भाग १ Wordle
......
Wordle शब्दखेळ एव्हाना लोकप्रिय झालाय. तो खेळून अनुभवी झालेल्यांसाठी सादर आहे या खेळाची नवी आवृत्ती Absurdle ! (नवोदितांनी इथे येण्याआधी भाग १ ला भेट द्यावी आणि त्या खेळाचा सराव करावा).
Absurdle हा नवा खेळ Wordle च्याच धर्तीवर आहे. म्हणजे तीन रंगी चौकटींचा अर्थ पूर्वीप्रमाणेच. या खेळातील बदल/वैशिष्ट्ये अशी आहेत :
१. इथे निर्मात्याने गुपित ठेवलेला ओळखायचा शब्द पक्का नसतो. खेळाडूच्या प्रत्येक प्रयत्नाबरोबर तो बदलत जातो. परंतु खेळाडूने आधी ओळखलेल्या अक्षरांवर त्याचा परिणाम होत नाही.
२. खेळाचे एकूण प्रयत्न तसे अमर्यादित ठेवले आहेत. वर्डलप्रमाणे पक्के ६ नाहीत.
३. अशा प्रकारे खेळत आपण एका ‘योग्य’ शब्दाशी पोचतो. आता आपल्याला वाटते की आपण जिंकलो; पण नाही !
४. खेळाची यंत्रणा लगेच बदलून नवा शब्द अपेक्षिते. अशा बदलत्या अपेक्षित शब्दांची संख्या बर्यापैकी असू शकते. उदाहरणार्थ मी खेळून सोडविलेला spool हा शब्द बघा :
५. तो मी ८ प्रयत्नात सोडवलाय. यात तुमच्या लक्षात येईल की तिसऱ्या ओळीतच मी एक अधिकृत इंग्लिश शब्द शोधला होता. पण ते अपेक्षित उत्तर नव्हते.
६. चौथ्या प्रयत्नात मी spoof हा योग्य शब्द ओळखला पण लगोलग त्यांची यंत्रणा बदलली आणि spoo* अशी रचना असलेले पण शेवटचे अक्षर भिन्न असलेले अजून काही शब्द त्यांनी खेळात सोडले.
७. शेवटी spool हा शब्द आला तेव्हा त्यांचा हा साठा संपला. म्हणून ते उत्तर बरोबर ठरले !
.....
हा खेळ एकत्रित स्वरुपात कायमस्वरूपी इथे उपलब्ध आहे :
याचा दैनंदिन प्रकार नसावा. म्हणजेच, इथे अमुक एक कोडे क्रमांकचे उत्तर सर्वांसाठी एकच हा प्रकार नाही. प्रत्येक खेळाडूच्या चालीनुसार त्यांची यंत्रणा अपेक्षित शब्द बदलत राहते. पहिल्या चालीसाठी आपल्याला जर स्वतःचा शब्द सुचत नसेल तर त्यांनी Random guess चा तयार पर्याय ठेवलेला आहे. ते बटन दाबले तरी चालते. तुमचे उत्तर बरोबर आल्यावर जी अक्षरांसकट सर्व चौकट समोर असेल ती जशीच्या तशी इथे डकवावी. या खेळात वर्डलप्रमाणे उत्तर लपवून ठेवण्याची गरज नाही, कारण प्रत्येक खेळाडूला प्रत्येक खेळात आपापले वेगळे उत्तर मिळणार आहे. सर्वांसाठी अमुक एक क्रमांकाचे कोडे हा प्रकार नाही.
सारांश : या खेळात निव्वळ तर्कापलीकडे जाऊन निर्माता आपला शब्दसंग्रह पूर्ण खुला करुन ‘बाहेर’ काढायला उद्युक्त करतो. इथे लवकरात लवकरच्या पायरीवर उत्तर आले याचे कौतुक नसून ते आपला खेळ मुद्दाम अधिकाधिक लांबवत नेतात. तीच या खेळाची मजा आहे.
.....
हा खेळ 10 जानेवारी 2022 रोजी अस्तित्वात आलेला आहे. वर्डल आणि हा खेळ यांच्याबद्दल काही रंजक माहिती:
१. या दोन्ही खेळांची शब्दबँक एकच आहे.
२. त्या बँकेमध्ये 2315 अपेक्षित उत्तरांचे शब्द आहेत. याव्यतिरिक्त 10657 राखीव गूढ शब्द म्हणून असतात. परंतु ते अपेक्षित उत्तर नसतात.
३. Absमध्ये नवप्रज्ञेच्या तंत्राचा सुरेख वापर केलेला आहे. निर्मात्यांच्या दाव्यानुसार यातील एखाद्या खेळाचे उत्तर कमीत कमी चौथ्या पायरीवरच येऊ शकते. जर कोणी ते तिसऱ्या पायरीवरच ते बरोबर आणून दाखवले तर ती अभूतपूर्व घटना असेल ! अर्थात हा मुद्दा स्पष्ट व्हायला अजून काही महिने जावे लागतील.
………………………………………………………………………………………………………………………
2021 हे वर्ष जागतिक स्तरावर कोविडमय होते. त्या काळात अमेरिकी संगणक अभियंता Josh Wardle आणि त्याची शब्दप्रेमी प्रेमिका पलक शाह यांनी मिळून Wordle हा खेळ विकसित केला. पुढे तो जालावर उपलब्ध झाला आणि प्रचंड लोकप्रिय झाला. या खेळाची एक पुढची पायरी म्हणून या द्वयीने Absurdle या खेळाची निर्मिती केली. या दोन्ही खेळांची लोकप्रियता बघून अन्य लोकांनी त्या खेळासारखी काही प्रारूपे तयार केली. ती सुद्धा जालावर खेळण्यास उपलब्ध आहेत.
