गेल्या 10-15 वर्षात आलेल्या चांगल्या मराठी कादंबऱ्या

Nishantbhau's picture
Nishantbhau in काथ्याकूट
16 Apr 2022 - 7:46 am
गाभा: 

नमस्कार,

गेल्या 10-15 वर्षात आलेल्या चांगल्या मराठी कादंबऱ्या कोणत्या? काही कादंबऱ्या सुचवाल का?

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Apr 2022 - 9:04 am | ज्ञानोबाचे पैजार

पण सध्या तरी आमच्या प्रातःस्मरणिय महागृंनी जगावर परम उपकार करण्याच्या उदात्त हेतूने लिहिलेले त्यांचे आत्मचरित्र आहे....

ते नक्की वाचा.

पैजारबुवा,

नगरी's picture

16 Apr 2022 - 6:26 pm | नगरी

बुवा कळले नाही

चौथा कोनाडा's picture

18 Apr 2022 - 5:42 pm | चौथा कोनाडा

खालच्या फोटोतल्या दिग्गजांना रसिक प्रेमाने महागुरू उर्फ महागृ / म्हाग्रू अश्या नावाने प्रेम करतात !

चित्रगुप्त's picture

16 Apr 2022 - 9:14 am | चित्रगुप्त

ह्योच माजा रस्ता.
हेच का ते? हे तेच का? ते हेच का?
.

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Apr 2022 - 4:21 pm | अमरेंद्र बाहुबली

अमिताभ ह्यांचे जुनीअर ना?

प्रचेतस's picture

16 Apr 2022 - 9:18 am | प्रचेतस

तांडव- महाबळेश्वर सैल
दंशकाल- हृषीकेश गुप्ते
मूळ हरवलेलं झाड- महाबळेश्वर सैल
आवरण- अनु. उमा कुलकर्णी, मूळ लेखक- भैरप्पा

तुषार काळभोर's picture

16 Apr 2022 - 11:13 am | तुषार काळभोर

तुमच्या नावासहीत मी हेच सुचवणार होतो...

तांडव- महाबळेश्वर सैल
दंशकाल- हृषीकेश गुप्ते
- सुचवणी श्रेय - प्रचेतस :)

बाय द वे, दंशकाल वाचली आहे. वाचताना आतमध्ये दंश करत राहते. वाचून झाल्यावरसुद्धा तो दंश लवकर उतरत नाही.

प्रचेतस's picture

16 Apr 2022 - 4:51 pm | प्रचेतस

=))

गेल्या १०/१५ वर्षातील इतर कादंबऱ्या नजरेसमोर येतच नाहीत, नाही म्हणायला मिलिंद बोकीलांची गवत्या, नेमाडेंची हिंदू, विश्वास पाटलांची लस्ट फॉर लालबाग ह्या गाजावाजा झालेल्या कादंबऱ्या आल्या पण मोठे अपेक्षाभंग झाले.

चित्रगुप्त's picture

17 Apr 2022 - 8:43 am | चित्रगुप्त

नेमाडेंची 'हिंदु' प्रकाशित झाल्याझाल्या वाचली. या कादंबरीची (मजसारख्या-) नेमाडेप्रेमींना दीर्घकाळ वाट बघावी लागली होती. सुरुवातीची पन्नासेक पाने काय बी कळ्ळेच नाय, पण नंतरचे सगळे आवडले होते.

@ प्रचेतस

सर आपणच सुचवलेली "शोध" ही कादंबरी पण वाचनिय आहे.

पैजारबुवा,

प्रचेतस's picture

18 Apr 2022 - 12:29 pm | प्रचेतस

ओहो माऊली,
तिचे नाव मीच कसे विसरलो कळत नाही. अप्रतिम कादंबरी आहे ही.

सौंदाळा's picture

18 Apr 2022 - 11:07 am | सौंदाळा

तांडवचा विषय माहित आहे पण अजून वाचली नाही :(
पण दंशकाल चा विषय काय आहे?

कोकणच्या पार्श्वभूमीवर भयगूढ कादंबरी आहे.

