पहिला दिवस अविस्मरणीय असतो मग तो कॉलेज मधला,नोकरीतला किवा आणखीन कुठलाही.तशीच माझी या नवीन शहरातली पहिली भ्रमंती.जमकर रॅगिंग झाली.आता वातावरणाची सवय झाली (Acclimatize).भ्रमणध्वनी पण मिळाला व घरातून NOC त्यामुळे भटकंतीचा उत्साह द्विगुणित झाला. मार्च महिना सुरू झाला होता.आता थोडा रूळावलो होतो.काहीतरी चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते.मराठी दिनदर्शिकेत डोकावून पहात आसताना लक्षात आले फाल्गुन मास सुरू झालाय.आपल्या देशात वसंताचा धुमाकूळ चालू होता.डोळ्या समोर भारतातल्या घराच्या बाल्कनीत फुललेली फुलझाडे दिसत होती.इथे मात्र दोन तीनच रंग,नीळा,पाढंरा आणी कुठे कुठे गडद हिरवा कारण नुकताच हेमंताने शिशीराला खो दिला होता.मला त्या रंगोत्सवाची तीव्र आठवण आली.
"बहरली रातराणी
पारिजात ही बहरला
शुभ्र पांढर्या मोगऱ्याचा
गंध आसमंती पसरला
उधळले रंग सारे
जणू रागदारी मांडली
पंचमीची मुठ माझ्या
दारी की हो सांडली"
बुंदेलखंड,अवध,ब्रज,बनारस आणी राजस्थान मधल्या वास्तव्यात होळी(होरी), रंगाच्या सणाचे विवीध रूप बघितले,अनुभवले.बनारस मधील "आस्सी", घाटावरचे कवी संमेलन,श्मशान होली.
"खेले मसाने में होली दिगम्बर
खेले मसाने में होली,
भूत पिशाच बटोरी दिगम्बर,
खेले मसाने में होली"
बनारसी बाबू आसे म्हणतात,
"दुनिया भर में होली को मनाते हैं पर बनारस में होली को पहनते है, ओढ़ते हैं, बिछाते हैं। उसे जीते हैं।"
जसे कबीरदासजी गुरूप्राप्ती करता बनारसच्या घाटावर पहाटे पहटे गुरूच्या मार्गावर आडवे पडले होते. आगदी तसाच फाग सुद्धा,
"फागुन भी आनंद के रामानन्द की तलाश में कबीर बनकर बनारस के घाट की सीढ़ियों पर लेट जाता है।"
ब्रजची लठमार होली,ब्रज भाषेचे विख्यात कवि पद्माकर लिहीतात-
"फागु के भीर अभीरन तें गहि, गोविंदै लै गई भीतर गोरी।
भाय करी मन की पदमाकर, ऊपर नाय अबीर की झोरी॥
छीन पितंबर कंमर तें, सु बिदा दई मोड़ि कपोलन रोरी।
नैन नचाई, कह्यौ मुसक्याइ, लला ! फिर खेलन आइयो होरी॥"
"कृष्ण और गोपियों के बीच होली खेली जा रही है। पद्माकर कहते हैं कि राधा हुरियारों (हुडदंगाई) की भीड़ से कृष्ण का हाथ खींचकर राधा भीतर ले जाती हैं और अपने मन की करती हैं। वे कृष्ण पर अंबीर की झोली पलट देतीं हैं। कृष्ण को वे यूं ही नहीं छोड़ देतीं। जाते हुए उनके गाल गुलाल से मीड़ कर, नटखट दृष्टि से निहार कर हंसते हुए वे कहती हैं कि लला फिर से आना होली खेलने।"
लखनौचे हास्यकवी संमेलन काका हाथरसी,शैल चतुर्वेदी,हुल्लड मुरादाबादी सारख्या सिद्ध हास्य कवींचा हुडदंग आणी सैन्यातील होळी याची खुप आठवण येत होती. लहानपणची होळी, बॅचलर्स होळी,गृहस्थाश्रमातली पहिलीच होळी प्रतेक वेळ्ची मजाच वेगळी, ठंडाई,भांग पकोडे,ठंडा मौसम विथ चिल्ड बियर,छोले भुटूरे जलेबी आ हा हा. आशा सर्व आठवणी मनात हुडदंग घालू लागल्या.खुब जमकर होली खेली थी और आज भी खेलता हूंI मिशिगन मधे होळीचा आनंद मिळणार नव्हता म्हणून चुकल्या चुकल्या सारखे वाटणारच ना. असो विषयांतर नको.
