अहमदनगर कट्टा!

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in काथ्याकूट
12 Apr 2022 - 8:49 pm
गाभा: 

नमस्कार मिपाकरांनो,

दिनांक १५ आणि १६ एप्रिल २०२२ रोजी अहमदनगर येथे मुक्काम होणार आहे. दिवस भटकंतीत पार पडेल पण अहमदनगर परिसरात कोणी मिपाकर रहात असतील तर एक सायंकट्टा करता येऊ शकेल ह्यासाठी हा धागा प्रपंच.

लागून चार दिवस सुट्टी आली असल्याने अनेकांचे काही कार्यक्रम अगोदरच ठरले असतील ह्याची कल्पना आहे, तरी कुणाला अशा अचानक होऊ शकणाऱ्या कट्ट्याला उपस्थित राहणे शक्य होणार असेल तर जरूर कळवा, वेळ आणि ठिकाण सर्वांच्या सोयीनुसार ठरवता येईल.

धन्यवाद.

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

26 Apr 2022 - 12:31 pm | टर्मीनेटर

राणकपुरला हेच नियम आहेत.

मी २०१६ मध्ये राणकपूर मंदिरात जाऊन आलोय पण तेव्हा तिथे कोणी पट्टा काढून ठेवायला आणि मोबाईल स्विच ऑफ करायला सांगितले नव्हते!

सोमनाथ मंदिरात मात्र फारच कडक नियम आहेत. तिथे काहीच आत नेऊन देत नाहीत (इथे काढून ठेवलेला माझा चांगल्यातला पट्टा चोरीला गेला होता 😀) पट्टा, मोबाईल, बॅग, पर्स इतकंच नव्हे तर हेडफोन पण बाहेर ठेऊन आत जावे लागते.

पट्टा काढून ठेवलेला चोरीला गेला!!! अरेरे...

मी बूट काढून ठेवलेले नांदेडच्या गुरुद्वारात. मला परत मिळाले तेव्हा नव्यासारखे!! एक सेकंद तर मी परतच देत होतो की हे माझे नाहीत म्हणून!! ....

(अतिशयोक्ती नाही. सेवा म्हणून कुणा भाविकाने पॉलिश केले होते. )

टर्मीनेटर's picture

26 Apr 2022 - 7:14 pm | टर्मीनेटर

कुणा भाविकाने पॉलिश केले होते.

चांगला आहे तुमचा अनुभव 👍

सुक्या's picture

29 Apr 2022 - 10:43 am | सुक्या

सेवा म्हणून कुणा भाविकाने पॉलिश केले होते.

हो. गुरुद्वारात सेवा म्हणुन बर्‍याच गोष्टी शिख लोक करतात. लंगर मधे सेवा, झाड पुस, ईतर स्वच्छता वगेरे वगेरे ... त्यात आलेल्या भाविकांचे पादत्राणे स्वच्छ करुन देतात. त्यात त्यांना काहीही कमीपणा वाटत नाही. एरवी टेबलावरची चपाती ताटात न घेणारी ही मंडळी गुरुद्वारात मात्र सगळी कामे करतात.

कॉलेजात असताना ग्वाल्हेर च्या किल्यात असलेल्या गुरुद्वारात जायचा योग आला होता. वेळ सकाळची असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती. तेव्हा एक मर्सिडीझ मधुन आलेल्याला ईतर भविकंच्या म्हणजे आमच्या चपला पुसताना पहिले होते.

तिथेही आमच्या डोक्यावरचे ठेवलेले रुमाल थोडे सरकले होते तर तिथल्या सेवादाराने "सर मे कील ठोकु क्या?" अशी धमकी दिली तेव्हाही ते आवडले नव्हते.

चौथा कोनाडा's picture

29 Apr 2022 - 6:24 pm | चौथा कोनाडा

या गुरुद्वार सेवेवरुन आठवले. सत्ताधारी पक्षातील एकाने (बहुधा बुटासिंह) केंद्रात मंत्री असताना गुरुद्वारात बुटपॉलिश सेवा केली होती. ही सेवा त्यांनी शिक्षा म्हणुन केलेली पुसटसी आठवते. आठवते आहे का कुणाला हे ?

हो. बुटासिंग यांना त्यांच्या ओपरेशन ब्लु स्टार मधील भुमिकेमुळे ५६ दिवस गुरुद्वारात सेवा करण्याचे आदेश (हुकुमनामा) दिले होते. सुरजित सिंग बर्नाला यांना पण बहुदा १६ दिवस अशीच शिक्षा मिळाली होती . .

