
---
अवांतर: भारतातील अनेक शहरांमध्ये ठिकठिकाणी वेगवेगळे रणगाडे ठेवलेले दिसतात. ते रणगाडे, १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचे पकडलेले आहेत का?

जेसलमेर जवळील प्रत्यक्ष रणभूमीवर उभारलेल्या लोंगेवाला स्मारकात पाकिस्तानी रणगाडे दिसतात.
(फोटो 3 मिहिन्यापूर्वी मुलीच्या राजस्थान भेटीतला)

टर्मीनेटर's picture

23 Apr 2022 - 6:11 pm | टर्मीनेटर

वाह! झकास फोटो.
राजस्थानला ३ वेळा गेलोय पण लोंगेवाला येथे जायचे अजून बाकी आहे.

टर्मीनेटर's picture

23 Apr 2022 - 6:08 pm | टर्मीनेटर

भारतातील अनेक शहरांमध्ये ठिकठिकाणी वेगवेगळे रणगाडे ठेवलेले दिसतात. ते रणगाडे, १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचे पकडलेले आहेत का?

तसे नसावे! आमच्या डोंबिवली मध्ये पंधरा-वीस वर्षांपूर्वी (नक्की साल आठवत नाही) एम आय डी सी परिसरातील घरडा सर्कल येथे तत्कालीन नगरसेवक कै. नंदू जोशी ह्यांच्या प्रयत्नातून 'विजयंता' रणगाडा आणून एका चौथऱ्यावर त्याची स्थापना केली गेली. पुढे त्यांच्याच पुढाकाराने २००३ साली काश्मीर मध्ये अतिरेक्यांशी लढताना विरमरण आलेले 'कॅप्टन विनयकुमार सच्चान' ह्या डोंबिवलीच्या सुपुत्राचे स्मारक व कायमस्वरूपीप्रदर्शन ह्या रणगाड्या शेजारी बांधण्यात आले.

बहुदा लष्करी सेवेतून निवृत्त केलेले रणगाडे विविध शहरांमध्ये ठेवले जात असावेत असा माझा अंदाज.

चौथा कोनाडा's picture

24 Apr 2022 - 7:57 am | चौथा कोनाडा

पुण्यातल्या संभाजी पार्कात १९७१ युध्दातील पाकिस्तानचा रणगाडा पाहण्यासाठी ठेवलेला आहे. अशी शौर्याची प्रतीके पाहिली की छाती गर्वाने फुलते!

जय जवान, जय किसान !
जय हिंद!

कर्नलतपस्वी's picture

27 Apr 2022 - 2:38 pm | कर्नलतपस्वी

बहुदा लष्करी सेवेतून निवृत्त केलेले रणगाडे विविध शहरांमध्ये ठेवले जात असावेत असा माझा अंदाज.

आपला आदांज बरोबर आहे. शाळा,शहरातील प्रमुख ठिकाणी सेवानिवृत्त रणगाडे,तोफा अन्य उपस्कर डिसप्ले केली जातात.नागरिकांमध्ये विषेशतः तरुणाई मधे,सैन्य सेवेबद्दल आदर,आकर्षण निर्माण करणे हाच मुख्य उद्देश आसतो.

सुबोध खरे's picture

27 Apr 2022 - 8:02 pm | सुबोध खरे

सध्या सेवेत असलेले रणगाडे नादुरुस्त झाले तरी त्यातील सुटे भाग काढून इतर चालू रणगाड्यात वापरले जातात आणि सुट्या भागावरील खर्च कमी केला जातो.(cannibalisation)

यामुळे सेवेत असलेले रणगाडे ( किंवा विमाने किंवा कोणतीही लष्करी सामुग्री) असे सहसा प्रदर्शनार्थ ठेवलेले दिसत नाहीत.

कर्नलसाहेब आणि डॉ. सुबोध खरे, चांगली माहिती दिलीत.

गोरगावलेकर's picture

23 Apr 2022 - 12:04 pm | गोरगावलेकर

खूप सुंदर फोटो आणि
माहितीपूर्ण लेख आवडला.

चौथा कोनाडा's picture

23 Apr 2022 - 1:01 pm | चौथा कोनाडा

अतिशय छान माहिती आणि सुंदर प्रचि.
अनगर ला गेल्यास बघावेच लागेल.