कुठल्याही नवीन ठिकाणी गेल्यावर इतिहास आणि भूगोलाचा आढावा घेण्याची जुनी सवय. त्यामुळे थोड्याच दिवसात नवीन जागा आपलीशी वाटते (स्वानुभव). जवळपास एकट्याने रोज फिरायला जाणे नित्याची बाब झाली.डेट्राईट खुपच जुने शहर व त्याचा इतिहास, खाणाखुणा या बद्दल आपण पुढच्या भागात बोलूच.
पाच दिवस भरपूर काम करायचे दोन दिवस"जीवाची मुंबई".सप्ताहा अंती कुटुंबा,मीत्रां बरोबर सहभोजन (पार्टी टाईम),कधी दुर कुठेतरी तर कधी आपल्याच परसदारी (Backyard). थंडीच्या पार्श्वभूमीवर फायर प्लेस/टुमदार तंबू,बारबिक्यू,संगीत आणी जाम आसे आयोजन मग शाम रंगीन होण्यास कितीसा वेळ लागणार. ओपन फायर प्लेस, बारबिक्यू मशीन इ. बहूतेक जणांच्या परसदारी बघायला मिळेल. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आसाच काहीसा आसावा आसे मला भासले.
"आता कशाला उद्याची बात ?
बघ उडुनि चालली रात
भरभरूनि पिऊ, रसरंग नऊ
चल बुडुनि जाऊ रंगात
हा ज्वानीचा बहार - लुटू या
भरवसा न ज्वानीचा
दो दिन ही साथ
हासत करि घात
गीत - अनंत काणेकर"
बरेच वेळा भटकताना एखाद्याच्या बंगल्यासमोर लांबलचक स्टेशन वॅगन उभी दिसायची.त्यावर RV लिहीले असायचे. प्रथमदर्शनी वाटले बहुतेक Rescue Van असावी, (Professional Hazards दुसरे काय).चौकशीनंतर कळाले की दुरच्या सहली करता मनोरंजन गाडी (Recreational Vehicle)आहे. या भाडे तत्त्वावर मिळतात, सर्व साधनांनी सुसज्ज,थोडक्यात आपण त्याला चार चाकी घर म्हणू शकतो.कुठल्याही निसर्गरम्य परिसरात किवा तलावा काठी गाडी उभी करून मुक्त विहाराचा आनंद घेऊ शकतो. गाडी मधे घरा प्रमाणेच सर्व सुखसोई असतात आगदी दुसरे घरच म्हणाना.पिकनिक करता फोर्ड एफ सिरीजचा पिक अप ट्रक किंवा तत्सम गाड्या खुप सोईस्कर असतात.बरेच लोक ट्रेलर पण घेतात म्हणजे लांब सहलीला जाताना सर्व कॅम्पिंग चे सामान भरून घेऊन जाता येते.
आता आम्हांस येवून पंधरवडा झाला होता. शनिवारी दुपारी जवळच वीस मैलावरच्या ऐतिहासिक वाॅल्ड लेक ला (Walled Lake) जायचे ठरले. पंधरा माईल रोडवर स्थित एक ऐतीहासीक तळे. मला सपड्लेल्या माहीती प्रमाणे "वाल्टेर हेवीट " हा येथील पहिला रहिवासी. तो १८२५ साली येथे राहाण्यास आला. त्यानेच या तळ्याला वाॅल्ड लेक आसे नाव दिलेहोते. कदाचीत य तलावाभोवती आसलेल्या दगडी भिन्ती मुळ्ये आसे नाव दिले आसावे.
बाहेर खूपच थंडी होती. इनर,आउटर सर्व घालून तयार झालो.काही खायला प्यायला घ्यायचे का? इती श्रीमती.नको आपण "वाणी",मधून समोसे, दालवडे आणी काॅफी उचलूया, इती मुलगी."वाणी",पुण्यातील ग्राहक पेठे सारखीच.नाव घ्या आणी पाहिजे ती गोष्ट उपलब्ध होती. पुजेचे सामान,विड्याची पाने,केळीचे खुंट,काटेरी वांगी,मिष्टी दोई (बंगाली व्यजंन),चौरंग,तांब्याचे ताम्हण पळी तांब्या भाडे,इतर भारतीय चवीच्या खाण्याच्या गोष्टी आगदी शेव रेवडी सुद्धा. खसखस,आळीव,नाचणी आणी कुळीथ सारख्या कधीतरी लागणाऱ्या वस्तू सुद्धा मिळाल्या. मल्याळम भाषेत दोन ललना बोलत होत्या.दुकानदार मल्याळी भाषीय, बंगाली,मराठी,गुजराथी,पंजाबी सर्व भाषा कानावर पडत होत्या. इथल्या प्रत्येक भारतीयाचे आवडते ठिकाण.एक समोसा एक डाॅलर म्हणजे ७५ रू. आसो किमतीवर लक्ष न देता इच्छित खाद्यपदार्थ घेऊन पुढील प्रवास सुरू झाला. एक गोष्ट कळाली की भारतातून दिवाळी फराळाची पार्सले का पाठवतात.