जेम्स वांड's picture

27 Apr 2022 - 11:51 am | जेम्स वांड

तर अहिंदू लोकांना प्रवेशही दिला जात नाही, मला वाटतं इतर ठिकाणांत उज्जैन महाकलेश्वर मंदिर आणि तिरुपती बालाजी इथं पण तोच नियम आहे.

चौथा कोनाडा's picture

27 Apr 2022 - 12:23 pm | चौथा कोनाडा

एकादी व्यक्ती अहिंदू आहे हे नक्की कसे तपासात असतील ?

टर्मीनेटर's picture

27 Apr 2022 - 1:04 pm | टर्मीनेटर

तिरुपतीला आता आधार कार्ड दाखवणे अनिवार्य आहे. त्यावरून अंदाज बांधत असावेत, त्याआधी काय पद्धत होती कल्पना नाही.

टर्मीनेटर's picture

27 Apr 2022 - 1:02 pm | टर्मीनेटर

उज्जैन महाकालेश्वर मंदिरात खूप वर्षांपूर्वी गेलो असल्याने त्याबद्दल ठाम माहिती नाही पण सोमनाथ आणि तिरुपती बालाजी इथे अहिंदूंना प्रवेश दिला जात नाही हे नक्की!

अवांतर: इजिप्त सफरीत भेटलेला पोर्तुगालचा 'रुई' फेब्रुवारी २०१९ मध्ये २० दिवसांसाठी भारतात येऊन गेला. त्याने काशी विश्वेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेऊन भारतभ्रमंतीला सुरुवात केली होती. ह्यावरून लक्षात येते की खुद्द काशीलाही असा काही नियम नाही.
त्याच्या भारतभेटीत ३ दिवस आम्ही सोबत फिरत होतो, तेव्हा गेटवे ऑफ इंडिया, एलीफंटा केव्हज (घरापुरी लेणी), अलिबागचा जलदुर्ग आणि आसपासचा थोडा परिसर फिरलो आणि काही मंदिरांतही गेलो होतो, पण कुठेही त्याचे अहिंदू असणे आड आले नव्हते आणि ते योग्यही वाटले.
अहिंदूंमध्ये हिंदू धर्माबद्दल प्रेम / गोडी / आकर्षण निर्माण व्हावे ह्यासाठी कर्मठपणा सोडून असले कालबाह्य नियम रद्दबातल करावेत आणि सर्वांना प्रवेश खुला करावा असे माझे वैयक्तिक मत.

प्रचेतस's picture

27 Apr 2022 - 1:13 pm | प्रचेतस

ह्यावरुन रिचर्ड फ्रान्सिस बर्टन ह्याने मुस्लिम वेषभूषा करुन मक्केत तर प्रवेश केलाच पण अगदी काबागृहाला पण भेट दिली याची आठवण आली. उघडकीस आले असते तर मृत्युदंड मिळाला असता. हा रिचर्ड बर्टन तोच ज्याने अरेबियन नाईट्स संकलित केले. वेताळ पंचविशीचे इंग्रजीत भाषांतर केले.

बाळ सामंतांनी ह्या अवलियावर लिहिलेले शापित यक्ष हे चरित्र वाचण्यासारखेच असे आहे.

बापरे... भलतेच धाडस केले होते की रिचर्ड बर्टनने!

उघडकीस आले असते तर मृत्युदंड मिळाला असता.

शिरच्छेद कन्फर्म होता 😀

शापित यक्ष वाचावे लागेल.

चौथा कोनाडा's picture

29 Apr 2022 - 6:20 pm | चौथा कोनाडा

ढण्यू प्रचेतस पुस्तकाच्या संदर्भासाठी.
शापित यक्ष अतिशय रोचक दिसत आहे.
आता वेळ काढून वाचणे आले.

त्यामुळे खात्रीने सांगू शकते की अहिंदूंना प्रवेश नाही असे म्हणणे चुकीचे आहे. आधारकार्ड वगैरेही काही तपासत नाहीत.

टर्मीनेटर's picture

27 Apr 2022 - 2:11 pm | टर्मीनेटर

चार पाच वर्षांपूर्वी सोमनाथ मंदिराला दिलेल्या शेवटच्या भेटीत हिंदू सोडून अन्यधर्मियांना प्रवेश नाही अशा आशयची पाटी तिथे वाचल्याचे स्पष्ट आठवते. मंदिर प्रवेशाआधी तीन ठिकाणी होणाऱ्या सुरक्षा तपासण्याही कंटाळवाण्या होत्या. आता परिस्थिती बदलली असल्यास आनंदाची गोष्ट आहे 👍
(तसे असल्यास पुढच्या गिरनार भेटीत पुन्हा सोमनाथला जाण्याचा विचार करता येईल!)