अनिंद्य's picture

23 Apr 2022 - 3:23 pm | अनिंद्य

३-५ वर्षांपूर्वी मलाही योग आला हे संग्रहालय बघण्याचा. छान आहे, वेल केप्ट!

… संग्रहालयाच्या आवारात 'फरिया पॅलेस' ही प्राचीन वास्तुही आहे…

ते फ़राह बक्श बाग आहे १५८३ च्या आसपासचे बांधकाम. त्यातल्या काही unique architectural features बद्दल लिहिले होते मी कुठेतरी. मुगल बादशाहाविरुद्ध बंड करून शहज़ादा जहांगीर इथे वर्षभर राहिला होता. स्थानिक राज्यकर्ता मुर्तज़ा निझाम शाहने त्याला विनाअट आश्रय दिला होता.

> ते फ़राह बक्श बाग आहे १५८३ च्या आसपासचे बांधकाम.

हेच लिहिणार होतो. इथे सदाशिवराव भाऊ राहून गेलेले आहेत. औरंगझेबसुद्धा राहिल्याचा उल्लेख आहे, अशी महत्त्वाची जागा आहे.

टर्मीनेटर's picture

26 Apr 2022 - 12:43 pm | टर्मीनेटर

ते फ़राह बक्श बाग आहे १५८३ च्या आसपासचे बांधकाम.

अनिंद्य आणि मनो साहेब ह्या माहितीसाठी आभारी आहे.
संग्रहलयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर डावीकडे ह्या बागेकडे जाणारे वळण आहे तिथे खालील बोर्ड लावला आहे.

1
(फोटो जालावरून साभार)

अशा महत्वपूर्ण प्राचीन वास्तूचे नाव इथे चुकीच्या पद्धतीने का लिहिले असावे हा प्रश्न पडला!

अनिंद्य's picture

23 Apr 2022 - 3:24 pm | अनिंद्य

उत्तम सचित्र परिचय.

टर्मीनेटर's picture

23 Apr 2022 - 6:15 pm | टर्मीनेटर

धन्यवाद चौथा कोनाडा आणि अनिंद्य 🙏

@ चौथा कोनाडा - अवश्य भेट द्या, फार छान आहे हे संग्रहालय.

@ अनिंद्य - पूरक माहितीसाठी आभारी आहे.

जेम्स वांड's picture

23 Apr 2022 - 6:35 pm | जेम्स वांड

थोडी धावती पण एकंदर सचित्र मेवायुक्त धागा मेजवानी आवडलेली आहे बॉस, मस्त आहे एकदम फोटोज वगैरे, तीन नंबर फोटो हा मुळात टॅंक नसून आर्मर्ड पर्सनल कॅरियर (एपीसी) आहे, तिच्यावर बसवलेली एक गन असते बहुतेक (तोफ नाही), थलसेनेतील मेकनाईज्ड इनफंट्री विभाग ही वाहने वापरतो, इनफंट्री सैनिकांची वेगवान अन सुरक्षित वाहतूक करण्याच्या हेतूने आर्मर्ड पर्सनल कॅरियर वाहनांची सुरुवात झाली असे म्हणतात. लष्कराच्या ह्या विभागात कॅप्टन रघुरामन हे प्रसिद्ध पब्लिक स्पीकर अन वक्ते तैनात होते असे युट्युबवर बघितल्यासारखे आठवते, एपीसी अन मेकनाईज्ड इनफंट्री बद्दल त्यांनी बरेच काही सांगितले होते एका भाषणात त्यांच्या.

चुभुदेघे. मी चुकलो असल्यास तज्ञ मंडळींनी चूक सुधारावी ही नम्र विनंती.

टर्मीनेटर's picture

23 Apr 2022 - 6:59 pm | टर्मीनेटर

तीन नंबर फोटो हा मुळात टॅंक नसून आर्मर्ड पर्सनल कॅरियर (एपीसी) आहे, तिच्यावर बसवलेली एक गन असते बहुतेक (तोफ नाही)

बरोबर असावे तुमचे म्हणणे!
मुख्य संग्रहलयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दूतरफा ठेवलेले हे रणगाडे तसे दूरवर आहेत, भर उन्हात (४२° तापमानात) त्यांच्या जवळ जाऊन माहिती फलक वाचणे शक्य नसल्याने त्यांची नावे आणि वैशिष्ट्ये समजून घेता आली नाहीत!