बर्फ् पडायचे थाम्बले होते पण आधुन मधुन पाऊस जरूर पडत होता, दुपारचे तीन वाजले होते. तापहीन मार्तन्ड आकशात तळपत होते. लवकरच तळ्याच्याकाठी पोहोचलो, वाहन थाम्बा (पार्कीग) छानच होता. समोरच मोठ्ठी हिमनदी दिसत होती. प्राणी पक्षी नदारद होते. तुरळक माणसे त्या हिमनदीवर खेळत होती. किती जाड बर्फाच्छादित चादर होती याचा आदांज लावणे कठीण होते. निरभ्र आकाशात सुर्यदेव रेगांळत होते. तलावाच्या लांबी, रुंदी खोली बद्दल वायफळ चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष फोटो बघा.काहीच दिवसानंतर जेंव्हा थोडे तापमान वाढले तसे पुन्हा एकदा या जागेस भेट दिली. त्यावेळेस केलेले छायाचित्रण सुद्धा खाली दिले आहे. आपल्याला आवडेल आशी आशा........
पुढील भागात लवकरच परत भेटूयात.......
हिमनदी
हिमनदी
हिमनदी
हिमनदी मे महिन्यात
हिमनदी मे महिन्यात
ईतीहास
सायकलचा पम्प
मुलाना खेळ्ण्यास
सायकल पथ
एक सन्ध्याकाळ
प्रतिक्रिया
17 Mar 2022 - 4:45 pm | सुप्रिया
सुरेख चालू आहे परदेशवारी !
17 Mar 2022 - 5:31 pm | सौंदाळा
मस्तच हा भाग पण
एक प्रश्न : कर्नलसाहेब उत्तर भारतात राहून मराठी कवितांची आवड कशी काय?
17 Mar 2022 - 7:42 pm | मुक्त विहारि
सफर मस्त सुरू आहे
17 Mar 2022 - 9:07 pm | कर्नलतपस्वी
सु प्रीया,सौदाळा,मुवि.
सौदाळाजी, संपुर्ण शिक्षण मराठीत झाले.शाळेत आसताना कवीता वाचल्या मार्क्स मिळवण्यासाठी लक्षात ठेवल्या. आमचे एक मित्र आणी पेशाने शिक्षक याने बाहेरून पदवी परीक्षेचा आभ्यास करताना कवीता कशा समजुन घ्याल हे समजावून सांगीतले. तेव्हाच गोडी लागली. त्याची कृपा. दत्तात्रेय घाटे ते संदिप खरे आणी आता मिपा वरचे कवी सर्वच आवडतात.
18 Mar 2022 - 1:03 am | अनिता
कवितांचे उत्तम व्यासंन्ग ... फारच छान ...
"मिपा वरचे कवी सर्वच आवडतात"
इथे आद्य कविता पहा .. प्रतिक्रिया पण ... पूर्ण दिवस आनंदात जाईल
https://www.misalpav.com/node/6332?page=1
18 Mar 2022 - 8:15 am | कर्नलतपस्वी
"मोकलाया" वाचली आहे.जेव्हा माझी पहिलीच कवीता "संकल्प" मिपावर टाकली होती. योगेश सावंताने "संकल्प "ला प्रतीसाद देताना संदर्भ दिला होता. कुठेतरी सुखावलो ,मिपाकरांना माझी पहिलीच कवीता वाचताना आद्य कवीतेची आठवण झाली..
कवितेतले शब्द आणी भावना जेव्हा मनाला भावतात ती कवीता आवडते.कवीतेला वय असते.कवी दत्त यांनी सन अठराशे शेवटच्या दशकातील "रवी गेला रे सोडून आकाशाला" हे अंगाईगीत आजची आई आपल्या बाळाला झोपवताना गातात.
19 Mar 2022 - 2:20 pm | गोरगावलेकर
छान जमलाय हा भागही
21 Mar 2022 - 8:40 am | nanaba
छान लिहिलंय!
21 Mar 2022 - 8:31 pm | चौथा कोनाडा
व्वा, भटकंती वर्णन आणि फोटो बेस्टच !
मजा आली.
कविता आणि त्याबद्दल लिहिलेलं खासच !
कर्नल साहेब, तुस्सी ग्रेट हो !
22 Mar 2022 - 12:15 pm | Vivek Phatak
परदेशवारीचे खुप छान वर्णन. फोटो आणि कविताही खास..
