मराठी भाषा गौरव दिन २०२२ : आढावा

कुमार१'s picture
कुमार१ in काथ्याकूट
1 Mar 2022 - 9:31 pm
गाभा: 

ok

नुकताच महाराष्ट्र राज्य पातळीवर मराठी भाषा गौरव दिन २०२२ साजरा झाला. त्या निमित्ताने अनेक पातळ्यांवर विविध उपक्रमांचे आयोजन केले गेले होते. त्या सर्वांचे संकलन करण्यासाठी हा धागा. काही उपक्रम शासकीय पातळीवरील होते. काही प्रत्यक्ष समारंभाद्वारा साजरे झाले तर अन्य काही वृत्तपत्रे, दृक्श्राव्य माध्यमांतून आणि मराठी संकेतस्थळांवर साजरे झाले. माझ्या माहितीतील अशा उपक्रमांची नोंद करीत आहे. वाचकांनी या व्यतिरिक्त त्यांना माहीत असलेल्या उपक्रमांची जरूर भर घालावी.

* पुणे आकाशवाणीवर मराठी भाषा दिनानिमित्त एक सुरेख परिसंवाद झाला. त्याचे सूत्रसंचालन केले होते वंदना बोकील-कुलकर्णी यांनी. काही प्राध्यापकांचा यात समावेश होता. सुरेख चर्चा झाली. चांगल्या मराठीचा (बोलणे/लिहिणे) प्रसार होण्यासाठी प्रत्येक मराठी भाषकाने आपापल्या परीने काय करावे यावर त्यात उहापोह झाला. बोकील यांनी, त्यांनी आयोजित केलेल्या एका चांगल्या उपक्रमाचा उल्लेख केला. त्याचे नाव चांदण्यातील गप्पा असे होते. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांसाठी तो उपक्रम होता. त्यात मराठीच्या विविध पैलूंचा मुलांना परिचय करून देण्यात आला. तो उपक्रम मुले व पालक या दोघांनाही खूप आवडला.

* मराठी पत्रलेखन स्पर्धा :
एबीपी माझाची पत्रलेखन स्पर्धा, पत्रलेखन उपक्रमातली निवडक पत्रं.
...
* वैचारिक लेख
मराठीची सद्य:स्थिती : काही अल्पचर्चित मुद्दे!

.*मराठी साहित्यविषयक विविध पुरस्कार :

ok

* मायबोली संकेतस्थळाचा मराठी भाषा दिवस २०२२ उपक्रम: त्यातील उल्लेखनीय बाबी :
- माझे मराठीचे मास्तर / बाई यावरील लेख
- भाषेचे अलंकार हा समूहखेळ
- साहित्य अभिवाचन/साहित्यवाचन

अभिनंदन !
असेच उपक्रम विविध स्तरांवर घडत राहोत ही सदिच्छा.