टर्मीनेटर's picture

23 Apr 2022 - 7:15 pm | टर्मीनेटर

बाकी "जुगाड" हा भारतीय लोकजीवनाचा किती अविभाज्य भाग आहे हे देखील ह्या संग्रहालयात पाहायला मिळाले 😀

'SP Sexton' ह्या रणगाड्याच्या तोफेचे मूळचे नळकांडे बेपत्ता असल्याने त्याजागी चक्क (रस्त्यावर उभारले असायचे त्यातला) जुना टेलिफोनचा खांब लावला आहे हे आपल्या नजरेतून सुटत नाही!

कुमार१'s picture

23 Apr 2022 - 6:45 pm | कुमार१

एकाहून एक भारी आहेत फोटो
मजा आली

टर्मीनेटर's picture

23 Apr 2022 - 7:00 pm | टर्मीनेटर

धन्यवाद कुमार सर 🙏

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Apr 2022 - 8:00 pm | ज्ञानोबाचे पैजार

फक्त विजयंता आणि पॅटर्न हे दोनच रणगाडे माहीत होते, नक्की भेट द्यायला पाहिजे

पैजारबुवा,

Trump's picture

23 Apr 2022 - 11:03 pm | Trump

जर्मन ४ मजली रणगाडा: नाव उंदीर - १०००

Trump's picture

23 Apr 2022 - 11:07 pm | Trump

भारतीय बनावटीचा एकाद दुसरा रणगाडा असता तर बरे वाटले असते. अर्जुन किंवा तत्सम रणगाडा सुध्दा हवा.

जेम्स वांड's picture

24 Apr 2022 - 9:37 am | जेम्स वांड

पण मला वाटतं संग्रहालय म्हणजे गतवैभवाची जंत्री असते, तिथे सध्या लाईव्ह सुरू असलेल्या प्रकल्पाचा नमुना ठेवणे असंयुक्तिकच नाही तर सिक्युरिटीच्या दृष्टीने पण चूक असेल.

माझ्या वाचनाप्रमाणे, टॅंक आणि रणगाडे बनवणे हे अतिशय उच्च दर्जाचे तंत्र असते, प्रत्येक देश आपल्या रणगाड्याचे डिझाईन, ऑपरेशनल डिटेल्स, विशेषतः चिलखतात वापरलेले तंत्रज्ञान वगैरे फारच सेफली गार्ड करत असतो, चिलखत हा तर एक स्वतंत्र विषय असतो, भारतात ह्या विषयात एकंदरीत प्रगती अत्युच्च आहे का नाही हे माहिती नाही पण मजबूत अटॉमीक मास असणारी मटेरियल्स चिलखत बनवायला वापरली जातात, अगदी डीपलिटेड युरेनियम सुद्धा, टेनिस बॉल इतका डीपलिटेड युरेनियमचा चेंडू दहा दहा किलोचा पण असू शकतो, अश्या कारणाने त्याच्या आर्मर प्लेट्स केल्या की टॅंकला अभेद्य मजबुती मिळते, कित्येक देश टॅंकचे कवच फोडायला ह्याच डीपलिटेड युरेनियमचे गोळे अन गोळ्या पण बनवण्याच्या प्रयोगात आहेत, स्पेशली अँटी मटेरियल रायफल्स मध्ये वापरले जाणारे राउंड बनवण्याच्या.

अश्या सगळ्या डायनॅमिकमुळे अर्जुन सारखा अत्याधुनिक तिसऱ्या पिढीतील टॅंक असा संग्रहालयात डिस्प्लेवर ठेवणे मला तरी उचित वाटत नाही.

तांत्रिक माहितीयुक्त प्रतिसाद आवडला 👍

टर्मीनेटर's picture

26 Apr 2022 - 11:29 am | टर्मीनेटर

भारतीय बनावटीचा एकाद दुसरा रणगाडा असता तर बरे वाटले असते.