बिपीन सुरेश सांगळे's picture

16 Apr 2022 - 9:25 am | बिपीन सुरेश सांगळे

काळे करडे स्ट्रोक्स कोणी वाचली आहे का ? कशी आहे कृपया कळवा

अंताजीची बखर, बखर अंतकाळाची: नंदा खरे

सातपाटील कुलवृत्तांतः रंगनाथ पठारे

चित्रगुप्त's picture

19 Apr 2022 - 8:40 am | चित्रगुप्त

@पुंबा: सातपाटील कुवृ. बद्दल थोडी माहिती देता येईल का ? वाचण्याची इच्छा आहे.

कॉमी's picture

19 Apr 2022 - 6:30 pm | कॉमी

पाचपाटील हे मायबोली व मिपावरचे रसिक आणि चोखंदळ मराठी वाचक आहेत. त्यांची यादी-

अलीकडची मला आवडलेली काही पुस्तकं मी आवर्जून सुचवू इच्छितो..जरूर वाचून पहा

उदाहरणार्थ..

दीडदमडीना, पेरूगन मुरूगन-- वर्जेश सोळंकी
(कादंबरी)

विवादे विषादे प्रमादे प्रवासे -- प्रशांत बागड
(लेखसंग्रह)

अतीत कोन? मीच-- प्रसाद कुमठेकर
(लेखसंग्रह)

बाकी शून्य- कमलेश वालावलकर
(कादंबरी)

सातपाटील कुलवृत्तांत- रंगनाथ पठारे (कादंबरी)
तीव्रकोमल दु:खाचे प्रकरण -- रंगनाथ पठारे
(कथासंग्रह)

आटपाट देशातल्या गोष्टी-- संग्राम गायकवाड (आयकर विभागाचा आणि एकूणच प्रशासनाचा सफाईदार क्रॉस सेक्शन घेणारी कादंबरी... सरकारी अधिकाऱ्यांनी उगाच टाईमपास करायला लिहिलेली रद्दी पुस्तकं आपल्याकडं काही कमी नाहीत.. पण संग्राम गायकवाडांची ही पहिलीच कादंबरी फार म्हणजे फारच 'तोडफोड' आहे)

संप्रति, उद्या -- नंदा खरे(कादंबरी)

विनाशवेळा- महेश एलकुंचवार (अनुवादित)

निकटवर्तीय सूत्र, रिबोट- जी के ऐनापुरे
(कादंबरी)
आलोक- आसाराम लोमटे (ग्रामीण/निमशहरी कथासंग्रह)
दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी- बालाजी सुतार
(ग्रामीण/निमशहरी कथासंग्रह)
स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट- अवधूत डोंगरे (कादंबरी)
एन्कीच्या राज्यात- विलास सारंग (कादंबरी)
व्हाया सावरगाव खुर्द- दिनकर दाभाडे (कादंबरी)
राखीव सावल्यांचा खेळ, श्रीलिपी - किरण गुरव
(कथासंग्रह)

वरणभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा- जयंत पवार
फिनिक्सच्या राखेतून उठला मोर-जयंत पवार

नाईन्टीन नाईंटी, कोबाल्ट ब्ल्यू- सचिन कुंडलकर
(कादंबरी)
दंशकाल- ह्रषिकेश गुप्ते (कादंबरी)

डॉ. मयांक अर्णव- आनंद विनायक जातेगावकर
(कादंबरी)
अच्युत आठवले आणि आठवणी- मकरंद साठे
(कादंबरी)

आणि कविता आवडत असतील तर ..
आणि खालचे दोन तरणेबांड, फुरफुरणारे कवी..
(पण एकेकच संग्रह काढून शांत बसलेत दोघेही.. माझा डोळा आहे त्यांच्यावर पुढं काय लिहितायत ते.. Happy )

१.धांदलमोक्ष- स्वप्नील शेळके

२.काळ्या जादूचे अवशेष- सत्यपालसिंग रजपूत ( नाव आपलं नाही वाटलं, तरी माणूस मराठीच आहे..!)

मुक्त विहारि's picture

20 Apr 2022 - 1:34 pm | मुक्त विहारि

हे निरंजन घाटे यांचे पुस्तक जरूर वाचा

त्यात तुम्हाला चांगला खजिना मिळेल ...