परदेशवारी -४ छायाचित्रण

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in भटकंती
2 Apr 2022 - 11:28 pm

परदेशवारी -४ छायाचित्रण

http://www.misalpav.com/node/49857/backlinks- परदेशवारी १

http://www.misalpav.com/node/49893/backlinks-परदेशवारी३

http://www.misalpav.com/node/49981/backlinks-परदेशवारी३

एकच झाड पण सहा ऋतूंचे सहा सोहळे.......

mi 1
शिशीर
mipa
वसन्त

"जीव शीणला तरच झोपेची विण.
नाही तर नुसत्याच कळा
करून आकाशाचा फळा
रातभर उताणे पडून तारे गिना".

झोपेची विण याचे अर्थ गुंफण गाढ (Deep)आणी हलक्या(Light) झोपेची गुंफण.

इथे काहीच काम नाही.गुबगुबीत पंलग,घर,वाहन वातानुकूलित,घर सफाई,धुणेभांडे,चहा काॅफी बनवणे सर्व काही यांत्रीक. माणूस दमणार कसा? चिझ,पिझ्झा,बर्गर,साॅसेजेस,चिकन ग्रीष्म,वाईन स्काॅच आणी चकणा म्हणजे सोने पे सुहागा.

सकाळी फिरण्याचे व्यसन.मुक्त निसर्ग आणी दिल मे जोश,उमंग. मग काय दररोज कमीत कमी दोन तास तरी बाहेर चालायला जायचो. जवळच स्पोर्ट्स क्लब होता तीथे दररोज ओपन जीम आणी योगा हा नित्यक्रम होता. तेथील कर्मचाऱ्यां बरोबर मैत्री सुद्धा झाली.कुतूहल म्हणून एक दिवस तर त्यांची गवत कापायची गाडी चालवून बघितली.

mi 1

mi 1

mipa

चार मैल चालणे तीन ठाव भरणे
सुखनैव घोरणे चार प्रहर

व्हीवो आणी गुगल पिक्सल ५ भ्रमणध्वनी आणी निकोन डि एस आर.एक गाणी ऐकण्या साठी तर दुसरा फोटो काढण्या साठी.गुगल पिक्सल मुळे फोटो काढला तर तत्संबंधी माहीती पण त्वरीत उपलब्ध.त्यामुळेच बर्‍याच नवीन गोष्टी कळाल्या. आसो आज फक्त मला विषेश वाटलेले आणी आवडलेले फोटो आपल्या बरोबर शेअर करतो बघा आवडतात का?

थंडी संपली होती,अधूनमधून पावसाची सर येतअसे.आशा वेळी कुठेतरी आडोशाला थांबायचे,सर गेली की पुन्हा मार्गी लागायचे. एकदा आसाच उभा होतो,फांद्या मधून पडणाऱ्या पागोळ्यां कडे गंमत म्हणून बघत असताना समोरच एक काळी गाडी येऊन उभी राहिली. शास्त्रीय नियमानुसार ती थेबांतुन बघताना उलटी दिसत होती. तसेच रस्ता सुद्धा.

फांद्यांच्या टोकावर पावसाचे थेंब पहाताना जणू झाडाला काचेची फळे लागली आहेत आसे वाटत होते. मोबाईल मधे कैद केले.

mi 1
झाडावरुन पडणार्य पागोळ्यातुन

mi 1
सम्पादित उलटे केलेले चित्र

mi 1
सुर्याचे प्रतिबिम्ब

mi 1
प्रतिबिम्ब

mi 1
काचेच्य फळाचे झाड

mi 1
नुकतीच पाउस येवून गेलाय

निरभ्र आकाश व सुर्यवंशी आसल्यामुळे उदितनारायणाची विवीध रूपे बघावयास मीळाली.