'विजयंता' हा भारतीय बनवटीचा रणगाडा ठेवला आहे. 'अर्जुन' रणगाडा हा लष्करी सेवेत रुजू आहे त्यामुळे खराखुरा रणगाडा न ठेवता त्याची प्रतिकृती इथल्या गॅलरीत बघायला मिळते.
वांड भाऊंनी म्हंटल्या प्रमाणे सेनादलत कार्यरत असलेला रणगाडा संग्रहलयात ठेवणे संयुक्तीक नाही, तसेच ६५ ते ७० कोटी रुपये किंमत असलेला हा (कार्यरत) रणगाडा कायमस्वरूपी प्रदर्शनात अडकवून ठेवणे व्यवहार्यही नाही!
वरचा अजस्त्र जर्मन रणगाड्याचा व्हिडिओ आवडला 👍

कंजूस's picture

24 Apr 2022 - 12:36 am | कंजूस

फोटोग्राफी रु ५०० ? दिले?

जेम्स वांड's picture

24 Apr 2022 - 9:26 am | जेम्स वांड

प्रत्येकजण कंजूस नसतो हो काका &#129315 &#129315 &#129315

कृ ह घ्या

हो, सेनादलांविषयी प्रचंड आदर असल्याने आनंदाने दिले!
अर्थात तिथे पाहायला मिळालेल्या कित्येक दुर्मिळ अशा (आणि एकत्रित पणे काही हजार कोटी रुपये किंमतीच्या) रणगाड्यांचे फोटो काढता आले त्यपुढे हे शुल्क तसे कमीच वाटले.

नै तर मी कसला जातोय तिकडे.

टर्मीनेटर's picture

2 May 2022 - 1:03 pm | टर्मीनेटर

😀

सुबोध खरे's picture

3 May 2022 - 7:21 pm | सुबोध खरे

आताच मार्च मध्ये मी जोधपूर आणि जैसलमेर ला गेलो असताना जैसलमेर येथे असलेल्या युद्ध संग्रहालयास भेट दिली.

https://en.wikipedia.org/wiki/Jaisalmer_War_Museum

https://indianarmy.nic.in/writereaddata/documents/jslmwarmuseumwebsite/i...

तेथे लौंगेवाला येथे झालेल्या युद्धाची इत्यंभूत माहितीअसणारा एक विभाग होता.

बॉर्डर या चित्रपटात याचीच कहाणी आहे.

ते संग्रहालय पाहण्यासाठी आम्ही एक गाईड सुद्धा केला. गाईड एका तेथेच( जैसलमेर ठाण्यात) तैनात असलेल्या लष्कराच्या सुभेदाराची पत्नी होती. तेथे मी सुद्धा कॅमेरा शुल्क १०० रुपये गाईड शुल्क १०० रुपये आणि आमच्या चार जणांचे तिकीट ४०० रुपये असे ६०० रुपये भरले संपूर्ण संग्रहालय पाहिले त्यावेळेस मी माझ्या कुटुंबियांना शस्त्रास्त्रे आणि विमाने यांची बरीच माहिती देत होते.

ते पाहून त्या गाईड नि मला विचारले सर तुम्हाला हे कसे माहिती मी शांतपणे तिला म्हणालो कि मॅडम मी लष्कराच्या वैद्यकीय विभागातून कर्नल हुद्द्यावर निवृत्त झालो.

त्यावर ती ओशाळून म्हणाली कि सर तुम्ही हे अगोदर सांगितले असते तर तुम्हाला तिकीट लागले नसते.

मी तिला शांतपणे हसत म्हणालो कि लष्करासाठी माझ्या खिशातून दोन पैसे गेल्याचे मला कधीच वाईट वाटणार नाही.

आपण इतक्या ठिकाणी वायफळ खर्च करत असतो त्या ऐवजी अशा विधायक कामाला पैसे द्यायला मला आनंदच होईल.

कंजूस's picture

3 May 2022 - 7:51 pm | कंजूस

आवडलं.

मुक्त विहारि's picture

3 May 2022 - 8:40 pm | मुक्त विहारि

एक लेख लिहिला तर उत्तम

पराग१२२६३'s picture

24 Apr 2022 - 5:09 pm | पराग१२२६३

मस्त फोटो आणि माहिती दिलेली आहे. हे संग्रहालय बघायची इच्छा आहे; पण अजून योग आलेला नाही. मागील महिन्यात दिल्लीला गेलो असताना तिथे हवाईदलाचं संग्रहालय पाहिलं. तेही मस्त आहे. त्याचवेळी चाणक्यपुरीतील रेल्वेचं संग्रहालयही पाहिलं. ते पूर्वी पाहिलेलं होतं; पण 2016/17 मध्ये रेल्वेच्या संग्रहालयाचं नुतनीकरण करण्यात आलं होतं आणि त्यासंबंधीचे बरंच वर्णन वाचलं होतं. म्हणून यावेळी ते पुन्हा पाहायला गेलो; पण तिथं गेल्यावर अपेक्षाभंगच पदरी पडला.