24 Mar 2022 - 7:14 am | प्रचेतस
जबरदस्त लिहिलंय कर्नलसाहेब.
24 Mar 2022 - 7:51 am | कर्नलतपस्वी
अनिता,चौथा कोनाडा,विवेक, गारगावलेकर,नानाबा,प्रचेतसजी प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.
24 Mar 2022 - 3:35 pm | चौकस२१२
जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आसाच काहीसा आसावा आसे मला भासले.
"आता कशाला उद्याची बात ?
बघ उडुनि चालली रात
कर्नल साहेब आपलया उत्साहावर पाणी ओतण्याचा उद्देश नाही पण या आपल्या या वरील विधानावर बोलावेसे वाटले ..
आपण अमेरिकेतील (किंवा ,कानडा इंग्लडं, ऑस्ट्रेल्या न्यु झीलंड झीलंड ) या देशातील भारतीयांबद्दल ( बहुतेक मध्यमवर्गीय भारतीय ) कि स्थानिक लोकसंख्येबद्दल बॊलताय ते माहित नसल्यमुळे लिहायला होत आहे पण तरी एक मुदा मांडतो
या दोन्ही प्रकारच्या रहिवाश्यांना " कशाला उद्याची बात " अश्या "काहीश्या बेफिकिरी पढतेने जीवन जगता येते" अशी समजूत त्यांच्या या आपण पाहिलेल्या जीवनमाना वरून गृहीत धरणे चुकीचे ठरेल.
आपण जे बघितलेलंत ते " काम आणि घरगुती जीवन याचा समतोल त्या देशात शक्य आहे / परवडते " या दर्शन आहे, चैनीचे नाही
आणि यात "परवडते" म्हणजे दृष्ट्या दृष्ट्या नव्हे तर वेळेच्या आणि उप्लब्धतेचं दृष्टीने
याला करणे अनेक आहेत आणि वरील देशामंध्ये ती थोडयाफार फरकाने लागू होतात
उदाहरण -
_ चैन नाही याची करणे :
- मासिक जमा खर्च जमवणे
- शुण्यापासून पासून सुरवात
- " अजंन्म नोकरी , कोण काढू शकणार नाही अशी शक्यता कमी
- स्वतःचे काम स्वतः करावे लागते इत्यादी
आता "चैन आहे" असे असण्यामागचे कारणे पण आहेत
-
१) उगाच १ तास जेवणाचाच वेळ ना घेता .. ३० मिनिटे घेऊन लवकर घरी जाऊन कुटुंबासमवेत वेळ घलववा असे मालक आणि नोकर दोघांना हि वाटते
२) मोकळी जागा आणि कमी गर्दी
३) कामाचं ठिकाणी असलेली "स्वतः निर्णय घ्या " हि मुभा त्यामुळे वाचलेला वेळ
४) सरकारचे पूर्वनियोजन
असो लेख चालु ठेवा
24 Mar 2022 - 4:38 pm | कर्नलतपस्वी
मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पाच दिवस भरपूर काम करायचे दोन दिवस"जीवाची मुंबई".सप्ताहा अंती कुटुंबा,मीत्रां बरोबर सहभोजन (पार्टी टाईम),कधी दुर कुठेतरी तर कधी आपल्याच परसदारी
माझे निरीक्षण सकारात्मकच आहे. उलट मला तेथील लोकांचे कौतुक वाटते. कुठलेही काम छोटे किंवा मोठे आसा भेदभाव करत नाहीत.
मनापासून काम करणे. Dignity of labour हे खरोखरच वाखाणण्या सरखे आहे.
त्याच प्रमाणेच कामानंतरचा वेळ माझा तो मी माझ्या व माझ्या कुटुंबासाठी यात बेफिकीर, बेजबाबदार हा सुर नसून ऑफिस आणी घर या दोन्हीत फरक कसा ठेवायचा हे शिकण्यास सारखे आहे. तुम्ही म्हणताय तेच मला म्हणायच आहे.
प्रतिसादाने उत्साह वाढतो, काळजी करू नका. बिनधास्त लिहा आवडेल.
25 Mar 2022 - 7:05 am | चौकस२१२
धन्यवाद ... आपण अजून तिथे आहात कि जुन्या वारी बद्दल आहे ? आता हळू हळू उन्हाळ सुरु होईल ना ? जमल तर बुश वॉकिंग, आर्ट आणि फूड फेस्टिवल, ,स्थापत्य / विविधता यावर पण लिहा
24 Mar 2022 - 3:35 pm | चौकस२१२
यात "परवडते" म्हणजे अर्थिक दृष्ट्या नव्हे तर वेळेच्या आणि उप्लब्धतेचं दृष्टीने