mi 1
उगवला नरायण

mi 1
बोटाच्या टोकवर

mi 1
तन्मणी,डायमन्ड कन्ठा

mi 1

"रजनीनाथ हा नभी उगवला" गुरुदक्शीणा किवा" नभ नीत चरयो चन्द्रमा" (मालकन्स ,प. मालिनी राजूरकर)

mi 1
नभ नीत चरयो चन्द्रमा

mi 1
आधा है चन्द्रमा मगर दिन है बाकी

पहिल्या भागात सांगीतल्या प्रमाणे इथे निसर्गात मानव वस्ती त्यामुळे विवीध प्रकारच्या वनस्पती,प्राणी, पक्षी आणी विवीध प्रकारची फुले फळे बघावयास मिळाली.ओघानेच फुलपाखरे सुद्धा. इथे फुलपाखरांची वेगळी बाग (Butterfly Park) आहे.काही कारणास्तव जाऊ शकलो नाही पण भटकंती मधे सुद्धा बरीच फुलपाखरे मुक्त विहार करताना दिसली.

mi 1
जगलातील टर्की
mi 1
कान्चन म्रुग

mi 1
एक अकेला इस शहर मे

mi 1
म्रुग्नयनी

mi 1
चेरी ब्लोसोम

mi 1

रेड मेपल

mi 1
रेड मेपल

mi 1
वीपिन्ग चेरी

mi 1
आइवरी गुल
mi 1
मोनार्क बटरफ्लाय
खुपच मोठा लेख झालाय.आता इथेच थांबतो.आवडला तर पुढील भागात भेटूयात आणखीन छायचित्रा सोबत.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

3 Apr 2022 - 6:38 am | कंजूस

विडिओही टाका.

कर्नलतपस्वी's picture

3 Apr 2022 - 6:49 am | कर्नलतपस्वी

धन्यवाद कंजूसजी, पुढील भागात टाकतो.

Nitin Palkar's picture

3 Apr 2022 - 12:53 pm | Nitin Palkar

लेख मोठा अजिबात वाटला नाही. सर्व प्रची अतिशय सुंदर!

नगरी's picture

3 Apr 2022 - 3:07 pm | नगरी

मला एक समजत नाही हे सर्व माझ्याकडे ही,भारतात आहे मग मी इतके पैसे खर्च करून,रात्रभर जागून काय साध्य करणार?
ठिकाय तो एक वेगळा देश आहे.या पलीकडे के

नगरी's picture

3 Apr 2022 - 3:10 pm | नगरी

ठिकाय माझ्या कडे टर्की नाहीत

कर्नलतपस्वी's picture

3 Apr 2022 - 4:28 pm | कर्नलतपस्वी

पालकरजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
नगरीजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपण पुण्यातले वाटत.

कर्नलतपस्वी's picture

3 Apr 2022 - 4:40 pm | कर्नलतपस्वी

हे सर्व प्राणी पक्षी.....
शहरात उन्मुक्त विहार करतात.नागरीक त्यांना त्यांचे सामान्य जीवन जगण्यास मदत करतात. एखादा हरणांचे कळप रस्ता ओलांडत आसेल तर वाहतूक थोडावेळ थांबते. यांना "डिनर डिलाईट " बनवताना पाहिले नाही.
या उलट आपल्या देशात आहे. यांच्या संरक्षणार्थ अभयारण्ये बनवली आहेत.

सरिता बांदेकर's picture

3 Apr 2022 - 7:23 pm | सरिता बांदेकर

छान आहेत फोटो

जुइ's picture

3 Apr 2022 - 11:22 pm | जुइ

ते पाहिल्यावर प्रतिसाद देता येइल.

चौथा कोनाडा's picture

4 Apr 2022 - 12:45 pm | चौथा कोनाडा

छान धागा, फोटो ही सुरेख !
मृगांच्या प्रचिंचे गुणोत्तर बरेच चुकल्यामुळे ते अतिउभट दिसत आहेत
पागोळ्याचे सम्पादित उलटे केलेले चित्र मस्तच, त्यात दिसणारे वाहनाचे प्रतिबिंब खासच !

कर्नलतपस्वी's picture

4 Apr 2022 - 3:40 pm | कर्नलतपस्वी

लक्षात घेऊन दुरुस्त करतो.

कर्नलतपस्वी's picture

4 Apr 2022 - 3:40 pm | कर्नलतपस्वी

लक्षात घेऊन दुरुस्त करतो.

कर्नलतपस्वी's picture

4 Apr 2022 - 3:40 pm | कर्नलतपस्वी

लक्षात घेऊन दुरुस्त करतो.

गोरगावलेकर's picture

4 Apr 2022 - 11:18 pm | गोरगावलेकर

फोटो खूपच आवडले