टर्मीनेटर's picture

26 Apr 2022 - 11:42 am | टर्मीनेटर

रेल्वेच्या संग्रहालयाचं नुतनीकरण करण्यात आलं होतं आणि त्यासंबंधीचे बरंच वर्णन वाचलं होतं. म्हणून यावेळी ते पुन्हा पाहायला गेलो; पण तिथं गेल्यावर अपेक्षाभंगच पदरी पडला.

हे संग्रहालय मी २००७ की २००८ च्या दिल्ली भेटीत पाहिले होते. छान होते! आता नूतनीकरणानंतर आणखीन चांगले वाटण्या ऐवजी अपेक्षाभंग झाल्याचे वाचून खेद वाटला.

प्रचेतस's picture

25 Apr 2022 - 9:13 am | प्रचेतस

अहा...!
एकापेक्षा एक जबरदस्त रणगाडे आहेत. जर्मन फिल्ड गन्स देखील लैच भारी. छायाचित्रांसोबत माहिती देखील असल्याने लेखन परीपूर्ण झालेय.

नचिकेत जवखेडकर's picture

25 Apr 2022 - 12:51 pm | नचिकेत जवखेडकर

खूप छान. रणगाड्याचं म्युझियम पहिल्यांदाच ऐकलं/पाहिलं...

माहिती आणि फोटो दोन्ही मस्त !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Harrdy Sandhu - Bijlee Bijlee ft Palak Tiwari | Jaani | BPraak | Arvindr Khaira | Desi Melodies

पैजारबुवा, प्रचेतस, नचिकेत जवखेडकर आणि मदनबाण साहेब प्रतिसादासाठी आभार 🙏

बिपीन सुरेश सांगळे's picture

26 Apr 2022 - 2:17 pm | बिपीन सुरेश सांगळे

टर्मिनेटर
खूप छान माहितीपूर्ण लेख
अन फोटो लाजवाब !

लिहते राहा

असंका's picture

26 Apr 2022 - 4:52 pm | असंका

अरे वा!!" वर्ल्ड ऑफ टँक्स, ब्लिट्झ"* मधले एवढे सगळे रणगाडे इथे प्रत्यक्ष बघायला मिळतायत की!!!
अनेक धन्यवाद या लेखाबद्द्ल!!

(*मोबाइल गेम आहे)

रच्याकने, २६ जानेवारीला आणि १५ ऑगस्टला, नवीन आणि वापरातले रणगाडे पण बघायला देतात आणि प्रत्यक्ष जवान त्यांची माहिती पण सांगतात. निदान मी १५/२० वर्षापूर्वी गेलो होतो, तेव्हा तरी असं होतं. एका T90 वर पार वर चढून एक जवानाने सगळं नीट समजून सांगितलेलं आठवतंय. (मग आमच्यातल्या एकाने विचारलं, अ‍ॅवरेज काय मिळतं!!)

टर्मीनेटर's picture

26 Apr 2022 - 7:20 pm | टर्मीनेटर

२६ जानेवारीला आणि १५ ऑगस्टला, नवीन आणि वापरातले रणगाडे पण बघायला देतात आणि प्रत्यक्ष जवान त्यांची माहिती पण सांगतात.

भारीच की!

मग आमच्यातल्या एकाने विचारलं, अ‍ॅवरेज काय मिळतं!!

😀 😀 😀

मुक्त विहारि's picture

26 Apr 2022 - 6:36 pm | मुक्त विहारि

वाखूसा

बिपीन सुरेश सांगळे, असंका आणि मुविकाका प्रतिसादासाठी आभारी आहे 🙏

मुक्त विहारि's picture

26 Apr 2022 - 8:22 pm | मुक्त विहारि

भरपूर भटका

टर्मीनेटर's picture

27 Apr 2022 - 2:26 pm | टर्मीनेटर

🙏

अथांग आकाश's picture

28 Apr 2022 - 10:36 am | अथांग आकाश

घरबसल्या हे सुंदर संग्रहालय बघायला मिळाले!!
धन्यवाद!!!

.

कंजूस's picture

28 Apr 2022 - 11:33 am | कंजूस

बरोबर.