चौथा कोनाडा's picture

21 Apr 2022 - 9:12 pm | चौथा कोनाडा

Tmple123

धर्मराजमुटके's picture

22 Apr 2022 - 2:06 pm | धर्मराजमुटके

प्रतिसाद कोणाला एकाला उद्देशून नाही पण घरात आपली बायका, मुले आपले ऐकत नाही, ऑफीसात बॉस ऐकत नाही तिथे आपण जुळवून घेतो मात्र मंदिरांमधे जायची वेळ आली आणि तिथले नियम जमत नसले तर आपल्याला लगेच राग येतो. नक्की काय कारण असावे ? देवाकडे जाताना नतमस्तक व्हावे, आपला मान अपमान बाजूला ठेवावा असे मानतात. कदाचित आपल्यात किती मान, अहंपणा उरलाय हे तपासण्यासाठी तर असे चित्र विचित्र नियम आखलेले नसतील ना ? असा विचार मनात येऊन गेला.

अजीब हम हैं सबब के बग़ैर चाहते हैं
तुम्हें तुम्हारी तलब के बग़ैर चाहते हैं

फ़क़ीर वो हैं जो अल्लाह तेरे बंदों को
हर इम्तियाज़-ए-नसब के बग़ैर चाहते हैं

मज़ा तो ये है उन्हें भी नवाज़ता है रब
जो इस जहान को रब के बग़ैर चाहते हैं

नहीं है खेल कोई उन से गुफ़्तुगू करना
सुख़न वो जुम्बिश-ए-लब के बग़ैर चाहते हैं

ठठुरती रात में चादर भी जिन के पास नहीं
वो दिन निकालना शब के बग़ैर चाहते हैं

जमी है गर्द सियासत की जिन के ज़ेहनों पर
मुशाएरा भी अदब के बग़ैर चाहते हैं

है ए'तिमाद उन्हें ख़ुद पर ग़ुरूर की हद तक
अकेले जीना जो सब के बग़ैर चाहते हैं

अजीब हम हैं सबब के बग़ैर चाहते हैं
तुम्हें तुम्हारी तलब के बग़ैर चाहते हैं

श्रीनिवास टिळक's picture

24 Apr 2022 - 7:58 pm | श्रीनिवास टिळक

अहमदनगरला निझाम अली शाह याने त्याचा एक हत्ती "गुलाम अली" याने तालिकोट १५६५ च्या लढाईत विशेष कामगिरी बजावल्याबद्दल त्याचे स्मारक उभारले होते. ते आजही आस्तित्वात आहे असे वाचनात आले. तरी त्याबद्दल अधिक माहिती नगरच्या स्थानिक जाणकारांनी येथे दिली तर आनंद होईल. धन्यवाद.

बिपीन सुरेश सांगळे's picture

26 Apr 2022 - 2:20 pm | बिपीन सुरेश सांगळे

मंडळी
पुण्यात कोणी भेटतंय का ?
ठरवा कट्टा
किंवा
विद्यापीठात जे साहित्य संमेलन आहे - श्रीरंग जोशी यांनी माहित दिल्याप्रमाणे
तिथे भेटत असाल तरी भेटू या
किंवा स्वतंत्र

कुमार१'s picture

26 Apr 2022 - 5:58 pm | कुमार१

स्वतंत्रपणे किंवा मिपा कट्टा स्वरूपात भेटायला आवडेल.

साहित्य संमेलन मला झेपणार नाही ! :)))

+१
असल्या बोरिंग इव्हेंटमध्ये मी पण रमू शकत नाही 😀

स्वतंत्र मिपा कट्टा व्हावा!

चौथा कोनाडा's picture

29 Apr 2022 - 10:54 pm | चौथा कोनाडा

+११

पण त्यांचा शेपरेट मिपा साहित्य कट्टा होऊ शकतो की !
माझ्या शुभेच्छा !

बिपीन सुरेश सांगळे's picture

26 Apr 2022 - 2:22 pm | बिपीन सुरेश सांगळे

टर्मिनेटर
कट्टा उत्तम झाला
अगदी फोटो वगैरे सहित

टर्मीनेटर's picture

26 Apr 2022 - 7:17 pm | टर्मीनेटर

धन्यवाद बिपीनजी 🙏