ऑनलाइन इंग्लिश शब्दखेळांच्या विश्वातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. यानिमित्ताने या सर्व खेळांची एकत्रित यादी इथे करून ठेवणे महत्त्वाचे वाटते.
१. Wordle
२. Absurdle
३. Dordle : https://zaratustra.itch.io/dordle.
हे जुळे Wordle म्हणता येईल. याला दोन समान भाग आहेत. आपण अक्षरे त्यात घालू लागलो की तीच अक्षरे दोन्ही बाजूंना उमटतात. रंगांचे अर्थ पूर्वीप्रमाणेच. फक्त त्यात एखादे अक्षर एका बाजूला चालणारे असते तर दुसऱ्या बाजूला नसते. असे करत करत कुठल्यातरी एका बाजूला अंतिम उत्तर येते.
४. Primel : हा अंकप्रेमींसाठी असून त्यात पाच अंकी मूळ संख्या तयार करायची असते. (https://converged.yt/primel/)
५. Sweardle : हे चार अक्षरी Wordle असून इथे फक्त बोलीभाषेतील उद्धट शब्दांचा वापर केला जातो.
६. Lewdle : या खेळात फक्त बोलीभाषेतील लैंगिक शब्दांचा वापर केला जातो.
अशा तर्हेने एका सूत्रावर आधारित वरील प्रकारचे विविध खेळ जालावर उपलब्ध आहेत. प्रत्येकाला आपापल्या आवडीप्रमाणे हवा तो खेळ निवडता येईल.
धन्यवाद !
प्रतिक्रिया
27 Jan 2022 - 9:01 am | कुमार१
Wordle आणि Absurdle या दोन्ही खेळांचे धागे मुद्दामच स्वतंत्र ठेवले आहेत.
प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार संबंधित धाग्यात सहभागी होता येईल.
धन्यवाद !
27 Jan 2022 - 7:39 pm | Nitin Palkar
काही दिवस वैयक्तिक कारणास्तव मिपावर येऊ शकलो नाही. आज प्रथमच world खेळून बघितला. मजा आली. Absurdle ला अजून थोडा वेळ जाईल....
27 Jan 2022 - 7:40 pm | Nitin Palkar
Wordle
27 Jan 2022 - 8:01 pm | राघवेंद्र
कुमार सर ऑफिस चे काम करू द्या की ?
आधी मिपाचे व्यसन, त्यात WORDLE ची भर आणि आता Absurdle
प्रयत्न करेल :)
27 Jan 2022 - 8:11 pm | कुमार१
निपा,
नक्कीच ! जसे अजून खेळाल तशी मजा वाढत जाईल मग हा पण खेळ आवडेल.
.....
राघवेंद्र
सध्या घरून काम करताना जास्ती ताणतणाव आहेत. म्हणून ही रंजक व्यसने हवीत !
जरूर खेळा :)
28 Jan 2022 - 6:43 pm | कुमार१
पाचव्या पायरीवर जिंकेन असं वाटलं होतं.
पण छे ! खेळ पुढे पळवतोच....
कोणाला पाच पायऱ्यामध्ये जमतय का बघा.
30 Jan 2022 - 4:25 pm | कुमार१
या लोकप्रिय खेळाच्या निमित्ताने भाषेसंबंधी काही रंजक वाचन झाले. त्यातील विशेष काही नोंदवतो.
१. काही अभ्यासकांनी यासाठी सुमारे ६०,००० शब्दांचा विशेष अभ्यास केला. त्यातून असे लक्षात आले की 46 टक्के शब्दांमध्ये e हे अक्षर असते.
२. याचे कारण सोळाव्या शतकातील भाषा सुधारणेला जाते. तेव्हा बऱ्याच शब्दांच्या शेवटी सायलेंट e जोडण्यात आला (उदाहरणार्थ tone).
३. e च्या खालोखाल a, r व o यांचे क्रमांक येतात.
४. शेरलॉक होम्सच्या एका कथेमध्ये एका सांकेतिक चित्राचा रहस्यभेद करायचा असतो. (चित्र पाहा):
तो करताना सर्वाधिक असणारे चित्र म्हणजे e अक्षर असले पाहिजे अशी कल्पना केलेली आहे.
५. e अक्षराची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी फ्रेंच भाषेत A Void या नावाची एक कादंबरी लिहिली गेली.
(चित्र जालावरुन साभार)
30 Jan 2022 - 6:50 pm | मुक्त विहारि
नाचणारी माणसे, अशा नावाची कथा आहे...
4 Feb 2022 - 1:11 pm | कुमार१
६ अक्षरी वर्डल इथे
5 Feb 2022 - 5:32 pm | कुमार१
आज प्रथमच Abs पाचव्या प्रयत्नात जमले. चौथ्या प्रयत्नात quiff हा अपरिचित शब्द टकल्यावर वाटले होते की कदाचित चौथ्या प्रयत्नातच येईल.
पण छे !
असो. प्रगती झाली
5 Feb 2022 - 7:54 pm | कॉमी
वर्डल वरील एक रंजक लेख वाचला.
https://aperiodical.com/2022/02/a-mathematicians-guide-to-wordle/
5 Feb 2022 - 8:05 pm | कुमार१
होय, तो मी दोन दिवसांपूर्वीच वाचला.
सुंदर विश्लेषण केलेले आहे.