उबुंटू/लिनक्सवर गमभन प्रणाली वापरून मराठी लेखन कसे करावे?

Primary tabs

उपाशी बोका's picture
उपाशी बोका in तंत्रजगत
25 Jan 2022 - 11:42 am

उबंटूवर ऑफलाइन (म्हणजे ब्राउजर न वापरता) मराठी लिहायचे असेल तर मला त्रास झाला आहे.
iTrans (m17n) ही प्रणाली त्यातल्या त्यात "गमभन"च्या जवळ जाणारी आहे. बाकी इतर KaGaPa phonetic, inscript (m17n), phonetic (m17n)आणि हिंदी बोलनागरी वापरून मराठी लिहिणे खूपच कठीण आहे आणि पटपट लिहिणे तर जवळपास अशक्य आहे, विशेषतः मायबोली आणि मिसळपावसारखी "गमभन"ची सवय असेल तर.

गमभन आता लिनक्सवर कसे आणायचे ते आता कळले आहे. त्याची माहिती पुढीलप्रमाणे.
$cd /usr/share/m17n
$sudo cp mr-itrans.mim mr-gamabhana.mim

मग mr-gamabhana.mim ही फाइल एडिट करा.
$sudo edit mr-gamabhana.mim (सूडो वापरणे महत्वाचे आहे. File must be owned by root.)
महत्वाचे म्हणजे पुढील बदल हवेत. (पहिली ओळ ही फक्त कॉमेंट आहे)
;; mr-gamabhana.mim -- Marathi input method with ITRANS method
(input-method mr gamabhana)

तुम्हाला जमत नसेल तर मी माझी फाईल पाठवू शकेन. (अजून १००% टेस्ट केलेली नाही, पण बर्‍यापैकी बदल केले आहेत ते व्यवस्थित वाटले)
नंतर रिबूट करा.
सेटिंग्ज => रिजन्/लँग्वेज मध्ये जाऊन Marathi (gamabhana(m17n)) इंस्टॉल करा आणि मग LibreOffice Writer मध्ये लिहून बघा.
ही माहिती उपयोगी पडेल असे वाटले, म्हणून इथे देत आहे.
धन्यवाद.

प्रतिक्रिया

वामन देशमुख's picture

25 Jan 2022 - 1:22 pm | वामन देशमुख

उपयुक्त माहिती.

उबंटूवर ऑफलाइन (म्हणजे ब्राउजर न वापरता) मराठी लिहायचे असेल तर मला त्रास झाला आहे.

धाग्याच्या मुख्य विषयाशी कदाचित विसंगत वाटणारा भाग पुढे लिहित आहे -

मी शक्यतो ब्राउझर आधारित प्रणाल्या वापरतो.

१. थोडेसे काही लिहायचे असेल तर गूगल इनपुट टूल्स -

२. दीर्घ आणि एका बैठकीत ना होणारे लिखाण करायचे असेल तर गूगल डॉक

(एकेकाळचा उबुंटू चाहता)
वामन

निनाद's picture

25 Mar 2022 - 8:55 am | निनाद

चांगली माहिती आणि तुम्हाला जमत नसेल तर मी माझी फाईल पाठवू शकेन. म्हणजे मार्ग काढून लगेच कृती करून शिवाय मदतीची तयारी केली हे खास आवडले आहे.

गामा पैलवान's picture

25 Mar 2022 - 7:15 pm | गामा पैलवान

उपाशी बोका,

माझ्या कुबुण्टु कृतकयंत्रावर टाकून पहातो. धन्यवाद! :-)

आ.न.,
-गा.पै.